Tag: MH34

  • Sudhir Mungantiwar social initiatives । आराध्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य – मुनगंटीवारांचे सामाजिक कार्य ठरले दीपस्तंभ

    Sudhir Mungantiwar social initiatives

    “जेव्हा राजकारण संवेदनशील मनाने बोलते…”

    कधीकाळी hopeless वाटणाऱ्या परिस्थितीचा turning point ठरला, जेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. अवघ्या एका वर्षाची आराध्या, जिला complete hearing loss होता, तिच्या आयुष्यात एक miracle moment आला – जेव्हा कॉक्लियर इम्प्लांटसारखी क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिने life’s first sounds ऐकले. वाघमारे कुटुंबासाठी तो क्षण emotional आणि unforgettable ठरला.

    Sudhir Mungantiwar social initiatives चंद्रपूर, दि. १३ – राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांसाठी १२ एप्रिल २०२५ हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्यांची मुलगी आराध्या मंगेश वाघमारे हिची कॉक्लियर इम्प्लांट ही अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला नसता तर आम्हाला आज हा आनंद अनुभवता आला नसता, या शब्दांत वाघमारे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत. Best ENT surgeon for cochlear implant

    चंद्रपुरात पोलिसांवर २ युवकांनी केला हल्ला

    आराध्या अवघी १ वर्षांची असताना दोन्ही कानांना पूर्णतः बहिरेपणा असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वाघमारे कुटुंब चिंतेत होते. प्राथमिक उपचारांमध्ये काहीच यश न मिळाल्यानंतर त्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष दिले. सागर खडसे यांना वाघमारे कुटुंबाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

    आ. श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी योग्य मदत व पाठबळ दिल्यामुळे टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ. श्वेता लोहिया यांच्या मार्गदर्शनात आराध्याचे ऑपरेशन पार पडले. आज आराध्या ऐकू शकते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू या यशोगाथेची साक्ष देतात. वाघमारे कुटुंबाने सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. Tata Trust cochlear implant program

    मंगेश वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आ. श्री. मुनगंटीवार यांना देवदूत म्हटले आहे. ‘आमच्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले आहेत. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आरोग्य सेवेत मानवी दृष्टीकोन व संवेदनशील नेतृत्व किती महत्त्वाचे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करणार आहो,’ अश्या भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केल्या.

    सुधीर मुनगंटीवार यांचे संवेदनशील नेतृत्व

  • CIPET Chandrapur plastic industry courses । महाज्योतीची ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! २००० जणांना मिळणार मोफत प्रशिक्षण.

    CIPET Chandrapur plastic industry courses

    CIPET Chandrapur plastic industry courses :  चंद्रपुर येथील सेंट्रल इन्स्टिट्‌युट ऑफ पेट्रोकेमिकल ऍण्ड  टेक्नॉलॉजी (सिपेट) या संस्थेच्या कार्याचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (Hansraj Ahir) यांनी दिनांक ०८ एप्रिल रोजी आढावा घेतला. वेकोलि वणी क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिपेटचे प्रमुख अवनितकुमार जोशी, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंह व सिपेट मधील प्रशिक्षित विद्यार्थी उपस्थित होते. ree skill training for OBC students

    चंद्रपुरात पोलिसांवर हल्ला


                       यावेळी हंसराज अहीर यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्यविकास कार्यकमाची माहिती जाणून घेतली तसेच प्रशिक्षणानंतर निर्माण झालेल्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक संधीचा  आढावा सुध्दा घेतला. सन २०२१-२२ पासून आजपर्यंत सिपेट मार्फत एकूण ७७५१ युवक-युवतींनी विविध प्रशिक्षण कार्यकम पुर्ण केलेले आहे. सोबतच प्लास्टिक उद्योग क्षेत्रात रोजगाराची संधी सुध्दा त्यांना मिळाली असल्याची संस्थेच्या माध्यमातून अहीर यांना माहिती देण्यात आली. CIPET Chandrapur placement opportunities


    हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून सिपेटची चंद्रपुरात उभारणी झाली असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी इथे प्रशिक्षण घेवून रोजगार व स्वयंरोजगार मिळविला आहे. संस्थेच्या रोजगाराभिमुख उपक्रमाबद्दल अहीर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. सिपेटसोबत नुकताच पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नागपुर द्वारा सिएसआर अंतर्गत २०० सुशिक्षित युवक-युवतींसाठी सहा महिन्यांच्या अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यापुर्वी महाज्योती नागपुर संस्थेमार्फत विदर्भातील २००० ओबीसी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचेही अहीर यांना श्री जोशी यांनी सांगीतले. सदर प्रशिक्षणास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले, प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन, प्रशिक्षण किट आदी बाबी मोफत देण्यात येणार असून या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना सिपेट मार्फत प्लास्टीक उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही सिपेट द्वारा सांगण्यात आले.


                  यावेळी हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रायोजित कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थीसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. अमित मेश्राम, सौरभ भजनकर, ऋतु दडमल या विद्यार्थ्यांनी टाकावु वस्तुपासून सायकल तयार केली. त्यांना चंद्रपुर मनपा द्वारा रु. ५०००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांचा अहीर व वेकोलि मुख्य महाप्रबंधकांनी प्रशस्तीपत्र देवून सम्मानित केले.


               प्रसार व जनजागृतीचे सिपेट मार्फत प्रयत्न होत असले तरी अजुनही विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षण व रोजगार संधीब‌द्दल पुरेशी माहिती मिळत नसल्याने सिपेट ने प्रशिक्षण कार्यक्रमाचा व्यापक स्तरावर प्रचार करावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी सिपेट प्रमुखांना केली. त्यांनी येथे कार्यरत सुरक्षाकर्मी व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार वेतन व भत्ते दिल्या जातात कां या विषयी चौकशी करुन शासन नियमानुसार वेतन, भत्ते देण्याची सुचना केली. स्थानिकांना प्रशिक्षणात प्राधान्य देण्याविषयी सुचित केले.

  • Attack on police officer in Chandrapur । चंद्रपूर पोलिसांवर पुन्हा हल्ला, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

    Attack on police officer in Chandrapur

    पोलिसांना शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

    Attack on police officer in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी ने राक्षसी रूप धारण केले असून या राक्षसी रूपाच्या विळख्यात पोलीस कर्मचारी सुद्धा पिसल्या गेले आहेत. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिना भरापूर्वी पोलीस शिपायाची हत्या झाली होती. आता पुन्हा कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षाला मारहाण केल्याची धक्कादायक १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. Chandrapur police attack

    चैत्र नवरात्री निमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी महाकाली मंदिर परिसरात जिल्हाभरातून पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहे, भाविकांची सुरक्षा करतेवेळी पोलीस सुद्धा असुरक्षित झालेले आहे असे चित्र या घटनेतून पुढे आले आहे.

    चंद्रपुरातील इरई नदी होणार स्वच्छ

    १० एप्रिल रोजी अंचलेश्वर गेट जवळ पोलीस आपलं कर्तव्य बजावीत होते, यावेळी त्याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, वाहतूक पोलीस नितीन दुभे व सुधीर रणदिवे उपस्थित होते. रात्री ९.३० वाजता मालवाहू चारचाकी वाहन त्याठिकाणी आले. पोलिसांनी नियमांप्रमाणे वाहन चालकाला कुठे जायचं आहे, पास आहे का असे विचारले मात्र वाहनातील दोघांनी पोलिसांना अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Chandrapur law and order

    कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांचा विरोध करीत समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोन्ही इसम पोलिसांवर धावून गेले त्यातील एकाने पोलीस उपनिरीक्षक दराडे यांची गच्ची पकडत मारहाण करीत शिवीगाळी केली. त्या पोलिसाला मारलं ती घटना तुम्ही विसरले काय? तुमची अवस्था तशीच करणार अशी जीवे मारण्याची धमकी त्या दोघांनी पोलीस कर्मचारी व पोउपनि यांना दिली.

    पोलिसांनी तात्काळ शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना संपर्क करीत घडलेला प्रकार सांगितला, पोलीस कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले व त्या दोघांना आपल्या ताब्यात घेतले. २८ वर्षीय आदिल अल्ताफ आरा, २२ वर्षीय अयान अल्ताफ आरा दोघे राहणार भावसार चौक घुटकाला यांच्यावर कलम १३२ , २२३, २९६, ३५१ (३), ११५ (२) शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    या घटनेवरून चंद्रपूर पोलिसही आता असुरक्षित आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

  • Maharashtra 100-day action plan । चंद्रपूर जिल्ह्यात 100 दिवसांच्या कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी

    Maharashtra 100-day action plan

    Maharashtra 100-day action plan : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने सर्व शासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात उत्तम सेवा मिळावी, हा संकल्प कृती आराखड्यामागे असून आतापर्यंत विविध विभागामार्फत जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला. Maharashtra government digital services

    चंद्रपुरातील इरई नदीचे होणार पुनरुज्जीवन

    वन अकादमी येथे आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, गिरीश धायगुडे पालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

    maharashtra government digital services

    यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने ई-ऑफिस ही संकल्पना प्रभावीपणे राबवली असून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालय ई -ऑफिसने जोडली आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. कृती आराखड्यांतर्गत सर्व शासकीय विभागांनी आपापले संकेतस्थळ अद्यावत करून नागरिकांना उत्तम सेवा मिळेल, यासाठी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच उत्तम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय सुध्दा असावे.

    राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसारच सर्व विभागांनी कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमध्ये नियमितपणे स्वच्छता, स्वतंत्र शौच्छालये असली पाहिजे. तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी भेटीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. जिल्हा परिषदेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे. आरोग्य संस्थेत आलेल्या गोरगरिबांना चांगली सेवा द्यावी. पोलिस विभागाने नागरिकांसोबत सुसंवाद वाढवावा, यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. Infrastructure development in Chandrapur

    सादरीकरण करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी संकेतस्थळ अद्यावत करणे, केंद्र शासनासोबत सुसंवाद, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमान, ऑनलाईन शस्त्र परवाना, बळीराजा समृद्ध मार्ग, जिल्हा प्रशासनाचे व्हाट्सअप चॅटबोट, शासकीय कामकाजात अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक न्यायालयीन बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब आदींबाबत माहिती दिली. तसेच जिल्हास्तरावरील कार्यालयांनी पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपर्यंत तर त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी 30 एप्रिलपर्यंत 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिले.

  • irai River rejuvenation in chandrapur । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी – इरई नदीचे १७ किमी पात्र होणार स्वच्छ व विस्तृत!

    irai River rejuvenation in chandrapur

    17 किमी नदीपात्रात गाळ, झुडपे आणि अतिक्रमण हटविण्याची मोहीम

    irai River rejuvenation in chandrapur : इरई नदी ही चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहते. चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या 17 किमी नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच इराई नदीपात्राची पूरवहन क्षमता वाढविणे यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.  Flood Prevention & Management

    ४ लाखांची लाच मागणारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्या घरी मिळाली ८ लाखांची रोकड

    इरई नदीच्या पुनरुज्जीवन अभियानसंदर्भत वन अकादमी येथे आयोजित बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून इरई नदी पुनरुज्जीवन अभियान जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी होणार आहे. इरई नदी खोलीकरण लोक चळवळ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी –कर्मचारी, जिल्ह्यातील सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी यात हिरहिरीने भाग घेऊन आपले योगदान द्यावे. हे अभियान आपले आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे.  नदी काठावरील जागेवर असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खाली भूखंडावर यापुढे कोणतीही बांधकाम होणार नाही, यासाठी प्रभावी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच सद्यस्थितीत नदीकाठावर असलेल्या अतिक्रमणबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिल्या. River desilting techniques

    flood prevention& management

    आमदार मुनगंटीवार यांनी केल्या सूचना : डब्ल्यूसीएल ने या उपक्रमात उदार होऊन साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत करावी. सीटीपीएस ने सुद्धा गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. यातून निघणारा गाळ हा शहरातील खोलगट भाग असलेल्या जागेवर टाकून मैदान तयार करता येईल का, याबाबत नियोजन करावे. नदी पात्रामधील अतिक्रमणाच्या विषयाचे योग्य नियोजन करावे. 17 किलोमीटर मध्ये झुडपे आणि गाळ काढण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे. तसेच इरई नदी निरंतर वाहण्यासाठी बंधारे बांधावे. नदी पुनरुज्जीवनासाठी पाच वर्षाचा कार्यक्रम ठरवावा. Chandrapur environmental initiatives

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, इराई नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत पाच लक्ष ब्रास गाळ काढण्याचे नियोजन आहे. सदर काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. नदीच्या पात्रातून निघणारा गाळ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच यातून निघणारी वाळू ही घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. डब्लूसीएल आणि औष्णिक विद्युत केंद्राने गाळ काढण्यासाठी साहित्य तसेच आर्थिक मदत करावी, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मशीन उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

    जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन : इरई नदीचे पुनरुज्जीवन हा एक सामाजिक उपक्रम आहे. शहराला पडणारा पुराचा वेढा, यापासून मुक्ती मिळण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध स्तरावरून निधीचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा मानस असून सर्वात प्रथम शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी या उपक्रमासाठी आपला एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

    प्रशासनाचे नियोजन – 45 दिवसात 5 लाख ब्रास गाळ काढण्याचे लक्ष्य

  • Shehnaz Akhtar live in Chandrapur । भक्ती आणि सूरांचे संगम: महाकाली यात्रेत शहनाज अख्तर यांच्या आवाजाची जादू!

    Shehnaz Akhtar live in Chandrapur

    महाकाली यात्रेतील भव्य भक्ती संगीत संध्या

    Shehnaz Akhtar live in Chandrapur : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात आयोजित करण्यात आलेला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला चंद्रपूरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव घेतला. Shehnaz Akhtar Bhajans

    चंद्रपुरात जय भीम यात्रा

      या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक, 

    विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख रविंद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांची उपस्थिती होती. यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    shehnaz akhtar bhajans

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण होते. अशा उपक्रमांद्वारे चंद्रपूरमध्ये भक्ती आणि संस्कृती यांचे संतुलन राखले जात आहे. यंदा यात्रा परिसरात प्रशासनाच्या सहकार्याने आपण उत्तम व्यवस्था उभी करू शकलो. यात्रा परिसराचा विस्तार केल्यामुळे भाविकांना राहण्याची सोय झाली. पिण्याच्या पाण्याची, पूजा साहित्य खरेदीची, आंघोळीची, चेंजिंग रूमची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. Bhajan Sandhya Event

    या वर्षीच्या यात्रेचे आयोजन विशेष ठरले. प्रशासनाच्या सक्रिय सहकार्यामुळे यात्रा परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकाने, अन्नदान वितरण व्यवस्था, आणि भाविकांसाठी मार्गदर्शक स्वयंसेवक यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुसंगठित झाली. ही सर्व व्यवस्था करताना जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसत होता, हीच आपल्या प्रयत्नांची खरी पावती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Bhakti Geet Program

    शहनाज अख्तर यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या संतवाणी, भक्तिगीते आणि भावगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अल्पावधीत सदर व्यवस्था उभारण्यात आल्याचे सांगितले. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

    या कार्यक्रमाला मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर आहिर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्री माता महाकाली महोत्सवचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, मोनू चौधरी, प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, पुरुषोत्तम राऊत, कल्पना बबूलकर, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे विश्वस्त वंदना हातगावर, सविता दंढारे, श्याम धोपटे, चंदू वासाडे, अजय वैरागडे, संजय बुरघाटे, रूपेश भुते, रंजन ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.

    शहनाज अख्तर Live – भावगीते आणि संतवाणींचा संगम

  • Lighting for Ambedkar Jayanti | आंबेडकर जयंतीला शासकीय कार्यालयांवर रोशनाईची मागणी – खासदार धानोरकरांचा पुढाकार!

    Lighting for Ambedkar Jayanti

    १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरी व्हावी, यासाठी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील शासकीय इमारती रोशन करण्याची मागणी.

    Lighting for Ambedkar Jayanti : दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. सदर जयंती निमित्त चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. Ambedkar Jayanti in Chandrapur and Yavatmal

    चंद्रपुरात जय भीम पदयात्रा

    ज्याप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या वेळी शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्यात येते त्याचप्रमाणे, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयावर विद्युत रोशनाई करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे.

    संविधानाने दिलेल्या तत्वावर चालणार हा संपुर्ण देश दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीने उजाळला जावा या हेतुने खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे. याकरीता खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

  • Rajura coal mine local jobs । अन्याय सहन करणार नाही! मनविसेचा श्री. बुद्धा कंपनीला कठोर इशारा!

    Rajura coal mine local jobs

    ८०% चा नियम गेला कुठे? राजुराच्या खाणीत स्थानिकांवर मोठा अन्याय!

    Rajura coal mine local jobs : राजुरा: राजुरा तालुक्यातील गौरी पवनी येथील कोळसा खाणीत श्री. बुद्धा या कंपनीकडून स्थानिक बेरोजगार युवकांना डावलले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. कंपनी व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातील कामगारांना रोजगार देत असल्याचा दावा मनविसेने केला आहे. Maharashtra coal mine job quota

    चंद्रपुरात जयभीम पदयात्रा

    या संदर्भात काही स्थानिक बेरोजगार युवकांनी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. कुलदीप चंदनखेडे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर तातडीने दखल घेत श्री. चंदनखेडे यांनी थेट श्री. बुद्धा कंपनी गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. Shri Buddha company job controversy

    श्री. चंदनखेडे यांनी कंपनी व्यवस्थापनाला येत्या सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर या कालावधीत स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीत सामावून घेतले नाही, शासन निर्णयानुसार (जी.आर.) वेतन दिले नाही आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कंपनीतील कामकाज मराठी भाषेत सुरू केले नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

    मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

    या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी श्री. बुद्धा कंपनी व्यवस्थापनाची असेल, असा इशाराही श्री. चंदनखेडे यांनी दिला आहे.

    यावेळी मनविसेचे जिल्हा सचिव किशोर भैय्या मडगुलवार, प्रवीण शेवते, कृष्णा गुप्ता, शंकर भडके, प्रशांत रामटेके आणि इतर मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनविसेने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थानिक बेरोजगार युवकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता कंपनी व्यवस्थापन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Ambedkar Jayanti 2025 Chandrapur । चंद्रपूरमध्ये जयभीम पदयात्रा: डॉ. आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन

    Ambedkar Jayanti 2025 Chandrapur

    Ambedkar Jayanti 2025 Chandrapur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कीडा संकुल येथून 13 एप्रिल 2025 रोजी ला सकाळी 6.30 वाजता जयभीम पदयात्रा निघणार आहे. Jay Bhim Padayatra 2025

    चंद्रपुर जिल्हा परिषदेत लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

                  या पदयात्रेचा मार्ग जिल्हा क्रीडा संकूल- डॉ. आंबेडकर महाविद्यालय चौक-पवनसूत दवा बाजार-पाण्याची टाकी, परत वरोरा नाका चौक-जिल्हा क्रीडा संकूल याप्रमाणे असेल. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यासह नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.

                डॉ. बाबासाहेबांनी भारताला सर्वोत्तम राज्यघटना दिली. त्यांच्या दूरदष्टीचा व कार्याचा गौरव करण्याकरीता जास्तीत जास्त नागरीक, विविध सामाजिक संघटना, क्रीडा मंडळे, शैक्षणिक संस्था, क्रीडा शिक्षक, खेळाडू व विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

  • Railway doubling project Vidarbha । विदर्भाला नवी झेप: बल्लारशा-गोंदिया रेल्वे दुहेरीकरणासाठी ४८१९ कोटींची भव्य गुंतवणूक!

    Railway doubling project Vidarbha

    विदर्भातील दळणवळणास नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

    Railway doubling project Vidarbha : महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या बल्लारशाची सीमा तेलंगणासोबत तर गोंदिया जिल्हा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे बल्लारशा – गोंदिया रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे सर्वात जास्त फायदा विदर्भाला होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. Ballarshah Gondia railway line update

    चंद्रपूर जिल्ह्यात १७ हजार ४३१ कोटी ची गुंतवणूक

    मुंबई येथून या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तर चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी व पत्रकार उपस्थित होते.  

    Press conference

    यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बल्लारशा – गोंदिया रेल्वे लाईन करिता 4819 कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विदर्भाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. राज्यात रेल्वेचे 1 लक्ष 73 हजार कोटींचे प्रकल्प सुरू असून महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिकीकरण केंद्र सरकारने हाती घेतले आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार असून मॉडेल रेल्वेच्या माध्यमातून किल्ले व इतर ऐतिहासिक बाबींचे पर्यटन होण्यासाठी 10 दिवसांच्या रेल्वेचे नियोजन आहे, ही आपल्या राज्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. रेल्वे विभागाचे महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. Gondia Ballarshah rail route development

    पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह इकॉनोमिक समीट 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत होणार आहे. त्यासाठी 100 देशातील प्रतिनिधी उपस्थित राहतील. जगातील सर्वात मोठा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या निर्मितीला हिरवी झेंडी दिली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

    यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बल्लारशा – गोंदिया रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भाग या रेल्वेच्या माध्यमातून जोडला जाईल. त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार असून या रेल्वे मार्गामुळे आकांक्षीत तालुकेसुद्धा जोडले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक रेल्वे प्रकल्प सुरू केले आहेत. यात जालना -जळगाव रेल्वे प्रकल्प 7160 कोटी, मनमाड- इंदोर प्रकल्प 18000 कोटी, मनमाड -जळगाव प्रकल्प 2700 कोटी, भुसावळ -खंडवा रेल्वे प्रकल्प 3500 कोटी असे एकूण 1 लक्ष 73 हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात करण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. Gondia Ballarshah rail route development

    असा राहील रेल्वेमार्ग : बल्लारशा – गोंदिया रेल्वे दुहेरीकरणामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण 29 स्टेशन जोडले जातील. हा रेल्वेमार्ग एकूण 240 किमी लांबीचा असून यावर 36 मोठे पुल, 338 छोटे पूल तर 67 पुल रेल्वे लाईनच्या खाली असणार आहे.

    बल्लारशा–गोंदिया रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प

    परिचय: प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि महत्त्व

    प्रकल्पाची तपशीलवार माहिती

    • लांबी: 240 किमी
    • खर्च: ₹4,819 कोटी
    • समाविष्ट जिल्हे: गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर

    पायाभूत सुविधा विकास

    • 29 रेल्वे स्थानके
    • 36 मोठे पूल, 338 छोटे पूल
    • 67 रोड अंडर ब्रिजेस (RUBs)
    • आर्थिक आणि सामाजिक लाभ
    • 3.79 कोटी मॅन-आवर्स रोजगार निर्मिती​
    • लॉजिस्टिक खर्चात दरवर्षी ₹2,520 कोटींची बचत​
    • विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास
    • औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील संधी
    • आकांक्षित तालुक्यांचा समावेश
    • राष्ट्रीय आणि आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी
    • उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रवासी व मालवाहतूक सुलभता
    • पर्यावरणीय आणि इंधन बचत
    • दरवर्षी 22 कोटी लिटर डिझेलची बचत​
    • भविष्यकालीन योजना आणि अपेक्षित परिणाम
    • प्रकल्पाची अंमलबजावणी वेळापत्रक
    • स्थानिक अर्थव्यवस्थेवरील प्रभाव