Tag: MH34

  • free silt for farmers । “शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! इरई नदीतून मोफत गाळ मिळवा – नोंदणी सुरू”

    free silt for farmers

    free silt for farmers : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतुन व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरण मोहीम जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. हा सुपीक गाळ शेतकऱ्यांना निःशुल्क नेता येईल, मात्र वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. benefits of silt for farming

    चंद्रपूरचा कडक उन्हाळा खासदार धानोरकर म्हणतात….

    नद्या प्रदुषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे इरई नदी खोलीकरणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. इरई नदीतील गाळ काढण्याची मोहीम 25 एप्रिल ते 8 जून दरम्यान 45 दिवस राबविण्यात येणार आहे. how to use river silt in agriculture

    या मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग लाभणार आहे. 

    मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ निःशुल्क नेण्यास शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याशी अथवा मंडळ अधिकारी प्रवीण वरभे (9595453655) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • summer heat safety tips । चंद्रपूरचा कडक उन्हाळा! खासदार धानोरकरांचे ७ महत्वाचे उष्माघात प्रतिबंधक उपाय

    summer heat safety tips

    summer heat safety tips : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढला असून 40 अंश सेल्सीयस पुढे तापमान गेले आहे. यामुळे जिल्ह्यात नागरीकांच्या आरोग्यावर  उष्माघाताचा प्रकोप होऊ नये याकरीता खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. heatwave precautions

    घरकुल अनुदानात तब्बल ५० हजारांची वाढ

    विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु असलेल्या शाळांना तात्काळ उन्हाळी सुट्ट्या द्याव्यात. तसेच, शहरातील व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून पाणपोई ची व्यवस्था करण्यात यावी. ग्रामीण भागातील पाणी टंचाई करीता टॅंकर च्या संख्येत वाढ करणे, चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याकरीता टोल फ्री नंबर त्यासोबतच, दुपारी 12.00 ते 04.00 या कालावधी संपुर्ण ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवणे.

    तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेद्वारा चमु उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यासोबतच सार्वजनिक स्थळे व शासकीय कार्यालयात थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे तसेच, चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत.

    चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने मे महिन्यात जगात सर्वात उष्ण राहत असल्याने खासदार धानोरकर यांनी या सुचना केल्या आहेत. या सुचनांची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यास नागरिकांना उष्माघातापासून बचाव करणे शक्य होणार आहे.

  • Bengali New Year celebration | बंगाली नववर्ष साजरा करताना चंद्रपूरमध्ये उमटलं सामाजिक सौहार्द!

    Bengali New Year celebration

    Bengali New Year celebration : बंगाली नववर्षाचा हा सण केवळ एक पारंपरिक उत्सव नाही, तर तो नवउद्यम, नवे स्वप्न आणि नवी आशा घेऊन येतो. आजच्या या सांस्कृतिक समारंभाने आपल्या चंद्रपूरात बहुजनता आणि विविधतेतील एकात्मतेचा सुंदर संदेश दिला आहे. बंगाली नववर्ष साजरा करणारा हा उत्सव केवळ तारखांचा बदल नाही, तर संस्कृती, ऐक्य आणि आनंदाचा अप्रतिम संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Pohela Boishakh event

    घरकुल अनुदानात आता 50 हजार रुपयांची वाढ

    चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प येथे बंगाली नववर्ष ‘पोइला बैसाख’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी मंचावर मनोज पाल, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. Bengali festival 2025

    यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरात वास्तव्यास असलेला बंगाली समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. चंद्रपूरच्या विकासात या समाजाचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. या समाजातून अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. हा समाज नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला असून, या समाजातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगाली कॅम्प, कृष्णा नगर या भागात आपण विकासकामे करत आहोत. पुढेही या भागाच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Bengali community

    संस्कृती ही आपली ओळख, आपला जन्मसिद्ध वारसा आहे. आज इथे नृत्य, गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमुळे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरेला नवीन रूप दिले आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या कलादानातून भारतवासीयांच्या विविधतेचा अद्भुत मेळ घातला. सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हेच खरे बंधुत्वाचे प्रतीक आहे. चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशनची ही जबाबदारी आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे.

    स्थानिक कलाकारांनी दिलेली उत्स्फूर्त कला सादरीकरणे तरुणाईला नव्या आत्मविश्वासाची प्रेरणा देतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तुमच्यातील प्रतिभेचा उजेड अधिक तेजस्वी बनवायला शिका. तुमचे कलारूपी बीज आज येथे रुजत आहे. आजचा हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, आपल्याला एकत्र येऊन सामाजिक सौहार्द दृढ करण्याची आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही यावेळी आमदार किशोर  जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

  • Gharkul Yojana subsidy update । घरकुल अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ – सामान्य जनतेसाठी दिलासा!

    Gharkul Yojana subsidy update

    Gharkul Yojana subsidy update : सर्वांसाठी घरे या केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुलाच्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून मिळणारे अनुदान अत्यल्प असल्याचे खासदार धानोरकर यांनी आमदार असतांना तसेच, लोकसभेत देखील मत व्यक्त केले होते.

    तर कामगारांना उष्माघाताचा धोका? हे उपाय एकदा वाचा

    घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी त्यांनी विधानसभा तथा लोकसभेत केली होती. घरकुल अनुदानाच्या निधी वाढी संदर्भात त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाने या संदर्भात दि. 04 एप्रिल रोजी शासन निर्णय प्रसिध्द करुन समोरील टप्प्यातील घरकुलांना 50 हजार रुपये वाढीव निधी मंजुर केला आहे. Maharashtra PMAY-G subsidy increase

    या पैकी 35 हजार रुपये बांधकामाकरीता तर, 15 हजार रुपये हे सौर उर्जा यंत्र उभारणी करीता प्राप्त होणार आहे. खासदार धानोरकर यांनी या संदर्भात केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले असून परंतु, सध्याची महागाई बघता 5 लक्ष रुपये एवढे अनुदान द्यावे असे देखिल मत व्यक्त केले.

    भविष्यात यासंदर्भात आपली मागणी रेटून धरण्याचे देखील सांगितले. खासदार धानोरकर यांच्या मागणीच्या यशामुळे सामान्य नागरीकांना थोड्याफार प्रमाणात का होइना, याचा फायदा होणार आहे. भविष्या या संदर्भात आपण घरकुल निधी वाढीची मागणी केंद्र सरकार कडे रेटून धरणार असल्याचे सांगितले.

  • Heat stroke prevention tips for workers । कामाच्या ठिकाणी उष्माघात? – ‘Heat Stroke Safety’ ची खबरदारी वाचाच!

    Heat stroke prevention tips for workers

    उष्णतेच्या लाटेत कामगारांसाठी “Heat Stroke Prevention Tips” अत्यंत गरजेच्या!

    चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून, उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत. अशा परिस्थितीत मजूर, बांधकाम क्षेत्रात काम करणारे श्रमिक, तसेच बाहेरील वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तींना “heat stroke” होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार “heat stroke prevention” साठी काही महत्वाच्या टीप्स (tips for workers) पाळणं आवश्यक आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की उष्णतेच्या झळांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे.

    Heat stroke prevention tips for workers : शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यात काही लोकांचा बळी जातो. Summer safety tips for laborers

    उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते व याच कालावधीत इमारत बांधकाम व त्याच्याशी निगडीत कामे केली जातात. उष्णतेच्या दुष्परिणामापासून वाचण्याकरीता कामगार व मालक वर्गाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे. Construction worker heat safety guidelines

    चंद्रपूर मनपाची हि सेवा महागली

    काय करावे : बांधकामाच्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगाराने दुपारी 12 ते 4.30 वाजेपर्यंत भरउन्हात काम करू नये /करण्यास सांगु नये, त्या दृष्टीने कामगारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन करावे. पहाटेच्या वेळेस जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.  तहान लागलेली नसतांना जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच अन्य वेळी गोडताक, पन्हे, कोकम सरबत प्यावे. जेवणामध्ये ताजे अन्न, तांदळाची भाकरी, भाताची पेज, पालेभाज्या खाव्यात. उन्हामध्ये डोक्यावर टोपी, गॉगल व ओल्या कपड्यानी डोके मान व चेहरा झाकला जाईल याची खबरदारी घ्यावी. 

    प्रथमोपचार पेटीमध्ये ओआरएस पाऊच, जुलाब प्रतिरोधक औषधे मुबलक प्रमाणात राहिल, याची खबरदारी घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांकडून कामे करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्यात यावी.

    काय करू नये : कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत शारिरीक श्रमाची कामे करण्यास सांगु नये.

    चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. शिळे अन्न व जंक फुड, तेलकट व तिखट पदार्थ तसेच आम्लवर्धक पदार्थ घेऊ नये.

  • District collector field visit । 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी मैदानात – शेतकऱ्यांशी थेट संवाद!

    District collector field visit

    District collector field visit : चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन आढावा घेतला. District Collector’s Development Visit

    पूर परिस्थिती टाळण्यासाठी चंद्रपूर मनपा अतिक्रमणावर करणार कारवाई

    सदर भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी मौजा करंजी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उज्वल  महिला प्रभागसंघ यांची भेट घेतली व मार्गदर्शन केले. तसेच येथील दाल मिल व राईस मिल भेट देऊन कामकाज विषयक आढावा घेतला. गोंडपिपरी तालुका मुख्यालयी नव्याने बांधकाम होत असलेल्या  मुख्य़ प्रशासकीय इमारतीची त्यांनी पाहणी केली. यानंतर मौजा वढोली येथे पांदण रस्ता पाहणी, मनरेगा विहीर कामांची पाहणी, कोसा ( रेशीम ) उद्योगास भेट, तसेच स्थानिक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांच्या या अडचणीबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या. Administrative development inspection

    त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा सकमुर येथील बचत गटाच्या मत्स्य़ बीज व्य़वसाय भेट देऊन मार्गदर्शन केले. मौजा पोडसा येथे वर्धा नदीवरील (महाराष्ट्र – तेलंगाणा) पुलाची पाहणी केली. तसेच मौजा तोहोगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयालीत यंत्रसामुग्री, औषधांची उपलब्धता व इतर सुविधा इत्यादीसंबधी आढावा घेतला.  मौजा पाचगांव येथील बांबु व्यवस्थापन केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज विषयक आढावा घेतला.

    District Collector's Development Visit

    जिल्हाधिका-यांसोबत यावेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार शुभम बहाकर, गटविकास अधिकारी श्री. चांगफणे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे, मंडळ अधिकारी प्रशांतसिंग बैस यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    Contents

  • ambulance price hike protest । चंद्रपूर मनपाची सेवा महागली – गरीबांच्या जखमेवर मीठ, आंदोलन पेटलं!

    ambulance price hike protest

    ambulance price hike protest : चंद्रपूर : १ एप्रिल २०२५ पासून चंद्रपूर महानगरपालिकेने ॲम्बुलन्स,शव वाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली. या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या.

    क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा, पोलिसांनी केली एकाला अटक


    मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा ‘घे पैसा’ आंदोलन केले.आज १६ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या दरम्यान गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर ‘घे पैसा’ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असुन आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली. protest against ambulance charges


    २०० ऐवजी आता १ हजार रुपये भाडे…
    पेट्रोल-डिझेलचा खर्चही खाजगीपेक्षा जास्त

    शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी मनपाच्या ॲम्बुलन्सची सेवा निशुल्क होती. आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात आले. मनपा हद्दीच्या बाहेर ॲम्बुलन्स व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासुन मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खाजगी ॲम्बुलन्स व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात. मनपा ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे.याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे. ambulance service hike

    protest against ambulance charges


    १०० गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही..पप्पू देशमुख

    आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आजपर्यंत अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या.कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे. पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली. आयुक्तांनी १०० तक्रारी कराव्या. आम्ही एकच तक्रार करणार आणि आयुक्त पालीवाल सर्व घोटाळेबाजांसह जेलमध्ये जाणार हे त्यांनी लक्षात ठेवावे. ambulance charges hike India

    ambulance service hike


    दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार

    चंद्रपूर शहराची दुर्दशा करणाऱ्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल. या तक्रारीच्या अनुषंगाने एसआयटी मार्फत चौकशी व कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

  • IPL gambling arrest । IPL क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा! राजुरा येथे युवक अटकेत – पोलिसांची कारवाई

    IPL gambling arrest

    IPL gambling arrest : राजुरा (जिल्हा चंद्रपूर) – आयपीएल 2025 (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना राजुरा पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले असून, एक आरोपी फरार आहे. सदर प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. IPL betting news

    ओव्हरटेक च्या प्रयत्नात भीषण अपघात, तरुण – तरुणीचा मृत्यू

    पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी, राजुरा नाका नंबर 3, स्टार बारसमोर सुझुकी स्कूटरवर बसून एक इसम आयफोनद्वारे ऑनलाईन बेटिंग करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ ठिकाणी धाड टाकून कारवाई केली.

    अटक आरोपी:

    1. ऋग्देव निनाद येरने (वय 22), रा. आंबेडकर चौक, पेटवार्ड, राजुरा.
      फरार आरोपी:
    2. आशिष भैया, राहणार अज्ञात.

    जप्त मुद्देमाल:

    रोख रक्कम – ₹65,000/-

    सुझुकी एक्सेस स्कूटर (क्र. MH34 CC 7682) – अंदाजे किंमत ₹60,000/-

    आयफोन 13 प्रो मॅक्स मोबाईल – अंदाजे किंमत ₹60,000/-

    1. रोख रक्कम – ₹65,000/-
      एकूण मुद्देमालाची किंमत: ₹1,85,000/-

    पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 191/2025, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम 49, 112 भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

    कारवाई पथक:
    या कारवाईत IPS अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि. भीष्मराज सोरते, पोउपनि. हाके, फौ. किशोर तुमराम, पो.हवा. विकी, पो.अं. शफीक शेख, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. शरद राठोड, पो.आ. आनंद मोरे व पो.आ. तिरुपती जाधव यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

    राजुरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर सट्टा व्यवहारांपासून दूर राहावे, तसेच अशी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

  • road accident today news । ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला! ट्रकखाली येऊन तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

    road accident today news

    road accident today news : गडचांदूर, १५ एप्रिल: गडचांदूर-राजुरा राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. होली फॅमिली पब्लिक स्कूल जवळ सकाळी ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पाटण (जिल्हा आदिलाबाद ) येथील आकाश भोयर (वय २६) व प्रणाली फुसाम (वय २२) हे दोघे मोटरसायकलवरून गडचांदूर मार्गे बल्लारपूर येथे नातेवाईकांना भेटण्याकरिता दुचाकी क्रमांक mh ३४ y १८३५ ने जात होते.

    २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, चिमूर पेटलं

    त्यावेळी ट्र्क क्रमांक mh ३४ ab ४२८६ ला आकाश ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला आदळली, या धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले आणि मात्र ज्या ट्र्क ला ओव्हरटेक करण्याचा पर्यंत केला असता त्याच ट्रक खाली आल्याने प्रणालीचा जागीच मृत्यू झाला तर आकाश ला रुग्णालयात नेट असताना मृत्यू झाला. bike accident latest update

    घटनास्थळ अतिशय हृदयद्रावक होता. अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.

    घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • Dr Ambedkar flyover Babupeth । बाबूपेठला मिळालं डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाचं गौरवदायक नाव!

    Dr Ambedkar flyover Babupeth

    Dr Ambedkar flyover Babupeth : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी बाबूपेठ येथील नवीन उड्डाण पुलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावरण करताना मनापासून आनंद झाला. हा नवीन उड्डाणपूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar news Chandrapur

    मानव वन्यजीव संघर्ष टोकाला, चंद्रपूर जिल्ह्यात १२ वा बळी

    पुलासाठी ६५ कोटींचा निधी

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबूपेठ येथील उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या उड्डाण पुलाच्या नामफलकाचे अनावरण आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हा उड्डाण पुल व्हावा, अशी बाबूपेठ येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. या पुलासाठी मी ६५ कोटी रुपये मंजूर करू शकलो, यासाठी मी भाग्यवान आहे. हा पूल बाबूपेठवासीयांची चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेल, असा मला विश्वास आहे.

    मी नशीबवान – मुनगंटीवार

    भाजपा महानगरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व येथे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘लंडनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला, ही माझ्या आयुष्यातील एक सौभाग्यशाली घटना आहे. १९२०-२१ मध्ये डॉ.बाबासाहेब लंडनमधील ज्या निवासस्थानी मुक्कामाला होते, तेथे जाऊन जनसेवेची ऊर्जा घेऊन येता आले, यासाठी स्वतःला नशीबवान समजतो.’

    दीक्षाभूमीसाठी २ कोटी

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दोन जिल्ह्यांमध्ये दीक्षा दिली, त्यात चंद्रपूरचा समावेश आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मला स्वतःला मंत्री म्हणून डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. १२५व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनके वास्तू निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला. दीक्षाभूमीसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता आला. आज मला त्यांच्या नावाने उड्डाणपुलाच्या नामफलकाचे उद्घाटन करता आले. या सर्व घटना माझ्यासाठी ऊर्जा देणाऱ्या आहेत, अश्या भावनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    sudhir mungantiwar news chandrapur

    महामानवाला सेवेतून अभिवादन
    चंद्रपूर रेल्वे स्टेशनजवळील उडिया मोहल्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवबौद्ध पंचशील मंडळ व साहेब मित्रमंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले. बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रमाला आ. श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच पडोली येथे पाणपोई व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सेवेचं रूप, समतेचं पूजन करत दुर्गापूर, नवरत्न बुद्ध विहार येथे आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुष्पांजली अर्पण केली. चंद्रपूर आंबेडकर चौक येथेही आ. मुनगंटीवार यांनी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी पाणी व बिस्कीट वाटप उपक्रमात आ. मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.