copper pipe theft in Chandrapur : चंद्रपूर शहरात चोरीचे वाढते प्रमाण हे डोकेदुखी बनली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित करीत चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी आदेशित केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली कि रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मोठ्या प्रमाणात कॉपर पाईप ची चोरी करीत सदर माल घरामागे लपून ठेवला आहे.
पोलिसांनी आरोपी २७ वर्षीय गोलू उर्फ सुमोहित चंद्रशेखर मेश्राम, १९ वर्षीय राहुल रतन रॉय, २१ वर्षीय सुंदरम संजय तिवारी व २९ वर्षीय कमलेश दादुभाई गुप्ता राहणार आरोपी अष्टभुजा व श्यामनगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीचा माल जप्त करण्यात आला. police solve copper theft case Chandrapur
सदर कॉपर पाईप हे चंद्रपुरातील निर्माणाधीन मेडिकल कॉलेज येथे सुरु असलेल्या बांधकाम येथील ऑक्सिजन आउटलेट कॉपर पाईप चोरी केल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्यात चोरी झालेला कॉपर पाईप व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लक्ष ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची यश्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.
Janata Junior College HSC Result 2025 : चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२४-२५ चा निकाल आज (दि. ५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. HSC 2025 results
जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९% टक्के, कला शाखेचा निकाल ८८.७८% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९३.०४% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ५०% इतका लागलेला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून कु. त्रिशा विजय होकम (९४.३३%), कु. मानवी सुधीर कापसे (९१.१७%), कु. नेन्सी जगन्नाथ प्रसाद (९१%), कु. प्राची प्रवीण आबोजवार (९०.३३%), अजीम अब्दुल वहाब फारुकी (८९.३३%), ओमकार अमर देवाळकर(८९.१७%) हे विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत.
कला शाखेतून ज्ञानेश्वर गुरुदास थेरे (६५.८३%), कु. प्रीती राजा काळे (६४.५०%), सुप्रीत विकास टिपले (६३.८३%) वाणिज्य शाखेतून देवांगशी संजय धकाते (८५.००%), शुभांक नितीश दास (८४.६७%), मिस्बा फातिमा नौशाद सय्यद (८३.८३%), एम.सी.व्हि. सी. शाखेतून श्रीयुत अजय नक्षने (६४%) हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झालेले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, डॉ. दीपिका संतोषवार, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. माया बिस्ट, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी, प्रा. अरूण बर्डे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
villagers protest for road construction : कोरपना तालुक्यातील पालगाव येथील नागरिकांनी तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवाळपूर येथील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान पालगाव परिसरात असूनही, गावात जाण्यासाठी वापरला जाणारा एकमेव मार्ग कंपनीच्या हद्दीतून जातो. या 3 किलो मिटर मार्गाची अवस्था अत्यंत खराब असून तो केवळ पायवाटीतच आहे. गावकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे काँक्रीट रस्ता बनवून देण्याची मागणी केली; मात्र मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ultra tech cement road controversy
गेल्या चार दशकांपासून हे दुर्लक्ष सहन करत अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला असून, त्यांनी एकत्र येत सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. “आमच्या हक्काचा रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,” असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
सध्या आंदोलन सुरूच असून, प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.
शॉर्ट सर्किट आणि मृत्यू
सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.
काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case
सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला
यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm
नागरिकांचे आंदोलन
देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी
नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.
chandrapur bjp mla news : चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातिनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय फक्त आकड्यांचा विषय नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख देणारा, त्यांच्या गरजांवर केंद्रित धोरणे आखणारा आणि सामाजिक समतेकडे नेणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे. समाजातील वंचित, मागास घटकांना त्यांचे प्रतिनिधित्व, त्यांची संख्या आणि त्यांच्या अडचणी दिसून येण्यासाठी ही जनगणना आवश्यक होती, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. caste census laddu celebration
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहरातील गांधी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार जोरगेवार बोलत होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विजय राऊत, भाजप नेते अशोक जिवतोडे, अनिल फुलझेले, माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, नामदेव डाहुळे, मनोज पाल, राजू अडपेवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका शीतल आश्राम, अरुण तिखे, बलराम डोडाणी, प्रवीण गिलबिले, अमोल शेंडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आता समतोल विकास
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, भाजप सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या घोषवाक्याला खरी दिशा दिली आहे. जातिनिहाय जनगणना ही केवळ न्यायाची सुरुवात नाही, तर ती समतेकडे नेणारी वाट आहे. या निर्णयामुळे केंद्र व राज्य सरकारांना समाजातील प्रत्येक घटकाला योजनांमध्ये योग्य स्थान देणे, निधीचे योग्य वाटप करणे आणि समतोल विकास साधणे शक्य होणार आहे. gandhi chowk chandrapur event
गांधी चौक येथे करण्यात आलेला लाडू वाटपाचा जल्लोष ही फक्त आनंदाची प्रतिक्रिया नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने असलेली बांधिलकीची प्रतिक्रिया आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. हा निर्णय समाजात समता निर्माण करण्यासाठी, गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने समाजहित साधण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जनहिताचा निर्णय – हंसराज अहिर
यावेळी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जातिनिहाय योग्य आकडेवारी सादर केली होती. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमधील अनेक बोगस जाती रद्द करण्यात आल्या आहेत. आता कर्नाटकमध्येही आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहेत. कार्यक्रमाच्या समारोपात नागरिकांना लाडूचे वाटप करून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results
या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review
जय – पराजय हा स्पर्धेचा भाग
या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner
कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली
नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results
चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाट्यस्पर्धेचे विजेते
स्पर्धेचा अंतिम निकाल: • सर्वोत्तम नाटक: o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल) o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल) • दिग्दर्शन: o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’) o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’) • अभिनय (पुरुष): o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’) o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’) • अभिनय (स्त्री):
o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’) o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’) • नेपथ्य: o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’) o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’) • प्रकाश योजना: o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’) o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’) • पार्श्वसंगीत: o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’) o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’) • रंगभूषा-वेशभूषा: o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’) o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’) • उत्तेजनार्थ पारितोषिक: o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’) o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’) o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’) o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)
mahadiscom lucky draw 2025 : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ मे २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 29 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. online bill payment reward scheme
पहिला लकी ड्रॉ दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढील लकी ड्रॉ जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना या संधीचा फायदा होणार आहे.
लघुदाब वीजग्राहकांसाठी योजना
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळासwww.mahadiscom.in भेट द्यावी.ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. electricity bill payment reward in Maharashtra
ऑनलाईन वीजबिल भरून जिंका आकर्षक बक्षिसे
ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. mahadiscom smartphone reward scheme
या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.
Urjanagar development meeting Sudhir Mungantiwar : चंद्रपूर, दि. 4 : ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांवर महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्यासमवेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृह येथे घेतली.
यावेळी परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करुन ठोस कार्यवाही करण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सूचित केले.ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. CSIR fund Urjanagar RO machine repair
याबैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड,रामपाल सिंग,अनिल डोंगरे, हनुमान काकडे आदिंची उपस्थिती होती.
आरओ मशीन त्वरित दुरुस्तीसाठी सीएसआर निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विद्युत कनेक्शन देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
वसाहतीचे नूतनीकरण
ऊर्जानगर वसाहतीच्या नूतनीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन वसाहतीच्या सुधारणेसाठी नियोजनबद्ध कामे हाती घ्यावी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 2 एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच परिसरातील युवकांसाठी अत्याधुनिक जिम उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच, पर्यावरण संवर्धनासाठी 2 लाख कडुलिंबाची झाडे ऊर्जानगर परिसरात लावण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.या भेटीत झालेली ही सर्वसमावेशक चर्चा ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार आहे.
Irai river deepening Chandrapur project : चंद्रपूर, दि. 4 मे : चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत शासनाच्या विविध विभागांचा सहभाग असून सामाजिक संघटना, लोकसहभाग आदींच्या माध्यमातून सदर मोहीम 45 दिवस निरंतर सुरू राहणार आहे. विविध यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून सद्यस्थितीत नदीच्या खोलीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. flood prevention Irai river Chandrapur
चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने 25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे. benefits of Irai river deepening
५ हजार ६०० ब्रास गाळ बाहेर
पहिल्या टप्प्यात राम सेतू ते चौराळा पुल दरम्यान अम्युझमेंट पार्कजवळ काम सुरू असून आतापर्यंत नदीपात्रातील 200 मीटर जागेतील 14 टीसीएम (अंदाजे 5600 ब्रास ) गाळ काढण्यात आला आहे. यासाठी 8 पोकलॅन मशीन, 15 हायवा / टिप्पर, 9 टॅक्टर, 2 जे.सी.बी. सद्यस्थितीत असले तरी ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
इरई नदी खोलीकरण: पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर.
शेतकऱ्यांना गाळ निशुल्क उपलब्ध
सदर मोहिमेत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना तर भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे. मोहिमेदरम्यान निघणारा सुपीक गाळ शेतक-यांना निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र त्यासाठी वाहनाची व्यवस्था शेतक-यांनी स्वत: करायची आहे.
अल्पवयीन मुलाला कामावर घेऊन मारहाण; कंपनीचा घाणेरडा चेहरा उघड!
minor assault company case : अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी सी ५ जेव्ही या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाल्याने सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. Shiv Sena youth leader news
डिसेम्बर २०२४ मध्ये अल्पवयीन मुलाला रोजगार देतो म्हणून तत्कालीन एचआर गिरी सिद्धापल्ली याने २० हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले. कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते. काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी हे सुट्टीवरून परतल्यावर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलावून घेतले व त्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हि बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी त्या मुलाला दिली. minor abuse case in company
अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून कमी केली मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही, याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती. याबाबत मुलगा व त्याच्या आईचे बयान नोंदविण्यात आले, संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला. district child protection committee action
३ मे ला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३५१ (२), ३ (५), अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५ कलम ७५, ७९, बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा १९८६ कलम ३ (A), १४ अंतर्गत एचआर हेड गिरी सिद्धापल्ली व कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. Juvenile Justice Act
नेमकं प्रकरण काय?
अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर रुजू केले, त्यानंतर त्याला व्यवस्थापक रेड्डी यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली, पीडित मुलाच्या आईने न्यायासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांचे दार ठोठावले, सहारे यांनी आई व मुलाला सोबत घेत कंपनी व्यवस्थापक रेड्डी यांना जाब विचारला असता तुम्हाला जे करायचं आहे ते करा असे सुनावले, सहारे यांनी कामगार आयुक्त व बाल संरक्षण समितीकडे तक्रार दाखल केली.
तक्रार का दाखल केली म्हणून रेड्डी यांनी सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला, मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणीचा कसलाही प्रकार घडला नसल्याचे हमीपत्र न्यायालयात सादर केल्याने रेड्डी यांची गोची झाली. यानंतर सहारे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत अल्पवयीन मुलाला न्याय देण्यासंदर्भात प्रयत्न केले, अखेर ३ मे रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर गुन्हे दाखल झाले. minor abuse case in company
माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न – विक्रांत सहारे
अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणात रेड्डी व सिद्धापल्ली यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हा सत्याचा विजय आहे, आम्ही प्रकरण उचलले म्हणून माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला मात्र आम्ही मागे हटलो नाही, सतत पाठपुराव्याचे फलित उशिरा का होईना अखेर मिळाले, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा हा एक प्रयत्न होता, पण प्रयत्न फसला, याबाबत आता न्यायालयही लढाई आम्ही लढणार असून अल्पवयीन मुलाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.