Tag: MH34

  • Msedcl Employee Theater Competition । नाट्यकुंभ २०२५: महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कलाविष्कार

    Msedcl Employee Theater Competition

    Msedcl Employee Theater Competition : चंद्रपूर – विदर्भापासून कोकणापर्यंत सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना वर्षातील प्रत्येक दिवस व दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला महावितरणकडून सेवा दिली जाते. या सेवेत चांगले किंवा वाईट असे बरेच नाट्यपूर्ण अनुभव अधिकारी व कर्मचाऱ्यांना येतात. या नाट्यपूर्ण अनुभवांना समाजासमोर मांडण्यासाठी नाट्यकृतींमध्ये स्थान मिळावे अशी अपेक्षा महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. corporate drama festival

    चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    महावितरणच्य ‘नाट्यकुंभ २०२५’ या नागपूर प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन आज, दि. २ मे रोजी संचालक श्री. पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री परेश भागवत, मुख्य अभियंते सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, राजेश नाईक, नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष श्री हरीश गजबे, परिक्षक श्री विनोद दुर्गेपुरोहित, श्री जयदेव सोमनाथे, अँड चैताली बोरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. internal drama competition

    महावितरण फार मोठा परिवार आहे. आपल्या परिवारात अनेकजणांकडे उत्तम कलागुण आहेत. महावितरणचे दैनंदिन काम सांभाळून त्यांनी हे कलागुण जपले आहेत. नाट्यस्पर्धेमुळे आपल्यातील कलाकारांना आपली क्षमता सादर करण्याची संधी मिळते. अशा स्पर्धांमुळे महावितरणमध्ये अधिकारी व कर्मचा-यांमध्ये सुसंवाद वाढतो, टीम स्पिरिट बळकट होते. असे सांगताना श्री पवार पुढे म्हणाले की, महावितरणचे काम अखंड चालणारे आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीवरील कोट्यवधी ग्राहकांना महावितरण सेवा देते. employee cultural event

    वर्षातील प्रत्येक दिवस आणि दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण लोकाना सेवा देत असतो. आपल्या कामातही अनेक नाट्यपूर्ण अनुभव येतात. आपल्या कामात जनतेची सेवा करताना आलेल्या नाट्यपूर्ण अनुभवांनाही आपण समाजासमोर मांडले पाहिजे. असेही ते म्हणाले.

    विदर्भाला नाट्यकलेची खूप मोठी परंपरा आहे. कालिदासापासून ते महेश एलकुंचवारांपर्यंत नाट्‌यकलेला उतम योगदान देणारे अनेक नाटककार विदर्भाच्या भूमीत झाले आहेत. रामटेकला कालिदास, भंडारा जिल्ह्यात भवभूती, वाशीमला राजशेखर, अंभोऱ्याला मुकुंदराज, रिद्धपूरला चक्रधर स्वामी या साऱ्यांनी नाट्यपरंपरेला बळ देणारे लेखन केले आहे. मराठीतील दोन दिग्गज नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व राम गणेश गडकरी या दोघांचेही आयुष्याच्या उत्तरार्धातील वास्तव्य विदर्भात होते. internal drama competition

    स्वातंत्र्यपूर्व काळातील वीर वामनराव जोशी यांचे ‘रणदुंदुभी’ हे नाटक महाराष्ट्रभर गाजले होते. झाडीपट्टी हा पूर्व विदर्भातील लोकप्रिय नाट्य प्रकार आहे, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील झाडीप‌ट्टीला देखील सुमारे दीडशे वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. लोकसंस्कृतीचा भाग असलेली दंडार आणि नंतरची झाडीपट्टी हा विदर्भाचा अपूर्व ठेवा ठरला आहे. नागपूरच्या दलित रंगभूमीनेही उत्तम काम केले आहे. अशा या पूर्व विदर्भामध्ये समृद्ध नाट्य परंपरेच्या वातावरणात ही स्पर्धा होत असल्याचे त्यांनी सांगितले. msedcl employee theatre competition

    महावितरणचे काम है तांत्रिक स्वरुपाचे असते. पण केवळ तांत्रिक ज्ञान पुरत नाही. आपल्याला जनतेला थेट सेवा द्यायची असते. त्यामुळे लोकांशी व्यवहार करताना संभाषण कला उपयुक्त ठरते. काही वेळा काही अधिकारी संकट प्रसंगी नाट्यकलाही वापरतात. दररोज तांत्रिक कामे करतानाही आपले कलागुण जोपासणाऱ्या महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना श्री पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

    internal drama competition

    आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री परेश भागवत यांनी अशा स्पर्धांमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश गजबे यांनी केले.

    चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, येथे आयोजीत करण्यात करण्यात आलेल्या या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. त्यावेळी संचालक (वाणिज्य) श्री योगेश गडकरी, संचालक (वित्त) श्री अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) श्री राजेण्द्र पवार, संचालक (प्रकल्प) श्री प्रसाद रेशमे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. msedcl employee theatre competition

    या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत आज चंद्रपूर परिमंडलाने श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ तर नागपूर परिमंडलाने प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग सादर केला, तर उद्या गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ तर अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक सादर करणार आहेत.

  • MSEDCL employee awards । चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    MSEDCL employee awards

    MSEDCL employee awards : चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व कार्यालयात १ मे रोजी गुरुवारला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी कारणाऱ्या ३६ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Chandrapur MSEDCL news

    जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?


    यावेळी चंद्रपुर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) रमेश सानप, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, बल्लारशा विभागाचे सत्यदेव पेगल्लापट्टी चाचणी विभाग योगेंद्र निचत वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी उपस्थित होते. Best MSEDCL workers in Chandrapur

    सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कर्मचारी तर गडचिरोली मंडळ कार्यालयातील ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कामगारांचा समावेश आहे. यामध्ये कपिल कावळे, संजय तपासे, सुरज पोहिनकर, संदिप नगराळे, विजयकुमार सोंडवले, आकाश देवगडे, मनोज गराडे, महादेव सलाम, रुक्सार अब्दुलरफिक शेख, आशा भगतकर, संजय येरणे, शहिद नौशद मोहम्मद सलिम शेख, निलेश लोदेल्लिवार, गणेश इंदुलवार, जितेंद्र बंसोड, सुधीर चौधरी, दिलीप येरमा, विलास धाकडे, पवन बोरकुटे, आकाश बांबोळे, मोहम्मद निसार शेख, सागर घोरपडे, नितेश श्रीराम, योगेश्वर कोवे, शंकर गेडाम, अमित परचाके, रितेश गाईन, विजय दिवठे, गणेश बुलबुले, विकास घरत, सचिन पेटकर, नितिन कांबळे, नितीन सोनकुसरे, दिनेश मेश्राम, जितेंद्र शहारे यांचा समावेश आहे.

  • Forest land removal from records Maharashtra | जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

    Forest land removal from records Maharashtra

    Forest land removal from records Maharashtra : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील, जिवती तालुका वन क्षेत्रातून वगळण्याबाबत तसेच बरांज 1 ते 4, मानोराडिप -किलोनी कोळसा खाणीकरिता चिचोर्डी या गावातील संपादन न झालेल्या उर्वरित 185 हेक्टर जमिनीच्या संदर्भात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नुक्तीच मुंबई येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे सुनावणी घेतली. या दोन्ही प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. Tribal land rights issue in Jivati taluka

    आपच्या सुराज्य मोहिमेचा चंद्रपूरातून शुभारंभ

    सदर सुनावणीस,डॉ. रविकिरण गोवेकर,मुख्य वनसंरक्षक,अवर सचिव,महाराष्ट्र राज्य हे   उपस्थित होते .यावेळी माजी आमदार एड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार, अरुण म्हस्की, निलेश ताजने, विशाल दुधे यांची उपस्थिती होती. तालुक्यातील सर्व महसुली गावे व 44 हजार हेक्टर क्षेत्रात वन जमिनीची नोंद असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर आले आहे त्यांना योग्य न्याय देऊन त्यांची सामाजिक स्थिती बदलण्याच्या आवश्यकतेवर भर देताना अहिर यांनी वन जमिनीची नोंद असलेली गावे व जमिनी या नोंदीतून मुक्त करण्याकरिता त्वरित निर्णय घेण्याचे  निर्देश दिले. सन 2015 मध्ये जारी करण्यात आलेले महसूल व वन विभागाचे पत्र परत घेऊन या ज्वलंत समस्येवर निर्णायक मार्ग काढण्याविषयी या सुनावणी मध्ये सविस्तर चर्चा पार पडली. Forest land dispute Maharashtra 2025

     वर्ष 2015 मधील सदर पत्र परत घेण्याबाबत वन विभागाचे कोणतेही आक्षेप नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकी दरम्यान सांगितले. जिवती तालुक्यातील हजारोच्या संख्येतील अन्य मागासवर्गीय तसेच इतर नागरिकांचा हा अत्यंत ज्वलंत प्रलंबित प्रश्न असल्याने व त्यांना न्याय देण्याची शासनाची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर वर्षानुवर्षे होणारा अन्याय दूर करण्यास तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना हंसराज अहिर यांनी सुनावणीस उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या. Hansraj Ahir tribal land hearing

    बरांज 1 ते 4, मानोराडिप -किलोनी कोळसा खाणीकरिता अधिग्रहित एकूण 1379.50 हेक्टर जमिनी पैकी चिचोर्डी या गावातील एकूण 298.05 हेक्टर लिजप्राप्त जमीनी पैकी फक्त 112.87 हेक्टर जमिनीचे संपादन KPCL कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. चिचोर्डी येथील उर्वरित 185 हेक्टर जमीन अधिग्रहणाविषयी या पूर्वी झालेला बैठकीतून दिलेल्या सूचनावर कार्यवाही बाबत माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रधान सचिव कर्नाटक व महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान झालेल्या पत्र व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर लवकरच उर्वरित जमिनीच्या अधिग्रहणाबाबत सीबी आक्ट 1957 अनुसार चीचोर्डी येथील 185 हेक्टर जमीन अधिग्रहण बाबत प्रक्रिया राबविण्या करिता आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. Jivati taluka farmers land problem

    सदर सुनावणी पश्चात अहिर यांनी माननिय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेवून या विषयावर सविस्तर चर्चा केली व प्रलंबित प्रश्नी गांभीर्याने दखल घेत उर्वरित जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया राबविण्याचे निवेदन केले.

  • Aam Aadmi Party Maharashtra campaign । ‘सुराज्य मोहिमे’चा चंद्रपूरहून भव्य शुभारंभ – जनतेच्या प्रश्नांना मिळणार आता आवाज!

    Aam Aadmi Party Maharashtra campaign

    Aam Aadmi Party Maharashtra campaign : चंद्रपूर – महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या दिवशी, आम आदमी पार्टीच्या राज्य समितीच्या पुढाकाराने संपूर्ण राज्यात जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी ‘सुराज्य मोहीम’ या अभियानाचा भव्य शुभारंभ चंद्रपूर येथील आझाद बाग मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. AAP Surajya Abhiyan launch

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची स्वप्नपूर्ती

    ही मोहीम ४५०० किलोमीटरचा प्रवास करत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये पोहचणार असून, पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, भ्रष्टाचार, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाघ हल्ला, वीज फसवणूक यांसारख्या विविध मुद्द्यांवर जनतेशी थेट संवाद साधून, सरकारला हिशेब मागण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. Chandrapur AAP rally 2025

    कार्यक्रमात आम आदमी पार्टीच्या राज्य समितीतील प्रमुख पदाधिकारी

    🔹 अ‍ॅड. मनीष मोडक – राज्य संघटक
    🔹 भूषण ढाकुलकर – राज्य संघटन सचिव
    🔹 डॉ. अभिजीत मोरे – राज्य सचिव
    🔹 डॉ. शाहिद अली जाफरी – राज्य सचिव
    🔹 सागर पाटील – राज्य सहसचिव
    🔹 डॉ. नामदेव भागिले पाटील – सोशल मीडिया प्रमुख

    या कार्यक्रमाचे नेतृत्व मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर यांनी केले.

    aap maharashtra public issues

    उपस्थित मान्यवरांचे योगदान

    कार्यक्रमाला पुढील मान्यवरांची उपस्थिती होती:
    वसंतराव डोके – यवतमाळ जिल्हाध्यक्ष, सुनिल मुसळे – ज्येष्ठ नेते, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, चंद्रपूर, राजू कुडे – युवा अध्यक्ष, राजकुमार नगराळे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – महानगर संगठन मंत्री, अ‍ॅड. तबसूम शेख – महिला आघाडी अध्यक्ष, दीपक बेरशेट्टीवार , जितेंद्र कुमार भाटिया ,अ‍ॅड. सफिया शेख, जावेद सय्यद,अदित्या नंदनवार, अजय बाथव, सागर बोबडे, भीमराज बागेसर, जयदेव देवगडे, मनोहर साखरकर, मधुकर साखरकर, सुनील सदभेया, सिकंदर सागोरे, सुधीर पाटील, परमजीतसिंग झगडे, करुणाताई यांचार्लावर, सुजाता देठे, कविता मॅडम, संतोष दुरखंडे, आकाश सतावडे, पंकज उरकुडे इत्यादि सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Mayur Raikwar AAP Chandrapur

    जनतेच्या प्रश्नांचा आवाज
    या मोहिमेच्या माध्यमातून सरकारच्या फसव्या योजनांवर जनतेने थेट प्रश्न विचारले. लोकांच्या हाती असलेल्या फलकांवरील काही ठळक मुद्दे:

    “कोरड्या नळांनी उघड केलं खोटं अमृत!”

    “234 कोटी कुठे गेले? – जनतेला हक्काचा हिशेब हवा!”

    “औषधं नाही, मशीन नाही – रुग्ण मरतो, सरकार पाहतो!”

    “200 युनिट वीज कुठे? – आमदार कुठे लपले?”

    “वाघाचे तोंड, सरकारचा मौन – शेतकरी मरतो!”

    “ही कुणाची जमीन? मग नोकरी बाहेरच्यांना का?”

    “काम केलं, पण पगार शून्य – अन्याय सहन नाही!”

    घोषणांनी गाजले वातावरण


    “चंद्रपूरचा हक्क मागतोय उत्तर – फसवणूक नाही, हिशेब हवा!”, “जनतेचा संयम संपला – आता संघर्षाचा नारा!”, “विकासाचे खोटे पोस्टर फाडून, वास्तव समोर आणा!” या घोषणा देत उपस्थित कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या प्रश्नांना आवाज दिला.

  • Warora city development । “वरोरा शहरातील समस्यांवर विशेष उपाययोजना, खासदार धानोरकरांच्या संघर्षाचे यश!”

    Warora city development

    Warora city development : चंदपूर : वरोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा शहरातील महत्त्वाच्या समस्या संदर्भात समिती गठीत करून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. लवकरच या सरदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याकरिता कार्यवाही करणार आहे.

    गंभीर आजार आता चिंता नसावी, चंद्रपुरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उदघाटन

    गुरुवारी खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन वरोरा शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तात्काळ गांधी सागर तलावाचे खोलीकरण, कोराडी नाल्या अंतर्गत वरोरा शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, कासमपंजा नाल्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलावाचे नगर परिषदेला हस्तांतरण करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती.  Gandhi Sagar lake beautification

    यावेळी वरोरा नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखा शेळके, गांधीसागर तलाव खोलीकरण समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी यांची उपस्थिती होती.    

    गांधी सागर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाचे विद्रुपीकरण झाले आहे. तलावातील गाळ काढल्यास पाण्याच्या नवीन स्रोत निर्माण होऊन त्याचे   सौंदर्यीकरण करून नौका विहार सुरु केल्यास छोटे पर्यटन सुरु होईल. या संदर्भात खासदार धानोरकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून गांधी सागर तलावातील गाळ काढण्यासाठी तात्काळ परवानगी दिली. तसेच या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या संदर्भात आराखडा तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांना दिले. Warora tourism potential

    त्यासोबतच वरोरा येथील सांड पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी पाहणी करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सांडपाण्याच्या प्रश्न मिटल्यास अनेक शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे. व पिकाचे नुकसान देखील टाळता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकरी व नागरिकाने आनंद व्यक्त करीत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.  

  • SNDT Womens University Maharashtra Day 2025 । SNDT महिला विद्यापीठाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम ठरला ‘ज्ञान आणि संधींचा उत्सव’!

    SNDT Womens University Maharashtra Day 2025

    SNDT Womens University Maharashtra Day 2025 : बल्लारपूर – एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे  १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई चे आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण उपस्थित होते. Maharashtra Day 2025

    दूरदर्शी धानोरकर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी जातनिहाय जनगणनेची केली होती पहिली मागणी

    कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, व विद्यापीठ गीत यांनी झाली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपूर आवाराचे संचालक  डॉ. राजेश इंगोले यांनी मुख्य पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

    डॉ. प्रभाकर चव्हाण  यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या समाजात आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या नवकल्पना याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजासाठी उपयुक्त नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी, बचत गटांशी एकत्रित काम करण्यावर भर देण्यात आला.

    woman empowerment

    कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यापीठासाठी पुस्तके देणगी केल्याचा उल्लेख केला. या पुस्तकांनी मला केवळ शिकवलं नाही, तर घडवलंही. आज या पुस्तकांचं देणगी  करताना  माझी एकच आशा आहे – यातून विद्यार्थीही घडतील, प्रगल्भ होतील आणि समाजासाठी योगदान देतील तसेच, सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड आणि  आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी देखील कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.

  • Balu Dhanorkar contributions । जातनिहाय जनगणनेचा आवाज — दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे दूरदर्शी योगदान!

    Balu Dhanorkar contributions

    Balu Dhanorkar contributions : चंद्रपूर : स्वतंत्र भारतात आजवर जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे देशात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक धोरणांची आखणी करताना अनेक समाज घटकांना न्याय मिळत नव्हता. मात्र आता या अन्यायाचा शेवट करत केंद्र सरकारने अखेर जातीनिहाय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. या मागणीचा पहिला आवाज चंद्रपूरचे लोकप्रिय दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी उठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी देशभर जातनिहाय जनगणना घेण्याची ठाम मागणी केली होती. त्यांनी ही मागणी संसदेत आणि माध्यमांतून सातत्याने मांडत ठेवली होती. Caste census in India 2025

    मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे चंद्रपुरात उदघाटन

    धानोरकर यांचा हा मुद्दा सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने आज मान दिल्याने हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं ऐतिहासिक पाऊल ठरतो आहे.

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा वेळोवेळी प्रभावीपणे संसदेत मांडला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि काँग्रेस पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. Caste-based census benefits

    या मागणीचा पुढे वारसा चालवत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील लोकसभेत हीच मागणी ठामपणे मांडली होती.

    त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जातीनिहाय जनगणना ही देशातील वंचित, मागास व उपेक्षित घटकांसाठी योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी अत्यावश्यक आहे. ही जनगणना सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.”

    हा निर्णय केवळ काँग्रेस पक्षाच्या विजयाचा नाही, तर वंचित, मागास आणि कष्टकरी घटकांच्या हक्काच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

  • mukhyamantri sahayata nidhi kaksh । गंभीर आजार? चिंता नको! मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आहे तुमच्या मदतीला

    mukhyamantri sahayata nidhi kaksh

    पालकमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन                                                               

    mukhyamantri sahayata nidhi kaksh : चंद्रपूर, दि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले. Charitable hospital assistance program

    charitable hospital assistance program

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.

    विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

    आता चंद्रपुरातच मिळणार मदत

    पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.

  • Caste based census India 2025 । “जातीनिहाय जनगणना 2025: चंद्रपूरमध्ये OBC समाजात आनंदाचे वातावरण!”

    Caste based census India 2025

    Caste based census India 2025 : चंद्रपुर : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३० एप्रिल) ला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले. Caste census benefits India

    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (दि.३० एप्रिल) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. Caste survey news India 2025

    चंद्रपुरातील धर्मगुरूंनी घेतली शपथ

    अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले.

    कॅबिनेट बैठकीतील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.

    या निर्णयाचा ओबीसी सह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीपर्यंत लाभ पोहोचतील, असे डॉ. अशोक जीवतोडे यावेळी म्हणाले.

  • child marriage prevention pledge । बालविवाह रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात धर्मगुरुंचा निर्धार

    child marriage prevention pledge

    child marriage prevention pledge : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी बुधवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृहात बालविवाहमुक्त शपथविधी कार्यक्रम पार पडला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व “Access to Justice for Children” प्रकल्पाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. stop child marriage campaign

    चंद्रपूर मनपातर्फे मान्सून पूर्व तयारी

    धर्मगुरूंची बालविवाह न करण्याची शपथ

    अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंनी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह न लावण्याची प्रतिज्ञा केली. ही बाब सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. child protection awareness 2025

    अध्यक्षीय भाषण – श्री. दीपक बानाईत (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी)

    श्री. बानाईत यांनी “रेड झोन” मधील मुलींचा उल्लेख करताना सांगितले की अशा मुलींच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते:

    • शिक्षण अर्धवट सोडलेल्या
    • स्थलांतरित कुटुंबातील
    • सामाजिक दबावामुळे लग्नाला प्रवृत्त होणाऱ्या
    • लैंगिक अत्याचारग्रस्त किंवा प्रेमसंबंधात गुंतलेल्या मुली

    या सर्व घटकांचा विचार करून त्या मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    प्रमुख पाहुणे ॲड. क्षमा बासरकर यांचे मार्गदर्शन

    बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी स्पष्ट केले की:

    • बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे
    • बालिका शारीरिक, मानसिकदृष्ट्या तयार नसतात
    • बालविवाहामुळे गर्भधारणा, पोषण, आरोग्य यासंबंधी गंभीर समस्या निर्माण होतात
    • धर्मगुरूंनी विवाह लावताना जन्मप्रमाणपत्राची खात्री करणे आवश्यक आहे
    कायद्याचा दंडक – श्री. काशिनाथ देवगडे यांचे स्पष्टीकरण

    रुदय संस्था गडचिरोलीचे संचालक श्री. काशिनाथ देवगडे यांनी सांगितले:

    • बालविवाह ठरविणे, घडविणे, प्रोत्साहन देणे हा गुन्हा आहे
    • दोषींना २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी व १ लाख रुपये दंड होऊ शकतो
    • बालविवाह झाल्यास POSCO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो
    • स्त्री गुन्हेगारांना कैदेपासून सूट असते

    🤝 धर्मगुरूंसोबत संवाद सत्र – श्री. अजय साखरकर

    जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. अजय साखरकर यांनी उपस्थित धर्मगुरूंसोबत थेट संवाद साधला व बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विवाह करताना वयाची खात्री करणे, समाजात जागृती करणे व कायदेशीर परिणाम समजावणे यावर भर देण्यात आला.


    🎙 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत मोकाशे सर यांनी केले.
    कार्यक्रमाचा समारोप धर्मगुरूंना धन्यवाद देऊन करण्यात आला.