Tag: हंसराज अहिर

  • Hansraj Ahir farmers land justice । हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश, ८६५० हेक्टर जमीन वनक्षेत्रातून मुक्त!

    Hansraj Ahir farmers land justice

    Hansraj Ahir farmers land justice : चंद्रपूर १४ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट असलेल्या हजारो हेक्टर जमिनीबाबत या तालुक्यातील इतर मागास व अन्य प्रवर्गातील नागरिकांच्या प्राप्त तकारीनुसार निर्वगीकरण (डीफोरेस्टेशन) करून व शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी माजी आमदार अॅड. संजय घोटे व सुदर्शन निमकर यांच्या उपस्थितीत सप्टेंबर-२०२४ रोजी वेणु गोपाल रेड्डी प्रधान सचिव वने महाराष्ट्र शासन, जानेवारी २०२५ रोजी उच्चस्तरीय अधिकारी वनविभाग,

    एप्रिल-२०२५ रोजी डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक, अवर सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालयीन स्तरावरील वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय अधिकारी, विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर, रामगांवकर जिल्हा मुख्य वनसंरक्षक श्रीकांत देशपांडे, अपर जिल्हाधिकारी, माने उपविभागीय अधिकारी राजुरा, सेंबटवाड तहसिलदार जिवती या अधिकाऱ्यांच्या समवेत वेळोवेळी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी घेतली होती. Jiwti taluka farmers rights

    ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर युवकाचा अपघातात मृत्यू

    या सुनावणीमध्ये सन २०१५ मधील महसुल व वनविभागाचे पत्र परत घेवून या ज्वलंत समस्येवर शीघ्र तोडगा काढण्याबाबत आश्वस्त करण्यात आले होते. तसेच या कार्यवाहीबाबत हंसराज अहीर यांनी आयोगाच्या माध्यमातून वारंवार आढावा घेतला होता त्यांच्या लोकसभा मतदार संघातील हा विषय असल्याने ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी मा. मुख्यमंत्री, महसुलमंत्री, केंद्रीय वनमंत्री तसेच राज्याचे वनमंत्री यांचेशी सुध्दा बृहत पत्रव्यवहार व वेळोवेळी बैठका घेत, त्यांनी हा विषय मार्गी लावण्याकरिता विशेष प्रयत्न केले.

    ऐतिहासिक निर्णय

    अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धोरणात्मक निर्णय घेत जिवती तालुक्यातील साडेआठ हजार हेक्टर जमिनीचे वनक्षेत्रातून निर्वणीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून न्याय दिल्याने जिवती तालुक्यातील भाजपाच्या शिष्टमंडळाद्वारे सर्वश्री भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, शहराध्यक्ष राजेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव केशव गिरमाजी, महामंत्री भिमराव पवार, अशपाक शेख, गोविंद टोकरे, चंद्रकांत घोटके, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे यांचेसह इतरांनी दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून शाल व पुष्पगुच्छ देवून हंसराज अहीर यांचा सन्मान करीत जिवतीवासियांच्या वतीने आभार मानले. Chandrapur land denotification news

    सुमारे ४० हजार हेक्टर जमिनी वनक्षेत्रात असल्या तरी, राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रारंभिक स्तरावर ८६५० हेक्टर जमीनी वनक्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळणार आहे. शासनाने या निर्वणीकरण कार्यवाहीचे पत्र नागपूर विभागीय आयुक्त व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविले असून, ही प्रकीया जलदगतीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

    जिवती तालुक्यातील शेतजमिनी वनक्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे १९७२ व १९९१ मध्ये महसुल विभागाद्वारे भोगवटा वर्ग २ चे पट्टे मिळूनही या पट्टयांचे फेरफार नियमाच्या कचाट्यात अडकले होते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासूनही या शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागत होते. Hansraj Ahir farmers land justice

    हंसराज अहीर यांनी ही समस्या गांभिर्याने घेवून हा प्रश्न शासन स्तरावरून धसास लावण्यात यश मिळविले असून उरलेल्या जमीनी व वसाहतीबाबत त्यांचे प्रयत्न सतत सुरू असल्याने त्यांच्या लोकहिताच्या या कार्याबद्दल जिवती तालुक्यातील नागरिकांनी व सन्मानकर्त्यांनी आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हंसराज अहीर यांनी मी सुध्दा या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले आहे.

  • Rani Durgavati tribal women empowerment । चंद्रपूरचा ऐतिहासिक दिवस, राणी दुर्गावती योजनेचा लोकार्पण समारंभ

    Rani Durgavati tribal women empowerment

    Rani Durgavati tribal women empowerment : चंद्रपूर, दि. 9 : आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन व सामाजिक सक्षमता देऊन सर्वांगिण सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” उपक्रमाचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे पार पडला. tribal women empowerment scheme

    राज्यातील मुख्य लोकार्पण समारंभ नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर कार्यक्रमात दाखविण्यात आले.

    ११ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात रोजगार मेळावा

    जिल्हा कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी मान्यवर उपस्थित होते.

    राखी पौर्णिमा साजरी

    याप्रसंगी आदिवासी महिलांनी मान्यवरांना राखी बांधून योजनेचे स्वागत केले. विविध शासकीय योजनांचे लाभ प्रदान करून ‘राखी पौर्णिमा’ साजरी करण्यात आली.

     हंसराज अहिर यांनी महिलांना केवळ शिक्षण नव्हे तर आर्थिक सक्षमता देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आमदार श्री. जोरगेवार यांनी आदिवासी युवतींना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

    प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी महिलांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे सांगून राज्य शासन या योजनेच्या उद्देशपूर्तीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

  • compensation increase for coal mine farmers । ✅ “OBC आयोग पुढे सरसावलं! शेतकऱ्यांना न्याय मिळणार?”

    compensation increase for coal mine farmers

    compensation increase for coal mine farmers : चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पातील मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि. 27 जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकल्पासाठी मिळणारा प्रति एकर आर्थिक मोबदल्यामध्ये दरवाढ मिळवून देण्याविषयी चर्चा केली यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, पूर्व जिल्हाध्यक्ष किसान आघाडी राजु घरोटे, कोलगाव उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना या आशयाचे निवेदन सादर केले. आर/आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या नोकरी सोबतच प्रति एकरी दरवाढ देण्याविषयी कोल इंडियाने तत्वतः मान्य केले असल्याने ही दरवाढ लवकरात लवकर मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

    युवकाला अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले की, नोकरी व शेतीला दरवृध्दी प्राप्त करून घेणे हा आपला न्याय अधिकार आहे. सन 2012 मध्ये कोल इंडिया व राज्य शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू प्रति एकर जमिनीस रू. 8 लाख व सिंचीत प्रति एकर जमिनीकरिता रू. 10 लाख दरवाढ लागु करण्यात आली होती. farmer land compensation policy Maharashtra

    दरवाढ होणार

    परंतु, जमिनीचे विद्यमान बाजारमुल्य आणि आजचे सरकारी दराच्या तुलनेत वेकोलिद्वारा आजघडीला मिळणारे हे दर अत्यल्प असल्याची भुमिका कोल इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. मल्लिकार्जूना प्रसाद यांच्या तसेच वेकोलि मुख्यालय, नागपुर यांचे वरिष्ठा प्रबंधनाच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2025 रोजी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे दरवाढीचा हा मुद्दा आग्रही स्वरूपात मांडण्यात आला असल्याचे हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. सदर दरवृध्दीबाबत कोल इंडिया प्रबंधनाने सकारात्मक भुमिका स्विकारत ओबीसी आयोगाद्वारे मांडण्यात आलेली भुमिका व्यावहारीक असल्याने ही मागणी तत्वतः मान्य केली असल्याचेही अहीर यांनी यावेळी सांगितले. farm land rate revision coal India project

    Somayya institute of technology

    हा निर्णय कोल इंडियाद्वारे लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे तसेच ज्या प्रकल्पांचे दर निश्चितीचे करारनामे झालेले नाही त्या प्रकल्पांना ही होणारी दरवाढ लागू राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. दर निश्चितीच्या करारनाम्यापुर्वी प्रकल्प धारकांनी द्यावयाच्या कौटूंबिक शपथपत्रात असलेला वर्ष 2012 च्या शासन धोरणानुसार, दर मान्य असल्याचा अनावश्यक उल्लेख वगळण्यासाठी वेकोलि प्रबंधनास सुचना व पाठपुरावा करणार असल्याचे सुध्दा अहीर यांनी सांगितले.

    शेकडो शेतकऱ्यांच्या जिवीताला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कोलगाव येथील उर्वरित 337 हेक्टर जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन याविषयासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तसेच या दरवृध्दीसाठी आमच्या पाठीशी उभे राहावे असा आशावाद उपस्थित शेतकऱ्यांनी अहीर यांचेशी संवाद साधतांना व्यक्त केला.

  • National Backward Class Commission hearing । “धरणे आंदोलनाचा परिणाम! आयोग अध्यक्षांनी घेतली चंद्रपूरमध्ये थेट सुनावणी!”

    National Backward Class Commission hearing

    National Backward Class Commission hearing : चंद्रपूर: दि. 16 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. टाकळी-जेना-बेलोरा, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन प्रा.लि. बरांज (मो.) कोळसा खाण, पी.एम. गतिशक्ती अंतर्गत रेल्वे लाईनचे वेकोलि संबंधित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न व मागण्या या संबंधी धरणे आयोजित केले होते.

    फळांच्या बियांनी भरलं चंद्रपुरातील जंगल

    या धरणे कार्यक्रमास अधिकांश इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांची संख्या असल्यामुळे त्यांनी आपल्या मागण्यांची तक्रार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केल्यामुळे आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी गंभीरपणे दखल घेवून धरणे स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून समस्यांची सुनावणी व नोंदी घेतल्या. backward class commission intervention

    शेतकरी व प्रकल्पग्रस्तांवर होत असलेले अन्याय, राज्य सरकारच्या निती धोरणाला डावलून जिल्हा प्रशासन अधिकारी, मायनिंग अधिकारी, भुमी अधिग्रहण अधिकारी, पुनर्वसन, वनविभाग, जिल्हा परिषद, महसुल अधिकारी, रेल्वे अधिकारी, वेकोलि अधिकारी तसेच या संबंधित अधिकारी राज्य शासनाच्या धोरणाच्या विरोधात जावून खासगीकरण व सरकारी कंपनीच्या बाजूने काम करीत असल्याचा आक्षेप प्रकल्पग्रस्तांनी केला.

    त्यांच्या तक्रारी नोंदवून झालेल्या अन्यायाची नोंद घेवून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मागासवर्गीयांना राज्य सरकारकडून नोकरी, वेतन, जमिनीचा मोबदला, गावाचे पुनर्वसन व त्यातील तफावती या सर्वावर आयोगाकडून न्याय मिळेल ही भावना व्यक्त केली. आयोगाने सर्व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेवून त्यांची व्हिडीओ रेकॉर्डिग घेतली. प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून लिखीत स्वरूपात त्याची नोंद घेतली. farmers rights in coal mining project

    पहिल्यांदाच अशी सुनावणी

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या धरणे मंडपात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजजी अहीर यांनी आंदोलन स्थळी जावून सुनावणी घेवून एक नविन स्तुत्य उपक्रम केला.

    यावेळी वरोराचे आमदार श्री. करण देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे समक्ष उपस्थित केल्या. यावेळी खुशालजी बोंडे, विजयजी राऊत, अनिलजी फुलझेले, डॉ. अशोकजी जिवतोडे, महानगर अध्यक्ष भाजपा सुभाषजी कासनगोट्टूवार, युवा नेते रघुवीर अहीर, विनोदजी शेरकी, नामदेव डाहुले,स्वप्निल डुकरे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाला समर्थन दिले.

    या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता श्री. प्रदीप महाकुलकर, श्री. धनंजय पिंपळशेंडे, सुनिल नामोजवार, गोविंदा बिंजवे, रामा मत्ते, गोपाल गोसवाडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, विशाल दुधे, संजय वासेकर, शाम महाजन, श्री. विठ्ठल पुनवटकर, विजय वानखेडे, दत्तात्रय गुंडावार, पुनम तिवारी, गौतम यादव, चेतन शिंदे, आशय चंदनखेडे, मयुर भोकरे, राहुल सुर्यवंशी, संजय खनके, संजय रॉय, जमील शेख आदींनी प्रयत्न केले.

  • railway land acquisition problems । 🛤️ रेल्वेच्या भूखंड संपादनात गोंधळ; शेतकऱ्यांनो ८ दिवसात आक्षेप नोंदवा – हंसराज अहिर

    railway land acquisition problems

    railway land acquisition problems : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावावा आणि संबंधित शेतकऱ्यांनी आठ दिवसाच्या आत लवादाकडे आक्षेप नोंदवावे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नुकसान होणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज येथे दिल्या.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आज श्री. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. Hansraj Ahir land acquisition intervention

    hansraj ahir land acquisition intervention

    शेतजमिनीच्या वादातून मुलाने केला वडिलांचा खून

    माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामासाठी दहेगाव, नायगाव, चरूरखटी आणि निमसडा येथील शेतकऱ्यांची 27.24065 हेक्टर आर जमीन भूसंपादित करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी योग्य मुल्यांकन मिळाले नसल्याची तक्रार आहे. याप्रकारणाबाबत श्री.अहीर यांनी शासन आणि शेतकऱ्यांचे मत समजून घेतले व आवश्यक माहिती यावेळी जाणून घेतली.


    याप्रकरणात शासनाने नेमलेल्या लवादाने सखोल बाबींचा विचार करून निर्णय द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे हरकती व नोंदी सादर कराव्या, अशा सूचना श्री. अहीर यांनी दिल्या. तसेच याभागात भूसंपादन होवून सुरू असलेले रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅकचे बांधकाम सद्या शेतीची पेरणी लक्षात घेता शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून पार पाडावी,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  • Hansraj Ahir Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर: चंद्रपूरमधून हंसराज अहीर यांचे भारताच्या विजयाचे कौतुक! 🚨

    Hansraj Ahir Operation Sindoor

    Hansraj Ahir Operation Sindoor : चंद्रपूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ‘‘ऑपरेशन  सिंदुर’’ सर्जिकल स्ट्राईक करुन  भारताने बदला घेत पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सडेतोेड उत्तर दिल्याबद्दल पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय  मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व तिन्ही सैन्यदलांचे अभिंनदन करुन याविशेष कामगीरीवर गर्व व्यक्त केला आहे. Hansraj Ahir on surgical strike

    चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांना न घाबरणारे सट्टेबाज, वाचा बातमी

    हिशोब चुकता


    कोटली, मुज्जफराबाद व बहावलपुर सह 9 आतंकी तळांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक द्वारे शेकडो आतंकवाद्यांचा खातमा करुन भारताने आपल्या भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा हिशेब चुकता केला. दहशतवादी संघटनांनी पुन्हा पुन्हा भारताच्या सीमांकडे करड्या नजरेने बघण्याचे धाडस करु नये अन्यथा जगाच्या नकाशावरुनच पुसुन टाकू हा पाकिस्तानला दि. 07 मे रोजी पहाटे केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मधुन दिलेला थेट इशाराच आहे.


    ‘‘देश प्रथम’’ ही मा. नरेंद्र मोदीजींची निती व स्पष्ट  भुमिका आहे. देशाविरुद्ध रचल्या जाणारे कोणतेही कट कारस्थान सहन केले जाणार नाही, त्याची किंमत वसुल करण्याची धमक मोदी सरकारची आहे. आमचे सैन्यदल यासाठी सक्षम आहेत. हेच या सर्जिकल स्ट्राईक ने पुन्हा एकदा दाखवून दिले. अत्यंत नियोजनबध्द व मानवीय दृश्टीकोनाचा परिचय देत पाकिस्तानी नागरीक व तेथील सैन्यदलास इजा न पोहचविता भारताने दहशतवादाविरुध्द केलेला सर्जिकल स्ट्राईक हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी म्हटले आहे.

  • Dr Babasaheb Ambedkar । शोषणाविरुद्ध संघर्षाची मूर्ती – बाबासाहेबांचा लढा आजही प्रेरणादायी – हंसराज अहिर

    Dr Babasaheb Ambedkar

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे योद्धा आणि सत्याच्या मार्गाने लढणारे थोर विचारवंत म्हणजे Dr Babasaheb Ambedkar. त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तावेज नसून, ते एक सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम ठरले आहे. Babasaheb यांचा लढा हा दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी equal rights, social justice आणि education empowerment मिळवण्याचा ऐतिहासिक टप्पा होता.

    आजच्या आधुनिक भारतातसुद्धा Dr Babasaheb Ambedkar यांच्या विचारांची relevance अधिक आहे. त्यांच्या विचारांमुळे आज लाखो लोकांनी शिक्षण, रोजगार, आणि सन्मानाचे जीवन मिळवले आहे. त्यांच्या स्मृती आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.

    Dr Babasaheb Ambedkar : चंद्रपूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुत्व वृध्दिगत करण्याकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यांनी विषमतेविरूध्द दिलेला लढा हा ऐतिहासिक होता. त्यांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज आपणा सर्वांना अनेक अधिकार बहाल झाले असून या घटनात्मक अधिकारांनीच बहुजन समाजाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व अन्य क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. 14 april news

    चंद्रपूर महानगरपालिका झाली डिजिटल

    एवढेच नव्हे तर आपला देश सुध्दा संविधानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा स्विकारून सर्वांनी राष्ट्राच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये योगदान देणे हीच या महान राष्ट्रपुरूषास खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

    14 april news

    डॉ. बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंती पर्वावर हंसराज अहीर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नमन केले. त्यांच्या राष्ट्रीय योगदानाचे स्मरण करून आदरांजली अर्पण केली. या अभिवादन कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विठ्ठल डुकरे, रवि गुरनुले, राजु येले, डॉ. शरद रणदिवे, राजु अडपेवार, राजु घरोटे, प्रमोद शास्त्रकार, प्रदीप किरमे, संजय खनके, हंसराज रायपुरे, पुष्पा उराडे, शितल गुरनुले, कल्पना बबुलकर, शिलाताई चव्हाण, सुप्रिया सरकार, श्रीकांत भोयर, विकास खटी, गौतम यादव, पुनम तिवारी, स्वप्निल मुन, संजय मिसलवार, रविंद्र मुन, संदीप देशपांडे, तुषार मोहुर्ले, रवि लोनकर, अतुल रायकुंडलिया, राहुल सुर्यवंशी, मधुकर राऊत, राज कुमार, सुदामा यादव यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Chanda Fort railway stop । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी: ‘चेन्नई-गया’ ट्रेन आता चांदा फोर्टला थांबणार!

    Chanda Fort railway stop

    Chanda Fort railway stop : चैन्नई-गया या  साप्ताहिक ट्रेनचा (१२३९०)  थांबा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर मंजूर झाला असून दि. १८ मार्च रोजी ही ट्रेन रात्री ११:४५ वाजता चांदा फोर्टवर पहिल्यांदाच थांबणार असल्याने चंद्रपूर व जिल्ह्यातील प्रवाशांना या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. Chandrapur train news

     ट्रेन नं. १२३८९ गया-चैन्नई या परतीच्या  प्रवासाचा थांबा चांदा फोर्ट  येथे मंजूर झालेला नसला  तरी लवकरच हा  थांबाही मंजूर केला जाईल. त्याकरिता रेल्वेच्या वरिष्ठांना अहीर यांनी कळवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची सुचना केली आहे. सदर ट्रेनचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून बल्लारशाह गाठावे लागत होते. चैन्नई-गया ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची होत  असलेली फरफट थांबणार आहे. Railway news Maharashtra

    चंद्रपुरात ३८ लाखांचे डिजिटल लाखांचे कॉइन जप्त

                    ट्रेन नं. १२३९० चा चांदा फोर्टला थांबा मिळाल्याने बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापारी, व्यवसायी, कर्मचारी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांनाही या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. New train stop in Maharashtra 

    गया-चैन्नई ही ट्रेन चांदा फोर्ट वरून  रात्रीच्या वेळेस जात असल्याने  ट्रेन नं. १२३८९ चा थांबाही चांदा फोर्टवर मंजूर  करणे प्रवाशांच्या दृष्टीने अनिवार्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने परतीचा प्रवास करणाऱ्या गया-चैन्नई या  ट्रेनचा सुध्दा चांदा फोर्ट स्थानकावर त्वरीत थांबा मंजूर करून  प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेने  हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. Hansraj Ahir railway initiative

    चैन्नई-गया (ट्रेन नं. १२३९०)  या साप्ताहिक  ट्रेनचा चांदा फोर्ट  स्थानकावर थांबा  मंजूर करून दिल्याबद्दल  संस्थेचे  अध्यक्ष रमणिकभाई चव्हान, कार्याध्यक्ष तथा झेडआरयुसीसीचे सदस्य दामोदर मंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या वतीने हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.

  • land conversion rules in Maharashtra । भोगवटा जमिनींसाठी नवा मार्ग खुला – हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश

    land conversion rules in Maharashtra

    land conversion rules in Maharashtra : चंद्रपूर / यवतमाळ भोगवटा वर्ग २च्या जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठीच्या प्रलंबित तसेच दाखल केलेल्या प्रकरणात उपविभागीय अधिकारी स्तरावरील प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्याचे तसेच शासनस्तरावरील निर्णय अपेक्षित असलेल्या प्रस्तावाचे अविलंब वर्गीकरण करून ही प्रकरणे शासन मान्यतेकरिता सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी याविषयी वेळोवेळी घेतलेल्या सुनावणींचा आढावा घेवून केली आहे. Maharashtra land revenue rules update

    चंद्रपुरात उभ्या ट्रकला बसची धडक, वाहकाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी

    भोगवटा वर्ग १ प्रकरणी हंसराज अहीर यांनी गत वर्षभरापासून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयीन स्तरावर जनसुनावणी घेतली होती. त्यांनी या संबंधात मा. देवेंद्रजी फडणवीस यांचेस्तरावर पत्रव्यवहार व चर्चा करून ७५% आकारण्यात येणारी नजराणा रक्कम कमी करण्याकरिता सातत्याने प्रयत्न केले होते. याविषयी राज्यशासनाने दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रारूप नियम प्रस्तावित करून, ७५% असलेली नजराना रक्कम नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीतील व बाहेरील, कृषक प्रयोजनार्थ धारण जमिनीला २५% आणि अकृषक जमिनीला ५०%, रहिवासी प्रयोजनार्थ व कब्जी हक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी १५% व भाडेपट्टयाने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी २५% नजराना रक्कम प्रस्तावित केल्यामुळे मोठ्या संख्येतील भोगवटदार २ च्या बहुतांशी मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांना वर्ग १ करण्याकरिता मोठा लाभ मिळाला आहे. Bhogwata Class 2 to Class 1 land conversion

    चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सुनावणी दरम्यान अन्य मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली होती की, वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करतांना ७५% नजराना रक्कम भरणे अनिवार्य केल्याने आपली जमीन विकत घेण्यासारखा प्रकार असल्यामुळे नजराना रक्कम कमी करण्यात यावी अहीर यांनी याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले होते. शासनाने नजरान्याची रक्कम कमी केल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात अहीर यांना यश मिळाले आहे. reserved land ownership benefits

    चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी स्तरावरील मागील काही वर्षापासून प्रलंबित प्रकरणांसह दाखल करण्यात आलेली अनेक प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याने वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मालकीहक्क मिळू लागल्याने शासनाच्या विविध सोयीसुविधांचा लाभही जिल्ह्यातील मागासवर्गीय तसेच अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याने हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहे. Hansraj Ahir land policy updates

  • Movement of project victims | हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

    Movement of project victims

    Movement of project victims : वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलेरा व पिंपरी या गावाची पुनर्वसन प्रकीया मागील ३० वर्षांपासून सुरू न झाल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दि. २५ जानेवारी २०२५ रोजीपासून खाणीमध्ये कामबंद आंदोलन सुरू केले होते.

    या आंदोलनाची गंभीर दखल घेवून पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी वेकोलिचे सीएमडी यांचेसोबत पुनर्वसन विषयक प्रलंबित प्रश्नांबाबत दुरध्वनीवरून विस्तृत चर्चा केली व आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलकांच्या मागणीस पाठिंबा देत मुख्य महाप्रबंधक वणी नॉर्थ क्षेत्र यांचे उपस्थितीत पुनर्वसन व अन्य न्याय मागण्यांच्या पुर्ततेकरिता पुढाकार घेवून महिनाभरात विषय मार्गी लावण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ यांचेकडून देण्यात आले.

    उच्च विस्फोटक निर्मनी येथे पदभरती, आजच करा अर्ज

    मुख्य महाप्रबंधक यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनानुसार महिनाभरामध्ये दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्त यादीचा विषय मार्गी लावून सन २०१९ पर्यंतची प्रकल्पग्रस्तांची नवीन यादी व २०११ ची जुनी यादी नुसार दोन्ही प्रस्ताव मुख्यालयाला सादर करून नवीन यादी धारकांकडून आवश्यक कागदोपत्री पुरावे मागवून कुंटूबाच्या अंतर्गत झालेले मालकीहक्क फेरफार ग्राह्य धरून पुनर्वसन लाभधारक यादीला अंतिम मान्यता द्यावी असे अहीर यांनी सांगितले. अहीर यांच्या मध्यस्थीने सुचविण्यात आलेल्या तोडग्याच्या आधारे प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी आपले खाणबंद आंदोलन मागे घेतले.

    चंद्रपुरात नाना – नानी पार्कचे उदघाटन

    आंदोलनामध्ये चर्चेदरम्यान यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदुरकर, बंडु चांदेकर, साधना उईके सरपंच कोलेरा पिंपरी, उपसरपंच केशव पिदुरकर, पवन एकरे, अतुल बोंडे, प्रियंका सातपुते, दिपक मत्ते, महेश देठे, बंडु खंडाळकर, बालु खामनकर, अनिल बोढाले, शंकर खामनकर व दोन्ही गावातील आंदोलनकर्ते प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.