Brahmpuri Armori accident news
Brahmpuri Armori accident news : चंद्रपूर (१४ सप्टेंबर २०२५) : ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात मांगली येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजय आनंदराव कार असे या मृत तरुणाचे नाव आहे. एका मिनी पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.
अजय कार हा प्रशांत पिलारे यांच्याकडे चारचाकी वाहनचालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामावर गेला होता आणि सायंकाळी काम आटोपून आपल्या गावी मांगली येथे परत जात होता. आरमोरी रोडवरील एका बारसमोर समोरून येणाऱ्या एमएच-३४ बीझेड-३१५३ क्रमांकाच्या मिनी पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अजय चा मृत्यू
हा अपघात इतका गंभीर होता की अजयला जबर दुखापत झाली. त्याला तात्काळ ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर, पिकअप चालकावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अजयच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी केली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply