Tag: हंसराज अहिर

  • Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    Chandrapur Bjp leader : आमदार जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपात….

    chandrapur bjp leader भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.


    Chandrapur bjp leader जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार व गजभे या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.  

    राजकीय : निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचा प्रयत्न – कांग्रेस उमेदवार संतोष रावत


    भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.

  • wcl chandrapur : स्थानिकांना आधी रोजगार द्या – हंसराज अहिर

    wcl chandrapur : स्थानिकांना आधी रोजगार द्या – हंसराज अहिर

    wcl chandrapur जिल्हयातील वेकोलि क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या खासगी ओबी (माती) कंपन्यांनी राज्यशासनाच्या स्थानिक पातळीवर रोजगारसंदर्भातील ८०*२० अनुपात धोरणाशी अधिन राहून प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील स्थानिक बेराजेगारांना सामावून घेण्यास प्राधान्यक्रम द्यावा व या संपूर्ण कार्यवाहीवर अंमल करवून घेण्याकरिता संबंधित शासकीय यंत्रणांनी नियंत्रण ठेवत या कंपन्याना स्थानिकांना रोजगार देण्यास बाध्य करावे असे सक्त निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले आहेत.

    wcl chandrapur स्थानिक शासकीय विश्रामगृहात दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी वेकोलि वणी, माजरी व बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालयाचे महाप्रबंधक व ओबी कंपन्याच्या व्यवस्थापनासोबत आढावा बैठक घेत आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलिशी संबंधित विविध प्रश्न, समस्या व अन्य बाबींचा सविस्तर आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यपूर्ततेबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर पोलिसांमुळे झाला पुरुषोत्तम चा मृत्यू, कुटुंबाचा खळबळजनक आरोप

    या बैठकीस माजी आ. अॅड संजय धोटे, भाजपा नेते खुशाल बोंडे, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रघुवीर अहीर, राजु घरोटे, मधुकर नरड, धनंजय पिंपळशेंडे, उमेश बोढेकर, पवन एकरे, राजेश तालावार, किशोर बावने, संजय तिवारी, सुदेश उपाध्याय, येनकच्या सरपंच कल्पना टोंगे, पाटाळाचे सरपंच विजयेंद्र वानखेडे, वेकोलि माजरीचे क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोद कुमार, वणी क्षेत्राचे आभासचंद्र सिंह, बल्लारपूर क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे ऋतुराज सुर्य आदीची उपस्थिती होती. (wcl chandrapur)

    खळबळजनक आरोप

    वेकोलि प्रकल्पप्रभावित गावातील ओबीसी व अन्य प्रवर्गातील बेरोजगारांच्या रोजगारविषयक ओबी कपन्यांविषयी रोजगाराबाबत गंभीर स्वरूपाच्या तकारी प्राप्त झाल्याने ही आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आयोगाद्वारे नव्याने प्रस्तावित खाणीबाबत तिन्ही वेकोलि क्षेत्राचा कार्य आढावा घेण्यात आला. उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांकडून अहीर यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

    मुंगोली प्रकल्प सेक्शन-७ करीता प्रस्तावित झाल्याच, कोलगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित होत असल्याचे व गाडेगाव सेक्शन-९ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलि अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. वणी क्षेत्रातील ग्राम-मुंगोली  पूनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे तसेच उकणीचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आयोगास दिली. माजरी क्षेत्रातील मार्डा गावाच्या पुनर्वसनाची मागणी असल्याचे तसेच बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन-४ करीता प्रस्तावित झाल्याची माहिती वेकोलिने दिली. गोवरी-पोवनी एकत्रिकरण, बल्लारपूर नार्थ-वेस्ट  सेक्शन-९ करीता प्रस्तावित असल्याची माहितीसुध्दा यावेळी देण्यात आली. (wcl chandrapur)

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्षांनी या सर्व प्रकल्पातील पुनर्वसन प्रस्तावित गावातील १०% पेक्षा कमी उर्वरित जमिनींचे अधिग्रहण करून पुनर्वसन प्रकीयेला गती देण्याची सुचना उपस्थित क्षेत्रीय महाप्रबंधकांना दिल्या बैठकीमध्ये सर्वच प्रकल्पातील ५ वर्ष कालमर्यादा कारणास्तव प्रलंबित नोकरी प्रस्तावांचा सुध्दा अहीर यांनी आढावा घेतला. वेकोलि क्षेत्रात कार्यरत ओबी कंपन्यांमधील एकुण मनुष्यबळ त्यापैकी स्थानिकांची नोकरीतील टक्केवारी, एचपीसी नुसार वेतन, कामगाराकरिता वैद्यकीय सुविधा, विटीसी, पोलीस वेरीफिकेशन आदी बाबतही अहीर यांनी माहिती जाणून घेतली स्थानिकांना ८०% रोजगार देण्याकरिता शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याची गांर्भीयाने दक्षता घेण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्याऱ्यांना दिले.

    वेकोलि भुमीअधिग्रहीत गावातील तसेच परिसरातील शिक्षित व व्यावसायिक शिक्षण पात्र बेरोजगार युवकांनी ओबी कंपन्यांमध्ये रोजगार मिळवण्याकरिता वेकोलिच्या सर्व क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयाकडे आवेदन करण्याच्या सुचना सुध्दा हंसराज अहीर यांनी केल्या आहेत.

    वेकोली ला सूचना

  • Hansraj Ahir ncbc : ओबीसींच्या नोकऱ्यातील अनुशेष आरक्षण धोरणानुसारच पूर्ण करा – हंसराज अहिर

    Hansraj Ahir ncbc : ओबीसींच्या नोकऱ्यातील अनुशेष आरक्षण धोरणानुसारच पूर्ण करा – हंसराज अहिर

    Hansraj ahir ncbc विविध राष्ट्रीयकृत बँका, जीवन विमा कंपनी, रिझर्व बँक ऑफ इंडिया व केंद्रीय आस्थापनातील नोकर भरती, ओबीसी प्रवर्गातील कार्यरत कर्मचारी, अधिकारी, आरक्षण रोष्टर नुसार कार्यवाही यासह अन्य बाबींचा सविस्तर आढावा संबंधित आस्थापनाच्या आयोजित बैठकीमध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात घेतला.

    अवश्य वाचा : योजनादुत बना आणि 10 हजार रुपये महिना कमवा

    Hansraj ahir ncbc दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने  घेतलेल्या बैठकीमध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्स्टिट्युट ऑफ पर्सोनेल ‍सिलेक्शन, युनियन बँक, एल. आय. सी., आर बी आय आदी आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी एनसीबीसी अध्यक्षांना आवश्यक माहिती सादर केली. बँकांच्या नव्या नोकरभरती प्रक्रियेत निवड झालेले सुमारे ५० % उमेदवार नोकरीत रूजु होत नसल्याची बाब आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या गंभीर विषयात योग्य दक्षता घेत उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले.

    अंमलबजावणी व्हायला हवी

    सर्वच बँकांमध्ये ओबीसी आरक्षणाविषयी असलेल्या टक्केवारीची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नापसंती व्यक्त करून वरिष्ठांनी ओबीसी आरक्षणाविषयी काटेकोर धोरण स्वीकारण्यास प्राधान्य देण्याची सुचना केली. ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग त्वरीत भरण्याकरिता जलदगतीने कार्यवाही करावी अशा सुचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना आयोगाद्वारे देण्यात आल्या.

    जनतेचे सर्व विघ्न बाप्पा दूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    दि. ०६ सप्टें. रोजी याच अतिथीगृहामध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आरसीएफ या रासायनिक खत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून तेथील पदभरती, रोष्टर नुसार ओबीसी आरक्षण व अन्य बाबींचा सुध्दा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अहीर यांनी कंपनीद्वारे सक्षम अधिकाऱ्यांकरवी ओबीसी आरक्षण रोष्टरचे पालन झाल्याचे अनुमोदन होईपर्यंत पुढील भरतीप्रक्रिया कार्यान्वित करू नये अशा सुचना केल्या. त्यांनी ओबीसी उमेदवारांच्या नोकरभरतीबाबत आरक्षण टक्केवारीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देतानाच तत्संबंधीचा अनुपालन अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला सादर करण्याची सुचना अहीर यांनी या आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना दिली.

  • hansraj ahir : 2 महिन्यात प्रकरणे निकाली काढा – आयोग अध्यक्ष हंसराज अहिर

    hansraj ahir : 2 महिन्यात प्रकरणे निकाली काढा – आयोग अध्यक्ष हंसराज अहिर

    hansraj ahir चंद्रपूर :- भोगवटदार वर्ग-2 चे भोगवटदार वर्ग-1 मध्ये वर्गीकरण करून भूधारकाला भूमिस्वामी बनविण्यात संदर्भातील प्रलंबित व कार्यवाहीकरीता दाखल केलेली ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रकरणे येत्या 2 महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आयोगाद्वारे राजुरा येथे घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये दिले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर वन प्रबोधिनीला राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन


    Hansraj ahir दि. 17 ऑगस्ट 2024 रोजी राजुरा उपविभागीय कार्यालयात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सुनावणीला श्रीकांत देशपांडे, अप्पर उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, रविंद्रकुमार माने, उपविभागीय अधिकारी राजुरा, डॉ. ओमप्रकाश गौंड तहसिलदार राजुरा, प्रकाश वटकर तहसिलदार कोरपना, अविनाश शेंबटवाड तहसिलदार जिवती, राजुराचे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा नेते खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, राजु घरोटे, अरूण मस्की, वाघूजी गेडाम, सुरेश रागीट, मधूकर नरड, शिवाजी सेलोकर, अॅड. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, दिलीप वांढरे, निलेश ताजने, महादेव तपासे, रामसेवक मोरे, सचिन शेंडे, जनार्धन निकोडे, संदिप शेरकी, किशोर बावने, रमेश मालेकर, संतोष भोसकर, संदिप पारखी, संजय पावडे, रवी गायकवाड, हरीदास झाडे, राहुल सूर्यवंशी, संजय जयपुरकर, सुयोग कोंगरे, कुणाल पारखी, अजूम शेख, राजू गगशेट्टीवार यांचेसह राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील शेतकरी बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : लाडकी बहीण अडकली केवायसी च्या फेऱ्यात


    राजुरा विधानसभेचे माजी आमदार अॅड. संजय धोटे यांनी ओबीसी आयोगाकडे याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करून आयोगाकडे जनसुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ओबीसी व अन्य शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सदर जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान राजुरा उपविभागीय कार्यालया अंतर्गत भो. वर्ग 1ची 176 प्रकरणे तर कोरपना तालुक्यातील 168 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना दिली. तलाठी अहवाल, दुय्यम निबंधकांचे मुल्यांकन अहवाल अप्राप्त असल्याने तसेच शासकीय त्रुटींमुळे ही प्रकरणे प्रलंबित असल्याबद्दल आयोगाने तीव्र नापसंती व्यक्त करीत तातडीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.


    राजुरा तालुका 1274, कोरपना तालुका 832 व जिवती तालुक्यासह 2106 प्रकरणे सुरूवातीला दाखल असून अन्य शेतकऱ्यांची प्रकरणे नोंदणीकृत करण्यात येत आहेत. जनसुनावणीमध्ये सुमारे 3000 च्या आसपास अर्ज प्राप्त झाले. ही सर्व प्रकरणे महिनाभरात आवश्यक दस्तावेजांची छाननी करीत त्रुट्यांची पुर्तता करवून अर्जदारांच्या नावासह यादी जाहीर करून ही सर्व प्रकरणे 2 महिन्याच्या आत मार्गी लावण्याचे निर्देश हंसराज अहीर यांनी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. दाखल झालेली काही प्रकरणे संगणकीय चुकीमुळे भो. वर्ग 1ची 2 मध्ये नोंद झाल्याची, निरंक ऐवजी वर्ग 2 झालेली तर काही पट्टे वाटप व कुळ कायद्यात मिळालेली असल्याची माहिती अतिरीक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगासमोर दिली.

    मार्च 2024 पुर्वीची प्रकरणे व त्यानंतरच्या प्रकरणात अनुक्रमे 50 % व 75% आकारणी शासन निर्णयानुसार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. वर्ग 2 ते वर्ग 1 चे वर्गीकरण कार्यवाहीचे शुल्क दर कमी करण्यास प्रयत्न करण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कार्य करू असे अहीर यांनी सांगितले. राज्यशासनाच्या अध्यादेशानुसार 200 रूपयांच्या मुद्रांकावर वडीलोपार्जित शेतीचे वाटणीपत्र, बक्षिसपत्र व फेरफार प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी तहसिलदारांनी कार्यवाही करावी असे निर्देशही आयोगाच्या वतिने या जनसुनावणीत देण्यात आले.
    या जनसुनावणीला राजुरा उपविभागीय क्षेत्रातील बहुसंखेने शेतकरी बांधव उपस्थित होते.

  • Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

    Hansraj Ahir : 18 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित होणार समावेश – हंसराज अहिर

    hansraj ahir महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसीवर दि. 26 जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली.

    अवश्य वाचा : चंद्रपूरात 2 युवकांचा जीवघेणा स्टंट

    Hansraj ahir मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह 16 जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होणार

    या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व 18 जातींचा समावेश केंद्रीय सुचीमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.

  • Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

    Union Budget Date : आजचा अर्थसंकल्प विकासाचा रोड मॅप

    Union budget date विकसित भारत घडविण्याचे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भक्कम जडणघडणीस तसेच गरीब, शेतकरी, युवा व महिला उत्थानास नवी दिशा देणारा असून हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास साह्यभुत ठरणारा असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

    या अर्थसंकल्पातून रोजगार, कौशल्य विकास लघु व सुक्ष्म उद्योगास चालना, मध्यम वर्गास न्याय, कृषी उत्पादन वृध्दी, कृषी संशोधन व अन्य क्षेत्राशी निगडीत रचनात्मक विकासाला वाव देण्याचा कसोशिने प्रयत्न करण्यात आला आहे. शेतीसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करुन सरकारने कृषीक्षेत्रात अनेक महत्वकांक्षी योजनांना पुरस्कृत करण्याचा व्यापक प्रयत्न केला आहे. नवरोजगारासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतुद करीत महिला उत्थानास गती देण्याची भुमिका आहे. पी-एम सुर्यघर योजनेंतर्गत एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज कर्मचारी पेन्शनधारकांना कर प्रस्तावात सवलत, शिक्षण, स्वास्थ्य, ग्रामीण विकासावर अर्थसंकल्पातून भर दिला आहे.

    अवश्य वाचा : केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळाला ठेंगा

    Union budget date हा अर्थसंकल्प सर्वसमावेशी असल्याने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला असून हा अर्थसंकल्प विकसित भारताचा रोडमॅप असल्याची प्रतिक्रीया हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.

    विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा तरी वित्तीय तूट कमी करणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. २३ जुलै २०२४ : देशाच्या विकासाला अधिक गती देत असतांनाच सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भारताचे लाडके आदरणीय पंतप्रधान मा.श्री नरेंद्रभाई मोदी जी यांच्या नेतृत्वात भारतमातेला विश्वगुरू बनविण्याचे आपल्या सर्वांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारा या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.

    चंद्रपूर-मूल मार्गावर भीषण अपघात

    ना.श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की आजच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.९% इतकी कमी राखली गेली आहे, हे कौतुकास्पद आहे. देशात विकासात्मक कामांवरील आणि कल्याणकारी योजनांवरील खर्च वाढत असतांना तूट कमी करण्याचे आव्हान मोदी सरकारने पेलून दाखवले आहे. त्याच्या जोडीला आयकराची केलेली पुनर्रचना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. जीएसटी मधे विविध वस्तूंना दिलेली सवलत, आयात व सीमा शुल्कातून विविध अत्यावश्यक औषधांना दिलेली सूट समाजाला समाधान देणारी आहे. तर मोबाईल फोन, त्याचे सुटे भाग यांच्यावरील घटवलेले कर हे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायजेशनला अधिक वेग देणारे आहेत, असे ते म्हणाले.

    Union budget date या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला गेला आहे असे सांगून ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की या अर्थसंकल्पामुळे खते व बीबियाणे स्वस्त होतील. हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दिशेने अधिक दमदार पाऊले टाकणारा आहे. तेलबियांच्या उत्पादनाला दिलेल्या सवलती व चालना देशाला खाद्यतेल क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याकडे नेणाऱ्या आहेत. तर नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता ग्रामपंचायत पातळीवर दिलेल्या योजना व सवलती हे आपली जमीन, जल व धान्य निर्वीष करणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.

    आजच्या अर्थसंकल्पात हवाई वाहतुक व जल वाहतुकीला तसेच जहाज व विमान दुरूस्ती व देखभाल या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरता जाहिर केलेल्या योजना या देशाला या ही क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवत पुढे नेणाऱ्या आहेत अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनांचे कौतुक केले आहे. बिहार, ओदीशा, प.बंगाल, झारखंड व आंध्र या पूर्व भारतातील भागात रस्ते, वीज , गृहनिर्माण व पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधांसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या आहेत, त्यातून याभागात उद्योग व रोजगार वाढून विकासाचा अनुशेष भरून निघेल असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बिहार व आंध्र प्रदेशाला दिलेले विशेष पॅकेज या राज्यामधील बेरोजगारी कमी करणारी ठरतील असे ते म्हणाले.

    ग्रामीण आणि नागरी भागातील भूमी अभिलेखांचे डिजिटायजेशन तसेच नवीन सर्वेक्षण, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून जमिनीचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येईल, तसेच विकासाचे नियोजन नियंत्रण करणाऱ्या संस्थांना व प्राधिकरणांना अधिक चांगले काम करता येईल असे ते म्हणाले. भूमी अभिलेख क्षेत्रात बरेच दिवस प्रलंबित असलेले प्रश्न या अर्थसंकल्पामुळे सुटतील असेही त्यांनी सांगितले.

    सर्वसामान्यांना आयकरात सवलत देतांनाच कॉर्पोरेट क्षेत्रालाही सवलती दिल्या आहेत, त्या सवलती रोजगार निर्मितीशी जोडल्याने (एम्प्लॉयमेंट बेस्ड इंसेंटीव्हज) कंपन्यांना तंत्रज्ञान व नफा यासोबतच आता रोजगार निर्मितीवर भर द्यावा लागणार आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे, असे ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यां्नी सांगितले.

    एकुणात हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, विकासाची गती वाढविणारा, रोजगार निर्मिती करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा, शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहे, असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

    केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय – आ. किशोर जोरगेवार

    आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी सादर केलेल अर्थसंकल्प देशाला विकासाची नवी दिशा देणारा आहे. उद्योग, ग्रामीण विकास, रोजगार, सुरक्षा या विषयांना केंद्र स्थानी ठेवून सदर अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा नवा अध्याय असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.

      यावर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून स्टार्टअप्स आणि रोजगार निर्मिती उपक्रमांवर दिलेला भर ही एक चांगली बाब आहे. अनेक क्षेत्रांमधील व्यवहार सुलभ करण्यात आले आहेत. सर्वच क्षेत्रांमधील भविष्यातील सुधारणांचा आढावा या अर्थसंकल्पात असून उद्योग विश्वासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे.पूरस्थिती नियंत्रणासाठी साधारणपणे ११ हजार ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत १ कोटी गरीब व मध्यम वर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे. यातून १ कोटी घरांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.

    कृषी क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण आदी क्षेत्रावर अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आले असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

    Pilgrimage : चंद्रपुरातील 400 नागरिक पुण्यभूमी अयोध्येसाठी रवाना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४०० प्रवाशांच्या तुकडीचे स्वागत केले. हे भाविक प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुण्यभूमी अयोध्येकडे प्रवासाला निघाले होते. बल्लारशाह-अयोध्या ही विशेष ट्रेन (क्र. ०१५९) चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून २० फेब्रुवारी रोजी निघाली. Pilgrimage

     

     

    दुपारी 12:15 वाजता स्थानकावर पोहोचल्यानंतर अहिर यांनी वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मनपाचे माजी सभापती रवींद्र गुरनुले, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, पूनम तिवारी, श्याम शारदा, अनिश दीक्षित, संजय मंघानी, किशोर बंडवार, रितेश वर्मा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. Punyabhumi ayodhya

     

    चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनीही रामभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 01:10 मिनिटांनी, “भारत माता की जय” आणि “जय श्री राम” च्या जयघोषात भाविक आणि मान्यवरांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला. Hansraj ahir

     

    अयोध्येची ही शुभ यात्रा भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ते प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी तीर्थयात्रेला निघतात. चेअरमन हंसराज अहिर आणि उपस्थित मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत आणि पाठिंबा या पवित्र प्रवासाभोवती एकता आणि भक्तीचा भाव वाढवतो. Prabhu shri ramchandra

  • chandrapur to pune trains : चंद्रपूरकरांनो थेट मुंबई, पुणे जाण्याचा मार्ग मोकळा

    chandrapur to pune trains : चंद्रपूरकरांनो थेट मुंबई, पुणे जाण्याचा मार्ग मोकळा

    News34 chandrapur

    चंद्रपुर – चंद्रपूर आणि मुंबई/पुणे दरम्यान थेट रेल्वे कनेक्शन नसल्यामुळे, जिल्ह्यातील रहिवाशांना, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि व्यापारी यांचा समावेश आहे, त्यांना पर्यायी पर्याय शोधावे लागले आहेत किंवा नागपूरहून त्यांचा प्रवास सुरू करावा लागला आहे. या समस्येचे महत्त्व ओळखून, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या समस्येचे निराकरण करण्यात उत्सुकता घेतली आहे. चंद्रपूर ते मुंबई आणि पुणे थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी हंसराज अहिर यांनी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. Railway department

     

    प्रतिसादात, रेल्वे विभागाने या विनंतीचे महत्त्व मान्य केले आहे आणि थेट रेल्वे मार्ग स्थापित करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी पावले उचलली आहेत. 12 फेब्रुवारी 2024 रोजी, नागपूरमधील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना एक पत्र जारी करण्यात आले, ज्यात त्यांना प्रस्तावित रेल्वे सेवांसाठी व्यवहार्यता टिप्पणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या. चंद्रपूर ते मुंबई आणि पुणे थेट गाड्या सुरू केल्याने जिल्ह्यातील रहिवाशांना लक्षणीय फायदा होईल, ज्यामुळे त्यांचा रेल्वे प्रवास सुरू करण्यासाठी नागपूरला जाण्याची गरज नाहीशी होईल. या विकासामुळे सुविधा वाढेल, वेळेची बचत होईल आणि विद्यार्थी, पालक आणि व्यापारी यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी सुधारेल. Mumbai-pune trains

     

    हंसराज अहिर यांनी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर रेल्वे विभागाकडून मिळालेला प्रतिसाद चंद्रपूर, मुंबई आणि पुणे दरम्यान थेट रेल्वे जोडणीची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे सूचित करतो. व्यवहार्यता मूल्यमापन जसजसे पुढे जाईल, अशी आशा आहे की या रेल्वे सेवांची स्थापना लवकरच प्रत्यक्षात येईल, ज्यामुळे चंद्रपूरच्या रहिवाशांसाठी अधिक कार्यक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध होईल.

     

    नंदीग्राम या रेल्वे च्या मार्गात भद्रावती, वणी, पिंपळखुटी या ठिकाणी थांबणार आहे. अहीर यांच्या या चर्चेला अनुसरून मध्य रेल्वे विभागाने सदर पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर यांना जारी केले आहे. या पत्रान्वये बल्लारशा येथून मुंबई करिता दररोज तर पुणे करिता आठवडयातून ३ दिवस रेल्वे धावणार आहे. Chandrapur to pune trains

     

    मुंबई व पुणे करिता थेट रेल्वे सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून यात्रेकरूंसाठी ही रेल्वे विशेष सुविधेची ठरणारी आहे. याबाबत अधिक माहिती देत हंसराज अहीर यांनी सांगीतले की, सदर रेल्वे गाडया जलद गतीने सुरू करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांच्याशी चर्चा केली असून त्वरीत व्यवहार्यता टिप्पणी मध्य रेल्वे मुंबई कार्यालयास सादर करण्याची सुचना केली आहे. Chandrapur to mumbai trains

     

    या रेल्वे सुरू होत असतांना चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील प्रवाशी, विद्यार्थी, पालक, व्यापारी व यात्रेकरू यांना भरिव फायदा होणार असून हंसराज अहीर यांचे हे प्रयत्न चंद्रपूर जिल्हयातील रेल्वे सुविधेमध्ये नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा सार्थ विश्वास चंद्रपूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने व्यक्त करून हंसराज अहीर यांचे आभार मानले आहे. Hansraj ahir

  • चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    News34 chandrapur

    चंद्रपूर / यवतमाळ – विकसीत व सामर्थ्यशाली भारत घडविण्याची ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात असल्याने ‘महाविजय 2024’ चे लक्ष्य गाठण्यासाठी व देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती सोपविण्यासाठी प्रत्येक बुथवर 50 टक्के मतदान हे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून सुपर वॉरीयर्सनी आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा अशी सुचना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र समन्वयक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.

     

    दि.23 डिसेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी पदाधिकारी व सुपर वॉरीयर्सना ते संबोधीत होते. सदर बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडीया, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, किशोर बावने, बंडु चांदेकर, संजय पिंपळशेंडे, मंगला धाकडे, ममता अवताडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे प्रभृती उपस्थित होते. यावेळी हंसराज अहीर यांनी ‘विकसित भारत रथ’ कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

     

    सुपर वॉरीयर्स तसेच बुथ संबंधात माहिती घेतली. पक्षीय कार्यकमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती घेतांनाच उपयुक्त सुचना केल्या. हंसराज अहीर यांनी आर्णी विधानसभा कोअर कमिटीची पांढरकवडा येथे बैठक घेवून संघटनात्मक कार्य तसेच प्रदेश भाजपाद्वारा दिलेल्या कार्यकमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्वांनी परिश्रमपुर्वक कार्य करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहचेल असे नियोजन करीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य करावे असे आवहन केले.

     

    यावेळी संतोष चिंतावार, आनंद वैद्य, किशोर देशट्टीवार, मदन जिड्डेवार, बंटी जुआरे, गुड्डू शुक्ला, विपिन राठोड मोहन कन्नाके, स्वप्नील मंगळे, बाळु हमंद, अॅड. मुत्तलवार, दयानंद सोयाम, दिलीप मुथा, शंकर समृतवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य करण्याची सुचना केली.

     

     

    वरोरा येथे दि. 23 डिसे. 2023 रोजी पार पडलेल्या विधानसभानिहाय कोअर कमिटीच्या या बैठकीस वरोरा विधानसभा निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर, डॉ. भगवान गायकवाड, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, करण देवतळे, रोशनीताई देवतळे, सुनिताताई काकडे यांचेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वणी व आर्णी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी बैठकीस प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्स उपस्थित होते.

     

     यावेळी उपस्थित पदाधिकारी, सुपर वॉरियर्स व बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी महाविजय 2024 चे स्वप्न साकार करण्यास व मा. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सुपर वॉरियर्सनी आवश्यक ते निर्णय व विशेष लक्ष घालून बुथ रचनेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याची सुचना केली.

     

    सुपर वॉरियर्सने महाविजयाचा संकल्प घेत प्रत्येक मुद्दा, विषय समजुन घेवून त्याची तिन्ही बुथवर शत प्रतिशत अंमलबजावणी करण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही अहीर यांनी वरील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील कोअर कमिटी पदाधिकारी वॉरियर्स व उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.