Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

    Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

    har ghar tiranga हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक येथे करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    राजकीय वार्ता : चंद्रपुरात मनसेचे इंजिन धावणार


       शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतल्या जात असुन १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

    सामाजिक : चंद्रपुरातील जीवघेण्या खड्ड्यात अपघात


      Har ghar tiranga शहरातील सर्व महाविद्यालये, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये यांना पत्र देऊन रॅलीत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने विद्यार्थी, शासकीय कर्मचारी,राजकीय पक्ष,मनपा अधिकारी – कर्मचारी व इतरांचा प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. बाईक रॅली असल्याने हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.  

       
        प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ते परत सावरकर चौक ते प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट ते अंकलेश्वर गेट ते बागला चौक ते अंचलेश्वर गेट असा रॅलीचा मार्ग असुन मनपा कार्यालय गांधी चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे.

    राजकीय : खड्डयासोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे


        त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट रोजी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले असुन मनपा अधिकारी कर्मचारी व व्यावसायिक कलाकार यात सहभागी होणार आहेत.स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या आप्तजनांना या कार्यक्रमांत सन्मानित करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियान सर्वांचे असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

    Selfie with Tiranga चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

    महत्त्वाचे : वाहतुकीचे हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन


        या सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ७०००/- तृतीय रु. ५०००/-  तसेच ५०० रुपयांची १० प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन harghartiranga.com या वेबसाईटवर तसेच चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर पाठवायचे आहेत. तसेच QR कोड स्कॅन करून देखील करता येईल. तसेच सेल्फी नागरिकांना त्यांच्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात लवकरचं सुरू होणार हवाई सेवा

    अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये तिरंगा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा कालावधी ०९ ते १५ ऑगस्ट असुन सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही  आहे.स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे.  

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर


          शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.

  • Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

    Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

    Chandrapur Road सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा रस्ता, चंद्रपूरच्या प्रमुख बस स्थानकापासून बंगाली कॅम्प व समोरील रस्ता, बस स्थानकापासून तूकूम कडे जाण्याचा प्रमुख रस्ता इत्यादी व शहरातील इतर प्रभाग जसे बाबुपेठ प्रभाग, महाकाली कॉलरी प्रभाग , लालपेठ कॉलरी प्रभाग , रयतवारी कॉलरी प्रभाग, इंडस्ट्री इस्टेट प्रभाग, रहमतनगर , भिवापूर प्रभाग, अशा अनेक प्रभागाच्या व शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहेत.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज नामंजूर झाला तर असा करा दुरुस्त

    Chandrapur road या रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असते, वाहन चालकांना वाहन चालवताना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.

    खड्डे चुकवताना अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी काही रस्त्यांवर पथदीप नसल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात आढळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले आहेत. तरी लवकरात लवकर रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे बुजवून चंद्रपूरचे शहराचे रस्ते खड्डे मुक्त करून शहरातील लोकांना न्याय द्यावा अशी सकारात्मक चर्चा चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी करण्यात आली व या संबंधीचे निवेदन ही त्यांना देण्यात आले याप्रसंगी बहुजन समाज पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार , जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, चंद्रपूर शहर महासचिव मंगेश, सागर करमरकर ,विवेक दुपारे अमरदीप दसोडे , अखिल निमगडे, सुवर्णा रामटेके, पौर्णिमा अवतरे , पूजा पोरेकर व बहुजन समाज पार्टी चे इतर कार्यकर्ता उपस्थित होते.

  • Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

    Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

    Anukampa niyukti चंद्रपूर : आज चंद्रपूर मनपा कृती समितीने शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड.निमेश मानकर यांचे नेतृत्वात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत निवेदन दिले. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु मा. आयुक्त साहेबांनी सर्व अनुकंपाधारकांना मराठा आरक्षणा बिंदुनामावली आरक्षीत झाली नसल्यामुळे अनुकंप भरतीला स्थगिती दिली आहे असे सांगितले. तसेच महानगरपालिकेच्या आस्थपना येथील संबंधित बाबुला विचारणा केली असता त्यांनी सुध्दा ३ ते ४ जागा शासनाच्या धोरणाप्रमाणे भरण्याचे सांगितले.

    अवश्य वाचा : त्या मुलीचा आत्मविश्वास बघून आमदार म्हणाले तू पुन्हा धावशील

    Anukampa niyukti ही सर्व आश्वासने अनुकंपधारकांना २०२२- ते -२०२४ या दरम्यान देण्यात आली, मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले .त्यामुळे प्रतिक्षा यादीत असणाऱ्या अनुकंपाधारकांवर व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
    शासन निर्णयानुसार सरळ सेवा कोठ्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के प्रमाणे पद भरती होत आहे. मात्र सदरील शासन निर्णयाप्रमाणे सामायिक प्रतिक्षासुची मधील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील मोजकेच अनुकंप धारकांना नियुक्ती मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्षा सुचीमध्ये सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यास १० ते १२ वर्षाचा कालावधी लागत असल्याने अनुकंपाधारक वयाच्या अटीमध्ये बाद होत आहोत.

    महत्त्वाचे : त्या दलालांविरोधात अनुसूचित जनजाती आयोगाला तक्रार

    शासन निर्णयामध्ये बदल करुन त्यामध्ये सरळसेवेने रिक्त होणाऱ्या पदाऐवजी सद्यस्थितीत सरळ सेवेचे रिक्त असलेल्या एकुण पदाच्या २० टक्के पदावर असा बदल केल्यास अनुकंपा प्रतिक्षा यादी कमी होईल. जर प्रशासन/ शासनाने अनुकंपा धारकांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर अनुकंपाधारकांकडे उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आम्ही सर्व अनुकंपाधारक दि. १४/०८/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून मनपा समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. त्यामुळे या निवदेनावर प्रशासन व शासनाने गांभिर्याने लक्ष देवून मागण्या मान्य कराव्या. अशी सर्व अनुकंप धारकांची नम्र विनंती.


    प्रमुख मागण्या :-
    १) ‘ड’ वर्गातील सर्व अनुकंप धरकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सामावून घेण्यात यावे.
    २) सद्या स्थितीत रिक्त असलेल्या एकुण पदाच्या २० टक्के वर्ग क व वर्ग ‘ड’ च्या अनुकंप धारकाची पद भरती करण्यात यावी.
    ३) २३/०८/२००८ चा शासन निर्णय ५० टक्के, २५ टक्के, २५ टक्के प्रमाणे १०० टक्के अनुकंप पदभरती करावी. मा.आमदार महोदय यांनी या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट घेवून तोडगा काढू असे आश्र्वासन दिले. निवेदन देताना शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर तसेच अनुकंपाधारक सुजय घडसे, संतोष सुभाष बोरकर, आकाश मधुकर करपे, ओमदेव दिनकर निखाते, शुभम मोरेश्वर गहुकर, अजय अनिल रामटेके, संगीता खेमराज दुर्गे उपस्थित होते.

  • Dengue : चंद्रपुरातील हे कुठलं दृश्य आहे?

    Dengue : चंद्रपुरातील हे कुठलं दृश्य आहे?

    Dengue घुटकाळा वॉर्ड येथील वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या इलियाज खान यांचा मालकीच्या लकी गराजवाला यांच्या घराला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सफाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.


      Dengue  डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान घुटकाळा वॉर्ड येथील लकी गराजवाला येथील मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्टस गॅरेजमालकाच्या घराच्या छतावर अनेक दिवसांपासुन टाकुन ठेवले असल्याचे आढळले. मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्टसचा खच असल्याने त्यात पाणीही मोठ्या प्रमाणात साचुन असलेले निदर्शनास आले.

    गुन्हेगारी : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 गुन्हेगारांना पोलिसांनी केले तडीपार


         परिणामतः अश्या ठिकाणी डेंग्यु डासांच्या लारवांची उत्पत्ती होऊन शहरात डेंग्यु उद्रेक होण्याची शक्यता असल्याने त्या वाहनांचे स्पेअर पार्टसची तात्काळ पर्यायी व्यवस्था करून परिसर स्वच्छ करण्याची नोटीस मनपामार्फत बजाविण्यात आली आहे.सदर प्रकार पुन्हा आढल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

    घटना : चंद्रपुरात भूस्खलन, महिला पडली 20 फूट खोल खड्ड्यात


         पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

    एडिसचा प्रसार डासांमुळे होतो.

    डेंग्यू हा लक्षणे नसलेला संसर्ग किंवा सौम्य आजारापासून गंभीर आजारापर्यंत असू शकतो. डेंग्यू विषाणूचे चार उपप्रकार आहेत. अंदाजे 4 पैकी 1 डेंग्यू विषाणू संसर्ग लक्षणात्मक आहे. लक्षणात्मक डेंग्यू विषाणूचा संसर्ग सामान्यत: सौम्य ते मध्यम, तीव्र तापजन्य आजार म्हणून प्रकट होतो. डेंग्यूच्या चारपैकी कोणत्याही एका विषाणूचा संसर्ग त्या विशिष्ट विषाणूला दीर्घकालीन प्रतिकारशक्ती निर्माण करेल. डेंग्यूचे चार विषाणू असल्यामुळे, लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा संसर्ग होऊ शकतो. प्रारंभिक क्लिनिकल निष्कर्ष अविशिष्ट आहेत, परंतु संशयाचा उच्च निर्देशांक आवश्यक आहे कारण शॉकची प्रारंभिक लक्षणे ओळखणे आणि त्वरित गहन सहाय्यक थेरपी सुरू केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.

  • Ghagar Morcha : चंद्रपुर मनपावर घागर मोर्चा

    Ghagar Morcha : चंद्रपुर मनपावर घागर मोर्चा

    Ghagar Morcha चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.

    धक्कादायक घटना – चंद्रपूर शहरात भूस्खलन, घराच्या आत पडला 20 फुटाचा खड्डा, महिला जखमी

    Ghagar morcha ऐन पावसाळ्यात हा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे शिवाय जो पाणीपुरवठा होतो तोही दूषित होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभाग एक दिवस आड पाणी पुरवठा करतो मात्र बिल नियमितपणे वसूल करतो, हा प्रकार अन्यायकारक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमितपणे व तोही स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात करण्यात यावा या विषयाअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती करण्यात आली.

    योजना : लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा करा दुरुस्त

    चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर पाण्यासंबंधी समस्येचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देते वेळेस शिष्टमंडळामध्ये माजी नगरसेवक वसंता भाऊ देशमुख, लता ताई बंडू जांगडे,प्रकाश चंदनखेडे ,हाजी सय्यद हारून, मोनू रामटेके, सरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम मोहम्मद इरफान शेख आदी सह चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांच्या समावेश होता.

    अमृत पाणीपुरवठा

    चंद्रपूर मनपाने मोठ्या हौशीने अमृत पाणी पुरवठा योजना शहरात सुरू केली, मात्र आजही अनेक ठिकाणी अनेक वर्षे लोटल्यावर सुद्धा नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन लागलेले नाही, आजही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अमृत योजना अंमलात आणण्याचा कालावधी संपला त्यानंतर सुद्धा योजना पूर्णत्वास आली नाही.

  • Chandrapur flood : शहरातील कृत्रिम पुराला चंद्रपूर मनपा जबाबदार – पप्पू देशमुख

    Chandrapur flood : शहरातील कृत्रिम पुराला चंद्रपूर मनपा जबाबदार – पप्पू देशमुख

    Chandrapur flood मागील वर्षी चंद्रपूर शहरात पहिल्याच पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. वडगाव प्रभागातील नानाजी नगर, दत्तनगर, मित्र नगर, बापट नगर,स्नेह नगर, भावनाथ सोसायटी, अपेक्षा नगर, ओम भवन इत्यादी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. संपुर्ण शहरात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती पहिल्या पावसाने निर्माण केली होती. मुळात पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करणे, नाल्यांमध्ये साचलेला कचरा काढून नाल्यांचे प्रवाह मोकळे करणे अशी स्वच्छतेची महत्त्वपूर्ण कामे मागील वर्षी मनपाने केले नाही. मनपाच्या या चुकीमुळे कृत्रिम पुराचा फटका शहरातील नागरिकांना बसला, हजारो नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असा आरोप मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात आदित्य उत्सव साजरा

    Chandrapur flood यावर्षी सुद्धा संपूर्ण शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे,नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत.त्यामुळे पहिल्याच पावसात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिली.या बाबत तातडीने उचित कार्यवाही करण्यासाठी
    आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने लेखी पत्र देऊन उचित कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळामध्ये जनविकास सेनेचे सुभाष पाचभाई,मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे,अमोल घोडमारे,स्नेहल चौथाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    बल्लारपूरचा वादग्रस्त कंत्राटदाराची नियुक्ती

    मनपा आयुक्त बिपिन पालीवाल बल्लारपूर नगर पालिकेत मुख्याधिकारी असताना दीपक उत्तराधी या कंत्राटदाराकडे कचरा संकलनाचे काम होते. याच कंत्राटदाराला मागच्या वर्षी मनपाच्या नाली सफाईचे काम मिळाले.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Chandrapur flood तीन वर्षांपूर्वी मनपा मध्ये 300 च्या जवळपास कंत्राटी कामगार नाली सफाईचे काम करत होते. दिपक उत्तराधी यांनी ही संख्या 180 च्या जवळपास आणली. संपूर्ण शहरात एकूण 90 हजारच्या वर निवासी व व्यावसायिक मालमत्ता आहेत. यातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची एकूण लांबी 1000 किलोमीटरच्या जवळपास आहे. स्वच्छतेच्या निकषानुसार सात दिवसातून एकदा प्रत्येक नालीची सफाई करणे आवश्यक आहे.नाली सफाईच्या कामाकरिता जवळपास 500 ते 600 कामगारांची गरज आहे. मात्र नविन कंत्राटदाराने केवळ 180 कामगारांची नियुक्ती केली. एवढ्या कामगारांमध्ये शहराची सफाई अशक्य असल्याने कामाचा ताण वाढला.स्वच्छता विभागाचे निरीक्षक,सफाई दरोगा,अधिकारी सर्वच हतबल झालेले आहेत.

    नवीन कंत्राटदारासोबत झालेल्या करारानुसार पंधरा दिवसातून प्रत्येक नालीची सफाई करून जिपिएस फोटो अपलोड करणे गरजेचे आहे.अन्यथा दंड आकारण्याची तरतूद करारात आहे.शहरात चार-चार, सहा-सहा महिने नाली सफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. मात्र आजपर्यंत कंत्राटदाराला दंड आकारलेला नाही. कामगार कमी केल्याने कंत्राटदार व आयुक्तांची मजा असून नागरिकांना सजा मिळत असल्याची टिप्पणी देशमुख यांनी केली.

  • Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

    Chandrapur mahanagar Palika : चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व तयारी

    Chandrapur mahanagar Palika चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली असुन गाळ किंवा कचऱ्यामुळे मोठ्या नाल्यातील पाणी अडणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

    Chandrapur mahanagar Palika   भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत.

    सविस्तर वाचा : 15 आरोपी, 1 कोटींचा मुद्देमाल, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Chandrapur mahanagar Palika अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सफाई मोहिम सुरु असुन १२० सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ६ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.

     

    नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल.

     

     

    शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

  • Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    Road Encroachment : चंद्रपूर मनपा व वाहतूक पोलिसांची अतिक्रमण विरोधात संयुक्त कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Traffic police

     

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच फुटपाथवरही अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन २० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. Chandrapur municipal corporation

     

    त्याचप्रमाणे काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबी द्वारे काढण्यात आले असुन काही गाळेधारकांना गाळे सील करण्याबाबत अंतिम सूचना देण्यात आल्या आहेत. रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Road encroachment

     

    सदर कारवाई उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात  सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,अतिक्रमण निर्मुलन अधिकारी राहुल पंचबुद्धे तसेच मनीष शुक्ला, अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली. Vehicle seizure

  • Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    Tax Payments : चंद्रपुरात कर थकविणाऱ्या नागरिकांच्या तब्बल 13 नळजोडण्या खंडित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील १३ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Chandrapur city

     

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. Tax collection

     

    कर वसूली मोहीमेदरम्यान दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार,सुंदराबाई खनके,पुंडलिक खनके यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासुन थकीत असल्याचे आढळुन आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत वारंवार सुचना दिल्याचेही आढळून आले,मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरम्यान पठाणपुरा वॉर्ड क्र.१ व २ येथील आडकू कान्हु गौरकार,मारोती शंकर गौरकार यांचे प्रत्येकी १,बापुजी बालाजी व लक्ष्मण ईरगीरवार यांचे ६,सुंदराबाई खनके यांचे २,पुंडलिक खनके यांचे ३ असे एकुण १३ नळ जोडणी खंडीत करण्यात आली आहे. Tax payments

     

    काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. Pathanpura ward

    करावा भरणा – www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. Municipal services

     

    त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.