Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • Model on rain water harvesting : चंद्रपूर मनपाच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची देशपातळीवर दखल

    Model on rain water harvesting

    Model on rain water harvesting चंद्रपूर महानगरपालिका स्कॉच सिल्वर पुरस्काराने सन्मानित झाली असुन शहरात मोठ्या प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टींग होऊन शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी मनपाने केलेल्या प्रयत्नांची एकप्रकारे देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.  

    ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनी विरुद्ध आमदार अडबाले आक्रमक

     
       दिल्ली येथे झालेल्या मोठया कार्यक्रमात स्कॉच ग्रुपचे चेअरमन समीर कोचर व व्हाइस चेअरमन गुरुशरण सिंग धंजल यांच्या हस्ते मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करिता सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे आभार मानले. rain water harvesting


         चंद्रपूर मनपाद्वारे रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. हार्वेस्टींगचे स्वेच्छेने काम करणारे 31 जलमित्र नेमून सिल्वर जलमित्र, गोल्डन जलमित्र, डायमंड जलमित्र व नगर जलमित्र असे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

    वॉर्डसखींद्वारे घरोघरी माहितीपत्रक देणे तसेच विहीर / बोअरवेल असलेल्या घरी दंडाच्या नोटीस सुद्धा बजावण्यात आल्या. हार्वेस्टींग करण्यास घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार 5,7 व 10 हजार रुपये अनुदान मनपातर्फे दिले जाते तसेच पुढील 3 वर्षे मालमत्ता करात 2 टक्के सूट सुद्धा देण्यात येत आहे. नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे करण्यात येऊन इतर सर्व माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली व मनपाच्या या प्रयत्नांची दखल सदर संस्थेने घेतली होती. Model on rain water harvesting

         
          स्कॉच ग्रुप ही 1997 पासून भारतातील अग्रगण्य पूर्ण सेवा सल्लागार फर्म आहे. या फर्मचे संशोधन अहवाल व शिफारसींची दखल उच्च पातळीवर घेतली जाते. विविध क्षेत्रातील जसे की प्रशासन, वित्त, बँकिंग, तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट नागरिकत्व यातील उत्कृष्ट कार्यासाठी ही संस्था ओळखल्या जाते. भारतातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपुर्ण कार्यांसाठी बेंच मार्क म्हणून या संस्थेचे कार्य ओळखले जाते.

    स्कॉच ग्रुप द्वारे 2003 मध्ये स्थापित, हा पुरस्कार,एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेने केलेले प्रत्यक्ष कार्य व त्याबद्दलच्या पुराव्यांचा वापर करून समाजाला त्याचा काय फायदा झाला याचे आकलन करतो व केवळ योग्य व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जाईल हे सुनिश्चित करतो.

  • National Deworming Day 2024 : चंद्रपूर मनपा हद्दीतील 67 हजार 448 मुलांना देणार जंतनाशक गोळी

    National Deworming Day 2024

    National Deworming Day 2024 राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 4 डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार असुन या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील 67448 मुला-मुलींना शाळा तसेच अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबर रोजी गोळी घेणे शक्य न झालेल्या मुला-मुलींना मॉप अप राउंडद्वारे 10 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

    आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची सुवर्णसंधी

     
         राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला. National Deworming Day

    हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात (राज्य विशिष्ट STH व्याप्तीवर आधारित) शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणून,जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

    जगप्रसिद्ध ताडोबा येथे नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज


           1 ते 19 वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि  कुपोषणाचे  कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून1 ते19 वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे. National Deworming Day 2024


         जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियमित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे,सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.


           सदर गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.सदर गोळी लाभार्थ्यांच्या हातात न देता प्रत्यक्ष समोर खाऊ घालणे आवश्यक आहे. National Deworming Day

    1 वर्षाखालील लाभार्थ्याला ही गोळी दिली जात नाही.1 ते 2 वर्षाच्या मुलांना अर्धी गोळी, 2 ते 3 वर्षाच्या मुलांना चारशे ग्रामची पूर्ण गोळी पाण्यात विरघळुन तर 3 ते 19 वर्षाच्या वयोगटातील मुलांना पुर्ण गोळी चाऊन खाणे आवश्यक आहे. गोळी घेतल्यावर स्वच्छ पाणी पिणे आवश्यक असुन किमान 2 तास शाळेतच थांबणे आवश्यक आहे.

  • Today chandrapur city water supply : चंद्रपूर शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होणार…कारण आलं समोर

    chandrapur city water supply

    chandrapur city water supply चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक (मीटर) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे.

    मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होऊन पाणी पुरवठा योजनेवरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


         चंद्रपूर शहरास ईरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून,रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज करण्यात येते. chandrapur city water supply

    चंद्रपूर शहरात दोघांनी हातात तलवार घेत केला दहशत पसरविण्याचा प्रयत्न

    अमृत योजना सुरु होण्यापुर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते, अमृत योजनेअंतर्गत त्यात वाढ होऊन ६२ हजार पर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत.परंतु त्या नळांना पाणी येत नसल्याची, कमी येत असल्याची किंवा पाण्याचे प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. chandrapur city water supply


         तपासणी केली असता आढळुन आले कि अनेक ठिकाणी उगीच नळ सुरु ठेवणे, वाहने धुण्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे अश्या निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता.सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते.

    मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणी धारकांकडुन सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता आणि तो सर्वांना सारखाच लागू होता.त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्येकाकडून केला जातो याचा अंदाज बांधणे कठीण होते. त्याने नागरिकांच्या आग्रहाखातर ‘ पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक ‘ या सुत्रानुसार मनपाद्वारे खर्च करून घरोघरी मीटर बसविण्यात आले. chandrapur city water supply

    ताडोब्यातील 3 गिधाडांचा मृत्यू

     
        ५०,८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले असुन यापैकी केवळ १४ टक्के इतक्याच नळजोडणी धारकांनी देयकाचा भरणा केलेला आहे. यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत असुन अप्राप्त देयकांमुळे संपुर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले आहे.

    हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागुन असलेला पाईप काढला जातो ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते, मात्र मीटर बंद झाले असता कळुन येत असल्याने अश्या नागरिकांवर नळ कनेक्शन कपात व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


       पाणी कराची थकबाकी होत असल्याने पाणी पुरवठा करतांना येणार खर्च हा मालमत्ता कर उत्पन्न व इतर उत्पन्नातुन मनपाला भागवावा लागतो. त्यामुळे कराच्या बदल्यात ज्या सुविधा मनपातर्फे पुरविण्यात येतात त्यावरही परिणाम होऊ शकतो.

    जर अश्याच प्रकारे बिल न भरल्याने मोठया प्रमाणात थकबाकी निर्माण होत राहिली तर मनपाला ही योजना चालविणे शक्य होणार नसल्याने सर्व नळजोडणी धारकांनी आपले देयक प्रामाणिकपणे भरण्याचे तसेच कुठेही मीटर बंद करू पाणी वापर सुरु असेल तर मनपाला कळविण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.

  • Safety Chandrapur Municipal Corporation : तर फटाके विक्रेत्यांचे दुकान होणार सील – चंद्रपूर मनपाचा इशारा

    Safety Chandrapur Municipal Corporation : तर फटाके विक्रेत्यांचे दुकान होणार सील – चंद्रपूर मनपाचा इशारा

    Chandrapur Municipal Corporation येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असुन अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

     
     Chandrapur Municipal Corporation  मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने लावण्यास निश्चित करण्यात आली आहेत. जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : बल्लारपूर नगरपालिका मध्ये आरोग्य विमा घोटाळा – मनसेचा आरोप


      परवानगी नअसलेल्या ठिकाणांहुन फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अश्या प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.


       भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. Chandrapur Municipal Corporation

    गुन्हे : चंद्रपुरात पुष्पा स्टाईल दारू तस्करी

    या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी व फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्याचे तसेच ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असल्याचे नमुद असेल तेच फटाके घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास रामाळा तलावाजवळ ४०७ या वाहनाद्वारे अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या प्रवीण काशिनाथ कांबळे यांच्यावर कारवाई करून ३७४ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.

    बनावट दारू आणि ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा


      Confiscation of banned plastic आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी ८ पथक तयार करण्यात आले होते. यातील सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास ४०७ या गाडीतुन मोठ्या प्रमाणात प्लास्टीकची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली. माहितीच्या आधारे पाहणी केली असता २२ किलो वजनाचे १७ पोते या गाडीत आढळुन आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन साठा मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.


        एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे  व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • Chandrapur City Municipal Corporation : तर मनपा नागरिकांना टाकणार काळ्या यादीत

    Chandrapur City Municipal Corporation : तर मनपा नागरिकांना टाकणार काळ्या यादीत

    Chandrapur City Municipal Corporation शहरातील तुकूम,गोपालपुरी व बाबुपेठ या परिसरात महानगरपालिकेमार्फत मीटर व टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात आली असुन काही ग्राहकांचे मीटर व टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन


    Chandrapur City Municipal Corporation मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात धावणार इलेक्ट्रिक बस, बस डेपोचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन


        सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

    school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

    school girls गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे मा.आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

    महत्त्वाचे : हाजी सरवर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कोण?


       school girls  ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो तोच समाज खऱ्या अर्थाने संपन्न समजला जातो.माता महांकाली महोत्सवाच्या माध्यमातुन ९९९९ कन्यापुजन असो वा शाळकरी मुलींना सायकल वाटप असो, स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे. शिक्षण पूर्ण न केल्याची वेदना फार मोठी असते याची जाणीव मला आहे त्यामुळेच अनेक गरजु विद्यार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना पुढील वर्षी सायकल देऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार महोदयांनी सांगितले.

       
        सर्वांच्या सह्कार्यातून शहराच्या विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी ११ ठिकाणी अभ्यासिका करण्याचा संकल्प आहे त्यातील ८ अभ्यासिका सुरु झाल्या आहेत याचा आनंद आहे. ज्याला कुणाचा आधार नाही त्याच्याकडे अम्माचा टिफिन जातो. आमदार निधीचा वापर हा शहराच्या विकासासाठी होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी. school girls

    हाजी सरवर हत्याकांड बाबत पत्रकार परिषद

    आपले प्रत्येक पाऊल हे वंचितांच्या विकासाच्या दिशेने राहील असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.      
      याप्रसंगी शाळकरी मुली व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ८ वाजेपासुन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सायकल वाटप सोहळा पार पडला.

    कार्यक्रमास उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे, शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,अक्षय गडलिंग, संतोष गर्गेलवार,चांदा क्लब सचिव डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित,नागेश नित,चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक उपस्थीत होते    

  • Electric bus charging station : चंद्रपूर शहरात ई-बस चार्जिंग स्टेशन

    Electric bus charging station : चंद्रपूर शहरात ई-बस चार्जिंग स्टेशन

    Electric bus charging station केंद्र सरकार पुरस्कृत पी -एम बस सेवा योजनेअंतर्गत चंद्रपूर शहराला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असुन या बसेससाठी चार्जिंग स्टेशन व वाहनतळ कृषी भवनच्या जवळील जागेत उभे राहणार आहे. या वाहनतळाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता माननीय नामदार व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

    राजकिय : आमदार किशोर जोरगेवार यांचा भाजपवर निशाणा, इतकी घाई होती तर….


     Electric bus charging station  शहरातील वीज केंद्र, कोळसा खाणी व पोलाद उद्योगांमुळे चंद्रपूरकरांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहन प्रदूषणाची भर पडली.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, चंद्रपूर महापालिकेनेही ई-बसेस चालविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये ‘पीएम ई- बस सेवा’ या नावाने केंद्र- प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. chandrapur city


       या उपक्रमाचा उद्देश केवळ शहरातील लोकांना सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करून देणे नाही तर पर्यावरण प्रदूषण कमी करणे देखील आहे. -बस‘साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाणार आहे. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ई-बसेस उपलब्ध करून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या टप्प्यात ३० व दुसऱ्या टप्प्यात २० ई-बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. (Electric bus charging station)

    भाजपवर निशाणा


       या भूमिपूजन सोहळ्यास मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार, मा.खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, मा.आमदार श्री.सुधाकर अडबाले, मा.आमदार किशोर जोरगेवार तसेच इतर मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.  

    ई-बस म्हणजे काय ?

    ई-बस ही एक शून्य उत्सर्जन बस आहे. ती साधारणतः कोणताही आवाज करत नाही. ते इंधनाऐवजी विजेवर चालते. अशा बसेस ऑनबोर्ड बॅटरी पॅक किंवा बाह्य स्रोताकडून ऊर्जा प्राप्त करतात. जलद चार्जरवर ई-बस एक ते दीड तासात चार्ज करता येते. ते एका चार्जमध्ये किमान १२० किमी धावू शकते. डीटीसी फ्लीटमधील ई-बस शून्य टेलपाइप उत्सर्जनासह ते इंधनावर आधारित वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करते, अशा ई-बसेस प्रदूषणावर मात करण्यास प्रभावी ठरतात.

    ई-बसमध्ये काय विशेष आहे?

    ई-बसेसच्या किमतीनुसार त्यात विविध सुविधा असतात. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक बसमध्ये १० पॅनिक बटणे आणि एक टूटर असतो. शिवाय, दिव्यांग प्रवाशांसाठी गुडघे टेकण्याचा स्म्प व महिला प्रवाशांसाठी खास आसनांची व्यवस्था असते.

    ई-बस’ कुठून कुठपर्यंत ?

    चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. या बसेस चंद्रपुरातून बामणी, बल्लारपूर, भदावती, घुग्गुस. आरवट-चारवट तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील. 

              

  • Majhi vasundhara : चंद्रपूर मनपाला दीड कोटीचे बक्षीस

    Majhi vasundhara : चंद्रपूर मनपाला दीड कोटीचे बक्षीस

    Majhi vasundhara पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. मोठ्या संख्येने स्थानिक संस्थांच्या सहभागात चंद्रपूर महानगरपालिकेने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक तर राज्यात १२ वा क्रमांक प्राप्त केला असुन या कामगिरीसाठी मनपास दीड कोटींचे बक्षीस प्राप्त झाले आहे. 

    अवश्य वाचा : चालकाचे नियंत्रण सुटले आणि घडला अपघात

    Majhi vasundhara माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.यात अमृत शहरे गटांसाठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन करतांना ११,६०० गुण ठेवण्यात आले होते. या दोन्ही मूल्यमापनातील गुणांच्या आधारे चंद्रपूर महानगरपालिकेने १ ते ३ लक्ष लोकसंख्येच्या व अमृत शहरांच्या यादीत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेचा वापर करण्याविषयी महापालिकांना सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचा वापर निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय- योजना हाती घेण्यात येणार आहेत. Chandrapur municipality

    महत्त्वाचे : 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरातील हे मार्ग राहणार बंद


         शहराचे हरित आच्छादन वाढविणे, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनरु- ज्जीवन, सौरऊर्जेवरील एलईडी दिवे, विद्युत वाहन चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्यासाठी निधी वापरला जाणार आहे. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. Chandrapur municipality


     


     

  • property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

    property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

    Property tax चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.

           
    Property tax महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

    महत्वाचे : नागरिकांनो हे काम करा मनपा देणार 1 लाख रुपये


        चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता मनपाद्वारे विविध प्रयत्न केले जातात. मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे करात  सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना पुढील आर्थिक वर्षात विशेष सवलत दिली जाणार आहे त्यामुळे या कर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.