Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक यांची मागणी अधिवेशनात मांडणार

    Maharashtra contract employees : चंद्रपूर 9 December 2025 (News३४) – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. असून अधिवेशनात सदर विषय उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (हे हि वाचा – सुगंधित तंबाखूचा व्यापार करणाऱ्यांवर लागणार मकोका – मुख्यमंत्री फडणवीस)

    कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनुकंपाधारक प्रकरणे तसेच शिक्षकांच्या समस्या याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक संघटना एकत्रितपणे उपोषणस्थळी बसल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया, वेतननिर्णय, सेवानिवृत्ती वय वाढ, अनुकंपाधारक नियुक्ती तसेच प्रलंबित भरती या प्रश्नावर तोडगा निघावा, या मागणीसाठी मोठ्या संख्येने कामगार आणि कर्मचारी उपस्थित होते.

    संघटनांचे निवेदन स्वीकारले

    उपोषणस्थळी पोहोचल्यावर आमदार जोरगेवार यांनी सर्व प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी प्रत्येक संघटनेचे निवेदन स्वीकारले आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. या समस्यांचे गांभीर्य समजून घेत त्यांनी सभागृहात हे प्रश्न दृढपणे मांडले जातील आणि सरकारच्या निदर्शनासही आणले जातील, असे आश्वस्त केले. Maharashtra contract employees

    या सर्व मागण्या जन जीवनाशी संबंधित आहेत. योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की अधिवेशनात या विषयांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांशीही संवाद साधला जाणार आहे.

  • चंद्रपूरमध्ये ३५०० विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनी

    science exhibition chandrapur : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. अपर आयुक्त (आदिवासी विकास) आयुषी  सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (हे हि वाचा – सुगंधित तंबाखू माफियांवर आता थेट मकोका, मुख्यमंत्री फडणवीस)

    ३५०० विद्यार्थी सहभागी होणार

    या स्पर्धेत नागपूर विभागातील एकूण ९ प्रकल्पांतील सुमारे ३५०० विद्यार्थी सहभागी होणार असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल या सांघिक स्पर्धांसोबतच 100 मी., 200 मी., 400 मी., 1000 मी., 5000 मीटर धावण्याच्या शर्यती, रिलेसह गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी अशा विविध ॲथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील खेल समन्वयक, शिक्षक व संघ व्यवस्थापकांसह सुमारे 300 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

    शिस्तबद्ध व्यवस्था सुनिश्चित

    तिन्ही दिवसांच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था केली असून विविध ठिकाणी प्रकल्पनिहाय निवास केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक स्थळी आवश्यक कर्मचारी नियुक्त करून शिस्तबद्ध व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. science exhibition chandrapur

    पहिल्यांदाच विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

    प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विभागीय प्रदर्शनीत आपापल्या प्रतिकृती सादर कराव्यात, यासाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व नवकल्पनाशीलता वाढावी या उद्देशाने पहिल्यांदाच विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.

    संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे नियोजन विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून त्यांच्या उपक्रमशील कार्यपद्धतीमुळे प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच गती मिळत आली आहे.

    सहभागी प्रकल्प

    नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर — असे एकूण ९ प्रकल्प या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

    विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्कृष्ट संधी

    “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा व प्रथमच विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन होत असून नागपूर विभागातील ३५०० विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. क्रीडा, ॲथलेटिक्स आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांत विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन मिळेल.

    चंद्रपूर येथील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असा मनापासून आग्रह आहे.” — विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर.

  • सुगंधित तंबाखू माफियांवर थेट मकोका! फडणवीसांची अधिवेशनात घोषणा

    MCOCA on gutkha trade : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी व सत्ता पक्षातील आमदारांनी अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखूवरून सरकारला चांगलंच घेरलं, इतर राज्यातून येणारे हे अंमली पदार्थाची वाहतूक थांबवायची असेल तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरचं कायद्यात बदल करून अश्या माफियांवर मकोका लावण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे असे सांगितले. (हे हि वाचा – ताडोब्याची वाघीण चालली सह्याद्रीला)

    विधानसभेत गुटखा माफियांचा मुद्दा: विरोधकांचा हल्ला

    वर्ष २०१२ पासून राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध असला तरी आज खुलेआम सर्रासपणे विक्री होत आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासन या विक्रीवर डोळेझाक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशी वस्तूची उलाढाल आठवड्याला कोट्यवधी रुपयांची असते.

    तंबाखू व्यापाऱ्यांवर मकोका

    हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ सह मुंबई भागात होत असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा व जे याचा व्यवसाय करतात त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. MCOCA on gutkha trade

    राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या आत सुद्धा गुटखा व खर्रा विक्रीची दुकाने मनपा, नगरपालिका द्वारे कारवाई करीत अतिक्रमण काढण्याच्या सूचना सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती मंत्री पंकज भोयर यांनी दिली.

    राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री होत आहे मात्र ऍन औषध प्रशासन झोपेचं सोंग घेऊन काम करीत आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्यामुळे तरुण पिढी कॅन्सर च्या विळख्यात सापडली आहे. कधीकाळी प्रशासनाने सुगंधित तंबाखूचा माल पकडला तर आरोपीना जामीन मिळतो व ते पुन्हा त्याच कामात गुंततात.

    कायदा कमकुवत असल्यामुळे आरोपी हा व्यवसाय वारंवार करतात त्यामुळे अश्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी. इतर राज्यातून होणारी वाहतूक थांबविता संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले तरचं हा अवैध धंदा बंद होऊ शकतो.

    मकोका लागणार

    आमदारांच्या या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि आम्ही यापूर्वी या गुन्ह्यात मकोका अंतर्गत कारवाई करू शकतो काय याबाबत सविस्तर चर्चाही झाली मात्र त्या कायद्यात सदर गुन्हा बसत नाही, त्यामुळे आम्ही कायद्यात बदल करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या गुन्ह्यात आता मकोका कायद्यांतर्गत कारवाई होणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले.

    चंद्रपुरातील सुगंधित तंबाखूचे केंद्र

    चंद्रपूर शहरात तुकूम, जटपुरा गेट, बिनबा गेट व बल्लारपूर आणि रयतवारी हे सुगंधित तंबाखू विकिरिचे मोठे केंद्र आहे, विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोलीस व अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध आहे, मात्र कारवाई करण्यात संबंधित विभाग डोळेझाक करतो.

  • चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला

    tiger breeding program : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : पश्चिम घाटातील वन्यजीव संवर्धन आणि अनुवंशिक विविधता (Genetic Diversity) वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण दिशेने पाऊल टाकत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) प्रशासनाने (८ डिसेंबर) वाघिणीला पकडण्याची एक यशस्वी मोहीम पार पाडली. (हे हि वाचा _ बल्लारपुरात देशी कट्ट्याचा सुळसुळाट, पोलिसांची कारवाई, ३ देशी कट्टे जप्त)

    T7_f_S2_f नावाची ही उप-प्रौढ वाघीण, जी वाघीण T7 ची पिल्लू आहे, तिला सुरक्षितपणे आणि यशस्वीरित्या बेशुद्ध (Tranquilized) करण्यात आले.

    अनुवंशिक विविधता वाढवण्यावर भर

    या वाघिणीला पकडण्याची मोहीम तिच्या मोठ्या वास्तव्य क्षेत्रात (Home Range) पार पडली, जे ताडोबा आणि कोलारा या दोन्ही मुख्य क्षेत्रांमध्ये येते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (STR) वाघांची सक्षम पैदास करणारी लोकसंख्या पुन्हा स्थापित करण्याच्या मोठ्या प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग आहे.

    या वाघिणीचे स्थलांतर केल्यामुळे, तिच्या विशिष्ट अनुवंशिक वंशाच्या (Genetically Distinct Lineage) माध्यमातून अंतर्गत प्रजनन (Inbreeding) थांबवून महाराष्ट्रातील वाघांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या लोकसंख्येला (Metapopulation) चालना देणे हे उद्दिष्ट आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवलेली ही दुसरी वाघीण आहे.

    🔬 तपासणी आणि भविष्यातील योजना

    • आरोग्य तपासणी: वाघिणीला पकडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी तिची संपूर्ण आरोग्य तपासणी केली, ज्यामध्ये तिचे आरोग्य उत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले.
    • रेडिओ कॉलर: यशस्वी अनुकूलन (Acclimatization) आणि पुढील ट्रॅकिंगसाठी तिला VHF/GPS रेडिओ कॉलर बसवण्यात आली आहे.
    • स्थलांतर: तिला खास तयार केलेल्या वाहतूक पेटीतून (Transit Crate) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्यात येत आहे.
    • पुढील प्रक्रिया: सह्याद्रीत पोहोचल्यावर, वाघिणीला तात्पुरत्या जागेत (Enclosure) नियंत्रित पद्धतीने “सॉफ्ट रिलीज” केले जाईल.

    प्रभू नाथ शुक्ला (क्षेत्र संचालक, TATR) यांचे मत: “T7_f_S2_f हे एक मौल्यवान अनुवंशिक संसाधन आहे. सह्याद्रीच्या नैसर्गिक वातावरणात तिचे सुरक्षित स्थलांतरण करणे हे आमच्या देशव्यापी वाघ संवर्धन धोरणामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” tiger breeding program

    श्री. ए. रेड्डी येलू (उपसंचालक, कोअर, TATR) यांचे मत: “ही यशस्वी मोहीम आमच्या टीमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे फलित आहे.” tiger breeding program

    🤝 मोहिमेतील टीम

    क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोअर) श्री आनंद रेड्डी येलू यांनी या विशेषज्ञ आणि बहु-शिस्तबद्ध टीमचे नेतृत्व केले.

    या यशस्वी मोहिमेत सहभागी असलेले प्रमुख अधिकारी आणि तज्ञांमध्ये श्री. विवेक रमेश नातू (सहाय्यक वनसंरक्षक), श्री. विशाल कलानू वैद्य (वन परिक्षेत्र अधिकारी, कोलारा), श्री. भाविक प्रभुनाथ चिवंडे (वन परिक्षेत्र अधिकारी, ताडोबा), डॉ. रविकांत खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी), श्री. अजय सी. मराठे (शूटर, आरआरटी), आणि जीवशास्त्रज्ञ (Biologist) श्री. शैलेंद्र सिंग देवरा यांचा समावेश होता. या स्थलांतरासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून ए.सी.एफ. श्री. संदेश पाटील आणि इकोलॉजिस्ट श्री. आकाश पाटील हे देखील उपस्थित होते.

  • क्राईम थ्रिलर प्रेमींना नक्की आवडेल: Joju George चा Joseph चित्रपट

    Joju George Joseph movie : मनोरंजन ९ डिसेंबर (news३४) – वर्ष २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम जोसेफ चित्रपट हा केवळ एक क्राईम थ्रिलर नाही, तर पोलिस दलातील एका अनुभवी अधिकाऱ्याच्या आयुष्यातील दुःख, त्याग आणि त्याच्या बुद्धिमत्तेची कहाणी आहे.या चित्रपटात मल्याळम अभिनेते Joju George यांनी अभिनयाची उंची गाठली.

    कथा: बुद्धिमत्ता आणि वेदनेची कहाणी

    चित्रपटाची कथा जोसेफ (Joju George) या निवृत्त झालेल्या, पण अत्यंत अनुभवी पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. जोसेफकडे गुन्ह्याच्या ठिकाणाचे (Crime Scene) विश्लेषण करण्याची आणि सूक्ष्म तपशील ओळखण्याची एक अद्भुत क्षमता आहे. वैयक्तिक आयुष्यात पत्नीपासून विभक्त झालेला आणि अत्यंत एकाकी जीवन जगणारा जोसेफ, तपासाच्या कामात नेहमीच जुन्या सहकाऱ्यांची मदत करत असतो. (हे हि वाचा – ९ मुलींची हत्या करणारा स्टीफन बघितला का?)

    या शांत, पण तीक्ष्ण बुद्धीच्या पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात तेव्हा उलथापालथ होते, जेव्हा त्याची पत्नी, Stella (अथमी), एका अपघातात सापडते. या अपघाताचा तपास करताना जोसेफला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो आणि तो स्वतःच्या पद्धतीने या गूढ घटनेचा छडा लावण्यास सुरुवात करतो. हा तपास केवळ एका अपघाताचा नाही, तर एका मोठ्या आणि हृदयद्रावक षडयंत्राचा पर्दाफाश करतो. Joju George Joseph movie

    🌟 जमेच्या बाजू आणि अभिनय

    1. जोजू जॉर्ज यांचा अभिनय: या चित्रपटातील जोसेफची भूमिका {Joju George} यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे. त्यांच्या डोळ्यांतील एकाकीपणा, तपास करतानाची त्यांची एकाग्रता आणि नंतर आलेल्या वेदनांचे चित्रण त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आहे. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
    2. उत्कृष्ट पटकथा (Screenplay): चित्रपटाची पटकथा (लेखक: {Shahi Kabir} तपास आणि भावनिक थरार यांचा उत्तम समतोल राखते. कथेची मांडणी संथ असली तरी, प्रत्येक दृश्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
    3. संगीत आणि पार्श्वसंगीत: चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत (Background Score) कथेतील भावनिक खोली वाढवते, विशेषतः जोसेफच्या एकाकी जीवनातील वेदना प्रभावीपणे दर्शवते.

    🎬 दिग्दर्शन आणि निष्कर्ष

    दिग्दर्शक एम. पद्माकुमार यांनी एका संवेदनशील विषयाला अत्यंत संयमाने हाताळले आहे. चित्रपटाचा शेवट वाचकाला केवळ धक्काच देत नाही, तर एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर (अवयवदान रॅकेट) प्रकाश टाकतो. चित्रपट हळूहळू उलगडत जातो, पण क्लायमॅक्स प्रेक्षकांना स्तब्ध करतो.

    ‘Joseph’ हा चित्रपट क्राईम थ्रिलर आणि सशक्त भावनिक ड्रामा यांचा उत्कृष्ट मिश्रण आहे. केवळ थ्रिलर म्हणून नव्हे, तर उत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट कथाकथन यासाठी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जाते.

  • सात महिन्यांची प्रतीक्षा संपली! जोरगेवार यांच्या मागणीनंतर नियुक्ती प्रक्रिया वेगात

    MLA Jorgewar follow up : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातील संबंधित पत्रे उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली असून, या घडामोडीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. (हे हि वाचा – हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार विक्रम)

                डिसेंबर 2024 मध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर 25 फेब्रुवारी 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. 5 ते 9 मे 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. त्यानंतर सात महिन्यांहून अधिक काळ उलटूनही अनेक निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नव्हती.

    सततच्या पाठपुराव्याला यश

                खुला, एससी आणि एसटी संवर्गातील उमेदवारांना सप्टेंबर महिन्यात नियुक्ती देण्यात आली, मात्र ओबीसी, इ डब्लु. एस, एस.ई.बीसी माजी सैनिक व खेळाडू संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती प्रलंबित राहिली. MLA Jorgewar follow up

        ही बाब गांभीर्याने घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तातडीने प्रलंबित नियुक्त्या देण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाशी सतत संपर्क, पाठपुरावा व चर्चा केल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून आता उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे सुरू झाले आहे.

                आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, योग्य पात्रतेने निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारास अन्याय होणार नाही. शासन स्तरावर आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली असून नियुक्ती प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. युवकांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

  • हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार विधेयकांचा विक्रम

    Winter Session Non-Governmental Bill : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) -दिनांक ४ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्‍बल ३० अशासकीय विधेयकांची पुरःस्‍थापना करून महाराष्‍ट्राच्‍या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्‍थापित केला. पुरःस्‍थापनार्थ मांडण्‍यात येणा-या अशासकीय विधेयकांचा हा विक्रम पुढे नेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवा विक्रम विद्यमान हिवाळी अधिवेशनात प्रस्थापित केला आहे. त्‍यांची तब्‍बल ३७ अशासकीय विधेयके या अधिवेशनात विचारार्थ ठेवण्‍यात आली आहेत. 

    अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवण्‍याच्‍या प्रक्रियेत हा एक नवा विक्रम आहे. विचारार्थ असलेली ही विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्‍यामध्‍ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा दृष्‍टीकोन अंतर्भुत आहे. विचारार्थ असलेल्‍या या ३७ विधेयकांपैकी काही विधेयके या अधिवेशनातच चर्चेला येणार आहेत. Winter Session Non-Governmental Bill (हे हि वाचा : युवक कांग्रेसचे महासचिव भाजपात)

    विधायक पर्याय सुचविण्‍याचे साधन अशासकीय विधेयक

    विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांना अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. विधीमंडळ सदस्‍यांना समाजातील विविध प्रश्‍नांना थेट कायद्याच्‍या स्‍वरूपात मांडण्‍याची संधी अशासकीय विधेयकांमुळे मिळते. अनेकदा शासनाने विचारात न घेतलेल्‍या मुद्दयांवर विधायक पर्याय सुचविण्‍याचे साधन अशासकीय विधेयक ठरते.

    काही वेळा हे विधेयक शासनाला धोरणपर बदल करण्‍यात प्रवृत्‍त करते. एखादया अशासकीय विधेयकाला व्‍यापक समर्थ मिळाले तर ते जनभावनेचे निदर्शक ठरते व अनेकदा सरकार त्‍या विषयावर पुढाकार घेते. अशासकीय विधेयके काही वेळा कायद्यात रूपांतरीत होतात, परंतु चर्चा करणे, जनभावना मांडणे, शासनाला दिशा देणे आणि विधायक वातावरण निर्माण करणे यादृष्‍टीने त्‍यांचा प्रभाव अमुल्‍य असतो. त्‍यामुळे विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांचे स्‍थान अत्‍यंत महत्‍वाचे व अपरिहार्य आहे.

    अशासकीय विधेयकांवर कायम भर

    अशासकीय विधेयकांचे हे महत्‍व ओळखुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या ३० वर्षांच्‍या संसदीय कारकीर्दीत अशासकीय विधेयकांवर कायम भर दिला आहे. त्‍यांनी अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन मांडलेल्‍या अनेक प्रश्‍नांवर शासनाने निर्णय घेतले असून त्‍यामुळे लोकहित साधले गेले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांची ही कामगिरी केवळ विक्रम नसून जनतेच्‍या प्रश्‍नांशी असलेली त्‍यांची असामान्‍य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे. Winter Session Non-Governmental Bill

    ३७ अशासकीय विधेयक

    या अधिवेशात विचारार्थ असलेल्‍या ३७ अशासकीय विधेयकांमध्‍ये सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचे कारागृहे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूलाच्या माफीबाबत (क्रमांक-१) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र हिंसाचार व लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात्न-फलक लावण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक,

    मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक,महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (दुसरी सुधारणा) विधेयक, बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,  

    महाराष्ट्र अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती वेतन, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र धुम्रपानास व थुंकण्यास मनाई करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) विधेयक, 

    विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, विवाह (महाराष्ट्र सुधारणा), मोटार वाहन (महाराष्ट्र दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक,

    मुंबई न्यायालय फी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात फलक लावण्यास, Winter Session Non-Governmental Bill

    विविध विधेयकाचा समावेश

    समाज माध्यमांवर व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (तिसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (दुसरी सुधारणा) विधेयक, औषधिद्रव्ये व सौंदर्यप्रसाधन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 

    महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक

    महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (चौथी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक,

    महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, हिंदू अज्ञानात्‍व व पालकत्‍व (महाराष्‍ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्‍ट्र भाडे नियंत्रण (सुधारणा) विधेयक या विधेयकांचा समावेश आहे.

    अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना त्‍यांच्‍या न्‍याय्य हक्‍कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकडयांची मांडणी नाही तर सामान्‍य जनतेच्‍या वास्‍तविक गरजांवर आधारित ही विधेयके आहेत, असे मनोगत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले आहे. जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी आपला हा लढा असाच अविरत सुरू राहील असेही त्‍यांनी म्‍हटले आहे

  • भोई समाज परिचय मेळावा: संस्कार, परंपरा आणि नवीन नाती यांचा उत्सव

    marriage introduction program : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) – समाजाचे एकत्र येणे, परस्परांना जाणून घेणे, संस्कार आणि परंपरेने जोडलेली घरे निर्माण करणे, ही फार मोठी सामाजिक शक्ती आहे. या मंचावर उमलणारी प्रत्येक जोडी, ही फक्त दोन व्यक्तींची नाही तर दोन घरांची, दोन कुटुंबांची आणि दोन संस्कृतींची सुसंवादाने होणारी सांगड असून परिचय मेळावा नातेसंबंधांचा उत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

                 जिल्हा भोई समाज सेवा संघ तर्फे चंद्रपूर येथे युवक उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विदर्भ विकास महामंडळचे सेवानिवृत्त सह संचालक प्रकाश डायरे, विदर्भ भोई समाजाचे सरचिटनिस मनोहराव पचारे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटटूवार, रमेश भुरे, महेंद्र पारिसे, यादवराव मेश्राम, नंदु पडाल, राजेश डहारे, श्रिहरी शेंडे आदिं मान्यवरांची उपस्थिती होती. (हे वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्यांवर तोडगा काढणार – आमदार जोरगेवार)

    साथीदार योग्य असेल तर संपूर्ण जीवन सुंदर

     या कार्यक्रमात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार पूढे म्हणाले कि, मोठ्या इमारती, मोठी शहरे, मोठ्या संधी  पण नाती हवे खरी प्रेमाची आणि विश्वासाची हेच आपल्याला शिकवणारे असे हे उपक्रम आहेत. योग्य जोडीदाराची निवड ही सर्वात महत्त्वाची निवड आहे. जीवनाच्या प्रवासात हात हातात घेऊन चालणारा साथीदार योग्य असेल तर संपूर्ण जीवन सुंदर बनते. marriage introduction program

     हा परिचय मेळावा केवळ नाव, काम, शिक्षण एवढ्यावर थांबत नाही इथे विचारांची देवाणघेवाण होते, जीवनमूल्यांची जुळवाजुळव होते, संस्कारांची सांगड जुळते. आपल्या समाजाला सुशिक्षित, शिस्तबद्ध, नैतिक मूल्यांनी बळकट करण्याची हिम्मत अशा कार्यातून तयार होते.

    भविष्यात निर्माण होणार्या अनंत आनंदी संसारांची पायाभरणी

         हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भविष्यात निर्माण होणार्या अनंत आनंदी संसारांची पायाभरणी आहे. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे योग्य जोडीदाराची निवड. संसार हा फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाहीय तर दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा आणि दोन परंपरांचा सुंदर संगम आहे. आज या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी आपले भविष्य शोधत आहेत. या परिचयातून निर्माण होणार्या घरांच्या पायावर प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मानाची वीट बसावी, अशी इच्छा व्यक्त करतो असे ते यावेळी म्हणाले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • बल्लारपूरमध्ये ‘देशी कट्ट्यांचा’ सुळसुळाट! आठवड्यात ३ शस्त्र जप्त

    illegal weapons crackdown : बल्लारपूर ८ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात एकाच आठवड्यात ३ देशी कट्टे पोलिसांच्या कारवाई दरम्यान मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे सदर कट्टे हे एकट्या बल्लारपूर शहरात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आले आहे.

    ७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एक युवक स्वतःजवळ अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर ते सास्ती जाणाऱ्या रोडवरी कब्रस्तान जवळ एक संशयास्पद असलेला इसम आढळला, पोलीस पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले. (हे वाचा – बल्लारपुरात दोन बंदुकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांची कारवाई)

    ३२ वर्षीय सलमान उर्फ राज सलीम खान राहणार भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर असे त्या युवकाचे नाव, पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता एक लोखंडी अग्निशस्त्र ज्याची लांबी १९.५ सेमी व बॅरेलची लांबी हि १५ सेमी होती. किंमत एकूण ८ हजार रुपये. गुन्हे शाखेच्या पथकाने सलमान वर पुढील कारवाईसाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. बल्लारपूर पोलिसांनी आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अन्व्ये गुन्हा दाखल करीत अटक केली. illegal weapons crackdown

    बल्लारपुरात स्थानिक युवक देशी कट्टे, पिस्टल हे आता फॅशन म्हणून वापरायला लागले आहे, नागरिकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी तरुण एक नवा उच्छाद या माध्यमातून मांडत असल्याचे चित्र आहे, अजूनही अनेकांकडे विनापरवाना शस्त्र असल्याची माहिती आहे. एकाच आठवड्यात गुन्हे शाखेने २ तर बल्लारपूर पोलिसांनी १ अग्निशस्त्र जप्त केले आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सचिन गुरनुले, जय सिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, शेखर माथनकर, दिनेश अराडे यांनी केली.

  • मानवी विकृतीचा अभ्यास करणारा ‘Stephen’

    psychological thriller movie review : मनोरंजन ८ डिसेंबर (News३४) – आपण क्राईम, इन्वेस्टीगेशन व सिरीयल किलर सारखे चित्रपट बघत असाल तर स्टीफन चा चित्रपट आपण नक्कीच बघावा. नेटफ्लिक्सवरील नुकताच स्ट्रीम झालेला ‘Stephen‘ हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून, मानवी विकृती आणि भूतकाळातील आघातांचा (Trauma) गडद अभ्यास आहे. अभिनेता गोमती शंकर यांनी मुख्य भूमिकेत स्वतःला सिद्ध केले आहे. (हे हि वाचा – कांतारा चॅप्टर १ हिंदी भाषेत रिलीज)

    केवळ खून नाही, विकृतीचे विश्लेषण

    दिग्दर्शक मिथुन बालाजी यांचा ‘Stephen’ हा चित्रपट एका सिरीयल किलरच्या (गोमती शंकर) गुंतागुंतीच्या मानसिकतेवर आधारित आहे. जेव्हा हा किलर पोलिसांच्या हाती लागतो, तेव्हा क्रिमिनल सायकोलॉजिस्ट सीमा (स्मृती वेंकट) त्याच्या बालपणातील आघातांचा आणि विकृतीचा शोध घेते. हा चित्रपट अमेरिकन सायको थ्रिलर्सच्या धर्तीवर माणूस खुनी का बनतो? या प्रश्नाचा शोध घेतो.

    गोमती शंकर यांची बाजी

    चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे गोमती शंकर यांची मुख्य भूमिका. त्यांनी ‘स्टीफन’चे पात्र अत्यंत थंड, शांत आणि एकाच वेळी भयानक पद्धतीने साकारले आहे. त्यांचे संवाद, त्यांची देहबोली आणि विशेषतः चौकशी दरम्यानचे डोळ्यांतील हावभाव उत्कृष्ट (Stellar) आहेत. त्यांच्या अभिनयामुळेच, चित्रपटाचा थोडा संथ असलेला वेगही टिकून राहतो. psychological thriller movie review

    दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

    दिग्दर्शकाने गडद आणि गंभीर (Gritty) वातावरण प्रभावीपणे तयार केले आहे. राघव रायन यांचे पार्श्वसंगीत अनेक दृश्यांना वेगळ्याच स्तरावर घेऊन जाते. मात्र, काही ठिकाणी कथेची गती संथ होते आणि फ्लॅशबॅकचा अतिरेक झाल्यासारखे वाटते. जर तुम्ही फास्ट-पेस थ्रिलर शोधत असाल, तर हा चित्रपट तुम्हाला थोडा स्लो वाटू शकतो.

    आमचा अंतिम निर्णय (News Verdict)

    ‘Stephen’ हा चित्रपट मनोरंजनापेक्षा मानवी विकृतीच्या अभ्यासावर अधिक केंद्रित आहे. गोमती शंकर यांच्या दमदार अभिनयासाठी आणि गंभीर विषयाची निवड केल्याबद्दल हा चित्रपट निश्चितच पाहण्यासारखा आहे. मात्र, तुमच्याकडे धीर असणे आवश्यक आहे!

    Rating: 3/5 ⭐⭐⭐