Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • थंडीत बेघरांना चंद्रपूर मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

    थंडीत बेघरांना चंद्रपूर मनपाच्या निवारागृहाचा आश्रय

    News34 chandrapur

    चंद्रपूर – उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास १५ बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.

     

     

        हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे त्यानुसार नागरी बेघरांना निवाऱ्यात आणण्याची सोय करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. रात्रीच्या सुमारास कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने कस्तुरबा रोड,आझाद बगीच्या जवळील आसरा बेघर निवारा केंद्र तयार केले आहेत.
    शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे नागरी भागातील बेघरांसाठी दर बुधवारी सर्वेक्षण करण्यात येते. बेघर निवारा केंद्राची माहिती जरी सर्वांना असली तरी अनेक गरजू स्वतःहुन या केंद्रापर्यंत येत नाही. त्यामुळे मनपा राष्ट्रीय नागरी उपजीविका कर्मचाऱ्यांनी रात्री वरोरा नाका पूल,बसस्थानक, रेल्वेस्टेशन, उड्डाणपुलांखाली बेघरांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्यांना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या बेघरांना थंडीपासुन संरक्षण मिळण्याचे दृष्टीने त्यांना ब्लॅंकेट,चादर,सतरंजी,पलंग,स्वेटर,चहा व जेवणाची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली.
  • शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं जंगी स्वागत

    शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचं जंगी स्वागत

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल येथे विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात मेळावा तथा पदाधिकारी बैठकीला जातांना मुल शहरातील गांधी चौक येथे थांबून गांधिंजोंच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

     

    त्या नंतर शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची साहेबांनी आस्थेने विचारपूस केली आणि नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी ला लागा मी स्वतः मुल शहरात येऊन लक्ष घालेन असे आश्वासन दिले.

     

    सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं मनोबल या वेळी वाढले असून सर्व पदाधिकारी यांना निवडणुका संधर्भात निर्देश दिले.

     

    यावेळी वेळी प्रामुख्याने युवासेना तालुका प्रमुख रितीक संगमवार,शहर प्रमुख आकाश राम,युवा शहर प्रमुख अमित आयालानी,मनोज मोहूर्ले,महेश चौधरी,सुनील काळे,नयन यलचलवार,हितेश निकोडे,युवी कोरडे,विनोद चलाख, गितेश घोडे,धनु लेंनगुरे,अनुराग आत्राम,संदीप रायपुरे,यश संगमवार,विशाल नालूरवार आदी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.