Tag: चंद्रपूर मराठी बातम्या

  • रेल्वे समस्यांवर तोडगा? उपोषणकर्त्यांना MLA जोरगेवारांचे आश्वासन

    MLA Jorgewar rail protest visit : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर शहरातील रेल्वे संबंधित दीर्घकालीन प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्यासाठी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी सदर प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.  (हे वाचा – युवक कांग्रेस महासचिवाचा भाजपात प्रवेश)

       यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती. 

    चंद्रपूर–मुंबई सुपरफास्ट ट्रेन तसेच चंद्रपूर–पुणे फास्ट ट्रेन रोज भुसावळ मार्गे सुरू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह रेल्वे संबंधित इतर मागण्यांना घेऊन रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. MLA Jorgewar rail protest visit

    आज रविवारी आमदार जोरगेवार उपोषणस्थळी पोहोचले आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. आंदोलन कर्त्यांकडून त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारताना त्यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जात असल्याचे सांगितले. रेल्वेसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    आमदार जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याला रेल्वेच्या उत्तम आणि वेगवान सेवांची गरज आहे. या मागण्या न्याय्य असून, जनहिताच्या आहेत. या विषयावर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही करणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे ते यावेळी म्हणाले.

  • युवा काँग्रेस नेते भाजपात! जोरगेवारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश

    Chandrapur political switches : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रघाताटे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या गजानन निवासस्थानी उत्साहात पार पडला. (हे वाचा : रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे, नागरिकांचा एल्गार)

    यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महानगर अध्यक्ष छबु वैरागडे, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अॅड. राहुल घोटेकर, देवानंद वाढई आदींची उपस्थिती होती.

    हा पक्षप्रवेश भाजपला ऊर्जा देणारा

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा दिवस केवळ पक्ष प्रवेशाचा नाही, हा विश्वासाचा दिवस आहे. वैभव रघाताटे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाचा आपल्या कुटुंबात प्रवेश हा आपल्या संघटनेला नवी ऊर्जा देणारा आहे. राजकारण म्हणजे पदाचा अभिमान नव्हे, तर जबाबदारी आहे. जनता आपल्या पासून अपेक्षा ठेवते. या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद कार्यकर्त्यांत आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा या पक्षाचा आधारस्तंभ आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भागात आपण काम केले आहे. अभ्यासिकांचा उभार, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा यासह प्रत्येक ठिकाणी आपण योजनाबद्ध काम केले आहे. लोकांच्या जीवनमानात बदल दिसायला लागला आहे. पक्षात येणाऱ्याचे आपण कौतुक करतो, जपतो आणि योग्य संधी देतो. पक्ष प्रवेश म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात आहे, असे ते यावेळी म्हणाले. Chandrapur political switches

    यावेळी रघाताटे यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. वैभव रघाताटे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन आम्ही भाजपात आलो आहोत. चंद्रपूरात विकासाची नवी दिशा सुरू झाली आहे. आम्ही या प्रवासात सक्रिय सहभाग करणार, असे ते यावेळी म्हणाले.

  • चंद्रपुरात रस्ता दुरुस्तीचा गोंधळ: निकृष्ट रस्त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश

     Gadchandur Awarpur road condition : कोरपना तालुक्यातील गडचांदूर – आवारपूर – कळमना – वणी हा राज्य मार्ग अतिशय वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज अवजड वाहतुकीची मोठी रेलचेल असते. या महत्त्वाच्या रस्त्यावर दूध डेअरी परिसरात मोठे खड्डे व फुटकळ अवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्या एजन्सीकडून सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.

    27 नोव्हेंबरला दिलेले आश्वासन वाया — तक्रारीनंतरही बोगस काम सुरूच

    नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शुभम अडेटवार यांनी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पुन्हा तेच बोगस काम सुरू असल्याने नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.
    आवारपूर येथे आज दर्जाहीन काम बंद पाडण्यात आले. तर नेहरू शाळेजवळ दुरुस्ती केलेला रस्ता फक्त दोन दिवसांतच पूर्ण उखडून गिट्टी उघड्यावर दिसू लागली, यामुळे पीडब्ल्यूडी विभागाचे गंभीर दुर्लक्ष उघड झाले आहे. (हे हि वाचा : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये बोनस द्या – सुधीर मुनगंटीवार)

    दुरुस्तीमध्ये आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पाळली नाही

    नियमांनुसार खड्ड्यांना चौकोनी कट करणे,डस्ट माती नीट साफसफाई करणे,योग्य गिट्टीचा थर देणे,बिटुमिनस कोट टाकणे,रोलरने कम्पॅक्शन करणे ही प्रक्रिया बंधनकारक आहे.मात्र प्रत्यक्षात मातीवरच सरळ गिट्टी टाकून दुरुस्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. गुणवत्तेचा पडताळा न करताच चाललेल्या कामामुळे रस्त्याचे आयुष्य कमी होईल व काही महिन्यांत पुन्हा खड्डे पडतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    गावकरी आक्रमक – चक्काजाम आंदोलनाचा इशारा

    आवारपूर परिसरात नागरिकांमध्ये आज प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी सरोळी बांधकाम उपविभागाचे अधिकारी शुभम अडेटवार यांची भेट घेणार आहे.
    दुरुस्तीच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने 10 डिसेंबरला आवारपूर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. Gadchandur Awarpur road condition

    “गावात मातीवरच गिट्टी टाकून रस्ता दुरुस्ती केली जात आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. कंत्राटदार कृष्णा सरकार यांच्याकडे तक्रार केली असता, ‘मी बाहेर गावाला आहे, दोन दिवसांनी येऊन बघते’ असे सांगण्यात येते. पण नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे. दर्जेदार रस्ता व्हावा म्हणून आम्ही चक्काजाम आंदोलनाला सज्ज आहोत.” बाळकृष्ण काकडे,
    उपसरपंच, ग्रामपंचायत आवारपूर

    “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. मागील दहा वर्षांपासून आम्ही या खराब रस्त्याचा त्रास सहन करतो आहोत. दुरुस्तीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून पीडब्ल्यूडी अधिकारी शुभम अडेटवार कंत्राटदाराचे संरक्षण करीत आहेत.” कल्पतरू कन्नाके,
    सदस्य, ग्रामपंचायत आवारपूर

    निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुणवत्तायुक्त दुरुस्ती, जबाबदारांवर कारवाई आणि कामाचा पारदर्शक अहवाल याची मागणी गावकऱ्यांनी केली असून 10 डिसेंबरचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.

  • धान उत्पादकांसाठी ₹२० हजार बोनस! मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

    farmer bonus demands : चंद्रपूर ७ डिसेंबर (News३४) – अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीकनुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन ही मागणीचे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हे हि वाचा : चंद्रपुरातील रेल्वे समस्यांवर खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा)

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत असल्याने शेतकरी बांधव आपल्या सरकारकडून आशावादी आहे. मागील वर्षी नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रूपये धान बोनस देण्याच्या माझ्या विनंतीस मान देत आपण धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तात्काळ बोनस जाहीर करून त्यांच्या आर्थिक संकटातून मोठी मुक्तता केली. या संवेदनशील निर्णयाबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. farmer bonus demands

    धान उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान

    चालू वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अनिश्चिततेचे संकट उभे राहिले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदाही बोनस जाहीर करणे अत्यावश्यक बनले आहे.

    नागपूर हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी ₹२०,००० बोनस जाहीर करावा, अशी राज्यभरातून सातत्याने मागणी होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

  • चिंतलधाबा आरोग्य क्रांती: ६१ लाखांचे PHC भूमिपूजन!

    आ. मुनगंटीवार यांच्यामुळे सौरऊर्जा व ग्रामीण सुविधा उभारणीला नवी गती

    rural health center : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चिंतलधाबा गावाने सर्वांगीण विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. गावाच्या आरोग्यसेवा बळकटीकरणाच्या दृष्टीने दि. ५ डिसेंबर रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तसेच, कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही आ.मुनगंटीवार यांनी केले असून, या उपक्रमामुळे  स्थानिक महिलांसाठी रोजगाराची नवी दालने खुली झाली आहेत. (हे हि वाचा : पोंभुर्णा मध्ये महिला बचत गटाच्या बाजारपेठेचे भूमिपूजन)

    यावेळी, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ढवस, सरपंच सौ. शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, विनोद देशमुख, राहुल पाल, रवि मरपल्लीवार, अजय मस्के, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काथोडे, दशरथ फरकडे आदींची उपस्थिती होती.

    आरोग्य उपकेंद्रासाठी तब्बल ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे गावातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा आपल्या परिसरातच मिळणार आहेत.

    गावाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या सरपंच व उपसरपंच यांच्या मागण्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ठोस बळ मिळाले आहे. चिंतलधाबाच्या विकासासाठी त्यांच्या या प्रयत्नांना आता वेग आणि दिशा मिळत असून गाव सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

    दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस

    नागरिकांनी मांडलेल्या दोन प्रमुख मागण्यांचाही विचार करण्यात आला. यामध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तत्काळ घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाला अंदाजपत्रक तयार करण्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. चिंतलधाबाची विजेची समस्या सोडविण्यासाठी महावितरणसोबत सविस्तर बैठक घेण्यात येणार आहे. यापूर्वी उथळपेठ हे गाव १००% सोलार करण्यात आले होते; त्याच धर्तीवर चिंतलधाबा हे महाराष्ट्रातील दुसरे पूर्ण सौरऊर्जेवर चालणारे गाव करण्याचा मानस आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्यादृष्टीने आगामी वर्षभरात या सोलार प्रकल्पाबद्दल गतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले. rural health center

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांमुळे चिंतलधाबा गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून आरोग्य, ऊर्जा आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीला निर्णायक दिशा मिळेल. आगामी काळातही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने आणि जबाबदारीने कार्यरत राहू, असा ठाम विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

    कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र

    चिंतलधाबा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लोकर संशोधन संघ, मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्पेट निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येथील तरुणी व महिला यांच्या प्रशिक्षण कौशल्याचा भविष्यात विचार व्हावा, त्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी येत्या सहा महिन्यात त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.यासाठी प्रशिक्षणार्थी तरुणी व महिलांची यादी तयार करावी.

    कायम सक्षम आरोग्य सुविधेचा मानस

    आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक बळ देताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच कळमना येथे २ कोटी ६८ लाखांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उमरी पोतदार येथे ८ कोटी ७५ लाखांच्या प्राथमिक आरोग्य संकुलाचे लोकार्पण केले आहे. अर्थमंत्री असताना शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत ७.५ कोटींचे एमआरआय मशीन, १.५ कोटींची मोबाईल कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देऊन जिल्ह्यातील आरोग्यसेवेला नवी दिशा देण्यात आली. तसेच १३ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३२ स्मार्ट आरोग्य केंद्रे, ६ स्मार्ट रुग्णालये, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल यांसारख्या भव्य प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम आणि आधुनिक आरोग्यव्यवस्था उभी करण्याचा मोठा उपक्रम त्यांनी साध्य केला.

  • आरोग्यासाठी धोकादायक केळी टाळा: ४ सोप्या चाचण्यांनी सावध व्हा

    carbide banana : आरोग्यवार्ता (News३४) : केळ्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, कारण त्यात अनेक आवश्यक पोषक तत्वे आढळतात जे रोगांशी लढण्यास मदत करतात. मात्र, आजच्या भेसळीच्या युगात खाण्याच्या वस्तूंवर विश्वास ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. एक धक्कादायक बाब म्हणजे बाजारात केळी पिकवण्यासाठी ‘कार्बाइड’ (Carbide Chemical) नावाच्या धोकादायक रसायनाचा वापर केला जात आहे. या रसायनाने पिकवलेल्या केळ्यांचे सेवन केल्यास अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

    तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी, खरेदी करण्यापूर्वी रासायनिक प्रक्रिया केलेल्या केळ्यांना ओळखण्यासाठी येथे ४ सोपे आणि प्रभावी मार्ग दिले आहेत: (हे वाचा : घरबसल्या ऑनलाईन करा बक्कळ कमाई)

    केमिकलने पिकवलेले केळे ओळखण्याचे ४ महत्त्वाचे मार्ग

    १. रंगावरून ओळख (Color Identification)

    केमिकलने पिकवलेल्या केळ्याची सर्वात सोपी ओळख त्याच्या रंगावरून करता येते.

    • रासायनिक केळे: जर केळे अगदी गुळगुळीत (चिकणे), हलके पिवळे दिसत असेल आणि त्यावर कुठेही हिरवे डाग दिसत असतील, तर ते रासायनिक प्रक्रियेने पिकवलेले असण्याची दाट शक्यता आहे.
    • नैसर्गिक केळे: नैसर्गिकरित्या पिकलेले केळे गडद पिवळे रंगाचे असते आणि त्यावर काळे ठिपके (डाग) दिसून येतात. हे ठिपके दर्शवतात की केळे नैसर्गिकरित्या आणि पूर्णपणे पिकले आहे. carbide banana

    २. गंधावरून ओळख (Odor Identification)

    नैसर्गिक आणि रासायनिक केळ्यांमधील फरक त्यांच्या वासावरूनही स्पष्ट होतो.

    • नैसर्गिक केळे: जर केळ्यातून गोड आणि ताजी सुगंध येत असेल, तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले केळे असू शकते.
    • रासायनिक केळे: जर केळ्यांना केमिकलसारखा वास येत असेल, तर ते रसायनांच्या मदतीने पिकवलेले आहे हे समजावे आणि अशा केळ्यांची खरेदी टाळावी.

    ३. पाण्याच्या चाचणीवरून ओळख (Water Test)

    हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

    • एका बादलीत किंवा भांड्यात पाणी घ्या आणि त्यात केळी टाका.
    • नैसर्गिक केळे: जर केळे पाण्यात खाली बुडत असेल, तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले केळे आहे.
    • रासायनिक केळे: जर केळे पाण्यात तरंगत असेल आणि बुडत नसेल, तर ते केमिकलने पिकवलेले असू शकते.

    ४. एकसारखेपणावरून ओळख (Uniformity)

    केमिकलने पिकवलेल्या केळ्यामध्ये पिकण्याचा एकसारखेपणा आढळत नाही.

    • रासायनिक केळे: हे केळे कुठूनतरी पिकलेले आणि कुठूनतरी कच्चे असे दिसते. म्हणजे संपूर्ण केळे एकाच वेळी पिकलेले नसते.
    • नैसर्गिक केळे: जर केळे पूर्णपणे आणि सर्व बाजूंनी एकसारखे पिकलेले असेल, तर ते नैसर्गिकरीत्या पिकलेले केळे असू शकते.
  • पोंभूर्णा येथे महिला बचतगट बाजारपेठेचे भूमिपूजन

    Pombhurna Market Bhumipujan : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दि. ५ डिसेंबर रोजी पोंभूर्णा येथे महिला बचत गट बाजारपेठेचे भूमिपूजन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी रोजगाराच्या नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याचा आनंद आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या बाजारपेठेच्या माध्यमातून केवळ पोंभूर्णाच नव्हे, तर संपूर्ण बल्लारपूर मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (हे हि वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार धानोरकरांचा पाठपुरावा)

    पोंभूर्णा येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून आयोजित महिला बचत गट बाजारपेठ भूमिपूजन सोहळा आणि बचत गट महिला मेळाव्याला अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी कल्पनाताई क्षीरसागर, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, तहसीलदार मोहनीश शेलवटकर, नगरपंचायत मुख्याधिकारी निखिल लांडगे, तालुका अध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, ऋषी कोटरंगे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गुरुदास पिपरे, ज्योती बुरांडे, वैशाली बोलमवार, अजय मस्के, गंगाधर मडावी, बंडू बुरांडे, ईश्वर नैताम, ओमदास पाल आणि आदि मान्यवरांची उपस्थिती होती. Pombhurna Market Bhumipujan

    या सोहळ्यात उमेदच्या ‘यशोगाथा’ पुस्तिकेचे विमोचन तसेच कृषी विभागाच्या एआय आधारित शेतीविषयक माहितीपत्रकाचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ

    आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभूर्णा आणि बल्लारपूर येथील बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज पोंभूर्णा येथे १ कोटी रुपये निधीतून होत असलेल्या बाजारपेठेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने यशस्वी पाऊल टाकण्यात आले आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. पोंभूर्णा येथील महिला बचतगटांच्या बाजारपेठेचे भूमिपूजन निश्चितच बल्लारपूर मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना बळ देईल.’

    हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी

    यावेळी त्यांनी बल्लारपूरमध्ये सुरु असलेल्या एसएनडीटी कॉलेजमुळे ६२ कौशल्याधारित अभ्यासक्रमांद्वारे हजारो मुली व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे विशेषत्वाने सांगितले. महिला व शेतकरी बांधवांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेली ८० कोटी रुपयांची महाराष्ट्रातील सर्वात मोठी आधुनिक बाजारपेठ स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार देणार असल्याचा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात

    ते पुढे म्हणाले, ‘आपल्या लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्यात, आत्मनिर्भर व्हाव्यात हा केवळ आपला ध्यास नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. महिलांच्या हाताला रोजगार मिळणे म्हणजे एका कुटुंबाची, एका समाजाची आणि पुढील पिढीची प्रगती होय. यासाठी बचतगटांनी कष्टाने तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या परिश्रमाला योग्य किंमत मिळावी, त्यांच्या उत्पादनांना खात्रीशीर मागणी निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढत राहावे, यासाठी सशक्त, कायमस्वरूपी आणि आधुनिक बाजारपेठ निर्माण करणे हा आपल्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.’

    भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ

    महिला बचत गटांनी उद्योगातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण शासनस्तरावर, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. त्यांना प्रशिक्षण, वित्तीय मदत, विक्रीचे मार्ग आणि तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. महिलांच्या प्रगतीशिवाय समाजाचा विकास अपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे उचललेले प्रत्येक पाऊल भविष्यातील मजबूत समाजव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल, याची जाणीव ठेवून आपण कार्यरत आहोत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

  • बल्लारपुरात पोलिसांची धांय धांय कारवाई

    Illegal Arms Raid in Ballarpur : चंद्रपूर 6 डिसेंबर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका गुन्हेगारीचे हब बनू पाहत आहे, काही महिन्यापूर्वी बल्लारपुरातील सूर्यवंशी टोळीने शस्त्रसाठा चंद्रपुरात आणत मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते, पोलिसांनी त्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती, मात्र त्यानंतर सुद्धा बल्लारपूर शहरात बंदुकीचा वापर काही थांबत नाही आहे. (हे वाचा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नी व प्रियकराकडून हत्या)

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत २ कट्टे व जिवंत काडतूस सह २ आरोपीना अटक करण्यात आली.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पहिल्या कारवाईत

    ५ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली कि एक इसम स्वतःजवळ देशी कट्टा बाळगून फिरत आहे, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक पंडित दीनदयाल वॉर्ड येथे पोहोचले.

    दीनदयाळ वॉर्डातील पेपरमिल कॉलोनी पडित क्वार्टर परिसरात ३९ वर्षीय राहुल दिनेश डंगोरे ला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीची जुनी वापरती देशी कट्टा आढळून आला. Illegal Arms Raid in Ballarpur

    आरोपी डंगोरे वर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, या कारवाईत ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

    या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, किशोर वाकाटे, शेखर माथनकर व रिषभ बारसिंगे यांनी केली.

    बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत

    रेल्वेनगर वॉर्डात एक इसम आपल्या घरी देशी बनावटीची पिस्टल बाळगून असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या इसमाच्या घराची झडती घेतली असता ७ MM बोर देशी बनावटीची पिस्टल मॅगझीन सह दोन जिवंत काडतूस आढळून आले.

    देशी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुसे

    रेल्वे नगर वॉर्डातील ३० वर्षीय मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसूफ शेख वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा ट्रान्सपोर्ट व्यवसायी आहे. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी शेख ला अटक करण्यात आली.

    या कारवाईत देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

    बल्लारपूर पोलिसांच्या कारवाईत पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने व गुरु शिंदे यांचा सहभाग होता.

    स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी या कारवाईत एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • चंद्रपूरच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सातत्याने पाठपुरावा

    Chandrapur rail connectivity : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, ‘रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही’ असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, मी केलेल्या धडाडीच्या कामाचा पुरावा जनतेसमोर आहे. (हे हि वाचा – NASP पोर्टल मधील अडचणी दूर करा)

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचा ‘रेल्वे’साठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

    १५ जून २०२४ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र: मी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून (पत्र क्र. १०१२/२०२४), बल्लारपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स (LTT) ही ट्रेन दररोज चालवण्याची आणि काजीपेठ-पुणे ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. Chandrapur rail connectivity

    ४ जुलै २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष पत्र:

    चंद्रपूर आणि परिसरातील हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी आहेत, हे लक्षात घेऊन काजीपेठ-पुणे एक्सप्रेस दररोज चालवण्यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पुन्हा स्वतंत्र पत्र (क्रमांक १०९८/२०२४) दिले.

    ०२ एप्रिल २०२५ रोजी संसदेत जाब:

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक ५२११ द्वारे चंद्रपूर ते पुणे आणि मुंबईसाठी थेट रेल्वे गाड्यांची कमतरता असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि नियमित सुपरफास्ट गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती.

    कोरोना काळात बंद झालेली बल्लारशाह-मुंबई लिंक कोच सेवा (जी सेवाग्राम एक्सप्रेसला जोडली जात होती) ती पूर्ववत सुरू करण्यासाठी त्यांनी पत्र (क्रमांक ३९२३/२०२४) दिले आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांची सोय होईल.

    वरोरा येथील प्रवाशांच्या सोयीसाठी कोरोना काळापासून बंद असलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी १५ जून २०२४ च्या पत्राद्वारे केली आहे

    आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आम्ही सातत्याने मागणी करत असतानाही रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आंदोलकांनी आपला रोष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर न काढता, निर्णयाचा अधिकार असलेल्या प्रशासनावर व्यक्त करावा.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, यापुढेही चंद्रपूरकरांना हक्काची रेल्वे मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असून, जनहिताच्या कामात राजकीय अडथळे आणणाऱ्या शक्तींचा त्यांनी तीव्र निषेध त्यांनी केला आहे.

  • संविधानाचे पालन हीच खरी राष्ट्रसेवा – आ. किशोर जोरगेवार

    mahaparinirvan diwas : चंद्रपूर ६ डिसेंबर (News३४) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याल्याही मार्ल्यापण करण्यात आले.

      यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बहुजन महिला आघाडी प्रमूख विमल कातकर, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, महामंत्री सविता दंढारे, श्याम कनकम, माजी नगर सेविका पूष्पा उराडे, सुषमा नागोसे, खुशबु चौधरी, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, आशु फुलझेले, नितेश गवळी, शितल गुरनुले आदिंची उपस्थिती होती. (नक्की वाचा – प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीची प्रियकराने केली हत्या)

    बाबासाहेबांच्या विचारावर चालणे हीच खरी आदरांजली

     यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा नाही, तर जागृतीचा दिवस आहे. बाबासाहेबांनी समाजाचे रुपांतर केले. त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे, गुलामगिरीतून स्वाभिमानाकडे आणि अन्यायातून न्यायाकडे नेणारा मार्ग दिला. आज आपण त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी आदरांजली आहे. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे आपल्या देशाचे बळ आहे. mahaparinirvan diwas

    समानता, स्वातंर्त्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर उभा असलेला हा देश मजबूत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे. संविधानाचे पालन करणे, कर्तव्य बजावणे आणि समाजात सकारात्मकता निर्माण करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. धम्म म्हणजे शांतता, नैतिकता आणि मानवी मूल्ये आहे. एकमेकांचा आदर, सहिष्णुता आणि सद्भावना हीच खरी जीवनशैली आहे.

    शिक्षण सर्वात मोठे शस्त्र

    शिक्षण हेच आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करावे, समाजासाठी पुढे यावे आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल उजळवत ठेवावी. बाबासाहेबांचा विचार कृतीत उतरवणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. समाजात न्याय, शिक्षण आणि समतेचा दीप पेटत राहिला पाहिजे.  असे ते यावेळी म्हणाले.  यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.