Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • Convocation ceremony : सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान

    Convocation ceremony : सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान

    Convocation ceremony गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून  जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो, त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.

    Convocation ceremony या सन्मानमुळे माझ्या पित्याचे स्वप्न पितृमोक्ष अमावस्या दिनी आणि गांधी जयंती सारख्या विशेष दिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना मंत्री मुनगंटीवार अत्यंत भावनिक झाले होते.

    अवश्य वाचा : शिक्षण क्षेत्रात हवं Ai तंत्रज्ञान

    गोंडवाना विद्यापीठाच्या ११आणि १२ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री. सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, रजिस्ट्रार डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य मंचावर उपस्थित होते.

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की, जुन्या आठवणींमुळे माझे भाव दाटून आले असून माझ्यासाठी हा क्षण बहुमूल्य आहे. माझ्या कुटुंबात बहुतेक डॉक्टर आहेत; वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते; मी देखील डॉक्टर व्हावं ही बाबांची इच्छा होती; बाबांना आणीबाणीच्या काळात 19 महिन्याचा कारावास झाला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. पण आज पितृमोक्ष अमावस्या या दिवशी माझ्या बाबांना ही पदवी समर्पित करताना आयुष्यातील एक अपूर्णता पूर्णतेमध्ये परावार्तीत झाल्याने भारावून गेलो आहे. Convocation ceremony

    गडचिरोली, चंद्रपूर या दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने, आदिवासी संस्कृती आणि वैभवला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी मी संघर्ष केला, प्रयत्न केले त्याचे मला मनापासून समाधान आहे. सुंदर पर्यावरण, शुद्ध हवा, असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात हे विद्यापीठ स्थापन करता आले याचा आनंद आहे ; कारण जेथे शुद्ध विचार तेथे शुद्ध आचार आणि शुद्ध आचार असतील तेथे शुद्ध कृती होते. Gondwana university

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार,  वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचा नामविस्तार असेल किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल या प्रत्येक अभियानात मी होतो हे मी माझे सौभाग्य समजतो. या सर्वं महामानवांच्या नावाने विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पदवी घेताना स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारला पाहिजे.  शिक्षण घेतल्यावर समाजाला “हम आपके है कोन” बनण्याच्या ऐवजी “हम साथ साथ है” चा भाव त्याच्या हृदयामध्ये जन्माला आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले. Convocation ceremony

    गोंडवाना विद्यापीठाने दिलेली मानद डी. लिट. मला ऊर्जा देणारी आहे; लोकोपयोगी कार्यात मी स्वतःला झोकून दिले आहेच; परंतु अधिक वेगाने विकास कामे करण्याची शक्ती विद्यापीठाने मला प्रदान केली आहे. हे विद्यापीठ डॉ प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी करत राहील, अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

  • Governor in Chandrapur : मंत्री मुनगंटीवार यांचं निमंत्रण राज्यपालांनी स्वीकारलं

    Governor in Chandrapur : मंत्री मुनगंटीवार यांचं निमंत्रण राज्यपालांनी स्वीकारलं

    Governor in Chandrapur राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या महिन्यात महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्यपाल महोदयांना चंद्रपूरमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी ‘आदिवासी लोक संस्कृतीचा आविष्कार बघण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात नक्की येईल’, अशी ग्वाही राज्यपालांनी ना. मुनगंटीवार यांना दिली होती. ना. मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून राज्यपाल महोदय आता चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत. १ ऑक्टोबरला ते पोंभूर्णा येथे आदिवासी समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील शाळा अदानीला विकली

    Governor in Chandrapur दिवाळीच्या पूर्वी राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करताना पोंभुर्णा तालुक्यात आदिवासी पारंपारिक उत्सवात उपस्थित राहण्याची ग्वाही राज्यपाल महोदयांनी ना. श्री. मुनगंटीवार व पोंभुर्णा येथील गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तालुकाध्यक्ष जगन येलके यांना दिली होती.

    आदिवासी समाजाचे अधिकार आणि त्यांची लोक संस्कृती जोपासण्यासाठी सर्व प्रयत्न होतील, असेही राज्यपाल महोदयांनी यावेळी म्हटले होते. त्याचवेळी ना. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्याला येण्याचे निमंत्रणही राज्यपाल महोदयांना दिले होते. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले होते आणि आता १ ऑक्टोबरला या महोत्सवाला ते उपस्थित राहणार आहेत. Governor in Chandrapur

    १ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता पोंभुर्णा येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर आदिवासी समाजाचा मेळावा होणार आहे. यावेळी महामहीम राज्यपाल महोदय व ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील आदिवासी बांधव या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याठिकाणी आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा होणार असून समृद्ध अशा आदिवासी लोकसंस्कृतीचे सादरीकरण देखील बघायला मिळणार आहे. Sudhir mungantiwar

    ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे…
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल आपल्या मेळाव्याला येत आहेत, याबद्दल आनंद आणि उत्साह आदिवासी समाजात आहे. त्यासाठी त्यांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार देखील मानले आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संस्कृतीचे जतन करण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्न करीत असतात, हे विशेष.

    राज्यपाल चंद्रपुरात येणार

  • Bahin Ladki Yojana : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत भविष्यात वाढ होणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    Bahin Ladki Yojana : लाडकी बहीण योजनेच्या रकमेत भविष्यात वाढ होणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    bahin ladki yojana कोणत्याही व्यापार किंवा व्यवसायामध्ये आता केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लक्ष महिला भगिनी महिला बचत गटांशी जुळल्या आहेत. या बचत गटांना 292 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भविष्याताही ही वाटचाल अशीच पुढे जाणार असून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरेल. त्यातून आत्मनिर्भरता आणि स्त्री शक्तीचा जागर वाढेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    bahin ladki yojana चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,  सहायक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंखे, गिरीश धायगुडे, पालिका प्रशासन अधिकारी वर्षा गायकवाड, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, राहुल पावडे आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांचं निलंबन

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झाले, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे चांदा हा राज्यात प्रथमच असला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कुठेही कमतरता नाही, फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिला बचत गटांना 292 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून यात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. bahin ladki yojana

    लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 4 लक्ष 70 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 2 लक्ष 75 हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा सुद्धा झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण 4 लक्ष 70 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    संसदीय समितीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती

    लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे. मात्र अजूनही काही महिलांचे आधार सिडींग नसल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही. वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बचत गटांनी सहकार्य करावे. कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहता कामा नये. तसेच ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, आज दरमहा 1500 रुपये या योजनेत दिले जाते, भविष्यात यात वाढ होणार आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जुन सांगितले. bahin ladki yojana

    पुढे ते म्हणाले, उद्योगांमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण देण्यात येत आहे. एमआयडीसी मध्ये महिलांना उद्योगांसाठी 20 टक्के प्लॉट आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानित शाळा, आश्रम शाळेत महिला बचत गट वस्तुंचा पुरवठा करण्यास सक्षम असून बचत गटांना अनेक कामे सरकारने दिले आहे. तसेच शिवणकाम प्रशिक्षण सुद्धा देणे सुरू असून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश संबंधित गावातच तयार झाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir mungantiwar)

     हा बहिणींचा सन्मान निधी : आमदार किशोर जोरगेवार

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत जिल्हा अग्रक्रमावर आहे. या योजनेमुळे बहिणी खुश झाल्या असून बहिणींना किमान 100 रुपये रोज मिळावे, म्हणजे महिन्याला तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा व्हावे, अशी आपली मागणी आहे. महिलांच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे बहिणींना हा सन्मान निधी देण्यात येत आहे. ज्या बहिणींच्या अर्जात तांत्रिक कारणामुळे त्रुटी आहेत, त्या त्वरित दूर कराव्यात, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. bahin ladki yojana

    बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉलची निर्मिती : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आता तंत्रज्ञान,  सोलर, सर्विस सेक्टर, उत्पादनांची मार्केटिंग,  पॅकेजिंग या क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्याची गरज आहे. बचत गटाच्या वस्तूंसाठी चंद्रपुरात कृषी विभागाच्या जागेवर उत्कृष्ट मॉल तयार होत आहे. यात फूड कोर्ट, प्रदर्शनी सेंटर, प्रशिक्षण सभागृह आदी सुसज्ज राहणार आहे. तालुका स्तरावरही बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी असे मॉल उभे करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. रिलायन्स पेक्षाही आपला मॉल उत्कृष्ट राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (Sudhir mungantiwar)

    वन विभागात आता ‘वनसखी

    चंद्रपूर जिल्ह्यात कृषी सखी, वॉर्ड सखी सुरू करण्यात आली असून ‘सखी’ या शब्दातच प्रेम जाणवते. वनविभागात सुद्धा ‘वनसखी’ करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आहे. bahin ladki yojana

    विविध लाभार्थ्यांचा सत्कार व धनादेश वाटप

    यावेळी माविमच्या माधुरी वाकडे, वैशाली गोवर्धन, देवीनंदा भोयर, कीर्ती चंदनमलाधार, नसरीत बानो मोहम्मद हारून, संध्या घरात यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कल्याणी रायपुरे आणि प्रियतमा खातखेडे यांना 1500 रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. लखपती दीदी अंतर्गत लीना मॅडावार, अर्चना टेकाम, लता खोब्रागडे,  उज्वला गेडाम यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दाताळा येथील सरस्वती समूह आणि जामतुकूम येथील संतोषी उत्पादक गट यांना धनादेश वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेले प्रियंका मोटघरे, अक्षता रामटेके, चांदणी शेंडे, अस्मिता आत्राम, सुश्मिता गिठणलवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. bahin ladki yojana

    महिलांना पैठणी आणि सुरक्षा कीट : लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यात आलेल्या पाच महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. यात सुलोचना नैताम, कल्पना शेडमाके, शकुंतला चालखुरे, गीता कार्लेकर, अन्नपूर्णा राऊत यांचा समावेश होता. तसेच लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या शीतल दरेकर, माधुरी टेकाम, मोहिता बोंडे, सविता नेवारे, सुनिता किसनाशिले यांना सुरक्षा किट तर विजया गोटमुखले,  वासंती नन्नावरे, विद्या सदनपवार, अंकिता चंद्रा, शुभांगी ढगे यांना लकी ड्रॉ द्वारे अम्माचा टिफिन देण्यात आला. bahin ladki yojana

    प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, महिला शिक्षित तर कुटुंब शिक्षित होते. महिलांमुळेच कुटुंबात आर्थिक साक्षरता निर्माण होते. चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 4 लक्ष 73 हजार 70 अर्ज प्राप्त झाले, यापैकी 4 लक्ष 64 हजार 800 महिलांना लाभ मिळणार आहे. उर्वरित महिलांनी या योजनेकरिता अर्ज करावे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची महत्त्वाची पायरी आहे. जिल्ह्यामध्ये तीन लक्ष महिला, बचत गटांसोबत जुळल्या असून बचत गटांना 292 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा राज्यात क्रमांक एकवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी पोंभुर्णा येथील माविमच्या महिला बचत गटाच्या सरिता मून आणि उमेदच्या शुभांगी गोवर्धने यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी मानले.

  • Yashwantrao Chavan Gharkul Yojana : 961 नागरिकांना मिळणार हक्काचं घर

    Yashwantrao Chavan Gharkul Yojana : 961 नागरिकांना मिळणार हक्काचं घर

    Yashwantrao Chavan Gharkul Yojana घर म्हणजे केवळ घर नसतं… असल्या जरी चार भिंती… तरी जगण्यासाठी विणलेलं… सुंदर स्वप्न असतं’, बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणारे, जिव्हाळा जपणारे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आता अनेकांचं हक्काच्या घराचं सुंदर स्वप्न साकार होणार आहे. गरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे.

    Yashwantrao Chavan Gharkul Yojana यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेंतर्गत हा लाभ बल्लारपूर विधानसभेतील गरिबांना मिळणार असून त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे.

    आमच्या विधानसभा क्षेत्रात हवा हा आमदार, शेतकऱ्यांनी केली उमेदवारांच्या नावाची घोषणा

    या योजनेंतर्गत पोंभुर्णा येथील 500 लाभार्थी, मुल येथील 376 आणि चंद्रपूर येथील 85 नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे. आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपुर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले असून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घरकुल योजनेच्या निधीकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील 961 लाभार्थ्यांना आता हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी 12 कोटी 49 लक्ष 30 हजार रुपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय 24 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. (Yashwantrao Chavan Gharkul Yojana)

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल, पोंभुर्णा चंद्रपूर तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजनेंतर्गत सन 2024-25 करीता 961 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता आणि लाभार्थ्यांकरीता प्रति लाभार्थी 1 लक्ष 30 हजार रुपये याप्रमाणे 12 कोटी 49 लक्ष 30 हजार इतक्या रकमेस मान्यता देण्यात आली आहे. (Sudhir mungantiwar)

    पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुल : जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, आणि पोंभुर्णा तालुक्यातील 961 लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलचा लाभ होणार आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चेक हत्तीबोडी लाभार्थी (60), घाटकुळ (106), सातारा भोसले (11), जामतुकूम (55), चेक आंबेधानोरा (22), मोहाळा रै (26), जुनगाव (42), बोर्डा झुल्लुरवार (12), बोर्डा बोरकर (127), चिंतलधाबा (16), नवेगाव मोरे (16) आणि फुटाणा मो येथील (7 लाभार्थी) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

    मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुल : मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चिमठा गावातील  (27 लाभार्थी), विरई (33), गवराळा (28), उश्राळा (17), चिरोली (42), डोंगरगाव (115), सुशी (99), आणि राजगड येथील (13 लाभार्थी) आहे.

    चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी : यात चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी आहेत. यात अजयपुर येथील (1 लाभार्थी), चिचपल्ली (21), मामला (11), चोरगाव (3), जुनोना (12), नागाळा म. (3), निंबाळा (9), पिंपळखुट (1), चेक पिंपळखुट (1), पिपरी (5), मोहर्ली (2), वरवट (12) आणि सिदूर येथील (4) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

  • chandrapur live news : वनमंत्री राजीनामा द्या, शिवसेनेचे घेराव आंदोलन

    chandrapur live news : वनमंत्री राजीनामा द्या, शिवसेनेचे घेराव आंदोलन

    chandrapur live news नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात जाणारे मानव बळी वाचवण्याकरिता मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव, वाघांचे लाड पुरवणाऱ्या वनमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून द्यावा राजीनामा; आंदोलनकर्त्यांची मागणी

    chandrapur live news चंद्रपूर :- मुल तालुक्यात दिवसेंदिवस नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला आहे. वनविभागाची थातुरमातुर भुमीका व वाघांचे लाड पुरवणारे कायदे यामुळे नरभक्षी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात मुल वनपरिक्षेत्रात वाढत आहे. होणारे वाघाचे हल्ले रोखण्यासाठी व मनुष्य जीवाचे रक्षण करण्यासाठी वनविभागाकडे वेळो-वेळी पाठपुरावा करण्यात येत होते. मात्र लोकांच्या जीवाची पर्वा न कलणाऱ्या वनविभाग कानाडोळा करून गप्प बसले होते.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 167 आदिवासी गावाचा कायापालट

    यामुळे दिड महिन्यात ५ लोकांचे वाघाच्या हल्ल्यात जीव गेले.त्यांचे परिवार उघड्यावर पडले.वारंवार होणारी घटना रोखण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी दि.२३ सप्टेंबरला चंद्रपूर येथे मुख्य वनसंरक्षण कर्यालयाला घेराव आंदोलन करून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा जनतेला घेऊन आम्हीच वाघाचा बंदोबस्त करू असा इशारा देण्यात आला.तसेच वाघाच्या हल्ल्यात ज्या लोकांचे बळी गेले त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा तसेच जनतेच्या भौतिक संरक्षणाची जबाबदारी स्वतः राज्य सरकारने व वनसंरक्षण अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

    मूल तालुक्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोन, प्रादेशिक, सामाजिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल लाभले आहे. या चारही भागात वाघांचा मोठा संचार आहे. (chandrapur live news)

    आता मिळणार 10 हजार पेन्शन


    जंगलालगत बराचसा शेतशिवार असल्याने तसेच जंगलाशेजारी जनावरांचे चराई क्षेत्र असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाकडून नियमित हल्ले होत आहे. त्यात निष्पाप शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांचे बळी जात आहे.यावर शासनस्तरावरून आणि वनविभागातर्फे कोणतेही ठोस उपाययोजना केल्या गेले नाही.मूल तालुका वाघाच्या दहशतीत सापडला असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

    रोज ऐक दुर्दैवी घटना घटना घडत आहे.याकडे वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे संतप्त मुल वासियांनी मुख्य वनसंरक्षकाच्याच कार्यालयाला घेराव घालून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.


    मुल तालुक्यातील वाघाचा तातडीने बंदोबस्त करा,नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास विना विलंब तात्काळ आर्थिक मदत करा,जंगली प्राण्यांमुळे पिकांची झालेली नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करा,या सगळ्या प्रकरणात चुप्पी साधलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबाबदारी स्वीकारून वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, मुल येथे वनपरीक्षेत्र कार्यालयात निर्माण करण्यात यावे,मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी तात्काळ आर्थिक मदत व वनविभागात शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी अश्या विविध मागण्यांच्या संदर्भात मुख्य वनसंरक्षक कार्यालयास घेराव घालण्यात आला.

    याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर संदिप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील,मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राज ठाकरे, विनय धोबे,महिला जिल्हा संघटिका कल्पना गारघाटे,ज्योती गहलोत, मीनाक्षीताई गलगट,प्रशांत मेश्राम युसूफ शेख,सागर राऊत,विनोद बुराडे व आदी उपस्थित होते.

  • Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

    Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

    Guru dakshina शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी भरारी घेतात. नाव कमावतात. आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण मोजकेच विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव ठेवतात. त्यातही ना. सुधीर मुनगंटीवार त्या शाळेचे माजी विद्यार्थी असतील, तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेला किती अधिक देता येईल याचा विचार करतात. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलसाठी ज्या भावनेतून परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे, ती कुठल्याही माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्श बाब ठरावी.

    Guru dakshina राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी आणि पाचवे सरसंघचालक प.पू के.सुदर्शन यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील बाकांवर श्री. सुधीर मुनगंटीवार यांना शैक्षणिक, सामाजिक धडे गिरवता आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण या शाळेत झाले. त्यानंतरचा ना. मुनगंटीवार यांचा लोकनेता म्हणून प्रवास साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करावे, अशी जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.

    तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    एका माजी विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा म्हणून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद (मा.शा) ज्युबिली हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला. ही खऱ्या अर्थाने एका माजी विद्यार्थ्याची आदर्श गुरुदक्षिणा ठरत आहे. नूतनीकरणांतर्गत इमारतीची संपूर्ण दुरुस्ती, नवीन फ्लोरिंग, नवीन छत, फॉल सीलिंग, दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, अनेक ठिकाणी प्लास्टर, डिजिटल क्लासरूम, आधुनिक फर्निचर, प्रयोगशाळा दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.  (Guru dakshina)

    राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये पेन्शन

    ना. श्री. मुनगंटीवार यांनी आज महाविद्यालयाच्या नुतणीकरणाच्या कामाची पाहणी केली आणि माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वाचनालयाचा विशेष उल्लेख केला. 14 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून अत्याधुनिक वाचनालय येथे तयार करण्यात येणार आहे. ई -लायब्ररी पासून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होतील. या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून विद्यार्थ्यांना येथे शिकता येईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. (Guru dakshina)

    संस्कारांचं माहेरघर


    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळले. पण ते ज्युबिली हायस्कूलच्या बाकांवर घडले. याच बाकांवर त्यांना पर्यावरणाचे धडे मिळाले आणि इथेच त्यांच्यातील गुणी विद्यार्थी घडला. आणि आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य बघितले तर शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासाठी त्यांची शाळा खऱ्या अर्थाने संस्कारांचं माहेरघर ठरले आहे.

    गुरू दक्षिणा

  • pik vima yojana : पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करा – पालकमंत्री मुनगंटीवार

    pik vima yojana : पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करा – पालकमंत्री मुनगंटीवार

    Pik vima yojana जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापी दुःखात असू नये, अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरि सहकार्य केले पाहिजे, शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून संवेदनशीलपणे प्रयत्न व्हावे, कुठलीही कुचराई खपवून घेणार नाही; हा विषय गांभीर्याने हाताळला जावा अश्या कडक शब्दात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना सुनावले.

    महत्त्वाचे : चंद्रपूर परिमंडळात 1 हजार 152 घरांवर सोलर पॅनल, प्रधानमंत्री सुर्यघर योजनेला वाढता प्रतिसाद

     Pik vima yojana चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पिक विमा योजनेतील प्रलंबित रकमेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

    Pik vima yojana जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, कृषी अधीक्षक श्री. शंकर तोटावार, शेतकरी नेते श्री बंडू गौरकर, यांच्यासह विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.


     पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या  जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मागील महिन्यात मोठा दिलासा मिळाला.  राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या सतत संपर्कात राहून, मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता.  चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल पिक विमा कंपनीकडे असून सदर कंपनीने २०२.६७ कोटी रुपये पिक विमा योजनेची रक्कम मान्य केली आणि ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर १४३.८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले. परंतु अद्यापही ५८.९४ कोटी रक्कम थकीत असून यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pik vima yojana)

    प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला सम्पर्क अधिकारी

     विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्याप ही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

     चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ५१,३५२ शेतकऱ्यांनी पीक विमा  दावा दाखल केला होता, यापैकी १ लक्ष १८,५८८ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम प्राप्त झाली, ३२ हजार ७६४ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अप्राप्त आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील रक्कम अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिले.

       विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून कृषी मंत्र्यांनी मागील बैठकीत दिले होते, हे विशेष.

    कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा !

      पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अतिशय संवेदनशील पणे दखल घेणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना दूरध्वनी करून वस्तुस्थिती अवगत करून दिली.  पिक विमा योजने संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची आपण पूर्ती करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ यासाठी आपल्या स्तरावरून आदेश द्या अशी विनंतीदेखील ना  मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
     ना सुधीर मुनगंटीवार यांची प्रशासनावरील पकड व संवेदनशील कार्यपद्धती ही सर्व परिचितच आहे; परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सुधीरभाऊ तातडीने धावून येतात अशी प्रतिक्रिया देत, उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले.

  • Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

    Today Environmental protection : पर्यावरणाचे रक्षण ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार

    Environmental protection चंद्रपूर: वसुंधरेच्या संरक्षणासाठी निसर्गाचे शोषण थांबावे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे ही सामाजिक जबाबदारी असून वनविभागाने महाराष्ट्र बांबू बोर्डाच्या माध्यमातून जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबू ट्री गार्डचे तसेच बांबू चारकोल साबणाचे उत्पादन जागतिक बांबू दिनाच्या औचित्य साधून सुरू केले याचा मनापासून आनंद होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज काढले. महाराष्ट्र वन विभाग व बांबू बोर्डाच्या वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ना. मुनगंटीवार बोलत होते.

    Environmental protection यावेळी वनबल प्रमुख श्रीमती शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व विकास) श्री. कल्याणकुमार यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला बुरड गटाने उत्पादित केलेल्या बांबू ट्री गार्ड तसेच बांबू चारकोल सोप (साबण) चे लोकार्पण करण्यात आले.

    चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा

    यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये पॅरिस येथे संपन्न झालेल्या एका जागतिक परिषदेत पृथ्वीच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनुष्याकडून निसर्गावर मात करत नवे शोध लावण्यासाठी वसुंधरेचा शाप ओढवल्याबाबत गांभीर्याने चर्चा झाली. त्यानंतर देखील पर्यावरणावरील होत असलेल्या आक्रमणाची चिंता वाढत गेली. पर्यावरणाचे रक्षण करत असताना ट्रिगार्ड मात्र आपण दुर्दैवाने प्लास्टिकचेच वापरत होतो; पण महाराष्ट्राच्या बांबू बोर्डाने जागतिक बांबू दिनानिमित्त जैविक विघटन होऊ शकेल अशा बांबूच्या ट्री गार्डचे उत्पादन करून, पर्यावरण रक्षणात मोठे पाऊल उचलले आहेच; परंतु रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे ते म्हणाले. (Environmental protection)

    ग्रामीण महिला व बचत गटांचा होणार विकास

    बांबू चारकोल साबण ही अतिशय उत्तम कल्पना असून याचे योग्य पद्धतीने डिजिटल मार्केटिंग करणे अपेक्षित असल्याचे सांगून स्पर्धेच्या या युगात उत्तम पॅकेजिंग व उत्तम वितरण याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. आदिवासी तसेच मानव विकास कक्षेत असलेल्या तालुक्यांमध्ये रोजगारासाठी शासनाकडे भरपूर निधी उपलब्ध असतो; त्या माध्यमातून महिला बचत गटांना ट्री गार्ड बनवण्याचे किंवा बांबू चारकोल साबण बनवण्याचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने दिल्यास निश्चितपणे या भागातील ग्रामीण महिलांचा व बचत गटांचा विकास होईल अशी अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (Environmental protection)

    अवश्य वाचा : चंद्रपुरात आम आदमी पक्षाच्या गांधीगिरी आंदोलनाची चर्चा

    राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या कडेला वापरता येतील बांबू ट्री गार्ड

    जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू ट्रीगार्डची निर्मिती करून वनविभागाने मोठे पाऊल उचलले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता आपण सातत्याने पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लागणाऱ्या वृक्ष लागवडी संदर्भात माहिती घेऊन त्यासाठी बांबू ट्री गार्ड वापरता येतील अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करावा, राज्याच्या बांधकाम विभागाला देखील असा प्रस्ताव आपण देऊ शकतो, अशा सूचना करत यासंदर्भात शिक्षण प्रशिक्षणाकडेही लक्ष देण्याचे सुचविले.

  • promise fulfilled : जनतेला दिलेला तो शब्द केला पूर्ण

    promise fulfilled : जनतेला दिलेला तो शब्द केला पूर्ण

    promise fulfilled नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू झाल्याने बल्लारपूर-चंद्रपुरातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला दिलेल्या या अनोख्या भेटीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात वंदे भारत एक्सप्रेस चे भव्य स्वागत

    Promise fulfilled पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, 16 सप्टेंबर  2024  रोजी हिरवी झेंडी दाखवत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचे लोकार्पण केले. या एक्स्प्रेससाठी  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वाधिक पाठपुरावा केला होता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना श्री. मुनगंटीवार प्रत्यक्ष भेटले. वंदे भारत सेवा सुरू करण्यासाठी सर्व अचडणी दूर व्हाव्या, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून  श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. या पाठपुराव्याला यश आले व वंदे भारत एक्स्प्रेस 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी चंद्रपूर येथून सायंकाळी 6.35 वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 7 वाजता धावली.

    मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी 7 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. तेव्हापासून ही सेवा सुरू व्हावी, यासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी प्रदान केली. या सेवेमुळे नागपूर ते हैदराबाद असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. (Promise fulfilled)

     चंद्रपुरात दोन थांबे : नागपूर ते हैदराबाद प्रवास करणाऱ्या नागरिकांना नवी सेवा देतानाच पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी वर्गाचेही हित जपले. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात दोन थांबे मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे लावून धरली. त्याचाच परिणाम म्हणून अतिजलद असलेल्या या अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्स्प्रेसला चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुंडम, काजीपेठ आणि त्यानंतर शेवटी सिकंदराबाद असे मोजकेच थांबे या गाडीला आहेत.

    वर्ध्याचेही हित : मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरसोबतच वर्धा जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत. सेवाग्रामवर त्यांचे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला श्री. मुनगंटीवार यांच्याच अथक प्रयत्नांमुळे सेवाग्राम येथेही थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासोबत त्यांनी वर्धा जिल्ह्यालाही दक्षिण भारताशी आणखी वेगाने जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

  • New Vande Bharat Train : 16 सप्टेंबर पासून चंद्रपुरात वंदे भारत ट्रेनचे आगमन

    New Vande Bharat Train : 16 सप्टेंबर पासून चंद्रपुरात वंदे भारत ट्रेनचे आगमन

    Vande Bharat Train नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी आणि त्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री आश्विनीकुमार वैष्णव यांना प्रत्यक्ष भेटत दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. सोमवारी १६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी ६.२० वाजता आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.४० वाजता नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

    Vande Bharat Train मुंबई-अहमदाबाद प्रमाणे नागपूर ते हैदराबाद करिता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ७ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यास नागपूरसह विदर्भातील सर्वसामान्यांसह विद्यार्थी,रुग्ण, व्यापारी,नागरिक या सर्वांना मोठा लाभ होणार असल्याचेही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले होते. पत्र व्यवहारानंतर या मागणीसंदर्भात ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनीकुमार वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसला मंजुरी प्रदान करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा विदर्भातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.सोमवारी १६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे सायंकाळी ६.२० वाजता आणि बल्लारपूर येथील जनतेकडून सायंकाळी ६.४० वाजता नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सक्प्रेसचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार देखील मानण्यात येईल, अशी माहिती भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच झेडआरयूसीसी मध्य रेल्वे झोन मुंबई चे सदस्य, एनआरयूसीसी रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली चे सदस्य श्री. अजय दुबे यांनी दिली आहे. (Vande Bharat Train)

    शेतकऱ्यांना वीज मोफत

    एकूण पाच थांबे, त्यातील दोन चंद्रपूर जिल्ह्यात
    अतिजलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत एक्सप्रेस ही २० डब्यांची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) हे ५७८ किलोमीटर अंतर ताशी १३० किमी वेगाने पार करेल. नागपूर ते सिकंदराबाद (हैदराबाद) वंदे भारत एक्सप्रेसला एकूण पाच थांबे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन थांबे चंद्रपूर जिल्ह्यातच देण्यात आले आहेत. ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने चंद्रपूर जिल्हावासीयांना ही भेट मिळाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.