Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads : रस्त्यात खड्डे, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

    Pothole free roads गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्‍यामुळे संपूर्ण जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून अपघातांची शक्‍यता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्ह्यातील रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले.

    समाजकारण : स्वखर्चातून गंगापूर गावात लावला आरो, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा पुढाकार

    या बैठकीला अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी दगडू कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले व सुनील कुंभे, मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. बोबडे, जिल्‍हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्री. पेंदे, मुख्‍य अभियंता विजय बोरीकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    Pothole free roads या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी रस्‍त्‍यांवरील खड्डयांचा आढावा घेतला. जिल्‍हा परिषदेनुसार जिल्‍हयात ओडीआर व व्‍हीआर चे 6 हजार किमीचे रस्‍ते आहेत, ज्‍यापैकी 450 किमी रस्‍त्‍यांचे नुकसान झाले आहे. याच्या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 5 कोटी रू. तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 115 कोटी रूपयांची गरज आहे. याकरिता राज्‍याच्‍या ग्रामविकास विभागाला ताबडतोब निधीची मागणी करावी असे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सिडीवर्कचे 39 रस्‍ते खराब झाले आहे, ज्‍याकरिता 1 कोटी 10 लक्ष रूपये लागतील असे अधिका-यांनी सांगीतले. हा निधी जिल्‍हा नियोजन समितीतून घ्‍यावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

    जिल्‍हयात राष्ट्रीय महामार्गाच्‍या गडचिरोली विभागाच्‍या अखत्‍यारित चंद्रपूर जिल्‍हयात 219 किमी तर नागपूर विभागात चंद्रपूर जिल्‍हयात 50 किमी रस्‍ता आहे. या रस्‍त्‍यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्‍याची दुरूस्‍ती कंत्राटदारांकडून पावसाने उसंत घेतल्‍यास 7दिवसात करून घेतल्‍या जाईल, असे त्‍या विभागातर्फे सांगण्‍यात आले. तसेच श्री. मुनगंटीवार यांनी मुल रोडवरील चिचपल्‍ली गावाजवळ ड्रेनेज सिस्‍टीमसाठी नाल्‍या करण्‍याच्‍या कामात विलंब झाल्‍याबद्दल अधिका-यांना खडसावले. त्‍यावर अधिका-यांनी त्‍या कामाचे अंदाजपत्रक बनवून वरिष्‍ठ अधिका-यांकडे पाठविले असल्‍याची माहिती दिली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार जिल्‍हयात 686 किमीचे राज्‍य रस्‍ते आहेत ज्‍यापैकी 70 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत, तर जिल्‍हयात एमडीआर चे 2116 किमीचे रस्‍ते असून त्‍यापैकी 555 किमी चे रस्‍ते खराब झाले आहेत ज्‍यापैकी 70 टक्‍के काम हे डब्‍ल्‍युबीएम पध्‍दतीने करणार आहे. आमच्‍या विभागाकडे 17.57 कोटी रूपये वार्षीक देखभालीसाठी मंजूर झाले आहेत त्‍यापैकी 74 ठिकाणी 2.28 कोटी रूपये तात्‍पुरता खर्च करण्‍यासाठी घेणार आहोत. हे काम पावसाने उसंत घेतल्‍यावर 15 दिवसात पूर्ण करण्‍यात येईल.

    चंद्रपूर महानगरपालिकेच्‍या अधिका-यांच्‍या माहितीनुसार शहरात 600 किमीचे रस्‍ते आहेत. त्‍यापैकी 400 किमीचे रस्‍ते हे सिमेंटचे आहेत. सध्‍या रस्‍त्‍याच्‍या तात्‍पुरत्‍या दुरूस्‍तीसाठी 40 लाख रूपयांची तर स्‍थायी दुरूस्‍तीसाठी 2 कोटी रूपयांचे तरतूद आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे अशा रस्त्यांना त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

    यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, बागला चौक ते बाबुपेठ ब्रिज हा रस्‍ता अतिशय खराब झाला असून त्‍याच्‍यासह गावातील मुख्‍य रस्‍ते सिमेंटचे करावेत, ज्‍यामध्‍ये उत्‍तम लायटींग करावी. पालकमंत्री यांनी बेलसनी येथील रस्‍ता न झाल्‍याबद्दल तिव्र नाराजी व्‍यक्‍त केली. या बैठकीत अनेक पदाधिका-यांनी अनेक ठिकाणी रस्ते खराब आहे यासंदर्भात माहिती दिली. श्री. मुनगंटीवार यांनी ताबडतोब रस्ते दुरुस्त करण्याच्या अधिकारी यांना सूचना दिल्या.

     बैठकीला विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह देवराव भोंगळे, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, अमर बोडलावार, बंडू गौरकार उपस्थित होते.

  • Sudhir Mungantiwar : लाडक्या बहिणी म्हणतात, धन्यवाद सुधीर भाऊ

    Sudhir Mungantiwar : लाडक्या बहिणी म्हणतात, धन्यवाद सुधीर भाऊ

    Sudhir mungantiwar महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यकरिता सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, विशेष म्हणजे लाभार्थी महिलांना 14 ऑगस्ट पासून योजनेचा पहिला हफ्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
    आज चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    अवश्य वाचा : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शब्द दिला आणि लगेच केला पूर्ण


    Sudhir mungantiwar प्रियदर्शिनी सभागृहात 17 ऑगस्टला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महिलांना योजनेच्या प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप करण्यात आले.
    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की महायुती सरकारने महिलांना या योजनेद्वारे मोठा आधार दिला आहे, आधी महिलांना पैश्यांची गरज भासली की त्यांना पती ची वाट बघावी लागत होती पण आता तसे होणार नाही, आज महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे.
    आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंगणवाडी ताई व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आभार मानले.

    योजना : लाडक्या बहीण योजनेचे वेबपोर्टल सुरू

    1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती, या योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला, 14 ऑगस्टला महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरू झाले, चंद्रपूर जिल्ह्यात हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

    लाभार्थी महिला म्हणतात की आधी सदर योजनेत नोंदणी करण्यासाठी त्रास झाला, अनेक समस्या उदभवल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बहिणींची अडचण लक्षात घेत विविध ठिकाणी आपल्या माध्यमातून मोफत अर्ज नोंदणी केंद्र सुरू केले, त्यातून आम्हाला दिलासा मिळाला व आमची नोंदणी लवकर झाली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी बहिणींना दिलेला शब्द पाळल्यामुळे आज आम्ही सर्व महिला त्यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमात सामील झालेलो आहे. अशी प्रतिक्रिया आज महिलांनी चंद्रपुरात आयोजित लाभ वितरण कार्यक्रमानंतर दिली.

  • majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 : लाडकी बहीण योजना होणार बंद?

    majhi ladki bahin yojana 2024 महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, सदर योजनेत महिलांना आधी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र सरकारने त्या अडचणी दूर केल्या.

    महत्वाचे : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

    majhi ladki bahin yojana 2024 14 ऑगस्ट पासून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये जमा झाले, ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज भरले त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, ज्यांनी नंतर अर्ज केला त्यांना पुढील दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.

    मात्र सध्या सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार आहे अशी अफवा सध्या जोर पकडत आहे, याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.

    काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार बघा

    राज्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेला कोट्यवधी महिलांनी पसंती दाखवीत अर्ज नोंदणी केली, 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये सरकार द्वारे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे.
    चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लक्ष 81 हजार अर्जाला मंजुरी दिली अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली, मात्र आता सदर योजना 31 ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू आहे, पण ही योजना कधीच बंद होणार नाही, 31 ऑगस्ट नंतर सुद्धा महिल या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज मंजूर झाल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

  • New Chandrapur : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

    New Chandrapur : नवीन चंद्रपुरात 10 घरांची योजना

    New Chandrapur चंद्रपूर जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी इरई नदीच्या बाजूस होत असलेले ‘नवीन चंद्रपूर’ नक्कीच जिल्ह्याच्या वैभवात भर टाकेल. म्हाडाने यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयमच्या धर्तीवर अद्यायवत  क्रीडा संकुल चंद्रपुरात करण्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल उज्वल भविष्याची नांदी आहे, असा विश्वास राज्याचे वने, संस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    News Chandrapur नवीन चंद्रपूरच्या निर्मितीसाठी ‘म्हाडा’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुरू आहे; त्यांच्याच संकल्पनेतून विकासकांची, विविध संस्थाचालकांची, उद्योग व्यवसायातील गुंतवणूकदरांची एक दिवसीय बैठक नागपुरातील वनामती सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : बाबूपेठ उड्डाणपूल महिन्याभरात होणार सुरू

    New Chandrapur पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वैविध्यपूर्णतेने संपन्न चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा गेल्या काही वर्षात वन अकादमी, सैनिकी शाळा, बोटेनीकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटल, एसएनडीटी महाविद्यालय यासारख्या वैशिष्टपूर्ण संस्था आणि पायाभूत सुविधांमुळे  देशाच्याच नव्हे तर  जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा विकास होत असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर शहरात वाढते नागरिकीकरण लक्षात घेता परिसरातील जंगल क्षेत्राचा विचार करता शहराच्या विकासाला मर्यादा आहेत; म्हणूनच कमी दरात घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 10 हजार घरांची योजना महाप्रीत सोबत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    राजकीय : गुन्हेगारांसाठी फोन कराल तर….पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    त्यापैकी 3600 घरे करण्याबाबतची बैठक नुकतीच झाली असल्याचे सांगत इतर सर्व पायाभूत सोयी सुविधा, शासकीय कार्यालये, इमारती यासाठी आग्रह करत असताना या भागात 100 एकर मध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम प्रमाणेच अद्ययावत स्टेडीयम करण्याचा माझा संकल्प होता, तो म्हाडाने जागा उपलब्ध करून पूर्ण केला याचे विशेष समाधान आहे. नवीन चंद्रपूरचा प्रकल्प या “इन्व्हेस्टर समिट” मुळे वेगाने मार्गी लागेल. म्हाडाने यासाठी नव्याने आराखडा तयार केला असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली असल्याने गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. 

    काय आहे नवीन चंद्रपूर ची संकल्पना? : साधारणत: 90 च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या सामावून घेण्यासाठी चंद्रपूर शहराच्या आसपास जागाच नसल्याने व आसपासचा परिसर जंगलांनी व्यापल्याने सुविधांवर ताण पडू लागला. त्यामुळे 1998 साली नवीन चंद्रपूर वसविण्याचा निर्णय घेण्यात आला व सूत्रे म्हाडाकडे देण्यात आली. त्यासाठी 139.71  हेक्टर क्षेत्र आरक्षितही केले. शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, क्रीडांगण, निवासी-अनिवासी संकुले अशा अनेक सुविधांसाठी भूखंड आरक्षित करून 7 लाख 13 कोटी निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र मात्र मधल्या काळात हा विषय प्रलंबित राहिला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यासाठी आग्रही असल्याने त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. अखेर  ‘म्हाडा’ ने  आराखडासाठी सल्लागाराची नियुक्ती करून कामाला गती दिली.

    नवीन चंद्रपूर प्रकल्पासाठी मंगळवारी नागपुरात झालेल्या बैठकीत  ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधला व चर्चा केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर, चंद्रपुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी, काही नागरिक बैठकीला उपस्थित होते. यावेळी रस्ते, वीज, पाणी यासह अन्य सुविधा कशा विकसित करायच्या, नवीन चंद्रपुरात स्थानिकांना काय हवे आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

  • Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur : गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणे बंद करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यापासून गोळीबार व गंभीर गुन्ह्याचे सत्र सुरू आहे, शांत असलेल्या या जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळी युद्धाने अशांती पसरली आहे, आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठे गुन्हे सहज घडत आहे, पोलीस प्रशासन सदर गुन्हे नियंत्रित करण्याबाबत अपयशी ठरला आहे.

    महत्वाचे – पीकविमा कंपनीला हायकोर्टाने बजावली नोटीस

    Chandrapur 2 दिवसांपूर्वी कुख्यात गुंड हाजी सरवर शेख यांची बिनबा गेट समोरील हॉटेल शाही दरबार येथे 5 जणांनी मिळून गोळ्या झाडत हत्या केली, 5 युवक चंद्रपुरात 4 बंदुका घेऊन शहरात फिरत असताना पोलीसांना याबाबत थांगपत्ता का लागला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या गोळीबाराच्या घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहे, चंद्रपूर शहरात 2, राजुरा व बल्लारपूर येथे प्रत्येकी 1 घटना घडली असून आतापर्यंत टोळी युद्धातून दोघांनी जीव गमावला आहे.

    राजकीय : बाबूपेठ वासीयांची प्रतीक्षा संपली, उड्डाणपुलाचे काम होणार पूर्ण, किशोर जोरगेवार यांनी आणला निधी

    विशेष बाब म्हणजे हाजी ची हत्या झाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात हाजी समर्थक व हाजी चे राजकीय समर्थकांनी गर्दी केली होती, जनप्रतिनिधी आता गुंडासमोर लोटांगण कसे घालतात हे यातून सिद्ध झालेले आहे, जनप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी असतो मात्र गुंडांसाठी रुग्णालयात गराडा घालणे म्हणजे जनतेला हा काय संदेश जात आहे.

    गुन्हेगारीचा कॅन्सर वाढू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

    या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुंडांना राजकीय संरक्षण देणे बंद करा असे निर्देश पोलीस विभागाला दिले आहे.

    चंद्रपुरातील टोळीयुद्धातून गोळीबाराच्या घटनेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले गेले. ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारी टोळ्या व गुंडांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात येणारे राजकीय नेत्यांचे कॉल्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या. गुन्हेगारीचा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात जाऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

  • Chandrapur District vidhansabha : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार

    Chandrapur District vidhansabha : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार

    Chandrapur District vidhansabha तळागाळातील कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातूनच भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याने आम्ही हिंमत हरलेलो नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून चंद्रपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका फडकवावी, असे आवाहन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Chandrapur District vidhansabha चंद्रपूर येथील स्व. ऍड.दादाजी देशकर सभागृहात महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यासोबतच भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सदस्य, जिल्हा ग्रामीण महामंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

    14 ऑगस्टला मनपा समोर अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विशेषत: काँग्रेसने लोकांमध्ये असत्य पसरविले. लोकांची दिशाभूल केली. आता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या घरापर्यंत पोहचून सत्य पोहोचवावे. कोणताही पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर मोठा होतो. भाजपही कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाचे कार्य करताना कार्यकर्त्यांना कौटुंबीक आदी काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठीही मदत करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.’

    एकापाठोपाठ महायुती सरकारने वेगवेगळ्या जनहिताच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. आपल्या चेलेचपाट्यांना योजनांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करायला लावल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता मिळविण्याच्या नादात सामान्यांचे नुकसान करीत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना बंद पडणार नाहीत, असेही ते म्हणाले.

    पूजा तू पुन्हा धावशील

    भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आज जिल्हास्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे हित साधणाऱ्या सर्वच सूचनांचे स्वागत करण्यात येईल. या सूचनांच्या आधारावर जिल्ह्यातील भाजपला पुढील वाटचाल करण्यास नक्कीच मदत होईल, असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

    महाविकास आघाडी सुडाने पेटली आहे

    मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. पण आलेच तर महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा फेसबूक लाइव्ह मुख्यमंत्री येतील. महाविकास आघाडीमध्ये सगळेच मंत्री एकच विभाग मागतील. हा विभाग असेल जेल विभाग. हे सगळे लोक याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक या सुडाने पेटलेले आहे. त्यामुळे जेल हा एकच विभाग महाविकास आघाडीमध्ये काम करणारा असेल, असा टोला ना. श्री. मुनगंटीवार यांनी लगावला.

    लोकांपर्यंत सत्य पोहोचवा

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येताच विरोधकांना सरकारच्या तिजोरीची चिंता वाटत आहे. जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. औरंगजेबाची बाजू घेणाऱ्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस धडपड करीत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकांशी खोटे बोलण्याचे पाप केले. महायुतीच्या सरकारने, केंद्रातील नरेंद्रजी मोदी सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. या योजनांबद्दलही काँग्रेस भ्रम पसरवित आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.

  • fire fighting bikes : चंद्रपूर जिल्ह्यात येणार अग्निशमन बाईक

    fire fighting bikes : चंद्रपूर जिल्ह्यात येणार अग्निशमन बाईक

    fire fighting bikes राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्याला 20 अग्नीशमन बुलेट (बाईक) मिळाल्या आहेत. लवकरच ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते या बाईक्सचे लोकार्पण होईल.

    अवश्य वाचा : पप्पू देशमुख यांचा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांवर अचूक निशाणा

    Fire fighting bikes अरुंद गल्ली-बोळ्यांमध्ये तसेच झोपडपट्यांमध्ये आगीच्या घटना घडल्यास त्या ठिकाणी अग्नीशमन वाहने पोहोचू शकत नाहीत. अश्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी होते. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आग विझविणाऱ्या बुलेट्स (बाईक) उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना आग विझविणाऱ्या एकूण 20 बाईक्स देण्यात आल्या आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांनी ही यंत्रणा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

    पालकांसाठी महत्वाचे : 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी

    वॉटर मिस्ट रॅपिड फायर फायटिंग बाईक्स आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स अश्या दोन प्रकारच्या दुचाकी आहेत. यामध्ये भिसी, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, मुल, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सावली आणि सिंदेवाही या शहरांसाठी प्रत्येकी 1 वॉटर मिस्ट्र रॅपिड फायर फायटिंग बाईक्स (दुचाकी) देण्यात येणार आहेत. तर बल्लारपूर, वरोरा आणि भद्रावतीसाठी प्रत्येकी 2 कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स (दुचाकी) देण्यात आल्या आहेत.

    असा होणार उपयोग
    छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीच्या ठीकाणी तातडीने वापरता येणारी प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून या दुचाकीचा अत्यंत प्रभावी वापर होणार आहे. तेल व गॅसमुळे लागलेली तसेच विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आगही या दुचाकीद्वारे विझवता येणार आहे. ज्या ठिकाणी फायर टेंडरच्या गाड्या पोहोचू शकणार नाहीत, अशा अरुंद गल्ली बोळात तसेच झोपडपट्टीमध्येही या दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणा-या आगीवर 3 ते 12 मीटर अंतरावरुन तसेच 30 फूट उंचीपर्यंत मिस्ट (Mist) स्वरुपात फवारा मारु शकतात. यामध्ये पाण्यासोबतच रासायनिक फोमचा वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे.

    ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
    चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या एकूण २० बाईक्सचे लोकार्पण ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी करावे, अशी विनंती मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला या बाईक्स देण्यात येणार आहेत.

  • Sudhir Mungantiwar : कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मुनगंटीवार झाले भावुक

    Sudhir Mungantiwar : कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मुनगंटीवार झाले भावुक

    sudhir mungantiwar आज वाढदिवसाच्या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे. लोकांचे प्रेम मिळत आहे. या प्रेमाने आपण भारावून गेल्याचे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथील बालाजी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी ते बोलत होते.

    महत्त्वाचे : गडचांदूर बॉम्ब प्रकरणी जुळे भाऊ ताब्यात

    Sudhir mungantiwar ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भगवान बालाजीची आपल्या परिवारावर कृपा आहे. महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नसेल असा बहुमान भगवान बालाजीने आपल्या परिवाराला दिला आहे. आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारने माझ्या अर्धांगिनीची नियुक्ती तिरूपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी केली होती . यातून भगवान बालाजीची सेवा करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. केवळ मतदारसंघासाठीच नव्हे तर राज्याच्या हितासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. जनसेवेचे व्रत आपण घेतले आहे. हे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करू, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    अवश्य वाचा : लोकसभा पावसाळी अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांचे जोरदार भाषण

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बल्लारपूर,दुर्गापूर, लखमापूर येथे महाआरती करण्यात आली. मूल येथे रूग्‍णांना फळे व भेटवस्‍तुंचे वाटप करण्यात आले. कार्यकर्ता स्‍नेहमिलन घेण्यात आले. पुरग्रस्‍त भागातील नागरिकांना अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वाटप करण्‍यात आले. पोंभूर्णा येथे विविध आजारांवर मोफत उपचार करण्‍यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्‍यात आले. राजुरा येथेही महाआरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. काशीनाथ सोमा टेकाम यांचा पुरात बुडाल्याचे मृत्यू झाला. यांच्‍या पत्‍नी सिंधुबाई टेकाम व मुलगा सुनिल टेकाम यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते चार लाख रूपयांचा सानुग्रह निधी प्रदान करण्‍यात आला. चंद्रपूर महानगर भाजपा तर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. जिल्हाभर कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. वाढदिवसाच्या दिवशीही जनसेवेशी संबंधित उपक्रम राबवित ना. श्री. मुनगंटीवार यांनी लोकनेता कसा असतो, याचा परिचय पुन्हा एकदा दिला.

  • Sudhir mungantiwar birthday : वाढदिवसाला जल्लोष नाही तर सेवा करा – हरीश शर्मा

    Sudhir mungantiwar birthday : वाढदिवसाला जल्लोष नाही तर सेवा करा – हरीश शर्मा

    Sudhir mungantiwar birthday 30 जुलै रोजी राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस, दरवर्षी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो मात्र यंदा त्यांनी जल्लोष करू नका असे आवाहन कार्यकर्त्याना केले आहे अशी माहिती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांचा धाक राहिला की नाही? आमदार किशोर जोरगेवार यांचा सवाल


    Sudhir mungantiwar birthday संतकृपा हॉटल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, यंदा राज्य सहित जिल्हयात अतिवृष्टी मुळे शेतकरी व नागरिक यांचे मोठे नुकसान झाले आहे, इतकेच नव्हे तर अजूनही पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे माझ्या वाढदिवसाला घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे व 30 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत सर्वांनी सेवा सप्ताह म्हणून साजरा करावा.
    यामध्ये पूर ग्रस्तांची मदत, आरोग्य शिबीर व नागरिकांसाठी धार्मिक स्थळी महा आरतीचे आयोजन करावे असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले अशी माहिती हरीश शर्मा यांनी दिली आहे.

    अवश्य वाचा : मुसळधार पावसाचा इशारा

    जिल्ह्यात अजूनही पावसाने हाहाकार माजविला आहे, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने यंदा चा वाढदिवस त्या पूरग्रस्त नागरिकांची सेवा करीत सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.

  • Sudhir Mungantiwar : नागरिकांनो घाबरू नका, पूर पीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar : नागरिकांनो घाबरू नका, पूर पीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

    Sudhir mungantiwar गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अश्यात चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. आज (दि.24) पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपिडीतांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभा राहील, असा शब्द राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्याच भाषणात संसद गाजवली

    Sudhir mungantiwar चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधतांना श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,  उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार विजय पवार,  पोलिस निरीक्षक सुनील गाडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, संध्या गुरुनुले, डॉ.मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, अशोक आलाम, सोहम बुटले आदी उपस्थित होते.

    पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पूरपीडितांना चहा-बिस्कीटसह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे. नागरिकांना तेल,  मीठ,  तिखट,  धान्य, कणीक यासोबतच कपडे देण्यात येईल. तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था करावी. चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबाना पहिली मदत म्हणून 5 हजार तात्काळ जमा होणार आहे. या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ. तसेच पुल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

    महत्त्वाचे : मूल तालुक्यातील बेंबाळ येथे बँक ऑफ इंडियाचे इंटरनेट बंद, शेतकऱ्यांच्या रांगा, आणि शिवसेनेची एंट्री

    Sudhir mungatiwar पालकमंत्री म्हणाले, ‘पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. तसेच पावसानंतर साथरोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी. तसेच नालेसफाई, बोअरीग, विहीर आदींमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी. ज्या नागरिकांचे धान्य, भांडे, बकऱ्या, बैलजोडी वाहून गेली, त्यांची यादी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    पंचनाम्यापासून एकही जण सुटणार नाही : ज्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्याचे पंचनामे फोटो आणि व्हीडीओ घेऊन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसान झाले पण घर पडले नाही, आणि दोन दिवसांनी कदाचित ते घर पडू शकते, अशाही घरांचे पंचनामे करावे. पंचनाम्यापासून एकही घर सूटणार नाही, याची काळजी घ्यावी. गावात पंचनामे झाल्यानंतर गावकऱ्यांनीच कोणी सुटणार नाही याची खात्री करावी. तसेच पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अश्या सूचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. 

    चिचपल्ली येथे 224 तर पिंपळखुट येथे 109 लोकांचे पैसे जमा होण्यास सुरवात : चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे पूरपीडितांसोबत संवाद साधत असतानाच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. लगेच खात्यात पैसे जमा होत असल्याचे मॅसेज नागरिकांकडून प्राप्त झाले, असे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले. चिचपल्ली येथील 224 तर पिंपळखुट येथील 109 लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

    अवश्य वाचा : 2 देशी कट्टे आणि चाकूने वार, राजुरा शहरात असा घडला गोळीबार

    धनादेशाचे वाटप : पुरामध्ये बकऱ्या आणि बैलजोडी वाहून गेलेल्या नागरिकांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात चिचपल्ली येथील देवरात मत्ते यांना 17200 रुपयांचा धनादेश, बाबुखान पठाण यांना 8 हजार रुपयांचा धनादेश, वसंत मडावी यांना 8 हजार, भाऊराव दुर्योधन यांना 16 हजार रुपये, प्रमोद आडे यांना 60 हजार रुपये तर दिनेश लाकडे यांना 84 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सोबतच पिंपळखुट येथील अभिमन्यू आत्राम यांना 16 हजार रुपयांचा आणि महादेव आत्राम यांना 28 हजार 600 रुपयांचा धनादेश देण्यात आला.