Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • New cricket kit : सुधीरभाऊ युथ क्लबद्वारे क्रिकेट संघांना १८५ किटचे वितरण

    New cricket kit : सुधीरभाऊ युथ क्लबद्वारे क्रिकेट संघांना १८५ किटचे वितरण

    cricket kit बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा या भागातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याची क्षमता आहे. फक्त या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा सदैव तोच प्रयत्न राहिला आहे. या भागातील क्रिकेटपटूंना सर्व सुविधा, उत्तम प्रशिक्षण आणि मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचा मी सदैव कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. Sudhir mungantiwar

    cricket kit सुधीरभाऊ युथ क्‍लब बल्लारपूरद्वारे आयोजित क्रिकेट स्‍पर्धेत सहभागी झालेल्या संघांना ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते किटचे वितरण करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या १८५ संघांना किट वितरण करण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश भैय्या, मनिष पांडे, रणन्जय सिंग, येलया दासरफ, राजेश दासरवार, सतिश कनकम, प्रमोद रामीलावार, अब्दुल आबिद, पिंटु देउळकर, मनोज खेंगर, बबलु गुप्ता, प्रभदिप सचदेवा, आशिष चावडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    राज्यातील 19 ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित समावेश

    महत्त्वाचे : चंद्रपूर शहरातील हाय-फाय ऑटो स्टॅण्ड

    या कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार यांनी खेळाडूंसोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘आपल्या येथील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आले. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर ते आकाशाला गवसणी घालतील असा मला ठाम विश्वास आहे. मिशन शौर्यच्या निमित्ताने मी एक प्रयत्न करून बघितला. आदिवासी समाजातील १७-१८ वर्षाचे तरुण, ज्यांनी कधी प्रत्यक्ष विमान बघितले नाही, जे कधी विमानात बसले नाही, त्यांनी आठ महिन्यांच्या प्रशिक्षणात एव्हरेस्टवर २९ हजार २९ फुटांवर चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडा रोवला. या कामगिरीचे विश्वगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देखील कौतुक केले. त्यामुळे आपल्या येथील क्रिकेटपटूंना थोडी संधी दिली, व्यासपीठ दिले आणि उत्तम प्रशिक्षण मिळाले, तर ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी करू शकतील.’ cricket kit

    मतदारसंघाला पुढे नेताना रस्ते, कॉलेज, पाणीपुरवठा, विद्यापीठ, बस स्टॅण्ड, पोलिस स्टेशन अशा सर्व सुविधा होत आहेत. त्या आवश्यकही आहेत. पण त्याचवेळी खेळाच्या मैदानावर देखील माझ्या मतदारसंघातील तरुण पुढे गेले पाहिजेत, असाही माझा आग्रह आहे. त्यासाठी मी संकल्पच सोडला आहे, असेही त्यांनी नमूद केले. १ ते १२ जानेवारी या कालावधीत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर, मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर येथे ही स्पर्धा होईल. ग्रामीण भागातील खेळाडू यात सहभागी होतील.१ लक्ष रुपये प्रथम पुरस्कार असणार आहे. आता फक्त पुढील ९० दिवस मैदानांमध्ये चांगली तालीम करा.जे खेळाडू उत्तम कामगिरी करतील त्यांना चांगली संधी मी उपलब्ध करून देईल, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

    अवश्य वाचा : महाकाली महोत्सवाचा समारोप

    एम फॉर मुल, बी फॉर बल्लारपूर, पी फॉर पोंभुर्णा!
    मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये माझे मित्र आमदार आशीष शेलार पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. आपल्या येथील चांगल्या खेळाडूंना कशी संधी देता येईल, यावर विचार होणार आहे. त्यांना मी सांगितले आहे की, ‘एम फॉर मुंबईच नाही तर एम फॉर मुल, पी फॉर पुणेच नाही तर पी फॉर पोंभुर्णा आणि बी फॉर बारामतीच नाही तर बी फॉर बल्लारपूरचाही विचार नक्कीच व्हायला पाहिजे.’ cricket kit

    गावसकर, तेंडुलकर, रोहित शर्मा घडतील
    बल्लारपूरमधील स्टेडियम छान झाले आहे. आता तर क्रिकेट अकादमी तयार करण्याचा विचार करतो. भविष्यात या मतदारसंघातील क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा होईल, तो दिवस फार लांब नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • Maharashtra Telugu Sahitya Academy : महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमीची स्थापना केल्याबद्दल तेलगू फेडरेशन ने मानले मुनगंटीवारांचे आभार

    Maharashtra Telugu Sahitya Academy : महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमीची स्थापना केल्याबद्दल तेलगू फेडरेशन ने मानले मुनगंटीवारांचे आभार

    Maharashtra Telugu Sahitya Academy राज्य सरकारने ‘महाराष्ट्र तेलुगु साहित्य अकादमी ‘ स्थापना केली असून त्याबद्दल फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ने नुकतेच मंत्रालयात भेट घेत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

    Maharashtra Telugu Sahitya Academy तेलगू फेडरेशनचे अध्यक्ष श्री.जगनबाबू गंजी यांनी सांगितले की ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या तेलगू साहित्य अकादमीमुळे राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या तेलगू भाषिकांना एक हक्काचे साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. राज्यात या आधी पासूनच हिंदी, सिंधी आणि गुजराती  या तीन भाषिक साहित्य अकादमी कार्यरत आहेत. त्यात आता तेलगू आणि बंगाली साहित्य अकादमीची भर पडली आहे.

    महत्त्वाचे : निसर्ग पर्यटन केंद्राला रतन टाटा यांचं नाव

    तेलगू अकादमीच्या स्थापनेत पुढाकार घेतल्याबद्दल ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार फेडेरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (एफ-टॉम) ने नुकताच मंत्रालयात केला. यावेळी अध्यक्ष जगनबाबू गंजी यांच्यासोबत प्रधान सरचिटणीस अशोक कांटे, संगेवानी रवी  आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी बोलताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलगू आणि मराठी या भाषा भगिनी आहेत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत तेलगू भाषकांचाही मोठा वाटा आहे, असे सांगितले. तेलुगू मराठी भाषेचे सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक आहेत, असे सांगून ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू तंजावरचे राजे सरफोजीराजे भोसले यांनी तेलगूतूनही अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहेत, याकडे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश या शेजारच्या राज्यात असलेल्या साहित्य परिषदेसारख्या संस्थांसोबत, तेलुगु आणि मराठी भाषिकांच्या विचारांची देवाण घेवाण करण्यात ही नवीन तेलगु अकादमी सहाय्यभूत ठरेल. Maharashtra Telugu Sahitya Academy

    एफ-टॉम चे अध्यक्ष श्री जगनबाबू गंजी यावेळी म्हणाले की तेलगू भाषक समाजाचे मुंबईच्या उभारणीत, उद्योगधंद्यात,  सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. मुंबईतल्या अनेक ऐतिहासिक इमारती तेलुगु भाषिकांनी उभारल्या आहेत. या संदर्भात मनोहर कदम यांच्या पुस्तकात नोंदी नमूद आहेत. सामाजिक चळवळीत, स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक तेलुगु भाषिक शहीद झाले आहेत, असे ते म्हणाले. बालगंधर्वांची अनेक नाटके तेलुगु भाषेत भाषांतरीत करून सादरही झाली आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली. तेलगु अकादमीच्या स्थापनेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांचेही आभार मानले आहेत.

    नवीन तेलगू साहित्य अकादमी वर लवकरच अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.


  • New Moharli gate tadoba : निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव – मुनगंटीवार यांची घोषणा

    New Moharli gate tadoba : निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव – मुनगंटीवार यांची घोषणा

    Moharli gate tadoba ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, अशी भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    Moharli gate tadoba मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकॅडमीचे संचालक एम.एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू, उपसंचालक (बफर) पियुषा जगताप, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रसिध्द डॉक्टर तथा निसर्गप्रेमी रमाकांत पांडा, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, अरुण तिखे, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, पद्मापूरच्या सरपंच आम्रपाली अलोने आदी उपस्थित होते.

    राजकिय : घर तिथं युवासैनिक, युवा सेना चंद्रपुरात राबविणार अभियान

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज अतिशय आनंदाची बाब आहे. चंद्रपूर नेहमीच पुढे राहावा, असाच आपला प्रयत्न असतो. वाघ हा पर्यावरणाचा मित्र असून ताडोबा ही आपल्याला परमेश्वराची देण आहे, त्याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. वाघाचे संरक्षण केले म्हणूनच जिल्ह्यात वाघ वाढले. चंद्रपूर पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर आपण चंद्रपुरात सफारी करीत आहोत. सफारीसाठी आलेले पर्यटक सैनिक शाळा, आर्मी म्युझियम, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, एसएनडीटी विद्यापीठ, आदींचा आनंद घेऊ शकणार आहेत. चंद्रपुरात वाघांची संख्या सर्वाधिक आहे.’
    चंद्रपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. मोहर्ली, ताडोबा, बफर झोन, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने काम करीत आहोत. तसेच प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपण सर्वजण मिळून ताडोबाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करुया. यासाठी सर्व वनमजूर, वन अधिकारी, वनरक्षक, वनसेवक, रोजंदारी करणारे कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. (Moharli gate tadoba)

    जिप्सी असोसिएशनला 25 लक्ष देणार : वन विभागात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एफडीसीएमच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना राहिलेला फरक देण्यात आला आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन देण्यासाठी आपण आग्रही भूमिका मांडली. तसेच ताडोबा फाउंडेशन मधून जिप्सी असोसिएशनला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिप्सी असोसिएशनची वागणूक चांगली असली तरच पर्यटकांचे समाधान होईल व जिल्ह्याचे नाव उंचावेल.

    चंद्रपुरात दिक्षाभूमिसाठी एल्गार मोर्चा

    निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव : प्रसिद्ध उद्योगपती स्व. रतन टाटा यांचे चंद्रपूरशी व्यावसायिक नाते नाही. तरीही त्यांचे चंद्रपूरसोबत वेगळेच ऋणानुबंध होते. रतन टाटा यांनी राज्यपालांच्या राजभवनात मोर संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला. (ratan tata) तसेच त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी 25 कोटी दिले. सरकार आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर येथे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभे राहत आहे. त्यासाठी टाटांनी 100 कोटीची देणगी दिली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आर्किटेकसाठी टाटा यांनी 3 कोटी दिले. कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी येथील 90 गावे दत्तक घेतली. स्व. रतन टाटा यांचे स्मारक चंद्रपुरात करण्यात येणार आहे, अशी माहिती ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्याचवेळी निसर्ग माहिती केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली. (Ratan tata)

    ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांना धनादेश वाटप : यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांना प्रत्येकी 3 लक्ष 50 हजारांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात खुंटवडा, भोसरी, काटवल, वडाळा, कोकेवाडा, बिलोडा, किन्हाळा, सोनेगाव, आष्टा, निंबाळा, चेकबोर्ड, मामला, हळदी, अर्जुनी, वायगाव, झरी, घंटाचौकी, दुधाळा, मोहर्ली, घोडेगाव, मुधोली, आगरझरी, सितारामपेठ, भांबेरी आदी गावांचा समावेश होता. (Ratan tata)

    गुराख्यांना स्मार्ट स्टिकचे वाटप : यावेळी गुराख्यांना वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मार्ट स्टिकचे वाटप करण्यात आले. यात मारुती जांभुळे, गणेश श्रीरामे, बुद्रुक कुलसंगे, अंकुश केदार, नरेंद्र डडमल, प्रकाश कन्नाके, लक्ष्मण तोफे, जयंत गडमल, विश्वनाथ मरसकोल्हे, मारुती आत्राम, राहुल आत्राम, वासुदेव सिडाम, परशुराम मडावी आदींचा समावेश होता. तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या हस्ते अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

  • Needly sos app : मिस कॉल द्या आणि मिळवा सुरक्षेची हमी

    Needly sos app : मिस कॉल द्या आणि मिळवा सुरक्षेची हमी

    Needly sos app राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना पुण्यातील आयटी तज्ञ यांच्या वतीने महिला, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पुरुष आणि मुलांसाठी NEEDLY SOS ऍप ची सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत 11 ऑक्टोबर रोजी भाजपतर्फे डॉ.मंगेश गुलवाडे व प्राचार्य मुरलीधर भुतडा यांनी सदर ऍप बाबत माहिती दिली.

    महत्त्वाचे : चंद्रपूर मुख्य बस स्थानकाचे आज उदघाटन

    Needly sos app मात्र प्ले स्टोर वरून ऍप साठी शुल्क मोजावे लागणार आहे पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही ऍप मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना 9168725125 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल करावा लागणार त्यानंतर सदर ऍप ची लिंक मोबाइल मध्ये येणार असून त्यानंतर ती ऍप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावी लागणार.

    सहकारी सूत गिरण्यांना महायुतीचे बुस्ट


    महिला व मुलींची सुरक्षेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उपलब्ध करण्यात आली आहे, याबाबत प्राचार्य भुतडा म्हणाले की सदर निडली ऍप चा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातून करण्यात येत आहे, महिला सुरक्षेसंदर्भात भारतीय जनता पार्टी एक एजेंडा म्हणून महिला सुरक्षेच्या बाबतीत गंभीर आहे.


    महिला व मुली संकटात सापडल्या तर त्यांना मोबाईल मधून आपण ऍप द्वारे समाविष्ट केलेल्या 4 मोबाईल क्रमांकावर लोकेशन पाठविण्यात येईल, आपत्कालीन संदेश, अज्ञात व्यक्तीचा फोटो, विशेष म्हणजे सदर ऍप मध्ये राज्यातील सर्व पोलीस स्टेशनचे क्रमांक सुद्धा समाविष्ट केले आहे अशी माहिती भुतडा यांनी दिली.

  • bus stand chandrapur : आज होणार बस स्थानकाचे उदघाटन

    bus stand chandrapur : आज होणार बस स्थानकाचे उदघाटन

    bus stand chandrapur पावसाच्या पाण्याच्या गळतीने नुकतेच प्रकाश झोतात आलेले चंद्रपुरातील मुख्य बस स्थानकाचे आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

    Bus stand chandrapur दोन दिवसांपूर्वी पावसाने मुख्य बस स्थानकाला गळती लागल्याचा प्रकार जनविकास सेनेने उघडकीस आणला होता, विशेष म्हणजे बस स्थानक अजूनही पूर्णपणे तयार झालेले नाही.

    अवश्य वाचा : सतत पाठपुरावा आणि दीड महिन्यात मागणी पूर्ण

    उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले, गडचिरोलीखासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, संचालक माधव कुसेकर व मनपा आयुक्त विपीन पालिवाल उपस्थित राहणार आहे. Sudhir mungantiwar

    आयोजित उदघाटन कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकांत गभने, प्रादेशिक व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता शीतल गोंड व विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे.

    राम भक्तांसाठी आनंदाची बातमी

    अजूनही मुख्य बस स्थानकाचे काम काही प्रमाणात बाकी आहे, बस स्थानकातील गाळे सुद्धा हस्तांतरित करण्यात आले नाही, मात्र एका राजकीय पदाधिकाऱ्याला एक गाळ देण्यात आले आहे.

  • Chandrapur taluka : मुनगंटीवार यांचा पाठपुरावा आणि अवघ्या दीड महिन्यात मागणी पूर्ण

    Chandrapur taluka : मुनगंटीवार यांचा पाठपुरावा आणि अवघ्या दीड महिन्यात मागणी पूर्ण

    chandrapur taluka राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केवळ दीड महिन्यात महावितरणच्या नवीन उपविभागाला मंजुरी मिळाली आहे.

    महत्त्वाचे : इतकी घाई होती तर, इतके वर्ष काय केलं? – आमदार जोरगेवार यांचा भाजपला टोला

    Chandrapur taluka महावितरणच्या चंद्रपूर मंडळांतर्गत सध्याच्या चंद्रपूर ग्रामीण उपविभागातील घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखेची पुनर्रचना करून नवीन ताडाळी उपविभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. महावितरणच्या तडाळी उपविभागासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच 16 ऑगस्ट 2024 रोजी पत्र लिहिले होते. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच केवळ दीड महिन्यात ताडाळी उपविभागाला मंजुरी मिळाली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर शहरात ई-बस चार्जिंग स्टेशन

    महावितरणच्या चंद्रपूर विभागांतर्गत ग्रामीण उपविभागात घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखा अस्तित्वात असून घुग्घुस शाखेअंतर्गत दोन 33 केव्ही उपकेंद्र, 31 गावे आणि 16122 ग्राहक जोडले आहेत. तर चंद्रपूर ग्रामीण शाखेअंतर्गत चार उपकेंद्रे, 46 गावे आणि 12764 इतके ग्राहक जोडले आहेत. दोन्ही शाखा कार्यालयांचे भौगोलिक क्षेत्र अतिशय मोठे असून बराचसा भाग जंगलव्याप्त आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज विषयक तक्रारींचे निवारण करण्यास विलंब होतो. तसेच कामावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असून ग्राहकांना जलद सेवा पुरविण्यास अडचण निर्माण होते. Chandrapur taluka

    उत्तम ग्राहकसेवेसाठी
    ताडाळी शाखा कार्यालय निर्माण झाल्यास घुग्घुस आणि चंद्रपूर ग्रामीण या शाखा कार्यालयांचे क्षेत्रफळ कमी होईल व कामामध्ये सुसंगती येण्यास मदत होईल. परिणामी ग्राहकांना चांगली सेवा देता येईल आणि वीज गळती, वीज चोरी, महसूल वसुली इत्यादी कामे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महावितरण कंपनीचा ताडाळी उपविभाग निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केवळ दीड महिन्यात ताडाळी शाखा कार्यालय निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहे. Sudhir mungantiwar

    असा राहणार ताडाळी उपविभाग
    सद्यस्थितीत घुग्घुस शाखा व चंद्रपूर ग्रामीण शाखा मिळून एकूण 28886 ग्राहक आहेत. महावितरणने प्रसारीत केलेल्या मानकांप्रमाणे प्रत्येक शाखेत 7500 ग्राहक असणे आवश्यक आहे. (Sudhir mungantiwar) ताडाळी उपविभाग निर्माण झाल्यास घुग्घुस शाखेमध्ये 10490 ग्राहक, चंद्रपूर ग्रामीण शाखेमध्ये 9660 ग्राहक तर नवीन ताडाळी शाखेमध्ये 8736 ग्राहकसंख्या राहणार आहे. तसेच ताडाळी शाखेमध्ये एकूण गावांची संख्या 35 तर संलग्न उपकेंद्राची संख्या 2 राहील.

  • Industrial Estate : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला हा निर्धार

    Industrial Estate : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला हा निर्धार

    Industrial Estate चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्‍या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्‍त्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूरचे आयोजन केले गेले. या ॲडव्हान्टेज चंद्रपूर मध्ये विविध कंपन्यांनी सामंजस्य करार (MOU) केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्‍या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    Industrial Estate चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पना पलीकुंडवार, उपाध्यक्ष पदमकुमार नायर, राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगोट्टूवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    राजकीय : भाजपची माजी नगरसेविका कांग्रेसच्या गळाला

    इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर एमआयडीसी स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, त्यादृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. (Industrial Estate)

    राजकिय : 12 कोटीच्या मुख्य बस स्थानकाला गळती

    या जिल्ह्यातील महामार्ग, समृद्धी महामार्ग पोंभुर्णा ते गडचांदूरपर्यंत जोडण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल यादृष्टीने कार्य केले जात आहे. तेलंगणा राज्याशी व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नागपूर-हैदराबाद ही वंदे भारत ट्रेन जोडण्याचे कार्य केले. वंदे भारत ट्रेनला नागपूर-सिकंदराबादच्या मध्ये चंद्रपूर व बल्लारशा येथे थांबा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

    मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र तयार होत आहे. ज्यामध्ये महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले. (Industrial Estate)

    राजकीय : चंद्रपूर जिल्ह्यात मनसेचे इंजिन सुसाट

    मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ उद्योगधंद्यांना पुरविण्यात येत आहे, औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या ज्ञानाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करू शकतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणल्या. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय,  एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. चंद्रपूरमध्ये होणारे कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा बघितल्यास अभिमान वाटेल. अशी सर्वोत्तम कामे करण्यात आली आहे. (Industrial Estate)

    60 हजार सौर कृषी पंपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

    चंद्रपूर जिल्ह्याकरिता गौरवाची बाब

    चंद्रपूरमध्ये दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले असून आता चंद्रपूरचे नाव देखील देशाच्या बाहेर जात आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहापासून तर प्रत्येक द्वार बल्लारपूरच्या काष्ठापासून तर संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूरच्या काष्ठापासून तयार झाले आहे. पुन्हा एक पाऊल पुढे टाकत पीएमओचे संपूर्ण कार्यालय बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होत आहे. पंतप्रधानांची सर्वोच्च खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्मित असेल ही गौरवाची बाब असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. (Industrial Estate)

    12 कोटीचे बस स्थानक आणि लागली गळती

    एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी         

    जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केल्या जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एम.आय.डी.सी.तील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत असून चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून फर्निचर एक्सपोर्ट मध्ये चंद्रपूर जोधपुरलाही मागे टाकेल, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • Ballarpur Maharashtra : महिलांसाठी विविध योजना महायुती सरकारच्या काळात – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Ballarpur Maharashtra : महिलांसाठी विविध योजना महायुती सरकारच्या काळात – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Ballarpur Maharashtra आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना या माध्यमातून महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज महिलांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधावी.

    Ballarpur Maharashtra या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून महिलांचा सन्मान व त्यांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना

    नांदगाव पोडे (ता. बल्लारपूर) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सरपंच (नांदगाव पोडे) सुनिता वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर देऊळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरिबांना मदत करणे व बहिणींना सहकार्य करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे, याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 75 हजाराच्या वर महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र, अजूनही 20 हजार महिलांचे आधार लिंक (केवायसी) नसल्यामुळे लाभ मिळू शकला नाही. कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. Ballarpur Maharashtra

    युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी शासन विविध योजना राबवित आहे. मात्र, माहितीअभावी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तीर्थक्षेत्र दर्शनाचे जेष्ठांचे स्वप्न साकार करण्यासाठी जळगाव व कोल्हापूर येथून तीर्थदर्शनासाठी ट्रेन रवाना करण्यात आल्या. येत्या काही दिवसात चंद्रपुरातून सुद्धा ट्रेन रवाना करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक ज्येष्ठांनी तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये महाआरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. प्रत्येक गावांमध्ये विकास कामे केली असून विकासकामांतून जिल्हा पुढे नेला असल्याचेही ते म्हणाले.

    महिलांच्या सुरक्षेसाठी निर्णय
    कोरपना येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची दखल घेऊन जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एका महिला पोलीसची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुलींची छेडछाड व इतर तक्रारींबाबत पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जेणेकरुन, बदलापूर व कोरपनासारख्या घटना थांबविता येतील, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. Ballarpur Maharashtra

    मुलींचे शिक्षण, एसटीचा प्रवास !
    आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100 टक्के शुल्क सवलत देण्यात येत असून शिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. महिलांना एसटीतून प्रवासात 50 टक्के सवलत तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात 100 टक्के सवलत देण्यात येत आहे. स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने बल्लारपुरात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित होत असून मुलींना व बचत गटातील महिलांना हे केंद्र फायदेशीर ठरणारे आहे. मुलींच्या शिक्षणाला गरिबी आडवी येते. त्यांना योग्य शिक्षणासह कौशल्य प्रशिक्षण मिळावे तसेच शिक्षणाच्या बाबतीत महिला मागे राहू नये हि अडचण दूर करण्यासाठी सर्व जातीच्या मुलींना आकाशाला गवसणी घालण्याची संधी एस.एन.डि.टी विद्यापीठाच्या माध्यमातून चालून आली आहे. तसेच बचत गटांमार्फत उत्पादित वस्तू विक्रीसाठी चंद्रपूर येथे बाजारहाटची निर्मिती तसेच फूड कोर्ट उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir mungantiwar)

    शासनाचे महत्वाचे पाऊल
  • Badminton selection competition 2024 : चंद्रपुरात महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन

    Badminton selection competition 2024 : चंद्रपुरात महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन स्पर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन

    Badminton selection competition 2024 महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच पराक्रम गाजविणारा असावा. यासाठी आपण जिल्ह्यात खेळाडूंसाठी अनेक दालने उभी करण्याचा निर्धार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्तरावर आणि पुढे ऑलम्पिकमध्ये उंच भरारी घ्यावी, यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. खेळाडूंच्या प्रगतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचे उदघाटन

    Badminton selection competition 2024 चंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनच्या वतीने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरीयल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश काशीकर, उपाध्यक्ष राज पुरोहित, जगदीश जोशी, प्रदीप गवारा, मोहन शहा, रणजीत माथु, नागोजी चिंतलवार, अनिरुद्ध जोशी आदी उपस्थित होते.

    अतिशय उत्तम वातावरणात या बॅडमिंटन स्पर्धा होईल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंचाचा निकाल प्रतिकूल वाटला तरी प्रत्येक खेळाडूंनी डोकं शांत ठेवून निर्णय स्वीकारावा. चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास असोसिएशनने अतिशय कमी वेळात राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. Chandrapur

    स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संघटनांमागे शासन आणि प्रशासन नेहमीच पाठीशी राहील. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा विभागाचा प्रस्ताव गेल्यास ते लगेच मान्य करतात. आपला शब्द खाली पडू देत नाही. त्यामुळे क्रीडा विभागाच्या सर्व सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध होतात, याचा फायदा येथील विविध क्रीडा संघटनांनी घ्यावा असे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. (Badminton selection competition 2024)

    चंद्रपूर जिल्हा हा गोंड राजा, राणी दुर्गावती, राणी हिराई यांच्या वीरतेचे आणि शुरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मैदानातही खेळाडूंनी पराक्रम दाखवावा, आंतरराष्ट्रीय स्तराच्या या वातानुकूलीत बॅडमिंटन सभागृहाला आणि स्टेडियमला सोलरवर करण्यात येईल. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची आणि पराक्रमाची कुठेही कमतरता नाही. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे एक नवी उर्जा आपल्याला प्राप्त होते. आपण नेहमी मतांपेक्षा सर्वांगीण विकासालाच चालना दिली आहे. जिल्ह्यातील बॅडमिंटन कोर्ट, स्टेडियम अत्याधुनिक करण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या सैनिक शाळेत नुकतीच देशभरातील सैनिक शाळांची ‘स्पोर्ट मीट’ पार पडली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. (Chandrapur)

    यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू माधवी काशीकर हेडाऊ यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा : जिल्हाधिकारी विनय गौडा

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, चंद्रपूर शहरातील वातानुकूलित नवीन बॅडमिंटन हॉलमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. चंद्रपुरातून सुद्धा उत्कृष्ट खेळाडू तयार झाले पाहिजे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चंद्रपुरचे खेळाडू नक्कीच पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Badminton selection competition 2024)

    प्रास्ताविकात जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक म्हणाले, गत १० वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात अनेक विकासाची कामे झाली असून ताडोबा हे जगाच्या नकाशावर आले आहे. स्पर्धेकरीता येथे आलेल्या सर्व खेळाडूंना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोफत सफारी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषित केला. चंद्रपुरात अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. म्हाडाच्या जागेवर चंद्रपुरात उभारण्यात येणाऱ्या नवीन इनडोअर स्टेडियममध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे दहा वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट तयार होत आहे. स्वर्गीय डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट बॅडमिंटन निवड स्पर्धेकरिता राज्यभरातील 520 खेळाडू आले असल्याचे गिरीश चांडक यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन निशा मेहता यांनी तर आभार जोवेल चांदेकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धेकरीता आलेले खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Badminton selection competition 2024)

    बॅडमिंटन

  • crop insurance : चंद्रपूर जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

    crop insurance : चंद्रपूर जिल्ह्यातील या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

    crop insurance शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तीन तालुक्यांमधील १४०२० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पिकविम्याचे उर्वरित १८.७६ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.

    crop insurance चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत होते. राज्यशासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता.

    त्यानंतर १४३.८१ कोटी रुपये पिक विमा रकमेचे वाटप झाले. पण ३१ हजार ९६८ शेतकऱ्यांचे ५८.९४ कोटी रुपये प्रलंबित होते. यात मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील १४०२० शेतकऱ्यांचे १८.७६ कोटी रुपये देखील प्रलंबित होते. मात्र मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळताच तीन तालुक्यांचा देखील प्रश्न सुटला. सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात आवर्जून चर्चा झाली. ना. श्री. मुनगंटीवार यांनी हा विषय पुन्हा एकदा लावून धरला. Crop insurance

    . ना. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मुल तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांना ५ कोटी ९२ लक्ष, पोंभुर्णा तालुक्यातील ५९६४ शेतकऱ्यांना ८ कोटी ९ लक्ष व बल्लारपूर तालुक्यातील ४९०६ शेतकऱ्यांना ४ कोटी ७५ लक्ष रुपये पिक विम्याचे मिळाले आहे. एकूण तिनही तालुक्यांतील १४०२० शेतकऱ्यांना १८.७६ कोटी रुपये मंजूर झाले.

    पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायम प्रयत्नशील असलेले ना. मुनगंटीवार यांचे तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

    अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात घडलं बदलापूर

    चंद्रपुरात महाकाली महोत्सवाचा ध्वज फडकला