Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • Exclusive Sudhir Mungantiwar : कांग्रेसवर कडाडले सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    Sudhir Mungantiwar संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.

    चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगारांची दहशत, पोलिसांनी केले स्थानबद्ध

    एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. Sudhir mungantiwar

    काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी
    काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटलीने वाढविले टेन्शन

    गरिबी नव्हे गरीब हटले
    काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

  • VBA workers join BJP : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला

    VBA workers join BJP गेल्या दहा दिवसांमध्ये तीनवेळा काँग्रेसला खिंडार पडल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीमध्येही फुट पडली आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून वंचितमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात बंडखोरी, 25 उमेदवारांची माघार

    VBA workers join BJP तर इतर पक्षांनी देखील भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

    विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शिस्तीचा अभाव बघायला मिळत आहे. त्या तुलनेत भाजपमध्ये शिस्तबद्ध काम आहे. याचाच परिणाम म्हणून इतर पक्षांचे पदाधिकारी भाजपकडे आकर्षित होत आहेत.

    चंद्रपुरात मायकल भाई जवळ मिळाली बंदूक

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील काही पक्षांनी ना. मुनगंटीवार यांचा विकासाचा दृष्टीकोन लक्षात घेऊन भाजपची कास धरली आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रमेश लिगमपल्लीवार यांच्यासह 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये महिला आणि युवकांची संख्या लक्षणीय आहे.

    पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष बल्लारपूर किशोर पंदीलवार, भाजपा शाखा अध्यक्ष विसापूर गणेश टोंगे,विजय घिरडकर, राजू डाहुले,विठ्ठल तुराणकर यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत जात हा फॅक्टर चालला होता. पण आता चालणार नाही, हे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सिद्ध करून दिले आहे.

    वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना साथ दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत, असे स्पष्ट दिसत आहे.

  • Now Vande Mataram : चंद्रपूर जिल्ह्यात वंदे मातरम ची चर्चा पण का?

    Vande Mataram ‘हाव जी मॅडम..’ बल्लारपुर मतदारसंघात कॉल झाला व्हायरल !,निरोप सांगून द्या, आमचे मत सुधीरभाऊंना, बल्लारपूर विधानसभेतील मतदाराने दिली ग्वाही

    Vande mataram महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून मतदारांना गेलेल्या कॉलची सुरुवात ‘वंदे मातरम्,पासून होते.

    गुन्हेगारी : चंद्रपुरात कॅश ऑन डिलिव्हरी चा नवा सायबर फ्राड

    वंदे मातरम् म्हटल्याबरोबर समोरचा व्यक्ती समजून जातो की, की हा कॉल सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून आहे. या कॉलला प्रतिसादही भरपूर मिळतो आहे.प्रत्यक्ष मतदार आम्ही सुधीरभाऊ यांना निवडून देऊ, आमचा निरोप मुनगंटीवार यांना पोहचवा असा आग्रह करत आहे. याचे कारण मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदार संघाची सेवा केली. Vande mataram

    समस्या सोडविण्यासाठी जनतेच्या पाठीशी तत्परतेने सोबत असतात. त्यांच्या याच कारणामुळे मतदार राजा संतुष्ट आहे. त्यांच्या लाडक्या नेत्यांच्या ऑफिस मधून फोन आल्यावर आमचे मतदान मुनगंटीवार यांनाच देणार असा विश्वास देत आहेत.

    मुनगंटीवार यांनी ‘हॅलो नाही, तर वंदे मातरम् म्हणा..’ हा उपक्रम सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केला. आज त्यांच्या कार्यालयात कुणीही कॉल केला, तर ‘वंदे मातरम्..’ पासून संवादाची सुरूवात होते. यामध्ये देशभक्ती ओतप्रोत भरून असते. लोक संवाद साधतात. त्यांच्या समस्या चुटकीसरशी सुटतात. हा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील जनतेने घेतला आहे. Vande mataram

    तर लाडक्या बहिणींना प्रतिमाह मिळणार अडीच हजार रुपये

    आता निवडणुकीच्या धामधुमीत मतदारांना मुनगंटीवार यांच्या कार्यालयातून कॉल केले जात आहेत. त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. कारण सुधीर मुनगंटीवार यांचे एक वैशीष्ट्य आहे. त्यांना कुणीही कॉल केला तर तो अटेंड केला जातो. त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केला तरीही ते प्रवासात असताना आणि वेळ मिळेल तेव्हा आलेल्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देतात. आज मतदार त्यांना तोच प्रतिसाद देत असल्याचे बघायला मिळते.

    मोठे नेते सामान्य लोकांचे कॉर रिसीव्ह करत नाहीत. हा लोकांचा अनुभव आहे. पण सुधीर मुनगंटीवार याला अपवाद आहेत. प्रत्येक व्यक्तीचा कॉल ते घेतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि लोकांची कामे होतात. म्हणून आज त्यांच्या कॉलला लोक प्रतिसाद देत आहेत. असाच कॉल व्हायरल झाले आहेत.

    त्याची चर्चाही मतदारसंघात आहे. ‘दिला शब्द केला पूर्ण’ ‘विकासपुरूष’ असे नामाभिमानही जनतेने त्यांना दिले आहे. मुनगंटीवार यांनी पहिल्या टप्प्यातच प्रचारात आघाडी घेतली. ही आघाडी ना.मुनगंटीवार कायम ठेवेल, असा विश्वास काही मतदारांनी व्यक्त केला.

  • Join Bjp : मुनगंटीवार यांच्या विकासकामांची कांग्रेस कार्यकर्त्यांना भुरळ

    Join Bjp मुल तालुक्यात काँग्रेसला खिंडार, राजगडच्या सरपंचांसह अन्य सदस्यांचा भाजप प्रवेश, ना. मुनगंटीवार यांच्या विकासकामावर प्रभावित होऊन केला प्रवेश

    Join bjp मुल – बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मुल येथील राजगडच्या सरपंचांसह इतर सदस्य व विविध समाज बांधवांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला.

    राजकारण : लाडक्या बहिणींना मिळणार अडीच हजार रुपये

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामावर होऊन आपण भाजपमध्ये आल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे. या सर्वांनी आज (शनिवार) ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. Join bjp

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबत नाहीये. गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथील शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने काँग्रेसच्या जाचाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील काटोली गावातील सरपंचांसह अख्ख्या ग्रामपंचायतने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेला चार दिवसही व्हायचे आहेत तोच आता मुल तालुक्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

    गुन्हेगारी : चंद्रपुरात सोनं लुटणारी टोळी सक्रिय

    मुल तालुक्यातील राजगड गावाचे सरपंच काँग्रेसचे नेते रविंद्र मनोहर चौधरी यांनी अन्य सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भोई समाजाचे ऋषी पेठकर, अमोल ठाकूर, माळी समाजाचे संकेत गायधने, माना समाजाचे प्रभाकर चौधरी यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकसात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधून भाजप मध्ये दाखल झालेले सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. Join bjp

    बल्लारपूरमधील धक्क्यातून सावरण्यापूर्वीच
    गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथे मागासवर्गीयांचे नेतृत्व करणारे बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद वर्मा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला व जाचाला कंटाळून भाजपमध्ये आले. त्यांच्यासह प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान अशा १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी काटोली ग्रामपंचायतचे सरपंच राजेश ढुमणे, उपसरपंच कवडू वागाडे, सदस्य अरुण गडकर, रसिका तोडासे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ग्रामपंचायतमधील जवळपास अख्खेच्या अख्खे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच काँग्रेसला मुलमध्ये खिंडार पडले आहे.

  • BJP manifesto : भाजपचा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार – सुधीर मुनगंटीवार

    BJP manifesto : भाजपचा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार – सुधीर मुनगंटीवार

    BJP manifesto विकासाच्या बाबतीत मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर रहावा यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहर पोलिसांचे कारवाई सत्र

    BJP manifesto ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमवारी (ता.२८) अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा जाहीरनामा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मांडला आहे. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर रयतेचे वचन पत्र आहे.

    या वचनपत्राला जनताही डोक्यावर घेईल.’ राज्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यातील लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांचे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी भाजपा महायुतीला निवडून देतील हा विश्वास आहे, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.

    राजकीय : चंद्रपूर जिल्ह्यात तीन वारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

    माझ्या मतदारसंघाशिवाय स्टार प्रचार म्हणूनही माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त वेळ काढून मी इतर मतदारसंघात प्रचार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. BJP manifesto

    राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जाहीर करण्याचे भाग्य लाभले. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा विश्वास राज्य गीतातून महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याच दिल्लीतील सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे स्थिर सरकार आम्ही आणणार आहोत, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे विशेष भर दिला. विविध समाजाच्या हक्काचे समाजभवन गावागावांमध्ये निर्माण करण्यात आले. ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ग्रामिण आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण केले. विविध रोजगाराभिमुख प्रकल्पांच्या माध्यमातून क्षेत्रातील गावागावांतील हजारो युवक, महिला, नागरिकांना हक्काचे रोजगार देण्याचेही काम झाले. BJP manifesto

    याशिवाय गावागावांमध्ये रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देण्याचे काम केले. या सर्व कामांमुळे जनतेच्या जीवनात सुलभता आली आहे. त्यामुळे जनता जनार्दन यावेळी देखील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिल. केवळ बल्लारपुरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहिल, असाही विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

  • Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    Mla kishor jorgewar in bjp : आमदार किशोर जोरगेवार यांची घरवापसी

    mla kishor jorgewar in bjp विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना कोण टक्कर देणार असा प्रश्न सर्व राजकीय पक्षासमोर उभा झाला होता, आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाला जोरगेवार यांनी उमेदवारी मागितली, त्यावेळी चंद्रपूर कांग्रेस व खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला, त्यामुळे आमदार जोरगेवार यांना राष्ट्रवादी कांग्रेसने उमेदवारी नाकारली.
    अनेक राजकीय घडामोडी नंतर आमदार जोरगेवार आज भाजप पक्षात सामील झाले आणि भाजपच्या जागेचा तिढा सुटला.


    Mla kishor jorgewar in bjp चंद्रपुरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व माजी कांग्रेस महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करीत पक्षाला मजबुती देण्याचे काम केले.
    यावेळी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.

    महत्त्वाचे : चंद्रपुर शहरात वेश्याव्यवसाय, 4 महिलांची सुटका


    विशेष म्हणजे जोरगेवार यांना भाजपचे तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रयत्न केले.
    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना पराभवाची धूळ चाटवित 72 हजारांचे मताधिक्य घेतले होते, आधी भाजप प्रवेशवरून अनेक वादंग पक्षात निर्माण झाले, मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावी याकरिता मुनगंटीवार हे प्रयत्नशील होते मात्र ऐनवेळी जोरगेवार यांच्या एंट्रीने पक्षात बंडाचे वातावरण निर्माण झाले, खुद्द मुनगंटीवार हे दिल्ली ला गेले, आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना लक्षात घ्यावी व उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी पक्ष श्रेष्ठीना केली होती. Mla kishor jorgewar in bjp

    बघा अनकट पक्ष प्रवेश सोहळा


    मात्र पक्ष श्रेष्ठीनी जोरगेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, आणि त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज घेण्यात आला.
    चंद्रपूर जिल्ह्याला मुनगंटीवार विरुद्ध किशोर जोरगेवार हा वाद नवा नाही मात्र यंदा जोरगेवार यांनी या वादात आघाडी घेतल्याने भाजप चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार हे निश्चित झाले आहे.

    Namrata themaskar


    महिला कांग्रेसच्या माजी अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जातीय राजकारण विरोधात कांग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नम्रता ठेमस्कर यांची ओळख फायरब्रॅंड नेता म्हणून आहे.
    आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार जोरगेवार व ठेमस्कर यांच्या शेकडो समर्थकांनी पक्षात प्रवेश करीत जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर विजय निश्चित होणार अशी हमी दिली. Mla kishor jorgewar in bjp

    विशेष म्हणजे आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे ब्रिजभूषण पाझारे व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते, सध्या समाजमाध्यमांवर पाझारे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असे संदेश पसरलेले आहे.

    असंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही जोरगेवार यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे, कार्यकर्त्यांच्या या बंडावर पालकमंत्री काय भूमिका घेणार ही येणारी वेळ सांगेलचं. Mla kishor jorgewar in bjp

    वर्ष 1995 पासून भाजप पक्ष चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत आला मात्र त्यांच्या विजयी रथाला खिंडार लावण्याचे काम आमदार जोरगेवार यांनी केले, त्यावेळी आमदार जोरगेवार यांना जनतेनी भाजपविरोधी मतदान केले होते, 2009 मध्ये जोरगेवार यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि विधानसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली होती हे विशेष.

  • Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    Powerful kishor jorgewar join bjp : आमदार जोरगेवार यांचा 10 वर्षाचा वनवास संपणार

    kishor jorgewar join bjp चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांचा 10 वर्षाचा वनवास संपला असून ते 27 ऑक्टोबर रोजी घरवापसी करणार असून त्यांचा भाजप पक्षात प्रवेश होत आहे.

    kishor jorgewar join bjp वर्ष 2014 मध्ये भाजप सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढली होती, त्यावेळी त्यांना 52 हजार मत मिळाले मात्र त्यांचा पराभव झाला, वर्ष 2009 मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार तर हंसराज अहिर यांच्याकडून राजेश मुन यांचं नाव पक्षाकडे गेलं मात्र दोन्ही नेत्यांच्या वादात जागा सुटू नये यासाठी भाजपने नागपूर निवासी नाना श्यामकुळे यांना चंद्रपूर मध्ये पाठवीत विधानसभेची उमेदवारी दिली.

    राजकीय : ब्रह्मपुरी येथे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लावले खिंडार

    त्यावेळी निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून बाहेरच्या पदाधिकाऱ्याला भाजपने उमेदवारी दिली होती, नाना श्यामकुळे विजयी झाले मात्र निष्ठवंतांना डावल्ल्याची खंत अनेकांच्या मनात होती, 2014 ला जोरगेवार यांनी भाजप सोडली, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केलं होतं, पराभव झाल्यावर जोरगेवार घरी बसले नाही तर त्यांनी 5 वर्षे सतत जनतेच्या संपर्कात राहिले. kishor jorgewar join bjp

    वर्ष 2019 ला जोरगेवार यांनी कांग्रेस पक्षाला विधानसभेची उमेदवारी मागितली मात्र त्यावेळी खासदार बाळू धानोरकर यांचा विरोध बघता जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु 2019 ला जोरगेवार अपक्ष निवडणुकीत उभे राहिले, कांग्रेस पक्षाची जमानत जप्त झाली, भाजप चा तब्बल 72 हजार मतांनी पराभव झाला.

    त्यावेळी महाविकास आघाडी अस्तित्वात आली, जोरगेवार यांनी सरकारला समर्थन दिले, अडीच वर्षांनी महायुती सरकार राज्यात स्थापन झाले, अपक्ष आमदार असल्याने विधानसभा क्षेत्रातील कामे व्हावी यासाठी जोरगेवार यांनी महायुती सरकारला समर्थन दिले.

    या दरम्यान पालकमंत्री मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार यांचा अनेकदा वाद झाला, अनेक सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही एकमेकांवर टीकास्त्र सोडत होते, लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार जोरगेवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला, मात्र मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. kishor jorgewar join bjp

    मुनगंटीवार यांच्याशी जवळीकता वाढल्याने वर्ष 2024 मध्ये आमदार जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशी शक्यता निर्माण झाली मात्र त्यांच्या उमेदवारीला पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला, अश्यात आमदार जोरगेवार यांच्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भाजप पक्षाची संजीवनी घेऊन आले, आणि जोरगेवार यांचा भाजप पक्षात प्रवेश निश्चित केला.

    परंतु या राजकीय घडामोडी मध्ये पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विरोध दर्शविला कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांनी लक्षात घ्याव्या यासाठी दिल्ली ला गेले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर निष्ठवंतांच्या उमेदवारीचा इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली, मात्र यंदा जोरगेवार यांना अहिरांची संजीवनी कामी आली. kishor jorgewar join bjp

    भाजपच्या वरिष्ठांनी एक एक विधानसभा महत्वाची आहे हे नेत्यांना सांगितले आहे तर आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावे यासाठी प्रयत्न करा असा आदेश दिला.

    आता 10 वर्षांनी आमदार जोरगेवार यांची भाजपात घर वापसी होणार असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार हे आमदार किशोर जोरगेवार असणार हे स्पष्ट झाले आहे, राजकारणात काहीही होऊ शकते हे याचं जिवंत उदाहरण आहे.

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत आमदार जोरगेवार यांना मतदारांनी भाजप विरोधात मतदान केले पण यावेळी चित्र वेगळे आहे, जनतेच्या मनात जोरगेवार अपक्ष म्हणून निवडून येणार असा कल आहे, ज्या विरुद्ध आपण निवडणूक लढलो आता त्या पक्षाला मतदान जनता करेल काय? हा मोठा गोंधळ व प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Exclusive Kishor Jorgewar Bjp Candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुतीचे मेरिट उमेदवार किशोर जोरगेवार?

    Kishor Jorgewar Bjp Candidate विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आता हळूहळू चुरस निर्माण होत आहे, महाविकास आघाडी व महायुती ने काही उमेदवारांची यादी जाहीर केली तर काही जागांवर एकमत नसल्याने जागा वाटपाचे घोड अजूनही अडलं आहे.

    Kishor Jorgewar Bjp Candidate चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी आधी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली मात्र कांग्रेसने जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग खडतर झाला.

    24 ऑक्टोबर रोजी रात्री दिल्ली मध्ये खलबत झालं आणि जोरगेवार हे भाजपचे उमेदवार असणार अशी माहिती बाहेर आली, त्यामुळे भाजप निष्ठावंत खवळून गेले, आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, यासाठी भाजपचे पदाधिकारी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका मांडणार आहे.

    जोरगेवार यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्ली ला रवाना झाले, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय? हे समजवून सांगण्यासाठी मुनगंटीवार दिल्ली येथे जात असल्याची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    महत्त्वाचे : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    विशेष बाब म्हणजे यंदा महायुती मेरिट नुसार तिकीट वाटप करणार आहे, महायुती च्या सर्व्हेमध्ये किशोर जोरगेवार हे आघाडीवर असल्याने भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे कदाचित ठरविले असणार अशी शक्यता आहे.

    वर्ष 2019 मध्ये आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला कांग्रेस पक्षातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी विरोध दर्शविला होता, आता वर्ष 2024 मध्ये पुन्हा कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरगेवार यांच्या महाविकास आघाडी मधून उमेदवारीला विरोध केला.

    विशेष म्हणजे धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांनी 72 हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रीय पक्षांना धोबीपछाड दिली होती, मात्र त्यावेळी महाविकास आघाडी ने एका जागेचे नुकसान केले होते, आता सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. Kishor Jorgewar Bjp Candidate

    सत्तेसाठी सर्व पक्षांना एक-एक जागा महत्वाची आहे मात्र महाविकास आघाडी व महायुती आमदार जोरगेवार यांच्या उमेदवारीला विरोध करीत स्वतःच नुकसान करीत आहे.

    चंद्रपूर विधानसभा ही जागा कांग्रेस पक्ष 1995 पासून सतत हरत आहे, वर्ष 2014 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर तर वर्ष 2019 मध्ये कांग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर होता त्यानंतर सुद्धा कांग्रेस पक्षाचा चंद्रपूर विधानसभेवरील दावा हास्यास्पद आहे असे जाणकारांचे मत आहे. लोकसभा निवडणुक व विधानसभा निवडणूक यामध्ये मोठा फरक असतो.

    एकेकाळी आमदार मुनगंटीवार यांचे भाजप पक्षातील खंदे समर्थक म्हणून किशोर जोरगेवार यांची ओळख होती, मात्र राजकारणात वैर व मैत्री हे जास्त काळ टिकत नसते.

    सध्या महाविकास आघाडी व महायुती मधील नेते आपापल्या सोयीनुसार उमेदवारी ठरवीत सेटिंग चे राजकारण करीत आहे. जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास तेचं जिंकणार असा कौल चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांचा आहे.

  • Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

    राजकीय – वाहनचालक विरोधी पक्ष नेत्याला विधानसभा निवडणुकीत भिडणार

    Health Care Center बल्लारपूर विधानसभेतील मुल व पोंभुर्णा तालुक्यातील  सर्वसामान्य नागिरकांची अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राची मागणी होती. त्याची दखल घेत ना. श्री. मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव तातडीने संबंधित मंत्रालयाला पाठविला होता.

    पत्रकार परिषद

    या प्रस्तावाची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपकेंद्राच्या मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगांव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष बाब’ म्हणून या केंद्रांना मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद आहे.

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपकेंद्रांची मागणी मंजूर झाल्यामुळे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्यसेवा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने म्हणत असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती यानिमित्ताने आली आहे. Health Care Center

    जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हात १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. याचा उपयोग संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार आहे. खनिज निधितून कॅन्सर व्हॅनसाठी निधी मंजुर केला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेले आहे. या व्हॅनचा फायदा गावागावातील नागरिकांना होणार आहे. Health Care Center

    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे आधुनिक रुग्णालय
    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे १०० खाटांचे आधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. केवळ मुल नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्यामागची संकल्पना ना.मुनगंटीवार यांची आहे. यापूर्वी आरोग्यक्षेत्रातील अनेक कामे ना.मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र,पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती,पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी असंख्य कामे झाली आहे.

    दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले आहेत.

    मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया
    लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातूनच हे शक्य झाले. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले.

  • Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

    Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

    Babupeth railway flyover 50 वर्षांपासून बाबूपेठ येथील नागरिक उड्डाणपुलाची मागणी करीत होते, मात्र उड्डाणपुलाच्या निर्माणात अनेक अडचणी आल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बाबूपेठ वासीयांचे स्वप्न साकार झाले.

    Babupeth railway flyover आज 15 ऑक्टोबर या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात लाखो नागरिकांना धम्म दीक्षा दिली आणि यादिवशी बाबूपेठ उड्डाणपूलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्त्वाचे : टिल्लू पंप लावणार तर मनपा टाकणार काळ्या यादीत


    बाबूपेठ उड्डाणपूलाचा नामकरण सोहळा आज पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी मुनगंटीवार म्हणाले की मी अर्थमंत्री असताना या उड्डाणपूल बाबत मी दखल घेत केंद्र सरकारतर्फे मंजुरी मिळवून दिली, आणि बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम सुरू झाले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निधी थांबला आणि काम पुन्हा थांबले नंतर महायुतीचे सरकार आल्यावर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आणि आज हा उड्डाणपूल तयार झाला.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल


    आजचा शुभ दिवस व नागरिकांची मागणी नुसार उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आलं.
    आयोजित नामकरण कार्यक्रमाला बाबूपेठ वासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.