Tag: अम्मा कि पढाई

  • open appeal to MLA Kishor Jorgewar । विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण? रामू तिवारी यांचे आमदार जोरगेवारांना आवाहन

    open appeal to MLA Kishor Jorgewar

    open appeal to MLA Kishor Jorgewar : प्रिय आमदार साहेब,
    सप्रेम नमस्कार!
    सर्वप्रथम, आपण आणि आपले कुटुंबीय सुखी व समृद्ध राहावेत, तसेच आपल्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा! मी हे पत्र एका पक्षाचा महानगर प्रमुख म्हणून नव्हे, तर एक चंद्रपूर प्रेमी आणि मित्र म्हणून लिहीत आहे.

    आम आदमी पक्षाचे आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

    आज माझ्या एका युवा सहकाऱ्याने मला यूट्यूबवरील एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये एक मुलगी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा करते. या व्हिडिओमुळे मला वाटते की, आपण एक नवीन राजकीय नौटंकी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या भविष्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे हा एक चुकीचा मार्ग आहे. आमदार साहेब, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’
    कृपया वाईट वाटून घेऊ नका, पण असे प्रकार खरोखर किळसवाणे वाटतात. विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर तातडीने थांबवावा, अशी मी विनम्र विनंती करतो. Amma Ki Padhai event controversy


    ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने उपक्रम सुरू करण्यास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. जर आपला खरोखर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा शुद्ध हेतू असेल, तर आपण विरोधकांशी संवाद साधला असता, त्यांच्याशी चर्चा केली असती किंवा उपक्रमाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला असता. परंतु, आपण यापैकी काहीही केले नाही.


    आपल्या शपथपत्रानुसार, आपल्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विरोधकांशी संवाद साधूनही मार्ग निघाला नसता, तर 24 तासांत ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची जागा बदलण्याची आर्थिक क्षमता आपल्यात आहे. जनता महाविद्यालयातील सभागृह, रोटरी हॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हा उपक्रम तातडीने हलवणे आपल्यासाठी सहज शक्य होते. विरोधकांशी चर्चा केली असती, तर त्यांनीही कदाचित सहकार्य केले असते. मात्र, आपण एका दिवसात उपक्रम बंद केला आणि तातडीने त्याचा इव्हेंट आणि नौटंकी सुरू केली. open appeal to MLA Kishor Jorgewar

    आंबेडकरी जनतेच्या मनात शंका

    आपल्या कार्यालयात आजही डॉ. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो असल्याने आंबेडकरी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीवर मागच्या दाराने प्रवेश करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संवाद साधणे आपली जबाबदारी होती, पण तसे न करता आपण विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. Amma Ki Padhai political misuse

    उपक्रम २०२५ ला सुरु मग २०२४ च्या परीक्षेत २७ विद्यार्थी उत्तीर्ण कसे?

    मी स्पष्टपणे सांगतो, ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला आमचे पूर्ण समर्थन आहे. यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या परीने सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत(फक्त त्यात राजकारण नको). विद्यार्थ्यांचे एक दिवसही नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सर्व मिळून घेऊ. पण कृपया, या उपक्रमाचा राजकीय वापर थांबवा.
    याशिवाय, 2024 च्या एमपीएससी गट ‘ड’ परीक्षेत ‘अम्मा की पढाई’ केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मला मिळाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु, हा उपक्रम 2025 मध्ये सुरू झाला, मग 2024 च्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घेतला? याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी विनंती. Amma Ki Padhai MPSC 2024 student results discrepancy

    माझे जिव्हाळ्याचे नाते

    वैयक्तिक स्तरावर, आपल्या दिवंगत आईंबरोबर माझे जिव्हाळ्याचे नाते होते, हे आपणास माहीत आहे. टोपल्या विकताना त्यांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागायचे, तेव्हा त्या मला आवर्जून बोलावायच्या. त्यांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम होते, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या नावाचा मी कधीही विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्या आईचे सार्वजनिक जीवनात विशेष योगदान नव्हते, हे सर्व चंद्रपूरकरांना माहीत आहे. ‘अम्मा टिफिन’, ‘अम्मा की पढाई’, ‘अम्मा की दुकान’ हे उपक्रम सुरुवातीला कौतुकास्पद वाटले, पण आता त्यातून राजकीय हेतूंचा गंध येत आहे. open appeal to MLA Kishor Jorgewar

    वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,शहीद बाबुराव थोरात यांच्यासारख्या थोर व्यक्तींचे चंद्रपूरच्या इतिहासात मोठे योगदान आहे. अशा भूमीत आपल्या आईच्या नावाने चौक किंवा पुतळा उभारण्याचा विचार आश्चर्यकारक आहे. आपण गांधी चौकाच्या बाजूला ‘अम्मा चौक’ आणि दीक्षाभूमीवर ‘अम्मा की पढाई’ सुरू करून महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना करत आहात, असा चुकीचा संदेश गेला आहे.
    आईच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा आणि चंद्रपूरची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करावा, अशी मी विनंती करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत हा वाद येथेच संपवतो.
    आपला स्नेही
    रितेश रामु तिवारी

  • AAP open letter to mla kishor jorgewar । 💥 “अम्मा की पढ़ाई” वरून AAP चं आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

    AAP open letter to mla kishor jorgewar

    AAP open letter to mla kishor jorgewar : आदरणीय आमदार किशोरजी,

    आपण आपल्या पत्रात “अम्मा की पढ़ाई” हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एका आत्मपरीक्षणात्मक, भावनिक शैलीत जनतेसमोर मांडला. आपण लिहिता की, “ही धम्मसेवा आहे” आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना आपण ‘अस्वस्थता’ म्हणून मांडता. पण हा मुद्दा भावनांचा नाही हा इतिहास, समाजप्रबोधन, आणि संविधानाच्या मूल्यांचा विषय आहे. Amma ki padhai controversy

    अम्मा कि पढाई वाद, आमदार जोरगेवार यांचं भावनिक पत्र

    आमच्या आरोपांचा गाभा काय होता?

    1. दीक्षाभूमीच्या परिसरात तिसऱ्या ओळखीची जाणीवपूर्वक निर्मिती “अम्मा की पढ़ाई” हे नाव देऊन.
    2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुद्दाम टाळले गेले.
    3. शासकीय रचनेत कोणताही स्पष्ट ठराव न करता, एका विशिष्ट ओळखीचा प्रचार सुरू केला गेला.
    4. स्मारकाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली “आयडेंटिटी शिफ्ट” सुरू करण्याचा भाजपाचा देशव्यापी पॅटर्न इथेही दिसून आला. Chandrapur Diksha Bhumi identity politics

    आपण काय म्हणता आणि आम्ही का असहमत आहोत?

    १. “हा उपक्रम धम्मसेवा आहे”
    धम्मसेवा व्यक्तिगत भावना नसते — ती सामूहिक असते.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा ती वैयक्तिक नव्हती — ती क्रांती होती. आपण जर या कार्याला “धम्मसेवा” म्हणत असाल, तर ती पवित्र सेवा एका विशिष्ट ओळखीच्या किंवा नात्याच्या नावाखाली चालवणे म्हणजे त्या क्रांतीचा अवमूल्यन आहे. मग तो तुमच्या मातोश्रींचा आदर असला तरीही. Amma ki padhai vs Ambedkar values

    २. “गैरसमज निर्माण झाले”
    गैरसमज नव्हते. लोकांनी स्पष्टपणे पाहिले की, बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेऊन, एका भावनिक नात्याच्या आधारे दीक्षाभूमीच्या परिसरात नवीन ब्रँडिंग सुरू होत होतं. तुम्ही हे केंद्र एखाद्या वस्तीमध्ये सुरू केलं असतं, तर कोणी विरोध केला नसता. पण तुम्ही नेमकं *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दीक्षाभूमी परिसर निवडला — हे निवडणूकपूर्व मनोवैज्ञानिक रणनितीचे पाऊल होते.

    ३. “विद्यार्थ्यांचा विकास झाला, 27 उत्तीर्ण झाले”

    हे खूप चांगले आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण शिक्षण देताना त्यावर तुमचं “ब्रँडिंग” लावणं — हेच प्रश्न निर्माण करतं.
    विचार करा — जर दुसऱ्या कुणी ‘हेडगेवार की पढाई’ सुरू केलं असतं, तर ते ही धम्मसेवा मानली गेली असती का?

    मुख्य मुद्दा : “ज्योत विझली नाही — पण तुमचा हात जर त्या ज्योतीच्या सावलीतच राजकारण करत असेल, तर ती विझवणंच योग्य!”

    तुम्ही लिहिता की, “ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे”* पण प्रश्न ‘ज्योती’चा नाही आहे.
    प्रश्न त्या ज्योतीच्या नावाखाली कोणते झेंडे फडकवले जातात, हाच आहे!
    तुम्ही सांगत आहात की केंद्र बंद केलं — परंतु बाबासाहेबाचे नाव ठेऊन हे केंद्र सुरू ठेवता आले असते परंतु तुम्ही तसें केले नाही नावासाठी एवढा अट्टहास का ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. AAP open letter to mla kishor jorgewar

    तुमचं पत्र — एक रणनीती, आत्मपरीक्षण नव्हे.

    आपण तुमच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना, आईच्या आठवणींना, आणि धम्मसेवेच्या शब्दसामर्थ्याला कवटाळून लोकभावना तयार करण्याचा प्रयत्न करता.
    हे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ते म्हणून चुकीचे वाटते , बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो

    भावना बाजूला ठेवा, सत्य ऐका — “बाबासाहेबांची जागा कोणत्याही नावाने बदलता येणार नाही.”

    म्हणून शेवटी आमचं उत्तर स्पष्ट आहे:

    तुमचं हे पत्र स्वतःला क्लीन चिट देण्याचा एक प्रयत्न आहे.
    पण चंद्रपूरच्या जनतेने डोळे उघडले आहेत.
    हा लढा “अम्मा की पढ़ाई” विरोधात नाही — तर बाबासाहेबांविरुद्ध सुरू असलेल्या हळूहळू चालणाऱ्या ओळख-हेरफेरी विरोधात आहे.

    बाबासाहेबांचे नाव, कार्य आणि जागा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावनिक संज्ञेतून झाकली जाणार नाही हीच आम्ही मागणी पुन्हा मांडतो. आपणाला माहित असेल आम आदमी पार्टी ने दिल्ली पंजाब मध्ये शिक्षा क्रांती सुरू केली ती केवळ नावासाठी नाही तर गरीब, वंचित ,दुर्बल घटकातील मुलगा शिकला पाहिजे कुठलेही जाती पातीचे राजकारण न करता मुलगा सक्षम झाला पाहिजे हीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे. शिक्षण आणी आरोग्य या विषयावर कुणी राजकारण करत असेल तर आम आदमी पार्टी भविष्यात ही विरोध करणार.
    हम राजनीती करणे नही इसे बदलणे आये हैं !

    जय संविधान

    आम आदमी पक्ष,
    चंद्रपुर

  • Politics on Amma Ki Padhai । शिक्षणाच्या उजेडावर राजकारणाचा अंधार, Amma Ki Padhai बंद?

    Politics on Amma Ki Padhai

    Politics on Amma Ki Padhai : चंद्रपूर – आज अनेक युवा डोळ्यात अधिकारी बनण्याचं स्वप्न बाळगून असतात , मात्र आर्थिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक युवा वर्गाचे स्वप्न भंग होतात, मात्र हि अडचण युवा वर्गापुढे येऊ नये यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या आईच्या नावाने अम्मा कि पढाई हा उपक्रम सुरु केला मात्र गोरगरीब युवकांच्या अधिकारी बनण्याच्या मार्गावर काही राजकीय पक्षांनी अडथळा आणला. आणि आज हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करण्यात आला. Politics on Amma Ki Padhai

    वनात वनरक्षकाने केला अत्याचार, चंद्रपूर हादरलं

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी युवा वर्गाला शिका व संघटित व्हा, असा मोलाचा संदेश दिला होता, त्यांच्या या संदेशावर आमदार जोरगेवार यांनी एक पाऊल पुढे टाकत अम्मा कि पढाई उपक्रमाचा शुभारंभ केला, या माध्यमातून पूर्व तयारी परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये तब्बल ३ हजार युवक वर्गाने परीक्षा दिली व त्यामधून एकूण २८४ विद्यार्थ्यांची निवड झाली. जून महिन्यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अम्मा कि पढाई केंद्र सुरु करण्यात आले. सर्व सुरळीत सुरु होते मात्र जोरगेवार हे दीक्षाभूमी परिसरात अतिक्रमण करीत आहे असा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई केंद्र बंद करा अशी मागणी केली. Amma Ki Padhai free coaching

    यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून नवा वाद निर्माण न व्हावा यासाठी सदर केंद्र आंबेडकर महाविद्यालयातून बंद करण्यात आला. याबाबत त्यांनी संदेश प्रसारित केला आहे.

    काय आहे आमदार जोरगेवार यांचा भावनिक संदेश?

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत आपल्या करुणामयी स्पर्शाने धम्मदीक्षेचा दीप प्रज्वलित केला. ही दीक्षा केवळ धर्मग्रहण नव्हे, तर आत्मोद्धार, समता, आणि शिक्षणाच्या क्रांतीची ग्वाही होती. त्याच प्रेरणेतून शिक्षणाची नवी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी. ‘अम्मा की पढाई’ हा उपक्रम आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरू केला. MPSC exam coaching for poor youth

      या उपक्रमात 284 गरीव व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन दिले जात होते. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकताच दिनांक ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला. यामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचे समाधान आहे. ही केवळ शैक्षणिक यशाची गोष्ट नव्हे, तर त्या मुलांच्या स्वप्नांना हात देणाऱ्या धम्मकार्याची साक्ष आहे. मात्र, या कार्याला काही राजकीय पक्षांचा विरोध उभा राहिला. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो, त्यांचाही आम्ही मन:पूर्वक आदर करतो.

    परंतु हे केंद्र नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हे समजवण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू शकतो. किंवा, हा एक विधायक सामाजिक उपक्रम राजकारणाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजाच्या भोवऱ्यात सापडून बळी गेला असेल — हे सुद्धा चिंतन करण्यासारखे आहे. उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत जे तेज होतं, त्याच डोळ्यांत आज अश्रू आहेत – ही बाब अस्वस्थ करणारी आहे. Chandrapur youth free exam preparation centre


    स्वतःच्या जिद्दीवर आणि शिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं… आज त्यांच्या अपेक्षांना तात्पुरता विराम मिळतो आहे, ही गोष्ट मनाला चटका लावून जाते. हा उपक्रम काही काळासाठी स्थगित करत आहोत. नवीन जागेची शोधाशोध व पुनर्रचना करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे.

    या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तात्पुरता थांबा लागेल, याचे दुःख आहे. आम्ही त्यांची आशा पूर्ण करू शकलो नाही, याचे मनस्वी वाईटही वाटते. पण हे कार्य इथे थांबणार नाही. कारण शिक्षण ही बाबासाहेबांची खरी दीक्षा आहे, आणि ही आमची धम्मसेवा आहे. या प्रवासात आमच्यासोबत उभं राहिलेल्या प्रत्येकाचा आम्ही ऋणी आहोत

       ज्योत विझलेली नाही — ती पुन्हा पेटणार आहे. अधिक तेजस्वीपणे.

     –  तुमचा किशोर जोरगेवार 

    राजकारणाचा बळी अम्मा कि पढाई

    ज्या राजकीय पक्षांनी अम्मा कि पढाई या केंद्राला विरोध केला त्यांनी कदाचित आयुष्यात एकही गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली नसेल, शिक्षणाचं महत्व काय हे बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वर्गाला पटवून दिले होते मात्र आज राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या धोरणावर टीका करताना दिसत आहे. राजकीय पक्षांनी या विरोधाच्या माध्यमातून गोरगरीब मुलांचे भविष्य उध्वस्त केले आहे.

  • Kishor Jorgewar on Amma Chowk controversy । “अखेर मौन सोडलं! जोरगेवारांनी दिलं अम्मा चौक वादावर सडेतोड उत्तर!”

    Kishor Jorgewar on Amma Chowk controversy

    Kishor Jorgewar on Amma Chowk controversy : चंद्रपूर – शहरात सध्या सुरु असलेला अम्मा चौक प्रकरणाचा वाद आता दीक्षाभूमी पर्यंत पोहोचला आहे, कांग्रेस व आम आदमी पक्षाने या वादात आमदार किशोर जोरगेवार यांना चांगलेच धारेवर धरले अश्यातच पीरिपा ने आंबेडकर महाविद्यालयात सुरु असलेल्या अम्मा कि पढाई उपक्रम तात्काळ बंद करावा अन्यथा आम्ही बंद पाडू असा इशारा दिला. अश्यातच या वादावर आमदार जोरगेवार यांनी मौन सोडलं. Amma Chowk naming dispute

    ज्यांच्या नावाने वाद त्या अम्मा आहे तरी कोण?

    सात मजली इमारतीजवळ आमदार जोरगेवार यांच्या आई दिवंगत गंगुबाई उर्फ अम्मा ह्या टोपल्या विकायच्या, अम्मा यांनी टोपल्या विकून आपल्या परिवाराचा गाडा पुढे नेला होतो, विशेष बाब म्हणजे किशोर जोरगेवार हे आमदार झाल्यावर सुद्धा त्या टोपल्या विकत होत्या. मोठे झाले तर माजू नका आणि आपल्या कामावर कधी लाजू नका असा संदेश त्यांनी अनेकांच्या मनात रुजविला. गोर गरीब व निराधार नागरिकांसाठी त्यांनी अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमातून दररोज ३०० च्या नागरिकांना जेवणाचा डब्बा घरपोच पोचविल्या जातो. त्यानंतर अम्मा कि दुकान निराधार महिलांसाठी सुरु केलेला उपक्रम. Amma Ki Dukan scheme

    चंद्रपुरात आता इव्हेन्ट आमदार मार्ग

    अम्मा स्वतः अशिक्षित राहिल्या मात्र त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपल्या मुलांना कसे वावरायचे याचे धडे दिले. आता आमदार जोरगेवार यांनी नुकतेच अम्मा कि पढाई हा स्पर्धात्मक परीक्षा केंद्र सुरु करीत बेरोजगार युवकांना स्पर्धात्मक शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण देणे सुरु केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल फुटपाथ असोसिएशन ने घेत त्या जिथे टोपल्या विकायच्या तिथेच अम्मा चौक स्मारक व्हावा यासाठी मनपाकडे प्रस्ताव दिला, मनपाने सर्व संमतीने प्रस्ताव पारित केला व अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरु केले.

    या अम्मा चौक ला शहर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी विरोध करीत गांधी चौकाला नामशेष करण्याचा हा आमदाराचा प्रयत्न आहे, सदर काम पुरातन विभागाची परवानगी न घेता सुरु असल्याने तिवारी यांनी मनपा व पुरातन विभागाकडे याबाबत लेखी तक्रार देत अम्मा चौक स्मारकाचे काम थांबविले. तसेच अम्मा चौक बाबत आंबेडकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस काम सुरु असल्याबाबत आम आदमी पक्षाने यावर आक्षेप घेतला. त्यावर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी ते सौंदर्यीकरनाचे काम सुरु असल्याबाबत सांगितले. असा व्हिडीओ समाजमाध्यमात मनपाद्वारे न देता भाजप पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केला. Amma Chowk memorial protest by Congress

    ज्यांना काम नाही ते आरोप करतात

    आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांच्या फैरी वर त्यांनी अखेर मौन सोडलं, भाजपची नवी कार्यकारणी जाहीर होताच आज याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकारांनी अम्मा चौक बाबत सुरु असलेल्या वादावर प्रश्न केला असता आमदार जोरगेवार म्हणाले कि, कष्टकरी दलित महिलेच्या सामाजिक कार्यावर फुटपाथ असोसिएशनने मनपाला अम्मा चौक निर्माण व्हावा याबाबत मागणी केली, मनपा ने दखल घेत सदर मागणी मंजूर केली त्या मागणीला तथाकथित कांग्रेसचे पदाधिकारी ज्यांना कसलेही काम नाही त्यांनी विरोध दर्शविला. अम्मा चौक न व्हावा असे कांग्रेसला वाटत असेल तर माझा काही आग्रह नाही कारण चौकाला अम्मा चं नाव दिल तर त्या मोठ्या होणार नाही आणि नाव दिल नाही तर त्या छोट्या होणार नाही, याबाबत मनपाने निर्णय घ्यावा. Kishor Jorgewar on Amma Chowk controversy

    अम्मा कि पढाई केंद्राला काहींनी विरोध करणे सुरु केले आहे त्यावर आमदार जोरगेवार यांनी स्पष्टीकरण दिले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या विचाराला केंद्रस्थानी घेत आंबेडकर महाविद्यालयाच्या मागील बाजूस च्या रूम खाली आहे त्याठिकाणी हा सामाजिक उपक्रम सुरु केला. त्यावर आक्षेप घेणारे हे तथाकथित सोडलेले लोक आहे.

  • Amma Ki Padhai education initiative । ‘अम्मा की पढ़ाई’ – गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!

    Amma Ki Padhai education initiative

    अम्मा की पढाई – विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम – आ. किशोर जोरगेवार

    Amma Ki Padhai education initiative : चंद्रपूर – आज या सभागृहात बसलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकता, आत्मविश्वास आणि एक वेगळी चमक दिसते आहे. ही केवळ एका चाचणीची मुलाखत नव्हे, ही भविष्यातल्या उज्वल वाटचालीची सुरूवात आहे. ‘अम्मा की पढ़ाई’ या उपक्रमाची कल्पना मनात आली, तेव्हा एकच गोष्ट विचारात घेतली  आपल्याला केवळ अभ्यासासाठी संधी देणं पुरेसं नाही, तर त्या संधीला स्वप्नांची दिशा देणं तितकेच महत्त्वाचे आहे. ‘अम्मा की पढ़ाई’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नव्हे, तर भविष्याचं स्वप्न देणारा उपक्रम ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. free coaching schemes for poor students

    चंद्रपूर शहरात जड वाहनांना नो एंट्री?

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. चाचणी परीक्षेतून तीन हजार विद्यार्थ्यांपैकी ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आज, रविवारी आंबेडकर महाविद्यालयात सदर विद्यार्थ्यांच्या मुलाखत सत्राचे आयोजन करण्यात आले होते. coaching classes for economically weaker students

    यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ‘अम्मा की पढ़ाई’ ट्रस्टचे उपाध्यक्ष निवृत्त प्रा. संजय बेले, सचिव सुमीत बेले, सहसचिव अ‍ॅड. राहुल घोटेकर, कोषाध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, विश्वस्त नायब तहसीलदार प्रतीक बोर्डे, राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, पोलीस उपनिरीक्षक अंजली सुमीत बेले, अजय जयसवाल, प्रसाद जोरगेवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, पवन सराफ आदींची उपस्थिती होती.

    free coaching schemes for poor students

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजची पिढी ही शिक्षणाच्या बाबतीत एका स्पर्धात्मक युगात आहे. आपल्या या उपक्रमात ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पण ज्यांची निवड झाली नाही, ते सुद्धा विजेते आहेत. तुम्ही तुमच्या आतल्या इच्छाशक्तीला जाग दिलं आहे, हेच खरं यशाचं बीज आहे. येथे दरमहा उत्तम मार्गदर्शक आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यात निवड न झालेले विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात.

    अम्मा की पढ़ाई म्हणजे आईच्या मायेचा, त्यागाचा आणि शिक्षणाच्या महत्त्वाचा संगम आहे. हा उपक्रम फक्त पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नाही, तर स्वप्न बघायला शिकवणारी, स्वप्नांसाठी झगडायला शिकवणारी आणि त्या स्वप्नांना वास्तवात उतरवायला शिकवणारी मोहिम आहे. आपण एका नव्या शिक्षण संस्कृतीची पायाभरणी करत आहोत, जिथे विद्यार्थी आपले कर्तृत्व दाखवतील, देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलतील, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. education empowerment programs for backward class

    शिक्षण अपुरं राहिल्याचं दुःख – आ. जोरगेवार

    दहावी उत्तीर्ण केल्यानंतर अकरावीत प्रवेश घेतला होता, पण आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण करता आलं नाही. आज माझ्या नावासमोर ‘शिक्षण – अपुरं’ असा कॉलम उरतो आणि ते दुःख आजही मनाला सलतं, अशा भावनिक शब्दांत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मनातील वेदना मांडल्या.

    पुढे परिस्थिती बदलली, शिक्षण पुन्हा घेता आलं असतं. पण मी मुद्दाम शिक्षण घेणं टाळलं. कारण अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाच्या अनुभवातूनच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचं दुःख अधिक समजू शकलो. त्यांच्या वेदना माझ्या स्वतःच्या झाल्या. आणि म्हणूनच या उपक्रमाची संकल्पना पुढे आली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. Amma Ki Padhai education initiative

    आमचं स्वप्न अपुरं राहिलं, पण तुमचं स्वप्न आम्ही अपूर्ण होऊ देणार नाही. परिस्थितीमुळे कुणाचं ‘अधिकारी’ बनण्याचं स्वप्न थांबू नये, म्हणून ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल, मार्गदर्शन दिलं जाईल आणि त्यांना आयुष्यात उभं करण्यासाठी संपूर्ण पाठबळ दिलं जाईल,असा विश्वासही आमदार जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • free mpsc coaching for poor students । अम्मा कि पढाई, गरजू विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धात्मक परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

    free mpsc coaching for poor students

    free mpsc coaching for poor students : चंद्रपूर –  गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना  एमपीएससी, पोलीस भरती, आर्मी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढ़ाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चाचणी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

    चंद्रपूर मनपा हद्दीत ५४ जीर्ण इमारतींना नोटीस

    13 एप्रिल रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर ही चाचणी परिक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 21 एप्रिल रोजी उत्तरतारीखा प्रसिद्ध करण्यात आली. 26 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गुणवत्तानिहाय सिमारेषा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवडलेल्या 300 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

    जून महिन्यात सुरु होणार प्रशिक्षण

    जून महिन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य, तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत. free army recruitment coaching for needy students

    आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई (Amma ki padhai) उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांना गळा घालतात, त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वासात आणि कौशल्यात वाढ करणे, हेच आमचे ध्येय आहे. अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. free coaching for competitive exams for underprivileged

    या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

     गुणवत्ता निहाय गुणांची सीमारेषा सर्वसाधारण वर्गासाठी 62 गुण , महिलांसाठी 58, बीपीएलसाठी 57, दिव्यांगांसाठी 32 आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 21 गुण ठेवण्यात आली. यानुसार 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.