Blog

  • BJP strategy in cooperative bank elections । राजकीय इतिहासात नवा अध्याय! भाजपने सहकार क्षेत्रात दाखवली ताकद

    BJP strategy in cooperative bank elections

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात सर्व विजय संचालकांचा सत्कार

    BJP strategy in cooperative bank elections : तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर ३ संचालक भाजप पुरस्कृत आहेत. या निवडणुकीसाठी आमदार किर्तिकुमार भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रभावी रणनिती आखली होती. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत आता (bjp)भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाचा निवडणुकीचा निकाल जाहीर

                या विजयानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त संचालकांचा आमदार जोरगेवार (kishor jorgewar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गांधी चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. cdcc bank chandrapur

    १३ वर्षानंतर निवडणूक

              जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील १३ वर्षांपासून रखडली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने सर्व ताकद पणाला लावत, आपल्या विचारसरणीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले. या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आमदार भांगडिया आणि आमदार जोरगेवार यांनी काटेकोर नियोजन करत रणनीती आखली होती.

               काल (१० जुलै) रोजी मतदान पार पडल्यानंतर आज (११ जुलै) निकाल जाहीर झाला. यात भारतीय जनता पक्षाचे सुदर्शन निमकर, संजय डोंगरे, नंदा अल्लूरवार, गजानन पाथोडे, यशवंत दिघारे, उल्हास करपे, प्रा. डॉ. ललित मोटघरे, आवेश पठाण, गणेश तर्वेकर, रोहित बोमावार, निशिकांत बोरकर, हे उमेदवार संचालक म्हणून विजयी झाले आहेत.

               या यशानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला असून, या विजयामुळे जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

              चंद्रपूर जिल्हा बँकेची 100 वर्षांपूर्वी कै.धनंजयराव गाडगीळ यांचे प्रेरणेतून कै. श्रीराम जाणी,बाबा आमटे ,जा.या.पाटील, श्रीधर पद्मावार, केशवराव नाकाडे या सारख्या श्रद्धेय मान्यवरांनी स्थापना केली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारास फार मोठा ईतिहास आहे. ही निवडणूक सोपी नव्हती. दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपच्या विचारसरणीची मुहूर्तमेढ रोवायची होती. त्यासाठी आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.

    आपल्याला आता या बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणायची आहे, शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक आणि सर्वसामान्य सदस्य यांना न्याय द्यायचा आहे.  बँकेचा विकास, अर्थसहाय्य योजना, कर्ज वितरणात पारदर्शकता आणि गरीब, वंचित घटकांसाठी अर्थसहाय्य या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करणार आहोत असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रकाश देवतळे, मनोहर पाहूनकर, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राजू पाटील झाडे, आमीन धामण्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य लाभले. 

  • Power restoration during flood conditions । “पाण्यात बुडालं गाव… पण वीज आली वेळेत! महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा धाडसी पराक्रम”

    Power restoration during flood conditions

    Power restoration during flood conditions : चंद्रपूर, ११ जुलै, २०२५: महावितरणचे कर्मचारी दररोज आपल्या जीवाची पर्वा न करता, विशेषतः पावसाळ्यात, जोखमीची कामे करत असतात. बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे वीजपुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत, खंडित झालेला वीजपुरवठा काही तासांतच सुरळीत केला आणि ग्राहकांकडून कौतुकाची थाप मिळवली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचे निकाल जाहीर

    गावाभोवती पुराची परिस्थिती असताना, सर्वत्र पाणीच पाणी साचलेले असताना, मानवी गरजांपैकी एक महत्त्वाची गरज असलेली विद्युत व्यवस्था सुरू राहणार की नाही, हा नागरिकांच्या मनातील एक मोठा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत वीज येणारच नाही, असे नागरिक गृहीत धरतात, कारण या पुराच्या पाण्यात जर विद्युत पुरवठा खंडित झाला, तर आपला जीव धोक्यात घालून तो सुरळीत कोण करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. MSEDCL flood emergency response team efforts

    परिस्थिती कशीही असो, महावितरणचे कर्मचारी अशा परिस्थितीतही नागरिकांना अंधारात न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि पुराच्या परिस्थितीतही जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करतात. अशीच एक घटना गेल्या दोन दिवसांत गांगलवाडी वीज वितरण केंद्रात घडली आहे.

    बोटीच्या साहाय्याने कर्मचारी पोहोचले

    दिनांक ९ आणि १० जुलै, २०२५ रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्याखाली आलेल्या विद्युत व्यवस्थेला सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले. बोटीच्या साहाय्याने पुराच्या ठिकाणी जाऊन बंद झालेली विद्युत वाहिनी कापून, उर्वरित गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

    Risky duty by electricity board workers

    महावितरणच्या गांगलवाडी शाखेचे अधिकारी श्री. दिनेश हनवते (सहाय्यक अभियंता) आणि कर्मचारी श्री. बोंडेजी (मुख्य तंत्रज्ञ), श्री. राकेश मलोडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), श्री. आकाश नखाते (वरिष्ठ यंत्रचालक), श्री. बारेवाड (यंत्रचालक), श्री. रोहित करंजीकर (तंत्रज्ञ), श्री. सूरज खोब्रागडे (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. नागदेवते (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. सचिन चहांदे (बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ) आणि अन्य गांगलवाडी वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे हा विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

  • CDCC Bank Chandrapur Election Results । CDCC बँकेच्या निकालात धक्कातंत्र! एका मताने विजय, ईश्वरचिठ्ठीने नशिब उजळले

    CDCC Bank Chandrapur Election Results

    CDCC Bank Chandrapur Election Results : चंद्रपूर, ११ जुलै: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. २१ संचालक असलेल्या या बँकेत १३ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली, ज्यात एका मताने विजय आणि ईश्वरचिठ्ठीने निकाल असे प्रसंग घडले. या निकालानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बँकेवर बहुमत असल्याचा दावा करत अध्यक्षपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. chandrapur cooperative bank election results

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आप मैदानात

    आज सकाळी चांदा इंडस्ट्रियल सोसायटी येथे मतमोजणीला सुरुवात झाली. चंद्रपूर तालुका ‘अ’ गटाचा पहिलाच निकाल अत्यंत रोमांचक ठरला. काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी भाजपचे सुभाष रघाताटे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. चोखारे यांना १५, तर रघाताटे यांना १४ मते मिळाली. काल मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची घटनाही घडली होती.

    प्रमुख लढती आणि निकाल:

    • वरोरा तालुका ‘अ’ गट: या गटात जयंत टेमुर्डे यांनी बँकेचे विद्यमान संचालक डॉ. विजय देवतळे यांचा पराभव करत विजय मिळवला.
    • सिंदेवाही ‘अ’ गट: येथे निशिकांत बोरकर यांनी प्रकाश बन्सोड यांचा पराभव करून जागा पटकावली.
    • राजुरा ‘अ’ गट: भाजपचे माजी आमदार सुदर्शन निमकर आणि नागेश्वर ठेंगणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोघांनाही प्रत्येकी बारा मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, ज्यात निमकर विजयी झाले.
    • ‘ब’ गट दोन (सावली): या गटातून रोहित बोम्मावार यांनी विक्रमी २१३ मते घेत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात किशोर ढुमणे यांना ६७, तर उमाकांत धांडे यांना केवळ ९ मते मिळाली.
    • अनुसूचित जाती (SC) गट: ललित मोटघरे यांनी ५३२ मतांसह विजय संपादन केला.
    • अनुसूचित जमाती (STVJN) गट: यशवंत दिघोरे ३७२ मतांसह विजयी झाले. त्यांनी बँकेचे विद्यमान संचालक दामोदर रुयारकर (२६६ मते) यांचा पराभव केला.
    • इतर मागासवर्गीय (OBC) गट: गजानन वासुदेव पाथोडे यांना ३०० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्यामकांत सीताराम थेरे यांना २९८ मते मिळाली. political influence in cooperative bank elections

    बिनविरोध संचालक:

    या निवडणुकीपूर्वीच बँकेच्या १३ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभा धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे आणि आवेश खान पठाण यांचा समावेश आहे.

    अध्यक्षपदासाठी चुरस:

    जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निकालानंतर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी आपापले बहुमत असल्याचा आणि अध्यक्ष आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार असून, तोपर्यंत दोन्ही पक्षांचे लक्ष संचालक मंडळावर आहे. या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संचालक मंडळाचा “घोडेबाजार” होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. district cooperative bank chairman election news

    आता पाहूया, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची कोणत्या पक्षाच्या ताब्यात येते!

  • AAP election campaign in Maharashtra । 2025 निवडणुका : केजरीवालांच्या आदेशावरून ‘आप’ मैदानात उतरली, चंद्रपूर ते मुंबई – AAP चा बुलंद प्रचार

    AAP election campaign in Maharashtra

    AAP election campaign in Maharashtra : आम आदमी पार्टी येत्या काळात चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका कोणत्याही युतीशिवाय लढवेल आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्याची अधिकृत तैयारी सुरू झाली आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रभारी दिल्ली आमदार प्रकाश जारवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

    चंद्रपुरातील अवैध सावकारांचा गेम ओव्हर

    आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा कार्यभार सोपवला आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जात आहे. बैठकां मध्ये पार्टीला मजबूत करणे, निवडणूक रणनीती ठरवणे, आप चे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी जनजागृती करणे, सर्वसामान्यांशी संपर्क वाढवणे, शहरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अधिकायांशी संपर्क साधणे याची कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. aam aadmi party Maharashtra 2025 elections

    सांडपाणी योजनेत मोठा घोळ

    चंद्रपूर शहरात ४५० कोटींची अमृत कलश योजना आणली गेली पण अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरत आहेत. सांडपाणी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. सरकारी निधीचा वापर जनतेच्या गरजा आणि सेवा पूर्ण करण्यासाठी करण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधी त्याचा वापर विशेष व्यक्तींच्या घरांचे रक्षण करण्यासाठी करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या विकासकामांच्या निविदा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या जवळच्यांना दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचारही समोर येत आहेत.

    शहरातील बहुतेक सरकारी शाळा जीर्ण अवस्थेत आहेत, रस्ते खराब आहेत, मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही आहे, सरकारी रुग्णालयातील महत्त्वाच्या मशीना बंद स्थितित आहेत परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. लोकांपर्यंत पोहोचणाया योजनांऐवजी त्या फक्त कागदावरच राहिल्या जात आहेत असा आरोप आमदार जारवाल यांनी केला. लोकशाही, विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जनहितासाठी काम करण्यासाठी ‘आप’ने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करून कोणत्याही युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. upcoming Zilla Parishad elections 2025 Maharashtra


    पत्रकार परिषदेला अजित फाटक, भूषण ठाकूरकर, सुनील मुसळे, योगेश गोखरे, राजू कुडे, मयूर राईकवार, तबस्सुम शेख आदी उपस्थित होते.

  • chandrapur illegal moneylenders police action । ✊ ‘तुमची मालमत्ता तुमच्याकडेच’ – पोलिसांची सावकारविरोधी मोहीम सुरू

    chandrapur illegal moneylenders police action

    chandrapur illegal moneylenders police action : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारांचा सुळसुळाट असून या सावकारांच्या जाचाला आजपर्यंत अनेक नागरिक बळी पडत आहे, अश्याच काही प्रकरणात चंद्रपुरातील ८अवैध सावकारांवर विविध कलमांव्ये दुर्गापूर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चंद्रपूर शहरात १७५ किलो प्लास्टिक जप्त

    अवैध सावकारी करणारे सावकार –

    ऋषिराज सोमाणी, रोहित सोमाणी, सुनीता राधेश्याम सोमाणी, राधिका सोमाणी, अजय हर्षदारय संघवी, प्रीती मनोज संघवी, स्तुती ऋषिराज सोमाणी आणि अशोक मुलजीभाई ठक्कर.

    चंद्रपूर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा व चंद्रपूर पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे कि शेतजमीन, प्लॉट, घर किंवा जंगम मालमत्ता अवैध सावकाराकडून बळकावली असल्यास त्यांनी लेखी तक्रार व आर्थिक गुन्हे शाखा दुर्गापूर मध्ये उपस्थित राहून द्यावी.

    सावकार विरुद्ध गोपनीय माहिती द्यायची असल्यास तक्रारकर्त्याचे किंवा माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अधिक माहिती द्यायची असल्यास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि सचिन यादव मोबाईल क्रमांक ९५९४०८३१४१ वर संपर्क साधावा.

  • school route flooded in railway underpass । 🚨 रेल्वे बोगद्यात पाण्याचा पूर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    school route flooded in railway underpass

    school route flooded in railway underpass : गडचांदूर : सततच्या पावसामुळे गडचांदूर परिसरातील होली फॅमिली शाळेजवळ असलेल्या मार्गावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

    पवनी प्रकल्पग्रस्तांची मागणी पूर्ण होणार? लवकरच मिळणार न्याय

    होली फॅमिली शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज गुडगाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. बोगद्यात पाणी साचल्याने त्यांचा शाळेत जाण्याचा व येण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे.

    पालक चिंतेत

    विद्यार्थ्यांचे पालक यामुळे चिंतेत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती निर्माण होत असूनही उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. हा मार्ग लखमापूर गावाकडे जातो या मार्गावर अल्ट्रटेक सिमेंट कंपनीच्या माल वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे.

    त्या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावं लागत आहे

  • coal project land acquisition injustice । पवनी प्रकल्पग्रस्तांची मोठी विजयाची दिशा? प्रशासनाला ४ आठवड्यांत अहवाल द्यावा लागणार!

    coal project land acquisition injustice

    coal project land acquisition injustice : राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात असलेल्या पवनी गावात जवळपास २८० हेक्टर जमीन होती. त्यातील पवनी-II कोळसा खाण प्रकल्पासाठी वेकोलीने २०३.७७ हेक्टर जमीन संपादित केली आहे. मात्र उर्वरीत ७७ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडे असून ती चारही बाजूंनी कोळसा प्रकल्पामुळे वेढलेली आहे.

    पिकांवर हुमणी अळीचा कहर. कृषी विभागाने सांगितले हे उपाय

    ही जमीन शेती अथवा वास्तव्याच्या दृष्टिकोनातून वापरण्यायोग्य राहिलेली नाही. दरम्यान वारंवार पत्रव्यवहार करून देखील वेकोलीचे अधिकारी काहीही उत्तर देत नव्हते. या अन्यायाविरुद्ध पवनी येथील पीडित शेतकरी राजेश उलमाले, उषा चन्ने, विजय पोटे, दिनकर मालेकर यांच्यासह ३५ शेतकऱ्यांनी माननीय महाराष्ट्र लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली. मा. न्यायमूर्ती श्री. वि. मु. कानडे यांच्या उपस्थितीत आज सुनावणी पार पडली. lokayukta order for report on pavni land acquisition dispute

    अर्जदारांच्या वतीने ॲड. दीपक चटप यांनी युक्तिवाद सादर करत वेकोली प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. या सुनावणीत वेकोलीचे वरीष्ठ अधिकारी तसेच चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. निलेश व्यवहारे हे देखील उपस्थित होते.या सुनावणीत मा. न्यायमूर्ती श्री. वि. मु. कानडे यांनी ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून पुढील सुनावणी ११ सप्टेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे.

    पवनी येथील सरपंच पांडुरंग पोटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी उर्वरित जमीन संपादित करण्याचा ठराव घेतला आहे. तक्रारकर्ते राजेश उलमाले व अन्य शेतकरी हे वारंवार पाठपुरावा करीत असून यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसते.

    प्रकरणाची पार्श्वभूमी:

    • ४ जून २०२२ रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत WCL अधिकाऱ्यांनी उर्वरित जमिनीचे संपादन करण्यास तोंडी सहमती दर्शविली होती.
    • अर्जदारांनी २१ जून २०२२ रोजी त्या बैठकीचे इतिवृत्त मागवले, परंतु आजतागायत पुरवले गेलेले नाही.
    • कोळसा मंत्रालयाकडे २०२२ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. कालांतराने उर्वरीत जमीन संपादित करणार नाही अशी वेकोलीने भूमिका घेतली.

    ॲड. दीपक चटप यांनी युक्तिवाद करताना पवनी येथील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रशासनाने शेतकऱ्यांना उत्तर न देणे ही बाब कर्तव्यात कसूर ठरणारी आहे. संविधानातील अनुच्छेद १४, २१ व ३००-अ नुसार घटनात्मक हक्कांचा भंग झालेला दिसतो. वापरायोग्य न राहिलेली जमीन देखील संपादित होणे आवश्यक ठरते. त्यासोबतच त्यांनी वेकोलीच्या हलगर्जीपणावर लक्ष वेधले. पवनी येथील उर्वरित जमीन तात्काळ संपादित करावी, वेकोलीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे अधिकृत इतिवृत्त पुरवावे, प्रशासनाच्या निष्क्रियतेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी असेही मांडले.

  • National Diarrhea Control Programme । 0 ते 5 वर्षाच्या मुलांकरिता चंद्रपूर महापालिकेचा आरोग्याचा महाउपक्रम!

    National Diarrhea Control Programme

    National Diarrhea Control Programme : चंद्रपूर 10 जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत दिनांक 2 जुन ते 31 जुलै 2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असुन या कालावधीत 0 ते 5 वर्षाच्या बालकांना ओ.आर.एस.(ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) व झिंक (Zinc) गोळ्यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी दिली.  

    चंद्रपुरात १७५ किलो प्लास्टिक जप्त

      चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात 5 वर्षाखालील बालकांची एकुण संख्या (मुले – मुली) 19053 आहे. या सर्व बालकांना ओ. आर. एस. (ORS) व झिंक (Zinc) ची गोळी देऊन अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शुन्य करणे, हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.अतिसारामुळे मुलांमध्ये निर्जलीकरण (dehydration) होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या मोहिमेद्वारे योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी गृहभेटीदरम्यान प्रत्येक बालकासाठी 1 ओ.आर.एस. (ORS) पाकीट हे बाळाला भविष्यात जुलाब, शौच झाल्यास वापरण्याकरीता पालकांना वापरण्याच्या माहितीसह देण्यात येत आहे. ORS Zinc distribution program Chandrapur municipal


      या मोहिमेत मनपाच्या 7 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात 170 आशा स्वयंसेविकांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येत असुन 0 ते 5 वर्षाखालील बालकांच्या मातांना अतिसाराचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन या विषयीची माहिती गृहभेटीदरम्यान देण्यात येत आहे.  


    प्रत्येक आरोग्य केंद्रात ओ.आर.एसचे महत्व सांगणारे ओआरटी कॉर्नर स्थापित करण्यात आलेले आहे तसेच आरोग्य सेविका मार्फत आरोग्य पोषण सत्रात व शाळेत हात धुण्याच्या योग्य पद्धतीची प्रात्यक्षिके दाखवुन महत्व समजाऊन सांगण्यात येत आहे.


      या अनुषंगाने बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र / दवाखाना / रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले आहे.  Asha worker ORS zinc distribution Chandrapur Monsoon campaign

    अतिसाराची लक्षणे :

    बालक अधिक आजारी होत असेल.
    अस्वस्थपणा, चिडचिडेपण
    डोळे खोल जाणे
    घटाघट पाणी पिणे,सतत तहानलेले असणे
    शौचद्वारे रक्त येत असल्यास
    ताप येत असल्यास.

    अतिसाराची कारणे :

    रासायनिक आणि उघडे पदार्थ
    शिळे अन्न सेवन
    दूषित पाणी पिणे
    अन्नाचे अपचन

    आपण काय करू शकता:

    आपल्या मुलांमध्ये अतिसाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
    ORS आणि झिंकचा वापर करा.
    आपल्या मुलाला पुरेसे द्रव द्या.
    आपल्या परिसरातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा आणि त्यांना सहकार्य करा

  • chandrapur plastic crackdown action update । दुकानदाराला ₹10,000 दंड, पुढच्यावेळी थेट जेल! चंद्रपूर मनपाची इशारा मोहीम

    chandrapur plastic crackdown action update

    chandrapur plastic crackdown action update :  चंद्रपूर 10 जुलै  – भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 175 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही तिसरी कारवाई असुन यापुढे साठा मिळाल्यास 25 हजार रुपये दंड व गुन्हा दाखल केला जाणार आहे.  

    चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टोलवसुली थांबवा – खासदार धानोरकर

         चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

    मनपाची सातत्याने कारवाई

    मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. chandrapur anti plastic drive news update

    ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा

        एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर,पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.  

  • Holotrichia serrata । पिकांवर हुमणीचा कहर! जिल्हा कृषी विभागाचे वाचवणारे सल्ले जाहीर

    Holotrichia serrata

    Holotrichia serrata : चंद्रपूर, दि. 10 जुलै : बहुभक्षीय हुमणी अळीच्या (Holotrichia serrata) प्रभावी व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हुमणी अळी ही जमिनीमध्ये राहून विविध खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी कीड असून, वेळेवर उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. how to use pheromone light trap for holotrichia serrata

    जिल्हाधिकारी गौडा पोहोचले पूरग्रस्त भागात

    होलोट्रीचिया प्रजातीच्या या अळीमुळे विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भात, गहू, ऊस, मिरची, वांगी, सुर्यफूल व अन्य पिकांमध्ये नुकसान होताना आढळते.

    पावसाळ्यात कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढील उपाय सुचवले आहेत :

    शेतीतील निरीक्षण आणि प्रकाश सापळ्यांचा वापर

    पावसानंतर सायंकाळी शेतातील बाभूळ, कडुलिंब व बोर झाडांखाली प्रकाश सापळे लावावेत. एका मादी भुंग्याचा नाश झाल्यास पुढील ४० ते ५० अळ्यांचा नाश होतो.

    फवारणीची शिफारस

    ज्या भागात सतत हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो, तिथे संबंधित झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. प्रत्येक झाडावर २० किंवा त्यापेक्षा अधिक भुंगे आढळल्यास नियंत्रणासाठी मोहीम हाती घ्यावी.

    प्रादुर्भावाचे निदान कसे करावे?

    शेतात एकरी २० ठिकाणी (१ फूट x १ फूट x ६ इंच खोलीचे) मातीचे नमुने घेऊन अळ्यांचा शोध घ्यावा. झाडांची पाने पिवळी पडून सुकल्यास आणि झाड कोलमडले असल्यास, ती झाडे उपटून मुळे कुरतडलेली आहेत का ते पाहावे.

    जैविक नियंत्रण उपाय

    तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास मेटॅरायझियम ही जैविक मित्र बुरशी ४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवावी किंवा १ किलो मेटॅरायझियम १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टरमध्ये वापरावे.

    रासायनिक उपाय योजना — गंभीर प्रादुर्भावासाठी

    जर प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात असेल, तर खालीलपैकी एक रासायनिक उपाय करावा : फिप्रोनील ४०% + इमिडॅक्लोप्रिड ४०% (दानेदार) – ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाजवळ ओतावे. कार्बोफ्यूरॉन ३% दानेदार – ३३.३० किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम ०.४% + बायर्फेनथ्रिन ०.८% – १२ किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम ०.९% + फिप्रोनिल २% – १२ ते १५ किलो प्रति हेक्टर

    वरील सर्व रसायने पिकाच्या खोडांजवळ जमिनीत मिसळावीत आणि वापराच्या वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. तसेच मजुरांना योग्य सुरक्षा साधने पुरवावीत.

    शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास हुमणी अळीच्या नियंत्रणात यश मिळू शकते, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.