Blog

  • road construction issues । आधी काम मग खोदकाम, आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    road construction issues

    road construction issues : चंद्रपूर – शहरातील सिवरेज लाईन आणि अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह पाहणी केली. शहरातील बहुतांश रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. खोदलेले रस्ते दुरुस्ती झाल्याशिवाय नवीण खोदकाम न करण्याचे सक्त निर्देश यावेळी त्यांनी अधिका-यांना दिले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

              यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता रविंद्र हजारे, एमजीपीचे कापसे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरणे, दिवाकर पूटड्डवार यांच्यासह कंत्राटदारांची व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याशिवाय पुढील कोणतेही खोदकाम सुरू करू नये. नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, आधी खोदलेले आणि निकृष्ट अवस्थेत असलेले रस्ते तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही निर्देश दिले. amrut scheme urban

    नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

     रस्त्यांची दुरवस्था, धुळीचे लोट, वाहतुकीतील अडथळे आणि पावसाळ्यात होणारे चिखलाचे साम्राज्य यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. कामे करताना जनतेचा त्रास कमी करण्याचे कर्तव्य प्रशासनाचे आहे. नागरिकांनीही जर डागडुजी न झाल्यास अशा नवीन खोदकामाला विरोध करावा असे आवाहनही आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    शहरातील पायाभूत सुविधांशी संबंधित ही कामे महत्त्वाची असली तरी त्याच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी दिसून येत आहेत. कामांची गुणवत्ता, वेळेत होणारी दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापन या सर्व बाबींवर लक्ष ठेवले जाईल, असे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवरी कॉलरी, महाकाली कॉलरी परिसरासह शहरातील इतर भागांची पाहणी केली

  • police crackdown on cattle trafficking gangs । 🔥 ३९ गोवंशांची सुटका, ३ आरोपी अटकेत – गडचांदूर पोलिसांचा ‘ऑपरेशन गो’ यशस्वी!

    police crackdown on cattle trafficking gangs

    police crackdown on cattle trafficking gangs : गडचांदूर – काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावरसहित कोट्यवधींचा मुद्देमाल महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर पकडला होता, आता पुन्हा गडचांदूर पोलिसांनी १२ जुलै रोजी ३९ गोवंश जनावरे सहित १९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत ३ आरोपीना अटक केली आहे.

    १२ जुलै रोजी गडचांदूर पोलिसांना गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा भोयगाव ते नारंडा या मार्गावर नाकेबंदी केली करून वाहनाची तपासणी करणे सुरु केले, काही वेळात त्याठिकाणी mh४० TC ४८१२ आयशर वाहन आले, पोलिसांनी वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये ३९ गोवंश जनावरे क्षमतेपेक्षा अत्यंत निर्दयपणे डांबून नेत होते. illegal cattle trade seized 39 animals

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपची रणनीती

    १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

    गडचांदूर पोलिसांनी आयशर चालक सहित ४ आरोपींवर गुन्हा नोंदवित गोवंश जनावरांची सुटका केली. पोलिसांनी हाफिज खान गुफरान खान, करीम खान नबी खान व सादिक नवाब खान तिघे राहणार गडचांदूर यांना अटक करण्यात आली तसेच नागपुरातील पाहिजे असलेला आरोपी शेख इब्राहिम शेख इस्माईल वर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी १९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि राधिका गायकवाड, पोलीस कर्मचारी शीतल बोरकर, बळवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सूरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे, श्रीनिवास सोडणार, रमेश कार्लेवाड यांनी केली.

  • BJP meeting former councillor for civic polls । चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ताकद एकत्र, जोरदार तयारी सुरू!

    BJP meeting former councillor for civic polls

    BJP meeting former councillor for civic polls : चंद्रपूर – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवकांची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनसंपर्क वाढविण्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना केल्या. Kishor Jorgewar election strategy Chandrapur

    मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहीम माहिती

    या बैठकीला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप नेते अशोक जिवतोडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, दशरथ सिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, रवी जोगी, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्नील डुकरे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य तुषार सोम, वनिता कानडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते.

    या बैठकीत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रभागातील स्थानिक समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. civic issue resolution in municipal elections

    संघटितपणे काम करा

    यावेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आपण केलेले काम आता प्रभावीपणे प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवा. पक्षाचे विचार प्रत्येक घरी पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. व्यक्तिकेंद्रित काम न करता पक्ष म्हणून संघटितपणे काम करा. पक्ष, जनसंपर्क आणि परिश्रम हा निवडणूक जिंकण्याचा मंत्र आहे, असे आवाहन त्यांनी सर्व माजी नगरसेवकांना केले.

    समस्या व नागरिकांच्या अपेक्षा जाणून घ्या

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, आजची ही बैठक केवळ निवडणूक तयारीची नाही, तर आपल्या एकत्रित ताकदीचा आणि पक्ष संघटनेच्या दृढतेचा संकल्प करण्यासाठी आहे. आपल्या प्रत्येक प्रभागातील समस्या, कार्यकर्त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा या सगळ्या आपण प्रत्यक्ष जाणून घेतल्या पाहिजेत. लोकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडवणे हीच आपल्या कामाची खरी ओळख आहे. आपण एकसंघ राहून काम केले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल तुषार सोम यांचा सत्कार करण्यात आला.

  • cataract free Maharashtra mission details । 💥 “मोतीबिंदू” संपवण्याची सुरुवात! महाराष्ट्रात ऐतिहासिक आरोग्य मोहीम

    cataract free Maharashtra mission details

    cataract free Maharashtra mission details : चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदुची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम जिल्हा सामान्य रुग्णालय व कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ही मोहीम 22 जुलै ते 22 ऑगष्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदु रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    यासंदर्भात आज (दि.12) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांची व्ही.सी. द्वारे सभा घेवून अधिनस्थ अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी यांना सदर मोहिमेचे उद्दिष्ट, नियोजन व अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.

    मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे : 

    मोतीबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, गरजु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे व जनजागृती वाढविणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरीकांपर्यंत सेवा पोहचविणे हे आहे.

    संपूर्ण जिल्हाभर या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका यांच्यामार्फत गृहभेटी देवून मोतीबिंदुग्रस्त रुग्णांना शोधून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदुग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मोफत उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

  • parent teacher meeting in ZP schools । जिल्हा परिषद चंद्रपूरचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    parent teacher meeting in ZP schools

    parent teacher meeting in ZP schools : चंद्रपूर, दि. 12 : आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा अधिकार प्रत्येक पालकांना आहे. विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय राहण्यासाठी पालकसभा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालक सभा आयोजित करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नूतन सावंत, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, राजेश पाताळे,  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, अधिव्याख्याता वैशाली येगलोपवार, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गटशिक्षणाधिकारी व सर्व विषय सहायक उपस्थित होते.

    एका आठवड्यात पालकसभा

    पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय रहावा व पालकांना आपल्या पाल्याची प्रगती व अडथळे यांची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालकसभांचे आयोजन करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शाळेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण पालकसभेत पेपर दाखवून देण्यात येणार आहे. या पालकसभा 31 ऑगस्ट व 31 नोव्हेंबर 2025 तसेच 31 जानेवारी व 31 एप्रिल 2026 ला घेण्यात येणार आहे. parent teacher coordination for student progress

    पालक सभा वर्ग स्तरावर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यात होणाऱ्या पालकसभांचे नियोजन करतील. संपूर्ण जिल्ह्यातील पालकसभेत सुसूत्रता राहावी, यासाठी जिल्हा स्तरावर सूचनापत्रक निर्गमित करण्यात येईल. पालक सभेचे आयोजन प्रभावी पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

  • Green Maharashtra Prosperous Maharashtra । 🌍 पर्यावरणासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम – तुम्ही पाहिलं का?

    Green Maharashtra Prosperous Maharashtra

    Green Maharashtra Prosperous Maharashtra : चंद्रपूर, दि. 12 : राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण 21.25 टक्के आहे.

    जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतुबदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानांतर्गत कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात 1501 वृक्ष लागवड करण्यात आली.

    साथी अभियानामुळे चंद्रपुरात घडतोय बदल

    1501 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

    सदर वैद्यकीय महाविद्यालयाला ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानांतर्गत 1500 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद कुचेवार यांनी संस्थेतील सर्व अध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी योग्य समन्वय साधून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. तसेच कर्मवीर मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील नवीन परीसरातील खुल्या जागेमध्ये 1501 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पार पाडले.

    यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिद कांबळे, प्राध्यापक डॉ. शरद कुचेवार, डॉ. प्रिती पुप्पलवार, डॉ. बी.बी. भडके, डॉ. अरुण हुमणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. निवृत्ती जिवने, डॉ. अजय चंद्रकापूरे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुलेश चांदेकर, डॉ. नादीया नुर अली संस्थेतील इतर अधिकारी व कर्मचारी  तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नवीन परीसरातील खुल्या जागेत लावण्यात आलेल्या सर्व 1501 झाडांचे योग्य संगोपन, देखभाल व देखरेख करण्याच्या सूचना संबंधित बांधकाम कंपनी शापुरजी पालनजी यांना देण्यात आल्या.

  • Sathi Abhiyan chandrapur । ‘साथी अभियान’ चंद्रपूरमध्ये बदल घडवतंय – 300 हून अधिक मुलांना मिळाला नवा आधार!

    Sathi Abhiyan chandrapur

    Sathi Abhiyan chandrapur : चंद्रपूर, दि. 12 : निराश्रीत बालकांना ओळख आणि प्रतिष्ठा, त्यांची आधार नोंदणी, बालकांचे कायदेशीर सक्षमीकरण आणि शाळाबाह्य गरीब वस्तीत राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले प्राथ व उच्च प्राथ शाळा, चंद्रपूर येथे आधार कार्ड शिबीर घेण्यात आले. 

    बल्लारपुरात स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाणे

    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून महिला बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन  प्रोजेक्ट,  हृदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या प्रभारी सचिव ए.  झेड. खान तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे,  जिल्हा परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, अजय साखरकर, मुख्याध्यापिका भारती पाजणकर, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे उपस्थित होते.

    शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे मत खान मॅडम यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनीही मार्गदर्शन करताना, शासन तुमच्या सदैव पाठीशी राहील. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करून बालकांना शाळेत विशेष प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा,  असे प्रतिपादन केले. यावेळी न्यायाधीश खान व महिला बल विकास अधिकारी भस्मे यांच्या समक्ष शाळेतील तक्रार पेटी उघडण्यात आली.  DLSA child welfare initiatives in Maharashtra

    निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण

    निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण करण्याचे काम ” साथी अभियान ” अंतर्गत सुरू आहे. यावेळी प्रकाश नगर, अष्टभुजा वॉर्डातील मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले.  सदर साथी अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वस्त्यांमध्ये सामाजिक सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त बालकांची नोंदणी करण्यात आली. aadhaar card camp for school dropout kids

    कार्यक्रमाचे संचालन  शशिकांत मोकाशे यांनी केले तर आभार मारोती दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला संध्या तोगर, अजय पवार, मारोती कोसे, विवेक चिमूरकर, राणी मेश्राम, रश्मी भोयर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा प्रशासनाचा विशेष सहभाग लाभला.

  • demand for independent GRP police station । १२० किमी दूर जीआरपी ठाणं! आता बल्लारशाहला हवं स्वतंत्र पोलिस स्टेशन!

    demand for independent GRP police station

    demand for independent GRP police station : चंद्रपूर, दि. १२ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या माध्यमातून आ. मुनगंटीवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा शासन दरबारी ठामपणे मांडत आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

    अत्याचार आणि व्हिडीओ व्हायरल, चंद्रपुरात थक्क करणारा गुन्हा

    यासंदर्भात सदस्य रेल्वे उपभोगता सल्लागार समिती ( झेडआरयुसीसी) मध्य रेल्वे मुंबईचे श्री.अजय दुबे यांनी हा विषय आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या विषयाची गांभीर्याने दखल घेत आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची लेखी विनंती सादर केली. independent GRP police station

    दररोज ३ हजार प्रवाशी

    या निवेदनात त्यांनी नमूद केले की, बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील एक अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथे दररोज ३००० हून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सध्या येथे केवळ जीआरपीची आऊट पोस्ट कार्यरत असून, तिची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित आहे. या ठिकाणी जवळचे जीआरपी स्टेशन वर्धा येथे आहे. ते तब्बल १२० किमी अंतरावर आहे. वर्धा जीआरपीचे कार्यक्षेत्र राजुरा आणि यवतमाळपर्यंत पसरले असून, एकूण १९ रेल्वे स्थानके यामध्ये समाविष्ट आहेत. railway passenger safety

    स्वतंत्र पोलीस ठाणे गरजेचे

    रेल्वे स्टेशनवर गंभीर घटनांचे प्रमाण वाढत असताना, स्वतंत्र पोलिस स्टेशन नसल्यामुळे तपास प्रक्रिया, प्रवाशांच्या मदतीसाठीची तत्परता आणि एकूणच कायदा-सुव्यवस्था यावर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाण्याची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

    आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे करण्यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  • minor gangrape case chandrapur । अत्याचार, व्हिडीओ, व्हायरल… चंद्रपूर हादरवणारा गुन्हा!

    minor gangrape case chandrapur

    minor gangrape case chandrapur : चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना ११ जुलै रोजी समोर आली. याप्रकरणी शेगाव पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, तिघांना अटक केली आहे. स्वप्निल राजकुमार गुर्जेलवार (२३), गणेश राजेंद्र विश्रामकर (२४, दोघेही रा, समूद्रपूर, जि. वर्धा) व रोहन गजानन विश्रामकर (२४, रा. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालात ईश्वरचिठ्ठीने विजय

    शेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२५ रोजी पीडित अल्पवयीन मुलीला तिघांनी शेतशिवारात नेऊन बलात्कार केला. एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडीओ तयार केला. शुक्रवारी हा व्हिडीओबाबत पीडित मुलीच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनी शेगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. सदर अत्याचाराचा व्हिडीओ एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये आला होता, त्यांनतर हा झपाट्याने व्हायरल झाला. तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी समयसूचकता दाखवली. legal action against minor rape accused

    चंद्रपूर पोलिसांनी सदर अत्याचाराचा व्हिडीओ किंवा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करू नये, पोलिसांना सहकार्य करा, जर व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    पॉक्सो गुन्हा, तिघांना अटक

    पोलिसांनी तिघांवर कलम ७० (२), १२३, भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ४, ६ पोक्सो कायदा, सहकलम ६६ (ई) ६७ (अ) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

    पोलिसांच्या तपासात अनेक खुलासे होणार

    या गंभीर प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे, याबाबत अद्याप प्रकरणाची सत्यता काय? हे कळू शकले नाही. जर हा व्हिडीओ बाहेर आला नसता तर गुन्हा दाखल झाला नसता. आरोपींनी २ महिन्यांनंतर व्हिडीओ समाजमाध्यमावर का टाकला? आरोपी पीडितेच्या ओळखीचे आहे काय? याबाबत अनेक प्रश्नांचे उत्तर पोलिसांच्या तपासात पुढे येणारचं.

  • use of AI in municipal administration । “सरकारी कामकाजात ChatGPT, Canva, Myca AI चा वापर! काय आहे चंद्रपूर पॅटर्न?”

    use of AI in municipal administration

    use of AI in municipal administration : चंद्रपूर १२ जुलै – राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या “150 दिवस कार्यक्रम” अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्रशासनात नावीन्यपूर्ण बदल घडवून आणत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर विविध विभागांमध्ये सुरू केला आहे. यामुळे नागरिक सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत मिळत आहे. AI initiatives under 150 day governance program

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालात धक्कातंत्र

       मागील काही दिवसात एआयची मदत घेऊन कोण-कोणत्या विभागात कशापद्धतीने बदल घडवून कामाची गती वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. मनपाच्या प्रत्येक विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या विभागाचे काम कसे सुलभ करता येईल तसेच काय नावीन्यपूर्ण बदल करता येईल याचे पीपीटीद्वारे सादरीकरण आयुक्तांपुढे केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पक वापर करणाऱ्या विभागांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.

            बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग,यांत्रिकी,कोर्ट विभाग,जनसंपर्क विभाग,आस्थापना,निवडणूक,स्टोर विभाग, अतिक्रमण ,नगर रचना,आरोग्य,स्वच्छता,ग्रंथालय ,संगणक , शिक्षण विभाग,विद्युत विभाग,समाज कल्याण ,अग्निशमन विभाग इत्यादी सर्व विभागाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

    जलद गतीने माहिती उपलब्ध होणार

       Chat-GPT,Claude ने शासकीय कामकाजाच्या टिपणी, पत्र, नोंद, संशोधन याबाबत मार्गदर्शन घेऊन काम जलद गतीने करण्यास मदत होते.‌ Notebook LM वापर शासकीय पुस्तक, जीआर किंवा माहिती असलेले कागदपत्र अपलोड करुन संक्षिप्त प्रश्नांची उत्तरे जलद गतीने शोधुन मिळण्यास मदत होते.‌ Canva व Gama चे वापर करून शासकीय कामकाजाचे पीपीटी करण्यास मदत होते आहे‌. Myca AI वापर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी निगडीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तसेच उपचार घेण्यासाठी फायदा होतो.

       150 दिवस कार्यक्रम हे केवळ एक उद्दिष्ट नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बदल घडवण्याची दिशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे  – आयुक्त विपीन पालीवाल