CDCC Bank Chandrapur Election Results । CDCC बँकेच्या निकालात धक्कातंत्र! एका मताने विजय, ईश्वरचिठ्ठीने नशिब उजळले

CDCC Bank Chandrapur Election Results

CDCC Bank Chandrapur Election Results : चंद्रपूर, ११ जुलै: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून, अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. २१ संचालक असलेल्या या बँकेत १३ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली, ज्यात एका मताने विजय आणि ईश्वरचिठ्ठीने निकाल असे प्रसंग घडले. या निकालानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बँकेवर बहुमत असल्याचा दावा करत अध्यक्षपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. chandrapur cooperative bank election results

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आप मैदानात

आज सकाळी चांदा इंडस्ट्रियल सोसायटी येथे मतमोजणीला सुरुवात झाली. चंद्रपूर तालुका ‘अ’ गटाचा पहिलाच निकाल अत्यंत रोमांचक ठरला. काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी भाजपचे सुभाष रघाताटे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. चोखारे यांना १५, तर रघाताटे यांना १४ मते मिळाली. काल मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची घटनाही घडली होती.

प्रमुख लढती आणि निकाल:

  • वरोरा तालुका ‘अ’ गट: या गटात जयंत टेमुर्डे यांनी बँकेचे विद्यमान संचालक डॉ. विजय देवतळे यांचा पराभव करत विजय मिळवला.
  • सिंदेवाही ‘अ’ गट: येथे निशिकांत बोरकर यांनी प्रकाश बन्सोड यांचा पराभव करून जागा पटकावली.
  • राजुरा ‘अ’ गट: भाजपचे माजी आमदार सुदर्शन निमकर आणि नागेश्वर ठेंगणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोघांनाही प्रत्येकी बारा मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, ज्यात निमकर विजयी झाले.
  • ‘ब’ गट दोन (सावली): या गटातून रोहित बोम्मावार यांनी विक्रमी २१३ मते घेत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात किशोर ढुमणे यांना ६७, तर उमाकांत धांडे यांना केवळ ९ मते मिळाली.
  • अनुसूचित जाती (SC) गट: ललित मोटघरे यांनी ५३२ मतांसह विजय संपादन केला.
  • अनुसूचित जमाती (STVJN) गट: यशवंत दिघोरे ३७२ मतांसह विजयी झाले. त्यांनी बँकेचे विद्यमान संचालक दामोदर रुयारकर (२६६ मते) यांचा पराभव केला.
  • इतर मागासवर्गीय (OBC) गट: गजानन वासुदेव पाथोडे यांना ३०० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्यामकांत सीताराम थेरे यांना २९८ मते मिळाली. political influence in cooperative bank elections

बिनविरोध संचालक:

या निवडणुकीपूर्वीच बँकेच्या १३ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभा धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे आणि आवेश खान पठाण यांचा समावेश आहे.

अध्यक्षपदासाठी चुरस:

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निकालानंतर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबद्दल सस्पेन्स कायम आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी आपापले बहुमत असल्याचा आणि अध्यक्ष आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार असून, तोपर्यंत दोन्ही पक्षांचे लक्ष संचालक मंडळावर आहे. या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत संचालक मंडळाचा “घोडेबाजार” होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. district cooperative bank chairman election news

आता पाहूया, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची कोणत्या पक्षाच्या ताब्यात येते!

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *