Raksha Bandhan ceremony : चंद्रपूर – आज असंख्य बहिणींनी माझ्या हातावर राखी बांधून प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येक राखीत मला बहिणींच्या मनातील माया, विश्वास आणि आपल्या नात्यातील अढळ बांधिलकीची अनुभूती झाली. हे नाते केवळ धाग्याचे नसून, भावनिक नात्याचे, परस्पर आदराचे आणि बहिणींप्रती भावाच्या जबाबदारीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
गुरुदेव सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक संगिडवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पुरुषोत्तम राऊत, बबन मत्ते, टिपले, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, कल्पना गिरडकर, नकुल वासमवार, चंदा ईटनकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त चंद्रपूर महिला गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. या सुंदर आणि भावनिक क्षणांचे साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी केवळ सन्मानच नाही तर जीवनभर जपून ठेवावा असा एक अमूल्य ठेवा आहे. मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि कार्यक्रमातील उत्साहामुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपल्याकडून मिळालेल्या या प्रेमाच्या उबेने माझ्या आयुष्याला नेहमीच नवे बळ, नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा मिळत राहील. MLA Kishor Jorgewar
या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील राखी पाठवली आहे. हा भावनिक संदेश नक्कीच आपल्या बहिणींच्या प्रेमाचा आणि आपल्या संस्कृतीतील स्नेहबंधाचा गौरव वाढवणारा आहे. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
open appeal to MLA Kishor Jorgewar : प्रिय आमदार साहेब, सप्रेम नमस्कार! सर्वप्रथम, आपण आणि आपले कुटुंबीय सुखी व समृद्ध राहावेत, तसेच आपल्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी माझ्या शुभेच्छा! मी हे पत्र एका पक्षाचा महानगर प्रमुख म्हणून नव्हे, तर एक चंद्रपूर प्रेमी आणि मित्र म्हणून लिहीत आहे.
आज माझ्या एका युवा सहकाऱ्याने मला यूट्यूबवरील एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये एक मुलगी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम अचानक बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा करते. या व्हिडिओमुळे मला वाटते की, आपण एक नवीन राजकीय नौटंकी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या भविष्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे हा एक चुकीचा मार्ग आहे. आमदार साहेब, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’ कृपया वाईट वाटून घेऊ नका, पण असे प्रकार खरोखर किळसवाणे वाटतात. विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूंसाठी वापर तातडीने थांबवावा, अशी मी विनम्र विनंती करतो. Amma Ki Padhai event controversy
‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला कोणीही विरोध केलेला नाही. मात्र, दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने उपक्रम सुरू करण्यास आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. जर आपला खरोखर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा शुद्ध हेतू असेल, तर आपण विरोधकांशी संवाद साधला असता, त्यांच्याशी चर्चा केली असती किंवा उपक्रमाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला असता. परंतु, आपण यापैकी काहीही केले नाही.
आपल्या शपथपत्रानुसार, आपल्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विरोधकांशी संवाद साधूनही मार्ग निघाला नसता, तर 24 तासांत ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाची जागा बदलण्याची आर्थिक क्षमता आपल्यात आहे. जनता महाविद्यालयातील सभागृह, रोटरी हॉल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हा उपक्रम तातडीने हलवणे आपल्यासाठी सहज शक्य होते. विरोधकांशी चर्चा केली असती, तर त्यांनीही कदाचित सहकार्य केले असते. मात्र, आपण एका दिवसात उपक्रम बंद केला आणि तातडीने त्याचा इव्हेंट आणि नौटंकी सुरू केली. open appeal to MLA Kishor Jorgewar
आंबेडकरी जनतेच्या मनात शंका
आपल्या कार्यालयात आजही डॉ. हेडगेवार आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे फोटो असल्याने आंबेडकरी जनतेच्या मनात शंका निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीवर मागच्या दाराने प्रवेश करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी संवाद साधणे आपली जबाबदारी होती, पण तसे न करता आपण विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. Amma Ki Padhai political misuse
उपक्रम २०२५ ला सुरु मग २०२४ च्या परीक्षेत २७ विद्यार्थी उत्तीर्ण कसे?
मी स्पष्टपणे सांगतो, ‘अम्मा की पढाई’ उपक्रमाला आमचे पूर्ण समर्थन आहे. यामध्ये काही अडचण आल्यास आपल्या परीने सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत(फक्त त्यात राजकारण नको). विद्यार्थ्यांचे एक दिवसही नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सर्व मिळून घेऊ. पण कृपया, या उपक्रमाचा राजकीय वापर थांबवा. याशिवाय, 2024 च्या एमपीएससी गट ‘ड’ परीक्षेत ‘अम्मा की पढाई’ केंद्रातील 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मला मिळाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! परंतु, हा उपक्रम 2025 मध्ये सुरू झाला, मग 2024 च्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घेतला? याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी विनंती. Amma Ki Padhai MPSC 2024 student results discrepancy
माझे जिव्हाळ्याचे नाते
वैयक्तिक स्तरावर, आपल्या दिवंगत आईंबरोबर माझे जिव्हाळ्याचे नाते होते, हे आपणास माहीत आहे. टोपल्या विकताना त्यांना अतिक्रमण विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागायचे, तेव्हा त्या मला आवर्जून बोलावायच्या. त्यांचे माझ्यावर मुलासारखे प्रेम होते, असे मला वाटते. त्यामुळे त्यांच्या नावाचा मी कधीही विरोध करू शकत नाही. परंतु, आपल्या आईचे सार्वजनिक जीवनात विशेष योगदान नव्हते, हे सर्व चंद्रपूरकरांना माहीत आहे. ‘अम्मा टिफिन’, ‘अम्मा की पढाई’, ‘अम्मा की दुकान’ हे उपक्रम सुरुवातीला कौतुकास्पद वाटले, पण आता त्यातून राजकीय हेतूंचा गंध येत आहे. open appeal to MLA Kishor Jorgewar
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,शहीद बाबुराव थोरात यांच्यासारख्या थोर व्यक्तींचे चंद्रपूरच्या इतिहासात मोठे योगदान आहे. अशा भूमीत आपल्या आईच्या नावाने चौक किंवा पुतळा उभारण्याचा विचार आश्चर्यकारक आहे. आपण गांधी चौकाच्या बाजूला ‘अम्मा चौक’ आणि दीक्षाभूमीवर ‘अम्मा की पढाई’ सुरू करून महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना करत आहात, असा चुकीचा संदेश गेला आहे. आईच्या नावाचा राजकीय वापर आता थांबवावा आणि चंद्रपूरची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करावा, अशी मी विनंती करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत हा वाद येथेच संपवतो. आपला स्नेही रितेश रामु तिवारी
paver block theft FIR Chandrapur : चंद्रपूर : कोहिनूर ग्राउंडवर नागरिकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या ट्रेकिंग व वॉकिंग ट्रॅकवरील पेव्हर्स अर्बन एनवायरो कंपनीने चोरून स्वतःच्या कामात वापरले, तसेच माता महाकाली महोत्सवासाठी वापरण्यात आलेली गिट्टी सुद्धा बेकायदेशीररीत्या तिथून चोरून नेली, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. kohinoor lake pavers theft case Chandrapur
या संदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सर्व पुराव्यासकट तक्रार चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल केली होती. तक्रारीनंतर महानगरपालिकेने विशेष चौकशी समिती नेमून तपास केला असता कंपनी दोषी आढळली.
जवळपास ९ लाखांचा दंड
त्यानुसार, अर्बन एनवायरो कंपनीवर रु. ८,८९,०००/- पेक्षा अधिक दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून तिच्यावर तात्काळ एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजू कुडे यांनी स्पष्ट केले की, “जनतेच्या पैशांचा अपव्यय व सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या कंपन्यांना केवळ दंड नव्हे तर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत लढणार आहे.”
आम आदमी पार्टीने शहरातील अशा प्रकारच्या भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Rishi August ITI Chandrapur job fair : चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट (News३४) : ऋषी अगस्त शासकीय औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून जिल्ह्यातील जी.एम. आर. इन्फ्रा, साई वर्धा पॉवर, मल्टी ऑरगॅनिक, मल्टी व्ह्यू फायबर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे. PM Apprenticeship Mela Chandrapur 2025
प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या व्दारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्यांची व रोजगाराची संधी उपलब्ध होते.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धडे मिळतात. प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याअंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य वैभव बोंगिरवार तसेच बीटीआरआय कार्यालयाच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.
शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर तसेच बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी आयटीआयचे गटनिदेशक श्री. टोंगे व बीटीआरआयचे योगेश धवणे यांच्याशी संपर्क साधावा.
Bamboo goods selling stall : चंद्रपूर, दि. 8 : ग्रामीण भागातील गरजू बांबू कारागीर महिलांना शहरी बाजारपेठेत प्रवेश मिळावा, यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांच्या वतीने एम. डी. आर. मॉल, चंद्रपूर येथे बांबू वस्तू विक्री स्टॉल उभारण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामूहिक उपयोगिता केंद्रांमधील कारागीर महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या, आकर्षक व उपयोगी बांबू हस्तकला वस्तू या स्टॉलवर ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शहरातील प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या हस्तकलेसाठी स्थिर आणि सन्माननीय विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यातून बांबू कारागीर महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. handmade bamboo gifts for festivals
पर्यावरणपूरक राख्या उपलब्ध
या स्टॉलचे उद्घाटन केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार यांनी केले. यावेळी केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, महिला बांबू कारागीर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संचालक श्री. खैरनार म्हणाले, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरकरांनी या पर्यावरणपूरक राख्या आणि आकर्षक बांबू भेट वस्तूची मोठ्या प्रमाणात खरेदी करून या ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा.
हा अभिनव उपक्रम अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राबविला गेला असून या विक्री केंद्रामुळे बांबू आधारित जीवनशैलीचा प्रसार, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, आणि पर्यावरणपूरक उत्पादनांचा प्रचार साध्य होत आहे. भविष्यात अशा स्टॉल्सचे जाळे चंद्रपूरसह विदर्भाच्या इतर शहरी भागातही उभारण्याचा मानस केंद्राचे संचालक श्री. खैरनार यांनी यावेळी व्यक्त केला.
stray cattle control campaign Chandrapur : चंद्रपूर ९ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 58 गायी / म्हशी पकडुन त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशनची गोशाळा येथे करण्यात आली आहे.
मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.
या कारणामुळे कारवाई
समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.
मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली 58 जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
mla kishor jorgewar study room initiative : चंद्रपूर – श्री श्री रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. modern digital study center
आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णा नगर येथील श्री श्री रामकृष्ण सेवा समिती येथे अभ्यासिकेच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर कामाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पॉल, सविता दंढारे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, सचिव विश्वजीत शाहा, रॉबिन बिश्वास, तपोष डे, प्रलय सरकार, आनंद रणशूर, सुधाकर राखडे, जितेश कूळमेथे, कृष्णा मंडळ, बलाई चक्रवर्ती, मदन शहा, संतोष चक्रवर्ती, सुशांत भद्रा, सुनील रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तब्बल २० अभ्यासिका
पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प आपण केला आहे. ११ अभ्यासिकांचा आपला संकल्प होता; मात्र आता जवळपास २० अभ्यासिका आपण मतदारसंघात तयार करत आहोत. यातील काही अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थी येथे अभ्यास करून स्वप्नांना पंख देत आहेत, असे ते म्हणाले. bjp mla kishor jorgewar development works
ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तक वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची जागा नसेल, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि स्वप्नांचा विस्तार करणारे केंद्र ठरेल. येथे होणाऱ्या वाचन-संवादातून, मार्गदर्शन सत्रांतून आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतून अनेक तरुणाई आपले उद्दिष्ट पूर्ण करतील. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक हेही या अभ्यासिकेचे ध्येय असेल. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आणि प्रत्यक्ष संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी, अशी सुविधा निर्माण होणे म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
crop insurance without farmer ID : चंद्रपूर, दि. 8 : केंद्र शासनाच्या 8 ऑगस्ट 2025च्या आदेशानुसार, जिवती तालुक्यातील शेतक-यांना व जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतक-यांना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीपासून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे फार्मर आयडी नसतानाही ते योजनेत सहभागी होऊ शकतात.
खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई ही अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवडण्यात आली आहे. योजनेत खरीप व रब्बी हंगामातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईची गणना पीक कापणी प्रयोग/तांत्रिक उत्पादनाच्या आधारे केली जाईल. jiwati taluka farmer insurance update
चंद्रपूर जिल्ह्यासाठी खरीप 2025 साठी विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांचा हप्ता (प्रति हेक्टर) पुढीलप्रमाणे आहे:
भात : विमा संरक्षीत रक्कम (प्रति हेक्टर) 61 हजार रुपये असून शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम 1,220 रुपये (प्रति हेक्टर)
नोंदणीची अंतिम मुदत : बिगर कर्जदार शेतकरी (CSC मार्फत) – 14 ऑगस्ट 2025, कर्जदार शेतकरी (बँक मार्फत) – 30 ऑगस्ट 2025
जिवती तालुक्यातील शेतक-यांनी तसेच फार्मर आयडी नसलेल्या वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखा व ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात विहित मुदतीत विमा हप्ता भरून जास्तीत-जास्त संख्येने योजना लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय, तालुका किंवा जिल्हा कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारसमोर मांडली महिलांसाठी मोठी मागणी!
aadhaar card dual surname for women : चंद्रपूर: शासकीय किंवा निमशासकीय कामकाजात महिलांना लग्नानंतर कागदपत्रामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. परिणामी त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. ही समस्या दूर करण्याकरिता महिलांच्या आधार कार्डवर लग्नापूर्वीचे (वडिलांचे ) आणि लग्नानंतरचे (पतीचे ) दोन्ही नावे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. add father’s and husband’s name in aadhaar card
अनेक समस्यांचा सामना
सध्याच्या नियमांनुसार, आधार कार्डवर फक्त एकच नाव नोंदवता येते. त्यामुळे, लग्नानंतर महिलांना त्यांच्या माहेरचे आडनाव सोडून पतीचे आडनाव लावावे लागते. या प्रक्रियेमुळे अनेक प्रशासकीय आणि भावनिक समस्या निर्माण होत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले की, अनेक महिलांचे शैक्षणिक दस्तऐवज, पदवी प्रमाणपत्र, जुने बँक खाते आणि मालमत्तेची कागदपत्रे त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावावर असतात, ज्यामुळे आधार कार्डवरील नावाशी ते जुळत नाही. या विसंगतीमुळे त्यांना विविध सरकारी आणि खाजगी कामांमध्ये अडचणी येतात.
याव्यतिरिक्त, सांस्कृतिक आणि भावनिक कारणांमुळे अनेक महिलांना त्यांच्या वडिलांचे आडनाव कायम ठेवायचे असते, परंतु आधार कार्डवर ही सुविधा नसल्यामुळे त्यांना आपली एक ओळख सोडावी लागते. या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसा वाया जातो, तसेच अनावश्यक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. aadhaar name change after marriage for women
आधार वर सुविधा उपलब्ध करा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पॅन कार्डचे उदाहरण दिले, जिथे वडिलांचे आणि लग्नानंतरचे असे दोन्ही नावे नोंदवण्याची सोय आहे. त्यामुळे महिलांची दोन्ही ओळख सुरक्षित राहते. त्याचप्रमाणे, आधार कार्डवरही ही सुविधा उपलब्ध करून दिल्यास महिलांना त्यांची ओळख जपण्याचा हक्क मिळेल, विविध कागदपत्रांमध्ये एकसारखेपणा येईल आणि प्रशासकीय अडचणी कमी होतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांना या महत्त्वाच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
AAP open letter to mla kishor jorgewar : आदरणीय आमदार किशोरजी,
आपण आपल्या पत्रात “अम्मा की पढ़ाई” हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एका आत्मपरीक्षणात्मक, भावनिक शैलीत जनतेसमोर मांडला. आपण लिहिता की, “ही धम्मसेवा आहे” आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना आपण ‘अस्वस्थता’ म्हणून मांडता. पण हा मुद्दा भावनांचा नाही हा इतिहास, समाजप्रबोधन, आणि संविधानाच्या मूल्यांचा विषय आहे. Amma ki padhai controversy
शासकीय रचनेत कोणताही स्पष्ट ठराव न करता, एका विशिष्ट ओळखीचा प्रचार सुरू केला गेला.
स्मारकाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली “आयडेंटिटी शिफ्ट” सुरू करण्याचा भाजपाचा देशव्यापी पॅटर्न इथेही दिसून आला. Chandrapur Diksha Bhumi identity politics
आपण काय म्हणता आणि आम्ही का असहमत आहोत?
१. “हा उपक्रम धम्मसेवा आहे” धम्मसेवा व्यक्तिगत भावना नसते — ती सामूहिक असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा ती वैयक्तिक नव्हती — ती क्रांती होती. आपण जर या कार्याला “धम्मसेवा” म्हणत असाल, तर ती पवित्र सेवा एका विशिष्ट ओळखीच्या किंवा नात्याच्या नावाखाली चालवणे म्हणजे त्या क्रांतीचा अवमूल्यन आहे. मग तो तुमच्या मातोश्रींचा आदर असला तरीही. Amma ki padhai vs Ambedkar values
२. “गैरसमज निर्माण झाले” गैरसमज नव्हते. लोकांनी स्पष्टपणे पाहिले की, बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेऊन, एका भावनिक नात्याच्या आधारे दीक्षाभूमीच्या परिसरात नवीन ब्रँडिंग सुरू होत होतं. तुम्ही हे केंद्र एखाद्या वस्तीमध्ये सुरू केलं असतं, तर कोणी विरोध केला नसता. पण तुम्ही नेमकं *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दीक्षाभूमी परिसर निवडला — हे निवडणूकपूर्व मनोवैज्ञानिक रणनितीचे पाऊल होते.
३. “विद्यार्थ्यांचा विकास झाला, 27 उत्तीर्ण झाले”
हे खूप चांगले आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण शिक्षण देताना त्यावर तुमचं “ब्रँडिंग” लावणं — हेच प्रश्न निर्माण करतं. विचार करा — जर दुसऱ्या कुणी ‘हेडगेवार की पढाई’ सुरू केलं असतं, तर ते ही धम्मसेवा मानली गेली असती का?
मुख्य मुद्दा : “ज्योत विझली नाही — पण तुमचा हात जर त्या ज्योतीच्या सावलीतच राजकारण करत असेल, तर ती विझवणंच योग्य!”
तुम्ही लिहिता की, “ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे”* पण प्रश्न ‘ज्योती’चा नाही आहे. प्रश्न त्या ज्योतीच्या नावाखाली कोणते झेंडे फडकवले जातात, हाच आहे! तुम्ही सांगत आहात की केंद्र बंद केलं — परंतु बाबासाहेबाचे नाव ठेऊन हे केंद्र सुरू ठेवता आले असते परंतु तुम्ही तसें केले नाही नावासाठी एवढा अट्टहास का ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. AAP open letter to mla kishor jorgewar
तुमचं पत्र — एक रणनीती, आत्मपरीक्षण नव्हे.
आपण तुमच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना, आईच्या आठवणींना, आणि धम्मसेवेच्या शब्दसामर्थ्याला कवटाळून लोकभावना तयार करण्याचा प्रयत्न करता. हे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ते म्हणून चुकीचे वाटते , बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो
भावना बाजूला ठेवा, सत्य ऐका — “बाबासाहेबांची जागा कोणत्याही नावाने बदलता येणार नाही.”
म्हणून शेवटी आमचं उत्तर स्पष्ट आहे:
तुमचं हे पत्र स्वतःला क्लीन चिट देण्याचा एक प्रयत्न आहे. पण चंद्रपूरच्या जनतेने डोळे उघडले आहेत. हा लढा “अम्मा की पढ़ाई” विरोधात नाही — तर बाबासाहेबांविरुद्ध सुरू असलेल्या हळूहळू चालणाऱ्या ओळख-हेरफेरी विरोधात आहे.
बाबासाहेबांचे नाव, कार्य आणि जागा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावनिक संज्ञेतून झाकली जाणार नाही हीच आम्ही मागणी पुन्हा मांडतो. आपणाला माहित असेल आम आदमी पार्टी ने दिल्ली पंजाब मध्ये शिक्षा क्रांती सुरू केली ती केवळ नावासाठी नाही तर गरीब, वंचित ,दुर्बल घटकातील मुलगा शिकला पाहिजे कुठलेही जाती पातीचे राजकारण न करता मुलगा सक्षम झाला पाहिजे हीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे. शिक्षण आणी आरोग्य या विषयावर कुणी राजकारण करत असेल तर आम आदमी पार्टी भविष्यात ही विरोध करणार. हम राजनीती करणे नही इसे बदलणे आये हैं !