Blog

  • Chandrapur urea supply update । तर खत वितरकांवर थेट गुन्हे दाखल करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur urea supply update

    Chandrapur urea supply update : चंद्रपूर, दि. 21 : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून खत टंचाईची समस्या सुटणार असून, शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची चिंता वाढली आहे. पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात HURL कंपनीचे 1250 मेट्रिक टन आणि NBCL (नर्मदा) कंपनीचे 1600 मेट्रिक टन युरिया खत लवकरच उपलब्ध होणार आहे. बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन किसान मोर्चाच्या विनंतीनंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यालयात खत उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. Sudhir Mungantiwar fertilizer planning

    चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार

    बैठकीला कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पवार, बल्लारपूरचे गुणनियंत्रक, तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड, पोंभुर्णाचे गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गवळी, चंद्रपूरच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्रीमती गोडबोले, मूलच्या गुणनियंत्रक तथा तालुका कृषी अधिकारी श्री. गजभिये, भाजपा किसान मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार, भाजपा किसान महानगर मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रवी चहारे आदींची उपस्थिती होती.

    वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करा

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘युरिया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करा. याशिवाय प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर थेट एफ.आय.आर दाखल करावे. दरम्यान, आजच्या तारखेस मूल तालुक्यात फक्त 2.5 टन खत उपलब्ध असून पोंभुर्णा येथे एकही युरियाची बॅग उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे.’

    शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामी गरजा लक्षात घेता खत उपलब्धतेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिले.

  • Chandrapur BJP internal conflict । चंद्रपूर मनपा निवडणूक 2026 : भाजपच्या गटबाजीमुळे डोकेदुखी वाढणार

    Chandrapur BJP internal conflict

    Chandrapur BJP internal conflict : चंद्रपूर – २१ सप्टेंबर २०२५ – वर्ष २०२६ मध्ये महानगरपालिका निवडणुका घ्या असे आदेश धडकल्यावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे, चंद्रपूर भाजपने २० सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती कार्यकर्ता सन्मान मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागा जिंकण्यासाठी तयारीला लागले असे आदेश दिले. आपल्याला आता जिंकायचं आहे, यासाठी प्रत्येक नागरिकांच्या घरी जा, त्यांच्या भेटीगाठी घ्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मात्र आगामी मनपा निवडणुकीत भाजपला अनेक आव्हानाच्या सामोरे जावे लागणार आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट

    वर्ष २०१७ च्या मनपा निवडणुकीत ६६ जागेपैकी भाजपने ३६ जागा जिंकल्या होत्या, त्यावेळी कांग्रेस १२, शिवसेना २, राष्ट्रवादी कांग्रेस २, बहुजन समाज पार्टी ८, मनसे २, अपक्ष ४ यांनी बाजी मारली त्यावेळी भाजपला बहुमत मिळाले होते. २०२२ नंतर मनपा वर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने अनेक कामे रखडले होते. आणि विशेष बाब म्हणजे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात ताटातूट झाल्याने २ शिवसेना व २ राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आले. पक्ष ताटातुटीनंतर मनपाची हि पहिली निवडणूक आहे.

    भाजपात गटबाजी

    चंद्रपूर शहरातील २८ हजार नागरिकांना पट्टे मिळणार अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली असून बूथ कार्यकर्ता यांना सदर पट्टा वाटप बाबत माहिती द्यावी जेणेकरून आपली सत्ता आल्यास सर्वाना पट्टे वाटप होणार अशी माहिती द्यावी. राज्यात जसे २ पक्षात गट निर्माण झाले त्याप्रकारे चंद्रपुरात भाजपचे २ गट तयार झाले आहे. भाजपचे आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार हे मनपा निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढणार कि वेगवेगळे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. भावी नगरसेवक सध्या संभ्रमात असून कुणाच्या मागे गेल्याने मनपाची तिकीट मिळेल असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्याकरिता कार्यकर्ते सुद्धा आपले पाऊल जपून टाकत आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्या कार्यकर्ता सन्मान मेळाव्यात मुनगंटीवार समर्थकांनी पाठ दाखवली. Chandrapur municipal election 2026

    मागील ५ वर्षात आप चर्चेत

    भाजप चंद्रपुरात मजबूत स्थिती मध्ये आहे असं शहर नेतृत्वाला वाटत असे तर ते चुकीचे आहे कारण यावेळी भाजपचे २ गट एकमेकांविरुद्ध काम करेल, कांग्रेस पक्ष सुद्धा यावेळी तयारीने उतरणार असून आप यावेळी प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्याच्या तयारीत आहे. सोबतच उबाठा, राष्ट्रवादी व मनसे यांची स्थिती आजच्या परिस्थितीत कमकुवत आहे. सत्ताधारी पक्षविरोधात फक्त आप पक्षाने अनेक आंदोलने केली आहे.

    चंद्रपूर शहराची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे, मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे, ३ महिन्यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेले रस्ते शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. चंद्रपूर शहरात नागरिक अनेक समस्याने त्रस्त झाले असून प्रशासन व आमदार मुकदर्शक बनले आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप समोर तिकीट वाटपाची डोकेदुखी उभी राहणार असून ६६ जागा निवडणून येणार हे स्वप्न भाजप सध्या बघत आहे. Chandrapur BJP internal conflict

    विशेष बाब म्हणजे भाजपच्या महानगर कार्यकारणीत ज्यांच्यावर संघटना वाढविण्याची जबाबदारी महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी दिली आहे, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फळी हि शून्य आहे, पद मिळाल्याने पदाधिकारी सुद्धा फक्त भाजपच्या नावावर संघटना वाढविणार काय? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

  • FIR against defamatory Facebook post । शेतकरी नेते वामनराव चटपांविरुद्ध बदनामी पोस्ट, युवकांनी केली तक्रार

    FIR against defamatory Facebook post

    FIR against defamatory Facebook post : राजुरा २० सप्टेंबर २०२५ – शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक भाषा वापरल्याच्या प्रकाराने शेतकरी संघटना आणि युवकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणी राजुरा आणि विरूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, तात्काळ गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    चांदा महसूल मित्र चॅटबोट चे उदघाटन

    शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी राजुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत,अतुल वरवडे (रा. विसर स्टे.) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानकारक मजकूर पोस्ट केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर गजानन ढवस, जीवन आमने, जयराज दोरखंडे, विशाल जिवतोडे यांसह विरूर येथील युवकांनीही विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. farmer leader defamation Chandrapur

    खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट

    ॲड. वामनराव चटप हे तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले आहेत. शेतकरी हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या या नेत्याविरोधात सोशल मीडियावरून केलेली खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट ही केवळ त्यांच्या वैचारिक प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न नसून संपूर्ण शेतकरी चळवळीवर घाव घालणारी आहे. शेतकरी संघटना आणि युवकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून दोषींना अटक केली नाही तर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल.

    शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. समाजात वैमनस्य आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान विरूर येथे २१ सप्टेंबरला निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या अश्लिल पोस्टमागील मास्टरमाईंड शोधावा, असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲड. मुरलीधर देवाळकर, माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, ॲड. श्रीनिवास मुसळे, दिलीप देठे, कपिल इद्दे, सय्यद शब्बीर, मदन सातपुते, आबाजी धानोरकर, मधूकर चिंचोलकर, नरेंद्र काकडे आदींनी व्यक्त केले आहे.

  • Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur । चंद्रपूरमध्ये ‘चांदा महसूल मित्र’ चॅटबोटचे उद्घाटन – सर्व सेवा आता ऑनलाईन

    Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur

    Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur : चंद्रपूर दिनांक 20 : राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा  राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतरस्त्यांचे मॅपिंग करणे, त्यांचे अतिक्रमण काढणे, राष्ट्रीय महामार्ग प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणे, सर्वांना घरे आदी  बाबी करण्यात येणार आहे. महसूल खाात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे. त्याला तडा जाऊ देऊ नका. लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभिर्याने काम करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी यंत्रणेला दिले

    चंद्रपुरात सोमवारपासून भाऊ चा दांडिया .

    जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागांतर्गत, भुमी अभिलेख, मुद्रांक नोंदणी आदी बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. बैठकीला सर्वश्री आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, संतोष थिटे (चिमूर), निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आदी बैठकीला उपस्थित होते. farm road numbering scheme Chandrapur

    शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते मोकळे होणे गरजेचे

     सेवा पंधरवडा अंतर्गत पाणंद रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांना क्रमांक देणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य आहे. पुढील काळात या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्याचा जीडीपी वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे. शेतात पाणी, वीज, रस्ता असेल तर शेती करण्याकडे ओढा वाढेल. revenue department service fortnight Chandrapur

    महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात. शासनाची भूमिका घेऊन प्रशासन आपल्या गावात आले, असे गावकऱ्यांना म्हटले पाहिजे. सामान्य आणि गरीब जनतेला चांगल्या सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. गतिमान, पारदर्शक प्रशासन राबविण्यासाठी यंत्रणेने सजग असावे. शासकीय कामासाठी लोकांना कोणताही त्रास होता कामा नये. घरकुल पासून कोणीही वंचित राहू नये, एकही शेतकरी पांदण रस्त्याविना राहू नये, याची काळजी घ्यावी. जनतेला भेटण्याचे फलक कार्यालयात लावा. लोकांशी संपर्कात रहा. शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करा.

    पुढे महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत, त्यांची जमीन सुद्धा नियमित करण्यात येईल. सरकारी जागेवरील सर्व घरांचा सर्वे करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरातील 55 झोपडपट्टीधारकांना कायदेशीर घरे देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. पुढील पाच वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते महाराष्ट्राचे असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .आपल्या चांगल्या कामाचे सादरीकरण करा. महसूल विभागाच्या संकेतस्थळावर हे सादरीकरण अपलोड करा. Chanda revenue mitra chatbot launch Chandrapur

    कृत्रिम वाळू धोरणानुसार शासकीय बांधकामात 50 टक्के वाळू अनिवार्य करण्यात आली आहे. कृत्रिम वाळू प्रकल्पासाठी  जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 प्रकल्प लागले पाहिजे.  महसुली अर्धन्यायीक प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांनी त्वरीत फार्मर आयडी करून घ्यावी. विशेष सहाय्य योजनेचा सर्व निधी डीबीटीवर देण्यात येतो. प्रत्येक घरी जाऊन 100 टक्के डीबीटी करण्यासाठी या पंधरवड्यात यंत्रणेने घरोघरी जावे, अशा सुचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विभागाचे सादरीकरण केले.

    chanda mitra

    चांदा महसूल मित्र चॅटबोटचे उद्घाटन :

     महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना माहित व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चांदा महसूल मित्र चॅटबोटचे (फोन नं. 9284061588) उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • overburden royalty waiver Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय लवकरच?, खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार

    overburden royalty waiver Chandrapur

    overburden royalty waiver Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे यांना एक पत्र दिले. या गंभीर प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे.

    लाईव्ह संगीतावर होणार दांडियाची धूम, सोमवारपासून भाऊंचा दांडिया

    तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार

    जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणात ‘ओव्हर बर्डन’चे ढिगारे तयार झाले आहेत. यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. याच ‘ओव्हर बर्डन’चा उपयोग खराब झालेल्या पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

    पत्रात, पांदण रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ वरील सर्व रॉयल्टी माफ करून ते स्थानिक प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि जिल्ह्याची एक मोठी पर्यावरणीय समस्या सोडवण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • Bhaucha Dandiya Chandrapur । भाऊचा दांडिया : लाइव्ह संगीतावर दांडियाची धमाल – तरुणाईसाठी खास आकर्षण

    Bhaucha Dandiya Chandrapur

    Bhaucha Dandiya Chandrapur : चंद्रपूर २० सप्टेंबर २०२५ : शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार, २२ सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे.

    दिव्यांगांना व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान

    दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली होती, आणि ती परंपरा आजही अखंड सुरू आहे. या महोत्सवात गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

    पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन

    नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन नसून, तो समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा एक मंच आहे. विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. garba dandiya competition prizes Chandrapur

    हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. ‘भाऊचा दांडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, ज्यात दोन विजेत्यांना दुचाकी आणि इतर रोख बक्षिसे दिली जातील. चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • financial literacy programs for women । महिलांची आर्थिक स्वातंत्र्याकडे मोठी वाटचाल : ‘आत्मनिर्भर’ गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम चंद्रपूरमध्ये

    financial literacy programs for women

    financial literacy programs for women : चंद्रपूर २० सप्टेंबर २०२५ – महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ‘आत्मनिर्भर’ या गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमाचे आयोजन चंद्रपूर येथील महामाया महिला समूहात करण्यात आले.

    चंद्रपूर नागपूर महामार्गावर द बर्निंग कार

    ‘आर्थिक स्वातंत्र्याकडे महिलांची वाटचाल’ या विषयावर आधारित या उपक्रमामध्ये सहभागींना सिक्युरिटीज मार्केटमधील संधी (Market opportunities), डिपॉझिटरी सेवांचे महत्त्व तसेच सुरक्षित व माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णयांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवता येते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    दैनंदिन जीवनाशी संबंधित व्यावहारिक उदाहरणे

    संकल्पना अधिक सोप्या रीतीने समजावून सांगण्यासाठी तज्ज्ञांनी मराठीत संवाद साधला आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित व्यावहारिक उदाहरणे दिली. या संवादात्मक पद्धतीमुळे शिकणे केवळ सोपेच नव्हे तर अधिक रंजक आणि उपयुक्त ठरले.

    हा उपक्रम सीडीएसएल गुंतवणूकदार संरक्षण निधी (CDSL IPF)च्या पुढाकारातून राबविण्यात आला असून, देशभरातील विविध भागांत आर्थिक साक्षरता वाढविणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.

  • financial aid for poor patients Chandrapur । आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठा आधार – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाखोंची मदत

    financial aid for poor patients Chandrapur

    financial aid for poor patients Chandrapur : चंद्रपूर, दि. 19 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळत असून, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 64 रुग्णांना 57 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

    चंद्रपूर नागपूर महामार्गावर कार ने घेतला पेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असलेल्या जिल्हा कक्षामार्फत ही मदत वितरित करण्यात आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत 54 रुग्णांना 47 लाख 48 हजार, ऑगस्टमध्ये 7 रुग्णांना 6 लाख, तर 15 सप्टेंबरपर्यंत 3 रुग्णांना 4 लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे.

    सदर निधीतून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस व अस्थिमज्जा प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, कॉकलियर इम्प्लांट, अस्थिबंधन, गुडघा व खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशु व बालकांच्या शस्त्रक्रिया तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सहाय्य दिले जाते. निधी प्राप्त न झाल्यास रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचाराची पर्यायी माहिती दिली जाते. government support for transplant surgeries

    वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी

    निधीसाठी पात्रता निकषांनुसार अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे व उपचार सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त रुग्णालयात झालेले असावेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित रुग्णालयाकडून सादर होऊन जिल्हा कक्षामार्फत मंत्रालयाकडे पाठविला जातो. समिती परीक्षणानंतर निधी मंजूर केला जातो.

    संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211, संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in तसेच प्रशासकीय इमारत, पहिला मजला, चंद्रपूर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांनी केले आहे.

  • Chandrapur disability welfare scheme । चंद्रपूर मनपाचा उपक्रम: दिव्यांगांना व्यवसायासाठी 23.82 लाखांचे अनुदान!

    Chandrapur disability welfare scheme

    Chandrapur disability welfare scheme : चंद्रपूर 19 सप्टेंबर –  दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82  लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.

    चंद्रपुरात द बर्निंग कार

    अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय किंवा लघुउदयोग सुरु करायचा असतो परंतु अपुऱ्या भांडवलामुळे व्यवसाय सुरु करु शकत नाही अश्या दिव्यांग व्यक्तीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याण धोरण या योजनेतुन 2 लक्ष रुपयांचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. मनपा दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत बँकेने मंजुर केलेल्या कर्जावर 50 टक्के अनुदान देण्यात येते.

    34 दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ

    चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत 34 दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग व्यक्तींनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे. divyang self employment assistance Chandrapur

    ज्या दिव्यांग व्यक्तींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे तसेच अधिकाधिक दिव्यांगांनी योजेनचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

  • alcazar car fire Chandrapur Nagpur route । चंद्रपूर-नागपूर मार्गावर अलक्झर कार जळून खाक, प्रवासी सुखरूप

    alcazar car fire Chandrapur Nagpur route

    alcazar car fire Chandrapur Nagpur route : चंद्रपूर / वरोरा – १९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

    बिबट्याने मुलाला नेले उचलून, सिंदेवाही हादरलं

    नागपूर निवासी अमीन हारून अली हाजी हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक mh ३१ fu ६६७३ ने निघाले होते, वरोरा मधील रत्नमाला चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीत जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्निविरोधक यंत्र आणण्यास गेले मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता.

    अन्यथा मोठी घटना घडली असती

    परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठी घटना टळली. वाहन मालक अमीन हारून अली हाजी यांनी याबाबत माहिती दिली कि आम्ही सकाळच्या सुमारास चंद्रपुरवरून नागपूरसाठी निघालो असता वरोरा जवळ पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघायला लागला. वेळेपूर्वी आम्ही वाहनातून उतरलो अन्यथा मोठी घटना घडली असती. याबाबत वरोरा पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली आहे.