Blog

  • Chandrapur Road Safety Initiative | चंद्रपूरमध्ये वाढत्या अपघातांवर उपाय; रस्त्यांवर ‘कन्वेक्स मिरर’ बसवण्याची धानोरकरांची मागणी

    Chandrapur Road Safety Initiative

    Chandrapur Road Safety Initiative : चंद्रपूर 13 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे  सचिव यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. विशेषतः ‘ब्लॅक स्पॉट’ आणि अंध वळणांवर दृश्यमानता वाढवण्यासाठी त्यांनी परावर्तक रोड स्टड्स सोबतच ‘कन्वेक्स मिरर’ तातडीने बसवण्याची मागणी केली आहे.

    Also Read : दीक्षाभूमीवर राजकीय भाषण नकोचं

    शहरवासीयांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रमुख कामांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

    तातडीने कन्व्हेक्स मिरर बसवा

    शहरातील मुख्य चौक, अरुंद वळण मार्ग आणि वारंवार अपघात होणाऱ्या ‘ब्लॅक स्पॉट’वर वाहनचालकांना बाजूने येणारे वाहन स्पष्टपणे दिसावे यासाठी तातडीने कन्वेक्स मिरर बसवावेत. हे आरसे ‘ब्लाइंड स्पॉट्स’वरील दृश्यमानता वाढवून संभाव्य मोठे अपघात टाळण्यास मदत करतील. याच ठिकाणी परावर्तक रोड स्टड्स बसवून रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेचा अंदाज स्पष्ट होईल, त्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग व थांबा रेषा रात्रीच्या वेळी अतिशय स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून नवीन मार्किंग करावे. यामुळे वाहनचालकांना रहदारीच्या नियमांचे पालन करणे सोपे होईल. Convex Mirror Installation Chandrapur

    चंद्रपूर शहर महानगर पालिका हद्दीतील सर्व प्रमुख दवाखाने आणि शाळांच्या परिसरामध्ये ‘शांतता क्षेत्र’ निश्चित करावे. या संवेदनशील भागांमध्ये वाहतूक नियमन सुधारण्यासाठी ‘शांतता क्षेत्र’ आणि ‘सावकाश चला ‘ दर्शवणारे स्पष्ट व परावर्तक सावधानता फलक तातडीने लावण्याचे निर्देशही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर कामे रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्राधान्याने आणि तातडीने मंजूर करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

  • Chandrapur Road Closure Update | चंद्रपूर शहरात आज आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा; अनेक मार्ग बंद

    Chandrapur Road Closure Update

    Chandrapur Road Closure Update : विविध मागण्यांसाठी चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचा महा आक्रोश मोर्चा आज 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे, यामुळे नागरिकांनी शहरात येताना काळजी घ्यावी कारण मोर्च्यामुळे अनेक मार्ग बंद राहणार आहे.


    सदर मोर्चा हा कोहिनुर ग्राउंड पासून सुरू होणार असून थेट अंचलेश्वर गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, जयंत टॉकीज चौक जटपुरा गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघणार आहे.
    मोर्च्यात सामील होणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. Chandrapur Aakrosh Morcha 2025

    Also Read : राजुरा नगरपालिका, मतदार यादीतील घोळ कायम


    विशेष म्हणजे ज्या मार्गावरून मोर्चा निघणार आहे तो मार्ग पूर्णतः नो हॉकर्स झोन घोषित करण्यात आला आहे.
    सकाळी 11 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत वाहतूक बंद चा आदेश अंमलात असणार आहे.

    या पर्यायी मार्गाचा करा वापर


    नागरिकांनी या कालावधीत जड वाहने वगळता अंचलेश्वर गेट ते गंजवार्ड कडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा, तसेच नागपूर व मूल कडून चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांनी पंचशील चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपूरा परिसर वार्ड मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नागरिकांनी वरोरा नाका, मित्र नगर चौक, जेष्ठ नागरिक भवन, संत कंवलराम चौक, विदर्भ हाऊसिंग चौक, बिनबा गेट या मार्गाचा वापर करावा.


    नागपूर व मूल शहरामधील रामाला तलाव, बगळ खिडकी, गंजवार्ड भानापेठ वॉर्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरिकांनी सावरकर चौक, बस स्टॅण्ड चौक, आरटीओ ऑफिस, रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.

    या ठिकाणी पार्क करा वाहने


    आक्रोश मोर्च्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने महाकाली मंदिर समोरील बैल बाजार व महाकाली यात्रा ग्राउंड मध्ये पार्क करावी, त्यासोबतच मूल व नागपूर मार्गे येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने मूल रोडवरील एसबीआय चौक समोरील ग्राउंड व न्यू इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावी.


    नागरिकांनी चंद्रपूर पोलिसांतर्फे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहणार नाही.

  • BJP Chandrapur appointments 2025 । चंद्रपूर महानगरात BJP पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या – संघटनेला बळ

    BJP Chandrapur appointments 2025

    BJP Chandrapur appointments 2025 : चंद्रपूर १२ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) –  भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरात  विविध आघाड्यांवरील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि समाजघटकांमध्ये अधिक प्रभावी संपर्कासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

    Also Read – राजुरा शहरातील मतदार यादीतील घोळ कायम

      यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री रवि गुरुनुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, सुमित बेले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    विविध आघाडी प्रमुखाच्या नियुक्त्या

     या वेळी मुक्ता खांडे यांची अध्यक्षा, ओबीसी महिला आघाडी, चंद्रपूर महानगर,  प्रियंका चितोडे यांची युवती प्रमुख, चंद्रपूर महानगर,  ओमेशजी आयलू यांची अध्यक्ष तेलगू आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, कौसर खान यांची अध्यक्ष अल्पसंख्यांक महिला आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, सुजाता कापसे यांची अध्यक्षा तेलगू आघाडी, आणि रामकुमार आकापल्लीवार यांची अध्यक्ष झोपडपट्टी आघाडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    या नव्या नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीत आणखी वाढ होणार असून, समाजाच्या विविध घटकांमध्ये पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. नव नियुक्त पदाधिकार्यांना त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्याचे, समाजहिताचे कार्य जोमाने पुढे नेण्याचे मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, समाजसेवा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्याचे आवाहनही आमदार जोरगेवार यांनी केले.

  • Sudhir Mungantiwar farmers relief । चंद्रपूरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – मुल तालुका मदतीच्या यादीत समाविष्ट

    Sudhir Mungantiwar farmers relief

    Sudhir Mungantiwar farmers relief : चंद्रपूर १२ ऑक्टोबर : (News३४ वृत्तसेवा) राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत व सवलतींचे पॅकेज जाहीर केले होते. प्रारंभी या आदेशात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका समाविष्ट नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नांनंतर केवळ काही तासांतच शासनाने सुधारणा करून १० ऑक्टोबर रोजी नवीन शासनादेश काढत मुल तालुक्याचाही समावेश केला आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आ. मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द काही तासांतच पूर्ण करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

    Also Read : राजुरा नगरपरिषद निवडणूक, मतदारयादीत घोळ कायम

    आ. मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. मुल,पोंभुर्णा , बल्लारपूर, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजचा थेट लाभ मिळणार आहे. Mul taluka included relief package

    राज्य शासनाने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. शासन आदेशानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती, वीज बिलात तिमाही माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क व शैक्षणिक फीमध्ये माफी अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.यासोबतच खरीप हंगाम जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील साहित्याचे नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. यासाठी नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे. flood affected farmers Maharashtra

    शेतकऱ्यांनी मानले मुनगंटीवार यांचे आभार

    राज्यभरातील विविध तालुक्यांप्रमाणेच आता मुल तालुकाही आपत्तीग्रस्त घोषित करण्यात आला असून,या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासन आदेशात स्पष्ट नमूद केल्याप्रमाणे या सवलतींचा थेट लाभ चंद्रपूर जिल्ह्यासोबतच मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

    ही सकारात्मक घडामोड म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत झटत राहणे हीच त्यांची कार्यसंस्कृती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांकडून आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

  • Rajura municipal election 2025 । राजुरा नगर परिषद निवडणूक; माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव मतदार यादीतून गहाळ

    Rajura municipal election 2025

    Rajura municipal election 2025 : राजुरा १२ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा ) :– राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादिवर हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदार यादीचा सखोल अभ्यास केल्यानंतर गंभीर अनियमितता, मतदारसंख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर आल्याने नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    Also Read : दीक्षाभूमीवर राजकीय भाषण नकोच

    या संदर्भात नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारींकडे लेखी आक्षेप/हरकती सादर केल्या असून, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसने नागरिकांच्या वतीने वरील आरोप केला आहे. voter list irregularities Maharashtra


    यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सांगितले की, मी ३५ वर्षापासून राजुरा नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करीत आहे. मी माझे नाव वगळण्यासाठी कोणताही अर्ज केला नसतांनाही माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. जेव्हा की मी लोकसभा व विधानसभा तसेच प्रत्येक नगर परिषद निवडणुकीत मतदान केले आहे. आमचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी देशपातळीवर पत्रकार परिषद घेऊन मत चोरी चा मुद्दा उचलून धरला तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितले की मतदाराने नाव वगळण्याची मागणी केल्याशिवाय नाव कमी किंवा स्थानांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. electoral roll errors Chandrapur district

    एवढेच नव्हे तर मी माझ्या दोन मुली बाहेर गावी स्थाईक झाल्यामुळे त्यांची नावे राजुरा च्या मतदार यादीतून वगळण्यात यावी यासाठी रितसर अर्ज करूनही त्यांची नावे कायम ठेवली आहेत. अशाच प्रकारे शहरातील अनेक नागरिकांची नावांबाबत गोंधळ दिसून येत आहे. तर माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि काँग्रेसने स्थानिक नागरिकांच्या वतीने पुढीलप्रमाणे मुख्य आक्षेप घेतले आहेत. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत सक्रिय असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. transparency in local elections

    यामध्ये काही संभाव्य उमेदवारांचाही समावेश असून, ही बाब मतदानाधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रत्येक प्रभागातील सुमारे २०० मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात नोंदविण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक १ मधील मतदार प्रभाग क्रमांक ५ किंवा ६ मध्ये दाखल झाल्याचे आढळले आहे. परिणामी मतदारांना आपल्या मूळ प्रभागातील नगरसेवकासाठी मतदान करता येणार नाही, ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. २०२४ साली नगर परिषदेची एकूण मतदारसंख्या २६,०२५ होती. १ जुलै २०२५ पर्यंत ६३६ नवीन मतदारांची भर पडून आणि ४८ वगळणी झाल्याने एकूण संख्या २६,६१३ अशी असणे अपेक्षित होती. मात्र, प्रारूप यादीत केवळ २६,३०० मतदारांचा उल्लेख असून, तब्बल ३१३ मतदारांचा फरक दिसून येतो.

    मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ

    राज्य निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदार यादीसाठी cut-off date १ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. तसेच २०२४ च्या विधानसभेतील मतदार यादीच ग्राह्य धरली जाईल, असे स्पष्ट नमूद आहे. परंतु, प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचे दिसत आहे. या सर्व अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची शेवटची तारीख २८ आक्टोंबर २०२५ असल्याने निवडणूक विभागाने तातडीने सर्व चुका दुरुस्त करून राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जावी, अशी ठाम मागणी केली आहे. Rajura municipal election 2025


    यावेळी पत्रकार परिषदेत राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, जकाँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, रवी त्रिशूलवार, संतोष गटलेवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अनंता ताजने, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

  • political speeches ban at Deekshabhoomi event | बहुजन हितकारिणी सभेचा इशारा: “धम्म मंचावरून राजकीय भाषण नाही चालणार!”

    political speeches ban at Deekshabhoomi event

    political speeches ban at Deekshabhoomi event : चंद्रपूर १२ ऑक्टोबर News३४ – चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी 15,16 ऑक्टोंबरला धम्मचक्र अनुवर्तन सोहळा साजरा होतो, यानिमित्य प्रमुख प्रस्थापित पक्षाचे पुढारी धम्म मंचावरून राजकीय भाषणे करतात, अप्रत्यक्ष त्यांचे पक्षाचा प्रचार करतात , यावर्षी हे खपवून घेणार नाही , निषेध करू असा सज्जड इशारा बहुजन हितकारिणी सभेने एका निवेदनातून दिला आहे.

    Also Read : सेल्फी विथ खड्डा, खासदार धानोरकर यांचा भन्नाट उपक्रम

    दिनांक 9 ऑक्टो. ला नागवंश नगराळे यांचे नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूर चे अध्यक्ष अरुण घोटेकर यांना एड. पूनमचंद वाकडे, विवेक कांबळे, एड. रवींद्र मोटघरे, बंडूभाऊ ठमके, विद्याधर लाडे, रवींद्र भैसारे, अशोक मुंजनकर, उषा तामगडे, बबिता बागेसर, कविता मून इ. च्या शिष्टमंडळाने यासंबंधी एक निवेदन सादर केले आहे . दीक्षाभूमीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय वापर होण्याला निर्बंध घालावे, तसे संबंधिताना नम्रपणे सुचित करावे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. Deekshabhoomi rules for public speeches

    सोबतच धम्म मंचासमोरील मंडपाला दुप्पटीने वाढवून त्या प्रमाणात बसण्याची व्यवस्था उपलब्ध करावी , ही मागणी सुद्धा करण्यात आली आहे . दरवर्षी दीक्षाभूमीवर वाढत असलेली गर्दी लक्षात घेता लगतचे चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीला देण्यात यावे व नागपूर रोडवर टॉल लावण्यास परवानगी द्यावी या बहुजन हितकारिणी सभेने आंदोलनातून केलेल्या मागण्या प्रशासनाने अस्थायी स्वरूपात मागील वर्षीपासून मान्य केल्या हे येथे महत्वाचे आहे.

    व्यवस्थेत बरेच बदल करण्याची गरज

    तरीही या महोत्सवाचा उद्देश सफल होत नसल्याने आयोजनात आणि व्यवस्थेत बरेच बदल करण्याची गरज असल्याचे नागवंश नगराळे यांनी सोसायटीच्या लक्षात आणून दिले आहे. आंबेडकरी समाजाला माहित न होऊ देता दिक्षाभूमीवर ‘ अम्मा की पढाई’ नावाचा उपक्रम सुरु करण्यात आला होता, ते कळताच अनुयायानी बंद करण्यास भाग पाडले, यावरून संबंध आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र असून दीक्षाभूमीच्या गैरवापराला कदापी सहन केले जाणार नाही हे स्पष्ट होते. political speeches ban at Deekshabhoomi event

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी ला महोत्सवाच्या आयोजनासाठी निधीची फार चणचण भासते , ते स्वतः हा खर्च उचलतात आणि काही प्रमाणात टॉल धारकाकडून धम्म दान मिळते ही बाब घोटेकर यांनी शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून दिली . त्यावर आयोजनातील व व्यवस्थेतील सुधारणा आणि शिस्त यावर्षी अनुयायांच्या नजरेस आणून दिल्यास पुढील वर्षीपासून समाजातून मोठ्या प्रमाणात धम्मदान मिळविण्यास पुढाकार घेऊ असे अभिवचन शिष्टमंडळाने दिले आहे.



  • Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives । घुग्घुसच्या विकासकामांचा आढावा; शुद्ध पाणी आणि स्वच्छ रस्त्यांसाठी आमदार जोरगेवारांचा पुढाकार

    Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives

    Kishor Jorgewar Ghugus infrastructure directives : चंद्रपूर ११ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – आज शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

    Also Read : २० कोटी रुपयांच्या निधीतून चंद्रपुरातील मार्गाचा होणार कायापालट

    यावेळी घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, नगर अभियंता मनीष जुनघरे, कार्यालय अधीक्षक निलेश तुरानकर, भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, भाजप नेते प्रकाश देवतळे, संतोष नुने, आशिष मासिरकर, हेमंत उरकुडे, स्वप्निल वाढई, साजन गोहणे, महेश लठ्ठा, श्याम आगदारी, मयूर कलवल, राजेश मोरपाका, मल्लेश बल्ला, विजय माथनकर, मुन्ना लोडे, गुरुदास तगरपवार, विनोद लाटेवार आदींची उपस्थिती होती. Ghugus development meeting

    नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक

    बैठकीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आणि स्वच्छ ठेवणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक असून त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. तसेच शहरातील बंद पडलेले वीज दिवे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देत रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सुलभ वाहतुकीची सुविधा मिळावी, यावर त्यांनी भर दिला.

    यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या नव्या विकास आराखड्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच अलीकडील भूस्खलनात बाधित झालेल्या १६५ घरांतील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. नगरपरिषदेच्या निधीचा वापर करताना शहराच्या सर्वसमावेशक आणि संतुलित विकासाचे ध्येय ठेवावे, कोणताही भाग विकासापासून वंचित राहू नये, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले. या बैठकीला संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

  • Illegal cattle transport Maharashtra । गोवंश तस्करीवर चंद्रपूर पोलिसांचा चाप – लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

    Illegal cattle transport Maharashtra

    Illegal cattle transport Maharashtra : चंद्रपूर ११ ऑक्टोबर २०२५ – (NEWS ३४ वृत्तसेवा) – तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावराची चंद्रपूर पोलिसांनी सुटका करीत ३ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत २५ गोवंश जनावरांची प्यार फाउंडेशन कडे रवानगी करण्यात आली.

    Also Read : खड्डेमुक्त चंद्रपूर साठी खासदार धानोरकरांची भन्नाट कल्पना

    ११ ऑक्टोबर रोजी उमरी पोतदार पोलिसांना पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहिती प्राप्त होताच पोलिसांनी मौज डोंगर हळदी मार्गावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी २ पिकअप वाहनांना थांबविता झडती घेतली असता त्यामध्ये २५ गोवंश जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळले. Chandrapur police news

    ३ आरोपींवर गुन्हे दाखल

    यावेळी जनावरांना कोंबून क्रूरपणे नेण्यात येत होते, पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय मंगेश शामराव चौधरी राहणार लक्कडकोट, २७ वर्षीय राजेश गजानन घोगरे राहणार बेंबाळ, २४ वर्षीय मोहम्मद अजीज अली राहणार वाकडी यांच्याविरुद्ध कलम ११ (१), (घ), (ड), (च), (ज) भारतात प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३ (५), ९ भारतीय न्याय संहिता अन्व्ये गुन्हा दाखल करीत गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक TS२०-T-४९६७ व MH३४-BZ_८४२५, २५ गोवंश जनावर सह ४ नग मोबाईल असा एकूण १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात उमरी पोतदार चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सुभाष राऊत, सतीश झाडे, विनोद चौधरी, राहुल शंखावार, सूरज बुजाडे, दिनेश देवाडे व गोपाल घुमडेवाड यांनी केली.

  • Selfie with pothole Chandrapur । “सेल्फी विथ खड्डा!” – खड्डेमुक्त चंद्रपूरसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भन्नाट उपक्रम

    Selfie with pothole Chandrapur

    Selfie with pothole Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी “सेल्फी विथ खड्डा!” नावाचे एक अभिनव अभियान सुरू केले आहे.

    Also Read : चंद्रपूर शहरातील मार्गाचा होणार कायापालट

    “एक फोटो खड्डेमुक्त चंद्रपूरसाठी” या उद्देशाने सुरू केलेल्या या अभियानात, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी त्यांच्या परिसरातील धोकादायक खड्ड्यासोबत सेल्फी काढावा. हा फोटो सोशल मीडियावर खा. प्रतिभा धानोरकर यांना टॅग करून पोस्ट करावा. याव्यतिरिक्त, नागरिकांनी फोटोसह गुगल लोकेशन देखील खा. प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला पाठवायचे आहे.

    प्रशासनावर दबाव वाढणार

    या उपक्रमाद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांची नेमकी माहिती आणि तीव्रता जमा केली जाईल, ज्यामुळे प्रशासनावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढेल.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, “तुमचा एक फोटो ठरेल बदलाची सुरुवात!” प्रत्येक नागरिकाचा सहभाग खड्डेमुक्त चंद्रपूरच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल.

    चंद्रपूरमधील रस्ते सुरक्षित आणि सुस्थितीत असावेत यासाठी नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

    अधिक माहिती आणि फोटो पाठवण्यासाठी संपर्क:

    संपर्क क्रमांक: ९८८१०१६७१४ / ८०१०७२३७५९

  • Review of Women and Child Development Department | “जिल्हाधिकारी गौडांचे निर्देश: सर्व संस्थांनी महिला तक्रार समिती स्थापन करावी”

    Review of Women and Child Development Department

    Review of Women and Child Development Department : चंद्रपूर – जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 10) आढावा घेतला. यात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज, ‘पोश ॲक्ट – 2013’, ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना आणि आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह योजनांचा समावेश होता.

    Also Read : चंद्रपूर-मूल मार्गावर रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी, मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश

    जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, माविमचे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, संरक्षण अधिकारी कविता राठोड, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तारवार, आतिश चव्हाण आदी उपस्थित होते. district women welfare meeting

    महिलांसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत्‍ तक्रार समिती स्थापन करावी. तसेच ती वेळोवेळी अपडेटसुध्दा करावी. ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर नोंदणीबाबत महिला व बालविकास विभागाने सर्वांसाठी प्रशिक्षण आयोजित करावे. विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणा-या योजना, त्यांना मिळणारे अनुदान आदी बाबी गांभिर्याने कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

    याप्रसंगी कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे, समुदेशन केंद्र, जिल्हा विधीसेवा अंतर्गत मनोधैर्य योजना, कायदेविषयक सल्ला व जनजागृती कार्यक्रम, सखी वन स्टॉप सेंटर, जिजामाता वर्किंग वुमेन होस्टेल, शक्तीसदन योजना, स्वाधार, सर्व शासकीय आस्थापनेवर अंतर्गत तक्रार समितीचे गठन, ‘शी –बॉक्स’ पोर्टलवर नोंदणी, बेटी बचाव, बेटी पढाओ, विविध योजनांमध्ये आलेले अनुदान आदींचा आढावा घेण्यात आला.

    जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.