Blog

  • WCL compensation scam exposed | भूस्खलन पीडितांच्या १६८ कुटुंबांचे लाखो रुपये हडपले? शिवसेना (उबाठा) आक्रमक!

    WCL compensation scam exposed

    WCL compensation scam exposed चंद्रपूर/घुग्घुस 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): वेकोलीच्या वणी क्षेत्रात तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनामुळे बाधित झालेल्या अमराई वॉर्ड क्रमांक ०१ येथील १६८ कुटुंबांना वेकोलीने दिलेला भरपाईचा पैसा (Compensation Amount) पीडितांपर्यंत पोहोचलाच नाही, असा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) ने केली आहे. landslide victim compensation missing

    Also Read : ब्रह्मपुरी मध्ये जुगार अड्ड्यावर धाड

    काय आहे नेमके प्रकरण?

    • घटनेची पार्श्वभूमी: अमराई वॉर्ड क्र. ०१, घुग्घुस येथे तीन वर्षांपूर्वी भूस्खलनाची घटना घडली होती.
    • भरपाईचा मुद्दा: वेकोली (WCL) वाणी क्षेत्र, घुग्घुस यांनी या १६८ पीडित कुटुंबांना भरपाईची रक्कम देण्याची लेखी ग्वाही दिली होती. हा पैसा ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आल्याचे वेकोलीने लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे.
    • गंभीर आरोप: वेकोलीने पैसे दिले असले तरी, हा पैसा पीडित कुटुंबांना मिळालेला नाही, त्यामुळे ‘हा पैसा कोणीतरी हडपला’ असा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

    किरणताई दरेकरांच्या नेतृत्वात तक्रार:

    आज, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी, उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी सौ. किरणताई संजय दरेकर (अध्यक्षा – एकविरा महिला पतसंस्था मारेगांव, विभागीय अध्यक्ष – राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अमरावती आणि अध्यक्षा – सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन) यांनी भेट दिली. भूस्खलनाच्या विषयावर सविस्तर माहिती घेतल्यानंतर, किरणताई यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये तातडीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    शिवसेनेच्या (उबाठा) प्रमुख मागण्या:

    1. भरपाईची रक्कम कोणत्या बँकेतून आणि कोणाच्या खात्यात जमा झाली, याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी.
    2. पैशांच्या व्यवहाराचे (Transaction) चेक, बिले आणि संपूर्ण तपशील सादर करण्यात यावा.
    3. भूस्खलन पीडितांच्या पैशांची चोरी करणाऱ्या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी.

    आंदोलनाचा इशारा!

    या विषयावर त्वरित गुन्हा दाखल न झाल्यास, सर्व १६८ पीडित कुटुंबे आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच एस.पी. ऑफिससमोर धरणे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, या आंदोलनाची आणि भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. Shiv Sena protest compensation scam

    यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी:

    यावेळी सौ. सुरेखाताई डेंगळे (महिला तालुका प्रमुख वणी), सौ. सीमाताई बालगोनी (शहर सचिव वणी), बंटी घोरपडे (घुग्घुस शिवसेना उबाठा अध्यक्ष), हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख), तसेच जेष्ठ नेते प्रभाकर चिकनकर, बाळू चिकनकर, अजय जोगी, इंजि. अमित बोरकर, चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), गणेश शेंडे, योगेश भांदककर, रघुनाथ धोंगडे, पवन नागपूर, गणेश उईके आणि इतर अनेक उपोषणकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Maharashtra local body election voter list download | महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

    Maharashtra local body election voter list download

    Maharashtra local body election voter list download : चंद्रपूर 16 ऑक्टोबर  : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम २०२५ जाहीर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाचा संभाव्य दिनांक लक्षात घेऊन मतदार यादी तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९ (१) (ब) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७ अ अन्वये एक विशिष्ट दिनांक अधिसूचित केली जाते.

    Also Read : ब्रह्मपुरीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 6 आरोपी अटकेत

    कार्यक्रम जाहीर


    मतदार यादी ग्राह्य धरण्याचा कार्यक्रम (१ जुलै २०२५), राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करणे (१४ ऑक्टोबर २०२५), राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी, municipal elections voter list

    हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याचा दिनांक (६ नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक (१४ नोव्हेंबर २०२५), प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाननिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे (२८ नोव्हेंबर २०२५), मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे ४ डिसेंबर २०२५, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे १० डिसेंबर २०२५ असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

  • gambling syndicate bust | ब्रम्हपुरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा: सहा जुगाऱ्यांना अटक

    gambling syndicate bust

    gambling syndicate bust : चंद्रपूर/ब्रम्हपुरी 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव (भोसले) येथे सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, सुमारे १ लाख ५६ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील चार मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

    Also Read : रहमत नगरच्या नागरिकांना न्याय कधी मिळणार?

    नेमके काय घडले?

    ब्रम्हपुरी पोलिसांना गुप्त सूत्रांकडून पिंपळगाव (भोसले) येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर उपविभाग ब्रम्हपुरी, मूल पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B. Chandrapur) संयुक्त पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.छापा टाकल्यावर खालील आरोपी ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले.

    क्र.आरोपीचे नाववयपत्ता
    १राहुल वैरागडे४०ब्रह्मपुरी
    २संतोष शेलोटे४८पिंपळगाव
    ३अरविंद भानारकर४४ब्रह्मपुरी
    ४अशोक ढोरे४५अरेर नवरगाव
    ५लोकमान डोंगे४९अरेर नवरगाव
    ६एकनाथ चंडीकार४०अरेर नवरगाव

    फरार आरोपींची नावे

    : या कारवाई दरम्यान, राहुल अलोने (रा. भालेश्वर), नितीन जराते (रा. अरेर नवरगाव), धर्मेंद्र उर्फ धम्मा कराडे (रा. नवरगाव) आणि मयूर निमजे (रा. अरेर नवरगाव) हे चार आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. जप्त केलेला मुद्देमाल: पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे, ज्याची एकूण किंमत ₹ १,५६,६५०/- आहे.

    नगदी रक्कम (रोख): ₹ २५,९००/-मोटारसायकल: २ दुचाकी (किंमत अंदाजे ₹ १,३०,०००/-)पत्ते: ५२ तास पत्ते (किंमत ₹ ५०/-)चटई: जुगारासाठी वापरलेली चटई (किंमत ₹ ५००/-)गुन्हा दाखल:या आरोपींविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे अ.क्र. ५०४/२०२५, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम (म.जु.का.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हपुरी उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

  • permanent jobs for land acquisition victims | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संघर्षाला आमदार मुनगंटीवार यांचा पाठिंबा; विदर्भ मिनरल्सने १०३ कामगारांना तातडीने नोकरी द्यावी

    permanent jobs for land acquisition victims

    permanent jobs for land acquisition victims : चंद्रपूर, दि. 16 – स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आणि अमान्य असल्याचे सांगत, विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 103 प्रकल्पग्रस्त कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आ.मुनगंटीवार यांनी कंपनी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देत प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी ठाम भूमिका मांडली. project-affected workers rights

    Also Read : क्लोरीन गॅस गळती, रहमतनगर वासीयांना न्याय कधी मिळणार?

    यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक योगेश वाघाये, सहाय्यक कामगार आयुक्त प्रवीण कावळे, सरकारी कामगार अधिकारी खंडाईत, कंपनीचे प्रतिनिधी मनोज अग्रवाल, तसेच प्रकल्पग्रस्त कामगार व शेतकरी उपस्थित होते.

    103 प्रकल्पग्रस्तांना कंपनीने तात्काळ रोजगार द्यावा

    आ. मुनगंटीवार म्हणाले, “कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना रोजगार देणे हे कंपनीचे नैतिक आणि कायदेशीर दायित्व आहे. कंपनीने 103 शेतकऱ्यांना स्थायी नोकरीचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. संबंधित कामगारांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने तातडीने 103 प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपात नोकरी द्यावी,” असे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिले. Maharashtra industry employment policy for locals

    यावेळी आ. मुनगंटीवार यांनी कोळसा चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कोल वॉशरीजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे, वाहतूक वाहनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आणि सर्व कंपन्यांच्या प्रदूषण परवानग्या तपासण्याचे निर्देश दिले.

    ते पुढे म्हणाले, कामगार कायद्यातील त्रुटी दूर करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. स्थानिकांना रोजगारात प्रथम प्राधान्य दिले जावे, तसेच आवश्यक असल्यास कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाईल.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत माझी भूमिका नेहमीच ठाम राहिली आहे. शेतकऱ्यांनी उद्योग उभारणीसाठी आपली जमीन दिली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना रोजगार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. हा प्रश्न केवळ रोजगाराचा नसून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा आहे. प्रशासन आणि कंपनी यांनी या विषयात जबाबदारीची भूमिका घेतल्यास निश्चितच न्याय मिळू शकतो. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी माझी ठाम भूमिका आहे. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,असे आ.मुनगंटीवार म्हणाले.

  • Chlorine Gas Leak | रहमत नगरमध्ये क्लोरीन वायू गळती: महिन्यानंतरही प्रशासन झोपेत!

    Chlorine Gas Leak

    Chlorine Gas Leak : चंद्रपूर 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): येथील रहमत नगर परिसरातील रहिवाशांसाठी एक मोठी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. CSTPS च्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (Sewage Treatment Plant – STP) झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घटनेला महिना उलटूनही दोषींवर कारवाई झाली नसल्याने, स्थानिकांनी आणि AIMIM पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Rahmat Nagar Accident

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    काय आहे नेमके प्रकरण?

    • गंभीर घटना: दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रहमत नगर परिसरात एसटीपीमधून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली.
    • परिणाम: या विषारी वायूमुळे एका लहान मुलासह अनेक रहिवासी गंभीररित्या आजारी पडले. आजही काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
    • आश्वासन फोल: घटनेनंतर १८ सप्टेंबर २०२५ रोजी AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

    प्रशासन ‘गाढ झोपेत’ असल्याचा आरोप

    आश्वासन देऊनही महिना उलटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी AIMIM पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. Government Negligence

    • जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांना निवासी उप-जिल्हाधिकारी (RDC) यांच्याकडे पाठवण्यात आले.
    • RDC यांनीही या संवेदनशील विषयावर चर्चा करणे टाळले आणि “आम्ही पाहू” असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली, असा आरोप AIMIM ने केला आहे.

    AIMIM चा इशारा:

    या संपूर्ण प्रकरणावरून ‘रहमत नगरच्या रहिवाशांवर कुणी दयामाया दाखवत नाही’ आणि ‘शासन-प्रशासन गाढ झोपेत आहे’ असे स्पष्टपणे दिसून येते.

    AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे आणि अधिकाऱ्यांनी जो मजाक उडवला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. तसेच, हा एसटीपी प्रकल्प रहमत नगरमधून कायमस्वरूपी हटवला जावा, यासाठी आम्ही मोठे आंदोलन उभारू.”

    या घटनेमुळे रहमत नगरमधील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, ते न्याय आणि सुरक्षिततेच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Chandrapur police law and order । चंद्रपूर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखा; जिल्ह्यात कलम ३६ लागू

    Chandrapur police law and order

    Chandrapur police law and order : चंद्रपूर,दि. 15 : चंद्रपूर शहरात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 21 ऑक्टो. रोजी दिवाळी व क्रांतीवीर बाबूराव शेडमाके पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 15 ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहचु नये, यासाठी कलम 36 चे पोटकलम अ ते फ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये लागू करण्यात आले आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात ८८ कोटीच्या ठेवी पण..

    यानुसार सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणुक काढण्याबाबत, त्या ठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

    असे आहेत पोलिसांना अधिकार

     अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकाचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, ब) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाचेजवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, क) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाजवळ लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ड) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर किवा सार्वजनिक ठिकाणी लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, फ) कलम 33, 35, 37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार. public event regulations Chandrapur

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार याची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिका-यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशात नमुद आहे.

  • Chandrapur police action on animal trafficking । चंद्रपूरमध्ये प्राण्यांची निर्दयी वाहतूक; १६ जनावरांची सुटका, ४ आरोपी अटकेत

    Chandrapur police action on animal trafficking

    Chandrapur police action on animal trafficking : चंद्रपूर १५ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीकडून नागपूरकडे क्रूरपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या जनावरांनी भरलेल्या एका ट्रकला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ जनावरांची सुटका केली असून ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Also Read : चंद्रपुरात बचत गटातील महिलांचे दिवाळी फराळ महोत्सव

    कारवाईचे स्वरूप:

    दिनांक १५/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागभीड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कोठेगाव येथे ही कारवाई केली. पोलिसांनी जनावरांना अत्यंत क्रूरपणे वागणूक देऊन वाहतूक करत असलेला ट्रक (क्र. MH40CT2954) पकडला. ट्रकमध्ये २ नग म्हशी आणि १४ नग रेड्यांसह एकूण १६ जनावरे होती, ज्यांची किंमत अंदाजे ६,४०,०००/- रुपये आहे.

    गुन्हा दाखल:

    या प्रकरणी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. १६५/२०२५ नुसार ‘प्राण्यांना क्रूरपणे वागणुकीचा प्रतिबंध अधिनियम, १९६०’ च्या कलम ११ (१) (घ), (ड), (च), (ज) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    आरोपी आणि जप्त माल:

    पोलिसांनी या प्रकरणी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे: १. फिरोज समीर खान (वय २६), रा. भीम गड कॉलनी, तालुका छपरा, जिल्हा शिवनी (म. प्र.) २. आझाद रविदाद खान (वय १९), रा. भीम गड कॉलनी, तालुका छपरा, जिल्हा शिवनी (म. प्र.) ३. सुनील चंद्रकुमार जेलेशिया (वय २१), रा. बोटाटोला, तालुका धुलिया, जिल्हा राजनांदगाव ४. पाहिजे आरोपी: जमीर कुरेशी, राहणार नागपूर

    जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक (किंमत २०,००,०००/- रुपये) आणि १६ जनावरे (किंमत ६,४०,०००/- रुपये) असा एकूण २६,४०,०००/- (सत्तावीस लाख चाळीस हजार) रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

    जनावरे ‘प्यार फाउंडेशन’च्या हवाली:

    जप्त करण्यात आलेल्या सर्व १६ जनावरांना पुढील काळजी आणि संरक्षणासाठी चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’ येथे सुरक्षितपणे जमा करण्यात आले आहे.

  • Unclaimed bank deposits Chandrapur । चंद्रपूरमध्ये 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी; दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्याची प्रक्रिया

    Unclaimed bank deposits Chandrapur

    Unclaimed bank deposits Chandrapur : चंद्रपूर, दि. 15 (News३४ वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार 242  खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. Chandrapur bank deposit claim process

    Also Read : नशामुक्त चंद्रपूर मोहिमेची सुरुवात

    ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशीष पोरकुटे यांनी दिली. देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4612 कोटी, संस्थांच्या 1082 कोटी आणि सरकारी योजनांतील 172  कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.

    जिल्हाधिका-यांचे आवाहन 

    जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी खात्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. ठेवींचा परतावा मिळविण्यासाठी आणि निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अद्ययावत केवायसी सादर करावे. बँकांमार्फत या विशेष मोहिमेअंतर्गत जनजागृती शिबिरे आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार असून, ज्या खातेदारांचे पैसे वर्ग झाले आहेत, त्यांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व खातेदारांनी आपल्या रकमेचा परतावा मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Bank of India unclaimed deposit recovery

    संबंधित खातेदारांनी बँकेत संपर्क करावा 

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित करण्यात येणार आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी केले आहे.

  • Brahmapuri police arrest thief । ब्रह्मपुरीत ‘बोटतुट्या’ राजूचा कारनामा; ४ तासांत चोरीचे ६३,००० रुपयांचे मुद्देमाल जप्त!

    Brahmapuri police arrest thief

    Brahmapuri police arrest thief : ब्रह्मपुरी: १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) ब्रह्मपुरी शहरात एकाच रात्रीत घरफोडी आणि चोरी करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला ब्रह्मपुरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे स्टेशनजवळील पेठ वॉर्ड परिसरात झालेल्या या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपीने एकूण ६४,००० रुपये किमतीचा ऐवज चोरला होता, जो पोलिसांनी पूर्णपणे हस्तगत केला आहे.

    घटनेचा तपशील:

    दिनांक १३/१०/२०२५ च्या रात्री पेठ वॉर्ड, ब्रह्मपुरी येथे चोरीच्या दोन घटना घडल्या.

    Also Read : चोरीच्या दुचाकीसह आरोपीला अटक
    1. पहिली घटना (घरफोडी): धनीराम नकटूची मेश्राम (वय ७१) हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून २३,००० रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले आणि १,००० रुपये किमतीचा नोकिया कीपॅड मोबाईल असा एकूण २४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(A) अंतर्गत गुन्हा (अप.क्र. ४९९/२०२५) नोंद झाला.
    2. दुसरी घटना (चोरी): सोहेल नूरखान पठाण (वय ३२) यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात दरवाजे बसवलेले नव्हते. घरात झोपलेल्या अवस्थेतच आरोपीने प्रवेश करून त्यांचे ४०,००० रुपये किमतीचे दोन महागडे स्मार्टफोन – Realme GT8 आणि IQOO – लंपास केले. याप्रकरणी भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा (अप.क्र. ५०९/२०२५) दाखल करण्यात आला. Chandrapur burglary case news

    पोलिसांची तत्परता आणि कारवाई:

    घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव आणि पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित शोधमोहीम सुरू झाली. Police recovery stolen goods Brahmapuri

    सपोनिरी मनोज खडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.हवा. योगेश शिवणकर, मुकेश गजबे, अजय कटाईत, पो.शि. इरशाद शेख, निलेश तुमसरे, स्वप्निल पळसपगार, चंदू कुलसंगे आणि वशिष्ठ रंगारी यांचा समावेश होता.

    पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेत असताना एका अनोळखी संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू जुनारकर (वय २२, रा. चंद्रपूर) अशी पटली. हा आरोपी चंद्रपूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळताच त्याची झडती घेण्यात आली.

    झडतीदरम्यान, दोन्ही गुन्ह्यांमधील चोरलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल त्याच्याकडे मिळून आले. पोलिसांनी एकूण ६३,००० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून, पुढील तपास पो.हवा. मुकेश गजबे आणि अजय कटाईत करत आहेत.

    ब्रह्मपुरी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे चोरीच्या घटनांना त्वरित आळा बसला असून, नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

  • Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 । चंद्रपुरात बचत गटातील महिलांचा दिवाळी फराळ महोत्सव

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 : चंद्रपूर,दि. 14 (News३४ वृत्तसेवा) :   दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे यांची खरेदी करावी. तसेच या महिला गटांचा उत्साह वाढवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पध्दतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव 15 ते 19 आक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

    ४ दिवसीय फराळ महोत्सव

    उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खाद्दपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या गणपती महोत्सव प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. Buy homemade Diwali faral

    Also Read : चंद्रपुरात १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित

                  सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसरात तथा मौलांना अब्दुल कलाम आझाद गार्डन चंद्रपूर येथे दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार आहे. यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच जिल्हा अभियान सहसंचालक मंजिरी टकले यांनी केले आहे.