Blog

  • tiger attacks on farmers in gondpipari region | शेतात वाघाचा हल्ला; गोंडपीपरीमधील ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

    tiger attacks on farmers in gondpipari region

    tiger attacks on farmers in gondpipari region : गोंडपिपरी 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) :– तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊजी पत्रू पाल (वय ७०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आहे. वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 34 नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यामध्ये 30 वाघाच्या, 1 अस्वल, 1 बिबट व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

    Also Read : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

    गावकऱ्यांची शोधमोहीम आणि भयावह दृश्य

    भाऊजी पाल हे शनिवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतातील बैल आणण्यासाठी गेले होते. परंतु सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता, बैलजोडी बांधलेली दिसली मात्र भाऊजी पाल यांचा काहीच मागमूस लागला नाही.
    अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली आणि सकाळी पुन्हा शोध घेतला असता गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले, शेतकरी भाऊजी पाल यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, वाघाने हल्ला करून भाऊजी पाल यांना ठार केल्याचे उघड झाले. farmer killed by tiger 2025

    घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर, बिटगार्ड दत्ता, तसेच निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

    या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संतापही व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात त्यांची पत्नी असून गावात शोककळा पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाचा वावर वाढला आहे. शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा सतत आढळत आहेत. या काळात कापूस वेचणे, धान कापणी आणि सोयाबीन संकलन अशी शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी अधिकच धोक्यात आहेत.

    तहसीलदार शुभम बहाकर आणि वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून उपाययोजना सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर यांनी दिली आहे.

  • Mahavitaran contract workers Diwali bonus | महावितरण कंत्राटी कामगारांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी, दिवाळीपूर्वी बोनसाची ग्वाही!

    Mahavitaran contract workers Diwali bonus

    Mahavitaran contract workers Diwali bonus : चंद्रपूर 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): महावितरण कडून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक दि.16 ऑक्टोबर रोजी संचालक मा. राजेंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यात प्रामुख्याने पुनर्रचनेमूळे एक ही कंत्राटी कामगार कमी होणार नाही उलट 10% अधिक कामगार वाढवणार असल्याची ग्वाही संचालक मा. राजेंद्रजी पवार यांनी संघटनेला दिली.

    Also Read : घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

    मा.औद्योगिक न्यायालयाकडून संरक्षण दिलेल्या कंत्राटी कामगारांच्या नावाची यादी राज्यातील सर्व विभागाला पुन्हा पाठवू, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील व सेवा ज्येष्ठता यादी नुसार शेवटी कामाला लागलेला कामगार आधी कमी केला जाईल या बाबत फिल्डवर सूचना दिल्या जातील असे महावितरण मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी सांगितले. electricity workers wage settlement before Diwali

    वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

    राज्यात ज्या कामगारांमुळे घरा घरात उजेड राहातो त्या कामगारांची दिवाळी अंधारात जायला नको या साठी दिवाळी पूर्वी वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे असे मत संघटनेने व्यक्त केले असता चालू व थकीत वेतन, तसेच मागील फरक व बोनसची रक्कम तातडीने देण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

    बैठीकसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व कार्याध्यक्ष अमर लोहार सहीत निखिल टेकवडे उपस्थित होते.

    कंत्राटी कांमगारांच्या अनेक प्रलंबित विषयासाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

  • Maharashtra juvenile crime news | बिनबा गेट परिसरात संशयास्पद हालचाल, गुन्हे शाखेची झडती; घरफोडी प्रकरणाचा उलगडा

    Maharashtra juvenile crime news

    Maharashtra juvenile crime news : चंद्रपूर 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch – LCB) पथकाने चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना मोठी कारवाई केली आहे. शहराच्या बिनबा गेट परिसरातील शांतीधामजवळ संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, एका गंभीर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. Chandrapur LCB patrol success

    Also Read : चंद्रपूर जिल्हाधिकारी व न्यायाधीश यांची बालगृहात दिवाळी

    नेमका काय प्रकार घडला?

    दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलींग करत होते.

    • गुप्त माहिती: याच दरम्यान, बिनबा गेट परिसरातील शांतीधामजवळ एक विधीसंघर्षग्रस्त बालक संशयास्पद हालचाली करताना दिसल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
    • ताब्यात: मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने शांतीधामजवळ या बालकास पंचांसमक्ष ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ सोन्याच्या दोन अंगठ्या (Rings) मिळून आल्या.
    • गुन्हा उघड: या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, बालकाने घुटकाला वॉर्ड, चंद्रपूर येथे झालेल्या एका घरफोडीची कबुली दिली.

    १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त!

    पोलिसांनी या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या वडिलांच्या उपस्थितीत त्याच्याकडून खालील गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे:

    गुन्ह्याचा तपशीलजप्त केलेला मुद्देमालकिंमत
    पो. स्टे. चंद्रपूर शहर अप क्र. ७५४/२०२५ (कलम ३०५(a), ३३१(३), ३३१(४) BNS २०२३)सोन्याच्या दोन अंगठ्या₹ १,००,०००/-

    पुढील तपास सुरू:

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेला मुद्देमाल आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमधील तपास अधिकारी आणि मुद्देमाल मोहरर यांच्या ताब्यात दिले आहे.

    कार्यवाही करणारे पथक: या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकासह उपविभाग चिमूर पथकाचाही सहभाग होता.

  • Chandrapur juvenile home Diwali | बालगृहातील मुलींसोबत जिल्हाधिकारी वन्यायाधीशांनी साजरी केली आनंदमयी दिवाळी

    Chandrapur juvenile home Diwali

    Chandrapur juvenile home Diwali : चंद्रपूर, दि. 18 (News34 वृत्तसेवा) :  चंद्रपूर येथील बालगृहामध्ये शुक्रवारी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  एस. एस. भिष्म  यांनी बालगृहातील मुलींसोबत दिवाळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.

    Also Read : ही आंबेडकरी पूर्व वैभवाची नवी सुरुवात – नागवंश नगराळे


    बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसोबत कुटुंबाप्रमाणे सण साजरा करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुलींना जीवनात सकारात्मकता राखून यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी बालकांना बाहेरील जगाचा अनुभव घेऊन आयुष्य योग्य मार्गावर जगण्याचा सल्ला देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. district child development event

    शिक्षणासाठी मदत करणार


    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भिष्म यांनी बालगृहातील वास्तव्याकडे एक संधी म्हणून पाहण्याचा संदेश देत त्या संधीचे सोनं करण्यासाठी प्रेरित केले. तसेच मुलींच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मदत करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा  सीमा लाडसे यांनी मुलींना “आकाशात गरुड होऊन झेप घेण्यासाठी प्रयत्न करा, Sky is the Limit मानून अभ्यास करा,” असा संदेश दिला. बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत आत्मविश्वास वाढविण्याचा सल्ला दिला.


    बालगृहातील मुलींनी स्वतः तयार केलेले दिवे, आकाशकंदील, ग्रीटिंग कार्ड इत्यादी हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनीस मान्यवरांनी भेट देऊन मुलींचे कौतुक केले. या साहित्याची खरेदी करून त्यांनी बालिकांचा उत्साह अधिक वाढविला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी बालकांसोबत दिवाळी फराळाचा आनंद घेतला. कार्यक्रमाला बाल न्याय मंडळाच्या सदस्या डॉ. जोत्स्ना मोहितकर, वनिता घुमे,  भावना देशमुख, ॲड. मनिषा नखाते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  अजय साखरकर अधिक्षक, समुपदेशक आणि कर्मचारी उपस्थित होते.


    कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केले. शेवटी समुपदेशक  यशवंत बावणकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

  • Bahujan Hitkarini Sabha leadership | बहुजन हितकारिणी सभेचे अध्यक्ष नगराळे म्हणतात: ही आंबेडकरी पूर्ववैभवाची नवी सुरुवात

    Bahujan Hitkarini Sabha leadership

    Bahujan Hitkarini Sabha leadership : चंद्रपूर 18 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – फार पूर्वी आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर शिदोरी घेऊन यायचे, आता येथून शिदोरी घेऊन जातात. ज्यांचे चळवळीशी काही नाते नाही, विरोधक आहेत, तेही भोजनदान देतात, काही प्रस्थापित गित- संगीत स्पॉन्सर करतात, तिकडे गर्दी करणारे धम्म मंचाकडे पाठ फिरवितात, या प्रस्थापिताना हा मंच बेधडक उपलब्ध होत राहिला, परंतु यावर्षी प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांचे राजकीय भाषण नकोच या भूमिकेला तरुणाईने उचलून धरले, परिणामता पुढे स्पॉन्सरशिप बंद होईल.

    Also Read : सफाई कामगारांची दिवाळी गोड, आमदार जोरगेवार यांची मध्यस्ती

    स्वावलंबन आणि स्वाभिमान जागृत होईल व चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीतून आंबेडकरी चळवळीचे पूर्ववैभव प्राप्त होण्यास सुरुवात होईल”, असे बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष नागवंश नगराळे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. Ambedkarite unity movement

    दीक्षाभूमी चंद्रपूर येथील महोत्सवातील दिनांक 16 ऑक्टो. च्या मुख्य समारंभास आठवले, अडबाले यांचा अपवाद वगळल्यास भाजप काँग्रेस च्या सर्वच नेत्यांनी मंचावर येण्याचे टाळले, त्याला’ राजकीय भाषण नकोच’ ही भूमिका कारण असल्याचे बोलल्या जात आहे, हे येथे विशेष महत्वाचे आहे.

    हे आंबेडकरी तरुणाईचे यश


    मुख्य समारंभाचे लाईव्ह प्रक्षेपण सुरु असताना केंद्रीय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले हे थोडक्यात भाषण आटपून निघून गेले. आम. अडबाले यांनी खाजगीकरणाच्या धोरणावरून अप्रत्यक्ष भाजप कांग्रेसवर टिका करताना बाबासाहेब व संविधानाचा संदर्भ जोडला , ते स्वागतयोग्य होते. मात्र भाजप काँग्रेसचे इतर मुख्य नेते मंचावर नदारद होते, हे बघून आपल्या प्रयत्नाला यश आल्याचे अनेक फोन आले याचे खरे श्रेय आंबेडकरी तरुणाईला आहे, असे नगराळे पुढे म्हणाले. Ambedkarite social change Maharashtra


    ” अभेद्य एकता आणि स्वाभिमानी चळवळ या बळावर आंबेडकरी समूहाने बहुजनांना हक्क मिळवून दिले आणि संविधानिक हक्क – अधिकार टिकविले. परंतु स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही नेते प्रस्थापित पक्षांच्या वळचनीला गेल्याने अभेद्य आंबेडकरी एकता नष्ट झाली आहे, याचे शल्य सतत सर्वांना बोचत आहे, परंतु आंबेडकरी तरुणाईने ‘ प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांची राजकीय भाषणे नकोच ‘ या भूमिकेला उचलून धरल्याने दीक्षाभूमी व्यवस्थापनाला सुद्धा’ पुढील वर्षी या पुढऱ्यांना निमंत्रित केले जाणार नाही व समाजाला विश्वासात घेऊन नियोजनात आमूलाग्र बदल केल्या जाईल’, अशी भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातून निकटच्या भविष्यात आंबेडकरी एकतेला सुरुवात होईल असा आशावादही या पत्रकात नगराळेनी व्यक्त केला आहे.

  • Nagpur University bamboo program | चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राला नागपूर विद्यापीठाची मान्यता – कौशल्यविकासाचे नवे दालन खुले

    Nagpur University bamboo program

    Nagpur University bamboo program : चंद्रपूर, दि. 18 (News34 वृत्तसेवा) : बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (BRTC) या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “बांबू हस्तकला” आणि “बांबू फर्निचर” या अल्पमुदत व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

    नागपूर विद्यापीठाकडून मिळणार प्रमाणपत्र

    या मान्यतेमुळे संस्थेचे प्रशिक्षण आता विद्यापीठीय ओळख प्राप्त होऊन प्रशिक्षणार्थींना नागपूर विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हे प्रशिक्षण चार क्रेडिटचे असून, उमेदवारांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही ते उपयुक्त ठरणार आहे. या प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थींना पुढे डिप्लोमा, पदवी किंवा उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे सुलभ होईल. Chichpalli bamboo course

    Also Read : वेकोलीच्या घुग्गुस कोळसा खाणींमधील ओव्हरबर्डन ची चोरी

    या मान्यतेसाठी बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राने नागपूर विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण व विस्तार विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने चिचपल्ली येथे भेट देऊन संस्थेची पायाभूत सुविधा, प्रशिक्षण पद्धती, तांत्रिक मनुष्यबळ व कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले. समितीने संस्थेला हे प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यास सक्षम असल्याचे मत नोंदविल्यानंतर विद्यापीठाने ही मान्यता प्रदान केली.

    या उपक्रमामागे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन व वन्यजीव) तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण)  एम. एस. रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निर्देशानुसार संस्थेने आवश्यक कार्यवाही करून ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

    संस्थेचे संचालक मनोज खैरनार यांच्या नेतृत्वाखालील टीमने सातत्यपूर्ण प्रयत्न, नियोजन आणि दूरदृष्टी दाखवून हे यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या बांबू औद्योगिक धोरणामुळे बांबू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता मिळून शासकीय योजना, शिष्यवृत्ती व रोजगार संधींचे दरवाजे खुलणार आहेत.

    या मान्यतेमुळे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली हे राज्यातील कौशल्याधारित शिक्षण व उद्योगसंबंधित प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक सक्षमपणे उभे राहणार आहे.

  • National Quality Assurance Standards certification | दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची उत्कृष्ट कामगिरी; राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाचा बहुमान!

    National Quality Assurance Standards certification

    National Quality Assurance Standards certification : चंद्रपूर, दि. 18 (News34 वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने अभिमानास्पद कामगिरी केली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards -NQAS) प्रमाणपत्र मिळविणारे हे जिल्ह्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे.

    Also Read : आमदार जोरगेवार यांच्या मध्यस्तीने सफाई कामगारांचे आंदोलन मागे

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णसेवेची गुणवत्ता, स्वच्छता, दस्तऐवजीकरण, सुविधा, मानव संसाधन व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान या विविध घटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन करण्यात आले. सर्व मापदंडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने मानांकन संपादन केले. Maharashtra healthcare facility certification NQAS

    दर्जेदार सेवा उपलब्ध

    या केंद्रात मातृ व बाल आरोग्य, अ-संसर्गजन्य रोग तपासणी, लसीकरण, प्रयोगशाळा सुविधा, आपत्कालीन सेवा आणि डिजिटल नोंद प्रणाली या सर्व सेवा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध आहेत. केंद्राच्या परिसरात स्वच्छता, हिरवळ आणि रुग्णाभिमुख सुविधा यामुळे हे केंद्र आदर्श आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जात आहे.

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले की, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रमाणपत्र मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. या यशामागे केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा संयुक्त सहभाग आहे.

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याकरीता आवश्यक निधीची तरतूद करून दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व प्राथमिक आरोग्य संस्थेचा आढावा घेऊन मार्गदशन केले व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील त्रुटीची पूर्तता करण्याकरिता आवश्यक सहकार्य केले. राज्य व जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दुर्गापूर आरोग्य केंद्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून हे केंद्र आता इतर सर्व आरोग्य केंद्रांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी कळविले आहे.

  • Diwali bonus sanitation workers | आंदोलनाचा तिढा सुटला; आमदार किशोर जोरगेवारांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य

    Diwali bonus sanitation workers

    Diwali bonus sanitation workers : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

    Also Read : घुग्गुस वेकोली मधून चक्क ओव्हरबर्डन ची चोरी

    वेतनवाढ, प्रलंबित वेतन तातडीने देणे, कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणे, दिवाळी बोनस तसेच कामाच्या अटी सुधाराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन कामगारांनी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवस नाले सफाईचे काम बंद पडले होते. municipal workers protest resolution

    आमदार जोरगेवार मुळे सुटला तिढा

    सदर प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या सफाई कामगारांच्या प्रतिनिधींशी आणि महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. आजच कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे.

    या चर्चेनंतर कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले.

    या प्रसंगी मनपा अधिकारी, भारतीय कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी, कामगार नेते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेशही आमदार जोरगेवार यांनी दिले.

  • Overburden Theft in wcl coal mine | मोठी बातमी! डब्ल्यूसीएल (WCL) घुग्घुस माईन्समध्ये ओव्हरबर्डन (OB) चोरीचा पर्दाफाश; सुरक्षा रक्षकाला मारहाण करून चोरटे पसार

    Overburden Theft in wcl coal mine

    Overburden Theft in wcl coal mine : चंद्रपूर/घुग्घुस 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील डब्ल्यूसीएल घुग्घुस ओपनकास्ट माईन्समधून ओव्हरबर्डन (OB) या गौण खनिजाची अवैध चोरी (Illegal Mining) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरी करणाऱ्या वाहनचालकांनी नाईट ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाशी मारहाण करून पळ काढल्याची घटना घडली आहे. WCL OB theft Chandrapur

    Also Read : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

    नेमका प्रकार काय घडला?

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून ओव्हरबर्डन चोरीचा हा गोरखधंदा सुरू होता.

    चोरीची पद्धत: आरोपींनी नकोडा ग्रामजवळ माईन्स परिसरात पोकलेन मशीनच्या साहाय्याने हायवा ट्रकमध्ये ओव्हरबर्डन लोड केले आणि ते चोरी करून घेऊन जात होते.

    सुरक्षा रक्षकांशी वाद: नाईट ड्युटीवर तैनात असलेले एमएसएफचे सुरक्षा रक्षक राशिद शेख आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी MH34-BG7088, MH40-1008 आणि MH34-BZ9334 या वाहनांचा पाठलाग केला. घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील सप्रा पेट्रोल पंपाजवळ या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार वाद आणि धक्काबुक्की झाली.

    चोरीचा माल रस्त्यावर खाली: या झटापटीनंतर चोरट्यांनी ओव्हरबर्डन मटेरियल घुग्घुस-चंद्रपूर रस्त्यावर रिकामे केले आणि वाहने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

    पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपी फरार

    गुन्हा नोंद: बुधवारी (दिनांक १६ ऑक्टोबर २०२५) मध्यरात्री १२ च्या सुमारास या प्रकरणी घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

    आरोपींचा शोध: पोलीस निरीक्षक एपीआय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या नंबरच्या आधारावर आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये चंद्रपूर येथील साकिब शेख आणि शिवशंकर नावाच्या मालकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

    सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

    डब्ल्यूसीएल (WCL) च्या एवढ्या मोठ्या परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची चोरी होणे, हे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. सब एरिया मॅनेजर मनीष पोडे यांनी ‘आर्थिक साठगाठ’ असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र, माहिती मिळताच डब्ल्यूसीएल प्रशासन व एमएसएफच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डब्ल्यूसीएल मुख्यालय, नागपूर यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी (Internal Inquiry) सुरू केली आहे.

    स्थानिक नागरिक बांदोरे यांनी ही पहिलीच घटना नसून, गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी असे अनेक वाहने ओव्हरबर्डन चोरी करताना दिसले आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

    घुग्घुस पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. हा चोरीचा धंदा एखाद्या मोठ्या रॅकेटचा भाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

  • Vidarbha Minerals Energy job assurance | डॉ. सुधीर मुनगंटीवार यांचा हस्तक्षेप — प्रकल्पग्रस्तांना मिळणार स्थायी रोजगार; आमरण उपोषण मागे; प्रशासनाने दिले रोजगाराचे लेखी आश्वासन

    Vidarbha Minerals Energy job assurance

    Vidarbha Minerals Energy job assurance : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरी संदर्भातील महत्वपूर्ण बैठक माननीय आमदार डॉक्टर सुधीर मुनगंटीवार  यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आणि अमान्य असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले.

    Also Read : 168 कुटुंबाचे लाखो रुपये हडपले, घुग्गुस पोलिसात तक्रार

    या बैठकीत विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्त कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, उपवनसंरक्षक श्री. योगेश वाघाये यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    103 प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्याचे निर्देश

    कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त बांधवांनी चंद्रपूर येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज मागे घेतले आहे. या संदर्भात काल डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करून निर्देश जारी केले आहेत. government action on job rights for displaced farmers

    डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने आणि ठामपणे उभा राहणार आहे.”

    आज आमरण उपोषण करणारे रंजीत पिंपळशेंडे, प्रभाकर काळे, राजू पिंपळशेंडे, कवडू नैताम यांनी डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण मागे घेतले.

    या प्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनोज सिंघवी, साजिद शेख, सोहम बुटले, धनराज कोवे, प्रलय सरकार, ढवळे, अमित निरंजने, उमेश आष्टणकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    प्रशासन आणि कंपनी यांच्यातील या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य तो प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.