Blog

  • India Alliance Press Conference : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांच्या विरोधात असंतोष – आमदार सुभाष धोटे

    India Alliance Press Conference : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांच्या विरोधात असंतोष – आमदार सुभाष धोटे

    India alliance press conference भाजपने चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार घोषित केल्यावर इंडिया आघाडीत सुद्धा उमेदवार लवकर घोषित व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे.

     

     

    खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे त्या जागेवर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा हक्क असल्याचे कांग्रेस पक्षातून नेहमी बोलल्या गेले, मात्र अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्येचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी पुढे आल्याने उमेदवारीसाठी कांग्रेस पक्षात चुरस वाढली आहे. India alliance press conference

    वाचा – आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

    मात्र चंद्रपुरातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी बैठक घेत चंद्रपूर लोकसभेसाठी लोकसभा क्षेत्रातील स्थानिक असावा अशी एकमुखाने मागणी केली.

     

    15 मार्च ला इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी, महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांची उपस्थिती होती. India alliance press conference

    वाचा – निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी भाजप लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या टीका करीत, मुनगंटीवार यांना चंद्रपूर शहराच्या बाहेर कोण ओळखत, ग्रामीण भागातील नागरिक मुनगंटीवार यांना ओळखत नाही, सुधीर मुनगंटीवार यांची जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. India alliance press conference

    वाचा – चंद्रपुरातील या सावकारांचे परवाने झाले रद्द

    तिकीट मिळण्याच्या आधी ते म्हणायचे संसद भवणातील दरवाज्याला लागलेले लाकूड हे चंद्रपुरातील आहे, त्या दरवाज्यातून मी जाणार अशी भीती माझ्या मनात आहे, मात्र चंद्रपूरची जनता तुम्हाला त्या दारातून जाऊ देणार नाही याची काळजी आम्ही घेणार असे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी केले.

  • National Health System Contract Workers :  आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

    National Health System Contract Workers : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

    National Health System Contract Workers
    राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे.

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी निर्भय बनो सभा रेड सिग्नल

    राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पदावर कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. यासंदर्भात त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांना शासन दरबारी ठेवण्याची विनंती केली. National Health System Contract Workers

    वाचा – जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

    या संदर्भात आमदार धानोरकर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावावा या संदर्भात विनंती केली. विधानसभेत लक्षवेधी लावून सभागृहाचे लक्ष वेधले व या आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात शासनाला व नागरिकांना केलेल्या मदतीची माहिती करून दिली. National Health System Contract Workers

     

    शासनाने आमदार धानोरकर यांना शब्द दिला होता व लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले होते. वारंवार या विषयाचा पाठपुरावा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने त्याची फलश्रुती प्राप्त झाली असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात लवकरच शासन निर्णय निघणार असून हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. National Health System Contract Workers

     

    याबाबत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार धानोरकर यांचे आभार मानले असून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे मत व्यक्त केले आहे.

  • Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech : निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल – असीम सरोदे

    Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech : निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल – असीम सरोदे

    Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech 14 मार्चला चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांनी प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शविली, नरेंद्र मोदी, अमित शाह कसे देशातील नागरिकांना मूर्खात काढत आहे याबाबत उपस्थित वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

     

     

    निर्भय बनो सभा सायंकाळी 5 वाजतापासून सभास्थळी गर्दी जमायला लागली, लहानापासून ते वृद्धापर्यंत नागरिक सभेच्या दिशेने येऊ लागले, भावी पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला काय करायला हवं यासाठी हजारो नागरिक सभास्थळी जमा झाले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

    वाचा – A to Z बाजाराला भीषण आग

    ऍड असीम सरोदे व विश्वंभर चौधरी या दोन वक्त्यांनी सभास्थळ गाजवून दिले, केंद्र सरकारच्या योजनांची पोलखोल या सभेच्या माध्यमातून करण्यात आली, नुकताच संपन्न झालेला ताडोबा महोत्सव कुणासाठी होता? तो कोट्यवधी रुपयांची उधळण ही सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होती, असे वक्तव्य सरोदे यांनी यावेळी केले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील 23 सावकारांचे परवाने रद्द

    लंडन मधून येणारे वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करीत राजकारण करण्याचा डाव सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार करीत असल्याची माहिती या सभेच्या माध्यमातून देण्यात आली. आजची ही सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    सरकार अनेक नव्या योजना आणतात, मात्र त्या योजनांचे पुढे काय होते, हे कुणालाच कळत नाही, त्या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होतात ते फक्त जाहिरात बाजीवर, आज चंद्रपूर शहर हे पूर्णतः प्रदूषित झाले आहे, आपल्या जनप्रतिनिधी यांना निर्भयपणे विचारा चंद्रपुरातील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करीत आहे?

     

    वाचा – सुरू झाली चंद्रपूर ते मुंबई रेल्वेसेवा

    विश्वंभर चौधरी यांनी या सभेचा उद्देश काय? याबाबत सांगत आपण आपल्या भावी पिढीचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, याबाबत आम्ही जनजागृती करण्यासाठी आलो आहे असे सांगितले, चंद्रपुरात अनेक समस्या आहे, मानवनिर्मित पूर, प्रदूषण मात्र यावर उपाययोजना काहीच नाही.

     

    वर्ष 2024 मध्ये मतदान करताना फक्त इतकं लक्षात ठेवा, संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, मतदानाच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    चंद्रपुरातील निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

  • Fierce fire in Chandrapur : A to Z बाजाराला भीषण आग

    Fierce fire in Chandrapur : A to Z बाजाराला भीषण आग

    Fierce fire in Chandrapur चंद्रपूर शहरातील गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानात आज 15 मार्चला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

     

    आगीचा धूर दिसतात नागरिकांनी त्या दिशेने धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले, आग हळूहळू रौद्र रूप धारण करीत असल्याने अजूनही आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. Fierce fire in Chandrapur

     

    शहरातील तुकुम परिसरात गजबजलेल्या ठिकाणी असलेले A TO Z बाजारात सकाळच्या सुमारास अचानक आग लागली, हळूहळू आगीने रौद्र रूप धारण केले, तुकुम भागात आगीचा धूर पसरल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले, सुजाण नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली, अग्निशमन विभागाची गाडी त्याठिकाणी पोहचली मात्र अजूनही आग आटोक्यात आली नाही. Fierce fire in Chandrapur

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

    A TO Z बाजाराच्या बाजूला हॉटेल आहे, जर आग आटोक्यात आली नाही तर भयावह दुर्घटना शहरात टाळता येणार नाही.

     

    सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली असा अंदाज आहे.

  • Cancellation of money lending license : चंद्रपूर जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

    Cancellation of money lending license : चंद्रपूर जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

    Cancellation of moneylending license सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्ती, राजुरा तालुक्यातील 6, ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे.

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात लोकसभेची जबरदस्तीची वरमाला

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अन्वये सावकारी परवाना नुतनीकरण 31 मार्च 2023 पूर्वी करणे बंधनकारक असते. त्यानंतर दोन महिन्यांच्या मुदतीत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत अतिरिक्त शुल्क 500 रुपये भरून नुतनीकरण करता येते. मात्र त्यानंतर आलेल्या अर्जावर संबंधित सावकाराचे सहायक निबंधक,  सहकारी संस्था हे अर्ज स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सावकारी परवानाशिवाय संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जातो. Cancellation of moneylending license

     

    वाचा – चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    सध्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्यावतीने सावकारी परवाना रद्द करण्याची प्रकिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असे एकूण 23 व्यक्ती असून त्यांचा परवाना रद्द करण्यात आल्याचे सावकाराचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी कळविले आहे.

     

    सावकारी परवाना रद्द झालेल्या व्यक्ती : चंद्रपूर तालुक्यातील विलास पांडूरंग निखारे (गजानन महाराज मंदीर रोड, स्नेहनगर, चंद्रपूर), विनोद नारायण अलगेरवार (हनुमान मंदिराजवळ भिवापूर रोड, चंद्रपूर), ओम हायर परचेस प्रोप्रा, शंकर वासुदेव शेंडे आणि कवलजितसिंग इंद्रजितसिंग सलूजा (चंद्रपूर), अशोक राजम येरकल (लालपेठ कॉलरी नं. 1, नांदगाव रोड, चंद्रपूर), बलविरसिंग हरभजनसिंग चड्डा (दीक्षित ले-आऊट, बापटनगर, चंद्रपूर), प्रकाश सिताराम गुंटेवार (सिव्हील लाईन, वॉर्ड क्र. 1, चंद्रपूर), सरीता राजेंद्र मालू (सिव्हील लाईन, चंद्रपूर),  ईझी फायनान्स प्रोप्रा. शुभम मारोती खुसपरे (गजानन मंदीर वॉर्ड, चंद्रपूर), रामदेवबाबा फायनान्स प्रोप्रा. प्रशांत भास्करराव कोलप्याकवार (रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर) क्रिष्णा राज क्रिष्णन पी. क्रिष्णा स्वामी रेड्डी (तुकूम, चंद्रपूर) आणि निलेश मधूकर नावकर (बगड खिडकी, चंद्रपूर) Cancellation of moneylending license

     

     

    राजुरा तालुक्यातील अनिल रामभाऊ गंप्पावार (रामनगर कॉलनी, राजूरा), राजेश बंडू यशुरवार (गडी वॉर्ड क्र. 1, राजुरा), नवनीत चंद्रकांत घट्टवार (राणा वॉर्ड क्र. 5 राजुरा), अवेज शकील अन्सारी (मौलाना आझाद, राजुरा), संदीप घनश्याम पडवेकर (रमाबाई वॉर्ड, राजुरा) आणि अंकूश अरविंद्र गंप्पावार (इंदिरा नगर, राजुरा). ब्रम्हपूरी तालुक्यातील राजेंद्र श्यामसुंदर काळबांधे (मु.पो. हळदा, ता. ब्रम्हपुरी) आणि हनुमंतराव मोनाजी राऊत (हळदा, ता. ब्रम्हपुरी). याशिवाय मार्गवी आनंद नायर (न्यू समठाना, भद्रावती),  हमीद युसूफ शेख (मु.पो. तळोधी, ता. नागभीड), मंदा बबनराव येमुलवार (मु.पो. सिंदेवाही) आणि जयलक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा सौरभ सुभाष येल्लेवार (मु.पो. भिसी, ता. चिमूर).

  • Bjp candidate Sudhir Mungantiwar : इच्छा नसताना मुनगंटीवार यांच्या गळ्यात जबरदस्ती लोकसभेची वरमाला

    Bjp candidate Sudhir Mungantiwar : इच्छा नसताना मुनगंटीवार यांच्या गळ्यात जबरदस्ती लोकसभेची वरमाला

    Bjp candidate sudhir mungantiwar 13 मार्च ला भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली या यादीत भाजपने महाराष्ट्र राज्यातील 20 जणांची नावे जाहीर केली होती, चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना मिळाल्यावर कही खुशी कही गम चे वातावरण निर्माण झाले आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी अनेकदा मला लोकसभा उमेदवारी नको, मला लोकसभेत जायची इच्छा नाही असे जाहीर प्रतिक्रिया दिली मात्र पक्षाने आदेश दिल्यास मला लढावे लागेल, आता मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Bjp candidate sudhir mungantiwar

     

    माझी तिकीट मीच कापणार असे म्हणणारे सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर झाली, आता थेट जनता तुमची दिल्लीची वाट कापणार हे येणाऱ्या काळात जनता जनार्दन करेल. अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 14 मार्च रोजी दिली. Bjp candidate sudhir mungantiwar

    वाचा – चंद्रपूर ते मुंबई, रेल्वे सुरू

     

    नव्या संसद भवनातील दरवाज्याला लावलेले लाकूड चंद्रपुरातील आहे, तिथून मला जाण्याचा प्रसंग येऊ नये अशी मला भीती वाटते अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली होती. Bjp candidate sudhir mungantiwar

     

    वाचा – वाघाचा 58 वर्षीय इसमावर हल्ला, इसम ठार

    ते लाकूड भाजपच्या जंगलातील नव्हते ते चंद्रपुरातील आहे, मुनगंटीवार यांची इच्छा नसताना त्यांच्या गळ्यात ही वरमाला टाकण्यात आली असून त्यांचा दिल्ली जाण्याचा मार्ग कठीण आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

  • Tiger Attack in chandrapur : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला

    Tiger Attack in chandrapur : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला

    tiger attack in chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचतो, एकतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलातून शहरात येतात तर दुसरीकडे नागरिक लाकडाच्या शोधात जंगलात जातो.

     

    बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर वार्ड येथे राहणारे 67 वर्षीय नामदेव आत्राम हे 13 मार्च ला कारवा जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेले होते, मात्र दिवस उलटल्यावर ते घरी परतले नाही, याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली, वनविभागाला याबाबत कळविण्यात आले, त्यानंतर वनविभागाच्या चमूने कारवा जंगलात आत्राम यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. tiger attack in chandrapur

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव

    जंगलाच्या 2 किलोमीटर अंतरावर नामदेव आत्राम यांचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला, सदर हल्ला हा वाघाने केल्याचा अंदाज वनविभागाने लावला आहे, आत्राम यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

    सध्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी घटना परिसरात कॅमेरे व पिंजरे लावण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली आहे.

     

    वाचा – चंद्रपुरातून आता थेट मुंबई रेल्वे ला सुरुवात

    सदरची पुढील कारवाई पोलीस निरीक्षक आसिफ रजा व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे. 13 मार्च ला बल्लारपूर येथे 7 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करीत तिला जखमी केले होते

  • Mungantiwar lost twice in Lok Sabha elections : 33 वर्षांनी सुधीर मुनगंटीवार पुन्हा लोकसभेचे उमेदवार

    Mungantiwar lost twice in Lok Sabha elections : 33 वर्षांनी सुधीर मुनगंटीवार पुन्हा लोकसभेचे उमेदवार

    Mungantiwar lost twice in Lok Sabha elections भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुक 2024 च्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहिर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचाही समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रामधुन दिल्ली वारी करण्यासाठी पक्षाने राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ना.मुनगंटीवार यांनी इच्छुक नसल्याचे सांगीतल्यावरही उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत काहीं खुशी कहीं गम चे वातावरण आहे.

     

    चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे पुन्हा एकदा इच्छुक होते.त्यांच्या पाठोपाठ ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, डॉ गजेंद्र आसुटकर (यवतमाळ) हे इच्छुक होते.मात्र यंदा पक्षाने राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली आहे. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections

     

    वाचा – चंद्रपूर ते मुंबई रेल्वे ला सुरुवात

    सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी दोन वेळा (1989 व 1991)चंद्रपूर लोकसभा लढविली आहे. त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.यंदा मात्र चित्र पालटले आहे.यंदा 400 पारचा नारा भाजपाने दिला आहे.मुनगंटीवार हे 1995 पासून आमदार आहेत.दांडगा अनुभव व त्यांची सुक्ष्मनियोजन शैली व सर्वमान्य नेतृत्व या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी असल्याचे बोलले जात आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असुन लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली वारी केली आणी तेव्हाही त्यांनी लोकसभा लढविण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते.असे असतांना उमेदवारी कां..? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections

    मुख्यमंत्र्यांना साकडे घातले पण…..

    दोन दिवसांपूर्वी मंगळवारी ना सुधीर मुनगंटीवार यांनी,चंद्रपूरच्या काष्ठने निर्मित नवीन संसदभवनाच्या दारातून मला जावे लागेल की काय..?याची मला भीती वाटत आहे सांगून,ती एन्ट्री थांबविण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे घातले होते.त्यांनंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारला ना.मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा झाल्याने,पक्षाचा आदेश त्यांना आता मान्य करावा लागणार आहे.

     

    वाचा – वनमंत्र्यांच्या विधानसभेतील धक्कादायक बातमी

     

    त्या चर्चेला विराम मिळाला

    ना.सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष महत्व त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपात आहे.त्यांच्या भावना लक्षात घेत पक्ष त्यांचे ऐकेल व उमेदवारी आ.प्रतिभा धानोरकर यांना मिळेल अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या,त्याला आता विराम मिळाला आहे.

     

    लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी

    सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली होते, ज्यामध्ये त्यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती, त्यावेळी कांग्रेसचे शांताराम पोटदुखे यांचा विजय झाला होता, वर्ष 1991 मध्ये गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर लोकसभेत समावेश झाल्यावर मुनगंटीवार दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. Mungantiwar lost twice in Lok Sabha elections

     

    त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 23 हजार 122 मते मिळाली, ते तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यावेळी कांग्रेसचे शांताराम पोटदुखे यांना 2 लाख 12 हजार 948 मते मिळवीत त्यांनी विजयश्री खेचून आणला, दुसऱ्या क्रमांकावर जनता दलाचे मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी 1 लाख 25 हजार 251 मते घेतली.

     

    आता सुधीर मुनगंटीवार 33 वर्षांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

  • Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी

    Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी

    Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur
    चंद्रपूर – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचे नाव असून विदर्भातील चौघांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
    राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.

     

    मागील अनेक दिवसांपासून मुनगंटीवार हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नव्हते, माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही पण पक्षाने आदेश दिल्यास मी कार्यकर्ता म्हणून लढणार. Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur

     

    आज 13 मार्च ला सुधीर मुनगंटीवार यांचं नाव भाजपच्या यादीत आले आहे, सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.
    वर्ष 2014 ला ते राज्याचे अर्थमंत्री व वनमंत्री म्हणून शपथ घेतली, वर्ष 2022 ला ते वनमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करीत आहे. Sudhir mungantiwar bjp loksabha candidate chandrapur

     

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत त्यांचा बल्लारपूर विधानसभेत निसटता विजय झाला होता, आज भाजपला प्रत्येक जागा महत्वाची आहे, त्याकरिता त्यांनी राज्यमंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, मुनगंटीवार यांनी शेवटपर्यंत आपल नाव यादीत नसावे यासाठी अनेक प्रयत्न केले हे विशेष.

  • Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train : पिटलाइन सुविधेमुळे बल्लारशाहचे महत्व वाढले – हंसराज अहीर

    Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train : पिटलाइन सुविधेमुळे बल्लारशाहचे महत्व वाढले – हंसराज अहीर

    Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train चंद्रपूर: बल्लारपूर येथे बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन (क्रमांक २२१०९/२२११०) ला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
    दि. १३ मार्च रोजी या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की बल्लारशाहमध्ये ११ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पिटलाइनच्या सुविधेमुळे आता रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.

     

    यासंदर्भात बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन आज सुरु करण्यात आली आहे. बल्लाशाह रेल्वे स्थानकाचे महत्व पिटलाईनमुळे वाढले आहे. अहीर पुढे म्हणाले की, पूर्वी सहा डब्यांची आरक्षण असलेली सेवाग्राम लिंक एक्सप्रेस येथे धावत असे. लिंक एक्सप्रेस गाड्या आता संपुर्ण भारतात बंद करण्यात आल्या आहेत म्हणुन ही गाडी सुरू करण्यात आली आहे. लवकरच नंदीग्राम ही ट्रेन दररोज धावणार आहे. तसेच आता पुण्यासाठीची ट्रेन आठवड्यातुन तीन दिवस धावणार असून, ती येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    वाचा – निधी अभावी काम रखडले, आणि झाला जीवघेणा हल्ला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूर आणि बल्लारशाहसाठी रेल्वेच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, असेही अहीर म्हणाले.
    उल्लेखनीय बाब अशी की, एलटीटी-बल्लारशाह सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक ०११२७/०११२८) या गाडीला पूर्वी विशेष दर्जा होता, या ट्रेनचे भाडे प्रवाशांना परवडणारे नव्हते. विशेष दर्जा असल्याने ही ट्रेन नेहमीच उशिराने धावत असे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन हंसराज अहीर यांनी या ट्रेनचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. आता ही ट्रेन नव्या क्रमांकाने धावत असून, आता या ट्रेनच्या भाड्यातही ३० टक्के कपात करण्यात आली आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर ट्रेन चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोहचताच भाजप कार्यकर्त्यांनी या ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिलाध्यक्ष हरीश शर्मा, विजय राऊत, खुशाल बोंडे, रेल आधिकारी, एडीआरएम पी एस खेरकर, एसीएम एच के बेहरा, दामोदर मंत्री, लखन सिंह चंदेल, अनिल फुलझले, चंद्रपुर जिल्हा रेलवे यात्री एसोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचूवार, रघुवीर अहीर, अरुण मस्की, राजु घरोटे, विनोद शेरकी, रेणुका दूधे, वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, स्वामी रायबरम, देवेंद्र वाटकर, कांता ढोके, किशोर मोहुर्ले, आरती आक्केवार, हनुमानसिंह खेंगर, रामेश्वर पासवान, जुम्मन शेख, ममता बोज्जा, गुलशन खान, गुलशन शर्मा, विकास राजुरकर, ज्ञानेंद्र आर्य, गणेश सैदाने व रेलवे कर्मचारी कृष्णकुमार सेन, एम वेंकटेश्वरलू, जी राजूरकर, रविंद्र नंदनवार, रवी मिश्रा, योगेश बविस्कर, आरपीएफ चे निरीक्षक श्री पाठक आदी उपस्थित होते. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    चंद्रपूर स्थानकावर या ट्रेनचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण, विनोद बजाज, नरेंद्र सोनी, प्रदीप माहेश्वरी, डॉ. भुपेश भलमे, डॉ. अशोक रोहरा, मिलींद दाभेरे, संजय मंथाने, अशोक बोथरा, नरेश लेकवानी, भाजपचे विठ्ठल डुकरे, मायाताई उईके, वंदना संतोषवार, प्रदीप किरमे, राजेंद्र तिवारी, अविनाश राखुंडे, प्रमोद शास्त्रकार, बि.बि. सिंह, शालु कन्नोजवार, राजेंद्र कागदेलवार, संजय खनके, मधुकर राउत, सुरेश यादव, मयुर भोकरे, प्रणय डंभारे, बाळा चंदनखेडे, चेतन शर्मा, पराग मलोडे, रेणुकाताई घोडेस्वार, किशोर बंडावार, नरेंद्र गुजराथी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.