Blog

  • Lok Sabha Candidate of Congress Party : कांग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

    Lok Sabha Candidate of Congress Party : कांग्रेस पक्षातर्फे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

    Lok Sabha Candidate of Congress Party चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला मात्र कांग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा अद्यापही केली नाही.

    भाजप पक्षाने आपले उमेदवार घोषित केले, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे, कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे. Lok Sabha Candidate of Congress Party

    वाचा – चंद्रपूरात ठाकरे गटाचा नेता भाजपात

    सूत्रांच्या माहितीनुसार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर कांग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केला असल्याची माहिती पुढे आली आहे, फक्त अधिकृत नावाची घोषणा बाकी आहे, आज रात्री किंवा 21 मार्च रोजी कांग्रेस आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. Lok Sabha Candidate of Congress Party

     

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना सुद्धा कांग्रेस पक्षाने वेळेवर लोकसभेचे तिकीट दिले होते, तिकीट मिळाल्यावर धानोरकर यांनी 12 दिवसात निवडणूक जिंकत राज्यातील कांग्रेस पक्षाचे एकमेव खासदार म्हणून ते प्रचलित झाले. Lok Sabha Candidate of Congress Party

     

    बाळू धानोरकर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करीत जायंट किलर बनले, आजही तशीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

     

    राज्यात सोलापूर मधून प्रणिती शिंदे तर चंद्रपूर मधून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस एक्शन मोड वर आली असून 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात तब्बल 35 ठिकाणी नाकाबंदी करीत मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली.

     

    ऑल आऊट मोहिमेदरम्यान 78 हॉटेल, लॉज व धाबे चेक करण्यात आले, यावेळी 821 वाहनांची तपासणी करून 64 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Chandrapur Police Mission All Out

     

    या मोहिमेत रेकॉर्ड वरील व कारागृहातून सुटलेले व प्रलंबित खटल्यातील 160 समन्स बजावणी करून 61 आरोपीना अटक करण्यात आली.

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत आव्हान देणारा नेता भाजपात सामील

    अवैध दारू बाळगणाऱ्यावर तब्बल 22 केसेस, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे 1 व पोलीस स्टेशन येथे 2 केसेस भारतीय हत्यार कायद्यांव्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले. Chandrapur Police Mission All Out

     

    तसेच राजुरा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या इसम विरुद्ध गुन्हा नोंद करून 3 लाख 36 हजार 200 रुपयांचा माल असा 8 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील 52 पोलीस अधिकारी व 265 पोलीस अंमलदार यांनी केली.

  • Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते व पदाधिकारी पक्ष बदलवित असतात या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेचे माजी पदाधिकारी बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

    वाचा – चंद्रपुरातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

    वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मधून निवडणूक लढत थेट सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी कामगार सेना जिल्हाप्रमुख बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

     

    वर्ष 1993 पासून शिवसेनेत तब्बल 30 वर्षे काम करणारे बबलू कटरे यांनी शाखा प्रमुख, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच ते कामगार सेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मजल मारली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

    विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कटरे यांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढली होती.

     

    यावेळी कटरे यांच्याशी संपर्क केला असता मी 30 वर्ष शिवसेना पक्षात काम केले, अनेक पदे पण भूषवली मात्र आज शिवसेना सोडून जाताना मी असंख्य आठवणी सोडून जात आहो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र काही कारणासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतो अशी प्रतिक्रिया कटरे यांनी दिली. Bablu Katre’s entry into BJP

     

    बबलू कटरे यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थित आपले सहकारी अतुल कटरे, श्याम वाढई, राजू कटरे सह भाजपात प्रवेश केला, यावेळी मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा कटरे यांच्या गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.

  • Deportation of criminals from Chandrapur : चंद्रपूर शहरात एकावर हद्दपारीची कारवाई

    Deportation of criminals from Chandrapur : चंद्रपूर शहरात एकावर हद्दपारीची कारवाई

    Deportation of criminals from Chandrapur अवैध दारूविक्र, भांडण, मारहाण, धमकी असे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर चंद्रपूर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.

     

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पंचशील वार्डातील रहिवासी 26 वर्षीय शुभम अमर समुद या सराईत गुन्हेगारांला जिल्ह्यातून 6 महिण्याकरिता हद्दपार केले आहे. Deportation of criminals from Chandrapur

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    शुभम समुद वर अनेक गुन्हे दाखल आहे, त्याच्यावर पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या मात्र त्यामध्ये काही सुधारणा झाली नाही, वारंवार पोलिसांनी शुभम वर प्रतिबंधात्मक कारवाई केली, मात्र तो धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

     

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता व सुव्यस्था बिघडू नये याकरिता शहर पोलीस निरीक्षकांनी शुभम विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी विहित मुदतीमध्ये हद्दपार च्या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी केली, त्यानंतर हद्दपारीचा आदेश काढण्यात आला. Deportation of criminals from Chandrapur

     

    पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया व हद्दपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे,  गुन्हेगारी वृत्ती संपावी व त्यांनी गुन्हेगारी पासून इतर धंद्याकडे वळावे अन्यथा अश्या कारवाया होत राहणार असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.

  • Restrictions in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    Restrictions in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    Restrictions in Chandrapur district लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच तसेच आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) कलम 144 मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत.

    वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश 

    त्यानुसार शासकीय कार्यालये / विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे / सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रपीकरण करण्यास निर्बंध करण्यात आले आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, तसेच निश्चित केलेल्या कागदाच्या आकाराप्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहेत. Restrictions in Chandrapur district

     

    वाचा – ते नवजात शिशु कुणाचे?

    निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तिंची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर तसेच सार्वजनिक रहदारी / वर्दळीच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध राहतील. धार्मिक स्थळे,  रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक वा भाषिक गटातील मतभेद अधिक तीव्र होतील किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास निर्बंध आहेत. Restrictions in Chandrapur district

     

    निवडणुकीच्या प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक जागेवर / खाजगी व्यक्तिच्या जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार / रॅली / रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात सलग 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या / वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.

    सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्या स्वाक्षरीने आणि कोर्टाच्या शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे.

  • Vanchit Bahujan Aghadi : राजेश बेले यांचा पक्षप्रवेश

    Vanchit Bahujan Aghadi : राजेश बेले यांचा पक्षप्रवेश

    Vanchit bahujan aghadi चंद्रपुरातील बहुजन समाजाचे नेते व संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी आज वंचित बहुजन आघाडी पक्षात अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

    वाचा – ते नवजात बाळ कुणाचे?

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेले यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश केला आहे, जर राज्यात महाविकास आघाडी सोबत वंचित ची युती झाली नाही तर तिन्ही पक्षाला याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. vanchit bahujan aghadi

     

    राजेश बेले यांच्या पक्षप्रवेश वेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर पश्चिम प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे, पूर्व चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, चंद्रपूर महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Vanchit bahujan aghadi

  • A live newborn was found : तुराट्याच्या ढिगाऱ्याखाली आढळले जिवंत नवजात शिशु

    A live newborn was found : तुराट्याच्या ढिगाऱ्याखाली आढळले जिवंत नवजात शिशु

    A live newborn was found तळोधी (बा) – नागभीड तालुक्यातील तळोधी जवळील बाळापूर येथील विनोद गोंगल यांच्या घराच्या मागच्या बाजुला तुराटीच्या खाली नवजात बालक आढळल्याची धक्कादायक घटना 18 मार्च सोमवार ला सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

    वाचा – चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांचं भव्य स्वागत

    यावेळी सदर बाब जवळील तळोधी (बाळापूर) येथील पोलीस स्टेशन ला माहीती दिली असता लगेच
    ठाणेदार अजितसिंग देवरे व त्यांची चमू घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बालकाला प्राथमिक उपचाराकरिता बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. A live newborn was found

     

    सदर बालक हा नुकताच जन्माला असून जन्मानंतर त्याची आई त्याला तुराट्यांच्या ढिगाखाली ठेवून फरार झाली. सध्या बालकावर चंद्रपूर जिल्हा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास तळोधी बाळापूर पोलीस करीत आहेत.

  • Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar : वणी तालुक्याशी माझं जुनं नातं

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar : वणी तालुक्याशी माझं जुनं नातं

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar चंद्रपूर लोकसभेसाठी भाजप पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांचं आज चंद्रपुरात आगमन झालं.

     

    मुनगंटीवार यांचे नागपूर ते चंद्रपूर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी भव्य सत्कार केला. 18 मार्च ला गांधी चौकात भव्य आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.

     

    वाचा – निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा नको – जिल्हाधिकारी गौडा

    Chandrapur Lok Sabha candidate Sudhir Mungantiwar आयोजित सभेत महायुती मधील शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसने मुनगंटीवार यांचा सत्कार केला, यावेळी नागरिकांना संबोधित करताना मुनगंटीवार यांनी वणी तालुक्यासोबत आपलं जुनं नातं असल्याचा उल्लेख करीत आज त्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली असून मी आपल्या लोकसभा क्षेत्राचे नाव दिल्लीच्या शिखरावर पोहचविणार असा विश्वास व्यक्त केला. 

     

    आयोजित आशीर्वाद सभेत असंख्य नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

  • Lok Sabha General Election Programme : कामात हलगर्जीपणा चालणार नाही – जिल्हाधिकारी गौडा

    Lok Sabha General Election Programme : कामात हलगर्जीपणा चालणार नाही – जिल्हाधिकारी गौडा

    Lok Sabha General Election Programme लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

     

    वाचा – एकाच दिवशी 151 मंदिरात आराधना, लोकसभा निवडणूक

    नियोजन भवन येथे बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल  यांच्यासह सहा. निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. Lok Sabha General Election Programme

    वाचा – बधिरभक्तीचा कर्कश भोंगा

     

    यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात 17 विषयांसाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्यासाठी इतरही अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी गांभियाने पार पाडावी. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यानुसारच काम करणे अपेक्षित आहे. यात वेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. काही शंका असल्यास त्या विचारून घ्याव्यात. Lok Sabha General Election Programme

    पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व सहायक निवडणूक अधिका-यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील स्ट्राँग रुमची पाहणी करावी. तेथील बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्राँगरुमची सुरक्षितता आदी बाबी तपासून घ्याव्यात. तसेच आपापल्या क्षेत्रातील फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), व्हीडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.), व्हिडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) त्वरीत कार्यान्वित करून पथकांच्या पॉईंटवर भेट द्यावी. सोबतच आपल्या कार्यक्षेत्रात विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना आणि नियंत्रण कक्ष स्थापन करावा. पोलिंग पार्टीचे प्रशिक्षण अतिशय गांभिर्याने घ्यावे, जेणकरून मतदानाच्यावेळी कोणत्याही चुका होऊ नये. मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा जसे, पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची आणि व्हीलचेअरची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Lok Sabha General Election Programme

    यावेळी प्रत्येक नोडल अधिका-यांनी आपापल्या कामकाजाचे सादरीकरण केले.

  • Chandrapur-Wani-Aarni Lok Sabha :एकाच दिवशी 151 मंदिरात होणार आराधना

    Chandrapur-Wani-Aarni Lok Sabha :एकाच दिवशी 151 मंदिरात होणार आराधना

    Chandrapur-wani-Aarni Lok Sabha चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा राज्याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विजय संकल्‍पासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दि. १९ मार्च २०२४ ला एकाचवेळी सायंकाळी ६ वाजता परमेश्वराची आराधना करण्‍यात येणार आहे. सामान्य कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आयोजन केले आहे.

    वाचा – नरभक्षक वाघाच्या जंगलात दोघांनी मारला फेरफटका आणि पुढे घडलं असं…

    सुधीर मुनगंटीवार यांच्‍या लोकसभा निवडणुकीतील विजयाकरीता मतदारसंघामधील मंदिरांमध्ये विधिवत पूजा-अर्चना होणार आहे. Chandrapur-wani-Aarni Lok Sabha

     

    याकरीता आमदार संजिव रेड्डी बोतकुलवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, यवतमाळचे जिल्‍हाध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे,लोकसभा प्रमुख प्रमोदभाऊ कडू, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, पुजनीय भागवताचार्य संत मनीष महाराज,रविंद्र बेल्‍लुरकर, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष संध्‍या गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, प्रज्ज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, राजू गायकवाड, महेश देवकते, विशाल निंबाळकर, आशिष देवतळे, अनिल डोंगरे, श्रीनिवास जंगमवार, रितीक परचाके, रविंद्र पिंपळशेंडे पुजेचे व्‍यवस्‍थापन करतील, अशी माहिती आध्यात्मिक आघाडी लोकसभा सहसंयोजक मयूर चहारे यांनी दिली.