Blog

  • MNS leaders join BJP : विजय मराठे यांचा भाजपात प्रवेश

    MNS leaders join BJP : विजय मराठे यांचा भाजपात प्रवेश

    MNS leaders join BJP पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेते भाजप पक्षात प्रवेश करीत आहे.

     

    मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी गिरनार चौक येथील भाजप कार्यालयात लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. MNS leaders join BJP

    हे ही वाचा : सुधीर भाऊ 15 वर्षात काय विकास केला? सांगा आधी

    सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा मराठे यांच्या गळ्यात टाकत स्वागत केले, मराठे यांच्यासोबत मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन बाळस्कर व मनसे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. MNS leaders join BJP

    विजय मराठे यांनी अनेक वर्षे मनसे पक्षात काम केले आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल असा अंदाज आहे.

     

    पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रामपाल सिंग, माजी नगरसेवक अजय सरकार यांची उपस्थिती होती.

  • What kind of development man is Sudhir Mungantiwar? : हे कसले विकासपुरुष?

    What kind of development man is Sudhir Mungantiwar? : हे कसले विकासपुरुष?

    What kind of development man is Sudhir Mungantiwar? नुकतेच खासदार पदाच्या शर्यतीत उतरलेले जिल्हयाचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

    हे ही वाचा : चंद्रपुरात आप ने केला भाजप सरकारचा निषेध

    “फक्त करोडोंच्या इमारती, रस्ते ,सौंदर्यीकरण यालाच विकास म्हणायचा का? या विकासामुळे सामान्य जनतेला काय मिळाले? विकासपुरूष म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीरभाऊंनी शहरातील सरकारी शाळांमधील अवस्था सुधारण्याकडे आजपर्यंत लक्ष दिले नाही? पण विद्यार्थांना देणाऱ्या बुकांमध्ये आपले फोटो छापून प्रचार केला,यालाच विकास म्हणतात का.? What kind of development man is Sudhir Mungantiwar?

     

    शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधली गेली आहे परंतु या सामान्य जनतेसाठी रूग्णालयात वैद्यकीय सोय-सुविधांचा अभाव आहे. त्याकडेही सुधीरभाऊंनी कधीच लक्ष दिले नाही. बल्लारपूर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अवाढव्य पाणी बिले जनतेला पाठवली जात आहे. चंद्रपूर व राजुरा शहराप्रमाणे वार्षिक सरासरी पाणी बिलाची सोय बल्लारपूर शहरातील नळ धारकांना करून देण्यासाठी आमदार साहेबांनी आजपर्यंत दुर्लक्ष का केला? What kind of development man is Sudhir Mungantiwar?

     

    औद्योगिक शहर म्हणून गणल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरात शिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे. या 15 वर्षांच्या आमदार पदाच्या कारकीर्दीत त्यांनी रोजगार वाढविण्यासाठी अयशस्वी रोजगार मेळावा घेण्या शिवाय काय प्रयत्न केले? असा सवाल पुप्पलवार यांनी उपस्थित केला.

     

    पेपरमीलमुळे होणारे प्रदूषण यावर कोणतेही पाऊले उचलली नाही. पेपरमीलच्या स्टॉक यार्डमुळे शहरात प्राण्यांचा हैदोस वाढला असतांना देखील वनमंत्री म्हणून कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शहरातील नागरिकांना अवाढव्य घर टॅक्स पाठिला जातो त्यावर भाऊंनी कोणतेही कार्य केले नाही. विकासपुरुषांचा विकास सामान्य जनतेच्या कधीही कामी आला नाही, हिच परिस्थिती असल्याचे पुप्पलवार म्हणाले. What kind of development man is Sudhir Mungantiwar?

     

    आमदार, जिल्हयाचे पालकमंत्री, राज्यात अनेक मंत्रीपदे उपभोगल्यानंतर आता ते खासदार पदाच्या मैदानात आहेत. आता खासदार बनून सामान्य नागरिकांचा विचार करतील कि फक्त विकासाचा देखावाच्या मागे कमिशनचा कारभार करतील हे आपल्याला बघावे लागेल असे देखील रविभाऊ पुप्पलवार म्हणाले.

  • Two Wheeler fancy number : तुमच्या दुचाकी वाहनाला हवा फॅन्सी क्रमांक? बघा ही बातमी

    Two Wheeler fancy number : तुमच्या दुचाकी वाहनाला हवा फॅन्सी क्रमांक? बघा ही बातमी

    Two Wheeler fancy number उपप्रादेशिक परिवहन कर्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील  दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. -३४, CJ-०००१ते एम.एच.-३४,CJ-९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

    वाचा – चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन?

    ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांकरिता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल, त्यांनी परिवहन कार्यालयात 26 मार्च 2024 पर्यंत (दुपारी 4)  अर्ज सादर करावेत.

    वाचा – चंद्रपूर लोकसभेसाठी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

     

    तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्क ( DD उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे नावे ) विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे तात्काळ सादर करणे अनिवार्य राहील. Two Wheeler fancy number

     

    सदर मालिका चालु असतांना  वाहन ४.० प्रणाली कार्यान्वीत झाल्यांनतर बंद करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. नविन मालिका दिनांक 27 मार्च 2024 पासून सुरु करण्यात येईल. Two Wheeler fancy number

     

    प्राप्त होणारे अर्ज दुपारी  4 वाजेपर्यंत स्विकारले जातील व 26 मार्च रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पध्दतीने क्रमांक जारी करण्यात येतील. 27 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता बंद लिफाफे  उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

  • Violation of the Code of Conduct : चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन

    Violation of the Code of Conduct : चंद्रपुरात आचारसंहितेचे उल्लंघन

    Violation of the Code of Conduct चंद्रपूर : आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्पाच्या 24.62 कोटी रूपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राज्याचे तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

    वाचा – अरविंद केजरीवाल यांना अटक, आप कार्यकर्ते आक्रमक

     

    22 मार्च रोजी सांयकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशमुख यांनी लेखी तक्रार केली.
    लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता 16 मार्च पासून लागू करण्यात आली आहे. Violation of the Code of Conduct

     

    आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही नवीन कामाची ई-निविदा प्रकाशित करणे किंवा ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. मात्र तरीसुद्धा मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी १८ मार्च रोजी ‘चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्प’ या नविन कामाची सुमारे २४.६२ कोटी रूपये अंदाजपत्रक असलेली ई-निविदा राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. आपातकालिन परिस्थिती नसताना किंवा अत्यावश्यक काम नसताना तसेच सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता पालीवाल यांनी आचारसंहितेच्या काळात सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. Violation of the Code of Conduct

    वाचा – कुणी भरला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज?

     

    आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध केल्याचे भासवले

    ऐन आचारसंहितेच्या तोंडावर १५ मार्च २०२४ रोजी तीन वर्तमानपत्रांमध्ये सदर ऑनलाइन ई-निविदेची जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये दिनांक १८ मार्चपासून सदर ऑनलाइन ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद केले. १५ मार्चपासून सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असे भासविण्याकरिता त्यांनी हे सर्व कटकारस्थान केले. ज्या तारखेला शासनाच्या वेबसाईटवर निविदा प्रपत्र विक्री करिता अपलोड होते त्याच तारखेपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होते याची पुरेपूर माहिती पालीवाल यांना आहे. असे असतानाही त्यांनी सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान सुरू केली व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही देशमुख यांनी तक्रारीत केला आहे. Violation of the Code of Conduct

    सात वर्षांपासून जिल्ह्यातच नियुक्ती

    विपिन पालीवाल हे २०१५ ते २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व पोंभुर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. मार्च २०२० नंतर जवळपास एक वर्षाकरिता त्यांची वर्धा येथे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली.

     

    जून २०२१ पासून आतापर्यंत पालिवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कार्यरत आहेत. सुमारे एक वर्षाचा वर्धा जिल्ह्यातील कार्यकाळ वगळता पालीवाल हे सुमारे सात वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांची कारकीर्द वादग्रस्त असून मर्जीतील कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी करोडो रुपयांच्या अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर असल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

     

    मनपा आयुक्त या आरोपांवर काय म्हणाले?

    15 तारखेला निविदा टाकली, 16 मार्च ला वर्तमान पत्रात जाहिरात आली, 16 व 17 मार्च रोजी सुट्टी असल्याने निविदा 18 मार्च रोजी अपलोड करण्यात आली त्यामुळे आम्ही कसल्याही आचारसंहितेचा भंग केला नाही, याबाबत आम्ही देशमुख यांच्या आरोपाबाबत उत्तर देऊ – विपीन पालिवाल, मनपा आयुक्त चंद्रपूर

  • Dictatorship in the country : चंद्रपुरात आप कार्यकर्ते आक्रमक

    Dictatorship in the country : चंद्रपुरात आप कार्यकर्ते आक्रमक

    Dictatorship in the country दिल्ली सरकारच्या बनावट मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे.

     

    वाचा – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून पहिला उमेदवारी अर्ज कुणाचा?

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पार्टीला दबावात आणत आहे. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र रचन्यात येत आहे. निवडणूक काळात भाजपाने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्वास दाखवला. याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांच नेतृत्व मान्य आहे. परंतु, तुम्ही (भाजपा) एका चांगल्या माणसाला खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकता, त्याचा लोकशाहीचा अधिकार हिरावता. येना-या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवण्यात मतदार मागे पुढे पाहणार नाही. Dictatorship in the country

     

     

    या आंदोलनात आप चे वरीष्ठ नेते सुनिल
    देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, भूमिपुत्र ब्रिगेड च्या डॉ अभिलाषा ताई गावतुरे, डॉ राकेश गावतूरे,CPM चे रमेशचंद्र दहीवळेसर ,अरुन भेलके सुरेश विधाते आप चे संगठन मंत्री योगेश मुर्हेकर,शंकर सरदार,महानगर अध्यक्ष योगेश गोखरे ,युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गडलेवार,सुरज शाह,जिल्हा सचिव राजकुमार नगराळे,बल्लारपूर अध्यक्ष रवी पुप्पलवार,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ताई बावरे,महिला महानगर अध्यक्ष एड तब्स्सुम शेख,शहर संगठन मंत्री संतोष बोपचे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभेय्या, राजेश चेटगुलवार, महानगर कोषध्यक्ष पवन कुमार प्रसाद,महानगर शिक्षक आघाडी अध्यक्ष ऐकनाथ हांडेकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने,राहुल चाव्हण, प्रा किशोर दहेकर,दिपक बेरशेट्टीवार,सुमित हस्तक,महानगर सहसंघटणमंत्री नागसेन लभाने,महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष अलंकार सावळकर, संतोष दोरखंडे, अफजल अली, डॉ सलिम तुकडी,सुनिल भोयर, बबन कृष्णपल्लीवार, प्रशांत रामटेके, इत्यादी उपस्थित होते.

  • Lok Sabha Nomination Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    Lok Sabha Nomination Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    Lok Sabha Nomination Application  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत चंद्रपूर, वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 20 मार्च पासून सुरूवात झाली आहे मात्र या तीन दिवसात कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

    वाचा – गुगल हिस्ट्री मुळे 26 लाखांची रोख रक्कम मिळाली

    20 मार्च रोजी 13 नामनिर्देशन अर्ज तर 21 मार्च रोजी 19 उमेदवारी अर्ज व 22 मार्चला 14 असे एकूण 46 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहे. Lok Sabha Nomination Application

     

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. Lok Sabha Nomination Application

     

    अद्यापही एकानेही चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही, होळी नंतर उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात अशी शक्यता आहे.

  • Accused arrested due to Google history : चंद्रपुरात पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास

    Accused arrested due to Google history : चंद्रपुरात पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास

    Accused arrested due to Google history शहरातील सिंधी कॉलोनी परिसरात 15 ते 18 मार्च दरम्यान अडवाणी यांच्या घरातून 26 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाली होती, सदर प्रकरणातील आरोपी हा गुगल हिस्ट्रीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

     

    शहरातील सिंधी कॉलोनी रहिवासी 38 वर्षीय खुशाल भागचंद अडवाणी हे 15 मार्च ला विजयवाडा आंध्रप्रदेश येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते, 18 मार्च ला अडवाणी चंद्रपुरात परतले असता ते सामानाची बॅग बेडरूममध्ये ठेवण्याकरिता गेले असता त्याठिकाणी असलेली खिडकीचे ग्रील तुटलेले होते. Accused arrested due to Google history

    वाचा – विजय वडेट्टीवार विरोधात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक

    अडवाणी यांनी घरातील अलमारी बघितली असता अलमारी मध्ये ठेवलेली 26 लाखांची रोख रक्कम गहाळ करण्यात आली होती.

     

    अडवाणी यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदविली, पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

    रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने घटनास्थळी धडक देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. Accused arrested due to Google history

     

    गोपनीय बातमीदार व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता एका मोबाईल हिस्ट्रीमुळे अखेर आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

     

    गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील निवासी 32 वर्षीय विकास महादेव गोंधळी सध्या मुक्काम फिर्यादी यांच्या घरी, याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने रोख रक्कम चोरली असल्याची कबुली दिली.

     

    असा आला गुन्हा उघडकीस

    रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ज्यावेळी अडवाणी यांच्या घरी पोहचली असता आरोपी विकास गोंधळी त्याठिकाणी त्यांना परिसराची माहिती देत होता, पोलिसांना त्याच्या सांगण्यावर काही संशय आला, तो मोबाईल आपल्या हातात ठेवत वावरत होता, पोलिसांनी त्याचा मोबाईल मागत तपासला असता त्याने गुगल वर ग्रील कापण्यासाठी काय वापरावे असे सर्च केले होते. Accused arrested due to Google history

     

    गुगल च्या हिस्ट्री मुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला, आरोपीने 26 लाख रुपयांची रोकड सासू च्या घरी ठेवली होती.

     

    आरोपी कडून 26 लाख रोख, ईलेक्टरीक कटर मशीन, सिपी प्लस कंपनीचा डिव्हीआर, लोखंडी छन्नी, पकड असलेले कटरे, एक्सटेन्शन बोर्ड असा एकूण 26 लाख 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Accused arrested due to Google history

     

    पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, रामनगर चे सपोनि देवाजी नरोटे, पोउपनी मधुकर सामलवार, पोउपनी दीपेश ठाकरे, पेतरस सिडाम, किशोर वैरागडे, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, लालू यादव यांनी केली.

  • Congress workers will resign en masse : चंद्रपुरात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक, राजीनामे देणार

    Congress workers will resign en masse : चंद्रपुरात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक, राजीनामे देणार

    Congress workers will resign en masse चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली मात्र कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

     

     

    कांग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी मात्र ऐनवेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीचे नाव समोर केले. Congress workers will resign en masse

     

    शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्ष श्रेष्ठीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती, त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली.

    वाचा – मद्य पिऊन वाहन चालविणार तर कारवाई

    20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली. Congress workers will resign en masse

     

    21 मार्च ला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार, व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

     

    वडेट्टीवार यांनी राज्यातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे मात्र आज कांग्रेस पक्षात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे, जर आमदार धानोरकर यांना तिकीट मिळाली नाही तर आम्ही कांग्रेस पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. Congress workers will resign en masse

  • Special Operation of Chandrapur Police : 22 ते 25 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

    Special Operation of Chandrapur Police : 22 ते 25 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

    Special Operation of Chandrapur Police होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्या संदर्भात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

     

    24 व 25 मार्च रोजी होळी व धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, रंगांच्या उत्सवात विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते, पार्टी दरम्यान काही अतिउत्साही तरुण मंडळी दारू चा अति घोट प्राशन करीत, वाहन अतिवेगात चालविण्याचे प्रकार करतात त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Special Operation of Chandrapur Police

     

    वाचा – आता घरबसल्या करा मतदान, ही आहे प्रक्रिया

    चंद्रपूर वाहतूक पोलीस नियंत्रक शाखा अपघात कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करीत आहे, अति-उत्साही तरुणांची हुल्लडबाजी व रॅश ड्रायव्हिंग वर आळा घालण्याचा उद्देशाने 22 ते 25 मार्च ला चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे.

     

    या मोहिमेदरम्यान कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. Special Operation of Chandrapur Police

     

    त्याकरिता कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवू नये, उत्सवाच्या या सणात कुणाच्याही निष्पाप आयुष्याचा बेरंग होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.

     

  • Notification of Election Commission of India : चंद्रपुरातील या नागरिकांना घरबसल्या मतदानाचा अधिकार

    Notification of Election Commission of India : चंद्रपुरातील या नागरिकांना घरबसल्या मतदानाचा अधिकार

    Notification of Election Commission of India भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

     

    85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. Notification of Election Commission of India

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षाचा लोकसभा उमेदवार ठरला

    85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 16621 मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 7117 तर स्त्री मतदारांची संख्या 9504 आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार 2754 (पुरुष – 1163, स्त्री – 1591), चंद्रपूर मतदार संघात 2380 (पुरुष – 1100, स्त्री – 1280),  बल्लारपूर मतदार संघात 2246 (पुरुष – 892, स्त्री – 1354), वरोरा मतदार संघात 2878 (पुरुष – 1356, स्त्री – 1522), वणी मतदार संघात 2846 (पुरुष – 1225, स्त्री – 1621, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात 3517 (पुरुष – 1381, स्त्री – 2136) मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

     

    तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 85 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 (पुरुष – 921, स्त्री – 1482) आणि चिमूर मतदार संघात 2594 (पुरुष – 996, स्त्री – 1598) मतदार आहेत. Notification of Election Commission of India

     

    असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 9679 आहे. यात 6164 पुरुष तर 3515 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात 1233 दिव्यांग मतदार (पुरुष – 781, स्त्री – 452), चंद्रपूर मतदार संघात 913 दिव्यांग मतदार (पुरुष – 591, स्त्री – 322), बल्लारपूर मतदार संघात 1842 दिव्यांग मतदार (पुरुष – 1195, स्त्री – 647), वरोरा मतदार संघात 1551 दिव्यांग मतदार (पुरुष – 1021, स्त्री – 530), वणी मतदार संघात 1679 दिव्यांग मतदार (पुरुष – 1035, स्त्री – 644), आर्णी मतदार संघात 2461 दिव्यांग मतदार (पुरुष – 1541, स्त्री – 920) आहेत. Notification of Election Commission of India

     

    तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या 1138 (पुरुष – 774, स्त्री – 364) आणि चिमूर मतदार संघात 1096 (पुरुष – 681, स्त्री – 415) मतदार आहेत.