Blog

  • Restricted flavored tobacco stocks : सुगंधित तंबाखू तस्कर वसीमच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा धडकली

    Restricted flavored tobacco stocks : सुगंधित तंबाखू तस्कर वसीमच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा धडकली

    Restricted flavored tobacco stocks चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचे नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले होते, मात्र पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी ते जाळे काढायला सुरुवात केली आहे.

     

    जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात व्यापार करणारे तस्कर जयसुख व वसीम यांच्यावर आता कारवाईची गदा आणण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. Restricted flavored tobacco stocks

     

    चंद्रपुरातील घुग्गूस येथील नकोडा गावात स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे 36 वर्षीय नदीम इकबाल जियाउद्दीन शेख यांच्या घरी धाड मारली, घराची झडती घेतल्यावर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांना आढळला.

     

    वाचा – चंद्रपुरात माजी नगरसेविकेचा पती निघाला तंबाखू व्यवसायी

    प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मध्ये होला हुक्का शिशा, विमल पान मसाला, ईगल हुक्का, मजा, बाजीराव फ्लेवर, विमल, ब्लॅक लेबल, गोल्ड स्वीट सुपारी, फजश्री पान मसाला, असा एकूण 4 लाख 36 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

     

    सदर साठा हा तंबाखू तस्कर वसीम झिमरी यांचा असल्याची कबुली आरोपी नदीम ने दिली, सदर साठा हा विक्री करण्यासाठी वसीम ने नदीम च्या घरी ठेवला होता. Restricted flavored tobacco stocks

     

    स्थानिक गुन्हे शाखेने घुग्गूस पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नदीम इकबाल व वसीम झिमरी यांच्यावर कलम 328, 188, 272, 273, 34 भांदवी सह कलम 30(2) 26(2) अश्या विविध कलम अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

     

    वसीम झिमरी याचे नेटवर्क चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मागील काळात वसीम वर अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र त्यानंतर सुद्धा त्याने हा धंदा सोडला नाही, वसीम ने आजच्या भावी पिढीला कॅन्सर च्या जाळ्यात ओढण्याचे काम केले आहे. Restricted flavored tobacco stocks

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनी विनोद भुरले, धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, प्रशांत नागोसे व दिनेश अराडे यांनी केली.

  • Aromatic tobacco trade in Chandrapur : शहरातील शामनगर भागात प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार करणारा “मंगल”

    Aromatic tobacco trade in Chandrapur : शहरातील शामनगर भागात प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार करणारा “मंगल”

    Aromatic tobacco trade in Chandrapur चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशावर जिल्ह्यात अवैध धंद्यावर मुसक्या आवळण्याचे काम पोलीस प्रशासन करताना दिसून येत आहे. 11 मार्चला रामनगर पोलिसांनी 35 हजार 650 रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडला.

     

    शहर व जिल्हाभरात तंबाखू तस्करांना राजकीय आश्रय प्राप्त असल्याने त्यांना हे अवैध धंदे करण्यास मुभा होती मात्र पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यामुळे हे नेटवर्क सध्या विस्कळीत झाले आहे.

     

    अशीच एक कारवाई रामनगर पोलिसांनी चंद्रपुरातील अयोध्या चौक, शामनगर येथील किराणा दुकानदार 49 वर्षीय मंगल शिवराम भोयर यांच्या दुकानावर धाड मारली असता पोलिसांना ईगल हुक्का शिशा तंबाखू चे 115 पॉकेट आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Aromatic tobacco trade in Chandrapur

     

    वाचा – तंबाखू तस्कर वसीम च्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक

    आरोपी मंगल भोयर हा माजी नगरसेविकेचा पती आहे, प्रभागात जनतेला ज्ञान पाजळणारे अवैध धंद्यात उतरून त्यांना कॅन्सर गिरविण्याचे धडे देत आहे हे विशेष. आरोपी मंगल वर अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी शेंद्रे, सिडाम, सतीश, रजनीकांत, शरद, मनीषा, लालू, हिरालाल, संदीप व प्रफुल यांनी केली.

  • Chandrapur Underground Sewerage Scheme : चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळणे मुख्यमंत्र्यांना महागात पडेल – पप्पू देशमुख

    Chandrapur Underground Sewerage Scheme : चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळणे मुख्यमंत्र्यांना महागात पडेल – पप्पू देशमुख

    Chandrapur Underground Sewerage Scheme चंद्रपूर: 15 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून टाकण्यात आलेली जुनी भूमिगत गटार योजना फसल्यानंतर त्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. कंत्राटदाराचे संपूर्ण 100 कोटी रुपयांचे देयके अदा केले. नेते आणि अधिकारी या योजनेतील मलिदा लाटून मोकळे झाले. खड्डे आणि धुळीचे परिणाम मात्र चंद्रपूरकरांना भोगावे लागले.

     

    आता 506 कोटी रुपयांच्या नवीन गटार योजनेचे 12 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जनतेच्या हितासाठी नव्हे तर 506 कोटींच्या निधीतून कमिशन लाटण्यासाठी अधिकारी व नेते जबरदस्तीने नवीन भूमिगत गटार योजना चंद्रपूरकरांवर थोपवत आहेत असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबरदस्तीने नवीन भूमिगत गटार योजना थोपविण्याचा प्रयत्न केल्यास चंद्रपूरची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. Chandrapur Underground Sewerage Scheme

    वाचा – शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध

    नवीन भूमिगत गटार योजनेचे काम मिळालेला कंत्राटदार मुख्यमंत्र्यांच्या ठाणे या गावापासून 29 किलोमीटर वरील उल्हासनगरचा आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांचे या कंत्राटदाराशी हितसंबंध असतील. गावाजवळच्या कंत्राटदाराची त्यांना जास्त काळजी असेल. मुख्यमंत्र्यांनी गावा जवळच्या कंत्राटदारापेक्षा चंद्रपूरच्या जनतेची काळजी घ्यावी. अन्यथा मुख्यमंत्री व पालकमंत्री दोघांनाही चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळ करणे महागात पडेल, त्यांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशारा देशमुख यांनी दिला. मलःनिसारण योजना म्हणजेच नवीन भूमिगत गटार योजनेचे 12 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याच दिवशी 100 कोटीच्या फसलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेची चौकशी व नवीन योजनेच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणी करिता जनविकास सेनेतर्फे जन आंदोलन सुरू करण्यात येत आहे. Chandrapur Underground Sewerage Scheme

     

    एवढी घाई का व कोणासाठी ?

    कोणत्याही मोठ्या योजनेचे काम सुरू करताना सर्वप्रथम निवड झालेल्या कंत्राटदाराला लेटर ऑफ इंडेट दिल्या जाते. यानंतर निवड झालेला कंत्राटदार काम करण्यास राजी असल्यास कंत्राटदार नियमाप्रमाणे बॅक गॅरंटीची रक्कम जमा करतो. बँक गॅरंटी ची रक्कम कंत्राटदराने जमा केल्यानंतर मनपाचे आयुक्त स्टॅम्प पेपरवर लेखी करार करून कंत्राटदराला कामाचा आदेश म्हणजेच कार्यादेश देतात. कार्यादेश दिल्यानंतर कंत्राटदराकडून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात येते. Chandrapur Underground Sewerage Scheme

    वाचा – कुलर लावताना ही काळजी घ्या

    नवीन भूमिगत गटार योजनेचे 11 मार्च रोजी भूमिपूजन करण्यात येणार होते. मात्र रविवारी 10 मार्च रोजी पर्यंत कंत्राटदाराला कार्यादेश मिळाला नव्हता. कंत्राटदाराने बँक गॅरंटी जमा केली नव्हती. या सर्व प्रक्रियेला बगल देऊन व नियम डावलून भूमिपूजनाची घाई करण्यात येत आहे. 506 कोटी रुपये खर्च असलेल्या योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी कमालीची घाई करण्यात येत आहे. नियम डावलून योजनेचे भूमिपूजन करण्याची घाई करण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केला. Chandrapur Underground Sewerage Scheme

    506 कोटीं मधील वरच्या 60 कोटींचे भागीदार कोण ?

    नवीन भूमिगत गटार योजनेसाठी जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्र जिवंत प्राधिकरणाने 448 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाला दिले. प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर टाकलेल्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली. तडजोड करून कंत्राटदाराला 13.50% अधिकच्या दराने काम देण्यात आले. Chandrapur Underground Sewerage Scheme

     

    अंदाजपत्रकापेक्षा जवळपास 60 कोटी रुपये अधिकच्या किमतीमध्ये कंत्राटदाराला काम देण्यात आले. अंदाजपत्रकाच्या वरच्या 60 कोटी रुपयांमध्ये कोण कोण भागीदार आहेत याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जनतेला द्यायला हवे. अमृत पाणीपुरवठा योजना, अमृत मलःनिसारण योजना व जुनी भूमिगत गटार योजनेमध्ये केंद्र सरकारच्या शेकडो कोटींचा निधी खर्च करताना गैरव्यवहार झाल्याने याची सीबीआय मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे तसेच चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटी स्थापन करावी अशी मागणी जनविकास सेनेने केली.

     

    हिम्मत असेल तर चंद्रपुरात भूमिपूजन करून दाखवा

    नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन विसापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. योजना चंद्रपूर शहराची आणि भूमिपूजन विसापुरात हा अजब प्रकार आहे. ‘शहरातील सर्व रस्ते खोदून 506 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन’, असे स्पष्ट फलक लावून मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहराच्या आत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिले.

  • Chandrapur lok sabha congress candidate : चंद्रपूर लोकसभेला कांग्रेस पक्षाकडून हा उमेदवार हवा

    Chandrapur lok sabha congress candidate : चंद्रपूर लोकसभेला कांग्रेस पक्षाकडून हा उमेदवार हवा

    Chandrapur lok sabha congress candidate आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र चंद्रपुरात अद्यापही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

     

    भाजप सहित कांग्रेस पक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास शिक्का मोर्तब झाल्यावर अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला आहे. Chandrapur lok sabha congress candidate

     

     

    शिवानी वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे कांग्रेस पक्ष व घटकपक्षात संभ्रमाची स्थिती आहे.
    विशेष म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांनी सरळ दिल्ली गाठत पक्षातील वरिष्ठांना लोकसभा उमेदवारीसाठी विनंती केली आहे.

     

    तर दुसरीकडे 11 मार्च ला चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात इंडिया आघाडीतील घटक पक्षाने शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

     

    आज झालेल्या बैठकीत कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड व समाजवादी पक्षाने संयुक्त बैठक घेत ठरविले की चंद्रपूर लोकसभा ही कांग्रेस पक्षाच्या कोट्यात आहे, त्यामुळे पक्षाने लवकरात लवकर आपला उमेदवार जाहीर करावा. Chandrapur lok sabha congress candidate

     

    उमेदवार कसा जिंकणार त्यासाठी आम्ही सर्व पक्ष मिळून कामाला लागू मात्र सध्या कांग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार द्यावा अश्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पाठविणार असल्याचे बैठकीत एकमत झाले.

     

    राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केल्याने पक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे, पुन्हा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष पक्षात सुरू झाला आहे.

    शिवानी वडेट्टीवार या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतात, त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांची मागणी केली आहे. एकंदरीत हा शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध आहे.

    वाचा – भाजपच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव झळकले

    महाविकास आघाडीमधील पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून लवकरचं सर्व घटक पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली.

     

    आयोजित बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महानगर अध्यक्ष दीपक जयस्वाल, कांग्रेसचे महानगरअध्यक्ष रामू तिवारी, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, आप चे नेते सुनील मुसळे, मयूर राईकवार आप जिल्हाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे सोहेल खान, संभाजी ब्रिगेडचे खैरे सर यांची उपस्थिती होती.

  • Happy Woman’s Day : 12 मार्चला महिला कांग्रेसचा कार्यक्रम

    Happy Woman’s Day : 12 मार्चला महिला कांग्रेसचा कार्यक्रम

    Happy woman’s day मुल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून मान.मृदुला मोरे रुजू झाल्याने मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ व वृषभेट देऊन स्वागत करण्यात आले.

     

    तसेच उद्या तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला व गरीब कष्टकरी महिलांचा सत्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. Happy woman’s day

     

    याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, ज्येष्ठ कांग्रेस नेते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले,ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, शहर सरचिटणीस संदीप मोहबे, औद्योगिक सेल उपाध्यक्ष दत्तू समर्थ, माजी प्राचार्य श्रीरंग नागोशे, विष्णू सादमवार,तालुका महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नालिनी आडपवार, उपाध्यक्षा लीना फुलझेले, सचिव शामलाता बेलसरे, समता बनसोड, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, उपाध्यक्ष फर्जना शेख, टिना ठाकरे, नेफडो राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोशे, माजी महिला शहर अध्यक्षा व नेफडो विभागीय अध्यक्ष रत्ना चौधरी, मनोज दामणपल्लीवार, यांचेसह अनेक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Hansraj Ahir in BJP list : मंत्र्यांच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव

    Hansraj Ahir in BJP list : मंत्र्यांच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव

    Hansraj Ahir in BJP list प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) व सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांकरीता शिक्षणाच्या प्रभावी सुविधा, शिष्यवृत्ती तसेच सिमांत वर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण व अल्प व्याजदरात कर्जाद्वारे आर्थिक सहाय्यता आदी प्रयोजनार्थ समाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पीएम-सुरज (प्रधानमंत्री-सामाजिक उत्थान व रोजगार आधारीत जनकल्याण) या महत्वाकांक्षी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून या योजनेच्या शुभारंभास समनवयक व सन्माननिय अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर (कॅबीनेट दर्जा) यांचेवर दायीत्व सोपविण्यात आले आहे.

     

    वाचा – चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी भैया तयार

    दि. १३ मार्च २०२४ रोजी सायं. ०४ वा आयोजित PM-SURAJ या देशव्यापी पोर्टल शुभारंभाचा कार्यक्रम मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. Hansraj Ahir in BJP list

     

    देशभरातील ५२५ जिल्ह्यात ही सामाजिक सशक्तीकरण योजना राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्यातील ९ जिल्ह्यांचा या योजनेत प्रारंभिक स्तरावर समावेश करण्यात आले असून या जिल्ह्यांसाठी समन्वयक म्हणुन केंद्रीय कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. Hansraj Ahir in BJP list

     

    वाचा – चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला धोका

    मुंबईकरीता केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नागपूर जिल्हा- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सिंधुदूर्ग-केंद्रीय मंत्री नारायण राणे, नाशीक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीबेन पवार, धुळे-केंद्रीय राजमंत्री भागवत कराड, सोलापूर-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अहमदनगर-केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हिंगोली- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा समावेश आहे.

  • Be careful when installing a cooler : उन्हाळा आला कुलर लावतायं? मग ही काळजी अवश्य घ्या

    Be careful when installing a cooler : उन्हाळा आला कुलर लावतायं? मग ही काळजी अवश्य घ्या

    Be careful when installing a cooler मार्च महिना सुरु होताच चंद्रपूरातील उन्ह आपली जाणीव करून देवू लागते. त्यामुळे स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात येत आहेत. परंतु सावधान कारण कुलरच्या वापरासोबतच कुलरची सुरक्षित हाताळणी व वापर अपघात टाळण्यास गरजेचे आहे.

     

    वाचा – सुधीर भाऊ शेतकऱ्यांकडे लक्ष द्या

    प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळयात शॉक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीनचा वापर थ्री-पीन प्लगवरच करावा व अर्थिंग नीट असल्याची खात्री करावी. Be careful when installing a cooler

     

    घरात अर्थिंग लिकेज सर्किट ब्रेकर ,एम. सी. बी. ( मिनीएचर सर्किट ब्रेकर) बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संभवताच ताच विजेचा पुरवठा बंद होतो.

     

    वाचा – ट्रॅक्टर चा टायर फुटला आणि घडला भीषण अपघात

    घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अर्थिंग व्यवस्थित असेल तर बराच धोका कमी होतो तसेच विजेचा वापर योग्यप्रकारे होतो.
    कुलरच्या लोखंडी बाहय भागात वीज पुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरतांना कुलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. Be careful when installing a cooler

     

    ओल्या हाताने कुलरला स्पर्ष करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावला. पंप पाण्यात बुडला नसलयाची खात्री करून घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लाॅक होतो.

     

    अशा वेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालु पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे, अशाप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
    जनसंपर्क अधिकारी, महावितरण चंद्रपूर परिमंड

  • Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

    Farmers problem in Chandrapur : सुधीरभाऊ महोत्सव झाले असेल तर इकडे ही लक्ष द्या – सुर्या अडबाले

    Farmers problem in Chandrapur चंद्रपूर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे, यावर वनविभाग व औष्णिक वीज केंद्राने तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे.

     

    चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राला लागून असलेल्या छोटा नागपूर व विचोडा गावातील शेतकऱ्यांच्या दुधाळू गायीची शिकार होत आहे, आतापर्यंत कमीतकमी 45 गायीची शिकार वाघाने केली, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. Farmers problem in Chandrapur

     

    गावालगत असलेल्या झुडपातून वाघ येत असल्याचे निदर्शनास आले आहे, झुडपे साफ करण्यासाठी वीज केंद्राने निविदा सुद्धा काढली मात्र काम काही सुरू झाले नाही.

    वाचा – चंद्रपुरात 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा

    वनमंत्री मुनगंटीवार व औष्णिक वीज केंद्राने यावर लक्ष देत शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली आहे. जर शेतकऱ्यांची समस्या निकाली न काढल्यास आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा अडबाले यांनी यावेळी दिला. Farmers problem in Chandrapur

  • Tractor tire burst accident : अपघातात 1 ठार तर 3 जखमी

    Tractor tire burst accident : अपघातात 1 ठार तर 3 जखमी

    प्रशांत गेडाम

    Tractor tire burst accident सिंदेवाही शहरालगत ठकाबाई तलाव जवळ कच्चेपार रोड मार्गावर लाकड़ाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने 1 जागिच ठार तर 3 गंभीर जख्मी झाल्याची घटना 10 मार्चला रविवार ला दुपारी घडली.

     

    रविवार ला दुपारच्या सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकुड़ घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर चे समोर चे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रेक्टर वाहना वरुन नियंत्रण सुटले व वाहन एका झाडाला जाऊन धडकले ही धडक ईतकी जोरदार होती कि, यामध्ये उमेश अशोक आदे वय 32 राहणार महात्मा फुले चौक सिंदेवाही हा जागिच ठार झाला. Tractor tire burst accident

     

    वाचा – चिकन खाल्ल्याने चंद्रपुरातील 41 पोलिसांना विषबाधा

    ट्रॅक्टर चालक मुन्ना देवराव गावतुरे, हमाल अनिल सदाशिव मोहुर्ले व सुखदेव विट्ठल गावतुरे हे सर्व राहणार सिंदेवाही हे तिघेही गंभीर जख्मी झाले. याची माहिती पुलिस स्टेशन सिंदेवाही ला मिळताच पोलीस ठाणेदार चव्हाण आपल्या पथकासह घटना स्थळी जाऊन ट्रॅक्टर मध्ये फसलेल्याना जेसीबी च्या सहाय्याने बाहेर काढले. लगेच जखमीना शहरातील ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

  • Food poisoning to police constables in Chandrapur : पोलीस शिपायांना जेवणातून विषबाधा

    Food poisoning to police constables in Chandrapur : पोलीस शिपायांना जेवणातून विषबाधा

    Food poisoning to police constables in Chandrapur चंद्रपुरात प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या 41 पोलिस शिपायांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना 10 मार्च ला उघडकीस आली. यामध्ये तब्बल 9 पोलिसांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे.

    वाचा – निर्भय बनो सभा चंद्रपुरात 14 मार्च ला

     

    रविवारी पोलीस फुटबॉल मैदानावरील पोलीस कॅन्टीन मध्ये 200 पोलिसांनी जेवण केले होते, त्यामध्ये 41 पोलिस शिपाई यांना जेवणानंतर काही वेळाने उलट्या झाल्या, तात्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. Food poisoning to police constables in Chandrapur

     

    रुग्णालयात डॉक्टरांनी 32 पोलिसांवर प्राथमिक उपचार करून सुट्टी दिली तर 9 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अजूनही बाधित पोलीस रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती आहे, त्यामुळे बाधित पोलिसांची संख्या वाढू शकते.

     

    वाचा – आमदार किशोर जोरगेवार यांचा मतदारसंघात विक्रम

    रविवारचा दिवस असल्याने आज चिकन ची भाजी पोलीस कॅन्टीन मध्ये होती, पोलिसांनी जेवण केल्यावर लगेच त्यांना उलट्या सुरू झाल्या.
    याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र त्यांनी पोलीस कॅन्टीन परिसर हे स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहे अशी माहिती मिळाली आहे.

     

    डॉक्टर या प्रकरणावर म्हणतात की उन्हामुळे हा प्रकार घडला, मात्र रविवारी चंद्रपुरात ढगाळ वातावरण होते, या घटनेमुळे पोलीस प्रशासन सारवासारव करताना दिसून येत आहे.