Blog

  • Chandrapur Walk for Unity rally । राष्ट्रीय एकतेसाठी चंद्रपुरात ‘वॉक फॉर युनिटी’

    Chandrapur Walk for Unity rally

    Chandrapur Walk for Unity rally : चंद्रपूर, दि. 31 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ या पायदळ रॅलीमध्ये चंद्रपूर पोलिस दलासह विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, खेळाडू आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही  रॅली श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलिस मुख्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती.

    Also Read : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेवरून खासदार धानोरकर संतापल्या

    यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात सदर रैलीत विविध पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील व्यवसायिक, विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विशेषतः एनएसएस व एससीसी कॅटेड आणि विविध समाजसेवी संघटना, योग, नृत्य क्लब आदी मोठया प्रमाणात उपस्थित होते. Sardar Vallabhbhai Patel birth anniversary events

    आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा

    पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तोच वारसा पुढे नेऊन आजच्या विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा.

    यावेळी उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचा, सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला. तसेच सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलिस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यायाठी मार्गदर्शन करण्यात आले.

    सोबतच सायबर गुन्हे व उपाययोजना, मुली व महिलांची सुरक्षितता, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. शेवटी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते.

  • Chandrapur heavy vehicle traffic control plan । चंद्रपूर शहरात जडवाहतूक बंदीची शक्यता; प्रतिभा धानोरकर यांचा प्रशासनाला अल्टिमेटम

    Chandrapur heavy vehicle traffic control plan

    Chandrapur heavy vehicle traffic control plan : चंद्रपूर 31 ऑक्टोबर (news34 वृत्तसेवा) : चंद्रपूर शहरातील अनियंत्रित जडवाहतूक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत प्रशासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विसकलमी सभागृहात झालेल्या बैठकीत चंद्रपूर शहरातून होणारी अवजड (जड) वाहतूक दिवसा (सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत) त्वरित बंद करण्याची आणि रस्ते दुरवस्था, नवीन बायपास तयार करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव शासनाकडे पाठवा तसेच वाहतूक सुरक्षेशी संबंधित सर्व समस्यांवर आठ दिवसांच्या आत उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.

    Also Read : ४ नोव्हेम्बरला महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर चंद्रपुरात

    निवासी जिल्हाधिकारी कुंभार, महानगर पालिका आयुक्त गायकवाड, तहसीलदार पवार, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पायघन, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता बोबडे, शहर अभियंता रवींद्र हजारे, वाहतूक पोलीस निरीक्षक पाटील, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कुंदाताई जेणेकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एहतेशाम अली, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक नेते प्रशांत भारती, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, राहुल तायडे यांची उपस्थिती होती.  Chandrapur bypass road proposal for heavy vehicles

    अनियंत्रित जड वाहतूक मोठी समस्या

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरातून होणारी अनियंत्रित जड वाहतूक ही आजघडीला सर्वात मोठी समस्या बनली आहे. या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था (विशेषतः चंद्रपूर-घुग्घुस, चंद्रपूर-बल्लारपूर व चंद्रपूर-वरोरा या मार्गावर), पर्यावरणाचे प्रदूषण आणि अपघातांची वाढलेली शक्यता यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. चंद्रपूर शहरात सकाळी १० ते रात्री १० या वेळेतही जड वाहने धावत असतात, जे अपेक्षित नियमांचे उल्लंघन आहे. आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे ओव्हरलोड वाहनांवर प्रभावी कारवाई होत नाहीये, तसेच ट्रॅव्हल्स धारक आणि ताडाळी परिसरातील रस्त्यावर उभी असलेली जड वाहने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत आहेत. Traffic law enforcement in Chandrapur city

    या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ खालील मागण्या पूर्ण करण्याची सूचना केल्या आहे. यामध्ये शहरातील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स उभे राहतात. त्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, शहरातील महानगर पालिका क्षेत्रातील ट्रक टर्मिनस जागेवर बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या आहे, चंद्रपूर-मुल मार्गावर शाळा-महाविद्यालयांजवळ तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत. खासगी बस थांबा शहराबाहेर हलवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी. ओव्हरलोडिंग आणि रस्ता अतिक्रमणावर त्वरित कठोर कारवाई करावी. तसेच, जिल्ह्यातील मुख्य मार्गावर प्रवाशांसाठी प्रसाधनगृहे  उभारण्याची योजना कार्यान्वित करावी.

  • Padvidhar Voter Registration । मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. किशोर जोरगेवार

    Padvidhar Voter Registration

    Padvidhar Voter Registration : चंद्रपूर ३० ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – पदविधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचे महत्त्व लक्षात घेता आज गुरुवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
    या बैठकीत मतदार नोंदणी अभियानाची सविस्तर माहिती, प्रगती आणि उर्वरित कामांवर चर्चा करण्यात आली. पदविधर नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शहर ते बुथ पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

    Also Read : ८५ कोटी रुपयांच्या रस्त्याचे पालकमंत्री वुईके यांच्या हस्ते भूमिपूजन

    या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, शहर महिला आघाडी अध्यक्षा छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, महामंत्री मनोज पाल, श्याम कनकम, रवि गुरुनुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळ अध्यक्ष आणि विविध आघाडी अध्यक्ष उपस्थित होते.

    पदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज

    बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पदविधर मतदारसंघ हा सुशिक्षित समाजाचा आवाज आहे. त्यामुळे प्रत्येक पदवीधर नागरिकाने आपली नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
    मतदार नोंदणी हा केवळ अधिकार नसून लोकशाही बळकट करण्याचे प्रभावी साधन आहे, असेही त्यांनी नमूद केले.

    त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की,  प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत जाऊन त्यांची नोंदणी सुनिश्चित करा. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून लोकशाहीच्या जडणघडणीचा भाग आहे. आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, मतदारसंघातील तरुण पदवीधर, शिक्षक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता वाढविणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजेनोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.

  • Shegav Chandankheda road bhumipujan । ताडोबा पर्यटक व नागरिकांचा प्रवास होणार सुलभ; ८५ कोटीच्या रस्त्याचे भूमिपूजन

    Shegav Chandankheda road bhumipujan

    Shegav Chandankheda road bhumipujan : चंद्रपूर, दि. 30 : भद्रावती तालुक्यातील शेगाव (खु.), चंदनखेडा – मुधोली – मोहर्ली हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने गावक-यांसाठी तर महत्वाचा आहेच, मात्र ताडोबात येणा-या देश- विदेशातील पर्यटकांसाठी सुध्दा अतिशय सोयीचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सुशोभिकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी असलेल्या या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखा, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

    Also Read – शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    बुधवारी शेगाव (खु.) येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भुमिपुजन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), बालाजी कदम (भद्रावती), कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, सहा. कार्यकारी अभियंता जय तिवारी, सरपंच मोहित लभाणे आदी उपस्थित होते. Tadoba tourist road improvement Maharashtra

    अर्थसंकल्पात नागपूर विभागात केवळ या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. शेगाव – चंदनखेडा- मुधोली – मोहर्ली या रस्त्याचा प्रश्न 2025 पासून प्रलंबित होता. तसेच याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. राज्य शासनाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. गावक-यांसाठी अतिशय उपयोगी असलेल्या या रस्त्याचे बांधकाम अतिशय गुणवत्तापुर्वक व दर्जेदार व्हायला पाहिजे. रस्त्याबाबत कोणतीही तक्रार येऊ देवू नका. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामावर नियमितपणे लक्ष ठेवावे, अशाही सूचना पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

    तत्पुर्वी पालकमंत्र्याच्या हस्ते कुदळ मारून रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता अक्षय पगारे म्हणाले, या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात 85 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 33 किमी लांबीच्या या रस्त्यामुळे गावखेड्यातील नागरिक आणि ताडोबाला येणा-या पर्यटकांना फायदा होईल. Bhadrawati taluka road infrastructure upgrade

    दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा रस्ता : खासदार प्रतिभा धानोरकर

    राज्य शासनाने बजेटमधून भद्रावती तालुक्यात हे काम मंजूर केले आहे. अनेक गावे आणि ग्रामपंचायती या रस्त्यावर असून दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. शेगाव, चंदनखेडा, मोहर्ली, जुनोना, कोलारा गेटकरीता हा रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अतिशय चांगले काम करावे, असेही त्या म्हणाल्या.

    पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश : आमदार करण देवतळे

    या अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यात 15 रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली. यात नागपूर विभागातून केवळ भद्रावती तालुक्यातील शेगाव, चंदनखेडा, मुधोली या रस्त्याचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्याने अनेक पर्यटक ताडोबाला येत असतात. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आवश्यकच होते. अधिका-यांनी रस्त्याच्या कामाची गती ठेवून दर्जेदार काम करावे, असे आमदार करण देवतळे यांनी सांगितले.

  • Shiv Sena leaders switching to Congress । राजकीय हालचाली; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    Shiv Sena leaders switching to Congress

    Shiv Sena leaders switching to Congress : चंद्रपूर ३० ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): वरोरा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसच्या ‘हात’ हाती घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामुळे वरोरा शहर आणि माजरी परिसरातील काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.

    Also Read : महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर ४ नोव्हेम्बरला चंद्रपुरात

    निहाल सिद्दीकी, रवी रॉय, रवी भोगे, मुन्ना वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. प्रवेशानंतर निहाल सिद्दीकी यांची तत्काळ माजरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे विशेष.

    यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अहेतशाम अली, माजी नगरसेवक राजू महाजन, राकेश दोंतावार यांच्यासह वरोरा व माजरी परिसरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कांग्रेस पक्षाला ऊर्जा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “या सर्व अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे जनसंपर्काचे बळ काँग्रेसला निश्चितच उपयोगी पडेल. सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लोकशाहीविरोधी कारभाराला कंटाळून हे सर्वजण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील.”

    प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही दिली.

  • Chandrapur mosquito control and prevention tips । चंद्रपूरमध्ये पावसाने वाढवला डासांचा उन्माद! घर सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा!

    Chandrapur mosquito control and prevention tips

    Chandrapur mosquito control and prevention tips : चंद्रपूर 30 ऑक्टोबर – मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

    Also Read : दुभाजकावरून चंद्रपुरात माजी नगरसेवकांचा राडा

    अवकाळी पावसात कीटकजन्य,साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते,कारण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते, जे डासांच्या प्रजननासाठी आदर्श वातावरण तयार करते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी उबतात आणि त्यांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.  महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.

    पाणी साचू देऊ नका

    घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात.

    हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. 

  • Women Commission initiatives at your doorstep । महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत चंद्रपूरमध्ये महिलांच्या तक्रारीचे निवारण

    Women Commission initiatives at your doorstep

    Women Commission initiatives at your doorstep : चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

    Also Read : नागपूरला जाण्यापूर्वी हि माहिती वाचा

    ४ नोव्हेम्बर रोजी रुपाली चाकणकर जिल्ह्यात

    महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 4 नोव्हेंबर, 2025 रोजी चंद्रपुर जिल्हयात येणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलिस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल.

    advirtisment

    या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.

  • Chandrapur crop damage relief fund । अतिवृष्टीग्रस्त मदतीचे चंद्रपूर जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप

    Chandrapur crop damage relief fund

    Chandrapur crop damage relief fund : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना  67 कोटी  43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाही, अशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

    Also Read : चंद्रपुरात दुभाजकावरून माजी नगरसेवक भिडले

    चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1 लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झाली. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 26 हजार 286 आहे. यासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे. Agricultural disaster fund distribution Maharashtra

    यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 कोटी 84 लक्ष 75 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना 9 कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष 6 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.  Chandrapur flood and drought relief for farmers

     पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सहायक जिल्हाधिकारी बालाजी कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.

    रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी 

    अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहे. यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 62 लक्ष 10 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 4 लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

    advirtisment

    जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर

     अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगिती, तिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे

    शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाही. यात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणे, ई -केवायसी प्रलंबित असणे, आधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहे. तरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावे. मदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावी. तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावे. जेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.

  • Ghugus water supply project Amrit 2.0 । घुग्घुस शहराला मिळालं अमृत 2.0 अंतर्गत 93.98 कोटींचा पाणीपुरवठा निधी

    Ghugus water supply project Amrit 2.0

    Ghugus water supply project Amrit 2.0 : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Also Read : चंद्रपुरात रस्ता दुभाजकावरून माजी नगरसेवक भिडले

       या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प, मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे आणि शहराच्या सर्वांगीण विकास संदर्भात सविस्तर चर्चा झाली.

    १८ महिन्याच्या आत काम होणार पूर्ण

                या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा हिस्सा 45 टक्के, राज्य शासनाचा हिस्सा 45 टक्के आणि नगरपरिषदेचा (स्वतःच्या संस्थेचा) हिस्सा 5 टक्के इतका असणार आहे. प्रकल्पाचे काम कार्यादेश मिळाल्यानंतर 18 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार असून, त्याचे कार्यान्वयन घुग्घुस नगरपरिषद अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून घुग्घुस शहराला पाण्याच्या टंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. अनेक प्रभागांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामुळे घुग्घुस शहरात अखंड, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे.

    भेटीनंतर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुससाठी अमृत 2.0 योजनेतून मिळालेला निधी हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे घुग्घुस शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री यांनी  शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने गती देण्याचे आश्वासनही दिले आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार असे ते म्हणाले.

  • Chandrapur Road Divider । दुभाजकाचा विरोध करत आंदोलन, काँग्रेस नगरसेवकांची आंदोलकांना धमकी?

    Chandrapur Road Divider

    Chandrapur Road Divider : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत दुभाजकाच्या प्रकरणाला आज एक वेगळेच वळण लागले. या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात आज बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केली, काम बंद पाडले.

    Also Read : नागपूरला जाण्यापूर्वी हि माहिती वाचा

    आंदोलन सुरू असताना अचानक काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर आंदोलनस्थळी आले. माझ्या प्रभागातील काम बंद करता, दादागिरी करता,मला पत्र का दिले नाही ? आंदोलन कशाला करत आहात ? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावर देशमुख यांनी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत नागरकर यांना सुनावले. Pappu Deshmukh

    काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भुमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागरकर महाकाली प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक होते तर रस्ता दुभाजक पठाणपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे. त्यामुळे नागरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चेला उधान आले आहे. दरम्यान देशमुख यांनी दुभाजकाची एक सळाख सहजपणे हाताने तोडून दाखवली. यावरून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    दुभाजकाचे काम रद्द करून रस्त्याचे काम करा.. आंदोलकांची मागणी

    दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व दुभाजकाच्या कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.

    या आंदोलनामध्ये मनसेचे पदाधिकारी मनोज तांबेकर, वर्षाताई भोमले, मंदाताई कराडे, प्रकाश चंदनखेडे,प्रगती भोसले, नेहा डुडलकर, कैलास पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रतिक चिकाटे, राजु पांडे जनविकास सेनेचे मनिषा बोबडे, इमदाद शेख,गोलू दखणे, प्रफुल बैरम,अमुल रामटेके,घनश्याम येरगुडे, अनिता पिसे,सचिन भिलकर,किशोर महाजन,देवराव हटवार,अरूणा मांदाळे,ललिता उपरे,माला गुरनुले,सुशिला चौधरी यांनी सहभाग घेतला.