Blog

  • Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start । घुग्गुस ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा – आमदार जोरगेवार यांची मागणी

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र, आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे घुग्गुस शहरासह आसपासच्या २० ते २५ गावांतील सुमारे ७० हजार नागरिकांना उपचारासाठी चंद्रपूरपर्यंत २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन  घुग्घुस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला स्व. रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर

    या भेटीत आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सार्वजनिक निधीतून उभारलेली ही आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू होणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयाची नवीन इमारत सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असून, केवळ मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी ती वापरात येऊ शकलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

    उपकरणांची तात्काळ खरेदी करा

    रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ अशा विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा व क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णालयासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, डिजिटल क्ष-किरण मशीन, ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, ॲनेस्थेशिया मशीन, व्हेंटिलेटर, ईसीजी मॉनिटर यांसारख्या आधुनिक उपकरणांची तात्काळ खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले. Ghugus hospital modern medical equipment

    आ. जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास  घुग्घुस  ग्रामीण रुग्णालय लगेच कार्यान्वित होऊन परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळेल. त्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ग्रामीण आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.

  • Ratan Tata Cancer Hospital Chandrapur । चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा’ यांचे नाव द्या!

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) : महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान आणि उपचार रुग्णालय उभारले जात आहे. या मानवतावादी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात उद्योगपती आणि थोर दानशूर व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफियांवर होणार कारवाई

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही लोकहितकारी मागणी केली आहे आणि राज्य सरकार तसेच टाटा ट्रस्टकडे विशेष आग्रह धरला आहे.

    कॅन्सर हॉस्पिटलमुळे रुग्णांना मिळेल आधार

    स्व. रतन टाटा यांनी चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात एवढे मोठे आणि अद्ययावत रुग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील लाखो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, रतन टाटा हे चंद्रपूरच्या माता महाकालीच्या पावन भूमीवर येऊन गेले आहेत, ज्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हा प्रकल्प अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. Pratibha Dhanorkar appeal Ratan Tata hospital name

    खासदार धानोरकर म्हणाल्या, “रतन टाटा हे केवळ मोठे उद्योगपती नाहीत, तर ते माणुसकी आणि निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी चंद्रपूरला दिलेले हे रुग्णालय विदर्भासाठी एक वरदान आहे. त्यांच्या या महान योगदानाचा यथोचित गौरव करण्यासाठी, या रुग्णालयाला त्यांचे नाव देणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची योग्य पद्धत ठरेल.”त्यांच्या नावाने हे रुग्णालय ओळखले गेल्यास, ते रतन टाटांच्या समाजसेवेच्या विचारांना कायम प्रेरणा देत राहील आणि इतरांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देईल, असे भावनिक आवाहनही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

  • illegal tobacco supply chain chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या तंबाखूच्या अवैध व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज

    illegal tobacco supply chain chandrapur

    illegal tobacco supply chain chandrapur : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमात सुरु आहे मात्र हे सर्व प्रशासनाच्या समोर होत असताना सुद्धा यावर कारवाई करण्याचं साधं धाडस प्रशासन तर्फे दाखविल्या जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व चंद्रपूर शहर मधून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्या जाते. या सर्व अवैध व्यवसायाची चौकशी व्हावी याकरिता उच्चस्तरीय समिती नेमावी यासाठी सामाजिक समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.

    Also Read : २२ डिसेम्बर रोजी चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण

    चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाकू (गुटखा/पान मसाला) चा अवैध व्यवसाय उघडपणे फोफावत असून, यामुळे ओरल कॅन्सरची साथ वेगाने वाढत आहे. हा धंदा FSSAI कायदा २००६, COTPA २००३ आणि महाराष्ट्र गुटखा बंदी २०१२ चा थेट भंग करतो. जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २ वर्षांत ओरल कॅन्सर रुग्णांत २५% वाढ झाली असून, यातील ६०% रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. टीनएजर्स आणि युवक गुटख्याच्या व्यसनात सर्वाधिक अडकले असून, शाळा-कॉलेज परिसर, बसस्टँडवर २० रुपयांत गुटखा सहज उपलब्ध होतो. १५-१९ वयोगटातील मुले ओरल कॅन्सरच्या मार्गावर आहेत. illegal gutkha trade Chandrapur

    खुलेआम चालतो हा धंदा

    हा अवैध धंदा अपराधी तत्त्वांनी चालवला जातो, ज्यात तस्करी, करचोरी आणि माफिया नेटवर्क सामील आहे. पोलीस व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कारोबार गल्ली-चौराह्यावर खुलेआम चालतो. नाममात्र कारवाई फक्त चिल्लर विक्रेत्यांवर होते, तर मुख्य सप्लायर आणि माफिया मोकाट राहतात, ज्यामुळे प्रशासनावर संशय निर्माण होतो. अधिवक्ता प्रीतीशा शाह यांनी जिल्हाधिकारी श्री विनय गौडा (आयएएस) यांना निवेदना द्वारे उच्चस्तरीय चौकशी समिती तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.


    समितीचे उद्देश: अवैध व्यवसायाचे मूळ कारण, सप्लाय चेन आणि संरक्षण देणारे घटक शोधणे. मुख्य सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर, गोदाम मालक आणि तस्करी नेटवर्कचे मास्टरमाइंड यांची ओळख पटवणे. कालबद्ध अहवाल सादर करणे.


    कारवाई केवळ पान ठेले किंवा छोटे विक्रेते यांच्यापुरती मर्यादित नसावी. हा धंदा थांबला नाही तर हजारो कुटुंबे उध्वस्त होतील आणि चंद्रपूरला “कॅन्सर फ्री जिल्हा” बनवण्याची संधी हातची जाईल
    निवेदन देतांना सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफ़ान शेख अधिवक्ता प्रीतिशा शाह सचिव धीरज तामगड़े व समिति चे सदस्य उपस्थित होते.

  • Durgapur PHC Quality Certification । राष्ट्रीय मानांकन प्राप्त दुर्गापूर प्रा.आ.केंद्राला आमदार मुनगंटीवार यांची भेट

    Durgapur PHC Quality Certification

    Durgapur PHC Quality Certification : चंद्रपूर, दि. 03 : भरघोस गुणांसह राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणा-या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन पाहणी केली. संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविल्याबद्दल अधिकारी व कर्मचा-यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच जिल्यातील इतर आरोग्य संस्थांनी सुद्धा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन पात्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    Also Read : धक्कादायक घटना; वरोरा मध्ये ४ मुले वर्धा नदीत बुडाली, दोघे बचावले

    यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर,    प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल यांच्यासह  केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

    सर्वोत्कृष्ट मानांकन

    आरोग्य क्षेत्रात गुणवत्तेचे अनन्यसाधारण महत्व असते. या गुणवत्तेचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याकरिता अनेक पद्धती आहेत. त्यापैकी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन हे सर्वोत्कृष्ठ मानले जाते. या मानांकन प्राप्त आरोग्यसंस्थेद्वारे रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात येतात. आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरला (NQAS) मार्फत केल्या गेलेल्या मुल्याकंनामध्ये मानांकन प्राप्त झालेल आहे. Sudhir Mungantiwar health initiatives Maharashtra

                राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक मध्ये आरोग्य संस्थेत एकूण 6 विभाग असतात. यात बाह्यरुग्ण विभाग,  आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रयोगशाळा विभाग, सामान्य प्रशासन विभाग याचा समावेश आहे. या प्रत्येक विभागामध्ये किमान 70 टक्के गुणांकन प्राप्त करणे अत्यावश्यक असते.  यामध्ये आधी राज्य पातळीवर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर मुल्यांकन करण्यात येते. मूल्यांकनामध्ये प्रा. आ. केंद्र, दुर्गापूर ला 94.64 टक्के गुणांकन मिळून जिल्ह्यामध्ये एन.क्य.ए.एस. पात्र संस्थेचा प्रथम मान मिळाला. national quality assurance standards healthcare

    सध्यस्थितीत चंद्रपूर जिल्यातील 11 आरोग्य संस्था राज्य पातळीवर  एन.क्यू.ए.एस. साठी पात्र झाल्या असून त्यापैकी 3 संस्थांचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले आहे. प्रा. आ. केंद्र, गंगालवाडी आरोग्य संस्था अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र ठरलेली आहे. तसेच प्रा. आ. केंद्र, नांदा फाटा या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले असून निकाल लागायचा आहे. उर्वरित ८ आरोग्य संस्था – प्रा. आ. केंद्र राजोली (मुल),  कळमना (बल्लारपूर),  नेरी (चिमूर), वाढोणा (नागभीड), नवेगाव पांडव (नागभीड),  बाळापुर (नागभीड),  मोहाडी नलेश्वर (सिंदेवाही),  माढेळी (वरोरा) यांचे NQAS मूल्यमापन माहे नोव्हेंबर मध्ये होण्याचे नियोजित आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी कळविले आहे.

  • Chandrapur cancer hospital inauguration । चंद्रपूरात नवं कॅन्सर हॉस्पिटल; मोहन भागवत यांच्या हस्ते २२ डिसेंबरला लोकार्पण

    Chandrapur cancer hospital inauguration

    Chandrapur cancer hospital inauguration : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना  चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर  2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.

    Also Read : अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, ६ एकरवरील सोयाबीन पेटवले

    अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली.  “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय. Tata Trust cancer hospital

    वर्ष २०१४ पासून पाठपुरावा

    2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला.  जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे. Sudhir Mungantiwar cancer care initiative

    या कॅन्सर हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री :यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators),ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग :यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा : सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे. या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे.

    स्व. रतन टाटा यांची इच्छा

    या प्रकल्पाबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांची  टाटा समूहाचे प्रमुख स्व. रतनजी टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सर संघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी मोहनजी भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी 22 डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. Chandrapur cancer hospital inauguration

    चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. आरोग्य सेवेचे नवे मानदंड जिल्ह्यात निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेले हे कॅन्सर रुग्णालय रुग्णसेवेचे प्रशस्त दालन ठरणार आहे.

  • farmers burning soyabean after rain । अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; ६ एकरवरील सोयाबीन पेटविले

    farmers burning soyabean after rain

    farmers burning soyabean after rain : कोरपना ३ नोव्हेम्बर (News३४): आधीच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असताना, अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे आणि मोठे संकट उभे केले आहे. कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्याने याच संकटापुढे हतबल होऊन 6 एकर क्षेत्रावरील कापणी केलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अखेर आग लावून जाळून टाकले. या हृदयद्रावक घटनेमुळे मसे यांचे केवळ पीकच नव्हे, तर सुमारे 25 हजार रुपयांचा कापणी खर्च देखील पाण्यात गेला असून, ते आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

    Also Read : वरोऱ्यात दुर्दैवी घटना, ४ शाळकरी मुले वर्धा नदीत बुडाली, दोघांना वाचविण्यास यश

    घडलेला प्रकार:

    • प्रशांत मसे यांनी आपल्या 6 एकर क्षेत्रावर मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली होती.
    • पीक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कापणी केली आणि सोयाबीन काढण्यासाठी तयार ठेवले होते.
    • मात्र, सुरुवातीच्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापणी केलेले सोयाबीन ओलसर झाले.
    • हे सोयाबीन उन्हात सुकविण्यासाठी शेतात ठेवले असताना, अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिला आणि सोयाबीन पुन्हा पूर्णपणे ओले झाले.
    • ओलसरपणामुळे थ्रेशर मशीनच्या मालकाने सोयाबीन काढण्यास स्पष्ट नकार दिला.
    • परिणामी, ढिगाऱ्यात साचलेल्या ओल्या सोयाबीनला अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आणि पीक कुजण्याच्या मार्गावर आले.

    अखेर हतबलता

    सततच्या पावसामुळे पीक काढता येत नाही आणि ढिगाऱ्यातच ते कुजत चालले आहे, हे पाहून शेतकरी प्रशांत मसे पूर्णपणे हतबल झाले. लाखोंचे नुकसान डोळ्यांदेखत होताना पाहून त्यांनी जड अंतःकरणाने आपल्या 6 एकर क्षेत्रावरील जमा झालेल्या सोयाबीनच्या संपूर्ण ढिगाऱ्याला आग लावून दिली. soyabean crop loss due to unseasonal rain

    या घटनेमुळे मसे यांचे संपूर्ण 6 एकरावरील उत्पादन नष्ट झाले असून, ते पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा आहे.


  • Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

    Wardha river missing children

    Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५, रा. जिजामाता वॉर्ड, वरोरा) यांचा समावेश आहे. नदीपात्रातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी, वाहून गेलेल्या मुलांचा रात्री उशीरपर्यंत शोध लागला नाही.

    नेमकी घटना काय?

    शहरातील चार मित्र – रुपेश कुळसंघे, प्रणय भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम, आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे रविवारी दुपारच्या सुमारास सायकलने तुराना घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीच्या पात्रात उतरले. त्याच वेळी घाटाच्या दिशेने कोणीतरी महिला येत असल्याचे दिसल्याने, चौघांनीही नदीच्या पात्रात लपण्याचा प्रयत्न केला. लपण्याच्या प्रयत्नात ते नदीतील खोलगट भागात गेले आणि चौघेही बुडू लागले.

    गुराख्याने वाचवले दोघांना

    मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू करताच, जवळच जनावरे राखत असलेल्या एका गुराख्याने तातडीने धाव घेतली. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोन मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढले.

    Also Read : कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

    मात्र, दुर्दैवाने, रूपेश आणि प्रणय हे दोन मित्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने खोल पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात गुराख्याला यश आले नाही.

    शोधमोहीम थांबली, उद्या पुन्हा सुरू होणार

    गुराख्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना माहिती दिली, ज्यामुळे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. Warora search operation river

    परंतु, रात्री उशीर झाल्यामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ता. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

    या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

    आईचे छत्र हरवलेल्या प्रणयवर काळाचा घाला

    वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या प्रणय विनोद भोयर याचा शोध अद्याप लागलेला नाही. प्रणय केवळ अकरा महिन्यांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याचे वडील विनोद भोयर यांनी त्याचे एकट्याने पालनपोषण केले होते. आधी पत्नी आणि आता एकुलत्या एका मुलगा नदीत बुडल्याने वडील विनोद भोयर यांच्यावर मोठा आघात झाला असून ते एकाकी पडले आहेत.

  • Chandrapur police raid animal trafficking । गोवंशाची अवैध वाहतूक; गोंडपिपरी पोलिसांनी केली कारवाई, ४ आरोपीना अटक

    Chandrapur police raid animal trafficking

    Chandrapur police raid animal trafficking : गोंडपिपरी २ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी जनावरांची अवैध आणि क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून क्रूरतेने दाटीवाटीने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असलेली एकूण १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे.

    Also Read : डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कांग्रेसचे निषेध आंदोलन

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील चेकविठ्ठलवाडा बसस्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली.

    नेमका प्रकार काय घडला?

    पोलीस कर्मचाऱ्यांनी MH-34 BZ 2383 क्रमांकाची पिकअप आणि MH-34 AB 8938 क्रमांकाची अशोक लेल्यॉड छोटी पिकअप ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, या दोन्ही वाहनांमध्ये क्रूरपणे आणि निदर्यतेने दाटीवाटीने, दोरखंडाने बांधून, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, १० गोवंशीय जनावरे कोंबलेली आढळली. Gondpipri police animal cruelty arrest

    जप्त केलेल्या जनावरांची किंमत ८,६४,००० रुपये इतकी आहे. आरोपी हे जनावरे अवैध मार्गाने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे उघड झाले.

    चार आरोपींना अटक

    या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

    1. सुधाकर पांडुरंग निकोडे (वय ५०, रा. भंगाराम तळोधी, चालक, पिकअप क्र. MH-34 BZ 2383)
    2. सुधाकर वारलु झाडे (वय ५२, रा. चेकविठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी)
    3. अमर सुदर्शन मडावी (वय ३०, रा. वेळगाव, ता. गोंडपिपरी, चालक, पिकअप क्र. MH-34 AB 8938)
    4. प्रभाकर हनुमंतु कन्नाके (वय ६०, रा. बामनपेठ, ता. चार्मोर्शि, जि. गडचिरोली)

    या चारही आरोपींविरुद्ध गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    सदरची यशस्वी कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, आणि श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या कारवाईत सपोनि रमेश हत्तीगोटे, सा. सफौ माणिक वाग्दरकर, पोहवा विलास कोवे (ब.नं. २४१९), पो. अं. सचिन गायकवाड (ब.नं. ११७४), आणि चालक मपोशि. मनिषा ठाकरे (ब.नं. ६०२७) या गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

  • Justice for Dr Sampada Munde । डॉ संपदा मुंडे ना न्याय द्या; महिला कांग्रेसचे निषेध आंदोलन

    Justice for Dr Sampada Munde

    Justice for Dr Sampada Munde : चंद्रपूर २ नोव्हेम्बर (News३४) – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा मा.संध्याताई सव्वालाखे यांचा निर्देश्यानुसार खासदार मा.प्रतिभाताई धानोरकर, विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेटीवार,चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा,सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनात,तसेंच शहर जिल्हाध्यक्ष मा. रामूभैय्या तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा सौ कुंदाताई जेणेकर,शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात बिड जिल्यातील फलटण येथील डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येकरिता प्रवृत्त करणाऱ्या दोन नराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. Dr Sampada Munde suicide case updates

    आरोपीना तात्काळ फाशी द्या

    आपल्या देशात वारंवार महिलांवर लैगिक अन्याय अत्याचार करून हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,आणि सरकार मात्र हत्त्यारयाला कठोर शिक्षा न करता बघ्याची भूमिका घेत अश्या घटनेमुळे महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरतले आहे.त्यामुळेच डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फाशीची शिक्षा दिली तर नक्कीच महिलांवरील अत्याचारयाच्या घटना घडणार नाही त्यामुळे त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फासी झालीच पाहिजे यासाठीच चंद्रपूर जिल्हा व शहर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलो आहे. अशी प्रतिक्रिया महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर आणि महिला शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी दिल्या. Women’s Congress protest Chandrapur

    Also Read : मुद्रांक विक्रेत्याने घेतली १४० रुपयांची लाच

    निषेध आंदोलनात रामूभैया तिवारी कुंदाताई जेणेकर,चंदाताई वैरागडे , जेष्ठ नेते विनोदभाऊ दत्तात्रय,अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे माजी महापौर संगीता अमृतकर माजी सभापती हर्षाताई चांदेकर,माजी नगर सेविका संगीता भोयर, सुनीता अग्रवाल, सोबतच शालिनी भगत, मीनाक्षी गुजरकर, अफसाना सैय्यद, साधना रामटेके शोभा वाघमारे, निर्मला कुळमेथे, संध्या चांदेकर, पूनम गीरसावळे, सुमित्रा कुचनकर,सुशीला रामटेके, राजेशजी अडूर,अनिलजी नरुले,नरेंद्रजी बोबडे, मनीषजी तिवारी, पिंटूभाऊ शिरवार, दुर्गेशभाऊ कोडाम, प्रशांतजी भारती,युषूप चाचा, शिरीषजी गोगुलवार पप्पूभाऊ सिद्धीकी, नौशाद शेख,नासिरजी शेख मोनू रामटेके, यांचे सह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    निषेध आंदोलनानंतर महिला कांग्रेस च्या शिस्टमंडळानी मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर याना स्व.डॉ संपदा मुंडे याना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले.