Blog

  • Election Campaign Office : मतदारांशी संवाद आणि प्रचार कार्यालयाचे उदघाटन

    Election Campaign Office प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यात आमदार किशोर जोरगेवार यांनी छोट्या बैठकींकडे लक्ष केंद्रित केले असून, ते बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात या बैठकांचे आयोजन केले जात असून, या बैठकींमधून मागील पाच वर्षांतील कामे सांगितली जात आहेत.

    सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला जोरदार धक्का

    Election Campaign Office मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी मागील आठ दिवसांपासून मतदारसंघात बैठका घेत आपली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या बैठकींमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती असते.

      या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मोठा निधी आपण मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. चंद्रपूरातील शेवटच्या भागात असलेल्या कृष्णा नगर, संजय नगर या भागांतून आपण विकासकामांना सुरुवात केली. दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील भागांमध्ये विकासासाठी मोठा निधी देण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. Election Campaign Office

    पाच वर्षांत अनेक मोठी कामे आपण मार्गी लावू शकलो. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे. धानोरा बॅरेजचा टीपीआर मंजूर करण्यात यश आले असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी आपण जवळपास ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून जागतिक दर्जाचे काम येथे केले जाणार आहे. Election Campaign Office

    वढा तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे. आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून येथील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या बैठकींना नागरिकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

    मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

    महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या मिलन चौकातील भाजप मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

    महानगरपालिकेच्या मागील मिलन चौकात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ मध्यवर्ती निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीसंदर्भातील कामे या कार्यालयातून चालणार आहेत. भाजप नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • mva maharashtra : सुधीर मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीला दे धक्का

    Mva maharashtra महाविकास आघाडीला धक्का; 150 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

    Mva maharashtra बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

    गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. 150 जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महाविकास आघाडीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. Mva maharashtra

    वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील एकूण 150 जणांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. मौजा वेळवा आणि चकठाणा येथील युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला.

    शिवसेना ठाकरे गटाचे नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • Pravin kakade congress : प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा

    Pravin kakade congress वरोरा – विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते जात आहेत. या कार्यकर्त्यांसाठी रात्रीच्यावेळी जेवण अर्थात पार्टीचे नियोजन असते. त्यानुसार एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित एका पार्टीत गेलेल्या माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    हंसराज अहिर यांनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद


    Pravin kakade congress जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसशी जुळलेल्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्री भोजन आयोजित केले होते.

    यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले असता अंधारात ते तेथील विहिरीत पडले. Pravin kakade congress

    चंद्रपूर शहरात जिवंत बुलेट सह एकाला अटक

    आवाज येताच सगळे धावले. यात एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे हे विहिरीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.


    घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी मृतदेह बाहेर काढला. दुसरा दिवस उजाडला तरीही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होता का? त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. Pravin kakade congress

    निवडणुकीचा माहोल असताना एका पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.

    प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा

    11 नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्रांतील अपक्ष उमेदवार अतुल ईश्वर वानकर यांनी पत्रकार परिषदेतून कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.


    वानकर म्हणाले की 10 नोव्हेंबर रोजी कांग्रेस समर्थक प्रमोद मगरे यांच्या गिट्टी क्रॅशर वर दारू – मटण पार्टीत घडलेल्या घटनेची योग्य चौकशी करीत त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला कळवावा व कांग्रेस पार्टीचे उमेदवार यामध्ये दोषी आढळल्यास आचार संहितेचा गुन्हा दाखल करीत प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी वानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

  • Hansraj ahir : हंसराज अहिर यांचा भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

    Hansraj ahir चंद्रपूर – विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीची सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचार मोहिमेकरीता भाजपाच्या वतीने तुकूम येथे दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीस पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व भाजपा उमेदवार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

    भाजप खासदार रवि किशन यांचा रोड शो


    Hansraj ahir लालपेठ वार्डामध्ये भाजपाद्वारे आयोजित प्रचार रॅलीमध्ये हंसराज अहीर यांनी सहभागी होवून नागरिकांशी संपर्क साधला. तुकूम येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करून महायुतीचे विकासाभिमुख सरकार सत्तेवर आणण्याकरिता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाकरिता परिश्रम घ्यावे असे आवाहन सुध्दा त्यांनी उपस्थिताना केले.


    चंद्रपुरातील संजयनगर परिसरात भाजपाद्वारा जनसंपर्क प्रयोजनार्थ काढलेल्या पदयात्रेत अहीर यांनी सहभाग घेतला. दरम्यान लोहारा येथील उज्ज्वल गौरक्षण केंद्रास भेट देवून त्यांनी दीपोत्सव प्रित्यर्थ आयोजित अन्नकुट कार्यक्रमास हजेरी लावून गौरक्षण केंद्राच्या कार्याची प्रशंसा केली. Hansraj ahir

    बाबूपेठ भागात 6 जिवंत बुलेट जप्त, एकाला अटक

    या कार्यक्रमास अनिल फुलझेले, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठलराव डुकरे, भाजपाच्या महिला अध्यक्ष सौ. सविताताई कांबळे, मायाताई मांदाडे, शिलाताई चव्हाण, मायाताई उईके, पुरूषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, माजी नगरसेवक श्याम कनकम, राजु कामपेल्ली, गणेश गेडाम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, श्रीनिवास रंगेरी, सुदामा यादव, रामा भंडारी, संजय मिसलवार, श्रीनिवास येरकल, जुपाका गट्टया, दोमती भुमन्ना, लिलावती यादव, सुदाक्का, सिताक्का, तिरमलाक्का दोमटी, श्रीनिवास कामपेल्ली, रमेश पुलीपाका, रवी कडम, कन्नया यादव, श्रीनिवास जुनमुलवार, कविता कनकम यांचेसह भाजप पदाधिकारी, शक्तीकेंद्र, बुधकेंद्र प्रमुख व भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Ravi Kishan Bhojpuri actor : भाजप खासदार व अभिनेते रवि किशन यांचा रोड शो

    Ravi Kishan Bhojpuri actor बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सोमवारी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भोजपुरी चित्रपट अभिनेते व खासदार रवी किशन यांची जाहीर सभा बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

    Ravi Kishan Bhojpuri actor बल्लारपूर मध्ये जाहीर सभेला भाजपाचे स्टार प्रचारक माजी खासदार अशोक नेते उपस्थित राहणार आहे.

    चंद्रपुरातील युवकाजवळ मिळाले 6 जिवंत बुलेट

    आपल्या दमदार अभिनयाने भोजपुरी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये छाप सोडणारे खासदार रवी किशन यांचा सोमवारी ११ नोव्हेंबरला दुपारी ३.०० वाजता बल्लारपूर येथे रोड शो गोल पुलिया पासून हेल्थ क्लब ग्राउंड पर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता डब्लूसीएल हेल्थ क्लब ग्राउंड येथे जाहिर सभेला मार्गदर्शन करतील. Ravi Kishan Bhojpuri actor

    ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे.

    भाजपकडून लाडक्या बहिणींना धमकविण्याचे काम सुरू – विजय वडेट्टीवार

    बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार रवी किशन यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.

  • ladki bahin threat : लाडक्या बहिणींना भाजपकडून धमकविण्याचे काम सुरू – विजय वडेट्टीवार

    ladki bahin threat आता भाजपकडून लाडक्या बहिणींना धमकविण्याचे काम सुरू- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका, राज्यात महिला असुरक्षित, आणि लाडकी बहीण नावाखाली महिलांची दिशाभूल करण्याचा महायुतीचा प्रयत्न – शिवानी वडेट्टीवार

    ladki bahin threat ब्रह्मपुरी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात आज गांगलवाडी इथे महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    चिमूर शहरात पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली. तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. ladki bahin threat

    लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे. भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत 1500 रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो अशी धमकी दिली.

    चंद्रपूर शहरात 30 वर्षीय युवकांकडून बुलेट जप्त

    भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे. म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा. अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते, तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

    आयोजित कार्यक्रमास विमुक्त जाती भटक्या जमाती प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सभापति डॉ. राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कम्युनिस्ट पक्ष नेते विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास विखार ,युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार , कल्पना गेडाम, मंदा चौके, किशोर राऊत,प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. ladki bahin threat

    पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे. मोदी सरकार आले तेव्हा तर पंधरा लाख देऊ असे आश्वासन दिले आता १५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत. ladki bahin threat


    ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटीचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील 80% शेती ओलिताखाली आली आहे. तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोगा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ladki bahin threat

    ब्रह्मपुरी मध्ये मी लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    याप्रसंगी मार्गदर्शनपर युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, भाजपकडे टीका करण्यासारखे काहीच नसल्याने खोटे बोलून रडीचा डाव सुरू आहे. राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून मोठया प्रमाणात गुन्हेगारी फोपावली आहे. लाडकी बहीण सांगून भ्रष्ट महायुतीच्या भूल थापाना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.


    यानंतर मंचावरील ब्रम्हपुरी काँग्रेसचे खेमराज तिडके, डॉ.राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर व मंदा चौके, यांनी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तथा ब्रम्हपुरी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विकास कामांची माहिती आपल्या मनोगतातून उपस्थितांना दिली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल मैंद,प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर यांनी केले. आयोजित मेळाव्यास गांगलवाडी परिसरातील बहुसंख्येने महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.

  • Lakhpati didi: प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून उभा राहील – आमदार किशोर जोरगेवार

    Lakhpati didi प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून उभा राहील – आ. किशोर जोरगेवार, गाव माझा उद्योग फाऊन्डेशन तर्फे आयोजित महिला उद्योजीकांचा एक दिवसीय मेळावा

    Lakhpati didi महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. यापुढेही बहिणींना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात येणार आहे. आम्हीही आमच्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.

    पुढेही असे उपक्रम सुरु राहणार असून प्रत्येक संकटकाळी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


    गाव माझा उद्योग फाऊंडेशनतर्फे घुग्घुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात महिला उद्योजिकांसाठी “लखपती दीदी” या एकदिवसीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. Lakhpati didi

    या कार्यक्रमाला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, भाजप घुग्घुस शहर अध्यक्ष विवेक बोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, रघुवीर अहिर, गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे संचालक पवन वानखेडे, सह-संचालिका अष्टगाथा वानखेडे, जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे, आणि रिजनल मॅनेजर राजकुमार भडके आदी मान्यवर उपस्थित होते. Lakhpati didi

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा, मार्गात झाला बदल


    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, निवडणूक प्रचाराकरिता आज घुग्घुस येथे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घुग्घुस शहराच्या विकासाला आपले नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आपण येथील ग्रामपंचायतीचे रुपांतरण नगरपरिषदेत केले.

    त्यानंतर आता घुग्घुस शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर काही दिवसांत येथील प्रमुख समस्या असलेल्या उड्डाणपूलाचे कामही पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


    महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आधार निर्माण करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे; मात्र, त्यांच्यातील उद्योगशीलतेला आणि व्यवसायवाढीसाठी योग्य दिशा देणे गरजेचे आहे. Lakhpati didi

    हीच गरज लक्षात घेऊन या “लखपती दीदी” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या उद्योगांचे विस्तार, आर्थिक स्थितीचे उन्नतीकरण, तसेच आत्मनिर्भरतेची भावना बळकट करण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होणार आहे, असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.


    मागील पाच वर्षांत आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे घेऊन ५ हजार महिलांना प्रशिक्षण दिले आहे, यातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, असेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती.

  • Pm Modi Rally : चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांची सभा आणि मार्गात झाला बदल

    Pm Modi Rally पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी चिमुर येथे आयोजित सभेनिमित्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

    Pm Modi Rally 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत भिसी ते पिंपळनेरीपर्यंत व जांभुळघाट ते आर.टी.एम कॉलेज, चिमुरपर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहनांना चिमुर जाण्यासाठी आर.टी.एम कॉलेज-नेरी रोड मार्गे चिमुर बायपास मार्गे चिमुर शहरात जाता येईल. त्याचप्रमाणे नेरी ते आर.टी.एम कॉलेज चिमुर पर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहने नेरी-चिमुर बायपास मार्गाने चिमुर शहरात जातील व बायपास मार्गेच बाहेर पडतील.

    डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या विजयासाठी 40 संघटनांची महत्वाची बैठक

    त्याचप्रमाणे हजारे पेट्रोलपंप ते आर.टी.एम कॉलेज पर्यंत, हजारे पेट्रोलपंप ते संविधान चौक चिमुर वडाळा पैकु पर्यंत व हजारे पेट्रोलपंप ते नेहरू चौक चिमुर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. तसेच वरोराकडून चिमुर शहरात जाण्यासाठी हलक्या वाहनांना नेहरू चौक या मार्गाचा अवलंब करता येईल. Pm Modi Rally

    या सर्व मार्गांवर सभेकरीता येणाऱ्या वाहनांना प्रवेश राहणार असून आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

    या कालावधीत अवजड वाहतुकदारांना पुढील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

    1. भिसी ते चिमुर-वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 2.जांभुळघाट ते चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 3.नेरी वरून चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर-भिसीला जाण्यासाठी जाण्यासाठी जांभुळघाट भिसी- कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 4.वरोरा कडुन भिसी-जांभुळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगांव-कन्हाळगांव या मार्गाचा अवलंब करावा. Pm Modi Rally

    गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकदारांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.

    ड्रोन उडविण्यास बंदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे दौरा असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखणे तसेच अवकाशीय उपकरणाद्वारे नियोजित संभाव्य हल्ल्याची शक्यता रोखण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  विना परवाना व बेकायदेशीर रित्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे. Pm Modi Rally

    भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 च्या तरतुदीन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  12 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 00.01 वाजतापासून 12 नोव्हेंबरच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशिररित्या  ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सही व शिक्यानिशी  सदर आदेश पारीत करण्यात आले आहे.

  • purogami sangathan : डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या विजयासाठी 40 संघटनांची बैठक

    purogami sangathan डॉ. अभिलाषाताई गावतुरे या केवळ उमेदवार नसून त्या फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या प्रतिनिधी आहेत.

    purogami sangathan त्यामुळे अभिलाषा ताईचा विजय होणे हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नसून महापुरुषांनी चालवलेल्या आंदोलनाची ती फलश्रुती ठरणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष कायदेतज्ञ व ओबीसी विचारवंतन मा. इंजि. प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.

    मुनगंटीवार हे खोटे विकास पुरुष – विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल


    डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्याच्या समर्थनार्थ यंग रेस्टॉरंट येथे विविध 40 पुरोगामी संघटनांची चिंतन बैठक पार पडली त्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


    डॉ. अभिलाषा ताईंची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच आहे.त्यामुळे कोण जिंकेल पैसा की विचार असा प्रश्न उद्भवला तर केवळ धनशक्ती च्या भरवश्यावर प्रत्येकाला विकत घेता येत नाही आणी म्हणून
    येथील दलित, आदिवासी, ओबीसी शेतकरी, मजूर हा बहुसंख्यांक वर्ग जर एकत्र आला तर धनशक्ती हरेल व जनशक्तीचाच विजय होईल असे स्पष्ट विचार त्यांनी या याप्रसंगी व्यक्त केले. purogami sangathan


    या चिंतन बैठकीला ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत मा. हिराचंद बोरकुटे, भूमिपुत्र ब्रिगेड चे मार्गदर्शक डॉ. राकेश गावतूरे, ओबीसी सेवा संघाचे मा. विलास माथणकर, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन भेदे ई. विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • Exclusive Vikas Purush : हे खोटे विकास पुरुष, वडेट्टीवार यांचा मुनगंटीवारांवर हल्लाबोल

    Vikas Purush चंद्रपूर जिल्हयात एकही उद्योग आणला नाही, उलट येथे सुरु असलेले उद्योग बंद पाडले. येथील नागरिक रोजगारासाठी वणवण भटकत आहे. काहींना तर नोकरीसाठी तेलंगणा राज्यात जावे लागते अशा विकासाच्या खोट्या थापा मारून बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे मुनगंटीवार हे खोटारड्या महायुतीचा भाग असून यांनी येथील जनतेला फसवले आहे.

    तर महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय – खासदार प्रतिभा धानोरकर

    Vikas purush आता सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी आणि  विकासाच्या खोट्या थापा मारणाऱ्या महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते बल्लारपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतं होते.

    आयोजित सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव के राजू, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, जिल्हा बँक अध्यक्ष तथा बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत, माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) संदीप गीऱ्हे, डॉ. संजय घाटे, घनश्याम मुल चंदानी, डॉ. वाढई, दिलीप माकोडे, सिक्की यादव, रोशणलाल बिट्टू, गोविंद उपरे, करीमभाई शेख,राजू काबरा,बादल उराडे, मल्लेश्र्वरी महेशकर, याकूब पठाण डॉ. बावणे, डॉ.कुलदीवार, तथा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख उपस्थीत होते. Vikas purush

    आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुल बल्लारपूर मतदारसंघात शहरातील जयभीम चौक (टेकडी) आणि दुर्गापूर इथे महा विकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्यासाठी सभा घेतल्या.यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप खोटारड्यांचा पक्ष आहे, तेलंगणात बहिणीसाठी प्रतिमाह २५०० रूपये योजना बंद केल्याचे धादांत खोटं भाजप पसरवत आहे. तेलंगणा असो की कर्नाटक या राज्यात योजना अजूनही सुरु आहे. तुम्ही विकास म्हणता मग रोजगारासाठी येथील कामगार परराज्यात का जातात, महीला अत्याचार रोखण्यात शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महाभ्रष्ट युती सपेशल अपयशी ठरली आहे. Vikas purush

    यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव के. राजू म्हणाले की, काँग्रेसने पाच गॅरंटी घोषणा केली , या गॅरंटी फक्त निवडणूक पुरते आश्वासन नाही.  राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल मध्ये लोकांना या योजनांचा लाभ मिळाला. महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आमचे सरकार महिलांना ३००० रुपये दर महिना देणार असे त्यांनी सांगितले. Vikas purush

    आज तेलंगणा मध्ये जातीय जनगणना सुरुवात झाली.लोकांच्या घरोघरी जाऊन जातीय जनगणना होणार हे ओबीसीसाठी महत्वाचे आहे.  तसेच राहुल गांधी यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याची भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष किशोर कन्हेरे यांनी भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा समाचार घेत बल्लारशाह भागात जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा झाली नाही. वृक्ष मोहीमेत किती झाडे लावली व किती जगली यावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांनी सांगीतले की, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. मी आपल्याला विश्वास देतो की आपण मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास जनतेचे प्रत्येक काम करीन. कार्यक्रमाचे संचालन मेघा भाले, प्रास्तविक घनश्याम मुल चंदानी यांनी केले.