Blog

  • maha vikas aghadi leader : तर महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय – खासदार प्रतिभा धानोरकर

    maha vikas aghadi leader विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असून सर्व विधानसभा क्षेत्रात प्रचार सुरु केला आहे.

    maha vikas aghadi leader महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दौरा करीत आहेत.

    प्रचारादरम्यान नागरीकांशी चर्चा करुन सर्व सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे.

    अम्मा का टिफिन उपक्रमातून आमदार किशोर जोरगेवार यांची नवी ओळख, निराधारांचा आधार, किशोर जोरगेवार – देवेंद्र फडणवीस

    वरोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासातील सातत्य टिकवण्याकरिता महाविकास आघाडीचे प्रविण काकडे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजरी येथील छठ पुजन च्या कार्यक्रमात केले. तसेच दि. 09 नोव्हेंबर 2024 रोजी गोंडपिपरी तालुक्यात विविध गावातील भेटी दरम्यान राजूरा विधानसभा क्षेत्रातील विकासामुख महाविकास आघाडी चे उमेदवार सुभाष धोटे यांना प्रचंड बहूमताने विजयी करण्याचे आवाहन देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. maha vikas aghadi leader

    मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीने उत्तम कार्य केले असून कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेची केलेली सेवा लक्षात घेऊन भविष्यात सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे.

  • Today Kishor Jorgewar Prachar : ज्यांचा कुणी नाही, त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार – देवेंद्र फडणवीस

    Kishor Jorgewar Prachar कार्यसम्राट आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाची कास धरून राजकारण केले. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील काम वाखण्याजोगे असून अधिवेशनात त्यांनी वाघासारखी भूमिका मांडून चंद्रपूर मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास चंद्रपूरात स्पष्टपणे दिसत असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासासंदर्भात केलेल्या सर्व मागण्या सरकारमध्ये पूर्ण होतील, ज्यांचा कुणी नाही त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार आहे, कारण अम्मा का टिफिन उपक्रमात आता त्यांची सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रतिमा निर्माण झाली आहे असे प्रतिपादन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Kishor jorgewar prachar महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ कोहिनूर तलाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सभेला संबोधित करताना फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, अनु. जमातीचे चेअर मॅन फग्गनसिंग फुलस्ते, श्रीनिवासजी गोमासे, यांची उपस्थिती होती.

    देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली अम्मा ला श्रद्धांजली


    आपल्या 20 मिनिटांच्या संबोधनात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य व केंद्राच्या योजनांची यादी वाचली.
    महायुती सरकार महिलांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली, गोरगरीब आई-वडील मुलींचे शिक्षण पूर्ण करीत नसेल तर मंत्रालयात बसलेले मामा त्यांचं संपूर्ण शिक्षणाचा भार उचलणार आहे असे सांगितले. Kishor Jorgewar Prachar


    यावेळी पूढे बोलतांना ना. फडणवीस म्हणले कि, आमदार किशोर यांनी विकासकामांना मानवीय चेहरा दिला. अम्मा का टिफिन उपक्रमातून ते गरजवतांच्या जेवणाची सोय करत आहे. आम्ही नागपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तेव्हा चंद्रपूरच्या दिक्षाभुमीलाही निधी हवा यासाठी आग्रही जिद्द करुन त्यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून घेतली. यातील पहिला टप्पा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.

    चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांनी 240 कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मिळविला पूढल्या वर्षी होणार असलेल्या माता महाकाली महोत्सामध्ये या परिसराचा चेहरा बदलेला असेल होणार असलेली ही सर्व विकासकामे आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्यामुळेच शक्य झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. Kishor Jorgewar Prachar

    शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी भाव मिळाल्यास त्यांच्यासाठी आर्थिक सुरक्षेचे जाळे उभारण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना, विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येत असून, त्यासाठी 12 तासांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित केला जाईल. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

    त्यांनी राज्य परिवहन (एसटी) बसमधील महिला प्रवाशांसाठी 50% भाडे सवलतीचा उल्लेख केला. ही योजना लागू झाल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली असून, तोट्यातील राज्य परिवहन महामंडळ आता नफ्यात आले आहे. ‘लाडकी बहिण योजना’ अंतर्गत सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात मासिक 1,500 रुपये जमा करत आहे, आणि या पुढे हे आर्थिक सहाय्य वाढवून 2,100 रुपये केले जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
    महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. Kishor Jorgewar Prachar

    भाजपच्या साथीने चंद्रपूरातील विकासपर्वाला गती मिळणार – आ. किशोर जोरगेवार

    मागील पाच वर्षांत चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अपक्ष आमदार असूनही मोठा निधी या मतदारसंघात आणला आहे. यामध्ये बाबूपेठ उड्डाणपूल,  रस्ते,  अभ्यासिका, समाज भवन यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत, आणखी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आता माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आणि भाजपची साथ आहे. त्यामुळे चंद्रपूरातील विकास पर्वाला आणखी गती मिळेल, असे जोरगेवार म्हणाले. Kishor Jorgewar Prachar

    जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक मोठी कामे मार्गी लागली. आता तर मी त्यांच्याच पक्षात आहे, त्यामुळे त्यांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. चंद्रपूरातील प्रदूषण आणि पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत, फडणवीस यांचा पुढाकार या कामांसाठी मिळेल, असे ते म्हणाले.

    प्रचार सभा

  • devendra fadanvis in chandrapur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली अम्माला श्रद्धांजली

    devendra fadanvis in chandrapur भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर असताना, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देऊन आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई उर्फ ‘अम्मा’ यांना आदरांजली अर्पण केली.

    चंद्रपूर विधानसभा निवडणूक निकाल वर्ष 2019

    devendra fadanvis in chandrapur चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमाच्या प्रणेत्या, स्व. गंगूबाई, उर्फ  यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा क्षेत्रातील नामवंतांनी शोकसंदेशांच्या माध्यमातून अम्माला आदरांजली अर्पण केली.

    अम्मा हे सामाजिक कार्यात मोठे नाव होते. ‘अम्मा का टिफिन’, ‘अम्मा की दुकान’, आणि ‘अम्मा की जल सेवा’ या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे कार्य केले. मात्र दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.

    दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महायुती आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर होते. devendra fadanvis in chandrapur

    दादमहल येथील कोहिनूर तलावाजवळ त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मिलन चौकातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचून अम्मांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी ना. फडणवीस यांनी अम्मा टिफिन उपक्रमची पहाणी करत कौतुक केले.

    सामाजिक उपक्रमांतून निराधारांची सेवा करणाऱ्या अम्मांची सेवा राज्यासाठी प्रेरणादायी आहे. आज निराधारांची ‘अम्मा’ आपल्यात नसली तरी, त्यांनी सुरू केलेले प्रत्येक उपक्रम सेवाभावनेतून पुढे नेला जाईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • Chandrapur Assembly Election Results : चंद्रपूर विधानसभा निवडणूक निकाल 2019

    Chandrapur Assembly Election Results विधानसभा निवडणुक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार प्रचारात व्यस्त आहे.

    Chandrapur Assembly Election Results चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत वर्ष 2019 मध्ये अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे सध्या भाजप पक्षातून निवडणूक लढत आहे.

    विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

    भाजप व कांग्रेस या राष्ट्रीय पक्षांचा आमदार जोरगेवार यांनी वर्ष 2019 मध्ये अक्षरशः धुव्वा उडविला होता, कांग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला आपली जमानत सुद्धा वाचविता आली नव्हती.

    वर्ष 2019 च्या निवडणुकीचा निकाल काय होता? कुणाला किती मते मिळाली होती, यावर आपण माहिती जाणून घेऊया. Chandrapur Assembly Election Results

    अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते, भाजपचे नाना श्यामकुळे 44 हजार 909, वंचित बहुजन आघाडीचे अनिरुद्ध वनकर 15 हजार 403, कांग्रेसचे महेश मेंढे 14 हजार 284, पीपीआयडी नामदेव गेडाम 3 हजार 956, बसपा भिक्खू बुद्धशरण 1 हजार 772, आरपीआय के.एच चे बबन महादेव रामटेके 1 हजार 730, अपक्ष मनदीप गोराद्वार 884, अपक्ष तथागत पेटकर 679, Apoy च्या अमृता गोगुलवार 562, BRSP ज्योतिदास रामटेके 482, अपक्ष संदीप पेटकर 324 व नोटा ला 294 मते मिळाली होती.

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपचे श्यामकुळे यांचा तब्बल 72 हजार 661 मतांनी पराभव केला, अपक्ष उमेदवार म्हणून देशात सर्वाधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा आमदार जोरगेवार यांनी पराभव केला होता.

  • Assembly General Election 2024 : चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा विधानसभा निवडणुकीत 2 ईव्हीएम मशीनचा होणार वापर

    Assembly General Election 2024 येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात खुल्या, मुक्त, नि:स्पक्ष वातावरणात अतिशय पारदर्शक पध्दतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केला.

    भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

     Assembly General Election 2024 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

                लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 3 ने वाढली होती, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी आणखी वाढण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सायकल रॅली, रन फॉर व्होट, पोस्टर्स, रिल्स, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार तसेच ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. Assembly General Election 2024

    अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध

    जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ईव्हीएम : जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएमचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ईव्हीएम असून कुठेही कमतरता नाही. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील एकूण 2077 मतदान केंद्राकरीता 3808 बॅलेट युनीट, 2490 कंट्रोल युनीट आणि 2678 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहे. Assembly General Election 2024

                अतिशय पारदर्शक पध्दतीने ईव्हीएमची तपासणी : जिल्ह्यात आलेल्या ईव्हीएम कडक सुरक्षा बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात. 24 बाय 7 येथे सुरक्षेचे कवच असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच स्ट्राँग रुम उघडली जाते. त्यातही स्ट्राँग रुमसाठी डबल लॉक सिस्टीम असल्यामुळे कोणताही हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच येत नाही. ईव्हीएमच्या तपासणीवेळी संबंधित कंपनीचे अभियंते बाहेरून येतात. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच पारदर्शक पध्दतीने तपासणी केली जाते. Assembly General Election 2024

                आतापर्यंत जिल्ह्यात 2 कोटी 90 लक्षाची जप्ती : आदर्श आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत रोकड, दारू, ड्रग्ज व इतर बाबी मिळून एकूण 2 कोटी 90 लक्ष रुपये / वस्तुंची जप्ती करण्यात आली आहे. यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 16 लक्ष 30 हजार, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 54 लक्ष 39 हजार, चंद्रपूर मध्ये 43 लक्ष, चिमूर 19 लक्ष 88 हजार, राजुरा 24 लक्ष 67 हजार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 1 कोटी 32 लक्षाची जप्ती करण्यात आली आहे.

    असे आहेत जिल्ह्यातील एकूण मतदार : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 50 हजार 102 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 39 हजार 115, स्त्री मतदार 9 लक्ष 10 हजार 939, इतर 48 मतदारांचा समावेश आहे.

    राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167895, स्त्री मतदार – 157381, इतर 2, एकूण – 325278), चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188724, स्त्री मतदार – 185168, इतर 35, एकूण – 373927), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158628, स्त्री मतदार – 153720, इतर 7, एकूण – 312355), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137752, स्त्री मतदार – 137914 एकूण – 275666), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 141153, स्त्री मतदार – 139674, एकूण – 280827), आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144963, स्त्री मतदार – 137082, इतर 4, एकूण – 282049).

  • Battle of the Constitution : ही मनुस्मृती विरुद्ध संविधानाची लढाई – विजय वडेट्टीवार

    Battle of the Constitution गेल्या दहा वर्षात केंद्रातील मोदी सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून केवळ व्यापारी हित जोपासत देशातील गोरगरीब जनतेला महागाईच्या आगीत झोकले.

    Battle of the Constitution आज तरुणांपुढें रोजगाराचा गंभीर प्रश्न, मुली, महिलांवरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण, बेपत्ता झालेल्या  महिलांचा अजूनही शोध नाही. याचा राज्यातही समान अनिष्ट परीणाम जाणवत आहे.

    भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

    या विवीध कारणांमुळे देश व राज्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. आता होऊ घातलेली महाराष्ट्राची निवडणूक हि देशाला नवी दिशा देणारी असुन मनुस्मृतीच्या विळख्यातून देश वाचवायचा असेल तर मनुस्मृती विरूध्द सुरु असलेल्या संविधान बचावच्या लढाईत सहभागी व्हा असे आव्हान राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.ते सावली तालुक्यांत कार्यकर्ता संवाद बैठकीत मार्गदर्शनक म्हणून बोलत होते. Battle of the Constitution

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  सावली तालुक्यातील सिर्सी, साखरी, हरंबा, लोंढोली, कडोली, डोनाळा, उपरी, कापसी, नीलसनी, व्याहाड (बूज) वाघोली (बुटी) गाव भेटीतून काँग्रेस तसेच महाविकास आघाडी व सर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला.

    यावेळी मार्गदर्शनपर बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपा तथा महायुतीने प्रत्येकाला १५ लाख देऊं अशी खोटी आमिषे दाखवून केंद्रात सरकार स्थापन केली. यानंतर स्वाय्यत संस्थांना हाताशी धरून पक्ष फोडीसाठी कट कारस्थान रचून महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम केले. पक्ष फोडले, लोकांची घरे फोडली.शिवरायांचा पुतळा निर्मितीत कमिशन खोरी करून त्यांचा अपमान केला. Battle of the Constitution

    खोटी आश्वासने पोकळ योजना, जाती धर्मामध्ये विभागून सत्ता प्राप्तीसाठी वाट्टेल ते प्रकार महायुती कडून सुरु आहे. मात्र देशांतील व महाराष्ट्रातील सुज्ञ जनता यांनी महायुतीला नाकारून लोकसभेत संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली. हेच महापापी सरकार आता 15 लाखावरुन 1500 वर आले असून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून लाडकी बहीण योजना घेऊन मिरवत आहे. अशी टीका देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर केली.

    संकट अजूनही टळलेले नाही. येत्या 20 नोव्हेंबर रोजी देशातील व राज्यातील बहुजनांना गुलाम बनवू पाहणाऱ्या,महाराष्ट्राचे वैभव व स्वाभिमान गुजरात चरणी गहाण ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तापीपासू महायुतीला आपल्या मतदानातून धडा शिकवून त्यांची जागा दाखवा असे आवाहनही त्यांनी उपस्थित त्यांना केले.

    आयोजित बैठकीस सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने, राकेश गड्डमवार, विजय कोरेवार, किशोर गड्डमवार, कृष्णा राऊत,किशोर कारडे, संजय मेश्राम, अविनाश भुरसे, किशोर घोटेकर,तथा महाविकास आघाडी पदाधिकारी, सर्व ग्राम काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Star campaigner : भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

    Star campaigner चंद्रपूर विधानसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असून सकाळी 10 वाजता दादमहल येथील कोहिनूर तलाव क्रीडांगण येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

    सुधीर मुनगंटीवार कांग्रेसवर कडाडले

    Star campaigner विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळ येताच सर्व पक्ष कामाला लागले असून सर्व उमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. यात भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही त्यांनी छोट्या बैठका,  नागरिकांशी संवाद अशा माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

    मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासासाठी असलेले त्यांचे व्हिजन ते या बैठकींच्या माध्यमातून सांगत आहेत. Star campaigner

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रामाणिक राजकारणावर रडीचा डाव

    दरम्यान, आता भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ उद्या शनिवारी येत असून, दादमहल येथील कोहिनूर तलाव मैदानात सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

    यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

  • Today Chhath Puja : छट पूजा कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांची उपस्थिती

    Chhath Puja प्रकृतीचे महत्त्व पटवून देणार्या छट पूजा उत्सवांसाठी घाटांचा विकास करण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार, छट पूजेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये किशोर जोरगेवार यांची हजेरी

    Chhath Puja छट पूजा ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, आपली श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाचे बळ एकत्र येण्याचा पर्व आहे. आपल्या छट पूजेचा उत्सव हा सूर्यदेवाच्या आराधनेचा पवित्र सोहळा असून, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात प्रकाश, ऊर्जा, आणि समृद्धी नांदावी, अशी कामना करत प्रकृतीचे महत्त्व पटवून देणाऱ्या छट पूजेसाठी चंद्रपूरातील घाटांचा विकास करण्याचा आपला संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    कांग्रेसवर कडाडले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार


    दर वर्षी प्रमाणे यंदा ही चंद्रपूरात छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रामाळा तलाव, महाकाली काॅलरी, लालपेठ शिव मंदिर, दुर्गापूर येथे छट पूजेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून पूजा अर्चना केली. Chhath Puja


    यावेळी ते म्हणाले, “चंद्रपूरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. या शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज आपला पवित्र सण आहे. आपण नेहमीच या सनानिमित्त आपल्याकडून आलेल्या सूचनांची दखल घेतली आहे. घाट स्वच्छता आणि सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत.

    चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

    या समाजाचे आपल्यावर विशेष प्रेम राहिले आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात सर्व समाजाला समान न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य राहील आणि पुढेही आपल्या हाकेला साथ मिळणार,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.


    छट पूजेचा पवित्र पर्व आपल्याला संयम, श्रद्धा आणि सहनशीलतेची शिकवण देतो. सूर्यदेवाच्या उपासनेतून मिळणारी ऊर्जा केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही प्रेरणा देते. छट पूजा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे, आणि मातृशक्तीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे.

    माताभगिनींनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी घेतलेले हे तप, हे व्रत यामध्ये एक समर्पण भाव असतो. त्यांचे धैर्य आणि श्रद्धा हे समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • Exclusive Sudhir Mungantiwar : कांग्रेसवर कडाडले सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    Sudhir Mungantiwar संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.

    चंद्रपुरात कुख्यात गुन्हेगारांची दहशत, पोलिसांनी केले स्थानबद्ध

    एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. Sudhir mungantiwar

    काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी
    काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केटलीने वाढविले टेन्शन

    गरिबी नव्हे गरीब हटले
    काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

  • pravin kakade : प्रवीण काकडे यांच्या उपस्थितीत असंख्य युवकांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    pravin kakade महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रचाराला सुरुवात झाली आहे.

    pravin kakade वरोरा विधानसभा क्षेत्राला महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारावर बंडखोरीचे ग्रहण लागले असले तरी वरोरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

    प्रामाणिक राजकारणाला विरोधक घाबरले

    महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून प्रचारादरम्यान आज दि. 07 नोव्हेंबर 2024 रोजी असंख्य युवकांनी कॉग्रेस पक्षावर तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रविण काकडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला.

    यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रविण काकडे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा धर्म निरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. कुठल्याही कठीण प्रसंगी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

    चंद्रपुरातील अट्टल गुन्हेगाराला केले स्थानबद्ध

    यावेळी मुकेश चांदेकर, दिपक चव्हाण, कपिल राऊत, मोसिन शेख यांसह अनेक युवकांनी प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षात नविन ऊर्जा संचारणार आहे.