Pm Modi Rally : चंद्रपूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांची सभा आणि मार्गात झाला बदल

Pm Modi Rally पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी चिमुर येथे आयोजित सभेनिमित्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

Pm Modi Rally 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत भिसी ते पिंपळनेरीपर्यंत व जांभुळघाट ते आर.टी.एम कॉलेज, चिमुरपर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहनांना चिमुर जाण्यासाठी आर.टी.एम कॉलेज-नेरी रोड मार्गे चिमुर बायपास मार्गे चिमुर शहरात जाता येईल. त्याचप्रमाणे नेरी ते आर.टी.एम कॉलेज चिमुर पर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहने नेरी-चिमुर बायपास मार्गाने चिमुर शहरात जातील व बायपास मार्गेच बाहेर पडतील.

डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या विजयासाठी 40 संघटनांची महत्वाची बैठक

त्याचप्रमाणे हजारे पेट्रोलपंप ते आर.टी.एम कॉलेज पर्यंत, हजारे पेट्रोलपंप ते संविधान चौक चिमुर वडाळा पैकु पर्यंत व हजारे पेट्रोलपंप ते नेहरू चौक चिमुर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. तसेच वरोराकडून चिमुर शहरात जाण्यासाठी हलक्या वाहनांना नेहरू चौक या मार्गाचा अवलंब करता येईल. Pm Modi Rally

या सर्व मार्गांवर सभेकरीता येणाऱ्या वाहनांना प्रवेश राहणार असून आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

या कालावधीत अवजड वाहतुकदारांना पुढील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

1. भिसी ते चिमुर-वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 2.जांभुळघाट ते चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 3.नेरी वरून चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर-भिसीला जाण्यासाठी जाण्यासाठी जांभुळघाट भिसी- कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 4.वरोरा कडुन भिसी-जांभुळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगांव-कन्हाळगांव या मार्गाचा अवलंब करावा. Pm Modi Rally

गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकदारांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.

ड्रोन उडविण्यास बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे दौरा असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखणे तसेच अवकाशीय उपकरणाद्वारे नियोजित संभाव्य हल्ल्याची शक्यता रोखण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  विना परवाना व बेकायदेशीर रित्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे. Pm Modi Rally

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 च्या तरतुदीन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  12 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 00.01 वाजतापासून 12 नोव्हेंबरच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशिररित्या  ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सही व शिक्यानिशी  सदर आदेश पारीत करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *