Blog

  • Dr Kalpana Gulwade : डॉ. कल्पना गुलवाडे यांचा सन्मान

    Dr Kalpana Gulwade इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या “बेस्ट सेक्रेटरी” म्हणजेच उत्कृष्ट सचिव या प्रतिष्ठित पुरस्काराने चंद्रपूरच्या डॉ. कल्पना गुलवाडे यांचा गौरव करण्यात आला.

    पोस्टल बॅलेट मुळे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित

    Dr Kalpana Gulwade डॉ. कल्पना गुलवाडे या अतिशय होतकरू आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

    IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि सचिव डॉ. अनिल आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ. कल्पना गुलवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    या पुरस्कार सोहळ्यात डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष, तसेच आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    हे आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नवे आमदार

    या यशस्वी कार्यप्रदर्शनाबद्दल डॉ. कल्पना गुलवाडे यांचे डॉ. संजय घाटे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. कीर्ती साने, डॉ. अपर्णा देवळीकर, डॉ. मनीषा घाटे आणि डॉ. अप्रतिम दीक्षित यांनी अभिनंदन केले.

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या सन्मानाने वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

  • Trending Now Postal ballot : धक्कादायक, हे कर्मचारी पोस्टल बॅलेटमुळे मतदानापासून वंचित

    Postal ballot चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २० रोजी पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का देखील मोठ्या प्रमाणात वाढला.

    Postal ballot यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मात्र, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या राज्‍यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या चर्चेत हा आमदार

    या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे केली आहे. Postal ballot

    विधानसभा निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेटसाठी त्यांच्याकडून फॉर्म नंबर १२ भरून घेण्यात आला होता.

    त्यासोबत मतदान कार्डची झेरॉक्ससुद्धा घेण्यात आली होती. परंतु, फॉर्म नंबर १२ भरूनही राज्‍यातील निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बी.एल.ओ. यांना अद्यापही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने राज्‍यातील अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहे. Postal ballot

    “निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यांना पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांचा हक्क नाकारला गेला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

    काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी आमदार अडबाले यांच्याकडे व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत ते स्वतः योगदान देत असतानाही त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला.

    अनेकांनी वेळेत अर्ज सादर करूनही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. यावर आमदार अडबाले यांनी या तक्रारींची दखल घेऊन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्‍याचा आरोप केला आहे.

    त्‍यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  • chandrapur vidhan sabha : आमदार कोण? नागरिकांच्या चर्चेतला आमदार कोण?

    chandrapur vidhan sabha 23 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार कोण हे निकालातून स्पष्ट होणार असून तत्पूर्वी विधानसभा क्षेत्रात कोण जिंकणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

    chandrapur vidhan sabha 20 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी मतदान पार पडलं, 16 उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन मध्ये बंद आहे, वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभेत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

    वर्ष 2019 मध्ये ना कांग्रेस चालली ना भाजप अपक्ष उमेदवाराची या क्षेत्रात लाट चालली आणि तब्बल 72 हजार मते घेत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला. chandrapur vidhan sabha

    यंदा चित्र काही वेगळे आहे, कांग्रेस पक्षातून प्रवीण पडवेकर हे निवडणुकीच्या रिंगणात जोरगेवार यांच्या पुढे होते, अपक्ष म्हणून आमदार झालेले जोरगेवार यांनी वर्ष 2024 मध्ये भाजप पक्षात प्रवेश करीत निवडणूक लढवली. chandrapur vidhan sabha

    यंदा विधानसभा निवडणुकीत अनेक समीकरणे बदलली होती, मागच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली, भाजपचे नाना श्यामकुळे – 44 हजार 909, वंचित बहुजन आघाडी अनिरुद्ध वनकर – 15 हजार 403 तर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 14 हजार 284 मतांवर समाधान मानावे लागले होते.

    चंद्रपूर भाजपात वातावरण टाईट, बॅनर वरून सुरू झाला वाद

    यंदा कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत विधानसभा क्षेत्रात बघायला मिळाली, भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांचे अनेक नागरिकांसोबत चांगले संबंध या निवडणुकीत कामी आले, काही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी यांनी आमच्या पक्षाला नको अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे प्रकार अनेक ठिकाणी घडले. chandrapur vidhan sabha

    कांग्रेस पक्षात सुद्धा हीच परिस्थिती मतदान प्रक्रियेत बघायला मिळाली, विशेष म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी 2 उमेदवार निवडणुकीत उभे राहिले. मतदान पार पडले, आता जिंकून कोण येणार याबाबत चर्चा रंगल्या आहे.

    पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती, ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा पेन्शन मिळणार नाही

    शहरी भागात किशोर जोरगेवार यांचे नाव आघाडीवर असून ग्रामीण भागात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी चर्चा आहे, काही नागरिकांनी तर उमेदवाराला किती मते मिळणार याचा थेट आकडाचं सांगितला.

    चर्चे प्रमाणे किशोर जोरगेवार यांना 80 हजार तर पडवेकर यांना 50 ते 55 हजार मते मिळणार आहे, तर काही नागरिक कांग्रेसचे पडवेकर नवीन आमदार म्हणून निवडून येणार अशी चर्चा रंगलेली आहे.

    अनेक ठिकाणी नागरिक सदर मतांच्या आकड्यांची गोळा बेरीज करताना दिसले. मात्र याबाबत अचूक निकाल 23 नोव्हेंबर रोजी नागरिकांपुढे येणार आहे.

  • important information pension holders : पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती

    pension holders चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे.

    pension holders सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे.

    चंद्रपुरात भाजपच्या बॅनर वरून वाद

    जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल.  तसेच जे निवृत्ती वेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. pension holders

     असा सादर करता येईल हयातीचा दाखला : आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा.

    1. https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2. GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3 तुमचा आधार क्रमांक टाका. 4. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा.

    तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. हयात दाखल्यावर  बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 

    हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024 पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासुनचे निवृत्तीवेतन बॅंकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

  • bjp banner controversy : भाजपच्या बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांची ठसठशीत एन्ट्री

    bjp banner controversy भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमध्ये भाजप नेत्यांचे फोटो होते. मात्र, त्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नसल्याने भाजपच्याच एका गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला.

    bjp banner controversy त्यानंतर हे बॅनर काढून, नवीन बॅनर लावण्यात आले, ज्यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो टाकण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांची ठसठशीत एन्ट्री झाल्याची चर्चा चंद्रपुरात सुरू झाली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात कुणाची आघाडी?

    भाजप नेते देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आझाद बाग मार्गावर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राऊल पावडे यांच्या वतीने लावले होते. त्यामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानसभा प्रमुख प्रमोद कळू, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचे फोटो होते.

    सकाळच्या सुमारास हे बॅनर दिसताच भाजपच्या एका वर्तुळात खळबळ माजली. “सदर बॅनरवर आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो नाही,” अशा चर्चा शहरात रंगू लागल्या. त्यामुळे हे बॅनर तात्काळ काढण्यात आले आणि आमदार किशोर जोरगेवार यांचा फोटो असलेले नवे बॅनर त्याच ठिकाणी लावण्यात आले.

    या प्रकारामुळे चंद्रपूरच्या भाजप राजकारणात आमदार किशोर जोरगेवार यांना सन्मानजनक स्थान द्यावेच लागणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी “ग्रँड एन्ट्री” केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • Polling Center Restrictions : मतमोजणी केंद्र परिसरात निर्बंध लागू

    Polling Center Restrictions येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    Polling Center Restrictions सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी निर्गमित केले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत कुणाची आघाडी?

    त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परीसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. Polling Center Restrictions

    1. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने /आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील.
    2. 2. मतमेाजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून, मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकरी व कर्मचारी यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.
    3. भारत निवडणुक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधीत असेल. मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 परीसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल, परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. Polling Center Restrictions
    4. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सभोवताल 1 कि.मी.चे क्षेत्रात/ परीसरात ड्रोन वा ड्रोन सदृश्य वस्तु उडविण्यास 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

    या ठिकाणी होणार मतमोजणी : 70- राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, 73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, 74- चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

  • Latest Total voting percentage : मतदानाची टक्केवारी वाढली, चंद्रपूर जिल्ह्यात कुणाची आघाडी?

    Total voting percentage चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, ग्रामीण भागातील जनतेने यंदा लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येत सहभाग घेतला पण शहरी भागातील जनता निरुत्साही निघाली.

    Total voting percentage जिल्ह्यात एकूण 71.27 टक्के मतदान झाले, असले तरी विधानसभा क्षेत्रात बाजी कोण मारणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नागरिक गल्ली बोळात कोण जिंकून येणार याची चर्चा करताना दिसून येत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड

    वर्ष 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.42 टक्के, बल्लारपूर – 62.53, राजुरा – 71.02, ब्रह्मपुरी – 71.53, चिमूर – 75.01 तर वरोरा विधानसभा मतदारसंघात एकूण 62.68 टक्के मतदान झाले होते. Total voting percentage

    वर्ष 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 57.98 (6.50 टक्के वाढ), ब्रह्मपुरी – 80.54 (9 टक्के), बल्लारपूर – 69.70 (7 टक्के), चिमूर – 81.75 (6.74 टक्के), राजुरा 72.71 (1.50 टक्के), वरोरा मतदारसंघात 69.48 (7 टक्के) मतदानात वाढ झाली आहे.

    ग्रामीण भागातील नागरिकांनी भरघोस मतदान केले तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात कमी प्रमाणात सहभागी झाले.

    विजय कुणाचा?

    राजुरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप यांचे नाव आघाडीवर तर बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, चिमूर – सतीश वारजूरकर, वरोरा – अपक्ष/भाजप, ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर आहे.

  • electronic voting machine : संविधान बचाव चा नारा देत महिलेचा ईव्हीएम मशीनवर धावा

    electronic voting machine चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिवसभरात काही ठिकाणी कांग्रेस-भाजप कार्यकर्ते यांचा वाद बघायला मिळाला.

    electronic voting machine वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच आदळली, या घटनेमुळे उपस्थित मतदान केंद्र अधिकारी यांची तारांबळ उडाली.

    ग्रामीण भागातील जनता हुशार, शहरी भागातील जनता मतदानात निरुत्साही

    सदर कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले, विशेष म्हणजे संविधान बचाव, ईव्हीएम मशीन हटाव असा नारा त्या महिलेने यावेळी दिला.

    वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान टाकण्यासाठी गेलेल्या एका राजकीय पक्षाची महिलेने संविधान बचाव चा नारा देत थेट ईव्हीएम मशीनवर धावा बोलला. electronic voting machine


    लता मंसराम शिंगाडे वय ६५ वर्षे राहणार सुरक्षा नगर भद्रावती असे त्या महिलेचे नाव आह . ही महिला बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे. ही महिला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बूथ क्रमांक ३०९ गेली असता तिथे मतदान करते वेळी ईव्हीएम मशीन उचलून जोराने त्या टेबलावर आदळली आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव अशी नारेबाजी करत तिने बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा घोषणा करत होती.

    ही घटना होताच येथील मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले या घटनेने येथे अर्धा तास मतदान केंद्राची प्रक्रिया थांबली होती पोलिसांनी लता शिंगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

  • Latest polling live update : सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 64.48 टक्के मतदान, सर्वात कमी मतदान चंद्रपुरात

    polling live update महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.

    polling live update विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते 3 वाजेनंतर नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केल्याने टक्केवारीत वाढ झाली.

    जोरगेवार यांना मिळाला अम्मा चा आशीर्वाद

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 63.44 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 72.97 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 53.57 टक्के, चिमूर विधानसभा – 74.83 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 65.59 टक्के, वरोरा विधानसभा – 60.21 टक्के असे एकूण 64.48 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. polling live update

    शेवटचा 1 तास शिल्लक असल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 94 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार असून 23 नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

  • Polling day : चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.87 टक्के मतदान

    polling day महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत झाले असून यामध्ये सर्वाधिक चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 57.79 टक्के मतदान झाले आहे.

    60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचार साहित्य जप्त

    polling day विधानसभा क्षेत्रात सकाळपासून प्रमुख उमेदवारांनी मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला, संथगतीने सुरू झालेले मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत संथगतीने सुरूच होते.

    एकूण मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत

    Polling day बल्लारपूर विधानसभा क्षेत्र – 48.81 टक्के, ब्रह्मपुरी विधानसभा – 56.34 टक्के, चंद्रपूर विधानसभा – 41.44 टक्के, चिमूर विधानसभा – 57.79 टक्के, राजुरा विधानसभा क्षेत्र – 51.52 टक्के, वरोरा विधानसभा – 46.09 टक्के असे एकूण 49.87 टक्के सरासरी मतदानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे.

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावीत राज्यात मजबूत सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला. Polling day

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केंद्रावर उपस्थित राहत मतदानाचा हक्क बजावला, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज सह कुटुंब ब्रम्हपुरी येथील देलनवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. Polling day

    लोकशाही व संविधान रक्षणाकरीता आपण सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.
    यावेळी त्यांच्या पत्नी किरणताई वडेट्टीवार, मुली रोशनी वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार, देवयानी वडेट्टीवार उपस्थीत होत्या.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुलगा मानस धानोरकर सोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

    आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आज सकाळी चंद्रपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील केंद्रावर जाऊन सपत्नीक मतदान केले.

    या उत्सवात आपणही सहभागी होऊन मतदान अवश्य करावे, असे आवाहन आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी यावेळी केले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी स्व. अम्माचा आर्शिवाद घेत सकाळी १० वाजता पटेल हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जात सह परिवार मतदान केले. यावेळी त्यांच्या सोबत कल्याणी किशोर जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजना जोरगेवार, प्रसाद जोरगेवार, कोमल जोरगेवार, यांची उपस्थिती होती.