Blog

  • kishor jorgewar latest news : त्या माय माऊलीने दिला आशीर्वाद

    kishor jorgewar latest news आमदार किशोर जोरगेवार मतदार करण्यासाठी पटेल हायस्कुल येथील मतदान केंद्रावर गेले असता मतदान करुन बाहेर निघताच एका माय माउलीने आवाज देत आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला. आज तुझ्या रुपाने अम्माने आर्शिवाद दिला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    60 लाखांची रोकड, भाजपचे प्रचारसाहित्य चंद्रपुरात नेमकं चाललंय तरी काय?

    kishor jorgewar latest news आज विधानसभा निवडणकींसाठी राज्यभरात मतदान होत आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी गिरणार चौकातील पटेल हायस्कुल येथे सहपरिवार मतदान केले.

    मतदान करुन ते बाहेर पडताच एका वयोवृध्द महिलेने मागुन जोरगेवार यांना हाक मारली आमदार किशोर जोरगेवार यांनीही थांबुन या माय माउलीची विचारपुस केली. यावेळी या मातेने आमदार किशोर जोरगेवार यांना आर्शिवाद दिला.


    दरवर्षी मतदान करतांना अम्मा सोबत रहायची, यंदा ती नाही. मात्र मतदान करतांना ती स्मरणात होती. अचाणक आज या मायमाउलीच्या स्नेहात अम्माचे दर्शन झाले. जनु अम्मानेच मला आर्शिवाद दिला असल्याचे या प्रसंगा नंतर आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • Cash seized : 60 लाखांची रोकड व भाजपचे प्रचारसाहित्य चंद्रपुरात चाललंय तरी काय?

    Cash seized चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारतोफा थंडावल्यानंतर भाजप व कांग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, त्यानंतर प्रमुख उमेदवारांवर गुन्हेही दाखल झाले मात्र आता तर 60 लाखांची रोकड व प्रचार साहित्य जप्त केल्याने निवडणुकीत चालणारा घोडेबाजार सुद्धा उघडकीस आला आहे.

    Cash seized राजुरा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६० लाखांची रोकड लपवून ठेवली होती. अशी तक्रार राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाने केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.

    राजकीय हाणामारीत उमेदवारांवर गुन्हे दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला – पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. Cash seized

    आयोगाची सतर्कता आणि निवडणुकीतील गैरप्रकार उघड
    निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    या कारवाईत रोकड व भाजपचे प्रचार साहित्य बुथ निहाय यादी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अद्यापही कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

    या घटनेमुळे राजुरा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • violation code of conduct : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

    violation code of conduct महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. त्यानंतरचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    violation code of conduct या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याबाबत त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही.

    बल्लारपूर राजकीय राडा, दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

    त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

    जिल्हा प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

  • cast your vote : खासदार धानोरकर यांनी मतदारांना दिला हा खास संदेश

    cast your vote लोकशाहीच्या पर्वणीचा सुंदर दिवस म्हणजे मतदानाचा दिवस. आज आपण सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. 

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर गुन्हे दाखल

    Cast your vote आपल्या क्षेत्रातील प्रश्न, क्षेत्रांचा सर्वांगीण विकास, त्यासोबतच संविधानाने दिलेल्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करण्यासाठी आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं, तसेच नव मतदारांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भविष्याचा वेध घेण्यासाठी आपलं मतदान अत्यंत आवश्यक आहे.

    यासाठी सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा टक्का वाढवावा व लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

    मतदानासाठी येणाऱ्या अडचणीं करिता प्रशासनाची मदत घेऊन मतदान यादीतील आपले नाव तपासून मतदान करावे असे देखील आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

  • Political crimes : अखेर गुन्हे दाखल

    Political crimes मुल पोलिस स्टेशन हद्दितील मौजा कोसंबी गावात 18 नोव्हेंबर रोजी दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.

    Political crimes त्या अनुषंगाने कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी याबाबतीत अफवा न पसरविण्याचे तसेच निवडणुक संबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

    18 नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रकरणात दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदविली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सध्यां गुरूनुले यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपुर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. Political crimes

    यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषसिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मुनगंटीवार चर्चा करीत असलेल्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून मोबईलद्वारे व्हिडीओ शुटींग केली. तसेच संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून भांडण केले असल्याची तक्रार नोंदविली.

    मूल विधानसभा क्षेत्रात राजकीय राडा

    त्यावरून मुल पोलिस स्टेशन येथे कलम 296,189(2),191(2),190 अन्वये संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम,विजय चिमडयालवार व इतर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. Political crimes

    तसेच दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे बल्लारशा विधानसभा क्षेत्रातील मौजा कोसंबी येथे सभा घेत असल्याचे माहिती झाल्याने, तक्रारदार कांग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे वाहनचालक राजू माणिकराव गावतुरे हे मौजा कोसंबी येथे उमेदवार व कार्यकर्त्यांसोबत गेले असता सदर सभा ठिकाणी मोबाईलने व्हिडीओ चित्रीत करीत असतांना, सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रीकरण का करीत आहे?

    यावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने पोलिस स्टेशन मुल येथे सुधिर मुनगंटीवार यांच्यावर कलम 115(2), 351 (2),351(3) अन्वये (एनसी) गुन्हा दाखल केला आहे.

    सदर घटनेबाबत दोन्ही गटांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. बल्लारशा विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे.

    याबाबत कुठल्याही पक्षाने किंवा नागरिकांनी अफवा न पसरविण्याचे आणि निवडणूकसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास कायदा हातात न घेता संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कार्यालयाने कळविले आहे.

  • kishor jorgewar pathimba : या पाठिंब्यामुळे जोरगेवार यांची ताकद वाढली

    kishor jorgewar pathimba क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीने महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

    kishor jorgewar pathimba यावेळी क्रांतीवीर शहीद पुलेश्वर शेडमाके आदिवासी समितीच्या अध्यक्ष शशिकला उईके, उपाध्यक्ष राधाबाई शिडाम, सचिव माला पेंदाम, कोषाध्यक्ष श्याम गेडाम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तुफान हाणामारी


    आमदार किशोर जोरगेवार यांना विविध सामाजिक संघटना आणि समाजांचा जाहीर पाठिंबा मिळत असून, या पाठिंब्यामुळे त्यांची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे.

    यापूर्वी सोनार हितकारिणी सभा, व्हॉइस ऑफ छत्रपती टायगर संस्था, एरंडेल तेली समाज, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा व भ्रष्टाचार निवारण संघटन, महाराष्ट्र ए.टी. वर्कर्स युनियन, जय विदर्भ संघटना, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, बहुजन युथ क्रांती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी आमदार किशोर जोरगेवार यांना समर्थन दिले आहे. kishor jorgewar pathimba


    “आपल्या सर्वांच्या समर्थनाने आमची ताकद वाढली आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हा आपला संकल्प आहे. या विकासाच्या पर्वात आपणही सहभागी होत आहात. समर्थन दिले आहे म्हणजे आपण विकासालाच पाठिंबा दिला आहे.

    आपल्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाला आमचे प्राधान्य असेल,” असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • Exclusive political rada : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रात्र झाली वैऱ्याची

    political rada 18 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या मात्र मूल तालुक्यातील कोसंबी गावात 19 नोव्हेंबर ला मध्यरात्री भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार गावकऱ्यांसोबत कॉर्नर सभा घेत असल्याची माहिती कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांना मिळाली.

    प्रतिभा धानोरकर यांच्यात दिवंगत खासदार बाळूभाऊ ची झलक

    political rada रावत यांनी समर्थकासह कोसंबी गावातील सभास्थळी पोहचले, यावेळी कांग्रेस भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, प्रचार संपला नंतर गावात सभा घेणं हे निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात आहे असे रावत यावेळी म्हणाले मात्र भाजप उमेदवार मुनगंटीवार म्हणाले की मी या क्षेत्राचा आमदार आहो गावातील समस्येबाबत बैठक घेत आहो, माझी बैठक संपली की आपण सुद्धा गावकऱ्यांशी चर्चा करा असे सांगितले.

    100 सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी दिली नोटीस


    हा आचारसंहितेचा भंग आहे म्हणत रावत यांनी सभा उधळून लावली, यावेळी रावत व मुनगंटीवार यांच्यात बाचाबाची झाली, काही कार्यकर्ते एकमेकांना सभेत भिडले.
    काही क्षणात पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. political rada


    रात्री 1 उशिरापर्यंत कांग्रेस कार्यकर्त्यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीत भाजप उमेदवार भाजप कार्यकर्ते व उमेदवार मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, कांग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

    अपक्ष उमेदवाराचे पारडं जड?

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध कांग्रेसचे संतोष रावत अशी लढत आहे मात्र ऐनवेळी कांग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार चांगलेच अडचणीत आले असून अपक्ष उमेदवार दोघांनाही पाणी पाजनार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  • New awards Take a selfie : सेल्फी काढा आणि जिंका आकर्षक बक्षिसे

    Take a selfie लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे.

    Take a selfie जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे. यात एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षीसे तुम्ही जिंकू शकता, त्याकरीता बस, मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे. 

    प्रतिभा धानोरकर मध्ये दिसली दिवंगत खासदार बाळूभाऊ ची झलक

    20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. यात मतदारांनो तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणा-या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आहे 2.15 लाखांची  रॉयल एनफिल्ड बुलेट (प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आणि विमा खर्च समाविष्ट). सदर बाईक सध्या विसापूर येथील अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षिसांमध्ये 15 ग्राम सोन्याचे नाणे, आणि एस-23, फाईव्ह जी सॅमसंग गॅलक्सी फोनचा समावेश आाहे. Take a selfie

    अशी आहे पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक. 2) 20 नोव्हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक.

    सहभागी होण्यासाठी : इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या Google फॉर्मवर (https://forms.gle/L9hkapkUuR3c46jBA) अपलोड करावा. दिलेला QR कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

  • Exclusive Political criticism : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात दिसली दिवंगत बाळूभाऊ ची झलक

    Political criticism विधानसभा निवणूकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांसह अपक्ष उमेदवारांचा चांगलाच समाचार घेतला. वंचित च्या उमेदवारावर तोफ डागत त्यांनी वारसदारी दाखवणाऱ्या उमेदवारावर आपले मत व्यक्त केले.

    Political criticism संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या वरोरा विधानसभा क्षेत्रात वंचित कडून दिवंगत खा. बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर निवडणूकीला रिंगणात आहेत. खा. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथे झालेल्या जाहिर सभेत वारसदारी सांगणाऱ्या वंचित च्या उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला.

    १०० गुन्हेगारांबाबत चंद्रपूर पोलिसांनी घेतला हा निर्णय

    वारसदार असते तर संपुर्ण माझ्या कुटूंबाची जबाबदारी स्वीकारली असती, वारसदार असते तर माझ्या दुखात माझ्या कुटुंबाला सावरले असते. आज सांगण्यात येत असलेली वारसदारी ही केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अपप्रचार करतांना आपण देखील आपल्या स्वतःहात डोकावून बघावं, त्यानंतरच दुसऱ्यांचा अपप्रचार करावा असे बोलून देखील अपक्ष उमेदवारांवर निशाना साधला. Political criticism

    प्रहार च्या उमेदवारांबद्दल बोलतांना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, हो मी त्यांना शब्द दिला होता परंतु कॉग्रेस पक्षात प्रवेश करा अशी अट त्यांच्या समोर ठेवली होती. आजच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भाषणातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची एक झलक जाहिर सभेतून बघायला मिळाली, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

    तर ४ कामे मी जास्त करणार

  • Bhagwan Birsa Munda : त्यापेक्षा 4 काम मी जास्त करणार – सुधीर मुनगंटीवार

    Bhagwan Birsa Munda समाजातील शोषित, वंचित आणि आदिवासींचा जगण्याचा संघर्ष दूर करण्याचा संकल्प भगवान क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी केला.

    Bhagwan Birsa Munda आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत भगवान बिरसा मुंडा संपुर्ण आयुष्य जगले. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांचा संकल्प मी निश्चितपणे पुढे नेईल आणि समाजातील उपेक्षितांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न करेन, असा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    मतदारांचा निर्धार….म्हणतात आम्हाला पुन्हा हवा किशोर जोरगेवार

    बल्लारपूर येथे भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान वीर बिरसा मुंडा यांनी लहान वयातच इंग्रजाच्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध लढा पुकारला. आमचा देश, आमचा अधिकार हा विचार त्यांनी मांडला. इंग्रजांना चले जाव म्हणत एल्गार केला. Bhagwan Birsa Munda

    आदिवासीचे शोषण करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, एक-एक आदिवासी हजार वाघांची ताकद ठेवतो, हे सांगण्याचे काम भगवान वीर बिरसा मुंडा यांनी केले. आदिवासी व इतर समाजासाठी वीर बिरसा मुंडा यांनी संघर्षाचा शंखनाद केला. आज त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करीत असताना भयमुक्त महाराष्ट्राचा संकल्प करायचा आहे.’

    ‘मी आदिवासी बांधवांसाठी अनेक कामे केलीत. शबरी आवास योजना शहरी भागासाठी लागू करण्याचा निर्णय केला. वनजमिनीचे पट्टे देण्याच्या कायद्यात बदल करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना शेतजमिनीचे केवळ पट्टेच नव्हे तर या भागामध्ये घर बांधकामासाठी पट्टे उपलब्ध करून देण्यात येईल. वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे पोस्ट तिकीट काढले. Bhagwan Birsa Munda

    या जिल्ह्यात मिशन ऑलिम्पिकसाठी 137 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित स्टेडियम उभारण्यात येत आहे. या स्टेडियमला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्याचा निर्णय केला आहे. स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय, समाज मंदिर, सभागृहाचे जिम, या परिसराचे सौंदर्यीकरण, भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आदी कामे पूर्णत्वास नेईल,’ असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

    आदिवासी समाजाचा एखादा आमदार आदिवासी समाजासाठी जेवढे काम करेल त्यापेक्षा चार कामे जास्तीच करेल, अशी ग्वाही देखील ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

    75 वर्षात काँग्रेसच्या राज्यामध्ये एकदाही आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकली नाही. विश्वगौरव नरेंद्रजी मोदीजी यांनी आदिवासी समाजातील सामान्य व्यक्तीला राष्ट्रपती करीत आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला. Bhagwan Birsa Munda

    बल्लारपूरमध्ये आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रपती महोदयांना निश्चितपणे निमंत्रीत करेन, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.