congress pravin kakde विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खा. इम्रान प्रतापगढी यांची तोफ वरोऱ्यात धडकली.
congress pravin kakde शेरो-शायरी च्या माध्यमातून त्यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील मैदानावर खा. इम्रान प्रतापगढी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी शायरींच्या माध्यमातून विरोधकांवर जारेदार टिकास्त्र सोडले. ‘‘नफरत के बाजार मे अपने इमान को जिंदा रखना’’ या शायरीतून महायुतीच्या चुकीच्या राजकारणाला बळी न पडता. एकजुट राहुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रविण काकडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. congress pravin kakde
मी एक महाराष्ट्राचा खासदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केला. आपण दिलेले प्रत्येक मत हे फक्त उमेदवारांसाठी नसून धर्मांध शक्तीला दुर करण्यासाठी असेल, असे मत देखील खा. इम्रान प्रतापगढ़ी यांनी व्यक्त केले.
‘‘अपने हौसलो को बुलंद रखना, मै जीत के जश्न को फिर लौटुंगा’’ असे म्हणत त्यांनी उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
Punha Jorgewar आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मागील 22 दिवसांपासून आपण विविध माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. झालेली विकासकामे आणि पुढे करावयाची कामे मतदारांना सांगितली.
Punha Jorgewar यावेळी सभा, बैठका, पदयात्रा यांना चंद्रपूरकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी विजयाचा विश्वास असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचाराची तोफ थंडावली आहे. मात्र, या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पूर्ण ताकद लावली आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुकूम, बाबुपेठ, जुनोना चौक या भागांमध्ये भव्य पदयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Punha Jorgewar
तत्पूर्वी त्यांनी आंबेडकर नगर येथील महा विहार येथे जात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाथेरो डॉ, सुमनवन्णो यांनी आ. जोरगेवार यांना आशीर्वाद दिला.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण अपक्ष असूनही चंद्रपूरसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. बाबुपेठ उड्डाणपुलासाठी साडे पाच कोटी रुपये मंजूर करून शेवटचे काम पूर्ण केले आहे. Punha Jorgewar
आज हा पूल नागरिकांसाठी सुरू झाला आहे. वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धानोरा बॅरेजचे कामही लवकर सुरू होणार आहे.
आपण 11 अभ्यासिकांचा संकल्प केला होता, मात्र आता 11 पेक्षा जास्त अभ्यासिकांचे काम मतदारसंघात सुरू आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्या कामांचे भूमिपूजनही पार पडले आहे. गावांमध्ये पांदण रस्ते, सामाजिक सभागृह तयार केले आहेत. घुग्घुस ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर केल्याने या शहराच्या विकासाला गती मिळाली आहे. Punha Jorgewar
आपण विकासकामांसह सामाजिक उपक्रमांतूनही नागरिकांच्या सतत संपर्कात राहिलो आहोत. चंद्रपूरची आराध्य देवी माता महाकालीची महती महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून देशभर पोहोचवली आहे.
अम्मा का टिफिन अविरत सुरू राहणार
आज आपल्यात अम्मा नाही, मात्र तिच्या प्रेरणेने सुरू झालेला “अम्माचा का टिफिन” उपक्रम नेहमी सुरू राहील. या उपक्रमाद्वारे आपण 200 हून अधिक नागरिकांना घरपोच जेवणाचा टिफिन पोहोचवत आहोत. कार्यालयात कार्यरत सेतू केंद्राद्वारे अनेक नागरिकांचे शासकीय योजनांचे कागदपत्रे निशुल्क तयार करून देत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
बाबुपेठ येथील पदयात्रेदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नेताजी चौक येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
chandrapur city police चंद्रपूर विधानसभा निवडणूक प्रक्रिया दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 100 सराईत गुन्हेगारांना स्थानब्धतेचं नोटीस बजावले आहे.
chandrapur city police 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीतील 100 सराईत गुन्हेगारांना नोटीस बजावीत मतदान प्रक्रिया झाल्यावर घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
अवैध दारूविक्री करणारे व विविध गंभीर गुन्ह्यातील 100 रेकार्डवरिल १०० सराईत गुन्हेगार यांचेवर क. १६३(२) बि.एन.एस.एस. अन्वये मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधिक्षक कार्यालय चंद्रपुर येथे पुढील आदेश होणेस प्रस्ताव पाठविण्यात आले होते. chandrapur city police
निवडणूक काळात सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी वृत्ती तशीच राहू शकते अशी शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शहर पोलिसांनी 18 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सदर 100 गुन्हेगारांना स्थानब्धतेचे नोटीस बजावण्यात आले आहे.
Shakti Pradarshan प्रचार तोफा हळूहळू थंडावत असतानाच एक दिवसा अगोदर भव्य दिव्य असा रोड शो काढून डॉ. अभिलाषाताई गावतुरे ह्यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांच्या छातीत अक्षरशः धडकी भरवली आहे.
Shakti Pradarshan एकीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी पवन कल्याण सारख्या स्टार प्रचारकाला आणूनही त्यांना पाहिजे तशी गर्दी खेचता आली नाही तर दुसरीकडे डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांच्या रोड शो च्या माध्यमातून जनता स्वयं स्फूर्तीने रस्त्यावर उतरून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला त्यामुळे या रॅलीची एकच चर्चा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आहे.
ढोल ताश्याच्या गजर, आदिवासी नृत्य, व डॉली चायवाला हे रॅली चे विशेष आकर्षण ठरले. या रॅली ची सुरुवात वस्ती परिसरातील गांधी चौक येथून सुरवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे या रॅलीची सांगता झाशी राणी चौकामध्ये एक मोठ्या जाहीर सभेमध्ये करण्यात आली. Shakti Pradarshan
या सभेला सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रचारासाठी आलेले डॉली चायवाला, गोंडवानाचे गणपत नैताम, सामाजिक कार्यकर्ते रितेश बोरकर, आरपीआय गवई गटाचे धीरज वाळके, प्रकृती पाटील मॅडम, प्रियाताई झांबरे, कारव्याचे विनोद सीडाम, ताहीर भाई हुसेन व विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते.
record break sabha मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे योगदान आमच्या सारख्या समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक वाटावे असेच आहे.
record break sabha समाजाच्या मागासवर्गात जन्म घेतलेली एक व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्रीपद प्राप्त करते ही सामाजिक इतिहासातील अत्यंत क्रांतिकारक गोष्ट आहे. कर्मवीर कन्नमवार हे विदर्भाची शान आहेत.
चंद्रपूरकरांसाठी तर ते प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहे. भद्रावती येथील आयुध निर्माण सारखे मोठे प्रकल्प आणून हजारो लोकांना रोजगार पुरविणारे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील खरे विकास पुरुष हे दादासाहेब कन्नमवार आहेत.
लाखोंची प्रेरणा बनलेल्या अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना येथील तथाकथित विकासपुरुषाची जीभ घसरली. त्यांनी जाहीर सभेतून बोलतांना त्यांचा अपमान केला. दादासाहेब कन्नमवार पेक्षा ही स्वतःला मोठे समजणाऱ्या मंत्र्याला महाराष्ट्रातील जनता कदापी माफ करणार नाही. record break sabha
लोकसभेच्या वेळी असेच महिलांबद्दल अपमानजक व्यक्तव्य केल्याबद्दल त्यांचा दारून पराभव झाला होता. व आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी केले, त्या मारोडा येथील आपल्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलत होत्या.
आयोजित सभेत प्रथमच एका अपक्ष उमेदवारांच्या जाहीर सभेला रेकोर्डब्रेक गर्दी होती.
या सभेला प्रवीण गावातूरे,सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे,कवडुजी येणप्रेड्डीवार शेतकरी संघटना,उमाजी मंडलवार जेष्ठ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ, श्री. कोठारेजि तेली महासंघ, दीपक काका वाढई ,प्रा. नामदेव कोकोडे आदी.विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते. या सभेला मारोडा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
Baahubali of development बल्लारपूर – ज्या बल्लारपूरच्या सागवनाने अयोध्येतील राम मंदिराचा कोपरा न् कोपरा सुगंधीत झाला, त्या बल्लारपूरचा विकास बघून मी थक्क झालो. त्यामुळे ‘बाहुबली’ चित्रपटात ज्याप्रमाणे बाहुबलीने राजमाता शिवगामीची पावले थांबू दिली नाहीत, त्याचप्रमाणे तुम्ही देखील सुधीरभाऊंच्या नेतृत्वात विकासाचे पाऊल थांबू देऊ नका.
Baahubali of development बल्लारपूरच्या ‘पॉवरफुल्ल’ विकासासाठी सुधीरभाऊंना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि तेलगू सुपरस्टार पवन कल्याण यांनी केले.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ डब्ल्यूसीएल कॉलनी मैदानावर श्री. पवन कल्याण यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. पवन कल्याण यांचे भाषण सुरू असताना प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे बल्लारपूरकरांनी अभूतपूर्व अश्या सभेचा अनुभव घेतला. Baahubali of development
पवन कल्याण म्हणाले, ‘सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दृष्टीने बल्लारपूरचा प्रवास सर्वांगीण विकासाच्या दिशेने सुरू आहे. एसडीओ किंवा तहसील कार्यालय असो वा विमानतळासारखे बसस्थानकाचा निर्माण असो. येथील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे असो किंवा जातीपाती भेद न करता समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करणे असो. सुधीरभाऊंनी प्रत्येक क्षेत्रात काम केले. त्यामुळे त्यांनी केलेली कामे लक्षात ठेवा आणि येत्या २० नोव्हेंबरला कमळ चिन्हाची बटण दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.’ sudhir mungantiwar
सुधीरभाऊंनी चंद्रपूरला एसएनडीटी, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र मतदारसंघात आणून मोठे काम केले आहे. भारताला आर्थिक महासत्ता होण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी अश्याप्रकारच्या केंद्रांचे मोठे योगदान राहणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंनी अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, या शब्दांत पवन कल्याण यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या योगदानाचे कौतुक केले. Sudhir mungantiwar
तेलगूसह मराठीतही भाषण
पवन कल्याण यांनी तेलगूसह मराठीतही भाषण केले. सुरुवातीला त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र’ असा जयघोष केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींनाही त्यांनी मराठीतच अभिवादन केले. ‘ माझे मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मराठी बोलताना चुकलो तर मला क्षमा करा. पांडुरंगाच्या वारीची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्रात मला प्रचारवारीसाठी येता आले, याचा आनंद आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. Sudhir mungantiwar
पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार – ना. श्री. मुनगंटीवार
बल्लारपुरातील तेलगू बांधवांनी देशाची सेवा केली. तेलगू बांधवांच्या कल्याणासाठी मलाही तेलगू साहित्य अकादमीची स्थापना करता आले. मंदिर निर्माण करता आले. सामाजिक सभागृह उभारता आले. तेलगू बांधवांच्या संघटनेसाठी खूप काम केले आणि पुढेही करणार आहे. आता पवन कल्याण यांच्या नावाने बल्लारपुरात ‘कल्याण मंडपम्’ उभारणार आहे, अशी घोषणा ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी पवन कल्याण यांच्या आगमनाने व सभेत हजारों संख्येने उपस्थित तेलगू समाजाच्या आशीर्वादाने माझा विजय सुनिश्चित झाल्याची भावनाही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. Sudhir mungantiwar
बल्लारपूर विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध
बल्लारपूरसाठी तहसील कार्यालय, एसडीओ, ग्रामीण रुग्णालय उभारले. नगर परिषदेची इमारत बनवत आहे. बसस्टॅण्ड, सैनिक स्कुल, स्टेडियम, जलतरण केंद्र, नाट्य गृह,डिजीटल स्कुल बांधले. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरची निर्मिती केली. यापुढेही बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
Warora Voters विधानसभेतील प्रचार अंतिम टप्प्यात असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या योजना समजवुन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
Warora Voters महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील मतदारांची संवाद साधून ग्रामीण भागातील विकासासाठी निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले आहे.
मागील दहा वर्षाच्या काळात धानोरकर दांपत्यांनी वरोरा विधानसभेचा विकासाच्या माध्यमातून चेहरा बदलवीलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील विकासातील सातत्य व आणखी विकासात्मक योजना आणण्याकरिता आपण निवडून द्यावं असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांनी ग्रामीण भागातील प्रचारादरम्यान मतदारांना केले आहे.
आम्ही विकासावर मते मागतो अपप्रचार करून नाही असे मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. अपक्ष उमेदवारांना मत देणे म्हणजे भ्रष्टाचाराला चालना देणे असे देखील मत प्रचारांना दरम्यान त्यांनी व्यक्त केले. Congress candidate
येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांची संवादातून माझी नाळ जुळून राहील व विकास करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन याकरिता आपण मला मतदान करावं असं मत देखील प्रवीण काकडे यांनी व्यक्त केले. वरोरा तालुक्यातील खांबाडा, टेंभुर्डा, नागरी, या ठिकाणी प्रवीण काकडे यांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
Road show आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी रोड शोच्या माध्यमातून त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन चंद्रपूरकरांना केले.
Road show यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भाजप विधानसभा अध्यक्ष प्रमोद कडू, अजय जयसवाल, रघुवीर अहिर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
साडे तीन वाजता उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रॅलीला शहरातील बागला चौकातून सुरुवात झाली. यावेळी पावर स्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रोडच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी पवन कल्याण यांनी सर्वांना अभिवादन करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थनार्थ मत मागितले. Pawan kalyan
तत्पूर्वी, पवन कल्याण यांचे मोरवा विमानतळावर आगमन झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. Pawan kalyan
दुपारी दीड वाजता पवन कल्याणचे चंद्रपुरात आगमन
रोड शोमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बागला चौकातून सुरू झालेल्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह चंद्रपूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून रोड शो ममध्ये सहभाग घेतला तर महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी “अम्मा का टिफिन” आणि माता महाकाली मूर्ती देऊन पवन कल्याण यांचे स्वागत केले.
हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घूस येथे पदयात्रेतून प्रचार
घुग्घूस येथे काल आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार किशोर जोरगेवार यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी हंसराज अहिर यांनी केले. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी प्रचार केला जात आहे. पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आमदार किशोर जोरगेवार यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान सायंकाळी सात वाजता घुग्घूस शहरातील टिळक नगर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर दसरा मैदान, जे.जे. आयटीआय, वराडे हॉस्पिटल, जामा मस्जिद, घुग्घूस पोलीस स्टेशन, एस.सी.सी. रोड, मिरची मार्केट, फटाका कॉर्नर, पंचशील चौक मार्गे ही पदयात्रा नगर परिषदेत येथे पोहोचली.यावेळी घुग्घूस वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
nivadnuk padyatra घुग्घूस येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.
nivadnuk padyatra आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हाहन हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथील नागरिकांना केले. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आमदार किशोर जोरगेवार यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान, काल आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर यांनी घुग्घूस येथे पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घुग्घूसवासियांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. kishor jorgewar
सायंकाळी सात वाजता घुग्घूस शहरातील टिळक नगर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर दसरा मैदान, जे.जे. आयटीआय, वराडे हॉस्पिटल, जामा मस्जिद, घुग्घूस पोलीस स्टेशन, एस.सी.सी. रोड, मिरची मार्केट, फटाका कॉर्नर, पंचशील चौक मार्गे ही पदयात्रा नगर परिषदेच्या जलव विभागापर्यंत पोहोचली. यावेळी घुग्घूसवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Voting awareness एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर कॅम्पसच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आज मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.
Voting awareness या उपक्रमाची सुरुवात बल्लारपूर बसस्थानक येथे पथनाट्य सादरीकरणाने झाली. कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक राकेश कांबळे यांचे स्वागत केले.
सुमारे २०० नागरिकांनी पथनाट्य पाहून मतदानाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
विद्यार्थिनींनी शहीद भगतसिंह वॉर्डमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. सुमारे १००-१५० घरांमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले.
यादरम्यान नागरिकांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला. याशिवाय, नागरिकांना त्यांचे मत बजावण्याचे अधिकार आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. Sndt woman university
रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करताना सुमारे २५०-३०० लोकांनी पथनाट्य पाहिले. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी फक्त पथनाट्य पाहून प्रेरणा घेतली नाही, तर त्यांच्याकडून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. नागरिकांनी या प्रतिज्ञेमार्फत आपापले मतदानाचा हक्क न चुकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रम पोलिस निरीक्षक श्री. गाडे यांच्या देखरेखीखाली पार पडला. निवडणूक विभाग, तहसील कार्यालय बल्लारपूरचे श्री. सचिन उमरे आणि नीरज बेहेरे यांचाही या उपक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. Sndt woman university
संपूर्ण कार्यक्रम कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले.
पथनाट्याचे सादरीकरण सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले, तर कार्यक्रम अधिकारी खुशबू जोसेफ यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या अभियानात विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले. Sndt woman university
या अभियानाद्वारे नागरिकांना मतदानाची जबाबदारी समजावून सांगण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लोकशाही हक्काचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.