Blog

  • Chandrapur Forest Fire । चंद्रपुरात वणवा

    Chandrapur Forest Fire

    Chandrapur Forest Fire : चंद्रपूर मुल मार्गालगतच्या चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण लागल्याची घटना आज रविवारी साडेतीनच्या सुमारास समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केला असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन विकास महामंडळाचे यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या आगीत जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका आहे असे वर्तविण्यात येत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी


    चंद्रपूर हा उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मार्च महिन्यापासूनच तापमान चढायला लागते. सध्या स्थितीत चाळीसीच्या आसपास तापमान आहे. याचवेळी दरवर्षीच आगीच्या घटना समोर येतात. तासभरापूर्वीच चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग लागली आहे. FDCM forest fire

    चंद्रपूर ते मूल महामार्ग लगत असलेल्या लोहारा ते घंटाचौकी या भागात लागली आहे.आगीत खूप मोठ्या प्रमाणात जंगल जळत आहे. आगीने रौद्ररूप धारण केला आहे. आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणि आग विझवण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. कडक ऊन असल्यामुळे रस्त्याच्या कडेने आग धडकत आहे. forest fire Maharashtra

    ज्या भागामध्ये आग लागली आहे त्याच परिसरात सागाचा घनदाट जंगल आहे. आज रविवारी चंद्रपूरचा तापमान चाळीस वर्षाच्या वर गेला आहे. शिवाय पानगळ झाल्यामुळे जंगलात पालाचोळा जंगलात पडला असल्यामुळे आग भडकत आहे. आगीचा आगीचा विळखा वाढतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. वृत्त लिहीपर्यंत आग पूर्णतः विझलेली नव्हती.

  • Maharashtra Job Fair for Graduates | थेट मुलाखत, थेट नोकरी – 29 मार्चला भद्रावतीत संधीचे सोने करा

    Maharashtra Job Fair for Graduates

    Maharashtra Job Fair for Graduates : चंद्रपूर : कोळसा आणि सीमेंट उत्पादन, ऊर्जा निर्मिती यासाठी ख्यातीप्राप्त असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 29 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    चंद्रपुरातील घोडाझरी येथे पर्यटनाला गेलेल्या 5 युवकांचा मृत्यू

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. Govindrao Wanjari Foundation Jobs

    सदर रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 29 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

    संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल. या मेळाव्यात जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.

  • Sewer line road damage repair । सीवरेजमुळे खोदलेले रस्ते लवकरच होतील सुरळीत – 20 कोटींच्या निधीतून दुरुस्ती होणार सुरू

    Sewer line road damage repair

    Sewer line road damage repair : शहरातील सीवरेज लाईनच्या कामामुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर 20 कोटी रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले. City road repair after sewer work

    घोडाझरी तलावात पोहायला गेलेल्या ५ युवकांचा बुडून मृत्यू

              यावेळी मनपाचे शहर अभियंता विजय बोरिकर, शाखा अभियंता अविनाश भारती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत भट्टड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर शहर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, अमोल शेंडे, सलिम शेख, करण नायर, करणसिंग बैस, स्वप्निल पटकोटवार, सुमित बेले, चंद्रराज बातो आदींची उपस्थिती होती.

              सीवरेजसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गांची पाहणी केली. सीवरेजचे काम पूर्ण होताच तातडीने रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू करावी. चैत्र नवरात्र यात्रा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे या यात्रेपूर्वी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा प्रमुख मार्ग संपूर्णतः तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. Sewerage project affecting traffic

              शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सीवरेज लाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पुनर्बांधणी थांबवण्यात आली होती. आता शहरात सिवरेजचे काम पूर्ण होत असल्याने तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधत कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. City traffic problems due to roadwork

              यापूर्वीही आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सीवरेजच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, कामे लवकर पूर्ण करून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. विशेषतः शहरातील मुख्य मार्गांचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय बैठकीत झाला होता.

    sewerage project affecting traffic

              शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांचे काम करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्र यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. यात्रेच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाने सिवरेजचे उर्वरित काम वेगाने करावे, असे आदेश त्यांनी दिले. Municipal corporation road repair plan

              सीवरेजचे काम पूर्ण होताच गांधी चौक ते पठाणपुरा, आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट यासह इतर दोन प्रमुख मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, ज्या भागात सिवरेजचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्यांचे डागडुजी करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या.नागरिकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून लवकरच दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

  • Lok Sabha MP development fund increase । महाराष्ट्राच्या खासदारांना कमी निधी, हरियाणाला जास्त? केंद्र सरकारवर धानोरकर यांचा आरोप

    Lok Sabha MP development fund increase

    Lok Sabha MP development fund increase : दिल्ली येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकार चे लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने जिवती तालुक्यातील पाणी समस्या, केंद्राकडून खासदारांना मिळणारा अत्यल्प विकास निधी तसेच चंद्रपूर-वणी महामार्गावर असलेल्या सलग दोन टोल नाक्याच्या संदर्भातील विषयांचा समावेश आहे. MP Pratibha Dhanorkar questions government

    घोडाझरी तलावात ५ युवकांचा बुडून मृत्यू

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. जिवती तालुक्यातील पाणी प्रश्नांच्या संदर्भात सरकार कडे विचारणा केली असून येल्लापूर येथील नागरीकांना पाण्या अभावी गाव सोडून जाण्याची वेळ येत असल्याचे सरकार च्या निर्दशनास आणून दिले. Pratibha Dhanorkar budget session questions

    या संदर्भात केंद्र सरकार जल शक्ती मंत्र्याद्वारे दिलेल्या उत्तरात तालुक्यात 85.19 टक्के पाणी पुरवठ्याचे काम पुर्ण झाले असून संपुर्ण तालुक्यातील पाणी प्रश्न लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे सांगितले. त्या सोबतच, खासदारांना लोकसभा क्षेत्रातील विकासात्मक कामाकरीता मिळणारा निधी अत्यल्प असून यात वाढ करण्याच्या संदर्भात सरकार चे लक्ष वेधले. या संदर्भात प्रश्नांवर हरीयाणा राज्यातील खासदारांना 50 कोटी रुपये तर राज्यसभा सदस्यांना 32.5 कोटी रुपये निधी मिळत असल्याचे सांगितले.

    भविष्यात लोकसभेतील खासदारांच्या विकास निधीत वाढ करणार असल्याचे सांगितले. त्या सोबतच चंद्रपूर-वणी महामार्गावर 60 किमी दरम्यान दोन टोल नाके असून ह्या दोन्ही टोल नाक्यावर नागरीकांकडून टोल वसूल केला आज आहे. नियमानुसार हे चुकीचे असल्याचे खासदार धानोरकर यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. यावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.

  • Ghoda Jhari Lake drowning incident । चंद्रपूरमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटनाला गेलेल्या पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

    Ghoda Jhari Lake drowning incident

    Ghoda Jhari Lake drowning incident : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेले पाच मुले तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी ( 15 मार्च) सायंकाळ चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

    5 मुले ही जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होते. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. Ghoda Jhari lake news update

    चंद्रपुरात बस व ट्रकचा भीषण अपघात, वाहकाचा मृत्यू तर १५ प्रवासी गंभीर


    चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात. आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साट गाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.

    त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजना योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा 16 वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली. पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत.

    त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले. rescue operation in Chandrapur

  • land conversion rules in Maharashtra । भोगवटा जमिनींसाठी नवा मार्ग खुला – हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश

    land conversion rules in Maharashtra

    land conversion rules in Maharashtra : चंद्रपूर / यवतमाळ भोगवटा वर्ग २च्या जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठीच्या प्रलंबित तसेच दाखल केलेल्या प्रकरणात उपविभागीय अधिकारी स्तरावरील प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्याचे तसेच शासनस्तरावरील निर्णय अपेक्षित असलेल्या प्रस्तावाचे अविलंब वर्गीकरण करून ही प्रकरणे शासन मान्यतेकरिता सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी याविषयी वेळोवेळी घेतलेल्या सुनावणींचा आढावा घेवून केली आहे. Maharashtra land revenue rules update

    चंद्रपुरात उभ्या ट्रकला बसची धडक, वाहकाचा मृत्यू तर १५ प्रवासी जखमी

    भोगवटा वर्ग १ प्रकरणी हंसराज अहीर यांनी गत वर्षभरापासून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयीन स्तरावर जनसुनावणी घेतली होती. त्यांनी या संबंधात मा. देवेंद्रजी फडणवीस यांचेस्तरावर पत्रव्यवहार व चर्चा करून ७५% आकारण्यात येणारी नजराणा रक्कम कमी करण्याकरिता सातत्याने प्रयत्न केले होते. याविषयी राज्यशासनाने दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रारूप नियम प्रस्तावित करून, ७५% असलेली नजराना रक्कम नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीतील व बाहेरील, कृषक प्रयोजनार्थ धारण जमिनीला २५% आणि अकृषक जमिनीला ५०%, रहिवासी प्रयोजनार्थ व कब्जी हक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी १५% व भाडेपट्टयाने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी २५% नजराना रक्कम प्रस्तावित केल्यामुळे मोठ्या संख्येतील भोगवटदार २ च्या बहुतांशी मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांना वर्ग १ करण्याकरिता मोठा लाभ मिळाला आहे. Bhogwata Class 2 to Class 1 land conversion

    चंद्रपूर मनपाच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सुनावणी दरम्यान अन्य मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली होती की, वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करतांना ७५% नजराना रक्कम भरणे अनिवार्य केल्याने आपली जमीन विकत घेण्यासारखा प्रकार असल्यामुळे नजराना रक्कम कमी करण्यात यावी अहीर यांनी याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले होते. शासनाने नजरान्याची रक्कम कमी केल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात अहीर यांना यश मिळाले आहे. reserved land ownership benefits

    चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी स्तरावरील मागील काही वर्षापासून प्रलंबित प्रकरणांसह दाखल करण्यात आलेली अनेक प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याने वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मालकीहक्क मिळू लागल्याने शासनाच्या विविध सोयीसुविधांचा लाभही जिल्ह्यातील मागासवर्गीय तसेच अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याने हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहे. Hansraj Ahir land policy updates

  • NHM Chandrapur Recruitment 2025 । NHM चंद्रपूरमध्ये १५ पदांसाठी भरती! आजच अर्ज करा

    NHM Chandrapur Recruitment 2025

    NHM Chandrapur Recruitment 2025 : नॅशनल हेल्थ मिशन चंद्रपूर (NHM चंद्रपूर) वैद्यकीय अधिकारी (MBBS), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (GNM) आणि ANM या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.cmcchandrapur.com या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

    चंद्रपुरात भीषण अपघात, एसटी महामंडळाच्या वाहकाचा मृत्यू

    नॅशनल हेल्थ मिशन चंद्रपूर (NHM चंद्रपूर) भरती मंडळ, चंद्रपूर यांनी मार्च २०२५ च्या जाहिरातीत एकूण १५ रिक्त पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२५ आहे. NHM Chandrapur GNM nurse jobs 2025 application

    • राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर भरती २०२५.
    • ⇒ पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (जीएनएम) आणि एएनएम.
    • ⇒ एकूण रिक्त पदे: 15 पदे.
    • ⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.
    • ⇒ शैक्षणिक पात्रता: MBBS, GNM, ANM.
    • ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
    • ⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 मार्च 2025.
    • ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2025.
    • आरोग्य विभाग
    • ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपर.
    • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ – पदांची संख्या – ५
    • मायक्रोबायॉलॉजिस्ट – १
    • स्टाफ नर्स – GNM – १
    • एएनएम -८
  • road accident news in Chandrapur । चड्डा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने घेतला वाहकाचा जीव

    road accident news in Chandrapur

    आरटीओची डोळेझाक, ट्रान्सपोर्टची मुजोरी

    road accident news in Chandrapur : चंद्रपूर शहरातील रस्ते अरुंद असल्याने नागरिकांना वाहतुकीस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, शहरापेक्षा भयावह स्थिती हि नागपूर रोडवरील आहे, या रस्त्यावर मोठ्या ट्रान्सपोर्टने आपला ठिय्या मांडलेला दिसून येतो. यामुळे १५ मार्च रोजी मध्यरात्री हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी समोर नागपूर वरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस ची धडक रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्र्क ला दिली या धडकेत बस मधील वाहक ठार झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले. Nagpur to Chandrapur road accident

    माजरी वेकोलि मध्ये महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांना चोरी करताना अटक

    कसा झाला अपघात?

    राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक MH14 KA 8587 नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येत होती. यावेळी रस्त्यावर उभा असलेला चड्डा कंपनीचा ट्र्क क्रमांक MH31 CA 3171 ला बसने जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कि बस चा समोरील भाग चक्काचूर झाला.

    बसचालकाने याबाबत माहिती दिली कि राखेच्या धुळीमुळे रस्त्यावर पुढे काही दिसले नाही, त्यामुळे अचानक उभ्या ट्रकला धडक बसली.

    अपघातानंतरची परिस्थिती काय होती?

    मध्यरात्री अपघात झाला अशी माहिती पोलीस व राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्यांनतर घटनास्थळी पोलीस व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी दाखल झाले, प्रवाशांना पोलीस नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवीत होते. बसचे चालक दत्तात्रय इंगोले यांना नागरिकांनी बाहेर काढले. बसचे वाहक संदीप वनकर ट्र्क व बसच्या सीट्मध्ये फसून गेले होते. त्यांच्या मागे बसलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी सिद्धार्थ मडामे या दोघांना बसचा पत्रा कापून बाहेर काढत होते.

    वाहक संदीप वनकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यासह एकूण १० ते १५ जखमी झाल्याची माहिती आहे. Chandrapur bus accident today

    ट्रान्सपोर्ट धारकांना रस्ते गहाण

    चंद्रपूर शहर व महामार्गावर चड्डा व डीएनआर ट्रान्सपोर्ट धारकांनी अक्षरक्षा कब्जा केल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी ५०० रुपयांची लाच प्रकरणी प्रकाशझोतात आलेल्या RTO विभाग यावर डोळेझाक करून आहे. आरटीओ विभाग व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे साटेलोटे असल्याने कारवाई होताना दिसून येत नाही याचा परिणाम अश्या अपघाताच्या घटनेत सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

    रस्त्यावर ट्र्क उभा ठेवल्यास त्याला झाडाची फांदी, रेडियम लावण्याचा नियम आहे मात्र आपलं कुणीही काही बिघडवू शकत नाही अशी वृत्ती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची असल्याने ते मुजोरीवर उतरतात.

    एसटी महामंडळाने याबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत चड्डा ट्रान्स्पोर्टचे चालक राजन बनवारी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे. ST bus accident in Maharashtra

  • Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming | चंद्रपुरातील या उड्डाणपुलाला मिळणार छत्रपती संभाजी महाराजांचे नाव?

    Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming

    Chhatrapati Sambhaji Maharaj flyover naming : गेल्या अनेक वर्षांपासून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एक उड्डाणपूल (फ्लाईओव्हर) बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल महामार्ग रस्ता बल्लारपूर मार्गाला जोडतो. मात्र, अद्याप या उड्डाणपुलाला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही.

    महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानांना चोरी करताना रंगेहात अटक, माजरी वेकोली मधील घटना

    म्हणून, आयुक्त साहेबांना निवेदन देऊन या उड्डाणपुलाला श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, जेणेकरून त्यांची वीरगाथा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान येणाऱ्या युवा पिढीच्या मनात कायम स्मरणात राहील. Chandrapur flyover Chhatrapati Sambhaji Maharaj

    अशी मागणी सामाजिक सेवेत अग्रेसर असणारे भाजप कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यासहित चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केली.

    उड्डाणपुलाचे महत्त्व:

    • हा उड्डाणपूल महामार्ग रस्ता आणि बल्लारपूर मार्ग यांना जोडतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होते आणि प्रवासाचा वेळ वाचतो.
    • राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ असल्याने, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा उड्डाणपूल खूप महत्त्वाचा आहे. Chandrapur flyover name request
    • छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी:
    • छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा आणि स्वराज्याचे रक्षक होते.
    • त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
    • त्यांच्या बलिदानाची आणि शौर्याची आठवण युवा पिढीला राहावी, यासाठी या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देणे योग्य आहे.
    • छत्रपती संभाजी महाराज हे एक महान प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे नाव या उड्डाणपुलाला दिल्याने, लोकांना त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची प्रेरणा मिळेल.
    • निवेदनातील मुद्दे:
    • उड्डाणपुलाला अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही.
    • छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्याने त्यांची स्मृती कायम राहील.
    • युवा पिढीला त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल.
    • या मागणीचा सकारात्मक विचार करून, उड्डाणपुलाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.
  • MSF security theft case | वेकोलि खाणीत खळबळ: सुरक्षा रक्षकांनीच केली चोरी

    MSF security theft case

    MSF security theft case : वेकोलि माजरी परिसरात बंद पडलेल्या भूमिगत खाणीच्या स्टोअर रूमचे संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांवरच चोरीचा आरोप लागल्याने खळबळ उडाली आहे.

    माजरीचे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या पाळीत काम करणारे एमएसएफचे चार जवान अजय पाटील, भीमराव जाधव, परमेश्वर पवार, शरद पवार हे रात्रीच्या पाळीत कर्तव्यावर असताना भूमिगत खाण क्रमांक ३ च्या बंद स्टोअर रूममधून केबल चोरून रात्री पावणेएकच्या सुमारास जाळून त्यातून तांबे काढत होते. (Coal mine cable theft)

    वरोऱ्यात 2 किलो गांजा जप्त, एका आरोपीला अटक

    त्याचवेळी वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांच्या गस्ती पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी एस.के. बैरवा यांना माहिती दिली. बैरवा यांच्या सूचनेनुसार सुरक्षा रक्षक शैलेश वानखेडे यांनी या चारही आरोपींविरुद्ध माजरी पोलीस ठाण्यात ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    माजरी पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि वेकोलिमध्ये लोखंड चोरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाही वेकोलिच्या स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना एमएसएफच्या सुरक्षा जवानांवर संशय आला. (Chandrapur mine theft)

    त्यानंतर वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि अखेर रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

    प्रतिक्रिया

    नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कठोर कारवाईमुळे वेकोलिच्या खाणींमधून होणारी चोरी थांबली होती. तरीही स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एमएसएफच्या जवानांवर संशय होता. वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाच्या निगराणीत असतानाच हे जवान रात्रीच्या वेळी केबल जाळून तांबे काढताना पकडले गेले.

    एस.के. बैरवा (क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी), वेकोलि माजरी क्षेत्र