Blog

  • RTO corruption in Maharashtra | चंद्रपूर RTO मध्ये मृत व्यक्तीच्या नावानेही दिले जातायं परवाने – आमदार जोरगेवारांचा गौप्यस्फोट

    RTO corruption in Maharashtra

    RTO corruption in Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी  परिवहन विभागातील भ्रष्ट काराभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधत या विभागातील प्रताप, सरनाईकांनी थांबवावा असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी केली. यावर उत्तर देतांना ना. प्रताप सरनाईक यांनीही कार्यवाही करणार असल्याचे सकारात्मक उत्तर सभागृहात दिले आहे. Transport department scam

    चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर नव्या रेल्वेचा थांबा

    आरटीओ विभागाच्या वतीने कोणतीही तपासणी न करता वाहनांना परवाने दिले जात आहेत. यातील अनेक वाहने प्रदूषणास तसेच अपघातास कारणीभूत ठरत आहेत. चार वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करून आरटीओ विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. Corruption in RTO office

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभारावर चांगलेच संतापले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारताना त्यांनी चंद्रपूर येथील प्रभारी आरटीओ बदलणार आहात का, असा थेट प्रश्न उपस्थित करत आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

    यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, “आरटीओ विभागात रॅकेट सक्रिय रित्या कार्यरत आहे. मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहने कार्यालयात जाऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करता त्यांना परवाने दिले जात आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. Truck overloading problem

    चंद्रपूर येथे आरटीओची जागा रिक्त असतानाही प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भरवशावर आरटीओ कार्यालय चालवले जात आहे. परराज्यातील वाहनचालक येथे येताना त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मागील काही घटनांमधून आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभार उघड झाला असतानाही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नाही, मृतक व्यक्तीच्या नावाने परवाना देण्याचा प्रताप या विभागाने केला. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येथे तात्काळ नियमित आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले. Transport minister action on RTO

    चंद्रपूर जिल्ह्यातील राख वाहतुकी संदर्भात त्वरित उपाययोजना करा

    चंद्रपूर जिल्ह्यातील पावर प्लांटमधून मोठ्या प्रमाणात राख निर्माण होते. ही राख सिमेंट उद्योग आणि रस्ते बांधकामासाठी वापरली जाते. मात्र, राख वाहतुकीवर कोणतेही नियमन नसल्यामुळे प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. नुकताच चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खुल्या ट्रकने राख वाहून नेताना एसटी बसला धडक बसून गंभीर अपघात झाला. यामध्ये बसचालकाचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी राख वाहतुकीसाठी निश्चित वेळेचे बंधन आणि वाहने सुरक्षित असावीत, याची तपासणी आवश्यक आहे. परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा धोका वाढत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. 

  • Workplace accident legal action | आमदार सुधाकर अडबाले यांचा पाठपुरावा यशस्वी – ओमॅट कंपनीवर मोठी कारवाई

    Workplace accident legal action : चंद्रपूर : ताडाळी येथील औद्योगिक वसाहतीतील ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनीत कामगारांच्या मृत्यूची घटना घडली असून, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची व कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. दोन्ही अपघातांबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून चौकशीदरम्यान आढळून आलेल्या भंगाबाबत मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय चंद्रपूर यांच्या न्यायालयात कारखान्याचे भोगवटादार यांचे विरूध्द एकूण ३ फौजदारी खटले दाखल करण्यात आल्याचे कामगार मंत्र्यांनी सांगितले. Industrial safety violations

    29 मार्चला थेट मुलाखत सह थेट नोकरी

    दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता अजय रवींद्र राम (रा. बिहार) या कामगाराचा २० फुट उंचीवरून २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडून मृत्यू झाला. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने कोणताही मोबदला न देता परस्पर मृतदेह बिहारला पाठवला.

    यापूर्वी, दिनांक २३ जून २०२४ रोजी श्यामसुंदर ठेंगणे या कामगाराचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना उर्वरित १५ लाखांची नुकसानभरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीत याआधीही अनेक कामगारांचा सुरक्षाव्यवस्थेअभावी मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही प्रकरण आमदार सुधाकर अडबाले यांनी उचलून धरले होते. Factory worker accident case

    या कंपनीत कामगारांसाठी आवश्यक सुरक्षात्मक साधनसामग्री पुरवली जात नाही, तसेच सुरक्षा अधिकारीही नेमलेला नाही, असेही आरोप करण्यात आले. याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली.

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी उत्तर देताना सांगितले की, अजय रवींद्र राम हे राज्य कामगार विमा योजनेंतर्गत नोंदणीकृत असल्याने त्यांच्या कुटुंबाला २ लाख सानुग्रह अनुदान व इतर लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    श्यामसुंदर ठेंगणे यांच्या कुटुंबास ३० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पत्नीला २०१.८६ रुपये प्रति दिवस, मुलगा व मुलीला प्रत्येकी १३४.५७ रुपये प्रति दिवस लाभ राज्य कामगार कार्यालयाकडून मंजूर झालेला आहे. यापूर्वी १६ जून २०२२ रोजी निकलेश हरीराम इनवटे या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर १६ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या अपघातात सिकंदर यादव गंभीर जखमी झाले होते. या कामगाराचा उपचारादरम्यान ३ फेब्रुवारी २०२५ रोजी मृत्यू झाला.

    कामगारांच्या अपघातांसंदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने चौकशी केली असून, मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर न्यायालयात कारखान्याच्या भोगवटादारांविरोधात ३ फौजदारी खटले दाखल करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी उत्तरात दिली.

  • farmer fights tiger | वाघाच्या बछड्याने हल्ला केला, शेतकऱ्याने दिले जोरदार प्रत्युत्तर!

    farmer fights tiger

    farmer fights tiger : सकाळी शेतात काम करीत असताना वाघाच्या बछड्याशी शेतकऱ्याचा अचानक सामना झाला. बछड्याने शेतकऱ्यावर हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाच्या बछड्याला पळून जाणे भाग पडले. शेतकरी आणि बछड्यांमध्ये झालेला हा थरार ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव जानी शेत शिवारात रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला. या घटनेमध्ये शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी झाले. त्यांच्यावर ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. tiger attack in Chandrapur

    वाळू अभावी घरकुलाचे काम ठप्प, आमदार जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न


    ताडोबा अभयारण्य असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे कुठेही, केव्हाही दर्शन होते. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना वाघ शेत शिवार, गावाशेजारी सहज बघायला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दर्शन इतके शक्य झाले आहे, त्यामुळे शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाताना काळजीनेच जावे लागत आहे. आज रविवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव ज्यांनी येथील 42 वर्षीय गोवर्धन डांगे गावापासून जवळ असलेल्या स्वतःचे शेतामध्ये सकाळी सव्वासात वाजता गेले होतें डांगे यांनी शेता मध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे आणि धानाला दिवस रात्र पंपाद्वारे पाणी द्यावे लागत आहे. tiger attacks on farmers

    त्यामुळे त्यांना शेतावर जाणे गरजेचे आहे. सकाळी शेतावरगेले आणि काम करू लागले. शेतासभोवती दूरवर जंगल नाही. तरीही अचानक एक वाघाचा बछडा शेतात येऊन धडकला. काम करीत असलेल्या डांगे यांच्या समोर तो अचानक पुढे आल्याने त्यांना धडकी भरली. वाघ मोठा असो की छोटा तो वाघ असते. त्या बछड्याने क्षणाचाही विलंब न करता थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.  तेवढ्याच तत्परतेने बछड्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांने हल्ला परतावून लावला. Chandrapur tiger incidents

    शिकारी वृत्ती अंगात असलेल्या बछड्याने वारंवार त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात शीताफिने सदर शेतकऱ्यांनी हल्ले परतवून लावले. काही वेळ त्याच्याशी झुंज देऊन त्याचा हल्ला परतावत शेतकरी भारी पडला. आणि बछड्याला पळून जाण्याशिवाय मार्ग उरला नाही. तो पळून गेला. मात्र यामध्ये शेतकरी जखमी झाला. पुन्हा पुन्हा बछडा परतून येईल त्यामुळे भयभीत झालेल्या शेतकरी लगतच्या विहिरीत उतरला तेथूनच त्याने मोठ्या मुलाला फोनवरून माहिती दिली.

    मोठा मुलगा आणि गावातील शेकडो नागरिक शेत शिवारात दाखल झाले. वडील रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या आहेत. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबियांना आणि नागरिकांना सांगितली. त्यानंतर त्याला लगेच ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शेतकऱ्यांने झुंज केल्यामुळेच वाघाला पळून जावे लागले नाही तर पुन्हा एका शेतकऱ्याला जीवापासून मुकावे लागले असते.   

    तपाड परिसरात काही दिवसांपासून वाघ व बछड्यांचे दर्शन होत आहे. त्यापैकीच एखादा बछडा नांदगाव जानी शिवारात आला असावा असा संशय शेतकरी वर्तवित आहेत.


    ताडोबा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघाला सहज पाहण्यासाठी अभयारण्यात जाण्याची गरज नाही तर शेत शिवारात गावालगत कुठेही वाघाचे दर्शन हमखास घेता येते. मात्र शेतकरी शेतमजूराणा कामावर जाताना धडकीच भरते. शेतशिवारात भटकंती करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

  • RTO Chandrapur Vayuveg । राख वाहतुकीत नियमांचे उल्लंघन, आरटीओने दाखवला ‘लाल डोळा’!

    RTO Chandrapur Vayuveg

    RTO Chandrapur Vayuveg :  चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या  वायुवेगपथकाने अचानक भेट देऊन प्रकल्पाच्या मागील भागातील सायवान परिसरात कडक तपासणी करून 13 टिप्पर वाहनांवर कारवाई केली. Chandrapur Thermal Power Station RTO Action

    कारवाई करण्यात आलेल्या सहा वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अटकाव करून ठेवण्यात आले तर उर्वरित वाहनांना चालान देण्यात आले आहे.  केंद्रीय मोटार वाहन  नियम 138 नुसार, एकरुप नसलेला माल  हा व्यवस्थितरित्या ताडपत्रीने आच्छादित करून किंवा बंद कंटेनरद्वारा वाहतूक करणे अत्यावश्यक असतांना सदर वाहनातील राखेवर  फक्त ग्रीननेटचे आवरण होते. राखेला व्यवस्थितरित्या आच्छादित न करता वाहतुक  करणाऱ्या वाहनांवार मोटार वाहन कायाद्यातर्गंत कडक कारवाई करण्यात येते.  RTO Vehicle Check Maharashtra

    चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी

    तसेच याबाबत सीटीपीएसच्या वरिष्ठ  अधिका-यांशी भेट घेऊन सदर राख आच्छादित न करता वाहतुक केल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबतचे सांगण्यात आले. सार्वजनिक परिसरात वाहतुक न करता सीटीपीएस स्तरावर प्रकल्पातर्गंतच्या जागेवर राखेची विल्हेवाट लावावी, असेही निर्देश देण्यात आले. चंद्रपूर थर्मल पॉवर  स्टेशन  सीटीपीएस येथून उत्पन्न होणारी राख एएसएच सुरक्षित आणि नियमानुसार होण्यासाठी  आरटीओ  कार्यालयाकडुन सीटीपीएस प्रवेशद्वारावर निरीक्षण ठेवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल, असे आरटीओ विभागाकडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

                  सदर कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निदीक्षक दिपक काळे,  विलास ठेंगणे, अनुराग सालनकर, निखिल गायकवाड, सुरज मुन यांच्यामार्फत करण्यात आली.

  • Maharashtra sand policy update । राज्यात वाळू धोरणाचा अभाव – विकासकामे आणि घरकुल प्रकल्प ठप्प

    Maharashtra sand policy update

    Maharashtra sand policy update : राज्यात अद्याप ठोस वाळू धोरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काही रेती घाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर वाळूवर आधारित उद्योग आणि घरकुलांच्या बांधकामांसाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली. Free sand for housing projects

    चंद्रपुरात २९ मार्चला थेट मुलाखत, थेट नोकरी

    मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यात वाळू धोरण तयार न झाल्याने विकासकामे आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक महत्त्वाची सार्वजनिक विकासकामे व घरकुल प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, पूल, इमारती यांसारख्या सार्वजनिक बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक असते. मात्र, वाळूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही कामे खोळंबली आहेत. परिणामी, नागरी सुविधांमध्ये दिरंगाई होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Sand distribution policy

    हाच मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की, वाळू धोरण तयार न झाल्याने रेतीवर आधारित असलेल्या अनेक उद्योगांना देखील मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठादार, काँक्रिट मिक्सिंग प्लांट, गट्टू कारखाने आणि इतर बांधकाम व्यवसाय वाळूच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कामगार बेरोजगार होण्याच्या संकटात आहेत.

    घर बांधण्यासाठी वाळू ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, वाळू मिळत नसल्यामुळे अनेक घरकुल प्रकल्प रखडले आहेत. सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना हक्काच्या घराची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.

    सरकारने लवकरात लवकर ठोस वाळू धोरण जाहीर करून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना येत्या आठ दिवसांत वाळू धोरण जाहीर करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

  • Chanda Fort railway stop । चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी: ‘चेन्नई-गया’ ट्रेन आता चांदा फोर्टला थांबणार!

    Chanda Fort railway stop

    Chanda Fort railway stop : चैन्नई-गया या  साप्ताहिक ट्रेनचा (१२३९०)  थांबा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा  राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अथक प्रयत्नाने चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर मंजूर झाला असून दि. १८ मार्च रोजी ही ट्रेन रात्री ११:४५ वाजता चांदा फोर्टवर पहिल्यांदाच थांबणार असल्याने चंद्रपूर व जिल्ह्यातील प्रवाशांना या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. Chandrapur train news

     ट्रेन नं. १२३८९ गया-चैन्नई या परतीच्या  प्रवासाचा थांबा चांदा फोर्ट  येथे मंजूर झालेला नसला  तरी लवकरच हा  थांबाही मंजूर केला जाईल. त्याकरिता रेल्वेच्या वरिष्ठांना अहीर यांनी कळवून प्रवाशांची गैरसोय टाळण्याची सुचना केली आहे. सदर ट्रेनचा बल्लारपूर रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने चंद्रपूर व परिसरातील रेल्वे प्रवाशांना रात्रीचा प्रवास करून बल्लारशाह गाठावे लागत होते. चैन्नई-गया ट्रेनचा चांदा फोर्ट स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांची होत  असलेली फरफट थांबणार आहे. Railway news Maharashtra

    चंद्रपुरात ३८ लाखांचे डिजिटल लाखांचे कॉइन जप्त

                    ट्रेन नं. १२३९० चा चांदा फोर्टला थांबा मिळाल्याने बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मधील मोठ्या प्रमाणात चंद्रपुरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापारी, व्यवसायी, कर्मचारी, विद्यार्थी व अन्य प्रवाशांनाही या थांब्यामुळे मोठी सोय झाली आहे. New train stop in Maharashtra 

    गया-चैन्नई ही ट्रेन चांदा फोर्ट वरून  रात्रीच्या वेळेस जात असल्याने  ट्रेन नं. १२३८९ चा थांबाही चांदा फोर्टवर मंजूर  करणे प्रवाशांच्या दृष्टीने अनिवार्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने परतीचा प्रवास करणाऱ्या गया-चैन्नई या  ट्रेनचा सुध्दा चांदा फोर्ट स्थानकावर त्वरीत थांबा मंजूर करून  प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्थेने  हंसराज अहीर यांच्या माध्यमातून रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. Hansraj Ahir railway initiative

    चैन्नई-गया (ट्रेन नं. १२३९०)  या साप्ताहिक  ट्रेनचा चांदा फोर्ट  स्थानकावर थांबा  मंजूर करून दिल्याबद्दल  संस्थेचे  अध्यक्ष रमणिकभाई चव्हान, कार्याध्यक्ष तथा झेडआरयुसीसीचे सदस्य दामोदर मंत्री व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या वतीने हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.

  • Online cricket betting arrest । क्रिकेट बेटिंगचा भांडाफोड – ३ लाख रोख आणि ३८ लाखांचे डिजिटल कॉइन जप्त

    Online cricket betting arrest

    Online cricket betting arrest : नागपूरनंतर सर्वात जास्त क्रिकेट सट्टा हा चंद्रपुरात खेळल्या व लावला जातो अश्यातच स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी धरपकड मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात व्यंकटेश हॉटेलमध्ये क्रिकेट बेटिंग घेताना तिघांना अटक करण्यात आली होती. Illegal cricket betting case

    म्हातारदेवी घुग्गुस मध्ये राहणारा २६ वर्षीय युवक अंशुल रामबाबू रॉय ला स्थानिक गुन्हे शाखेने १६ मार्च रोजी लिजेंड लीग पाध्ये खेळल्या गेलेल्या भारत-वेस्टइंडीज च्या अंतिम सामन्यात क्रिकेट बेटिंग घेताना अटक केली.

    थेट मुलाखत आणि थेट नोकरी, चंद्रपुरात २९ मार्चला भव्य रोजगार मेळावा

    चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर लिजेंड लीग क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली होती, यावर क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरु झाली. चंद्रपूर शहरात क्रिकेट सट्टेबाज यांच्यावर कारवाई झाल्यावर पोलिसांच्या नजरा या सट्टेबाजांवर होत्या, अश्यातच स्थानिक गुन्हे शाखेला क्रिकेट बेटिंगबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे पथक घुग्गुस मधील म्हातारदेवी या गावात धडकले. Cricket betting police raid

    Illegal cricket betting case

    चिंतामणी कॉलेजजवळ राहणारा २६ वर्षीय अंशुल रामबाबू रॉय हा आपल्या घरी मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट सामन्यादरम्यान बेटिंग घेत होता. पोलिसांनी धाड मारताच आरोपीची घाबरगुंडी उडाली. यावेळी kingexch९.com या आयडीमध्ये ३८ लाख रुपयांचे डिजिटल कॉइन सोबतच १ मोबाईल व रोख ३ लाख रुपये असा एकूण ४२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.

    आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेट सट्टेबाजांचे नेटवर्क उध्वस्त करण्याची मोहीम सध्या स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या हातात घेतली असून लवकरच या धंद्यातील वस्ताद पोलिसांच्या ताब्यात असतील.

    घुग्गुस मधील यशस्वी कारवाई हि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, मिलिंद टेकाम यांनी केली.

  • Chandrapur monsoon tourism safety । धबधबे, तलाव, किल्ले; पर्यटनापूर्वी सुरक्षिततेची काळजी घ्या

    Chandrapur monsoon tourism safety

    Chandrapur monsoon tourism safety : चंद्रपूर जिल्हातील अनेक पर्यटन स्थळी व धबधब्यांचे ठिकाणी विशेषतः मान्सुन कालावधीत मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जिवीत व वित्तहानी होऊ नये, या करिता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. तसेच याबाबत नागरिकांनी सुद्धा आवश्यक काळजी घ्यावी,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    चंद्रपुरात संस्काराची नवी शाळा

    1. जिल्हयातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल या  ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (शहरी/ग्रामीण) व इतर आवश्यक यंत्रणा, सोबत उपविभागीय अधिकारी यांनी समक्ष भेटी देऊन पाहणी करावी. धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पाईंटस या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेखा आखावी. तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून स्पष्ट सूचना असलेले फलक लावण्यात यावेत. Maharashtra waterfall safety guidelines

    2. आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण, प्रेक्षणीय स्थळे ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नाही अशा सर्व पर्यटन स्थळे डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करावे.

    3. पर्यटकांसाठी काय करावे आणि काय करु नये या बाबतचे सूचना फलक लावण्यात यावे. महसूल/नगरपालिका/रेल्वे/वन विभाग/सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक, लाईफ जॅकेटस्, लाईफ ब्वाईज, रेस्क्यू बोटी इत्यादी ठेवाव्यात. Chandrapur district tourist safety

    4. गिर्यारोहण, जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, गिर्यारोहक, जिल्हा प्रशासनव्दारा प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादीची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी प्रथोमपचार सुविधा असलेल्या अॅब्युलन्सची देखील व्यवस्था करावी. जेणेकरुन जिवीत हानी टाळता येऊ शकेल. उपविभागीय दंडाधिकारी हे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत. त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना अशा प्रत्येक पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत योग्य  आदेश निर्गमित करावेत.

    5. बहुतांशी पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते व त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होतो व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी  रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक इत्यादी बाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. Monsoon safety for tourist places

    6. पर्यटनाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या हॉटेल व्यवसायीक, टॅक्सी/रिक्षा चालक संघटना, गाईडस, स्वयंसेवी संस्था इत्यादी संस्थाना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करावा. या संघटनांच्या माध्यमातून देखील पर्यटकांना योग्य माहिती देणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, वाहनांच्या कमीत कमी वापर, पाकींग इत्यादी बाबत सुचना द्यावेत. 

    7. पर्यटन हा जिल्हयाच्या विकासाचा एक महत्वाचा घटक आहे. जिल्हयामध्ये पर्यटन वाढीचा प्रयत्न करीत असतांना “सुरक्षित व जबाबदार पर्यटक” हे सूत्र अवलंबिणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे.  चंद्रपुर जिल्हयामध्ये अनेक पर्यटनस्थळ जंगलामध्ये असुन मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी तेथे जात असतात. वन विभागातील संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असुरक्षित ठिकाणे पावसाळयामध्ये पर्यटनासाठी हवामान विभागाचे अतिवृष्टी इशारेप्रमाणे तात्पुरतो बंद करावीत. Monsoon safety for tourist places

    जी ठिकाणे पर्यटनासाठी सुरु ठेवणेत येणार आहेत, त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक लावावेत. अतिक्रमणे काढून टाकावेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटनासाठी वेळ निश्चित करुन सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे थांबणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी.  नियमांचे उल्लंघन करणा-या विरुध्द कायदेशीर कारवाई करावी. वर नमूद केलेल्या उपाययोजनांची सर्वसंबंधितांनी काटेकारपणे अंमलबजावणी करावी. या अंमलबजावणी मध्ये कोणत्याही निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.

  • Amma Sanskar Bharti । चंद्रपुरात संस्कारांची शाळा: आमदार जोरगेवारांच्या ‘अम्मा संस्कार भारती’चा शुभारंभ!

    Amma Sanskar Bharti

    Amma Sanskar Bharti : आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि पुढच्या पिढीला योग्य संस्कार देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलले आहे. अम्मा संस्कार भारती हा उपक्रम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे व्यासपीठ आहे. अम्मा संस्कार भारती म्हणजे केवळ एक शिक्षणपर उपक्रम नाही, तर मुलांच्या मनोभूमीवर संस्कारांची गोड शिदोरी ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न असून, यातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amma Sanskar Bharti initiative

    चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘अम्मा संस्कार भारती’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी लक्ष्मी नारायण मंदिर येथे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि शारीरिक-मानसिक विकास घडविण्यावर भर दिला जाणार आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रशिक्षिका अनामिका चहारे, प्रशिक्षक राजु जोशी, प्रशिक्षिका मिनाश्री ठेंगडी, प्रशिक्षिका रुपाली तोषनीवाल, प्रशिक्षक अनिरुद्ध टिकले, श्रद्धा सेलोटे, मृनाल पनके, लक्ष्मी नारायण मंदिरचे विश्वस्त जुगल सोमानी, कैलास सोमानी करणसिंग बैस, आदींची उपस्थिती होती.

    थेट मुलाखत थेट नोकरी, २९ मार्चला चंद्रपुरात रोजगार मेळावा

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य आणि जीवनशैलीत विस्कळीतपणा दिसून येत आहे. गॅझेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपली परंपरा, संस्कारांची ओळख व्हावी, त्यांना जीवनमूल्ये मिळावीत, यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण हा उपक्रमाचा राबवत आहोत. या उपक्रमाला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Indian culture for kids Chandrapur

    amma sanskar bharti initiative

    भारतीय संस्कृतीत बालपणी दिलेले संस्कार संपूर्ण जीवनाचा पाया घडवतात. म्हणूनच ‘अम्मा संस्कार भारती’ उपक्रमाच्या माध्यमातून ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी मंत्रजप, श्लोक, स्तोत्र पठण, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चारित्र्य संवर्धन, पौराणिक कथा, चित्रकला आणि आर्ट अँड क्राफ्ट असे विविध उपक्रम घेतले जात आहे. मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रुजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना चांगले आचरण आणि आदर्श विचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. Traditional values learning India

    आजच्या मुलांमध्ये चांगले विचार आणि सशक्त व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. म्हणूनच हा उपक्रम केवळ संस्कारांची शिकवण देणारा नसून, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी चिमुकल्यांसह पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Maharashtra teacher protest 2025 । शिक्षकांचा एल्गार: १८ मार्चला राज्यव्यापी आंदोलन!

    Maharashtra teacher protest 2025

    Maharashtra teacher protest 2025 : राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खाजगी अनुदानित विजाभज, आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान १८ मार्च २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे.

    शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित समस्‍या सोडविण्याठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले व अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्‍वात मंगळवार, दिनांक १८ मार्च २०२५ रोजी  दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत नागपूर व अमरावती शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयासमोर उर्वरीत विदर्भातील सर्व नऊ जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात वनविकास महामंडळाच्या जंगलात भीषण आग

    या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, दि. १५ मार्च २०२४ यातील संचमान्यतेबाबत जाचक अटी रद्द करण्यात याव्या, १४ ऑक्टोंबर २०२४ चा शासन निर्णयानुसार अंशतः अनुदानित शाळा / तुकड्यांना अनुदान मंजूर करणे, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना / अंशतः अनुदानित शाळा/तुकडीवर नियुक्त पण १०० टक्के अनुदान ०१ नोव्हेंबर २००५ नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, Vidarbha teachers’ demands

    राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, नागपूर खंडपीठाने दि. १९/०७/२०२४ रोजी दिलेल्या निकालानुसार १०० टक्के अनुदानित शाळेतील वाढीव तुकडीवर दि.०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त टप्पा किंवा अंशतः अनुदानावर असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, आरटीई २००९ अंतर्गत खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची थकबाकी अदा करण्यात यावी, नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती व वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा तसेच १५ टक्के नक्षलग्रस्त भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात यावा यासह एकूण ३७ मागण्यांचा समावेश आहे. Old pension scheme for teachers Maharashtra

    सदर आंदोलनाबाबत मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव श्री. देओल यांची भेट घेऊन १८ मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनाचे निवेदन दिले. यावेळी उपसचिव तुषार महाजन उपस्थित होते. Teacher grant protest Maharashtra

    या धरणे / निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जगदीश जुनघरी, लक्ष्मणराव धोबे, विमाशि संघाचे चंद्रपूर जिल्‍हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्‍हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकर, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, जिल्‍हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यवाह व सदस्‍यांनी केले आहे.