Chandrapur Babupeth ward problems : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग हे समस्यांचे माहेरघर आहे, महानगर पालिकेला कित्येकदा निवेदनाद्वारे बाबूपेठ प्रभागातील समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या, मात्र पालिका प्रशासन समस्याकडे डोळेझाक करण्याचे काम करीत आहे,त्यामुळे बाबूपेठ मधील नागरिकांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन बाबूपेठ प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला. Babupeth Chandrapur municipal corporation complaints
या समस्येत प्रामुख्याने बजरंग क्रीडा संकुल ला लागून असलेले माराई मंदिर परिसर, गोंड पुरातन मंदिर परिसरात सर्वत्र घाण पसरलेली आहे,त्याच परिसरात विहिरीची दैनावस्था, तसेच विहिरीला कठडे नसल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे,अमृत योजनेचे पाईप लाइन टाकण्याकरिता संपूर्ण रस्ते फोडलेले आहे,आणि नळाला पुरेसे पाणी सुद्धा येत नाही. Chandrapur municipal negligence Babupeth
रेल्वे उडान पुलाच्या खाली फुले चौक येथील रस्त्याचे अर्धवट काम केले आहे,दररोज अपघात होत असतो, मोकाट कुत्र्यामूळे लहान मोठयाना धोका निर्माण झालेला आहे.तसेच इतर समस्यांमुळे बाबूपेठ प्रभागातील नागरिक हैराण झालेले आहे,त्यामुळे वरील मूलभूत समस्या तात्काळ सोडवून बाबूपेठ प्रभागातील नागरिकाना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेऊन महानगर पालिका आयुक्त बिपीन पालिवाल यांना सामाजिक कार्यकर्ते चंदाताई वैरागडे, मुकेशभाऊ गाडगे, महेशभाऊ म्याकलवार, ज्ञानेश्वर नगराळे,उमंग हिवरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.यावेळी संगीता देठे, वैशाली ऐसेकर, नीता चन्ने, कांचन बेरड, दामू मरस्कोल्हे, बाबू दंतुलवार,निखिल खनके उपस्थित होते.
चंद्रपूर महानगरपालिकेचा आरोग्य उपक्रम! 630 शिबिरांमधून माता आणि किशोरींना पोषण मार्गदर्शन!
Nutrition programs for women and children : चंद्रपुर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 2024-2025 या वर्षात एकुण 630 बाह्य शिबिरे घेण्यात येऊन गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. Pregnancy nutrition tips
मनपा आरोग्य विभागांतर्गत सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरी आरोग्य व पोषण दिवस/अर्बन हेल्थ न्युट्रिशन डे (UHND) वर्षभर साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने पोषण आहारा विषयी प्राधान्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असते. 2024-2025 या वर्षभरात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मार्फत प्रत्येक झोन व अंगणवाडीमध्ये अंदाजे 630 बाह्यसत्र (UHND) घेण्यात आले. Urban health and nutrition programs
या सत्रांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांचा प्रामुख्याने समावेश होता. पोषण आहारामध्ये समतोल आहार जसे की पालेभाज्या, फळे, दुध, अंडे, मोड आलेले कडधान्य इत्यादी फुड पीरॅमिडनुसार प्रदर्शन ठेवून त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना मासीक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्या विषयीच्या सुचना देण्यात आल्या.
तसेच वर्षभर झालेल्या सर्व सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जसे लोहयुक्त आहार, प्रोटीन युक्त आहार, कुटूंब नियोजनाचे साधने, स्तनपान, जलजन्य, किटकजन्य आजार, सिकलसेल, कुष्ठरोग, टि.बी, कॅन्सर आणि जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सत्रात उपस्थित लाभार्थ्यांना शेंगदाणा चिकी, राजगिरा लाडु व केळी वाटप करण्यात आले. Free health checkups for pregnant women
सदर सत्र हे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अश्विनी भारत, डॉ.विजया खेरा,डॉ.जयश्री वाडे,डॉ.अर्वा लाहेरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयू गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. घोषणा कोराम,डॉ.उत्कर्षा कारमोरे तसेच आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्या सहकार्याने पार पडले.
महाराष्ट्राच्या अर्थवाढीसाठी केरळ मॉडेल! सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा प्रस्ताव!
Maharashtra state lottery revenue : केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविता येऊ शकते, यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले. श्री. अजित पवार यांनी या सूचनेचे स्वागत केले, तसेच केरळच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष आ. श्री. सुधीर मुनगंटीवार असतील, असे सभागृहात घोषित देखील केले. state lottery revenue generation
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा मुद्दा सभागृहात अनुदानावरील चर्चेदरम्यान मांडला होता. त्यावर निधीबाबत असमर्थता दर्शविण्यात आली. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांनी सरकारला महाराष्ट्राचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत सूचना केल्या. उत्पन्न वाढवल्यास विकास साधणारी, रोजगार देणारी कामं थांबविण्याची गरज पडणार नाही, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना केली. ही सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना करणार असल्याची घोषणा केली. Kerala lottery revenue model
लॉटरीच्या माध्यमातून केरळचे २०२३-२४ चे उत्पन्न १२ हजार ५२९ कोटी आहे. केरळ पॅटर्न राबवल्याने राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर नक्कीच त्या दृष्टीने विचार करायला हवा. यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल, अशी सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर श्री. अजित पवार यांनी या संदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचे अध्यक्ष आ. श्री. सुधीर मुनगंटीवार असतील, अशी घोषणा सभागृहात केली. Lottery for state revenue growth
१२ एप्रिल १९६९ ला महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. साप्ताहिक, मासिक पद्धतीने गुढीपाडवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. राज्याचे सन २०२३-२४ चे एकूण उत्पन्न २४ कोटी ४३ लाख ६१ हजार आहे. बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन ३ कोटी ५१ लाख ६६ हजार १६३ रुपये राहतात. त्यामुळे या विभागाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः जीएसटीच्या ३५ बैठकांमध्ये सदस्य होतो. त्यामुळे इतर राज्यांमधील चांगली धोरणे आपण स्वीकारायला हवीत, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. how lotteries fund state projects
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात लॉटरी खरेदी करतात. त्यामुळे लॉटरीतून मिळालेला पैसा गरिबांच्या उत्थानासाठी खर्च करता येईल, असा विचार केरळ सरकारने केला. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणीही केली, त्यामुळे आपणही यादृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. मी अर्थमंत्री असताना देशात ११ हजार ९७५ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिले. २ हजार ७२ कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिले. त्यामुळे हे शक्य आहे, हे मला माहिती आहे. राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील, असेही आ. श्री. मुनगंटीवार सभागृहात म्हणाले.
पूर्व वैमनस्यातून भरदिवसा युवकाचा खून – आरोपी फरार!
सास्ती येथे थरारक घटना, पोलिसांची शोध मोहीम सुरू
crime in small Indian villages राजुरा तालुक्यातील सास्ती गावात भरदिवसा थरारक हत्याकांड घडले आहे. शुक्रवार (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आतिश बापू मोतकू (32, रा. सास्ती) याची निर्घृण हत्या करण्यात आली. रामनगर (सास्ती) येथील दोन भावंडांनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जागीच ठार मारले. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. murder cases in rural India
मृतक आतिश याला काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती. तो नुकताच बाहेर आला होता. आरोपी त्याच्या हालचालींवर नजर ठेवून होते. त्याच्यावरील रेकी आधीपासून सुरू असल्याची चर्चा असून, तो गावात बाहेर पडताच आरोपींनी त्याचा पाठलाग केला.
चन्ने देशी दारू दुकानाजवळ त्याला पाहताच दोघांनी त्याचा पाठलाग केला. आपला जीव वाचवण्यासाठी आतिश गल्लीत पळाला, मात्र तेथे लपण्यासाठी जागा नसल्याने आरोपींनी निर्दयीपणे लोखंडी रॉडने सपासप वार करून त्याला ठार मारले.
पोलीस ताफ्याची तातडीने धाव, गावात तणाव
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (आयपीएस) अनिकेत हीरडे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चिघळू नये म्हणून दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.
पोलीस उपजिल्हा अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल कचोरे यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गावात भीतीचे वातावरण, नागरिकांमध्ये अस्वस्थता
या घटनेमुळे संपूर्ण सास्ती गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सास्ती गाव वेकोलीच्या खाणपट्ट्यांनी वेढलेले असून येथे अवैध व्यवसायांचे जाळे फोफावले आहे. यापूर्वीही या भागात मारामाऱ्या, गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. इतक्या संवेदनशील भागात असतानाही सास्ती पोलिस चौकी कायम बंद असते, हे विशेष चिंतेचे कारण बनले आहे. violence near liquor shops
पोलिस ठाण्याची संख्या वाढवण्याची मागणी
सास्ती गावातील देशी दारू दुकान, बिअर बार आणि अवैध धंदे यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. safety issues in rural Maharashtra
पुढील तपास सुरू
राजुरा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे.
📌 गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का? पोलीस चौकी कायम सुरू होईल का? सास्तीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना होतील का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे!
“नळ आहेत, पण पाणी नाही! स्थानिकांचा मनपावर आक्रोश”
municipal water supply issues : चंद्रपूर : प्रभागातील अनेक भागांमध्ये विहिरी किंवा बोअरवेल असे पाण्याचे स्त्रोत आटल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भिषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली.काही ठिकाणी मनपाच्या नळांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. तर काही ठिकाणी नळ पोहोचले पण पाणी पोहोचले नाही.त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. या पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. water shortage solutions
देशमुख यांचे नेतृत्वात स्थानिक नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.शिष्टमंडळामध्ये जनविकास सेनेचे प्रफुल बैरम, मनिषा बोबडे यांचेसह स्थानिक नागरिक रवींद्र पेटकर,अशोक कातकर,रेखा पोलावार,रंजना पेटकर,अनिता शेंडे,रजनी पाचभाई,किरण कातकर,रूपा बैरम यांचा समावेश होता. poor water supply in cities
जगन्नाथ बाबा नगर मधिल साव ले-आऊट मध्ये मागील चार महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. याच भागात वासेकर ले-आउट व जगन्नाथ बाबा उद्यान परिसरात अनेक महिन्यांपासून अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गजानन महाराज मंदिर समोरील परिसरात मागील अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. वडगाव जुनी वस्ती, मित्र नगर,वरोरा नाका चौक व लक्ष्मी नगरच्या अनेक भागांमध्ये अनियमित किंवा अपुरा पाणीपुरवठा होतो. हवेली गार्डन परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी मनपा आयुक्त बिपीन पालीवाल यांनी स्वतः उपस्थित राहुल अमृत पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून घेतली. दोन दिवस नळांना पाणी दिले. मात्र त्यानंतर दोन वर्षांपासून या भागात नळाला पाणी आले नाही.
आकाशवाणी जवळील चांद टेकडी, नागपूर रोडवरील ओम भवन परिसर, मित्र नगर लोकमान्य शाळेच्या जवळ व नागराज चौक,अपेक्षा नगर, विठ्ठल रुक्माई नगर, ठाकरे वाडी या ठिकाणी अमृत पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. पंधरा दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी यावेळी जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
Research workshop 2025 : चंद्रपूर – आज आपल्या भागात प्रदूषणासह कॅन्सरसारख्या महाभयंकर आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. संशोधनातून त्या समस्यांची उत्तरे शोधली गेली पाहिजे. संशोधन हे समाजाभिमुख आणि मानवी मूल्यांना महत्व देणारे असावे, समाजहितासाठी संशोधन केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी येथे बोलताना केले. Academic research methods
येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग,रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज’ (संशोधन केंद्र) व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टेपिंग इनटु रिसर्च प्रिसिंक्ट : मेथॉडॉलॉजी, पब्लिकेशन अँड पेटंट्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे होते, तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, ‘स्पोर्ट्स सायकॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, मुंबई येथील डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस, नागपूर येथील ‘लेक्स रेगिया एलएलपी’ कंपनीच्या सर्वेसर्वा तथा सिनियर आयपीआर अटर्नी डॉ. उशोषि गुहा, गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, प्राचार्य राजीव वेगिनवार व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन केंद्र समन्वयक डॉ. रक्षा पी. धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. Research publication guidelines
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, करोना काळात त्यावर मात करण्यासाठी संशोधनातून लस निघाली. त्यामुळे भारताचे नाव जगात पुढे गेले. आज गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात बांबू मुबलक प्रमाणात आहे. पण संशोधनामुळे बांबूला जागतिक पातळीवर पोहोचता आले आहे. आज बांबूपासून इथेनॉल बनवले जात असून आसाममध्ये त्याचा कारखाना प्रगतीपथावर असल्याचे सांगत समाजासाठी संशोधन करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. PhD research methodology कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी महाविद्यालयाच्या व संशोधन केंद्राच्या वाटचालीचा यशोदायी प्रवास विशद केला. संचालन प्रा. शीतल बोरा, तर आभार प्रदर्शन डॉ. रक्षा पी. धनकर यांनी केले.
कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर हे होते, तर यावेळी नागपूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. तपन दत्ता व समन्वयक डॉ. रक्षा पी.धनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी सदर कार्यशाळा संशोधनकर्त्यांसाठी फलदायी ठरल्याचे आवर्जून नमूद केले. प्रास्ताविक डॉ. रक्षा पी.धनकर, संचालन संशोधक विद्यार्थ्यांनी रिता टेकाडे, तर आभार प्रदर्शन डॉ कविता रायपुरकर यांनी केले. या कार्यशाळेला प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात तज्ञांचे मार्गदर्शन- मुख्य भाषणात डॉ. अनिल करवंदे म्हणाले की, संशोधन समस्यांचे उत्तर आहे. संशोधनाची नेमकी प्रक्रिया समजावून सांगत त्यांनी संशोधनात आपल्या मूळ कामाचे संरक्षण ‘कॉपीराईट’ कायद्यान्वये केले जात असल्याचे नमूद केले. तांत्रिक सत्रात तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. सेल्वी जोस यांनी संशोधनाच्या विविध शास्त्रीय पाय-या स्पष्ट करून संशोधनाद्वारे कसे नवे सिद्धांत आपल्याला मांडता येतात याची माहिती देत त्यांनी संशोधकांनी आपले ज्ञान दैनंदिन ‘अपडेट’ केले पाहिजे, असे आवाहन केले.
डॉ. उशोषि गुहा यांनी संशोधनासंदर्भात ‘क्रिएटिव्ह’चे अधिकार काय असतात आणि आपल्या कल्पना ह्या कशा आपण संरक्षित करू शकतो याकडे लक्ष वेधून त्यांनी अलीकडे वापरले जाणारे ‘पेटंट’,’ट्रेडमार्क’ व ‘कॉपीराईट’ या संदर्भात विस्तृत माहिती दिली . डॉ. तपन दत्ता यांनी संशोधनाकरिता लागणारे विविध ज्ञानाचे स्त्रोत कसे घ्यावेत, हे स्त्रोत घेताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि संशोधकानी स्त्रोत घेतल्याची शास्त्रीय मांडणी प्रबंधात कशी करावी यावर प्रकाश टाकला. Academic research methodology
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.
worker fakes assault to steal employers money : चंद्रपूर शहरात गुरुवारी २० मार्चला संध्याकाळी शहरातील स्क्रॅप व्यापारी आणि पोलिसांसमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला, जेव्हा व्यापाऱ्याच्या नौकराने स्वतःवर मिरची पूड टाकून १७ लाख रुपये लुटल्याचा बनाव रचला. employee staged robbery
शहर पोलिसांनी सखोल तपास आणि नौकराची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने अखेर कबूल केले की हे सर्व पैसे हडप करण्याच्या उद्देशाने त्यानेच केले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रसिद्ध स्क्रॅप व्यापारी हबीब दाऊद मेमन यांनी आपल्या नौकर रफिक शेख याला १७ लाख रुपये घरपोच करण्यासाठी दिले. मात्र, रफिक शेखने हे पैसे घरी न नेता, घुटकाला वॉर्ड येथील आंबेकर ले-आऊट परिसरात स्वतःवरच मिरची पूड फेकून अज्ञात व्यक्तींनी पैसे लुटल्याचा बनाव केला.
यानंतर, घाबरलेल्या नौकराने आपल्या मालकाला फोन करून लुटीची माहिती दिली. हबीब दाऊद मेमन यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. worker fakes own assault for money
पोलिसांचा तपास आणि सत्य उघड
शहर पोलिसांनी त्वरित कारवाई करत तपास सुरू केला. संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी नौकराची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, नौकर रफिक शेखने अखेर कबुली दिली की, १७ लाख रुपये लाटण्यासाठी त्यानेच हा बनाव केला होता.
या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून, पोलिसांची कारवाई सुरू आहे.
Chandrapur Mahakali Yatra preparation : चंद्रपूर शहरात “देवी महाकाली” यात्रेस 3 एप्रिलपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने चंद्रपूर मनपा प्रशासनद्वारे तयारी करण्यात येत आहे.
महानगरपालिका प्रशासनातर्फ़े यात्रा मैदानाला व्यवस्थेच्या दृष्टीने विविध भागात विभाजित करण्यात येत आहे.यात्रा मैदानात जाण्यास अतिरीक्त रस्ते तयार करण्याचे काम प्रस्तावित असुन झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून नदी पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे, बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई व सपाटीकरण करून याच भागात भक्तांकरिता मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात 2 हजार लिटरची क्षमता असलेल्या 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येणार आहे. Chandrapur Mahakali Yatra facilities
नदीचे स्वच्छ पाणी मिळण्यास तात्पुरते बंधारे उभारण्याचे काम सुरु असुन भाविकांना आंघोळीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरद्वारे आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुलभ शौचालय, प्री कास्ट व फिरते शौचालय यांची व्यवस्था केली जात आहे. भाविकांकरीता यात्रा परिसरात मंडप तसेच बैल बाजार परीसर, पंजाबी वाडी व संपूर्ण यात्रा परीसरात विदयुत व्यवस्था उभारली जात आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असुन वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे मिळुन 14 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी असल्याने पुर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यास 2 कंट्रोल रूम उभारण्यात येत असुन संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही निगराणीखाली असणार आहे.स्तनपानासाठी नियंत्रण कक्षलगत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.यात्रेत खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स लावण्यात येतात या स्टॉल्सला परवानगी देणे व त्यांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे तसेच स्वच्छता कर्मचारी पुर्ण वेळ कार्यरत असणार आहेत. सदर महाकाली मंदिर यात्रा 15 एप्रिल पर्यंत सुरु राहणार असुन या उत्सवादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
परवानगी आवश्यक – महाकाली यात्रा परिसरात ज्या दुकानदारांना आपले दुकान लावायचे आहेत त्यांना मनपाच्या झोन ऑफीस मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे कारण जर नोंदणीकृत असेल तर ती अधिकृत माहीती मनपाकडे उपलब्ध राहील व दुकानदारांना यात्रेच्या दिवसांपुरती ठराविक जागा मिळेल.यात्रेत रस्त्यावर तथा मंदिर परिसरात दुकाने लावण्यास पूर्णपणे बंदी लावण्यात आली असुन दुकानदारांसाठी वेगळी जागा देण्यात येणार आहे जेणेकरून परिसरात स्वच्छता राहावी व गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे. Chandrapur Mahakali Yatra temporary shops
भोजनदान करायचे तर परवानगी आवश्यक – यात्रा परिसरात जर स्वयंसेवी संस्था,व्यक्तींना शीतपेये,भोजनदान करावयाचे असेल तर त्यासाठीही मनपाकडुन रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. Chandrapur Mahakali Yatra food stalls
महाकाली यात्रेत बर्फी बनविणाऱ्यांसाठी वेगळी जागा – बर्फी बनविणाऱ्यांसाठी वेगळी जागा मनपातर्फे उपलब्ध करून दिली जाणार असुन महाकाली यात्रा परिसरात त्यांना दुकाने लावता येणार नाही.
वाहनतळ व्यवस्था – गौतम नगर (रेल्वे पुलाकडुन),नायरा पेट्रोल पंप मागे (बायपास रोड)सिद्धार्थ स्पोर्टींग क्लब,डी.एड कॉलेज बाबुपेठ,चहारे पेट्रोल पंप मागील जागा,कोनेरी ग्राउंड या ठिकाणी वाहने ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. Chandrapur Mahakali Yatra parking
Chandrapur property tax seizure : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 31 मार्चपुर्वी अधिकाधिक मालमता कर वसुलीचे ध्येय समोर ठेऊन नियोजन करण्यात आले असुन मनपाची पथके थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुली करीत आहेत. 31 मार्चपर्यंत शास्तीवर 25 टक्के सूट देण्यात आली असुन तरीही कर भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील व जप्त केल्या जात आहेत.नुकतेच एमईएल प्रभागातील तुकडोजी महाराज सेवा समिती इथे 13 गाळे सील करण्यात आले आहे.
प्रत्येक झोनमध्ये 5 याप्रमाणे 15 व मार्केट वसुलीसाठी 2 याप्रमाणे 17 पथकांवर वसुलीची जबाबदारी असुन आतापर्यंत 56.33% टक्के वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कराची थकीत व चालु मागणी मिळुन एकूण 80 कोटी 58 लक्ष रुपयांची मागणी आहे त्यातील थकीत व चालु मिळुन 45 कोटी 70 लक्ष रुपयांची वसुली झाली आहे. तिन्ही झोनमधील अनेक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असुन कर भरणा न करणाऱ्या 1 हजारांवर मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे. थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत आहे. Chandrapur property tax discount
यापूर्वी नियमित व आगाऊ कर भरणा करणाऱ्यांना चालु वर्षाच्या मागणीत 10 टक्के सूट देण्यात आली होती तसेच थकबाकीदारांना 15 फेब्रुवारी पर्यंत 50 टक्के शास्तीत सवलत देण्यात आली होती.ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. Chandrapur property tax deadline
ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकवित आहेत त्या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
land acquisition compensation update : बल्लारपूर नॉर्थ वेस्ट प्रकल्पातील, कोलगांव येथील सर्व उर्वरित जमीन प्रकल्पग्रस्तांचे वतीने शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा भव्य नागरी सत्कार दि. १७ मार्च रोजी संपन्न झाला याप्रसंगी माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे व सुदर्शन निमकर, वाघुजी गेडाम, राजु घरोटे, कोलगांवच्या सरपंच अनिताताई पिंपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, मधुकर नरड, अरूण मस्की, संजय पावडे व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. land acquisition for mining projects
धोपटाळा भुमिगत ते खुली खाण प्रकल्पाकरिता ८१० हेक्टर जमीन अधिग्रहीत झाली ज्यामध्ये घोपटाला, सास्ती, भडंगपूर सह कोलगांव येथील जवळपास २४५ हेक्टर जमीन अधिग्रहण झाली. परंतु उर्वरित ३३७ हेक्टर जमीन शिल्लक राहिली होती व मुळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पातील डम्पिंग व वर्धानदी लागून असल्यामुळे वारंवार निर्माण होणारी पूर परिस्थिती यामुळे उर्वरित जमिनीवर शेती करणे हे केवळ अशक्य होणार होते आणि गावकऱ्यांसाठी सुध्दा ही गोष्ट संभाव्यतः प्राणहानिकारक उरणारी होती विद्यमान उपसरपंच पुरुषोत्तम लांडे व सर्व गावकऱ्यांनी अहीर यांचे समक्ष ही समस्या उपस्थित केली व उर्वरित शेतीचे अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन या दोन्ही समस्या अतिशय ताकदीने लावून धरल्या. Hansraj Ahir latest news
अहीर यांनी उर्वरित शेतजमिनीच्या समस्येला व भविष्यात गावकऱ्यांच्या जीविताला होणारा संभाव्य धोका ओळखून तात्काळ वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. धोपटाला भुमिगत ते खुली खाण हा मुळ प्रकल्पच सेक्शन ९ होऊनही व्यवहार्य ठरत नसल्यामुळे खुप मोठी अडचण या प्रकल्पात आणि गावासाठी निर्माण झाली होती. परंतु शेतकऱ्याचे खरे कैवारी असलेले अहीर यांनी कोल मंत्रायल, कोल इंडिया, वेकोलि मुख्यालय क्षेत्रीय कार्यालय या स्तरावर वारंवार बैठका घेऊन, कॉस्ट प्लसच्या कारणाने अडकलेला मूळ प्रकल्प वेकोलि बोर्डातून पास करवून घेतला. त्यातील आर्थिक मोबदला, नोकरीचे फायदे या गोष्टी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या व सोबतच उर्वरित कोलगांव जमीन अधिग्रहण व गाव पुनर्वसन या विषयासाठी सतत वरिष्ठ पातळीवर बैठका घेऊन बल्लारपूर नॉर्थ वेस्ट या प्रकल्पात ३६० हेक्टर अधिग्रहीत जमिनीत कोलगांव येथील ३३७ हेक्टर जमीन घेण्यास वेकोलिस भाग पाडले.
या भीष्म कार्यासाठी कृतज्ञ शेतकऱ्यांनी अहीर यांचा गावात भव्य मिरवणूकीसह, नागरी सत्कार करून शेतकऱ्यांचे प्रतिक असलेला चांदीचा नांगर, शाल, श्रीफळ आणि भव्य हार घालून सत्कार केला. यावेळी प्रास्ताविकातून कोलगांवचे उपसरपंच पुरूषोत्तम लाडे यांनी समस्त गावकऱ्यांसमोर काही वर्षांपूर्वी प्रतिपादन केल्यानुसार, मुळ प्रकल्प यशस्वी करणे, उर्वरित जमीन अधिग्रहण करणे, गावाचे पुनर्वसन करणे या संपूर्ण कार्यासाठी गावाचे वतीने अहीर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. land acquisition compensation for coal mining in Maharashtra
अहीर यांनी यावेळी, मागील २५ वर्षांपासून आपण सतत शेतकऱ्यांसाठी मैदानात असून, भविष्यात देखील पूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहण्याचे उद्द्घोषित केले तसेच या जमिनी आपण वडीलोपार्जितरित्या कसत आलेलो आहोत, आपणांपैकी कोणीही व्यापार किंवा सावकारी पध्दतीने जमिनी हडपून मालक झालेलो नाही, आपणा सर्वांची नाळ जमिनीशी जुळलेली आहे. त्यामुळे आपण खरे शेतकरी असल्याचा अभिमान बाळगून गावकऱ्यांनी जरी संपूर्ण शेती अधिग्रहीत झाली असली तरी शेतकरी पुत्रांनी आपले शेतीचे कौशल्य लोप न पावण्यासाठी अधिग्रहणातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात दुसरीकडे शेती घेवून शेतकरी असल्याचा आत्मसन्मान बाळगावा व कृषीप्रधान देशाची सर्वचा सेवा करावी. भविष्यात अधिग्रहीत जमिनीसाठी वाढीव दर मागण्याचे सुतोवाच सुध्दा अहीर यानी केले.कार्यकमाचे संचालन प्रदीप बोबडे यांनी केले तर यावेळी अॅड. प्रशांत घरोटे व माजी आमदारद्वय अँड. संजय धोटे व सुदर्शन निमकर यांचे सत्कारपर भाषण झालीत.