Blog

  • Reward for reporting illegal sonography । चंद्रपूर शहरात धडक मोहीम – अवैध सोनोग्राफी केंद्रे निशाण्यावर!

    Reward for reporting illegal sonography

    Reward for reporting illegal sonography : चंद्रपूर 1 एप्रिल – गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणे,गर्भपात करणे कायदान्वये गुन्हा आहे. मात्र त्यानंतरही राज्यात अश्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता शासनाद्वारे कठोर पाऊले उचलण्यात येत असुन प्रसुतीपूर्व निदानतंत्र प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या वतीने ‘आमची मुलगी’ ही वेबसाईट व टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून यावर अवैध सोनोग्राफी केंद्राची तक्रार करता येते. अशा सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्या खबरी व्यक्तीस 1 लाख रुपयांचे बक्षीस शासनातर्फे व स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस 1 लाख शासनातर्फे तर 25 हजारांचे बक्षीस चंद्रपूर मनपातर्फे देण्यात येते. Government action against foeticide

    बल्लारपुरातील तहसीलदाराला २ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक


       समाजात अजूनही भ्रूणहत्या करणाऱ्या प्रवृत्तीची कमी नाही. मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी होत आहे. परंतु त्यानंतरही सोनोग्राफी केंद्रात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 1994 चे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे असे कृत्य करण्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती, पुस्तके, प्रकाशने, संपादक, वितरक आदींची माहिती आरोग्य विभागाच्या टोल फ्री क्र.18002334475 या क्रमांकावर नागरिकांनी नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर मनपा आरोग्य विभागाने केले आहे.  

           
       गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित मनपा आरोग्य विभागास संपर्क करून तक्रार दाखल करावी. अवैध गर्भलिंग निदान केंद्राची माहीती पुराव्यासहित दिल्यास व माहीती खरी निघाल्यास व यासंदर्भात संबंधित डॉक्टर विरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतरच  तक्रारकर्त्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची नियमात तरतूद असुन अशी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते त्यामुळे न घाबरता गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहीती देण्याचे आवाहन चंद्रपुर मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.      

    चंद्रपुर शहरात डीकॉय मोहीम –
      अवैध गर्भलिंग निदान टाळण्यासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे “डीकॉय” मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एका गर्भवती महिलेला संशयित केंद्रावर पाठवले जाते. जर ते केंद्र अवैध गर्भलिंग निदान करण्यास तयार झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाते.स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेचे नाव गुप्त ठेवले जाऊन संबंधित केसमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता महिलेची उपस्थिती राहिल्यास व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत झाल्यास प्रत्येक बनावट (डीकॉय) केसेसमधील उपस्थित डीकॉय महिलेला 1 लाख शासनातर्फे तर चंद्रपूर मनपातर्फे 25 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येते.  Anti-sex determination laws

    दंड आणि शिक्षा?
    गर्भलिंग निदान अथवा गर्भपात केल्यास संबंधित व्यक्तींना 3 वर्षे कारावास व 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास ५ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड होऊ शकतो.गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.  Sex determination test punishment
    .  
    गर्भलिंग निदान कधी करता येते?
    गर्भधारणेच्या साधारण 3 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भलिंग ओळखता येतो,परंतु गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा 2003 कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

    सोनोग्राफी केंद्रांची तपासणी –
    मनपा कार्यक्षेत्रात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येते. शहरात एकुण 74 सोनोग्राफी केंद्र व 43 वैद्यकीय गर्भपात केंद्रे आहेत. मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दर 3 महिन्यांनी या सर्व सोनोग्राफी केंद्र व वैद्यकीय गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येते.मागील काही वर्षात यासंबंधी एकही तक्रार आरोग्य विभागास प्राप्त झालेली नाही – डॉ. नयना उत्तरवार (वैद्यकीय आरोग्य अधिकारी,मनपा)   

    अवैध केंद्राची माहिती कुठे द्याल? –
    1. टोल फ्री क्र. 104
    2. हेल्पलाईन क्र. 18002334475
    3. www.amchimulgimaha.in
    4. मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010
    5. व्हाट्सअप क्रमांक 8530006063

  • Tehsildar caught taking bribe । बल्लारपूरचे तहसिलदार लाच घेताना रंगेहात! महसूल विभागात खळबळ

    Tehsildar caught taking bribe

    Tehsildar caught taking bribe : चंद्रपूर जिल्हा गौण खनिज संपत्तीने संपन्न जिल्हा आहे त्यामुळे अवैध उत्खनन याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते, मात्र प्रशासन त्यावर कारवाई न करता डोळेझाक करीत असल्याचे चित्र पुढे आले आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर येथे याउलट एक प्रकरण उघडकीस आले असून त्यामध्ये गौण खनिज प्रकरणी कारवाई न करणे बाबत तहसीलदार यांनी २ लाख २० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून तलाठी हे रजेवर असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.

    चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक

    बिल्डिंग मटेरियल सप्लाय चे काम करणारे एक व्यक्ती आपल्या शेतातील माती\मुरूम काढून लेव्हलिंग चे काम करीत होते त्यावेळी कवडजई साजाचे तलाठी सचिन रघुनाथ पुळके व तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांनी मुरूम काढण्याची परवानगी नसल्याने २ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त करण्याची तयारी दर्शविली त्या व्यक्ती/तक्रारदार यांचेवर कसलीही कारवाई न करण्याकरिता २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. Bribery in revenue department

    तक्रारदार यांनी त्याचदिवशी म्हणजे २३ मार्च ला तहसीलदार व तलाठी यांना १ लाख १९ हजार ९०० रुपये दिले, उर्वरित १ लाख रुपयांसाठी तहसीलदार व तलाठी यांनी तक्रारदाराच्या मागे तगादा लावला असता त्यांच्या त्रासाला कंटाळून २६ मार्चला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. Maharashtra government officer bribe

    तडजोडीतील १ लाख रुपये स्विकारण्याची तयारी बल्लारपूर चे तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांनी मान्य केल्याच्या कारणावरून लाच प्रकरणात तहसिलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुळके यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
    ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, संजय पुरंदरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे,अमोल सिडाम,प्रदीप ताडाम,सतीश सिडाम यांनी केली

  • road dust pollution । चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक! रस्ते खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य

    road dust pollution

    चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक: रस्ते खोदकामामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळला

    road dust pollution – चंद्रपूर: मार्च महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, प्रमुख कारणांमध्ये चुकीच्या पद्धतीने केलेले रस्ते खोदकाम आणि अन्य नागरी विकास प्रकल्पांचा समावेश असल्याचे पर्यावरण अभ्यासक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. impact of road construction on air quality

    चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलं सौरग्राम कोणतं?

    मार्चमधील प्रदूषणाची भीषण स्थिती

    प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, मार्च महिन्यातील ३१ पैकी ०९ दिवस अत्यंत खराब प्रदूषण, १८ दिवस मध्यम दर्जाचे प्रदूषण आणि केवळ ०४ दिवस समाधानकारक हवेची गुणवत्ता होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही प्रदूषणाचा स्तर सातत्याने उच्च राहिला होता, मात्र मार्चमध्ये यामध्ये आणखी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. air pollution due to road construction

    प्रदूषण निर्देशांकाचा आढावा

    शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) खालीलप्रमाणे नोंदवण्यात आला:

    • ०-५० (Good): एकही दिवस नव्हता
    • ५१-१०० (Satisfactory): ०४ दिवस
    • १०१-२०० (Moderate): १८ दिवस
    • २०१-३०० (Poor): ०९ दिवस

    विशेषतः, संपूर्ण महिन्यात २६ दिवस १० मायक्रोमीटर आणि ५ दिवस २.५ मायक्रोमीटर आकाराचे धूलिकण हवेतील प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आढळले. ही परिस्थिती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

    रस्ते खोदकाम आणि प्रदूषण वाढीचा संबंध

    पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांच्या मते, शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले रस्ते खोदकाम नियमांचे पालन न करता केल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे रस्ते खोदताना पाणी मारण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे केली जात नसल्यामुळे धूळ हवेत मिसळते आणि प्रदूषणात वाढ होते.

    प्रदूषण वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

    प्रदूषणाच्या या वाढत्या पातळीमुळे श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्या असून, अनेकांना दम्याचे (Asthma), ब्रॉन्कायटिस (Bronchitis), टीबी, हृदयविकार आणि मानसिक आजार होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. effects of construction dust on health

    प्रदूषणाचे प्रमुख कारणे

    1. वाहनांची संख्या वाढ आणि धूर उत्सर्जन
    2. रस्ते बांधकाम व गैरव्यवस्थित खोदकाम
    3. कचऱ्याचे खुले ज्वलन
    4. थर्मल पॉवर प्लांट व उद्योगांमधून बाहेर पडणारे धूर आणि वायू
    5. शहरातील वाढती धूळ आणि अस्वच्छता

    प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना

    1. वृक्षारोपण आणि हिरवळ वाढवणे
    2. सायकल आणि बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर प्रोत्साहित करणे
    3. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करणे
    4. रस्ते खोदकामादरम्यान नियमित पाणी फवारणी करणे
    5. कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावणे
    6. उद्योगांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर निर्बंध लागू करणे
    7. स्मॉग टॉवर्स, फॉग मशीन आणि कृत्रिम पावसाचा वापर करणे

    प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाची जबाबदारी

    चंद्रपूर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत प्रदूषित शहरांच्या यादीत सामील आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही बांधकाम कंपनीवर पर्यावरण नियम लागू करणे आवश्यक आहे. प्रशासनाने कडक उपाययोजना राबवून प्रदूषण नियंत्रणात आणण्यास प्राधान्य द्यावे, अशी नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांची मागणी आहे.


    चंद्रपूरमध्ये वाढत्या रस्ते खोदकामांमुळे आणि शहरातील इतर विकास प्रकल्पांमुळे प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात प्रदूषणाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही प्रदूषण नियंत्रणासाठी पुढाकार घ्यावा आणि प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून तातडीने पावले उचलावीत.

  • Avinash Poiankar Surjagad Pustak । “अविनाश पोईनकर यांचे सुरजागडवरचं संशोधन: वाचकांना अंतर्मुख करणारं पुस्तक!”

    Avinash Poiankar Surjagad Pustak

    Avinash Poiankar Surjagad Pustak : चंद्रपूर : चंद्रपूर येथील प्रथितयश युवा लेखक, संशोधक, मुक्त पत्रकार अविनाश पोईनकर यांच्या ‘सुरजागड विकास विस्थापन?’ या बहुचर्चित संशोधन पुस्तकाचे नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित समता महोत्सवात प्रकाशन करण्यात आले. Surjagad Khan Prakalp Parinam

    चंद्रपूर जिल्ह्यातील लाल मिरची संकटात

    प्रसिद्ध अर्थतज्ञ व अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोरचे प्रा.नीरज हातेकर, जनतेचा महानायकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते सुनील खोब्रागडे, भटक्या-विमुक्त चळवळीतील अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव, अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच रजनी पवार, हेमलकसाचे सामाजिक कार्यकर्ते चिन्ना महाका, कोरो संस्थेच्या मुमताज शेख, सुप्रिया जाण, कुणाल रामटेके, मेळघाटातील सामाजिक कार्यकर्त्या व सरपंच गंगा जावरकर, प्रमोद काळे, तुकाराम पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. Surjagad Lohkhanij Prakalp

    नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाचे वास्तव मांडणारे हे महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकाला प्रख्यात विचारवंत व संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांची प्रस्तावना व नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांचे ब्लर्ब आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी, संविधान व नागरी हक्क विश्लेषक ॲड.असीम सरोदे, ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे महत्त्वाचे अभिप्राय आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे, सुजाता खांडेकर, अंजली मायदेव, संध्या नरे-पवार, सुभाष वारे, अभिजीत कांबळे, दिशा पिंकी शेख, डॉ. चंद्रिका परमार, भीम रासकर, डॉ. विभूती पटेल, सुरेश सावंत, संजय सोनवाणी आदी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

    लेखक अविनाश पोईनकर आदिवासी व ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात राहून शोध पत्रकारितेच्या अंगाने त्यांनी हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. सुरजागडसह प्रस्तावित खाणींमुळे स्थानिक आदिवासींवर होणारा परिणाम, भांडवलशाही धोरणे, माओवाद, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची भूमिका तसेच आदिवासींचे जल, जंगल, जमीन विषयक कायदे व त्याची सद्यस्थिती, आंदोलने व सर्वसामान्य आदिवासींची होणारी गळचेपी या पुस्तकात सविस्तर मांडली आहे. या संशोधनासाठी पुणे येथील साधना साप्ताहिकाने तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती दिली होती. पुणे येथील हर्मिस प्रकाशनाने हे संशोधन पुस्तक प्रकाशित केले आहे.

  • red chilli market price today । “गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारी मिरची, स्वतःच रडली!”

    red chilli market price today

    चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे संकट – मिरची उत्पादकांना मोठा फटका

    red chilli market price today : चंद्रपर : (01 एप्रिल 2025) लाल मिरचीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पारंपारिक पिकाऐवजी शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. परंतु खर्च जास्त आणि उत्पन्न् कमी होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादक संकटात सापडले आहेत. सध्या भाव पडल्याने लाल मिरची झाडालाच आहे. तोड्याचा खर्च शेतकरऱ्यांना परवडणारा नसल्याने लाल मिरची झाडालाच आहे. मिरचीचातोडा करायचा कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. Chandrapur Mirchi Sheti

    चिमूर हादरले, विहिरीजवळ झोपला सकाळी मृतदेहचं आढळला


    चंद्रपूर जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. परंतु परंपरागत काळातपासून धानाचेच उत्पनादन घेत असल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. त्यामुळे पारंपारीक पिकाऐवजी नवनवीन पिकाचे लागवड करण्यास शेतकरी पुढे येत आहे.धानासह कापूस, सोयाबीन, मिरची व बागायती पिकांकडे शेतकरी वळलाआहे. विशेष म्हणजे राजूरा, कोरपना, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी या परिसरात कापूस, सायोबीन, मिरची व बागायती पिकांची लागवड केली जात आहे. या वर्षात राजूरा, कोरपना सह जिल्ह्यात सुमारे बाराशे हेक्टरमध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. Mirchi Bazar Bhav Mahiti

    सध्या मिरचीचा एक तोडा संपला आहे तर दुसरा तोडा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु तोडा होण्याच्या अगोदरच मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातून लाल मिरचीची निर्यात नागपूर सह अन्य राज्यात होते. परंतु अचानक भाव पडल्याने मिरची उत्पादक संकटात सापडला आहे. पहिल्या तोड्यात लाल मिरचीला 10 हजारापर्यंत भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला तोडा आटोपून घेतला. त्यानंतर दुसऱ्या तोड्याची तयार सुरू असताना अचानक भाव पडले. फक्त् 5 ते 7 हजारावर आलेत. त्यामुळे मिरचीचा दुसरा तोडा करायचा कि नाही असा प्रश्न मिरची उत्पादकांना पडला आहे. red chilli cultivation cost per acre


    लागवड केल्यानंतर इतर पिकांपेक्षा मिरचीची विशेष काळजी घेतली जाते. या पिकाला किडींचा जास्त धोका असतो. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करतात. बुरशीजन्य किडींचा धोका हा नेहमीच असल्याने शेतकरी विशेष काळजी घेत असतात. शिवाय हंगामभरही मशागत करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात यावर खर्च होतो. मिरचीच्या तुलनेत अन्य पिकांना भाव जास्त नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हलाखीची होत आहे. त्यामुळेच शेतकरी मिरची सारख्या नगदी पिकाकडे वळत आहे.


    मिरचीचा तोडा करण्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे भाव पडल्याने लाल मिरचीचा तोडा करायची कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तोड्या अभावी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लाल मिरची झाडालाच दिसून येत आहे. प्रत्येक वेळी गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणारी लाल मिरची यावेळी स्वत:च झाडाला लाल होत आहे. पडलेल्या भावाने उसळी घेतली नाही तर लाल मिरची उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. red chilli farming profit


    “दरवर्षी मी मिरचीची लागवड करतो. हे नगदी पीक असून लाल मिरचीला भाव चांगला मिळतो. मात्र यावर्षी सुरूवातीपासून लाल मिरचीचे भाव पडले आहेत. या वर्षी पहिला तोडा आम्ही 10 हजार प्रती क्विंटल प्रमाणे विकला. दुसऱ्या तोडा तोडण्याची वेळ आली आहे मात्र भाव 4 ते 5 हजार वर आले आहे. त्यामुळे मिरची लागवडीचा खर्चही निघणार नसल्यामुळे झाडाला असलेली लाल मिरची तोडायची की नाही असा प्रश्न आमच्या समोर आहे. ”
    : संतोषकुमार पावडे, शेतकरी बिबी (कोरपना)


  • Ashish Shelar । महाकाली यात्रेसाठी विशेष सुविधा! चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांसमोर महत्त्वपूर्ण मागण्या

    Ashish Shelar Minister for Information Technology of Maharashtra

    Ashish Shelar : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या चंद्रपूर दौर्‍यानिमित्त भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे श्री माता महाकालीची मूर्ती, अम्मा का टिफिन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि विकासविषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमीसाठी ५ कोटी निधी तसेच महाकाली यात्रेसाठी दरवर्षी २ कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्याची मागणी करण्यात आली. Mahakali Yatra Chandrapur fund

    याप्रसंगी अजय जैस्वाल, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथ सिंग ठाकूर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, श्याम कनकम, पुरुषोत्तम राऊत, विठ्ठल डुकरे, पूनम तिवारी, शेखर शेट्टी, अमोल शेंडे, विश्वजित शहा, जितेश कुळमेथे, प्रतीक शिवणकर, करण बैस, सुमित बेले, हरमन जोसेफ, विनोद शेरकी, शशिकांत म्हस्के, विकास खटी, संजय निकोडे, अभिजित पोटे, राजू व्यंकटवार, कार्तिक बोरेवार, महेश गहुकर, संजय महाकालीवार, सुरेंद्र अंचल, रुपेश पांडे, ताहीर हुसेन, राकेश पिंपळकर, करण नायर, गुड्डू सिंग, मंगेश अहिरकर, अक्षय घोटेकर, नीलिमा वनकर, विमल काटकर, शालू कनोजवार आदी उपस्थित होते.

    झाडाखाली निवांत झोपला, मात्र दुसऱ्या दिवशी घडलं असा भयावह

    भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभेच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमीच्या संवर्धनासाठी चंद्रपूर येथे रंगमंचाच्या बांधकामासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील लोककलेचा अनमोल ठेवा असून, या पारंपरिक नाट्यप्रकाराच्या जतन व प्रसारासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. Chandrapur tourism festival funds

    ashish shelar in chandrapur

    तसेच, चंद्रपूरमधील श्री महाकाली माता यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षेसाठी दरवर्षी २ कोटी निधीची तरतूद करण्याची विनंती करण्यात आली. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्वच्छता, वाहतूक नियोजन तसेच सुरक्षाव्यवस्थेवर विशेष भर देण्याची गरज असल्यामुळे दरवर्षी हा निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • Youth death in well Chimur । चिमूर हादरले! दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह

    Youth death in well Chimur

    Youth death in well Chimur : चिमूर [३१ मार्च ]: चिमूर तालुक्यातील मदनापूर शिवारात आज सकाळी एका युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल मंगल शेंडे (वय २१, रा. मदनापूर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.

    चंद्रपुरातील नामवंत डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

    मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा गेल्या दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याचे आई-वडील मदनापूर हेटी येथे राहतात. राहुल हा मदनापूर येथील आजीकडे राहून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मदनापुरातील बिरजे यांच्या विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत तो झोपला होता. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना विहिरीत राहुलचा मृतदेह तरंगताना आढळून आला. Chimur police investigation death

    या घटनेची माहिती मिळताच मदनापूर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

    राहुलच्या मृत्यूमुळे मदनापूर गावात शोककळा पसरली आहे. चिमूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

  • Chandrapur solar village । चंद्रपूर जिल्ह्यात क्रांती! सूर्याच्या ऊर्जेवर झगमगले सादागड हेटी गाव!

    Chandrapur solar village

    Chandrapur solar village : चंद्रपूर : आज दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड हेटी गावाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा बहुमान मिळवला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्य मार्गदर्शक मा. मुख्य अभियंता श्री. हरीश गजभे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे मॅडम यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेश त्वरित मिळवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना सालुंखे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Sadagad Heti solar initiative

    एसी बसविण्यासाठी चंद्रपुरातील डॉक्टरची ३५ लाखांनी फसवणूक

    याशिवाय, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक प्रयत्न केले. तसेच, दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूरचे व्यवस्थापक श्री. सूरज बोमावर यांच्या त्वरीत प्रतिसादाने गावकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील सादागड हेटी गावाने ‘सौरग्राम’ बनण्याचा मान पटकावला आहे. Maharashtra rural solar power

    गावातील सौरऊर्जा प्रकल्पाचा आढावा सादागड हेटी हे गाव मूल पासून अवघ्या १० किमी अंतरावर असून सावली तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. गावात एक प्राथमिक शाळा आणि एकूण १९ घरे आहेत. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत, येथील प्रत्येक घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेसाठी देखील स्वतंत्रपणे १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प (विना अनुदान) उभारण्यात आला आहे. यामुळे गावात एकूण २० किलोवॅटची सौरऊर्जा निर्मिती केली जाणार असून, महिन्याला सरासरी २४०० युनिट वीज निर्मिती होईल.

    योजनेंच्या अंमलबजावणीतील सहकार्य आणि पुढील वाटचाल संपूर्ण गावाला सौर ऊर्जेने स्वयंपूर्ण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. केवळ २० दिवसांत सर्व अडचणी दूर करत, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया आणि त्यांची टीम, मंडळ कार्यालयातील श्री. राठोड (उपकार्यकारी अभियंता), तसेच संबंधित सोलर एजन्सी यांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला. दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चंद्रपूर यांनी आवश्यक वित्तसहाय्य पुरवल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात आला. Government solar schemes for rural areas

    सादागड हेटी गावातील सर्व रहिवासी आदिवासी समाजाचे असून, त्यांच्या गावाने जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’ होण्याचा मान मिळवल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. शासनाच्या या योजनेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून, हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

  • Ram Navami rally route | रामनवमी शोभायात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स!

    Ram Navami rally route

    Ram Navami rally route : आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सण उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने आज (दि.31) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी रामनवमी शोभायात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीचा आढावा घेतला. Ram Navami celebrations guide

    एसी बसविण्याच्या नावाखाली चंद्रपुरात डॉक्टरची 35 लाखाने फसवणूक

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, शैलेश बागला आदी उपस्थित होते.

    रामनवमी शोभायात्रेनिमित्त आयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय रहावा, या उद्देशाने आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, रामनवमी हा उत्सव सर्व भाविकांच्या श्रध्देचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे यासाठी संपूर्ण सहकार्य राहील. अतिशय उत्साहात आणि आनंदात रामनवमी साजरी करावी. रॅलीची वेळ वाढवून मिळण्याबाबत विचार-विमर्श करून आणि नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. शासन – प्रशासनाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. Chandrapur festival events

    जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात साज-या होणा-या सर्वधर्मीय सणांबाबत नुकतीच जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राहण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला आणि शांतता समितीच्या सदस्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

    मनपा आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे युध्दस्तरावर सुरू असून शोभायात्रेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मजबुत करून दिला जाईल. तसेच फॉगिंग मशीनने रस्त्यावरील धूळ खाली बसण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येईल. सोबतच रस्त्याची स्वच्छता आदी कामे मपनाने हाती घेतली आहेत.

    यावेळी आयोजन समितीच्या सदस्यांनी देखील सुचना केल्या. बैठकीला विश्वास माधशेट्टीवार, रोडमल गहलोत, डॉ.गोपाल मुंधडा, अजय वैरागडे, जीतेन्द्र जोगड़, रविन्द्र गुरुनुले, अमित विश्वास, आशिष मुंधडा, प्रवीण खोब्रागडे, सुहास दानी, विजय डोमलवार, लखनसिंग चंदेल, विवेक होकम आदी उपस्थित होते.

  • Blue Star AC cheating case | चंद्रपुरात खळबळ: एसी बसवण्याच्या नावाखाली डॉक्टरांना लाखोंचा गंडा

    Blue Star AC cheating case

    Blue Star AC cheating case : चंद्रपूर : एसी बसविण्याच्या नावाखाली ब्ल्यूस्टार कंपनीच्या मुंबई विभाग प्रतिनिधीसह नागपूर व चंद्रपुरातील एंजटने चंद्रपुरातील एका डॉक्टरची तब्बल ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन शहर पोलिस स्टेशनमध्ये अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गुरुनानक रेफ्रिजेशनचे डिलरचे मालक गगनदीप सैनी, जसबीर सिंग सैनी या चौघांवर बीएनएस ३१८ (४), ३ (५) या कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. नामांकित असणाऱ्या ब्ल्यूस्टार कंपनीच्या प्रतिनिधीकडून झालेल्या या प्रकारामुळे विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न उद्भवत आहे. AC installation fraud Chandrapur

    चंद्रपुरातील दुचाकी प्रकरणात ट्विस्ट, फिर्यादीने शोधला आरोपी


    चंद्रपुरातील एका हृदयरोग तज्ज्ञाचे पडोलीत नव्या रुग्णालयाच्या ब्लिडिंगचे सुसज्ज असे बांधकाम सुरु आहे. २ जानेवारी २०२३ रोजी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी रुग्णालयात बसवावी, असा प्रस्ताव घेऊन ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई विदर्भ विभागाचे प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन, गगनदीप सैनी हे गंजवॉर्ड येथील त्या डॉक्टरच्या रुग्णालयात गेले. Doctor scammed AC installation

    ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर 2 जखमी

    त्यांनी ब्ल्यूस्टार कंपनीची एसी चांगली असल्याचे सांगतिले. त्यांनी कंपनीकडून घेतलेल्या कोटेशनच्या आधारे गुरुनानक रेर्फिरेटर प्रा. लि. चंद्रपूरच्या खात्यावर २५ डिसेंबर २०२३ रोजी ३५ लाख २१ हजार २७३ रुपयांची रक्कम वढती केली. मात्र रक्कम वढती झाल्यानंतर ब्ल्यूस्टार कंपनीचे मुंबई प्रतिनिधी अभिलाश शाहा, कार्तिकेयन गगनदीप सैनी, जसबीर सैनी यांनी लवकरच काम सुरु करु असे आश्वासन दिले.

    थातूरमातूर काम केल्यानंतर काम बंद केले. तेव्हापासून हे सर्वचजण काम करण्यास असमर्थता दर्शवत आहेत. तसेच पैसेही परत देण्यास नकार देत आहेत. अशी तक्रार त्या डॉक्टरांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्याआधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AC installation fraud Maharashtra

    अर्धवट कामानंतर झाले पसार

    त्या डॉक्टरनी ब्ल्यूस्टार कंपनी डिलरच्या खात्यात पैसे वर्ग केल्यानंतर साईटवर काम सुरु केले. वायरिंग व कॉपर पाईपकींचे थोडेफार काम केल्यानंतर काम बंद केले. डॉक्टरांनी विचारणा केली असता, आज उद्या करुन असे सांगून वेळ मारुन नेली. मात्र आता एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असतानाही कामाला सुरुवात केली नाही.

    कंपनी म्हणते पुन्हा पैसे टाका

    चंद्रपूर येथील ब्ल्यूस्टार कंपनीचे डिलर तथा गुरुनानक रेफ्रिजेशनचे मालक हे पैसे देऊनही काम करत नसल्याची माहिती ब्ल्यूस्टारच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी आज उद्या काम करतील असे आश्वासन दिले. त्यानंतर प्रतिसादच देणे बंद केले. मात्र डॉक्टरांकडून दररोज संपर्क करणे सुरु असताना कंपनीचे अधिकारी आता तुम्ही थेट कंपनीकडे पैसे टाका, तेव्हा काम सुरु करु असे सांगत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.

    माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे – जसबीर सिंग सैनी

    डॉक्टरांनी केलेल्या आरोपावर जसबीर सिंग यांनी आपली बाजू मांडली आहे, सदर प्रकरणात माझा काही सहभाग नाही, जे पैसे खात्यात वळविण्यात आले ते खाते माझे नाही, पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केल्यास त्यांना सत्य माहिती कळेल. मी मागील 40 वर्षांपासून चंद्रपुरात एसी चा व्यवसाय करतो, या कालावधीत आम्ही ग्राहकांना चांगले कामे करून दिली आहे, त्यामुळे आमच्या कामापासून ग्राहक खुश आहे.