Blog

  • Protection wall collapse near CSTPS due to rain । वन्यजीव आता तुमच्या दारात! भिंत पडली, प्रशासनाचा कानाडोळा

    Protection wall collapse near CSTPS due to rain

    Protection wall collapse near CSTPS due to rain : चंद्रपूर – वन संपत्तीने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनके वन्यप्राणी वावरतात, वन्यक्षेत्रातून हे प्राणी आता बाहेर निघत आहे कारण जिल्ह्यात वन्यक्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आजची चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे, हे हल्ले कमी व्हावे यावर अजूनही प्रशासनाने ठोस पाऊले उचलली नाही. ग्रामीण भागासह आता शहरातही वन्यप्राणी सहज आपले दर्शन देऊन जातात. wall collapse due to rain

    जनविकास सेनेने उधळल्या नकली नोटा

    शहरातील सीएसटीपीएस वीज केंद्र परिसरात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, या परिसरात अनेक अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे. सीएसटीपीएस ला लागून असलेले राष्ट्रवादी नगर व वृंदावन नगर या भागात वीज केंद्रातून भ्रमंती करीत अनेक वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास येतात, ते प्राणी येऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात आली मात्र २ दिवसांपूर्वी चंद्रपुरात आलेल्या अवकाळी पावसामुळे संरक्षण भिंतीचा तब्बल ५० मीटर पर्यंतचा भाग कोसळला.

    यामुळे वृंदावन व राष्ट्रवादी नगर मधील नागरिक दहशत मध्ये आलेले आहे, कारण संरक्षण भिंतीमुळे वन्यप्राणी या भागात येऊ शकत नव्हते मात्र भिंत कोसळल्याने वन्यप्राणी अगदी सहजपणे या भागात येऊ शकतात. नागरिकांनी याबाबत वीज केंद्राला माहिती देत संरक्षण भिंतीचे पुन्हा बांधकाम करावे यासाठी निवेदन सुद्धा दिले मात्र अजूनही नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. forest animals entering city

    wall collapse due to rain

    संरक्षण भिंत कोसळल्याने परिसरात राहणारे अनेक कुटुंब दहशतीमध्ये आले आहे. यामुळे वीज केंद्र व्यवस्थापनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वृंदावन नगर वासियांनी दिली आहे.

  • POSH Act compliance checklist । चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने घ्यावी ‘POSH Act’ ची गांभीर्याने दखल

    POSH Act compliance checklist

    POSH Act compliance checklist : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हयातील ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत  तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे.

    चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या वाहनावर पैशांचा पाऊस

                 समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांशी  बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून  किमान दोन सदस्य, तसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहिल. Internal Complaints Committee formation

                निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी, (पीओएसएच) ॲक्ट यांचे आदेशान्वये सदर अधिनियमात दिल्याप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिनियमांतर्गत तक्रार करण्यास काही अडचण जात असल्यास संपर्क साधावा.          

               ज्या कार्यालयात दहा पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत किंवा मालकाविरुध्द तक्रार आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  स्थानिक तक्रार  समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी. सदर अंमलबजावणीत कोणी कसुर केल्यास 50 हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतुद कायद्यात नमुद आहे. Steps to establish Internal Complaints Committee

            ज्या आस्थानेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत  तक्रार समिती स्थापन केल्याची महिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, सार्ई बाबा वार्ड, चंद्रपूर येथे किंवा disttwcdocha@gmail.com disttwcdocha@rediffmail.com या संकेतस्थळावर येथे सादर करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

  • Janvikas Sena protest Chandrapur । ‘आमच्या शहराचा विनाश थांबवा!’ – चंद्रपूरमध्ये जनविकास सेनेचं आंदोलन पेटलं

    Janvikas Sena protest Chandrapur

    Janvikas Sena protest Chandrapur : चंद्रपूर : ‘मेन रोड तो झाकी है, पुरा शहर खोदना बाकी है’, महानगरपालिकेच्या वतीने असा लक्षवेधी व खोचक नारा देऊन जनविकास सेनेने गांधी चौकातील मनपा इमारती समोर उभ्या असलेल्या आयुक्त विपिन पालीवाल यांच्या चार चाकी वाहनावर खेळण्यातील नकली नोटांची उधळण केली. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका लाल ब्रिफकेस मध्ये आणलेल्या या नकली नोटा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्ताच्या वाहनावर उधळल्या.

    महाकाली यात्रा – चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    केवळ कमिशनच्या हव्यासापोटी व मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे 506 कोटी रुपयांची नविन भुमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील असा जनविकास सेनेचा दावा आहे. Chandrapur sewage scheme controversy

    pappu deshmukh chandrapur


    नवीन गटार योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील 50 कोटी रुपयांच्या गैर-व्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच 15 वर्षांपूर्वी काम झालेल्या 100 कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले ? याची, 234 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जनविकास सेनेची मागणी आहे. माजी नगरसेवक देशमुख यांनी मनापातील कोट्यावधी रुपयांच्या अनेक घोटाळ्यांची पुराव्यासह शासन-प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर शासनाने अनेक निविदा रद्द केल्या परंतु दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. Pappu Deshmukh Chandrapur


    मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक लक्ष्य सह्यांचे पत्र

    जनविकास सेनेने आज शहरातील गांधी चौकातून महा-स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. या अभियानाला रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला.गोल बाजार व मुख्य रस्त्यावरील दुकानातही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी 1000 च्या जवळपास नागरिकांनी या महा-स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला.
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लक्ष नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्यात येईल. पुढील काही दिवस संपूर्ण शहरात पदयात्रा व कॉर्नर सभा घेऊन एक लक्ष सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सोडणार नाही असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. Chandrapur public protests

    chandrapur sewage scheme controversy


    महा-स्वाक्षरी अभियानासाठी मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे,निर्मला नगराळे, प्रफुल बैरम,इमदाद शेख, अजित दखने, दिलीप होरे, सुरेश विधाते, किशोर जामदार, अशोक दिघिकर, देवराव बोढे, अजय महाडोळे,कुशाब कायरकर, सुधाकर मत्ते, पुरषोत्तम सोयाम,रविंद्र टोंगे, नितिन बनसोड, मनोज भैसारे,पुष्पा मुळे, माया गेडेकर, किरण कांबळे, रेखा टिपले, माया गोडे, अरुणा महातळे, अरुणा मांदाळे, ललिता उपरे, कुसुम वैद्य, रेखा निकुरे, अजय लांडे, नंदू लभाने, सतिश आकनूरवार, नकुल मुसळे, अमोल पांढरे, अंकित पोईनकर, रोहित उमाटे, सुजल पाटील, संदीप कष्टी, सचिन भिलकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

  • Chandrapur traffic update for Mahakali Yatra । चंद्रपूर महाकाली यात्रा 2025: ट्रॅफिक प्लॅन, पार्किंग आणि पर्यायी मार्गांची संपूर्ण माहिती

    Chandrapur traffic update for Mahakali Yatra

    Chandrapur traffic update for Mahakali Yatra : चंद्रपुर शहरात माता महाकाली यात्रेला 3 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. महाकाली यात्रेमध्ये येणा-या भाविकांसाठी एकेरी मार्ग आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीदरम्यान जटपुरा गेट येथे जास्त गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे. Mahakali Yatra Chandrapur

    महाराष्ट्र पोलिस अधिनियम- 1951 च्या कलम 33-(1) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निमार्ण  होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये, म्हणून 3 ते 13 एप्रिल पर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे.

    ताडोबा सफारी आता शहरातून सुरु होणार

    सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील . तसेच अचंलेश्वर गेट ते बागला चौक, अचंलेश्वर गेट ते कोहीनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर के. चौक हा नो पार्कींग झोन  व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गौतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनाकरीता बंद राहणार आहे. Chandrapur traffic update

    नागरिकांसाठी पर्यायी  मार्ग : बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर- हनुमान खिडकी- दादमहल वार्ड  या मार्गाचा  वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चारचाकी वाहनांने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट- गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा. Mahakali Yatra traffic diversion

    यात्रेकरीता येणाऱ्या वाहनाकरीता पार्कींग व्यवस्था : 1. नियोजित वाहनतळांची नावे पुढीलप्रमाणे आहे. कोहीनुर तलाव मैदान येथे जिप कार, (टॅम्पो, आईचर आणि त्यापेक्षा मेाठे जड वाहनांना या पार्कींग स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.) 2. इंजिनिअरींग कॉलेज ते भिवापुर मार्केट रस्त्याच्या दोन्ही बाजुला तेलंगणा व आंध्रप्रदेशातुन येणा-या बसेसची व्यवस्था 3. डी. एङ कॉलेज मैदान (जुनी बाबुपेठ पोलिस चौकीच्या बाजुला) सर्व प्रकारचे वाहन 4. न्यु इंग्लींश हायस्कुल मैदानात राज्य परिवहनच्या बसेस करीता (विश्राम गृह समोर) 5. बैलबाजार पार्कींग क्र.1 व पार्कींग क्र.2 मध्ये सर्व प्रकारचे वाहन 6. नयरा पेट्रोल पंप (बायपास रोड, आंबेडकर चौक)  सर्व प्रकारचे वाहन

  • Tadoba Andhari Tiger Reserve safari । ताडोबाच्या वाघांपर्यंत आता थेट सफर – चंद्रपूर शहरातून क्रुझर सेवा लवकरच!

    Tadoba Andhari Tiger Reserve safari

    Tadoba Andhari Tiger Reserve safari : चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी थेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच क्रुझर सेवा सुरू होणार आहे. महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतल आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. तर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Tadoba jungle safari

    बाबुपेठ मध्ये पाणी बाणी, नागरिकांचे निवेदन


     या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएम चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदिंची उपस्थिती होती.


      ताडोबा हे देशभर प्रसिद्ध असलेले व्याघ्र प्रकल्प असून, येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता. Tadoba tourism


      या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी वन विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत क्रुझर सेवेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाहीबाबत चर्चा केली. या बैठकीत स्कूझरच्या मार्गाची आखणी, वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
      स्कूझर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना शहरातून ताडोबाला जाण्यासाठी सुविधा मिळणार आहे.

    पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, पर्यटकांना प्रवासासाठी सहज सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ताडोबाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यवसायालाही चालना मिळणार आहे. यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “ताडोबा हा चंद्रपूरच्या पर्यटन क्षेत्रातील एक महत्त्वाचा ठिकाण आहे. पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रुझर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा महिन्याभरात सुरू होईल. Tadoba forest safari

    वन विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, महिन्याभरात ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारीला वेग देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सोबत बुकिंग करुन वेळेवर न येणा-या पर्यटकांच्या ठिकाणी दुस-या पर्यटकांना ताडोबा सफारी दिली जाणार आहे, संजय सब्बनवार यांनी तयार केलेली 40×40 फूट लांबीची गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे. तर दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांनी बांबूपासून साकारलेले काष्ठशिल्पांसाठी वन विभागाद्वारे प्रदर्शनी दालन उभारून दिल्या जाणार आहे. आदी निर्णय सदर बैठकीत घेण्यात आले आहे.

  • compassionate appointment process | आमदार सुधाकर अडबाले यांचा पुढाकार – सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत समाविष्ट करण्याचे निर्देश

    compassionate appointment process

    compassionate appointment process : चंद्रपूर : महानगरपालिकेतील सेवानिवृत्त झालेल्‍या व मृत्‍यू पावलेल्‍या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले. अनुकंपा धारक व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांच्‍या प्रलंबित प्रकरणांबाबत आमदार सुधाकर अडबाले (mla sudhakar adbale) यांच्या पुढाकाराने २ एप्रिल रोजी स्‍थायी समिती सभागृहात दुपारी बैठक पार पडली. cleaning staff employment

    चंद्रपुरातील बाबुपेठ मध्ये पाणी संकट

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर झालेला असून सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. मंजूर पदांपैकी सद्यास्‍थितीत ३१७ सफाई कामगार कार्यरत असून १४२ पदे रिक्‍त आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ अन्वये शासन निर्णय दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ मधिल विहित केलेल्या तरतूदी दिनांक १२/०८/१९७५ ते २३/०२/२०२३ या कालावधीतील सर्व प्रलंबित प्रकरणांना लागू असल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे वारसांचे अर्ज मागविण्यात आले. यात सद्यास्थितीत अनुसूचित जातीचे ५०८ तसेच इतर प्रवर्गातील ९५ अर्ज असे एकूण ६०३ अर्ज प्राप्त झालेले आहे. compassionate hiring policy

    त्‍यामुळे सर्व अर्जाची छाननी करून सेवाज्‍येष्ठतेनुसार यादी प्रकाशित करण्यात यावी. त्‍यावर हरकती मागवून १३ ऑक्टोंबर २०२४ च्‍या शासन निर्णयानुसार मनपा सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी. सदर शासन निर्णयानंतर नोकरी दिलेल्‍या वारसांची तपासणी करावी, अशा सूचना आमदार अडबाले यांनी दिल्‍या. यावर मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल यांनी ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९० दिवसांचा अवधी मागितला. municipal worker hiring

    सदर वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार क वर्गात रिक्‍त पदी नोकरीत सामावून घेण्यात यावे. अर्ज ६०३ आणि रिक्‍त पदे १४२ असल्‍याने वाढीव पदांना पदभरतीबाबत शासनाकडे मागणी करावी, अशा सूचना देखील आमदार अडबाले यांनी आयुक्‍तांना दिल्‍या. सदर विषयावर तीन महिन्‍यांनंतर बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले. महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी आमदार अडबाले यांची भूमिका असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

    बैठकीला मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, अति. आयुक्‍त चंदन पाटील, उपायुक्‍त मंगेश खवले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, श्रीकांत पोडे, देवेंद्र बलकी, अ‍ॅड. सुजय घडसे, राज बीरीया, जीवन भगत, संतोष बोरकर, मिथुन चौहान, अजय रामटेके, संजय नगराळे व मोठ्या संख्येने सफाई कामगारांचे वारस उपस्‍थित होते. 

  • Chandrapur water crisis । चंद्रपूरमध्ये पाणीबाणी: बाबूपेठमधील नागरिक त्रस्त!

    Chandrapur water crisis

    Chandrapur water crisis : चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ प्रभागात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नळाला अत्यंत कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. Municipal water issues

    निलेश बेलखेडे यांच्या मागणीला यश, गोंडवाना विद्यापीठात शिवरायांचा पुतळा

    • पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल:
    • नळाला कमी प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी येत आहे.
    • उन्हाळ्यामुळे समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
    • पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे.
    • भाजपा कार्यकर्त्यांची मागणी:
    • पाणीपुरवठा वाढवण्यासाठी किंवा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
    • नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.

    या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रुपेश पांडे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन केली. याप्रसंगी अभिलाष दुबे, प्रफुल्ल डफ, अभिनेश इम्मडी, विनोद नले, राहुल शुक्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


  • Gondwana University Shivaji Maharaj statue । प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश – गोंडवाना विद्यापीठात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मंजूर!

    Gondwana University Shivaji Maharaj statue

    Gondwana University Shivaji Maharaj statue : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या विद्यापिठाच्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव द्यावे यासाठी ठराव पाठविला होता. University campus historical statues

    चंद्रपुरात मद्य परवाना घोटाळ्याची चौकशी होणार

    परंतु विद्यापीठ प्रशासनाने चुकीचे कारण देऊन हा प्रस्ताव नामंजूर केल्या गेला आहे त्यामुळळे आपण हा ठराव अधिसभेत मांडू शकत नाही संदर्भात पत्र पाठविले त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी संपर्क करून आणि आपला प्रस्ताव आणि आपण पाठविलेले खारीज पत्र यामध्ये विसंगता असून पुन्हा एकदा वाचावा आणि मला प्रस्ताव मांडू द्यावा ही विनंती केली असता विद्यापीठ प्रशासनाने कुठलेही यावर उत्तर दिलें नाही.त्यामुळे निलेश बेलखेडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कुलगुरू व प्रशासन हे महाराज विरोधात आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला होता व यापुढे ठराव न घेतल्यास आक्रमकपने भूमिका घेऊन शिवसेना च्या पद्धतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार अशी भूमिका मांडली होती. Gondwana University latest updates

    छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल मानव जातीची प्रेरणा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. व्यवस्थापन, नियोजन, पर्यावरण, मानवी मूल्य, युद्धनीती, राजनीति भाषा विकास कला विकास इत्यादी क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रचंड मोठे कार्य असून आज देखील ते जगभरातील लोक अभ्यास करतात. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापिठात महाराजांचा पुतळा उभारला गेला असून अश्या छत्रपती शिवरायांची अखंड प्रेरणा गो़डवाना विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक ,कर्मचारी व इतर सर्वच घटकांना सातत्याने मिळत राहावे म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील परिसरात तसेच चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या उपकेंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा तसेच चंद्रपूर येथील गोंडवाना उपकेंद्राच्या परिसरास छत्रपती शिवाजी महाराज परिसर असे नाव देऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवावा याकरिता हा ठराव मांडला होता. Shivaji Maharaj legacy in Maharashtra


    यानंतर प्रा.बेलखेडे यांनी 24 मार्च 2025 च्या विद्यापीठ सिनेट च्या बैठकीमध्ये विद्यापीठ परिनियम कायदा अंतर्गत कामकाजादरम्यान सभागृहाचे नियम किंवा प्रथागत प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने लागू केल्या गेल्या आहेत किंवा दुर्लक्षित केल्या गेल्या आहेत याबद्दल पॉईंट ऑफ ऑर्डर घेऊन हा विषय मांडला असता कुलगुरू यांनी परवानगी दिली आणि अधिसभेमध्ये गडचिरोली विद्यापीठ अडपेली येथील मुख्य केंद्रआणि चंद्रपूर बाबुपेठ येथील उपकेंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल हा प्रस्ताव सिनेट मध्ये सर्वानुमते मान्य करण्यात आला आणि उपकेंद्र परिसराला नाव देण्याचा संदर्भात प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


    छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार या निर्णयामुळे संपूर्ण शिवप्रेमी,विद्यार्थी,युवक- युवतीनी आनंद व्यक्त करीत सर्व स्तरावरून युवासेना सचिव, सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांचे आभार मानून अभिनंदन करत आहेत.

  • Excise department corruption complaints । चंद्रपूर मद्य परवाने घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी – SIT कडून तक्रारी स्वीकारल्या जाणार!

    Excise department corruption complaints

    Excise department corruption complaints : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त  संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे. Excise license scam investigation

    मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपुरात नवीन बसेस दाखल

     तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष  संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत. Liquor license fraud investigation

    चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व  8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे. Chandrapur liquor permit scam

  • Chandrapur bus service | मुनगंटीवारांमुळे एसटी प्रवासाला मिळणार ‘तेजस्विनी’चा वेग!

    Chandrapur bus service

    Chandrapur bus service : चंद्रपूर जिल्ह्यासाठी दहा नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून, एसटी महामंडळाच्या सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या नव्या बसेस केवळ वाहने नसून, जनतेच्या विश्वासाचं, संवादाचं आणि सेवाभावाचं प्रतीक आहेत. प्रत्येकाचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा, जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्यांपैकी एक असून, एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी असल्याचे मत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी व्यक्त केले. Maharashtra state transport news

    आमदार जोरगेवार यांच्या हस्ते परिवहन महामंडळाच्या नव्या बसेसचे लोकार्पण

    चंद्रपूर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे मंजूर झालेल्या दहा नव्या बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 5 बसेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर, विभागीय अभियंता (स्थापत्य) ऋषिकेश होले, बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन, कार्यशाळा अधीक्षक मनोज डोंगरकर, वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रकाश तोडकर, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना एसटी महामंडळाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला होता. याचे कारण म्हणजे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकतो, परंतु गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी हा प्रवासाचा आधार आहे. सर्वांच्या सुखदुःखामध्ये एसटी महामंडळाने साथ दिली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर आणि मुल या बस स्थानकांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. परिवहन मंत्र्यांनी निधी न मागता देखील 700 नवीन बस खरेदीसाठी निधी दिला. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘तेजस्विनी’ वातानुकूलित बसेस उपलब्ध करून दिल्यात. Public transport development India

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 100 बसेस जिल्ह्याला मिळाल्या असून उर्वरित 100 बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार असून, येथील वाहन चालकांची पदे, त्यांच्या निवास व्यवस्थेबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल. मुल येथे बस डेपो उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असून, त्याच्या उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लवकरच चंद्रपूर दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला. Indian bus station upgrades

    यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बस स्थानकातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.