Blog

  • IDFC Bank Chandrapur Marathi language issue । मनसेचा मराठीसाठी रणसंग्राम – बँकांतील इंग्रजी फलक उतरवले

    IDFC Bank Chandrapur Marathi language issue

    IDFC Bank Chandrapur Marathi language issue : बॅकेचं कामकाज मराठीतच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅकेचं पत्रक आधी बघून आपल्या बैंकेत मराठी भाषेतून कामकाज चालवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देतं चंद्रपूर मनसे पदाधिकारी यांनी आय.डी.एफ.सी बैंकेच्या व्यवस्थापककडे निवेदन देऊन दम दिला. Chandrapur MNS bank protest Marathi language

    idfc bank chandrapur marathi language issue

    यावेळी बैंकेच्या कार्यालयात भिंतीवर असलेले इंग्रजीतील जाहिरात पत्रक काढून व बोर्डावरील इंग्रजी भाषेतील मजकूर खोदून मराठीत सर्व जाहिरात व फलक लावा असा आग्रह सुद्धा करण्यात आला यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Chandrapur MNS warns banks over Marathi

    ७० रुपयांसाठी चंद्रपुरातील पेट्रोल पंपावर वाद

    मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात राज्यातील सर्व बैंकेतील कामकाज मराठीतून व्हावं यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी प्रत्येक बैंकेत जाऊन प्रथम बैंक अधिकाऱ्यांना समज द्यावी असे सांगितले जर ते ऐकले नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करून त्यांना समज द्यावी.

    chandrapur mns warns banks over marathi

    यांनतर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मनसे कामगार सेने जिल्हाध्यक्ष मन अन्देवार यांच्या नेतृत्वात विविध बँकेत जाऊन बँक अधिकाऱ्यांना कार्यालयात मराठी भाषेचा वापर करावा असे सांगत बँकेतील इंग्रजी शब्दातील फलक काढण्यात आले

  • Chandrapur Mahakali Temple flag hoisting । “५१ फूट ध्वज, चांदीची मूर्ती आणि भक्तांची गर्दी – चंद्रपूरात चैत्र पौर्णिमेची भक्तिमय झळाळी!”

    Chandrapur Mahakali Temple flag hoisting

    Chandrapur Mahakali Temple flag hoisting : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी ८ वाजता श्री महाकाली मंदिर परिसरात १०१ माता भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. Kishor Jorgewar Mahakali Temple event

    भाजप स्थापना दिवस, चंद्रपुरात आमदारांचे वेगवेगळे कार्यक्रम

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार, मनिष महाराज, सुनील महाकाले, श्री महाकाली माता ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, तुषार सोम, भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबुलकर, प्रदीप किरमे, वंदना हातगावकर, संजय बुराघाटे, अरुण तिखे, राजेंद्र खांडेकर, अनिल तहलानी, जितेश कुळमेथे, निलीमा वनकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, रुपा परसराम, वंदना हजारे, अनिता झाडे, चंपा विश्वास, दीक्षा सातपुते, चंदा ईटनकर, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, नितीन शाहा, कालिदास धामणगे, करणसिंग बैस, प्रविण गिलबीले, मुन्ना जोगी, संजय महाकालीवार, सुमित बेले, कैलास धायगुने, चंद्रकांत बातव, प्रशांत दिवेदी आदींची उपस्थिती होती. Mahakali Mata festival Chandrapur

    यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उत्सवाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाकाली माता ही शक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त आपण येथे एकत्र आलो आहोत, हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.

    kishor jorgewar mahakali temple event

    ५१ फूट उंच ध्वज हा आपल्या भक्तीची आणि परंपरेची साक्ष आहे. हजारो भक्तांनी दिलेला भावपूर्ण सहभाग, चंद्रपूरची सांस्कृतिक श्रीमंती दर्शविणारा आहे. दरवर्षी नवरात्रात आपण महाकाली महोत्सव साजरा करतो. यावेळी रथातून मातेची भव्य पालखी  मिरवणूक निघते. चैत्र यात्रेत येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी रथ आणि पालखीची विधीवत पूजा करून ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मातेच्या भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Kishor Jorgewar BJP Chandrapur program । सुधीर मुनगंटीवार येणार का जोरगेवारांच्या कार्यक्रमाला? कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

    Kishor Jorgewar BJP Chandrapur program

    Kishor Jorgewar BJP Chandrapur program : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar)यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन कन्यका सभागृहात केले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) उपस्थित राहणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

    मराठीचा अपमान खपवून घेणार नाही – मनोज तांबेकर

    विशेष म्हणजे, चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे दोन गट सक्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुन्हा एकदा आला आहे. स्थापना दिन साजरा करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री माता कन्यका सभागृहात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे.

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • MNS demands Marathi in banks । मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही – मनोज तांबेकर यांचा इशारा

    MNS demands Marathi in banks

    चंद्रपूरातील सर्व बँकांना मराठीसाठी निवेदन – मनसेचा निर्णायक इशारा

    MNS demands Marathi in banks : चंद्रपूर | चंद्रपूर शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा वापरणे सक्तीचे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे. मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन सादर केले. Marathi language usage in banks

    चंद्रपुरात ७० रुपयांच्या पेट्रोल वरून वाद

    या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात राहून मराठी भाषा न बोलणं ही मराठी जनतेचा आणि भाषेचा थेट अपमान आहे. अनेक बँकांमध्ये आजही परप्रांतीय कर्मचारी कार्यरत असून, त्यांना मराठी येऊनही ते मुद्दामहून मराठी भाषा टाळतात. याचा फटका मुख्यतः सर्वसामान्य ग्राहकांना – विशेषतः मजूर आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना – बसतो. अशा ग्राहकांना हिंदी येत नसल्याने त्यांना बँकिंग व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर बँकेचे कर्मचारी उद्धटपणे “मुझे मराठी आती नही, तुमको हिंदी आती है तो बात करो” अशा स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य करतात.

    मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक बँक कर्मचाऱ्याला मराठी भाषा अवगत असणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणीही मनसेने केली आहे. मराठी भाषेचा अवमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. Manoj Tambekar bank language protest

    निवेदन देताना मनसेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्यासह जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, राज वर्मा, संदीप पटेल, महिला आघाडीच्या वर्षा ताई भोमले, मंदा ताई कहाडे, शिवराज चौहान आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.

    मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर बँकांनी मराठी भाषेचा वापर वाढवला नाही, तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

  • WCBTRL road project delay | चंद्रपूरमध्ये रखडलेल्या प्रकल्पाविरोधात ‘आप’चा हल्लाबोल!

    WCBTRL road project delay

    WCBTRL road project delay : चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा ते बाबूपेठ दरम्यानच्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम गेली ८ ते १० वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. या गंभीर विषयाकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत.

    70 रूपयांच्या पेट्रोल वरून चंद्रपुरात वाद

    ब्रिजचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे आम आदमी पार्टीने WCBTRL व विश्वराज Infrastructure या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कंपनीने पूर्वी रेल्वे परवानगीसाठी अर्ज दाखल केल्याचे सांगून एका वर्षाच्या आत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता दीड वर्ष उलटूनही कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. pending bridge construction cases

    उल्लेखनीय बाब म्हणजे विश्वराज कंपनीचे नाव जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त कामांमध्ये आढळले आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीला देण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणातही या कंपनीचे नाव चर्चेत आले होते. यासंदर्भात आम आदमी पार्टी भविष्यात आणखी खुलासे करणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. AAP demands legal action on contractor

    या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने कार्यकारी अभियंत्यांना WCBTRL व विश्वराज कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.

    pending bridge construction cases

    यावेळेस आप नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, प्रशांत शिदूरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, अनुप तेलतूमडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  • pratibha dhanorkar on gondia ballarshah railway । चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात रेल्वे विकासाची नवी पहाट: खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश!

    pratibha dhanorkar on gondia ballarshah railway

    pratibha dhanorkar on gondia ballarshah railway : खासदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे दिसुन येत आहे. खासदार धानोरकर यांनी निवडून आल्यानंतर 18 जुलै 2024 रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच, महाप्रबंधक दक्षिण-पुर्व-मध्ये रेल्वे यांना पत्र पाठवून गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी केली होती. त्या मागणी ला यश प्राप्त झाले असून 04 एप्रिल 2025 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. railway development chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लयात शेतकरी ठार

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या संदर्भात वारंवार आढावा घेऊर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या दुर करण्याच्या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे चे जाळे मजबूत करण्यासंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले होते.

    बल्लारशा -गोंदिया रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी देखील मा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरील प्रकल्पा संदर्भात सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले होते. खासदार धानोरकर यांच्या मागणीला यश आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील नागरीकांना देखील याचा लाभ होणार आहे. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार व रेल्वे मंत्री यांचे आभार मानले आहे. railway line doubling benefits

  • bjp foundation day chandrapur । चंद्रपुरात भाजप स्थापना दिन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा होणार सन्मान!

    bjp foundation day chandrapur

    bjp foundation day chandrapur : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन उद्या, रविवार 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने रविवारी दुपारी 12 वाजता श्री माता कन्यका सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जैन भवन येथील कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्खेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. bjp sthapana din maharashtra

    चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला, शेतकरी ठार

    या बैठकीला भाजपाचे माजी महानगराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, ज्येष्ठ नेते विजय राऊत, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रघुवीर अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगर सेविका कल्पना बबूलकर, माजी नगर सेविका छबु वैरागडे, माजी नगर सेविका वंदना तिखे, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, राजेंद्र खांडेकर, गणेश गेडाम, पुरुषोत्तम राउत, प्रविण गिलबिले, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, वामन आमटे, प्रज्ञा बोरगमवार, विठ्ठलराव डुकरे, आमीन शेख, शेखर शेट्टी, रज्जन ठाकूर, बाळू कोलनकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, सविता दंढारे, अमोल शेंडे, मृग्धा खाडे, रशिद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, सपना नामपल्लीवार, निलिमा वनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. bjp chandrapur meeting

    या कार्यक्रमादरम्यान पक्षासाठी निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात पक्षाचे अनेक मान्यवर नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन हा आपल्या पक्षाच्या विचारांचा आणि संघर्षमय वाटचालीचा स्मरण दिन आहे.

    bjp karyakarta samman

    हा दिवस आपण केवळ साजरा करायचा नसून, पक्षासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे योगदानही गौरवायचे आहे. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि परिश्रमामुळेच आज पक्षाची मुळे जनतेत घट्ट रुजलेली आहेत. उद्याचा सत्कार सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, आपल्या आदरभावनेचा एक नम्र प्रयत्न असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. bjp karyakarta samman

    महाकाली मंदिर परिसरात होणार ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण

    चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने दिनांक रविवारी ६ एप्रिल २०२५ रोजी माता महाकाली मंदिर परिसरात १०१ माता महाकाली भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये श्री महाकाली मातांची चांदीची मूर्ती, रथ व पालखीचे विधीवत पूजन होईल आणि भक्तांना दर्शन मिळणार आहे. सकाळी ८ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

  • pregnancy weight monitoring । “चंद्रपूर जिल्ह्यात २५,००० कुटुंबांमध्ये होणार आरोग्याची मोहीम – ‘वेट स्टिकर’चा नवा प्रयोग”

    pregnancy weight monitoring

    pregnancy weight monitoring : जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने नाविन्यपूर्ण  “वेट स्टिकर “योजना उपक्रम मा. विवेक जॉनसन , मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर यांचे विशेष मार्गदर्शनाखली व डॉ.अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर यांचे विशेष नियोजनाखाली राबविण्यात येणार व सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हास्तरावरुन मान्यवरांच्या शुभहस्ते दि. 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनी करण्यात येणार आहे. Chandrapur district pregnancy monitoring program

    चंद्रपुरात ७० रुपयांच्या पेट्रोलवरून वाद

     गरोदर मातांचे मृत्यू हे योग्य आहार न घेतल्याने व बाळंतपणात वजनाचे लक्ष्य साध्य न झाल्याने  होत असल्याचे निदर्शनास दिसुन आले आहे. याकरीता गरोदरपणाची नोंदणी झाल्याबरोबर उंची आणि वजन सूत्रानुसार ( बीएमआय ) गरोदर मातेच्या घरी दर्शनी भागात गरोदर मातेचे अपेक्षित असलेले वजन “वेट स्टिकर” च्या सजवलेल्या आकड्यात लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. rural pregnancy care programs


    चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात 22 माता मृत्यूची नोंद झालेली आहे. गरोदर मातांना आपले वजन किती वाढले पाहिजे याबाबतचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी अशा पद्धतीच्या उपक्रमाची योजना आखण्यात आली आहे. गरोदर मातेचे वजन योग्य नसल्यास  वेळे आधी  प्रसुती, गर्भपात व माता बालमृत्यू ओढविण्याचा जास्त संभव असतो.  हे टाळण्यासाठी  बाळंतपणाच्या तिसऱ्या  महिन्यापासून स्थानिक  प्रा.आ. केंद्र ,आरोग्य उपकेंद्रातील  आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्या मार्फत ठराविक काळात वजनाची  नोंदणी केली जाते. मात्र गरोदर मातेचे कुटुंब वजनाबाबत फारसे गंभीर नसतात. त्यांच्यात जनजागृती व्हावी असा दृष्टीकोन ठेउन व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. Awareness campaigns to reduce maternal deaths in Maharashtra

    यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले घोषवाक्य “आरोग्यदायी सुरवात, आशांदायी भविष्य ” साधण्यासाठी अशा पद्धतीने वेट स्टिकर उपक्रम राबविण्याचे नियोजन आरोग्य विभाग, जि.प.चंद्रपूर यांनी केले आहे. या संपूर्ण उपक्रमात  जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावरील आरोग्य विभागील  कर्मचारी  यांचा  सहभाग राहाणार आहे . यामुळेच कार्यक्रमाची  व्याप्ती  व गुणवत्ता वाढणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील  25 हजार गरोदर मातांच्या घरी जाउन ,कुटुंब सभा घेउन स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगितले जाणार आहे. तरी गावातील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

  • petrol pump fraud chandrapur । ’70 रुपयांच्या पेट्रोलवरून वाद!’ चंद्रपुरात पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक!

    petrol pump fraud chandrapur

    petrol pump fraud chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील वासेकर पेट्रोल पंपावर ग्राहकाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुटकाला वॉर्डातील भारत मुधोळकर यांनी 70 रुपयांचे पेट्रोल टाकले, मात्र 100 मीटरवरच त्यांची दुचाकी बंद पडली. या घटनेमुळे पंपावर एकच गोंधळ उडाला. 70 rupees petrol

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ९ वा बळी

    मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुधोळकर हे सकाळी रामनगर येथील सेंट मायकल शाळेत गेले होते. त्यांच्या मोपेडमध्ये (क्रमांक एमएच 34 एजे 7611) पेट्रोल कमी असल्याने त्यांनी शाळेजवळच्या वासेकर पेट्रोल पंपावर 70 रुपयांचे पेट्रोल टाकले. त्यानंतर ते घरी निघाले असता सेंट मायकल शाळेजवळच त्यांची दुचाकी बंद पडली.

    भारतने दुचाकी तपासली असता त्यात पेट्रोलचा एक थेंबही नव्हता. त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर कर्मचाऱ्यांनी 500 रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे आमिष दाखवले, मात्र भारतने कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला. petrol pump customer rights

    पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल टाकल्याचे सांगितले, मात्र पेट्रोल वाहनात आले की नाही, याबाबत ते मूग गिळून बसले. यापूर्वीही वासेकर पेट्रोल पंपावर असे प्रकार घडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पंपावरील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्येही फेरफार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरताना सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • tiger attack on farmer । उमा नदीकाठी मृत्यूचं तांडव: वाघाने घेतला युवा शेतकऱ्याचा बळी!

    tiger attack on farmer

    tiger attack on farmer : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. farmer killed by wild animal

    वन्यजीव आता तुमच्या दारात, संरक्षण भिंत कोसळली

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत:

    चितेगाव परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोऱ्ह्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. tiger attacks in Maharashtra

    2025 मध्ये वाघाच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू:

    या घटनेमुळे परिसरात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे. 2025 या चालू वर्षात अवघ्या ४ महिन्यातच वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

    वन विभागाकडून पंचनामा:

    या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नागोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.