Car bike accident case : चिमूर – पळसगाव (पिपरडा) विहीरगाव वरून चिमूर कडे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एक ठार महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक ३०/०३/२०२५ सायंकाळी ५.३० सुमारास घडली. Drunk driving accident case
पिपर्डा येथील भारत भेंडारे यांच्या घराचे वास्तूपूजन करून पती-पत्नी आपल्या मुलाला घेऊन आपल्या स्वगावी पवनी जिल्हा भंडारा कडे जात असतानाच विहीरगाव कडून दवाखान्यात जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला रिया राकेश जुमडे (३७, रा. पवनी )हिचा मृत्यू झाला.
चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले आहे. तर त्याचे पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७)लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हे जखमी आहेत.
एमएच ३३ – एफ ५१५१ या क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने समोर जाणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच ३६ – व्ही ५००१) जोरदार धडक दिल्याने महिला ठार झाली. तर या अपघातात तिचा पती राकेश ताराचंद जुमडे (वय ३७) लहान मुलगा अद्वित राकेश जुमडे (४) हा सुद्धा अपघातात जखमी झाला. हा अपघात रविवारला सायंकाळी साडे पाच च्या सुमारास घडला.
दुचाकीला धडक देणारी चारचाकी ही विहीरगाव येथील मंगेश नन्नावरे यांची असल्याची माहिती मिळाली असून चालक विना लायसन्स व मद्यप्राशन करून गावातूनच भरधाव वाहन चालवीत जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
OBC caste census demand :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि बीसी वेलफेअर असोसिएशन तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल 2025 रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करावे.
आरक्षणाची 50% मर्यादा हटवावी.
13 सप्टेंबर 2017 पासून प्रलंबित असलेली क्रिमीलेअरची मर्यादा वाढवावी.
तेलंगणातील वाढलेले 42% ओबीसी आरक्षण 9 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे.
संविधानाच्या कलम 243 डी (6) आणि 243 टी (6) मध्ये सुधारणा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षणाचा कायदा करावा.
केंद्र सरकारच्या सर्व विभागांतील ओबीसी संवर्गातील राखीव 27% जागा पूर्णपणे भरण्यात याव्यात. मंडल आयोग आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. ओबीसी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. ओबीसी प्रवर्गासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची निर्मिती करावी. ओबीसी प्रवर्गाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करावा. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्ट गाव योजना लागू करावी. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबी आणि एलएलएमच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना 27% आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गाकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी. OBC reservation in local bodies
आंदोलनाचे आवाहन:
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी बांधवांना या देशव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. National OBC Federation
Gudi Padwa celebration : हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सोहळा म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा उत्सव यंदाही चंद्रपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गुढी उभारून उपस्थित नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने या अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. Hindu new year festival
यावेळी भागवताचार्य संत श्री मनीष महाराज, तुषार सोम, दशरथ ठाकूर, रघुवीर अहिर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, अनिल फुलझेले, रवी गुरनुले, कल्पना बगुलकर, प्रदीप किरमे, आशिष मासिरकर अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार, संजय बुरघाटे, अनिल टहलीयानी, पूनम तिवारी, विकास खटी, विनोद शेरकी, संजय निकोडे, अभिजित पोटे, सुप्रिया सरकार, सपना पाल, मंजुश्री कासनगोट्टूवार, श्रुती ठाकूर, रामकुमार आकेपल्लीवार, अमोल शेंडे, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, राजू जोशी, संजय महाकालीवार, राकेश बोम्मनवार, सुमित बेले, राम जंगम, ताहीर हुसेन, हर्षद कानमपल्लीवार, पिंटू धिरडे, मयूर बोकरे, शैलेश दिंडेवार, कल्पना शिंदे, शीतल रंगदळ, ऍड. राम मेंढे, ऍड. परमहंस यादव, मुन्ना जोगी, कालिदास धामनगे, राकेश नाकाडे आदींची उपस्थिती होती.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जगदंब ढोल ताशा आणि ध्वज पथक, स्वराज्य वाद्य पथक आणि ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथक, यांच्या दमदार आणि जोशपूर्ण वादनाने सोहळ्याला विशेष उत्साह मिळाला. ठेका धरायला लावणाऱ्या ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणला. गुढीपाडवा उत्सवात विठ्ठल व्यायाम शाळेच्या कुशल खेळाडूंनी सादर केलेल्या नेत्रदीपक मल्लखांब प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना थक्क केले.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून, नवीन संकल्प, नवीन उमेद आणि नव्या ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा विजयाचा आणि चैतन्याचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली. आज आपणही ही गुढी उभारून समाजाच्या प्रगतीसाठी, शिक्षण, रोजगार आणि विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प करत असल्याचे त्यांनी सांगितले. Marathi new year celebration
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात प्रजेचे राज्य होते. त्यांच्या विचारांतून समाजाला नेहमी प्रेरणा मिळत राहावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा आपण संकल्प केला असून, वर्षभरात हा पुतळा तयार करणार असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.
आज कलाकारांनी आपली पारंपरिक कला सादर करून गुढीपाडव्याला एक वेगळीच शोभा आणली आहे. विठ्ठल व्यायाम शाळेच्या खेळाडूंनी सादर केलेले मलखांब प्रात्यक्षिक हे आपल्या ऐतिहासिक शारीरिक संस्कृतीचे प्रतीक आहे. अशा कला आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
bike theft case Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे, तरीसुद्धा हि गुन्हेगारी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर आहे, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा हि गुन्हेगारी नियंत्रित करण्यास असमर्थ ठरली आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थीत होतो. अशीच एक गुन्हेगारी चंद्रपूर शहरात घडली. १३ फेब्रुवारीला शहरातील बंगाली कॅम्प परिसरातून एक दुचाकी वाहन चोरी झाले. मात्र आरोपी अजून मिळाला नाही. सदर दुचाकी चोरी प्रकरण अतिशय रंजक आहे. CCTV footage bike theft
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १३ फेब्रुवारीला ३१ वर्षीय सुशांत राजबंशी हा युवक भाजीपाला घेण्यासाठी बंगाली कॅम्प येथे गेला, रात्री ८ वाजता भाजीपाला मार्केट जवळ सुशांत ने आपले दुचाकी वाहन क्रमांक MH ३४ बीटी ४५०९ पार्क केले. अंदाजे ९.३० वाजता सुशांत भाजीपाला घेत परत आपल्या दुचाकी जवळ गेला मात्र दुचाकी वाहन पार्क केलेल्या ठिकाणी नव्हते.
दुचाकी वाहनाचा सुशांतने परिसरात इतरत्र शोध घेतला मात्र वाहन कुठेही आढळून आले नाही. आपलं वाहन चोरी झालं हे समजताच त्याने पोलीस स्टेशन गाठलं मात्र पोलिसांनी सध्या तक्रार करू नका काही दिवस थांबा असे सांगितले. सुशांत काही दिवस थांबला मात्र वाहन नसल्याने त्याचे कामे खोळंबले. त्याने वेळ न गमावता आरोपीबाबत माहिती घेणे सुरु केले. Chandrapur latest crime updates
आपलं वाहन कुणी चोरी केले? त्याचा पत्ता सुशांतने १२ दिवसांच्या कालावधीत लावला, सीसीटीव्ही फुटेज काढत आरोपीची ओळख सुशांत ने पटवली. त्याचा मोबाईल क्रमांक सुद्धा सुशांत ने शोधून काढला. आरोपी बाबत संपूर्ण माहिती व सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांना दिले, प्रथमच फिर्यादीने पोलिसांचे काम केले. तब्बल १४ दिवसांनी पोलिसांनी सुशांत ची तक्रार घेतली. मात्र आरोपीने आपला मोबाईल बंद केला. criminal activities in Chandrapur
आरोपी अजूनही पोलिसांच्या अटकेबाहेर आहे. पोलिसांनी जर वेळीच दुचाकी चोराची माहिती काढली असती तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असता अशी भावना सुशांत ने News३४ समोर व्यक्त केली आहे. मी आरोपी बाबत संपूर्ण माहिती आणि पुन्हा एक दुचाकी वाहन चोरत असताना त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले मात्र यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही अशी खंत सुद्धा सुशांतने यावेळी व्यक्त केली.
chandrapur yatra planning : चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महाकाली मंदिर येथे मोठ्या उत्साहात यात्रा होत असते. महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे हजेरी लावतात. माता महाकालीला साष्टांग दंडवत करून भक्त झरपट नदीत स्नान करतात. नदीतील पाण्याला तीर्थाप्रमाणे महत्त्व आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यात्रेचे व नदीचे पावित्र्य जाणून यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी पुढाकार घेतला आहे. महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंदिर परिसराची शनिवारी ( दि.२९) पाहणी केली. Mahakali temple yatra
या यात्रेच्या नियोजनासाठी आणि सोयीसुविधांसाठी राज्य सरकारने मोठा आर्थिक हातभार लावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यात्रेसाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्यात येत आहे. झरपट नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली असून उर्वरित स्वच्छतेचे काम देखील सुरू आहे. भविष्यात यात्रेसाठी स्थायी यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. Mahakali devotee facilities
आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री सुरज पेद्दुलवार,सोहम बुटले,मनपाचे शहर अभियंता बोरीकर,संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
यात्रेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांसोबत विशेष चर्चा देखील करण्यात आली आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारल्यास यात्रा अधिक भक्तीमय आणि पवित्र वातावरणात पार पडेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी व्यक्त केला.
महाकाली यात्रेतील दुकाने नियोजनबद्ध रेखांकनातून निश्चित केली जाणार:
महाकाली यात्रेदरम्यान अनेक छोटे-मोठे दुकानदार आपला व्यवसाय करतात आणि भक्तांची सेवा करतात. मात्र, अलीकडे प्रशासनाच्या नियमांमुळे काही व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात व्यवस्थापन योग्य व्हावे आणि गेल्या 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी महाकाली मंदिर परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरातील कोणतीही दुकाने हटविण्यात येणार नाहीत, ती पूर्वीप्रमाणेच राहतील. मात्र, दुकाने रस्त्यावर येऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध रेखांकन करून त्यांची निश्चित मर्यादा प्रशासनाकडून ठरवली जाणार असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
Local journalism success stories : सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) या एका छोट्याश्या गावचे सुपुत्र प्रशांत रामटेके यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून स्वतः मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी असं कार्य करून पत्रकारिता क्षेत्रात नवलोकिक मिळविले.
चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, लोकहितासाठी झटणारे, गोर गरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे अन्यायच्या विरुद्ध उभे रहाणारे आणि वेळ प्रसगी समविचार भावनेतून प्रश्न सोडवणारे एक तडफदार व्यक्तिमत्व असलेले युवा पत्रकार प्रशांत ताराचंद रामटेके यांना सन्मान चिन्ह देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री, मॉडेल शिपा तेलंगे, अभिनेता अजय राठोड, मुंबई, अभिनेता प्रशांत तोतला, मुंबई या मान्यवरांच्या हस्ते प्रशांत रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. Journalism awards in Maharashtra
प्रशांत रामटेके हे शून्यातून विश्व् निर्माण करणारे हाडाचे पत्रकार आहेत गरीब जनतेचे प्रश्न सोडवत, समाजसेवा,आणी साहित्य सेवा ही अतिशय सुंदर रित्या बजावतात, ज्या ठिकाणी घटना घडेल त्या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता वार्तांकन करून लोकांपर्यंत वेगवेगळ्या घटना ची माहिती ते अनेक वर्षापासून करत आहेत.
दिवस रात्र एक करून मेहनतीने स्वतःच्या जीवावर प्रबोधिनी न्युज चॅनेल त्यांनी सुरु करून आज जगभरात प्रसिद्धीसाठी त्यांचे चॅनेल आणि स्वतः ते सज्ज आहेत, अभिमान व आदर्श वाटावा असा प्रवासाचे पाईक असणारे, युवा पत्रकार प्रशांत रामटेके यांचे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. आणि ते कार्यरत असलेल्या सर्व ग्रामीण भागातील ग्रामस्ताकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन होत आहे..
Maharashtra CET practice : चंद्रपूर : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि विधी क्षेत्रातील कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) परीक्षेसाठी प्रभावी तयारी करता यावी, यासाठी युवासेना – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोफत सीईटी महासराव परीक्षाआयोजित करण्यात आली. राज्यभरातील २४,३१५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विशेष बाब म्हणजे, चंद्रपूर विधानसभेने नोंदणीच्या संख्येत संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकावला, ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली. Free CET mock test
चंद्रपूर जिल्ह्यात १,६५० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यानुसार, २९ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० दरम्यान चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील ६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. अकरावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या ८५७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. Maharashtra CET practice
परीक्षेचे उद्दिष्ट आणि महत्त्व
✅ विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून देणे – सीईटी ही एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा असून, त्यात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सराव गरजेचा असतो. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची ओळख होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
✅ मोफत परीक्षा – सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी – अनेक विद्यार्थ्यांना महागड्या सराव परीक्षांसाठी फी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे युवासेनेने ही परीक्षा पूर्णपणे मोफत ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी दिली. Maharashtra CET practice
✅ संपूर्ण राज्यभर आयोजन – ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – ही परीक्षा केवळ महानगरांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या सर्व परीक्षेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
✅ सीईटीसाठी तंत्रशुद्ध तयारी – ही परीक्षा सीईटीच्या प्रश्नसंचावर आधारित होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती
📌 श्री साई पॉलिटेक्निक, चंद्रपूर विधानसभा (७१) – ५२७ विद्यार्थी 📌 मौशिम भाई जवेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर विधानसभा (७२) – २४५ विद्यार्थी 📌 वेक्टर मॅथ्स क्लास आणि परम ट्युशन, राजूरा विधानसभा (७०) – ८५ विद्यार्थी
एकूण ८५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी आणि फार्मसी क्षेत्रातील प्रवेश परीक्षेचा समावेश होता. Rural student CET help
चंद्रपूर विधानसभेने मिळवले राज्यात दुसरे स्थान
राज्यातील २४,३१५ विद्यार्थ्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,६५० विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. यामध्ये चंद्रपूर विधानसभा (७१) मध्ये तब्बल ५२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत राज्यभरात नोंदणी प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
ही गोष्ट जिल्ह्यासाठी अभिमानाची असून, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली शैक्षणिक स्पर्धात्मकता आणि अभ्यासाविषयी जागरूकता दर्शवते.
परीक्षा यशस्वी होण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
ही परीक्षा उत्तम प्रकारे पार पडावी म्हणून युवासेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षेच्या आयोजनात पुढील मान्यवर उपस्थित होते –
🔹 युवासेना कार्यकारिणी सदस्य: श्री. हर्षल दादा काकडे 🔹 युवासेना विभागीय सचिव: प्राचार्य निलेश बेलखेडे 🔹 शिवसेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर: श्री. संदीपभाऊ गिऱ्हे 🔹 युवासेना सहसचिव व युवती सेना जिल्हा प्रमुख: सौ. रोहिणी पाटील 🔹 युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक, चंद्रपूर जिल्हा: श्री. संदीप (रियाल) पटेल 🔹 जिल्हाप्रमुख युवासेना: श्री. विक्रांत सहारे 🔹 युवासेना सरचिटणीस: सुमीत अग्रवाल 🔹 कॉलेज कक्ष लोकसभा प्रमुख: इंजी. चेतन बोबडे 🔹 युवासेना उपजिल्हा प्रमुख: यशपाल उर्फ बंटी भाऊ कमटम 🔹 युवासेना तालुका चिटणीस: प्रवीण पेटकर 🔹 तालुका प्रमुख: सुरज शेंडे 🔹 शहर प्रमुख: शहबाज शेख 🔹 अनिकेत बेलखोडे, प्रशांत गडाला, उपतालुका प्रमुख विवान रामटेके, युवती सेना उपजिल्हा अधिकारी धनश्री हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी गोलदार, प्रज्वल आवळे, जय हिरकरे, केतन बेले, सार्थक शिक्रे, हंसराज करोले, श्रीकांत दडमल
विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद आणि पुढील योजना
युवासेनेच्या या उपक्रमामुळे सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. परीक्षेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे युवासेनेने भविष्यात अशा सराव परीक्षांचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करण्याचे ठरवले आहे. CET preparation online made easy with Yuva Sena’s initiative
युवासेनेने केलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोफत परीक्षेची संधी मिळाली, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्याचा युवासेनेचा उद्देश सफल झाला.
➡️ युवासेनेच्या वतीने भविष्यात अजून मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.
Kishor Jorgewar on Gondwana University : गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शुल्कात अचानक वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अन्यायकारक शुल्कवाढीविरोधात आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत तात्काळ वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. Gondwana University student fee hike
विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये शुल्कवाढ केली असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर मध्येच शुल्कवाढ करणे गैरव्यवहार्य आहे, यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना या वाढीचा फटका बसणार असून, त्यांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही शुल्कवाढ तातडीने मागे घेण्यात यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना केली आहे. Kishore Jorgewar against university fee increase
सोबतच आमदार किशोर जोरगेवार यांनी कुलगुरू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आठवडा भरात याबाबत निर्णय घेण्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी मान्य केले आहे.
CBSE 10th board exam twice : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने अलिकडेच नविन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 10वी च्या परिक्षा पद्धतील बदल करण्यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. यामध्ये 10वी च्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची दखल घेत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाला पत्र पाठवून प्रचलित पद्धतीत बदल करु नये अशी मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने खासदारांच्या मागणी ची दखल घेऊन वरील निर्णयावर पुनःविचार करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. CBSE 10th exam latest update
नविन परिक्षा पद्धीत दोन वेळा होणाऱ्या परीक्षा या मार्च व मे महिन्यात होणार आहे. सदर कालावधीत विदर्भासह महाराष्ट्रात उन्हाची दाहकता अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक तासाला समोर जावे लागणार आहे. त्यासोबच, शाळांदेखील सदर परिक्षा पदृधीत अडचणी च्या ठरणार आहे.
या कारणात्सव खासदार धानोरकर यांनी सदर परीक्षा पद्धतील विरोध करुन एकच परिक्षा सुरु ठेवण्याची मागणी केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा ने खासदार धानोरकर यांची शिफारस मान्य केली असून लवकरच बोर्ड यावर निर्णय घेणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. असे झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा सोयीचे होणार आहे.
Chandrapur Public Trust Workshop 2025 : चंद्रपूर: सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर येथे गुरुवारी, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. श्रीमती पि.के. करवंदे, सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर, यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चंद्रपूर आणि चंद्रपूर डिस्ट्रीक पब्लीक ट्रस्ट अॅडव्होकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम पार पडला. Public Trust Management Training
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आयोजन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शासकीय कार्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून, तसेच माननीय धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनांनुसार या विश्वस्त परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विश्वस्तांना न्यास व्यवस्थापनासंबंधी कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची माहिती देणे हा होता. Chandrapur Trustee Guidelines
कार्यशाळेत न्यास नोंदणी, संस्था नोंदणी, न्यासाचे लेखापरीक्षण आणि हिशोबपत्रके सादर करणे, बदल अर्ज सादर करण्याची प्रक्रिया तसेच कलम ५०-अ अंतर्गत तरतुदी यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली. या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी धर्मादाय संघटनेतील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. टिकले, अॅड. ढोक आणि अॅड. काकडे यांच्यासह सनदी लेखापाल श्री हर्षवर्धन सिंघवी यांनी सहभाग घेतला. त्यांनी विश्वस्तांना या प्रक्रियांबाबत सोप्या आणि स्पष्ट भाषेत माहिती दिली, ज्यामुळे उपस्थितांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची चांगली समज मिळाली. Maharashtra Trust Registration Workshop
विश्वस्तांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यशाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यासांचे विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि आपल्या शंकांचे निरसन केले. विश्वस्तांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कार्यक्रमात संवादात्मक वातावरण निर्माण झाले. न्यास व्यवस्थापनातील कायदेशीर गुंतागुंत आणि लेखापरीक्षणाच्या बाबी समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुमुधुरे यांनी अतिशय प्रभावीपणे केले, तर प्रस्ताविक भाषण श्री र.र. ठाकरे, अधिक्षक, यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती सो.वि. करमरकर यांनी सर्वांचे आभार मानले. आयोजकांनी केलेल्या नियोजनामुळे हा कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला.
कार्यशाळेचे महत्त्व
सार्वजनिक न्यासांच्या विश्वस्तांना त्यांच्या कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांबाबत जागरूक करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट होते. न्यास नोंदणी आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्त श्रीमती पि.के. करवंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. त्यांनी विश्वस्तांना आपल्या न्यासाच्या कार्यात नियमांचे पालन आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
चंद्रपूर येथील ही विश्वस्त परिषद न्यास व्यवस्थापनातील विश्वस्तांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली. यामुळे न्यासांच्या कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होईल, तसेच विश्वस्तांना शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि विश्वस्त यांच्यातील समन्वय वाढून न्यास व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.