Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • congress protest against attack on Chief Justice । 🚨 सर्वोच्च न्यायालयात चप्पलफेक प्रकरणावर चंद्रपूर काँग्रेसचा संताप

    congress protest against attack on Chief Justice

    congress protest against attack on Chief Justice : चंद्रपूर : देशाचे सरन्यायाधीश मा. बी.आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकिलाने चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी पुतळा, जटपूरा गेट येथे निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

    Also Read : तुमचा नगराध्यक्ष कोण? जाणून घ्या

    आरोपीवर कठोर कारवाई करा

    या आंदोलनाचे नेतृत्व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “न्यायसंस्थेवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे” अशा घोषणा देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

    यावेळी प्रवीण पडवेकर, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सुनंदाताई धोबे, चंद्रपूर शहर महिला काँग्रेसच्या  अध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुभाषसिंग गौर, सोहेल शेख, रोशन लाल, राजेश अडूर, शफक शेख, रामकृष्ण कोंडरा, ऊषाताई धांडे, अश्विनी खोबरागडे, अमजद अली, विणा खनके, सकीना अंसारी, संगीता पेटकुले, मनोरंजन राय,शिरीन कुरैशी,तवंगर खान, ऍड. प्रितिशा, ऍड. आयेशा शेख, शिरीन कुरेशी, साबिर सिद्दीकी, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोंडाम, भालचंद्र दानव, गोपाल अमृतकर, पिंटू शिरवार, रतन शिलावार, कुणाल चहारे, नौशाद शेख, काशिफ अली, निलेश ठाकरे, दीपक कटकोजवार, मोहन डोंगरे, शिरीष गोगुलवार, मोनू रामटेके, याकुब पठान, राजू वसेकर, राजू खजांची, रोहित पिंपळकर, प्रवीण अडूर, स्वप्निल चिवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Nagpur voter registration for graduates । 🗳️ जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन – प्रत्येक पदवीधराने मतदार यादीत नाव नोंदवावे

    Nagpur voter registration for graduates

    Nagpur voter registration for graduates : चंद्रपूर, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Graduate voter list Nagpur division 2025

    Also Read : चंद्रपुरात ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदणीकरीता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2025 असून सर्व पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    असा आहे पदवीधर मतदारसंघ पुनरिक्षण कार्यक्रम :

    1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर,

    6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 25 नोव्हेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत, 8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबर रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल.

  • Maharashtra Nagarparishad Reservation । ⚡ चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आरक्षण जाहीर, कोण होणार तुमचा नगराध्यक्ष?

    Maharashtra Nagarparishad Reservation

    Maharashtra Nagarparishad Reservation : चंद्रपूर – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. आरक्षण जाहीर झाल्यावर राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न भंग झाले आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस नगर परिषदेची हि पहिली निवडणूक असणार आहे. नगरपालिकेचा जिल्ह्यातील राजकीय इतिहास बघता भाजप पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. Maharashtra Nagarparishad Nagarpanchayat Reservation

    Also Read – मुंबई ते चंद्रपूर मेफेड्रोन पावडरचा प्रवास, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    नगरपरिषद आरक्षण चंद्रपूर जिल्हा, जिल्ह्यात एकूण १० नगरपरिषद आहे. भद्रावती नगरपरिषद मध्ये मागील २० वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि कार्यकर्त्यांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले त्यामुळे आता ठाकरे गटाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील १० नगरपरिषदेत यंदा महिलाराज स्थापन होणार, १० पैकी ६ नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव आहे.

    नगरपालिका आरक्षण (Nagarparishad Reservation)

    • १ ) घुग्गुस नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
    • गतवेळचे आरक्षण – पहिलीच निवडणूक
    • २ ) चिमूर नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
    • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग महिला
    • विजेता पक्ष – भाजप
    • ३ ) नागभीड नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
    • गतवेळचे आरक्षण – अनुसूचित जाती पुरुष
    • विजेता पक्ष – भाजपा
    • ४ ) भद्रावती नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – ओबीसी पुरुष
    • विजेता पक्ष – शिवसेना ठाकरे
    • ५ ) वरोरा महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग
    • विजेता पक्ष – भाजप
    • ६ ) मूल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
    • गतवेळचे आरक्षण – सर्वसाधारण महिला
    • विजेता पक्ष – भाजप
    • ७ ) बल्लारपूर महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग
    • विजेता पक्ष – भाजप
    • ८ ) ब्रह्मपुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग महिला
    • विजेता पक्ष – कांग्रेस
    • खुला प्रवर्ग
    • ९ ) राजुरा खुला प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – पुरुष ओबीसी
    • विजेता पक्ष – कांग्रेस
    • १० ) गडचांदूर खुला प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण – अनुसूचित जमाती महिला
    • विजेता पक्ष – कांग्रेस

    नगरपंचायत आरक्षण (Nagarpanchayat Reservation)

    • १ ) गोंडपिपरी नगरपंचायत अनुसूचित जाती महिला
    • गतवेळचे आरक्षण –
    • विजेता पक्ष –
    • २ ) सिंदेवाही अनुसूचित जमाती प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण –
    • विजेता पक्ष –
    • नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • ३ ) पोंभुर्णा
    • गतवेळचे आरक्षण – खुला महिला
    • विजेता पक्ष – भाजप
    • ४ ) जिवती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
    • गतवेळचे आरक्षण –
    • विजेता पक्ष
    • ५ ) सावली ओबीसी महिला
    • गतवेळचे आरक्षण – सर्वसाधारण महिला
    • विजेता पक्ष – कांग्रेस
    • ६ ) भिसी अनुसूचित जाती प्रवर्ग (पहिलीच निवडणूक)
    • गतवेळचे आरक्षण –
    • विजेता पक्ष –

    प्रभाग आरक्षण सोडत ७ व ऑक्टोबर रोजी

     बल्लारपूर नगर परिषदेची आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), वरोरा न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), नागभीड 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी, पर्वणी पाटील), गडचांदूर 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), चिमूर न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर, डॉ. संतोष थिटे). Maharashtra Nagarparishad Reservation

    मूल न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), भद्रावती 8 ऑक्टो. रोजी दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), ब्रम्हपुरी 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, पर्वणी पाटील), राजुरा 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), भिसी नगर पंचायतीची आरक्षण सोडत 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी चिमूर, डॉ. संतोष थिटे) आणि घुग्घुस न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, लघिमा तिवारी) Maharashtra Nagarparishad Reservation

    आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी वरील नगर परिषद / पंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

    मतदार यादी अंतिम करण्याकरीता प्राधिकृत अधिका-यांची नेमणूक : 

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगरपरिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2025 जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने 8 ते 13 ऑक्टो. 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करावयाची आहे.

    बल्लारपूर न.प. (प्राधिकृत अधिकारी तहसीलदार बल्लारपूर), वरोरा न.प. (प्रा. अधि. तहसीलदार वरोरा), भद्रावती न.प. (तहसीलदार भद्रावती), ब्रम्हपुरी न.प. (तहसीलदार ब्रम्हपुरी), मूल न.प. (तहसीलदार मूल), घुग्घुस न.प. (तहसीलदार चंद्रपूर), चिमूर न.प. (तहसीलदार चिमूर), नागभीड न.प. (तहसीलदार नागभीड), राजुरा न.प. (तहसीलदार राजूरा), गडचांदूर न.प. (तहसीलदार कोरपना), भिसी न.पं. (अपर तहसीलदार भिसी).

    उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी प्रारूप मतदार यादीवर 8 ते 13 ऑक्टो 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या  हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावा व आवश्यक असल्यास योग्य त्या सुधारणा मतदार यादीत कराव्यात, असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • snake friend passes away from snakebite । सर्पमित्र महेंद्र भडके यांचा सर्पदंशाने मृत्यू; बल्लारपूर शहरात शोककळा

    snake friend passes away from snakebite

    snake friend passes away from snakebite : बल्लारपूर (५ ऑक्टोबर २०२५): शहरातील एक निष्ठावान आणि अनुभवी सर्पमित्र म्हणून ओळख असलेले महेंद्र भडके (३२, रा. विद्यानगर वॉर्ड, सावित्रीबाई फुले चौक) यांचे रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्पदंशामुळे निधन झाले. सर्पांना जीवदान देण्याचे काम करणाऱ्या एका तरुणाचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्याने बल्लारपूर शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    नाग पकडताना घडली दुर्दैवी घटना

    मिळालेल्या माहितीनुसार, न्यू कॉलनी परिसरात असलेल्या एका नर्सरीमध्ये विषारी नाग दिसल्याची माहिती महेंद्र भडके यांना मिळाली. माहिती मिळताच ते तत्काळ तिथे पोहोचले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्या नागाला जीवदान देण्यासाठी ते नेहमीप्रमाणेच मोठ्या धैर्याने नाग पकडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, याच दरम्यान त्या नागाने महेंद्र भडके यांना दोन वेळा दंश केला. snake rescuer dies in Maharashtra

    Also Read : शासकीय निवासस्थानी चोरीचा माल, २ आरोपीना अटक

    उपचारादरम्यान झाला मृत्यू

    सर्पदंश होताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुर्दैवाने चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

    सर्पमित्र म्हणून भरीव योगदान

    महेंद्र भडके हे गेल्या अनेक वर्षांपासून बल्लारपूर शहरात सर्पमित्र म्हणून सक्रिय कार्यरत होते. शहरातील विविध वस्त्यांमध्ये आणि भागांमध्ये साप निघाल्यास ते तात्काळ घटनास्थळी जाऊन सापांना पकडत असत. सापांना मारण्याऐवजी त्यांना सुरक्षितरित्या पकडून, जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी अविरतपणे केले. त्यांचा हा प्रयत्न केवळ सर्प संरक्षणासाठीच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही खूप मोलाचा होता.

    बल्लारपूर शहरात हळहळ

    सर्पांना जीवदान देणाऱ्या या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बातमी शहरात पसरताच सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात आले. महेंद्र भडके यांच्या निधनाने बल्लारपूर शहराने एक समर्पित वन्यजीव संरक्षक गमावला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे विद्यानगर वॉर्ड आणि संपूर्ण बल्लारपूर शहरात शोकाचे वातावरण आहे.

  • Karnataka high court orders NCBC powers । राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा; कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

    Karnataka high court orders NCBC powers

    Karnataka high court orders NCBC powers : चंद्रपूर / नागपूर / यवतमाळ : विभागीय आयुक्त, नागपूर कार्यालयात दि. 24 जूलै 2023 रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक व जनसुनावणी घेण्यात आली होती. आयोगाने कर्नाटक पाॅवर कार्पोरेशनशी संबंधित प्रकल्पपिडीत, पुनर्वसित शेतकरी, ग्रामस्थ आणि मजूरांशी निगडीत ज्वलंत समस्या, भुमी अधिग्रहण आदीबाबत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात सन 2016 मध्ये झालेल्या करारावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश या बैठकीत दिले होते.

    कर्नाटक सरकार व केपीसीएल ने विभागीय आयुक्त, नागपूर तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या शेतकऱ्यांना भरपाई, पुनर्वसन, अधिग्रहण, वेतन व अन्य लाभांविषयीच्या भुमिकेचा तसेच आयोगाने या संदर्भात दिलेल्या निर्देशास आव्हान देत मा. कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सन 2018 मध्ये कलम 338 ब अंतर्गत आयोगाला प्राप्त संवैधानिक अधिकारान्वये आपली भुमिका स्पष्ट केली. NCBC authority recognition

    Also Read : वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    दि. 24 जुलै 2023 रोजी मा. बंगलौर उच्च न्यायालय, कर्नाटक समोर आयोगाने शेतकऱ्यांचे हित आणि केपीसीएल द्वारा त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारा विरूध्द प्रभावीपणे बाजू मांडली. मा. उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकार व केपीसीएल च्या स्थगिती आदेश आणि याचिकेला खारीज करीत निवाडा दिला की, आयोगाचा संवैधानिक अधिकार केवळ औपचारिकता नसून, त्याचा आदर केलाच पाहिजे आणि संविधानानुसार, त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे याच भावनांसह मा. कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारची याचिका रद्द केली.

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मा. कर्नाटक उच्च न्यायालयात आपला पक्ष भक्कमपणे मांडला त्यामुळे रिट याचिकेवरील सुनावणी 14 ऑगस्ट 2025 रोजी पार पाडत मा. न्यायालयाने 19 सप्टेंबर 2025 रोजी आयोगाच्या बाजूने निकाल दिला. या निकालात न्यायालयाने नमुद केले की, कलम 338 ब संविधानात समाविष्ट करण्यात आले असल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला वैधानिक संस्थेतून संवैधानिक संस्थेत स्थान मिळाले आहे. त्यामुळे एक संवैधानिक संस्था म्हणून आयोगाचे कार्य सामाजिक, शैक्षणिकदृष्टया मागासवर्गीयांच्या हिताचे रक्षण करणे, केंद्र आणि राज्य सरकारांशी सल्लागार भुमिका बजावणे, तक्रार निवारण यंत्रणा म्हणून काम करणे आणि जातींच्या समावेश आणि बहिष्काराबाबत शिफारसी करणे हे आहे. या संवैधानिक दर्जामुळेच आयोगाला तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्याचे अधिकार बहाल आहेत. National Commission for Backward Classes verdict

    न्यायालयाने आपल्या निकालात पुढे असेही म्हटले की, कलम 338 ब च्या उपकलमान्वये आयोगाला संविधानानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या वर्गांसाठी प्रदान केलेल्या संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी आणि देखरेख करण्याचे तसेच मागासवर्गीयांना हक्कापासून वंचित राहण्याच्या तक्रारींचे संरक्षण आणि निवारण करण्याचे व या अनुषंगाने इतरही कर्तव्य पार पाडण्याचे असिमित अधिकार आहेत. न्यायालयाने असेही नमुद केले आहे की, आयोग अशा प्रकरणात एका कर्मचाऱ्यांची तक्रार ऐकत नाही तर, खाणकामांमुळे ज्यांचे जीवनावर विपरीत परिणाम होत आहे अशा विस्थापित शेतकरी, ग्रामस्थांच्या सामुहीक आक्रोशाची सुनावणी करत आहे. Karnataka high court orders NCBC powers

    आयोग ही संवैधानिक संस्था

    आयोग ही संवैधानिक संस्था आहे आणि संविधान हा कायदा नसून तो, सर्व कायद्यांचा स्त्रोत आहे. मा. कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णयात असेही अधोरेखीत केले की, न्यायालय वरील वादाकडे केवळ कराराच्या बारकाव्यामधून बघू शकत नाही, संविधान हे कागदोपत्री निर्जीव शब्द नसून ते न्याय, समानता आणि उपेक्षितांच्या कल्याणाची जीवंत साक्ष आहे. कलम 338 ब मागासवर्गीयांच्या न्याय हक्काचे कर्तव्य आयोगाला सोपवते हे अधिकार अस्पष्ट नसून उलट ते ज्या उद्देशासाठी तयार केले गेले होते तितकेच व्यापक सुध्दा आहेत. ज्या प्रकल्पपिडीत गावकऱ्यांनी स्वतःच्या जमीनी सोडल्या आहेत ते संवैधानिक सहानुभूतीला पात्र आहेत. त्यामुळे त्यांची दुर्दशा ही तडजोडीची गैरसोय नाही तर, संवैधानिक चिंतेचा विषय आहे असेही मा. कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. Karnataka high court orders NCBC powers

    राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी मा. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत या निर्णयामुळे विस्थापित ओबीसी शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. हे यश मा. मोदी सरकारने आयोगाला दिलेल्या संवैधानिक दर्जा आणि संविधानाच्या कलम 338 ब अंतर्गत बहाल केलेल्या अधिकाराची फलश्रृती असून श्री. अहीर यांनी मा. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रती विशेष आभार मानले आहे. या निर्णयामुळे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.



  • Maharashtra teachers salary before Diwali | दिवाळीचा आनंद द्विगुणित करा! आमदार अडबाले यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी केली महत्त्वाची मागणी

    Maharashtra teachers salary before Diwali

    Maharashtra teachers salary before Diwali : चंद्रपूर (५ ऑक्टोबर २०२५) : दि. १८ ऑक्टोंबर २०२५ पासून दिवाळीचा सण सुरु होत आहे. देशासह राज्‍यात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्‍याण व  कौशल्य व उद्योजकता विभागाअंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त सर्व शिक्षक, प्राध्यापक, सर्व निदेशक व कर्मचारी यांचे ऑक्‍टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच पाचही विभागाच्या प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. MLA Sudhakar Adbale latest news

    Also Read ; वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

    राज्‍यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, आयटीआय येथे कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळी हा सण आनंदाने साजरा करता यावा, याकरिता दिनांक १८ ऑक्‍टाेंबर २०२५ पूर्वी वेतन होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे नेहमी शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी झटणारे आमदार सुधाकर अडबाले यांनी सदर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी व्‍हावे, याकरिता मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

    राज्‍यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबरचे वेतन दिनांक १८ ऑक्‍टाेंबर २०२५ पूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत वेतन तरतूद तात्‍काळ उपलब्‍ध करून द्यावी व दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्याबाबत संबंधितांना आदेश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मा. मुख्यमंत्री, दोन्‍ही उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास बहु. कल्‍याण व  कौशल्य व उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. 

  • Ahetesham Ali joins Congress । वरोरा-भद्रावतीत भाजपला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली काँग्रेसमध्ये!

    Ahetesham Ali joins Congress

    Ahetesham Ali joins Congress : चंद्रपूर : चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होवून वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये रविवारी पक्षप्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    Also Read : खासदार धानोरकर यांच्या मागणीवर ताडोबा प्रशासन नरमल, स्थानिकांना जंगल सफारी मध्ये सवलत

    मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २१ हजारांहून अधिक मते मिळवून अहेतेशाम अली यांनी आपला मजबूत जनाधार सिद्ध केला होता. एनएसयूआय व युवक काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून ते वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. मात्र, २०१४ साली माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या सोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०१६ च्या वरोरा नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्यातील सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपद मिळवले होते. Warora Bhadrawati political news

    लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षात प्रवेश

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Pratibha Dhanorkar leadership

    यावेळी भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, दादापाटील झाडे (संचालक, नंदोरी सेवा सहकारी संस्था), अशरफ खान (जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजरी), आशिष ठाकरे, बंडूभाऊ लभाने, सादिक अली, शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, अनिल खडके (माजी सरपंच), मारोती झाडे (माजी सरपंच, टेमुर्डा), गणेश जोगी (ग्रामपंचायत सदस्य, फत्तापूर), जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर (पंचायत समिती प्रमुख, बोर्डा), सौ. चंद्रकलाताई मते (अध्यक्ष, महिला गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा), जितुभाऊ कांबळे (ग्रामपंचायत सदस्य, बोर्डा) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

    माजी नगराध्यक्ष अली हे भाजप पक्षातून निलंबित असले तरी त्यांचे पक्षात मोठे स्थान होते.

    अहेतेशाम अली यांच्यासह समर्थकांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात आणखी बळकट होणार आहेत.

  • Tadoba-Andhari new safari scheme for locals । प्रतिभाताई धानोरकरांचा पुढाकार; ताडोबाच्या बफर गेटवर स्थानिकांना आरक्षित जिप्सी सफारी

    Tadoba-Andhari new safari scheme for locals

    Tadoba-Andhari new safari scheme for locals : चंद्रपूर (दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५): ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने, ताडोबाच्या बफर विभागात आता स्थानिकांना जिप्सी सफारी साठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    Also Read : भाऊंचा दांडिया, विजेत्यांना मिळाली लाखोंची बक्षिसे

    या निर्णयानुसार, आगरझरी बफर गेटवर आता दर बुधवारी सकाळच्या सत्रासाठी सर्वच्या सर्व सहा जिप्सी सफारी वाहने (६ सीटर) केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यकारी समितीने दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. Tadoba local jeep safari booking Chandrapur

    जिप्सी बुकिंग आणि शुल्क तपशील

    • कोणासाठी: केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक
    • कुठे: आगरझरी बफर गेट
    • कधी: दर बुधवारी (सकाळच्या सत्रासाठी)
    • वाहन संख्या: एकूण ६ जिप्सी (६ सीटर)
    • शुल्क: एका जिप्सीसाठी (६ सीटर) ₹ ५००० (पाच हजार रुपये)
    • अंमलबजावणी: बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ पासून.

    बुकिंगची प्रक्रिया

    या जिप्सी सफारीची बुकिंग पर्यटनाच्या ७ दिवस आधीपासून एक दिवस आधीपर्यंत करता येणार आहे. बुकिंगसाठी नागरिकांना उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयातील क्रुझर बुकिंग काउंटर येथे सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत संपर्क साधावा लागेल.

    क्रुझर सफारीची सवलत कायम

    स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ताडोबा प्रशासनाने यापूर्वीच ९ सीटर क्रुझर सफारी सेवा सुरू ठेवली आहे. मोहर्ली प्रवेशद्वारासाठी ४ क्रुझर आणि कोलारा प्रवेशद्वारासाठी ३ क्रुझर सध्या कार्यरत आहेत. या क्रुझरद्वारे दररोज एकूण १२६ पर्यटकांना सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रवेश मिळतो. या क्रुझर सफारीचे शुल्क केवळ ₹ ७२०/- असून, यावर कॅमेरा शुल्कामध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे.

    हा नवीन जिप्सी उपक्रम सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. याला मिळणाऱ्या प्रतिसाद आणि यशावर आधारित पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वन्यजीव पर्यटन आणि स्थानिकांचे हित यांचा समन्वय साधण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.

  • Chandrapur anukampa and direct recruitment । अनुकंपाधारक उमेदवारांना मोठा दिलासा; चंद्रपूरमध्ये नियुक्तीपत्र वाटपाचा सोहळा

    नोकरीचा आधार कुटुंबासाठी मोठा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

    Chandrapur anukampa and direct recruitment

    Chandrapur anukampa and direct recruitment : चंद्रपूर, दि. 04 : राज्यामध्ये अनुकंपाधारकांच्या नोकरीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या कुटुंबांना आर्थिक व भावनिक मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळेच आज संपूर्ण राज्यात एकाचवेळी अनुकंपाधारक व सरळसेवा भरती उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहे. शेवटी नोकरी ही उपजिविकेचे साधन असून कुटुंबासाठी अतिशय मोठा आधार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. Chandrapur anukampa and direct recruitment

    Also Read : शेतकरी विष प्राशन प्रकरण, तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आणि प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करत नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केले, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, आज चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 सरळसेवा भरती उमेदवार असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी अनुकंपा या विषयासंदर्भात 40 शासन निर्णय होते. या सर्व शासन निर्णयांना एकत्रित करून अनुकंपाबाबत सुलभ धोरण तयार व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनव संकल्पना मांडली. त्यामुळेच आज अनेक कुटुंबांना शासकीय नोकरीचा आधार मिळाला आहे. Anukampa recruitment job orders

    अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा प्रशासनाने अतिशय पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे तयार केली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगले काम जिल्हा प्रशासन करत आहे. अनुकंपाधारक तसेच नवीन उमेदवारांनीही यात आपले योगदान देऊन निष्ठेने काम करावे. नोकरीत आपले ध्येय आणि उद्दिष्ट ठरवून नागरिकांची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

    anukampa recruitment job orders

    प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक व 83 लिपिक टंकलेखकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. सर्व विभागातील रिक्त पदांची माहिती घेऊन एकत्र यादी तयार करण्यात आली. त्यानुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. उमेदवारांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. नवीन उमेदवारांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करावे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. 285 new government jobs appointments Chandrapur

    कार्यक्रमाचे संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी सर्व विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यासाठी काम करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

    कार्यक्रम अनेक होतात, मात्र आजचा कार्यक्रम नेहमी आठवणीत राहील, असा आहे. जगातील केवळ 28 देशात स्थायी नोकरी आहे. शासकीय नोकरी ही ईश्वराची सेवा आहे, असे समजून लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण होईल, या भावनेने काम करावे. आपल्या हातून कोणतीही चूक होता कामा नये. जे काम मिळेल त्या कामांमध्ये तज्ज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. Chandrapur anukampa and direct recruitment

     अधिकारी आणि कर्मचा-यांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे : आमदार किशोर जोरगेवार

    राज्यात पहिल्यांदा एकाचवेळी 10309 उमेदवारांना शासकीय नेाकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 285 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांनी तसेच नवनियुक्त उमेदवारांनी चंद्रपूरचे नाव मोठे करावे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सरकारने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील. शासकीय नोकरीत रुजू होणाऱ्या उमेदवारांनी अनेक नवीन नवीन गोष्टी शिकून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. Chandrapur anukampa and direct recruitment

    उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप :  चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात मनिष दहिवले, सरिता मेश्राम, संदीप किटे, दिवेश भैसारे, समित्र कुमरे, राज सलामे, नम्रता करमळकर, राकेश आष्टेकर, प्रगती मार्लेवर, संतोष घाटोडे, शितल पाटोळे, शितल पुल्लावार, कविता उमरे, शिवम मडावी, कृष्णा सातपुते, विश्वास इटणकर, सिद्धेश तायडे, सरोज ब्राह्मणे, तन्वी सिडाम, यांच्यासह सेवा पंधरवडा अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत आदेश वाटप, वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले.

  • Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 । चंद्रपूरमध्ये ‘भाऊचा दांडिया’ महोत्सवाचा भव्य समारोप; विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 : चंद्रपूर (४ ऑक्टोबर २०२५) – “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यांमुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-भाऊचा दांडिया’ या सोहळ्याचे चौथे वर्ष दिनांक २ ऑक्टोबर रोजी  थाटामाटात संपन्न झाले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले.  Bhaucha Dandiya Festival Chandrapur

    Also Read : खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केले चक्काजाम आंदोलन

    हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता, तर शिक्षण, क्रीडा, कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला.

    अनुराग घोरपडे आणि मनीषा सरकार चॅम्पियन

    समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चॅम्पियन पुरुष गटातून अनुराग घोरपडे आणि चॅम्पियन महिला गटातून मनीषा सरकार यांनी दुचाकी आणि सन्मानचिन्ह पटकावले. याशिवाय, किंग मध्ये धनंजय मेश्राम आणि क्वीन मध्ये सुष्मिता मलिक यांनी पारितोषिक मिळवले.

    bhaucha dandiya festival chandrapur

    यावेळी रील स्पर्धा, ग्रुप दांडिया, लहान गट आणि ३५ वर्षांवरील महिला गटातील स्पर्धकांनाही रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि दांडिया खेळण्याची उत्तम संधी मिळाली. या यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शहरातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.