Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मतुआ महासंघाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान – आमदार किशोर जोरगेवार

    मतुआ महासंघाचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मतुआ महासंघाच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविल्या जात आहे. धार्मिक क्षेत्रातही मोठे काम मतुआ महासंघाच्या वतीने होत आहे. समाजाकडून त्यांना मिळत असलेले लक्षणीय सहाकार्य कौतुकास्पद असून मतुआ महासंघाचे सामाजिकधार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    चंद्रपूर येथील जागृत श्री श्री हरिचांद ठाकुर मंदिर येथे मतुआ महासंघाच्या वतीने चतुर्थ वार्षिक मतुआ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूरयांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी शोभा मा ठाकुरमंजुर ठाकुरमतुआ महासंघाचे डॉ. जे. बी महालीकसचिव शैलेन स्वरातीकोषाध्यक्ष निर्मेलेंद हलदारछत्तीसगड चे रवी गासाईरमेन बरदुलाल गोसाईडाॅ. अमल पोद्दार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

     

    यावेळी पुढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले किसमाजाला वेळो वेळी योग्य दिशा देत राहण्याची गरज असते. सध्या अनेक सामाजिक सेवाभावी संस्थासंघटनच्या माध्यमातून हे ईश्वरिय कार्य केल्या जात आहे. मतुआ महासंघही समाजात धार्मिक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. आपण दरवर्षी सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत असता यातील सातत्यता अशीच कामय ठेवण्याचे आवाहण यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    मतुवा महासंघाअंतर्गत समाजाचा विकासशिक्षणसांस्कृतिक सुरक्षा आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अनेक कार्यक्रम घेत या  पैलूंवर काम केल्या जात आहे.  ही संस्था सामाजिक आणि सांस्कृतिक सौहार्द वाढविण्याचे कार्य करत आहे. समाजातील सदस्यांना एकत्र येण्यास प्रोत्साहित करत आहे. आपल्या या कार्यात लोकप्रतिनीधी म्हणून आमचे नेहमी सहकार्य असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • नाल्यावर बांधली 10 फुटाची अनधिकृत भिंत, भिंत हटवा अन्यथा…मनविसेचा प्रशासनाला इशारा

    नाल्यावर बांधली 10 फुटाची अनधिकृत भिंत, भिंत हटवा अन्यथा…मनविसेचा प्रशासनाला इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनजीवन विस्कळीत होते अनधिकृत बांधकामामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. आज नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्याने पूरपरिस्थिती व नागरिकांचे मोठे नुकसान पाहायला मिळते.

     

    चंद्रपूर शहरानजीक असलेल्या मौजा कोसारा येथील श्री. हंस भक्ती आश्रम जवळ पाऊणकर ले आऊट येथील रस्त्यावर असलेल्या इरई नदीलागत असलेल्या पुलाखालून पाणी सुरळीत वाहत होते व पाण्याचा योग्य निचरा देखील होत होता. परंतु सदर नाल्या लगत चौधरी नामक व्यक्तीने काही दिवासा आधी अनधिकृत रित्या 10 फूट उंचीची काँक्रीट भिंत बांधल्याने पावसात सदर भागातील नागरिकांच्या घरात नाल्यातील पाण्याचा शिरकाव होऊन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

     

    सदर गंभीर बाब लक्षात घेत अनधिकृत केलेले बांधकाम तात्काळ कार्यवाही करत या भागातील नागरिकांना समोर उभारणाऱ्या समस्येपासून बचाव करण्या करीता चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुलदीप चंदनखेडे व पदाधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात व त्वरित सदर विषयावर तोडगा काढावा या साठी विनंती देखील केली. अणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत या निवेदनाची तत्काळ दखल जर घेतली जाणार नाही तर येत्या 7 दिवसात मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे आणि समत्त मनसे परिवार या वाहणाऱ्या पाण्याची रोक करणाऱ्या पुलियातील पाणी रोखणाऱ्या चौधरी यांना चौधरी चा चांद दाखवून पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून देणार अणि त्यांनी सुधा मार्ग मोकळा झाला नाही तर मग मनसे आपला मनसे स्टाईल हिसका दाखविणार.

     

    यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, जिल्हा अध्यक्ष व्यापारी सेना महेश शास्त्रकार,जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना महेश वासलवार,जिल्हा अध्यक्ष सुनिल भाऊ गुडे, जिल्हा सचिन किशोर मडगूलवार, तालुका अधक्ष प्रकाश नागरकार, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूर्क्याल, तालुका सचिव करन नायर, तालुका उपाध्यक्ष मयुर मदनकर, कोसारा अध्यक्ष शुभम वांढरे, जनहित कक्ष सचिव मंगेश धोटे, कामगार अध्यक्ष अक्षय चौधरी, प्रफुल कुचनकर, शिवाजी कडुकर, नितेश शेंडे, भुषण अंबादे, अक्षय काकडे आदी मनसैनिक अणि समस्त कोसारा गावकरी तसेच संगदिप जांभूळकर,धर्मेंद्र किनाके, नारायण गौरकार, विजय धागी, ईश्वर पांघटे, ओम जी शर्मा उपस्थित होते.

  • जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज नागपूर एम्सला टेलीकन्सल्टसिने जोडणार – भारती पवार

    जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज नागपूर एम्सला टेलीकन्सल्टसिने जोडणार – भारती पवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. यात अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णाला जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला टेलिकन्सलटन्सीने जोडणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चंद्रपुरात गुरुवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

     

    जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार या गुरुवारी चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यानी शासकीय विश्रामगृहात बैठक घेत आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी खनिज विकास निधीच्या बैठकीत काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आरोग्य क्षेत्राचा समावेश असून, जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सुविधांसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून, या निधीतून अनेक कामे केली जात आहे.

     

    काही कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांचा डॉ. भारती पवार यांनी बैठकीत आढावा घेतला.
    आरोग्याच्या दृष्टीने भविष्यात जिल्ह्यासाठी आणखी काय सुविधा देता येईल, याबाबत गुरुवारच्या आढावा बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात पीएम रिलिफ फंडातून पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात १४ कोटींची निधी देण्यात आला अशी माहिती देत उच्चदर्जाच्या लॅबसाठी प्रस्ताव आल्यास त्यासाठी १ कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही डॉ. पवार यांनी दिली. यानंतर वेगवेगळ्या आरोग्य सुविधांसाठी आतापर्यंत जिल्ह्याला ४८ ते ५० कोटींचा निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

     

    जिल्ह्यातील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट सुरू करण्यात आले आहे. टेलिकन्सलटन्सीने ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरेाग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आली असून, काही ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत. जिल्ह्यातील १७ लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड दिले जाणार असून, ५ लाख लाभार्थ्यांना या कार्डचे वितरण करण्यात आल्याची माहिती देत कोरोणासारख्या कोणत्याही साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य सज्ज आणि तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

     

    पत्रकार परिषदेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प. सीईओ विवेक जॉन्सन, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे उपस्थित होते.

  • चंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

    चंद्रपुरात लायन्स क्लब च्या एक्स्पो चे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर- लायन्स क्लब चंद्रपूर तर्फे आयोजित पाच दिवसीय एक्स्पो चे उदघाटन आमदार किशोर जोरगेवार याचे हस्ते बुधवारी पार पडले.
    स्थानिक क्लब ग्राउंड येथील लायन्स एक्स्पो च्या शुभारंभ प्रसंगी हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूह नृत्य स्पर्धे द्वारे करण्यात आला.

     

    या वेळी लायन क्लब चे प्रांतपाल बालबीर सिंह वीज, डॉ विलास मुळे, शैलेश बागला, घनश्याम भाई दरबार,दिनेश बजाज, राजू भास्करवार, wबबलू कोठारी, मंचावर उपस्थित होते. माता महाकाली च्या पूजनाने लायन एक्स्पो चा शुभारंभ करण्या आला.

     

    लघु आणि घरगुती व्यवसाय ला चालना मिळावी, व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या एक्स्पो चे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या एक्स्पो मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मंच मिळावा या उद्देशाने विभिन्न स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.

     

    एक्स्पो च्या यशस्वी ते साठी शैलेश दरबार,अजय वैरागडे,विश्वास माधमशेट्टीवार, गोपिकीशन डॉ अपर्णा सोनवलकर,अनु बागला, अंजु गोयल, पूजा जैन, सुनीता जैन,कविता अग्रवाल, जया सातपुते, लक्ष्मी अग्रवाल ,मंजू गोयल,कविता तहीलीयनी, अभिषेक बांगला, निर्मल भंडारी, पंकज खजांची, कोमल मुरारका, सोनल पुगलिया, सोनिया गुप्ता प्रयत्नशील आहेत

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपूर गॅझेटिअरचे प्रकाशन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून प्रथमच मराठीत तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा गॅझेटिअरचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित झाले आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना ठेवण्यात आले होते. बल्लारपूर येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

     

    चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकिंग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्यात आल्याचे गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी सांगितले.

     

     ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे प्रकाशन : 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेनिमित्त देशभरातून येणा-या खेळाडूंना चंद्रपुरचे वैभव, सांस्कृतिक वारसा व इतिहास तसेच प्रेक्षणीय स्थळांची माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेनुसार ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ ही हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तिका खेळाडूंसाठी तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचेही प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात करण्यात आले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    चंद्रपूर जिल्ह्यात वाळू घाटावर खुनी संघर्ष

    News34 chandrapur

    गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त ‘कुलथा’ घाटावर गुंड प्रवृत्तीच्या रेतितस्करांचा दि.(२८) गुरुवारी रात्री १ वाजता दरम्यान गावकऱ्यांनी जेसीबी व पोकलेन नदिघाटात टाकायला अडवल्यानंतर तस्करांनी गावकऱ्यांवर चाकू व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात सरपंचा सह महिलांना मारहाण करण्यात आली. तारडाचे शिवसेना (उबाठाचे) सरपंच तरुण गंगाराम उमरे,तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली.

     

    गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा रेती घाटासह अनेक घाटावरून रात्रीच्या सुमारास जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरने स्टॉक तयार करत रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

     

    स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टीच्चून रेती तस्करी केल्या जात आहे.जिल्हा प्रशासनाने रेती घाटावर उरलेला स्टॉक उचलण्याची(३१) डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. मात्र अनेक घाटावर स्टॉक शिल्लक नव्हता मिळालेल्या परवानगीच्या आधारावर संधीचा फायदा घेत स्टॉक व्यतिरिक्त पुन्हा नदीपत्रातून रेती उपसा करने सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून दादागिरी करत रेती उपसा सुरू आहे.

     

    नदीपात्रात जेसीबी, हायवा, पोकलेनचा वापर करू नये यासाठी सरपंच, तमुस अध्यक्ष यांच्यासह काही महिलांनी रेती घाटावर धडक दिली.शाब्दिक वादानंतर मारहाणीत रूपांतर झाले.रेती तस्करांनी लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून हल्लेखोरांनी घटस्थळावरून पळ काढला.

     

     

    जखमींच्या बयानानुसार ३०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे, आरोपीना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय मोगरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

     

    या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सरपंच तरुण उमरे हे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहे व विशेष बाब म्हणजे पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्यासहित दोघांवर गुन्हे दाखल केले आहे, सदर प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

     

    याबाबत गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आरोपी स्वप्नील काशीकर हे सध्या पसार झाले आहे त्यांना पकडण्यासाठी पथक निघाले आहे, महत्वाची बाब म्हणजे वाहतूक सेना जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की ज्यावेळी हा वाद मारहाण झाली त्यावेळी मी तिथे नव्हतो याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे देखील आहे, मला या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    ठाणेदार राजगुरू यांना कदाचित काशीकर यांची लोकेशन मिळत नसेल अन्यथा पोलीस विभाग मोबाईल लोकेशन घेऊन सुद्धा आरोपीना अटक करतात, फक्त गोंडपीपरी पोलीस याला अपवाद ठरली आहे, जिल्ह्यात अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे,  प्रशासनाच्या संमतीने हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे, प्रशासनाची संमती असल्याशिवाय अवैध वाळू माफिया इतकी हिम्मत करु शकत नाही.

  • मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे 67 व्या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन 27 डिसेंम्बरला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेच्या अभूतपूर्व आयोजनाबद्दल मुनगंटीवार यांचं भरभरून कौतुक केले.

     

    उदघाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दास, पद्मश्री बहाद्दूर सिंग चव्हाण, ललिता बाबर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आदींची उपस्थिती होती.

     

    स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.

     

    यावेळी धावपटू हिमा दास यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभूतपूर्व आयोजनाबद्दल आभार मानले, सोबतच सर्व खेळाडूंना खेळात आपल्या राज्याचे नाव उंचवावे असे आवाहन केले.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या भूमीत आपण आपल्या राज्याचे नाव उंचवायला आले आहेत इथं आल्यावर वाघाची वृत्ती आपल्यात आणा, आपण विविध राज्यातून आलात मात्र राज्यसहित व देशाचं नाव आपण सर्वांनी पुढे न्यावे असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

     

    मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गवगवा केला, देशात मागील 50 वर्षात जे झालं नाही तसा विकास पंतप्रधान मोदी यांनी केला आहे, पंतप्रधान मोदी यांचे फिट इंडिया स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, व पुढे मिशन ऑलम्पिक चे ध्येय आपण पुढे ठेवावे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तालुका ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेचे अभूतपूर्व आयोजन, हे मुनगंटीवार यांना चांगलेच जमले, मुनगंटीवार जी मानलं पाहिजे तुम्हाला या शब्दात शिंदे यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांचं कौतुक केले.

    आयोजित स्पर्धा उदघाटन प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

     

     

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाला अधिकाऱ्यांनी लावला बट्टा

    खेळाडूंचा काढता पाय
    पाहुण्यांचे भाषण लांबताच खेळाडू बाहेर निघाले

    आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे भाषण लांबल्याने खेळाडूंनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. धावपटू हिमा दास यांच्या भाषण दरम्यान खेळाडूंनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केले हे विशेष.

     

    पोलिसांवर भरोसा नाय का?

     

    राष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना सुद्धा आयोजकांनी खाजगी बाऊन्सर लावले, भाषण लांबल्याने खेळाडू बाहेर जात असताना बाऊन्सर त्यांच्या मार्गावर आडवे होत त्यांना खाली बसवीत होते. या प्रकाराने काही खेळाडू अक्षरशः घाबरून गेले होते, त्यांनी बाहेर निघण्यासाठी दुसरा मार्ग निवडला.

     

    भविष्यातील हे मोठे खेळाडू आणि हे नियोजन?
    National athletic
    कार्यक्रम संपल्यावर खेळाडूंना माल वाहतूक करणाऱ्या वाहनात नेण्यात आले

    कार्यक्रम संपला, नागरिक घरी निघाले, पाहुणे आपल्या मार्गावर निघाले मात्र अश्यातच माल वाहतूक करणाऱ्या वाहनात स्पर्धेत सहभागी खेळाडूंना नेण्यात आले, आहो कुणी जनावरांना सुद्धा असे नेत नाही, आणि आपले अधिकारी त्यांना अशी वागणूक देतात हे बरं नाही, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेतली मात्र आयोजन समिती मधील जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी काही प्रमाणात कार्यक्रमाला बट्टा लावलाचं

  • पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    पोम्भूर्ण्यातील या ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- वेळवा माल ग्रामपंचायतीवर शिवसेना (उबाठा)ची सत्ता असून ठल्याप्रमाणे अडीच- अडीच वर्षासाठी सरपंचपदाची वाटाघाटी करून आज झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र मानकर यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.शिवसेना कार्यकर्त्यांनी मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर करताच फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.

     

    वेळवा गट ग्राम पंचायतीच्या सरपंच सिमा निमसकार यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्राम पंचायत वेळवा माल कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

     

    यावेळी सरपंच पदासाठी जितेंद्र मानकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमरदिप खोडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी जितेंद्र मानकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच पदी निवड झाल्यानंतर नवनियुक्त सरपंच यांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,गणेश वासलवार निलेश लोणारे यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच जितेंद्र मानकर यांनी दिली आहे.

     

    यावेळी शिवसेना उबाठा चे तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार ,नगरसेवक बालाजी मेश्राम,माजी सरपंच सीमा निमसकार, सदस्य अतुल जाधव, सुरेखा कुडमेथे, निता येरमे, ममता जाधव,रमेश कुडमेथे, समीर लोणारे, मुना लोणारे, वनवासू येरमे माजी सरपंच, मधुकर मेश्राम,विलास कामिडवार,अनिल निमसकार,भाऊजी कुडमेथे प्रशांत कावटवार,अनिल मडावी,सतीश लोणारे,विनोद खोब्रागडे,प्रशिक मानकरयांची उपस्थिती होती.

  • मरेगाव ग्राम पंचायत सरपंच पदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंच निलेश धोटे

    मरेगाव ग्राम पंचायत सरपंच पदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंच निलेश धोटे

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मरेगाव ग्राम पंचायत येथील निवडणुकीच्या वेळेस निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने परत दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी परत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामधे सरपंच पदासाठी ज्योत्स्ना पेंदोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.सरपंच पदासाठी दुसरा अर्ज न आल्याने ज्योत्स्ना पेंदोर यांची सरपंच म्हणून अविरोध झाल्याचे घोषित केले. तर उपसरपंच पदासाठी निलेश धोटे व माजी सरपंच लक्ष्मी लाडवे आणि मंगला घाटे या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

     

    यामधे कांग्रेस पक्षाच्या लक्ष्मी लाडवे यांनी आपसी सामंजस्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी यांनी उपस्थित सहा सदस्यांना उपसरपंच पदासाठी हात वर करून मतदान घेतले असता निलेश धोटे यांचे बाजूने पाच तर मंगला घाटे यांचे बाजूने फक्त एक हात वर झाल्याने निलेश धोटे यांना उपसरपंच म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. आणि भाजपच्या मंगला घाटे यांना केवळ एक मत मिळाल्याने त्यांना हार मानवी लागली. निवडणुकीला ज्योत्स्ना पेदोर,निलेश धोटे,मारोती वेलके,लक्ष्मी लाडवे,आकाश वाकुडकर, मंगला घाटे उपस्थित होते.

     

    अखेर मरेगाव ग्राम पंच्यायत काँग्रेसच्या ताब्यात व कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात विजयी झाले असून सरपंच,उपसरपंच यांचे तालुका कांग्रेस कमिटी कार्यालयात पेढा चारून सरपंच,उपसरपंच व उपस्थित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कांग्रेस नेते संतोषसिंह रावत, माजी तालुका अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

  • आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

    आमदार निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी, मोठ्या इमारती व बगीचे बांधण्यात नाही – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरातील विद्यार्थी प्रतिभाशाली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याने भरारी घेतली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. आपण मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत आहोत. यातील आज दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण झाले आहे. अभ्यासा बरोबरच त्यांना विचारांची देवाण – घेवाण करता यावी, आपले अनुभव दुस-या विद्यार्थ्यांपर्यत्न पोहचविता यावेत. अभ्यासासाठी पूरक असे उत्तम वातावरण निर्माण व्हावे यासाठी आपण चंद्रपूरात ५० लक्ष रुपयातून खुली अभ्यासिका तयार करणार असुन हा चंद्रपूरातील पहिला प्रयोग असणार आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    आमदार निधीतून वडगाव येथील नानाजी नगर येथे अभ्यासिकीचे इमारत बांधकाम करण्यात आले आहे. आज सदर ईमारतीचे आमदार किशोर जोरगेवर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी नगर सेवक पप्पू देशमूख यांची तर प्रमुख अतिथी म्हणून नवदत्त क्रीडा मंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र येरगुडे, विनोद निखाडे, जनविकास युवा आघाडीचे अक्षय येरगुडे, जनविकास महिला आघाडी प्रमुख मनीषा बोबडे, सार्वजनिक दत्त मंदिराचे सचिव व्यंकटेश उपगन्लावार, बाळू पारखी, मनोज भैसारे आदींची उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना ते पूढे म्हणाले की, केलेल्या संकल्पाची पुर्तता होते. तो आनंद मोठा असतो.

     

    आमदार होताच चंद्रपूर मतदार संघात गरिब – गरजु विद्यार्थ्यांना निशुल्क अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण होउ लागला आहे. आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या इमारतीचे लोकार्पण करत आहोत. ही दत्त मंदिर येथील लोकार्पीत झालेली अभ्यासिकेची ईमारत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात नक्कीच योगदान देणारी ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर मतदार संघाचा विकास होत आहे. हा विकास होत असताना समाजातील सर्व घटकांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात आपण विकास पोहचवू शकलो आहे. महाविकास आघाडी सरकार आणि आता शिंदे- फडणविस सकरकार या दोनही काळात आपण विविध विभागातून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून विकासकामे करत असतांना मोठ्या इमारती, बगीचे बांधण्यावर आपण भर न देता लोकउपयोगी वास्तु उभारण्यावर लक्ष केंद्रीत केले. समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी आपण सामाजिक भवन उभारले आहे. हे सामाजिक भवन भविष्यात सांस्कृतीक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध असणार आहे.

     

    तर कोरोणा काळात विद्यार्थ्यांवर कोसळलेल्या संकटात आपण विद्यार्थ्यांसाठी मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला होता. यासाठी मोठ्या निधीची गरज होती. ती पूर्ण करतांना अनेक अडचणी आल्यात मात्र केलेला संकल्प पुर्ण करण्याचा निर्धार आपण केला होता. याचेच परिणाम स्वरुप आज आपण मतदार संघातील दुस-या अभ्यासिकेच्या ईमारतीचे लोकार्पण करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज इमारतीचे लोकार्पण झाले आहे. येथे पुस्तक व ईतर साहित्य खरेदीसाठी आपण आणखी निधी देणार असल्याचेही ते यावेळी बोलताना ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संचालन रमा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे आमदार – पप्पू देशमूख

    आमदार किशोर जोरगेवार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यांना एखादी मागणी केली व ती लोकउपयोगी असली कि ते ती पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. आज येथे लोकार्पित झालेली अभ्यासिका याचाच प्रत्यय देणारी आहे. आपण त्यांना खुल्या अभ्यासिकेची मागणी केली ती ही समजून घेत त्यांनी यासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. एकंदरीतच किशोर जोरगेवार हे समाज उपयोगी सुचनांची तात्काळ दखल घेणारे कार्यक्षम आमदार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमूख म्हणाले.