Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    चंद्रपुरात युवासेना (उबाठा) गटात युवकांची इनकमिंग सुरू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशात अन् राज्यात राजकारणात मोठी उलथापालथ होतांना कायमच आपल्याला दिसते.अशातच शिवसेना ऊबाठा गटातील नेतृत्वावर विश्वास ठेवत चंद्रपुरात युवकांची मोठी फळी युवासेनेत प्रवेश करतानाचे चित्र दिसत आहे.

    चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे विक्रांत सहारे यांनी घेताच त्यांनी युवकांची मोठी फळी चंद्रपुरात तयार केली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात विक्रांत सहारे हे पक्ष संघटन बांधणीत आगेकूच करीत आहे.

     

    आज दिनांक २५ डिसेंबर २०२३ शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे व प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेनेचे शिवा मिलिंद वझरकर, शाहबाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांनी युवासेनेत प्रवेश केला.

    येत्या काळात चंद्रपुरात शिवसेनेच्या उबाठा गटाला युवकांच्या माध्यमातून बळ मिळतांना नक्कीच दिसेल.

  • चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.

     

    घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर.जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले. सदर वाघ ही मादी असून 1 वर्षाची आहे, शवविच्छेदन केल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या वतीने देण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर सर्व स्पष्ट होणार.

     

    मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

     

    दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू – पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात 14 नोव्हेम्बरला 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर 18 नोव्हेम्बरला ताडोबा नैसर्गिकरित्या मृत्यू, 10 डिसेंबर ला वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू, 14 डिसेंबर पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू, 21 डिसेंम्बरला विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला, 24 डिसेंबर ला शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली आज 25 डिसेंम्बरला सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला.

  • राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

    राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज

    News34 chandrapur

    चंद्रपूर: राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मिशन ऑलिम्पिक 2036’ हे एकच ध्येय्य डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, २६ डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.

     

    या स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूरनगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. विविध चौकांचे सौंदर्यीकरण झाले असून नानाविध संकल्पनावर आधारित रंगबेरंगी चित्रांनी भिंती फुलल्या आहेत. अखिल भारतीय स्तरावरील या स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज झाली आहे.

     

    देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार, संपूर्ण तयारी झाली आहे.

     

    २६ ते ३१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास ३ हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडावी यासाठी आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

     

    यासंदर्भात वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी आढावा घेऊन समायोजित निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुरूप स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

     

    अभिनेते सलमान खान यांच्या शुभेच्छा

    भव्य अशा ६७ वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते सलमान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर येथील क्रीडा संकुलमध्ये होणारी ही स्पर्धा यशस्वी व्हावी, अशी भावना अभिनेते सलमान खान यांनी त्यांच्या शुभेच्छापर संदेशातून व्यक्त केली आहे. त्याचसोबत जयंत दुबळे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, रोहिणी राऊत ,माधुरी गुरनुले, ज्योती चव्हाण आंतरराष्ट्रीय धावपटू , सायली वाघमारे अथलेटिक्स परीक्षक यांनी देखील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

     

    थीम साँगला कैलाश खेर यांचे स्वर

    ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी थीम साँग तयार करण्यात आले आहे. या गाण्याला प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांनी आवाज दिला आहे. ‘आओ चंद्रपूर, खेलो चंद्रपूर… खेलो ऐसा दिल लेलो चंद्रपूर…’ असे शब्द असलेले हे गीत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाची पेरणी करणारे ठरत आहे. लक्षवेधक शब्द, जोशपूर्ण संगीत आणि कैलाश खेर यांचा भावगर्भित आवाज ही या थीम साँगची वैशिष्ट्ये ठरत आहेत.

     

    सूर्यनमस्कारातील मुद्रा, रंगबेरंगी भिंती, उड्डाणपूलावर रोषणाई

    ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डाणपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. जणू काही दिवाळी असल्यासारखे चंद्रपूर शहर सजविण्यात आले आहेत.

  • चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात हंसराज अहिर यांच्या बैठकीचा धडाका

    News34 chandrapur

    चंद्रपूर / यवतमाळ – विकसीत व सामर्थ्यशाली भारत घडविण्याची ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वात असल्याने ‘महाविजय 2024’ चे लक्ष्य गाठण्यासाठी व देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती सोपविण्यासाठी प्रत्येक बुथवर 50 टक्के मतदान हे लक्ष्य दृष्टीपथात ठेवून सुपर वॉरीयर्सनी आपल्या जबाबदारीला न्याय द्यावा अशी सुचना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र समन्वयक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.

     

    दि.23 डिसेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी पदाधिकारी व सुपर वॉरीयर्सना ते संबोधीत होते. सदर बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडीया, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, किशोर बावने, बंडु चांदेकर, संजय पिंपळशेंडे, मंगला धाकडे, ममता अवताडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे प्रभृती उपस्थित होते. यावेळी हंसराज अहीर यांनी ‘विकसित भारत रथ’ कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

     

    सुपर वॉरीयर्स तसेच बुथ संबंधात माहिती घेतली. पक्षीय कार्यकमाच्या अंमलबजावणी विषयी माहिती घेतांनाच उपयुक्त सुचना केल्या. हंसराज अहीर यांनी आर्णी विधानसभा कोअर कमिटीची पांढरकवडा येथे बैठक घेवून संघटनात्मक कार्य तसेच प्रदेश भाजपाद्वारा दिलेल्या कार्यकमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सर्वांनी परिश्रमपुर्वक कार्य करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहचेल असे नियोजन करीत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य करावे असे आवहन केले.

     

    यावेळी संतोष चिंतावार, आनंद वैद्य, किशोर देशट्टीवार, मदन जिड्डेवार, बंटी जुआरे, गुड्डू शुक्ला, विपिन राठोड मोहन कन्नाके, स्वप्नील मंगळे, बाळु हमंद, अॅड. मुत्तलवार, दयानंद सोयाम, दिलीप मुथा, शंकर समृतवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेशातील खेळाडू चंद्रपुरात दाखल

    28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेशातील खेळाडू चंद्रपुरात दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर आता जोमाने चढत असून विविध राज्यांमधून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुर येथे दाखल झालेल्या खेळाडूंचे जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना, पदाधिकारी व स्वागत समितीच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन आणि स्वागताने क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू भारावून गेले आहेत.

     

    राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना व त्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदींचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात स्वागत समिती, निवास समिती, भोजन समिती, उद्घाटन समिती, वाहतूक व्यवस्था समिती आदींचा समावेश आहे.
    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आजपासून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे.

     

     

    चंद्रपुरात खेळाडू घेऊन येणा-या विविध राज्यांच्या प्रतिनिधींशी स्वागत समितीच्या सदस्यांनी सुरवातीपासूनच संपर्क केला असून, त्यांची ट्रेनची येण्याची वेळ लक्षात घेता नियोजन केले आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकावर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी झारखंड, उत्तराखंड, जम्मु काश्मिर, ओडीसा, पंजाब या राज्याातील खेळाडूंचे त्यांच्या प्रशिक्षकांसह चंद्रपूर व बल्लारपूर येथे आगमन झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्व राज्यातील खेळाडू चंद्रपूरात दाखल होतील, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.

  • चंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….

    चंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी –  ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात सकाळच्या सुमारास गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पट्टेदार वाघ मृत अवस्थेत पडला होता.

    सदर वाघ हा शिकारीच्या शोधात आला असून तो विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला.

     

    यावेळी तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार साहेब यांनी वनविभाग चमु घेऊन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी विहिरीत पडलेल्या वाघाला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले.

     

    सदर पट्टेदार वाघ हा नर असुन अंदाजे वय अडीच वर्षाचे आहे.यावेळी ब्रम्हपुरी वनविभाग चे प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक एस.डी.हजारे, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविदपुर क्षेत्रसहाय्यक आर.एस.गायकवाड, तळोधी चे क्षेत्र सहायक मने,नेरीचे क्षेत्रसहाय्यक रासेकर, वनरक्षक श्रीरामे,बंडू धोतरे एन.टि.सी.ए.,मानद वन्य जीवरक्षक विवेक करंबेळकर, पंकज माकोडे एन.जीओ.यश कायरकर, पशुवैद्यकीय डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ.ममता वानखेडे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले.

     

    यावेळी तळोधी बा.पोलीस स्टेशन चे कर्मचारी वर्ग बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित होते.विहिरीत पडलेल्या वाघाला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी उसळली होती.सावरगांव येथील रोपवाटीका मध्ये मुत्यु पडलेल्या वाघाचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

    बल्लारपूर विधानसभा उमेदवाराची घोषणा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  वाढदिवसाच्या बॅनर वरून ban evm हा संदेश नागरिकांना देण्याचे काम गावतुरे दाम्पत्यानी केल्याने सदर बॅनर ची जिल्हाभरात चर्चा होती, मात्र गावतुरे यांच्या वाढदिवशी बॅनर काढल्याने आता विविध चर्चा रंगल्या आहे.

     

    डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढत्या राजकीय वजनाला घाबरून सूडबुद्धीने पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर हटविले व स्वतःचे बॅनर लावले
    क्रीडा महोत्सवाचे बॅनर काही दिवसापासून लागलेले असताना 21 तारखेलाच बल्लारशाच्या नगरपालिकेतून एक नोटिफिकेशन काढून 22 तारखेला लागलेले डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर फक्त काढणे म्हणजे डॉक्टर अभिलाष गावतुरे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका पालकमंत्र्यांनी घेतला की काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला असेच वाटते.

     

    आणि क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करत स्वतःच्याच जाहिरातीचे मोठ्या मोठ्या फोटोचे फलक जिल्हाभरामध्ये झळकावणे ही मोदी स्टाईल सुद्धा जनमानसामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

     

    बॅनर वर केवळ स्वतःचेच नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे व भाजपाच्या बोधचिन्ह कमळाचे फोटो लावलेले आहेत जसा काही हा सरकारी क्रीडा मंत्रालयाचा कार्यक्रम नसून भाजपाचा एक कार्यक्रम आहे. भूमिपुत्र ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यामुळे प्रचंड रोष आहे आणि तो ते बॅनर पुन्हा काढूही शकत होते पण पालकमंत्री या संविधानिक पदाचा मान राखत त्यांनी असे असंवैधानिक काम न करण्याचे ठरवले
    पण यानिमित्ताने आपल्या विरोधातला दणकट उमेदवार कोण आहे याची घोषणा तर पालकमंत्री तर करीत नाही ना ? असे भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

  • अजून किती जीवतोडुन सांगणार?

    अजून किती जीवतोडुन सांगणार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नुकतीच ओबीसी परिषद पार पडली मात्र या परिषदेतून एका स्वयंघोषित व स्वतःला ओबीसी नेता म्हणणाऱ्याच्या अस्तित्वाची धडपड दिसून आली.

     

    मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, त्यानंतर ओबीसी समाज जागृत झाला, अनेकांनी विरोधही केला, यामध्ये जरांगे पाटील यांचा विरोध करणाऱ्यात अग्रेसर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राहिला.

     

    जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटनांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले, चंद्रपुरात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी स्वतःला ओबीसी नेते म्हणजेच स्वयंघोषित असलेल्यांनी हजेरी लावली, आंदोलनाच्या मध्ये हे ओबीसी नेते मंडपाजवळ सुद्धा भटकले नाही.

     

    यामुळे अनेक ओबीसी समाजातील नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, फक्त चमकोगिरी साठी ओबीसी चा वापर करायचा आता हेच काम या नेत्याला उरले आहे.

     

    ओबीसी परिषदेनंतर विविध ठराव घेण्यात आले होते, मात्र ते ठराव कुणी मांडले? कुणाचं कुणी अभिनंदन केले? ओबीसी प्रवर्गातील विविध प्रतिनिधी आले मात्र त्यांचं नाव कुठेही आले नाही, म्हणजेच ते नाव नसलेले प्रतिनिधी होते काय? कारण ओबीसी परिषदेच्या प्रेसनोट मध्ये फक्त एकंच नाव होतं, बाकी कोण आलं कोण गेलं याचा काही एक उल्लेख त्यामध्ये नव्हता हे विशेष.

     

    एकीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शासनजवळ आपली मागणी विविध माध्यमातून पोहचविताना दिसतो मात्र दुसरीकडे आपल्या प्रांगणाच्या आतून हे स्वयंघोषित ओबीसी नेते आपला आवाज चार भिंतीच्या आत वाजविण्याचे काम करीत असतात.

     

    चंद्रपुरातील या स्वयंघोषित ओबीसी नेत्याची वाहवा काही निवडक लोक करताना दिसून येतात, मात्र खरे ओबीसी आपल्या समाजासाठी धडपडत आहे, आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र होत आपली ताकद दाखवीत आहे मात्र ओबीसी मधील काही अपवाद वगळता आपण आपल्या समाजात कसे श्रेष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी हे स्वयंघोषित धडपडत आहे.

     

    ओबीसी परिषद झाली, ठराव मांडले, त्याची प्रत उपमुख्यमंत्री यांना दिली त्यावेळी फक्त एकच नेता ही परत देताना दिसला, म्हणजेच फक्त नावासाठी ओबीसी समाजाचा वापर करायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे, मात्र तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरीही खरे ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

     

     

  • चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    चंद्रपुरातील मतदारांपर्यंत पोहचणार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृतीचा चित्ररथ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुका – 2024 च्या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत एलईडी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत राबविण्यात येणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते नियोजन भवन येथे चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

     

    यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएम / व्हीव्हीपॅटबाबात प्रचार प्रसिध्दी आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 2032 मतदान केंद्र, प्रत्येक शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गाव / शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, नाका, शासकीय कार्यालये, सभेची ठिकाणे इत्यादी मौक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनांद्वारे सदर मोहीम राबविण्यात येईल. या जनजागृती मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.

     

    पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेमध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घेणे, मतदान यंत्राबाबत आवश्यक माहिती घेणे, प्रत्यक्ष मतदान करणे, आपण केलेल्या मतदानाप्रमाणेच निकाल येतो का, ते तपासणे, याबाबत नागरिकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे, तसेच व्हीव्हीपॅटबाबत माहिती जाणून घ्यावी.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत ही जनजागृती मोहीम पोहचेल, असे नियोजन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घ्यावा. तसेच येणा-या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

  • हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    हंसराज अहिर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील 3 विधानसभेचा घेतला आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वरोरा विधानसभा क्षेत्र, वणी विधानसभा क्षेत्र व आर्णी विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा समन्वयक तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुथ रचना बळकट करीत सुपर वॉरियर्सने आपल्या नियंत्रण क्षेत्रातील प्रत्येकी तीन बुथवर 50 टक्क्याहून अधिक मतदान मिळेल याकरीता प्रभावीपणे कार्य करण्याची सुचना केली.

     

     

    वरोरा येथे दि. 23 डिसे. 2023 रोजी पार पडलेल्या विधानसभानिहाय कोअर कमिटीच्या या बैठकीस वरोरा विधानसभा निवडणुक प्रमुख रमेश राजुरकर, डॉ. भगवान गायकवाड, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, करण देवतळे, रोशनीताई देवतळे, सुनिताताई काकडे यांचेसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वणी व आर्णी विधानसभा क्षेत्राच्या कोअर कमिटी बैठकीस प्रमुख पदाधिकारी, सुपर वॉरियर्स उपस्थित होते.

     

     यावेळी उपस्थित पदाधिकारी, सुपर वॉरियर्स व बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना हंसराज अहीर यांनी महाविजय 2024 चे स्वप्न साकार करण्यास व मा. मोदीजींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी सुपर वॉरियर्सनी आवश्यक ते निर्णय व विशेष लक्ष घालून बुथ रचनेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्याची सुचना केली.

     

    सुपर वॉरियर्सने महाविजयाचा संकल्प घेत प्रत्येक मुद्दा, विषय समजुन घेवून त्याची तिन्ही बुथवर शत प्रतिशत अंमलबजावणी करण्याचे नियोजन करावे अशा सुचनाही अहीर यांनी वरील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील कोअर कमिटी पदाधिकारी वॉरियर्स व उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.