Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    हिट अँड रन कायदा रद्द करा, चंद्रपुरात वाहन चालकांचा निषेध मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पूर्वीच्या हिट ॲण्ड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट ॲण्ड रन कायदा २०२३ गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे. हा कायदा देशभरातील वाहनचालकांसाठी अन्यायकारक असून, लहानमोठ्या अपघातात वाहनचालक भरडले जाणार आहे.

     

    अनेकदा वाहनचालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात. मात्र, अशावेळी मोठ्या वाहनचालकांना दोषी ठरविले जाते. नवीन कायद्यामध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आल्याने हा कायदा रद्द यावा या मागणीसाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने शनिवार ३० डिसेंबर रोजी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली, या रॅलीत असंख्य वाहन चालक सहभागी झाले होते.

     

    यापूर्वी अपघातातील दोषींना शिक्षा देण्यासाठी विविध कलमे अस्तित्वात आहे. शिवाय मोटार वाहन कायदा अस्तित्वात आहे. असे असतानाही सुधारित हिट ॲण्ड रन कायद्यात नव्याने कलम ३०२ म्हणजे हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार १० वर्ष कारावासाची शिक्षा, २ लाख ते १० लाख रुपयेपर्यंत दंड अशी तरतूद करून हा कायदा २० डिसेंबर २०२३ रोजी संसदेत पारीत करण्यात आला आहे.

     

    अनेक अपघात अचानक झालेले असतात. अशोवळी मोठ्या वाहनाचे वाहनचालक नाहक भरडले जातात. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे उपरे यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहनचालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्यायकरणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेध रॅलीत वाहनचालकांनी मोठ्या संख्येत सहभाग दर्शविला.

    New year 2024 ad
    अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

     

  • तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

    तर वेकोली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – राजू झोडे यांचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर उपक्षेत्र वेकोली परिसरात 7 नोव्हेम्बरला 12 वर्षीय प्रेम वाघमारे या बालकाचा वेकोलीच्या वॉटर प्लांट मध्ये बुडून मृत्यू झाला होता, त्यावेळी पीडित परिवाराला 25 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य करू असे लिखित आश्वासन दिले होते मात्र वेकोली तर्फे आज पत्र मिळाले की अशी मदत करण्याचे कसलेही प्रावधान नाही.

     

    याविरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व दुर्गापुरातील नागरिकांनी वेकोली कार्यालयात धडक दिली, वेकोलीच्या वतीने आधीच पोलिसांना बोलाविण्यात आले होते, त्याठिकाणी अनुचित घटना घडून यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

     

    बराच वेळ झोडे यांनी चर्चा केली मात्र काही तोडगा निघत नसल्याने चंद्रपूर वेकोली क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधकांनी आम्हला आठवडा भराचा वेळ द्या आम्ही यामध्ये काही तडजोड करीत विशेष बाब म्हणून पीडित परिवाराला आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.

     

    झोडे व नागरिकांना आश्वासन मिळाल्यावर आम्ही आठवड्या नंतर पुन्हा येऊ असे सांगितले, जर पीडित परिवाराला मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू झोड यांनी दिला.

     

    कामगार संघटनेच्या भूमिकेवर संभ्रम

    आजच्या चर्चेत वेकोलीच्या 2 कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, मात्र त्यांनी पीडित परिवाराला मदत मिळावी यासाठी कसलेही भाष्य केले नाही, यावर राजू झोडे संतापले व दोन्ही कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना खडेबोल सुनावले.

    News year 2024
    डॉ. अशोक जीवतोडे यांच्याकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
  • नवीन वर्षाच्या पूर्व मुल पोलिसांची विशेष मोहीम

    नवीन वर्षाच्या पूर्व मुल पोलिसांची विशेष मोहीम

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – 31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, मुल पोलीस स्टेशन सज्ज झाले आहे. व यासाठी दिनांक 29/12/23 पासूनच विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुल पोलीस स्टेशन कडून नियोजनबद्ध बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.

     

    पोलिस स्टेशन हद्दीत ठीकठिकाणी फिक्स पाईन्ट व बॅरिगेड लावून नाकाबंदी करण्यात येणार असून, ड्रन्क ॲन्ड ड्राईव्हवर लगाम लावण्यासाठी पोलिसांचा तडगा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. बहुतांश पोलीस रस्त्यावर उतरून बंदोबस्त ठेवणार आहे. हद्दीत फिक्स पाईन्ट लावून वाहनांची तपासणी केली जाईल.

     

    मुख्यतः चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे नववर्षाच्या स्वागतावेळी दारू पिऊन वाहने चालविणारे अपघात घडवितात. त्याचेवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करून त्यांचे वाहन सुद्धा जप्त करण्यात येणार आहे.

  • १ जानेवारीच्या फुले दाम्पत्य सन्मान रॅलीत समाज बांधवांनी सहभागी व्हावे – चंद्रकांत बोरकर

    १ जानेवारीच्या फुले दाम्पत्य सन्मान रॅलीत समाज बांधवांनी सहभागी व्हावे – चंद्रकांत बोरकर

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – १ जानेवारी १८४८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलीचा पहिली शाळा सुरू केली. त्या सन्मानार्थ भिडेवाडा ते फुलेवाडा महारैली १ जानेवारी २०२४ रोजी माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

     

    या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तीखे यांचे मार्गदर्शनाखाली माळी महासंघाच्या वतीने गत नऊ वर्षापासून या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसह भिडेवाडा ते फुलेवाडा सन्मानदिन महारॅली फुले दांपत्यांच्या सन्मानार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाच्या निर्माणाचे सर्व अडथळे दूर होवून येत्या काही दिवसात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माणाचे कार्य सुरू होत आहे, माळी महासंघाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धता म्हणावी लागेल.

     

    फुले दांपत्यांच्या सन्मानासाठी तसेच आलेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी माळी समाज बांधवांनी या महारॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माळी महासंघाचे चंद्रकांत बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एस.कोकोडे, महीला आघाडी कार्याध्यक्ष प्रमुख संध्याताई गुरनूले, डॉ. संजय घाटे, यांनी केले आहे.

  • रानटी डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

    रानटी डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी

    News34 chandrapur

    चिमूर – गुणवंत चटपकार

    नेरी वरून जवळ असलेल्या नवतळा येथील शेतात काम करीत असलेल्या महिलेवर रानटी डुकराने हमला करून जखमी केले सदर हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून चिमूर येथील उपजिल्हारुग्णालयात उपचार घेत आहे सुदैवाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने जीवितहानी टळली.

     

    नवतळा येथील शालिनी मारोती बारसागडे वय अंदाजे 60 वर्षे ही सकाळी 10 वाजता शेतातील काम करण्यासाठी शेतात गेली असता शेतात एकटीच होती ऐन दुपारी 12 वाजता दरम्यान ऐका रानटी डुकराने शेतात आगमन करीत सरळ शालिनी बाईवर हल्ला चढवला मात्र शालिनी ला या डुकराचा मागोवा सुद्धा लागला नाही ती तुरी च्या शेंगा तोडीत होती रानटी डुकराची धडक इतकी जोरदार होती की सरळ पाळीवरून खाली कोसळली यामध्ये तिला गंभीर मार लागला व ती जखमी झाली खाली पडताच ती जोरात ओरडल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिक तिच्या आवाजाच्या दिशेने धावले लोकांना पाहून रानटी डुकर पसार झाला.

     

    त्यामुळे सुदैवाने तिचे प्राण वाचले सदर शेतकऱ्यांनी तिला उचलून घरी नेले व तात्काळ वाहन करून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले वृत्त लिहिपर्यत वनविभाग पोहचले की नाही याची माहिती मिळाली नाही सदर महिलेला वनविभागाने उपचारासाठी मदत द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.

  • चिमूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

    चिमूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

    News34 chandrapur

    चिमूर – चिमूर तालुक्यातील हिरापूर येथे दुचांकी वाहनाने चारचाकी वाहनाला समोरून धडक दिल्याने दुचाकी वाहक जखमी झाले असून जखमी युवक हीरापुर येथील रहिवासी आहेत. हिरापुर येथील ही दुसरी घटना आहे.

     

    शंकरपुर जवळील हिरापुर येथे शुक्रवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान हिरापुर गावातून येणाऱ्या दुचांकीने भरधाव वेगात येऊन चारचाकी वाहन क्रमांक ला धडक दिल्याने दुचाकीवाहक समीर नानाजी रावडे वय 19 व सुमित प्रल्हाद मुनघाटे वय 18 वर्ष दोघेही राहणार हिरापुर गंभीर जख्मी झाले असून. या घटनेची माहिती शंकरपुर पोलिस चौकीला कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी शंकरपुर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.

     

    प्राथमिक उपचार करून सुमित मुनघाटे याला नागपूर येथील रुग्णालयात तर समीर रावडे याना ब्रम्हपुरी येथे रेफर करण्यात आले. हिरापूर् येथील याच आठवड्यातील हा दुसरा अपघात असून पहिल्या अपघातात एक गंभीर जख्मी तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलिस शिपाई परमेश्वर नागरगोजे करीत आहेत

  • चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डाक विभाग करणार विशेष सन्मान

    चंद्रपूरचे पहिले आमदार श्रीमंत देवाजीबापू खोब्रागडे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त डाक विभाग करणार विशेष सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये मध्य-वऱ्हाड प्रांताच्या प्रांतिक न्यायमंडळात चांदा-ब्रह्मपुरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रपूरचे पहिले आमदार व बल्लारपूरचे पहिले नगराध्यक्ष श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या डाक विभाग तर्फे विशेष आवरण (Special Cover) चे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

     

    श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर व बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर च्या विद्यमाने चंद्रपूरचे पहिले आमदार, बल्लारपूर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष, चंद्रपूर येथील धम्मदिक्षा समारंभाचे अध्यक्ष, विदर्भातील प्रसिद्ध व्यवसायिक, समाजसेवक श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची १२५ वी जयंती चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात २ जानेवारी २०२४ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे साजरी करण्यात येणार आहे.

     

    सकाळी ९ वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे भवन, चंद्रपूर येथे श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणायात येणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता डाक विभाग भारत सरकारच्या वतीने विशेष आवरण (Special Cover) चा अनावरण सोहळा विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, विमोचनकर्ता शोभा मधाले, पोस्ट मास्टर जनरल, विदर्भ क्षेत्र, नागपूर तसेच श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांची सून सुधा हेमचंद्र खोबरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण हेमचंद्र खोबरागडे राहणार आहेत.

     

    त्यानंतर भव्य प्रबोधन सभेत ( ‘भारतातील वर्तमान वाटचाल, एक मूल्यमापन’ ) या विषयावर आंबेडकरी विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम, नागपुर व भीमराव वैध (श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे जीवन – एक अवलोकण) यांचे मार्गदर्शन होणार आहे. ह्या कार्यक्रमास ॲड. रामभाऊ मेश्राम व ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

     

    स्वागताध्यक्ष मारोतराव पत्रूजी खोबरागडे भूषवतील तर अध्यक्षस्थानी रिपब्लिकन नेते अशोक निमगडे राहातील.
    विदर्भातील प्रसिद्ध मोठे व्यापारी असलेले चंद्रपूर जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालणारे श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांनी तन-मन-धनाने संपूर्ण आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी खर्ची घातले त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रफित दाखविण्यात येणार आहे.

     

    श्रीमंत देवाजीबापू खोबरागडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय कार्य’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजीत केली असुन इच्छुक स्पर्धकांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला निबंध पीडीएफ करून दिनांक 31 डिसेंबर पर्यंत 9527580964 व 8698615848 या मोबाईल क्रमांकावर पाठवावे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

     

    या पत्रकार परिषदेला किशोर सवाने, प्रतीक डोर्लीकर, दीपक जयसवाल , नंदू नागरकर , रामु तिवारी , सूर्यकांत खनके, बलराम डोडाणी, विजय नळे, पप्पू देशमुख, ॲड. राजस खोबरागडे, डी. के. आरीकर, ॲड. वैशाली टोगे, द्रौपदी काटकर , एम टी साव , संजय डुंबेरे, राजकुमार जवादे , अशोक टेंभरे, शाहीन शेख , पुरणसिंग जुनेजा, हाजी अन्वर अली, अमजद पापाभाई शेख, प्रा. नितीन रामटेके, अवतारसिंग गोत्रा, अॅड. हिराचंद बोरकुटे, अॅड. विजय मोगरे, गोपाल अमृतकर, डॉ. रोशन पुलकर, डॉ. टी.डी. कोसे, अॅड. राजेश वनकर, डॉ. मुकूंद शेंडे , प्रविण पडवेकर, सोहेल शेख, राजूभाऊ खोबरागडे, विशालचंद्र अलोणे, केशव रामटेके, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, शेषराव सहारे, आर्कि. राजेश रंगारी , दुष्यंत नगराळे, नेताजी भरणे, रमजान अली, जि. के. उपरे, सुरेश नारनवरे, पवन भगत, अॅड. आशिष मुंधडा, तवंगर खान, धर्मेश निकोसे, रामकृष्ण कोंड्रा, जॉन्सन नळे, जमनादास मोटघरे, भाऊराव चांदेकर, वसंत रंगारी, अशोक सागोरे, कैलाश शेंडे, ज्योती सहारे, निर्मला नगराळे, मृणाल कांबळे, गिता रामटेके, योगिता रायपुरे, अल्का मोटघरे, तनुजा रायपुरे, वर्षा घडसे, ज्योती शिवणकर, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकर, अश्विनी आवळे, वैशाली साठे, राजेश्री शेंडे, शिला कोवले, छाया थोरात, अनिता जोगे, अंजली निमगडे, ज्योती निमगडे, लिना खोबरागडे, सुनिता बेताल, पोर्णिमा जुलमे, समता खोबरागडे, पोर्णिमा गोंगले, अशोक फुलझले, शंकर वेल्हेकर, प्रेमदास बोरकर, अनिल अलोणे, सचिन पाटील, प्रदिप अडकिने, विजय करमरकर, माणिक जुमडे, सिध्दार्थ वाघमारे, प्रभुदास माऊलीकर, यशवंत मुंजमकर, वामनराव चंद्रिकापूरे , विशाल चीवंडे, सुधीर ढोरे, सुनिल जुनघरे, हर्षल खोबरागडे उपस्थित होते.

  • DBT योजनेचा फुग्गा फुटला

    DBT योजनेचा फुग्गा फुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुमुल जिल्हा आहे. आदिवासींच्या विकासासाठी व प्रगतीसाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी असताना व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अनेक योजना कार्यरत असताना केवळ राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे या जिल्ह्यातील अनेक आदिवासीं विद्यार्थी महिना उलटूनही डीबीटी न मिळाल्यामुळे अनुदानापासून वंचित म्हणजेच शिक्षण व विकासापासून वंचित राहण्यासाठी बाध्य झाले आहे.

     

    ५ वर्षापूर्वी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही अनुदान देणारी योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. पण गेल्या तीन वर्षापासून नेहमीच बजेट नसल्याचा कारण देऊन या विद्यार्थ्यांना नियमित अनुदानापासून वंचित ठेवण्यात येते आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचा जेवण, शालेय साहित्य व त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशाअभावी त्यांच्या अडचणीत वाढ होते.

     

    आदिवासी विद्यार्थ्यांकडून हे सतत लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा शासन व प्रशासन पातळीवर याबद्दल संवेदनशीलता नाही. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, व पूर्वीची वस्तीगृहात मेस व शालेय साहित्य पुरवणी केल्या जावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

     

    या मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांचा मोर्चा हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या प्रांगणात पोहोचला. यावेळी उपस्थित सर्व अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. प्रकल्प अधिकारी मुरुंगणाथम एम यांनी वरच्या पातळीवर दूरध्वनीद्वारे संपर्क केला व या विद्यार्थ्यांची अनुदान लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. पण विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन घेऊन आपल्या वस्तीगृहात परत जावे लागले.

     

    विद्यार्थी आपल्या समस्यां घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांकडे आल्याचे समजतात डॉ अभिलाषा गावतुरे यांनी सुद्धा धाव घेतली. त्यांचा प्रश्न किती गंभीर आहे व तथा सोडवणे का आवश्यक आहे हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच कुठलाही आदिवासी वस्तीगृहातील एकही विद्यार्थी उपाशी राहता कामा नये ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे आश्वासन देखील दिले तसेच डीबीटी न आल्यामुळे कुठल्या ही आदिवासी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास आणि शाळा सोडून गावाकडे जाऊ नये, स्वतःचे शैक्षणिक नुकसान करून घेऊ नये.

     

    त्यांचा जेवणाचा व शालेय शिक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू असे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आश्वासित केले. त्यांच्यासोबत नितेश कुळमेथे व इतर कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

    ज्या जिल्ह्यात आदिवासींनी निर्माण केलेली वनसंपदा आहे आणि या जिल्ह्याला वैभव व संस्कृती जडणघडण ज्यांच्यामुळे आहे त्या समाजाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या वनसंपदेवर लाखोची उलाढाल होऊन वनविभाग व इतर विभाग लाभार्थी बनले आहेत आज त्याच वनातील आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे हे इथल्या राजकीय व प्रशासकीय लोकांसाठी सुद्धा शरमेची बाब आहे.

     

    एकीकडे आदिवासींचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंडळ आणि योजना तयार कराव्यात पण त्यांचा विकास तर सोडाच पोटात अन्न द्यायला जर सरकारकडे पैसा नसेल तर खरंच विकास कुणाचा होत आहे असा गंभीर प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला! राजकारणी तुपाशी तर जनता उपाशी हे चित्र चंद्रपूरला नेहमीच बघायला मिळतं. हा प्रश्न तत्काळ निकाली निघावा असे निवेदन डॉक्टर अभिलाषा गावतूरे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.

  • उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    उमा नदीच्या पात्रातुन भरमसाठ रेती उपसा

    News34 chandrapur

    चिमूर – (गुणवंत चटपकार)
    चिमूर शहर व तालुक्याची जिवन वाहीनी असलेल्या उमा नदीचीचे पात्र रेती तस्करां करीता संजिवनी ठरली आहे. सोनेगाव सिरास गावा जवळील उमा नदीच्या घाटातुन मागील पंधरा दिवसा पासुन रात्रोच्या सुमारास रेतीचा उपसा करून रोज चिमूर व नेरी येथील पंचेविस ते तिस ट्रॅक्टर द्वारे तस्करी केल्या जात आहे.ज्यामुळे शासणाचा लाखो रूपयाचा महसुलास रेती तस्करांनी चुना लावलेला आहे.

    चिमूर तालुक्यात सर्व पक्षीय रेती तस्करांकडून रेतीचा उपसा व वाहतुक करून बक्कळ पैसा कमविल्या जात आहे.या तस्करांना राजकिय व प्रशासकिय आधार मिळाल्याने त्यांची मुजोरी वाढली असुन सामान्य नागरीकांना कुणीही जुमानत नाही.

     

    शेतकऱ्यांना,गावकऱ्यांना धमकावुन व प्रशासनाशी आर्थिक हितसंबध जोपासुन यांचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु आहे. चिमूर तालुक्यात उमा नदीच्या सोनेगाव सिरास जवळील पात्रात स्थळावर मोठ्या प्रमाणात रेती आहे.हे सर्व हेरून चिमूर नेरी येथील रेती तस्कर सामुहिक पणे या पात्रातुन अवैध रेती उत्खनन व वाहतुक करीत आहेत.ज्यामुळे पात्रात जवळपास पाच फुटावर खड्डे पडलेले आहेत.हि रेती तस्करी रोज रात्रो पहाटे पाच वाजे पर्यंत केल्या जाते.

     

    अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या साठी निर्माण करण्यात आलेल्या पांदण रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात दुचाकीने जाताना जिव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक शेतकरी यावरून मार्गक्रमण करताना पडले आहेत.मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या रेती तस्करीकडे महसुल विभाग जाणीव पुर्वक दुर्लक्ष करतात कि त्यांना माहीती नसते हा गंभीर प्रश्न आहे.या घाटातुन करण्यात आलेल्या रेती उपसा संबधी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांना माहीती देण्यात आली असुन या रेती तस्करावर कोणती कार्यवाही होईल याकडे नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल- खरीप हंगाम धान कापणी व चुरणा करण्याची वेळ आली की, नेहमी वाघाच्या घटना घडतच असतात. याच्यावर मात्र शासनाच्या वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शेतकरी म्हटला तर त्याच्या जनावरांना चारा लागणारच यासाठी शेतातून गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३३ मध्ये गुरुवारी सकाळी ८.३० वाजता दरम्यान घडली. रात्रो होऊनही शेतातून घरी परत न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला असता शुक्रवार सकाळी ७ वाजता दरम्यान शेतातलगत असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

     

    सुभाष लिंगाजी कडते वय अंदाजे (४२) वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे.नेहमीप्रमाणे घरच्या गुरांना शेतातून चारा आणायला सुभाष शेतात गेला होता.दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने सुभाषवर हल्ला करून जागीच ठार केले.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र सुभाष दिसला नाही.शुक्रवारी सकाळी ७ वाजता शेतातून फरफटत नेल्याचे दिसून आले.त्याच्या ५०० किमी अंतरावर जंगलात सुभाषचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर आणि कर्मचारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

     

    शासनाच्या वनविभागाकडून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ ३० हजार रुपयाची मदत वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडून देण्यात आली. याच वन परिक्षेत्रात यापूर्वीही अनेक वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाला पुन्हा किती घटनेची अपेक्षा आहे असा सूर मात्र जानाळा ग्रामस्थांमध्ये दिसून आला. वाघाच्या सारख्या दहशतीमुळे शेतकरी आपली शेती कसने सोडून देणार असल्याचे बोलून दाखविले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याची शेती करावी व शेतकऱ्याला शेतीचा मोबदला द्यावा. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वणाला तारेचे कुंपण करुन आपल्या वन्य प्राण्यांचे रक्षण स्वतः करावे. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.