Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur police law and order । चंद्रपूर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखा; जिल्ह्यात कलम ३६ लागू

    Chandrapur police law and order

    Chandrapur police law and order : चंद्रपूर,दि. 15 : चंद्रपूर शहरात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 21 ऑक्टो. रोजी दिवाळी व क्रांतीवीर बाबूराव शेडमाके पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 15 ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहचु नये, यासाठी कलम 36 चे पोटकलम अ ते फ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये लागू करण्यात आले आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात ८८ कोटीच्या ठेवी पण..

    यानुसार सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणुक काढण्याबाबत, त्या ठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.

    असे आहेत पोलिसांना अधिकार

     अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकाचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, ब) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाचेजवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, क) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाजवळ लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ड) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर किवा सार्वजनिक ठिकाणी लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, फ) कलम 33, 35, 37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार. public event regulations Chandrapur

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार याची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिका-यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशात नमुद आहे.

  • Unclaimed bank deposits Chandrapur । चंद्रपूरमध्ये 88 कोटींच्या दावा न केलेल्या ठेवी; दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्याची प्रक्रिया

    Unclaimed bank deposits Chandrapur

    Unclaimed bank deposits Chandrapur : चंद्रपूर, दि. 15 (News३४ वृत्तसेवा) : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा जिल्ह्यातील 3 लक्ष 76 हजार 242  खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. Chandrapur bank deposit claim process

    Also Read : नशामुक्त चंद्रपूर मोहिमेची सुरुवात

    ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशीष पोरकुटे यांनी दिली. देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4612 कोटी, संस्थांच्या 1082 कोटी आणि सरकारी योजनांतील 172  कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.

    जिल्हाधिका-यांचे आवाहन 

    जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँकांमधील सुमारे 88 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी खात्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. ठेवींचा परतावा मिळविण्यासाठी आणि निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ठेवीदारांनी आपल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अद्ययावत केवायसी सादर करावे. बँकांमार्फत या विशेष मोहिमेअंतर्गत जनजागृती शिबिरे आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार असून, ज्या खातेदारांचे पैसे वर्ग झाले आहेत, त्यांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व खातेदारांनी आपल्या रकमेचा परतावा मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Bank of India unclaimed deposit recovery

    संबंधित खातेदारांनी बँकेत संपर्क करावा 

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी, ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित करण्यात येणार आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी केले आहे.

  • Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 । चंद्रपुरात बचत गटातील महिलांचा दिवाळी फराळ महोत्सव

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025

    Chandrapur Diwali Faral Mahotsav 2025 : चंद्रपूर,दि. 14 (News३४ वृत्तसेवा) :   दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे यांची खरेदी करावी. तसेच या महिला गटांचा उत्साह वाढवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पध्दतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव 15 ते 19 आक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

    ४ दिवसीय फराळ महोत्सव

    उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खाद्दपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या गणपती महोत्सव प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. Buy homemade Diwali faral

    Also Read : चंद्रपुरात १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित

                  सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसरात तथा मौलांना अब्दुल कलाम आझाद गार्डन चंद्रपूर येथे दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार आहे. यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच जिल्हा अभियान सहसंचालक मंजिरी टकले यांनी केले आहे.

  • Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic । धम्मचक्र प्रवर्तन दिन: चंद्रपूर शहरातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची वाहतूक सूचना

    Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic

    Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – शहरामधील दीक्षाभूमी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून  सदर सोहळयात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा  प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दीक्षाभुमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

    Also Read : १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

                त्या अनुषंगाने 15 ऑक्टो. च्या  सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टो. च्या 8 वाजेपर्यंत शहरातील वाहतुक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे.

    सर्व प्रकारच्या वाहनाकरीता खालील मार्ग बंद : 

               दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक – जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड/हुतात्मा स्मारक जवळील रोड, तसेच वरोरा नाका चौक -मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी  राहील. तसेच सदरचा सर्व परीसर नो पार्कीग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. Chandrapur Dhammachakra Pravartan parking    

    अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग

              1) सदर कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड़ वाहने ही  हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प, सावरकर चौक, वरोरा नाका उडाणपुल या  मार्गाने जातील. किंवा नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपुर कड़े जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल.नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशा कडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प, नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प  डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.

    शहरातील दुचाकी व चारचाकी हलकी वाहनाकरिता रहदारी व्यवस्था

     : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक-टि. बी . हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी, विश्रामगृह, जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहना करिता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका उड्डाण पुल  सिध्दार्थ हॉटेल, बस स्टैंड, प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. Chandrapur city traffic management Dhammachakra

    रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी  पाण्याची टाकी –दवा बाजार – संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने, जड वाहने वगळून  घेवून जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेट कडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे  जाणाऱ्या वाहन चालकांनी  आपली वाहने पाण्याची  टाकी, प्रियदर्शनी चौक, बस स्टैंड, सिध्दार्थ हॉटेल, उड्डान पुल मार्गं नागपूरकडे जातील. Chandrapur Dhamma Chakra Pravartan traffic

    दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ

                1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता  शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान. 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणारी  वाहनाकरिता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ),  जीवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय हॉस्पीटलच्या मागे), 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातुन येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स  स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी. Diksha Bhumi road closures Chandrapur

                  सदर अधिसूचना 15 ऑक्टो च्या सकाळी 8 वा पासून 17 ऑक्टो च्या सकाळी 8 वाजतापर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार  बदल करण्यात येईल. तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव / अनुयायी व जनतेने वरील वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच वाहतुक व्यवस्थेचे (नियमाचे) पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

  • Vijay Wadettiwar Farmers Relief । अतिवृष्टीग्रस्त तालुके नुकसान भरपाई यादीत समाविष्ट; वडेट्टीवार पुन्हा ठरले शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक

    Vijay Wadettiwar Farmers Relief

    Vijay Wadettiwar Farmers Relief : ब्रह्मपुरी १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – यंदाचे वर्षी खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले. अशा आसमानी संकट काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार कडे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत देऊन, सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केलेल्या आग्रही मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार आहे. Kharif Crop Damage Maharashtra

    Also Read : चंद्रपुरात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

    राजकारणा सह सामाजिक बांधिलकी जोपासणारा सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची सर्वदूर ओळख आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, मजूर यांच्या समस्यांचे निराकरणासाठी सदैव पाठीशी खंबीर उभे राहणारे विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यंदाचे वर्षी झालेल्या अतिवृष्टीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. व लगेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

    सततच्या पाठपुराव्याला यश

    शेतकऱ्यांची दैन्यावस्था बघून सदर मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तीनही तालुक्यांचा अतिवृष्टी व नुकसानग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षनेते,आ विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सदर तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार असून एक कर्तव्यदक्ष,शेतकऱ्यांप्रती सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा याचा प्रत्यय ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आला आहे.

  • Chandrapur Public Holiday News । धम्मचक्र प्रवर्तन दिनी चंद्रपूरमध्ये सार्वजनिक सुट्टी; प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश

    Chandrapur Public Holiday News

    Chandrapur Public Holiday News : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन इतिहास घडवला. या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’ निमित्त दरवर्षी मोठा जनसमूह या दिवशी चंद्रपूरमध्ये एकत्र येतो. मात्र, या दिवशी अद्यापही सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली नव्हती.

    Also Read : चंद्रपुरात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

    या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे आक्रमक मागणी करून १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, जिल्हाधिकारी विनय गौडा (अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर) यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत १४ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे. public holiday on Dhamma Chakra Pravartan Day

    अत्यावश्यक सेवा वगळता सुट्टी

    या आदेशानुसार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.कार्यालयांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते की, या दिवशी सुट्टी नसल्यामुळे अनेक शासकीय कर्मचारी, कामगार आणि नागरिकांना रजा मिळवून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक सोहळ्यात त्यांचा सहभाग मर्यादित राहतो. मात्र आता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे लाखो अनुयायांना व त्यांच्या कुटुंबीयांना या पवित्र दिनाचे उत्साहात व शांततेने पालन करता येणार आहे. ही मागणी अंशतः मान्य झाल्याने समाजाच्या भावना आणि लोकहित दोन्हींचा सन्मान झाला आहे.

  • Mahavikas Aghadi prominent leaders meeting । 💪 चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू — प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक

    Mahavikas Aghadi prominent leaders meeting

    Mahavikas Aghadi prominent leaders meeting : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने आज चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची प्राथमिक बैठक पार पडली. ही बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.

    Also Read : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    मनपा निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार

    या बैठकीत आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महानगरपालिकेवर विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी केला. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

     यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महानगर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी, काँग्रेसचे विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, उबाठा शहर अध्यक्ष सुरेश पचारे, उबाठा गटाचे नेते सतीश भिवगडे, उबाठा उपाध्यक्ष शालिक फाले, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, मनपा माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, मनपा माजी स्थायी समिती सभापती नंदू नगरकर, माजी नगरसेवक राजेश अडूर, काँग्रेस नेते शिव राव, उबाठा नेते अजय वैरागडे, माजी शहर प्रमुख उबाठा प्रमोद पाटील, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, संभाजी ब्रिगेड मार्गदर्शक दीपक जेऊरकर, नवशाद शेख, पप्पू सिद्धीकी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

  • skill training short term courses । PM मोदी यांच्या हस्ते कौशल्य रोजगार कोर्सेसचा शुभारंभ — चंद्रपूरमध्ये संधीचा नवा सूर!

    skill training short term courses

    skill training short term courses : चंद्रपूर, दि. 13 : कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागामार्फत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (शॉर्ट टर्म कोर्सेस) या उद्योगस्नेही व नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

    Also Read : १६ ऑक्टोबर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची सुट्टी द्या

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून 6 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात संपूर्ण जिल्ह्यात  1145 विद्यार्थ्यांनी शॉर्ट टर्म करीता प्रवेश घेतला असून यात 138 जणांनी न्यू ऐज कोर्स, 141 मुलींच्या संबंधित कोर्सेस, 157 जण संगणकाशी संबंधित तर 709 विद्यार्थ्यांनी व्होकेशनल संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. Chandrapur Short Term Skill Courses

    असे आहेत नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम : 

    चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ॲडेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरींग, इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी, सोलर एनर्जी, सर्व्हिस टेक्निशिअन (होम अल्पायंन्सेस), ड्रोन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरीटी तसेच महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम, डीजीटल मित्र, सोशल मिडीय इन्फ्ल्युएंसन, सेल्फ ऐप्लॉईड टेलर, कॉसमेटॉलॉजी, ब्युटी पार्लर असे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.

    प्रवेश घेण्यासाठी पात्रता

     : या अभ्यासक्रमांसाठी पात्रता म्हणून आयटीआय प्रशिक्षण घेत असलेले किंवा उत्तीर्ण विद्यार्थी, उच्च व तंत्रशिक्षणातील पदवीधर किंवा पदविकाधारक तसेच दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

    येथे करा नोंदणी : नोंदणी खालील संकेतस्थळांवर करता येईल. 1. https://admission.dvet.gov.in

    2. https://msbsvet.edu.in

    अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी जिल्ह्यातील जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार यांनी केले आहे.

  • Public Holiday October 16 । चंद्रपूर दीक्षाभूमी येथील १६ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सार्वजनिक सुट्टी?

    Public Holiday October 16

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी

    Public Holiday October 16 : चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरनंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ज्या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक ऐतिहासिक क्रांती घडवली, त्याच दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा थेट मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्याकडे १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करण्याची लोकहितकारी मागणी केली आहे.

    Also Read : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    या मागणीचे गांभीर्य स्पष्ट करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले की, १६ ऑक्टोबर रोजी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध धर्मीय बांधव चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर अखंड श्रद्धेने अभिवादन करण्यासाठी येतात. हा दिवस सामाजिक समता आणि क्रांतीचे प्रेरणास्रोत आहे. Deekshabhoomi Day Public Holiday

    सुट्टी जाहीर करा

    “सध्या १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, तसेच विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामावरून रजा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परिणामी, त्यांना त्यांच्या श्रद्धेचा मान राखणे आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी होणे शक्य होत नाही. हा विषय लाखो लोकांच्या धार्मिक व सामाजिक श्रद्धेशी जोडलेला आहे,” असे थेट मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात मांडले आहे.

    लाखो अनुयायांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी १६ ऑक्टोबर या पवित्र दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करणे काळाची गरज आहे. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण लोकहितकारी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रहपूर्ण विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो अनुयायांना शांतता आणि उत्साहाने या ऐतिहासिक स्थळी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • Chandrapur Zilla Parishad Reserved Seats । चंद्रपूर जिल्ह्यात 56 जागांची सोडत जाहीर, जाणून घ्या कोणत्या प्रवर्गाला किती जागा!

    Chandrapur Zilla Parishad Reserved Seats

    Chandrapur Zilla Parishad Reserved Seats :चंद्रपूर, दि. 13 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आली. सदर सोडतीनंतर निश्चित झालेले निवडणूक विभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. District Council Reserved Seats Maharashtra

    Also Read : चंद्रपूर भाजमध्ये नवीन नियुक्त्या

    प्रारुप आरक्षणाची अधिसुचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी 14 ऑक्टो 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्रारुप आरक्षण अधिसुचनेस ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी जिल्हाधिकारी / तहसील कार्यालयात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. Chandrapur District Council Election 2025

    चंद्रपूर जिल्हा परिषदेतील एकूण जागांचा तपशील

     : जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा असून महिलांकरीता आरक्षित जागांची संख्या 28 आहे. यात 1. अनुसुचित जाती (एकूण जागा – 8, महिलांसाठी राखीव – 4), 2. अनुसुचित जमाती (एकूण जागा – 13, महिलांसाठी राखीव – 7), 3. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा – 15, महिलांसाठी राखीव – 8), 4. सर्वसाधारण (एकूण जागा – 20, महिलांसाठी राखीव – 9) Chandrapur Zilla Parishad Reserved Seats

    जिल्हा परिषद चंद्रपूर मधील अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेत महिला राज येणार हे निश्चित. Chandrapur Zilla Parishad Reserved Seats

    असं आहे आरक्षण…

    • चिमूर तालुका
    • १) आंबोली-सावरगाव (अनुसूचित जमाती महिला)
    • २)शंकरपूर-डोमा (अनुसूचित जाती महिला)
    • ३) नवतळा-नेरी (अनुसूचित जमाती)
    • ४) गदगाव-खडसंगी (अनुसूचित जमाती महिला)
    • ५) मासळ बु.-पळसगाव (अनुसूचित जमाती)
    • नागभीड तालुका
    • ६) कानपा -मौशी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • ७)पारडी-बाळापूर बूज (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • ८) गोविंदपूर – तळोधी बा. (सर्वसाधारण महिला)
    • ९) गिरगांव-वाढोणा (सर्वसाधारण)
    • ब्रह्मपुरी तालुका
    • १०) नान्होरी-अऱ्हेर नवरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • ११) पिंपळगाव -मालडोंगरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • १२) खेडमक्ता-चौंगाण (सर्वसाधारण)
    • १३) गांगलवाडी-मेंडकी (सर्वसाधारण)
    • १४) आवळगाव-मुडझा (सर्वसाधारण)
    • सिंदेवाही तालुका
    • १५) नवरगाव-पळसगाव जाट (सर्वसाधारण महिला)
    • १६) गुंजेवाही-सरडपार (०नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • १७) रत्नापूर-शिवणी (सर्वसाधारण)
    • १८) मोहाळी नले-वासेरा (अनुसूचित जमाती महिला)
    • भद्रावती तालुका
    • १९) चंदनखेडा-मुधोली (अनुसूचित जमाती महिला)
    • २०) मांगली-नंदोरी (सर्वसाधारण)
    • २१) कुचना-शिवाजीनगर (अनुसूचित जाती)
    • २२) कोंढा-घोडपेठ (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • वरोरा तालुका
    • २३) खांबाडा-चिकणी (सर्वसाधारण महिला)
    • २४) टेम्भूर्डा-आबमक्ता (अनुसूचित जमाती)
    • २५)नागरी माढेळी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • २६) चरुरखटी-सालोरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • २७) शेगाव बु – बोर्डा (सर्वसाधारण)
    • चंद्रपूर तालुका
    • २८) दुर्गापूर (अनुसूचित जाती महिला)
    • २९) जुनोना (अनुसूचित जमाती)
    • ३०) कोंडीमाल (अनुसूचित जाती)
    • ३१) पडोली (अनुसूचित जाती)
    • ३२) नकोडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • मूल तालुका
    • ३३) राजोली-मारोडा (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • ३४) जुनासुर्ला-बेंबाळ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • ३५) चिंचाळा मो-सुशी दाबगाव (सर्वसाधारण)
    • सावली तालुका
    • ३६) अंतरंगाव-निमगाव (सर्वसाधारण महिला)
    • ३७) पाथरी – व्याहाड खुर्द (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • ३८) बोथली – कवठी (सर्वसाधारण)
    • ३९) व्याहाड बूज – हराम्बा (सर्वसाधारण)
    • पोंभूर्णा तालुका
    • ४०) देवाडा खुर्द – केमारा (अनुसूचित जमाती)
    • ४१) चितळधाबा- घोसरी (सर्वसाधारण महिला)
    • गोंडपिपरी तालुका
    • ४२) करंजी-खराळपेठ (सर्वसाधारण महिला)
    • ४३) विठ्ठलवाडा – भंगाराम तळोधी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • ४४) तोहोगाव – धाबा (अनुसूचित जाती महिला)
    • बल्लारपूर तालुका
    • ४५) विसापूर- बामणी (सर्वसाधारण महिला)
    • ४६) पळसगाव- कोठारी (सर्वसाधारण महिला)
    • कोरपना तालुका
    • ४७) भोयगाव-आवालपूर (सर्वसाधारण)
    • ४८) उपरवाही-नांदा (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
    • ४९) वनसडी- कोळशी बु (सर्वसाधारण महिला)
    • ५०) परसोडा – येरगव्हाण (अनुसूचित जमाती महिला)
    • जिवती तालुका
    • ५१) चिखली बु – शेणगाव (अनुसूचित जमाती महिला)
    • ५२) येल्लापूर – कुंभेझरी (अनुसूचित जमाती)
    • राजुरा तालुका
    • ५३) गोवरी-धोपटाला (अनुसूचित जाती महिला)
    • ५४) चुनाळा – विरूर स्टेशन (अनुसूचित जाती)
    • ५५) रामपूर – पाचगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
    • ५६) देवाडा- भेंडवी (अनुसूचित जमाती महिला)