Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Administration alert for Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रशासन सतर्क

    Administration alert for Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर प्रशासन सतर्क

    Administration alert for Lok Sabha elections संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आदर्श आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.

     

    भद्रावती तालुक्यातील पाटाळा आणि वणी मतदारसंघातील सीमेवर असलेल्या चेकपोस्टला जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी भेट दिली. यावेळी वरोराच्या उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम, तहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती) आदी उपस्थित होते.  Administration alert for Lok Sabha elections

     

    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. पाटाळा (ता. भद्रावती) येथील पथकांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही निष्काळजीपणा करू नये. Administration alert for Lok Sabha elections

     

    चारचाकी वाहनाच्या डिक्की सह वाहनाच्या सीट जवळील भागसुद्धा तपासावा. यात असणा-या बॅग्ज व इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी. पूर्णपणे खात्री झाल्यावरच संबंधित वाहनाला प्रवेश द्यावा. तसेच तालुक्यातील वरीष्ठ अधिका-यांनी रात्री – बेरात्री चेकपोस्टवर अकस्मिकपणे भेट द्यावी, असे निर्देश दिले. Administration alert for Lok Sabha elections

     

    यावेळी जिल्हाधिका-यांनी वरोरा – वणी मार्गावरील पाटाळा आणि वणी येथील चेकपोस्टला भेट दिली. किती जणांची टीम लावण्यात आली आहे, प्रत्येक टीममध्ये किती लोकांचा सहभाग असतो, प्रत्येक शिफ्टमध्ये काम करणा-यांच्या वेळापत्रक कसे आहे, आदी बाबींची माहिती जाणून घेतली. तसेच दोन्ही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचा-यांनी ऐकमेकांना मोबाईल क्रमांक देऊन ठेवावे, जेणेकरून एखादे वाहन न थांबता सुसाट गेले आणि संशयास्पद वाटले तर त्याची माहिती लगेच दुस-याला देणे शक्य होईल. Administration alert for Lok Sabha elections

     

    वरोरा येथे स्ट्राँग रुमची पाहणी : तत्पुर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून या परिसराला बॅरिकेटींग करावे, तसेच स्ट्राँग रुम सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागाने विशेष दक्ष राहावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

     

    असे आहेत प्रत्येक मतदारसंघनिहाय तैनात असलेले एसएसटी पथक : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 62 स्थायी निगराणी पथकांचे (एसएसटी) गठन करण्यात आले आहे. यात राजुरा विधानसभा मतदार संघात 15, चंद्रपूर – 4, बल्लारपूर – 6, वरोरा – 12, वणी – 13 तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 12 पथकांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 8 तर चिमूर मतदारसंघात 4 एसएसटीचे गठण करण्यात आले आहे.

  • Sudhir mungantiwar loksabha nomination : 26 मार्च रोजी मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Sudhir mungantiwar loksabha nomination : 26 मार्च रोजी मुनगंटीवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

    Sudhir mungantiwar loksabha nomination भाजपा चे चंद्रपूर लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार 26 मार्च ला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

     

    छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कार्यकर्ते व नागरिकांच्या भव्य उपस्थिती मध्ये नामांकन रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Sudhir mungantiwar loksabha nomination

    सध्या तर भाजप कडून सुधीर मुनगंटीवार एकमेव निवडणुकीच्या रिंगणात आहे अजूनही कांग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. Sudhir mungantiwar loksabha nomination

     

    मंगळवारी सकाळी 11 वाजता सुधीर मुनगंटीवार वणी-आर्णी व चंद्रपुरातील दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थिती मध्ये लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात अनेक मोठे नेते व सेलिब्रिटी सुद्धा चंद्रपुरात प्रचाराला येणार असल्याची माहिती आहे.

  • Four criminals deported from Chandrapur district : 4 गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

    Four criminals deported from Chandrapur district : 4 गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार

    Four criminals deported from Chandrapur district आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी 4 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.

    हे ही वाचा : अम्मा का टिफिन ची माहिती घेण्यासाठी विदेशातून आला पाहुणा

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधीक्षकांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

     

    यामध्ये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगार पंचशील वॉर्ड येथील 26 वर्षीय शुभम समुद, अष्टभुजा वार्ड, जयश्री लॉन जवळ राहणारा 29 वर्षीय शारुख नूरखान पठाण, लुम्बिनी नगर बाबूपेठ येथील 31 वर्षीय नैनेश उर्फ लाला नितीन शाहा व वरोरा येथील 25 वर्षीय मोहन केशव कुचनकर यांच्यावर कलम 56(1) (अ)(ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अनव्ये 6 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे. Four criminals deported from Chandrapur district

    हे ही वाचा – शहरात चोऱ्या वाढल्या, सीसीटीव्ही मात्र बंद

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केली.

  • MNS leaders join BJP : विजय मराठे यांचा भाजपात प्रवेश

    MNS leaders join BJP : विजय मराठे यांचा भाजपात प्रवेश

    MNS leaders join BJP पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेते भाजप पक्षात प्रवेश करीत आहे.

     

    मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी गिरनार चौक येथील भाजप कार्यालयात लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. MNS leaders join BJP

    हे ही वाचा : सुधीर भाऊ 15 वर्षात काय विकास केला? सांगा आधी

    सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा मराठे यांच्या गळ्यात टाकत स्वागत केले, मराठे यांच्यासोबत मनसे तालुका उपाध्यक्ष सचिन बाळस्कर व मनसे कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. MNS leaders join BJP

    विजय मराठे यांनी अनेक वर्षे मनसे पक्षात काम केले आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल असा अंदाज आहे.

     

    पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रामपाल सिंग, माजी नगरसेवक अजय सरकार यांची उपस्थिती होती.

  • Lok Sabha Nomination Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    Lok Sabha Nomination Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    Lok Sabha Nomination Application  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत चंद्रपूर, वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 20 मार्च पासून सुरूवात झाली आहे मात्र या तीन दिवसात कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

    वाचा – गुगल हिस्ट्री मुळे 26 लाखांची रोख रक्कम मिळाली

    20 मार्च रोजी 13 नामनिर्देशन अर्ज तर 21 मार्च रोजी 19 उमेदवारी अर्ज व 22 मार्चला 14 असे एकूण 46 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहे. Lok Sabha Nomination Application

     

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. Lok Sabha Nomination Application

     

    अद्यापही एकानेही चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही, होळी नंतर उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात अशी शक्यता आहे.

  • Congress workers will resign en masse : चंद्रपुरात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक, राजीनामे देणार

    Congress workers will resign en masse : चंद्रपुरात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक, राजीनामे देणार

    Congress workers will resign en masse चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली मात्र कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

     

     

    कांग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी मात्र ऐनवेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीचे नाव समोर केले. Congress workers will resign en masse

     

    शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्ष श्रेष्ठीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती, त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली.

    वाचा – मद्य पिऊन वाहन चालविणार तर कारवाई

    20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली. Congress workers will resign en masse

     

    21 मार्च ला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार, व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

     

    वडेट्टीवार यांनी राज्यातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे मात्र आज कांग्रेस पक्षात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे, जर आमदार धानोरकर यांना तिकीट मिळाली नाही तर आम्ही कांग्रेस पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. Congress workers will resign en masse

  • Special Operation of Chandrapur Police : 22 ते 25 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

    Special Operation of Chandrapur Police : 22 ते 25 मार्च रोजी चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम

    Special Operation of Chandrapur Police होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्या संदर्भात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

     

    24 व 25 मार्च रोजी होळी व धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, रंगांच्या उत्सवात विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते, पार्टी दरम्यान काही अतिउत्साही तरुण मंडळी दारू चा अति घोट प्राशन करीत, वाहन अतिवेगात चालविण्याचे प्रकार करतात त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Special Operation of Chandrapur Police

     

    वाचा – आता घरबसल्या करा मतदान, ही आहे प्रक्रिया

    चंद्रपूर वाहतूक पोलीस नियंत्रक शाखा अपघात कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करीत आहे, अति-उत्साही तरुणांची हुल्लडबाजी व रॅश ड्रायव्हिंग वर आळा घालण्याचा उद्देशाने 22 ते 25 मार्च ला चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे.

     

    या मोहिमेदरम्यान कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. Special Operation of Chandrapur Police

     

    त्याकरिता कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवू नये, उत्सवाच्या या सणात कुणाच्याही निष्पाप आयुष्याचा बेरंग होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.

     

  • Notification of Election Commission of India : चंद्रपुरातील या नागरिकांना घरबसल्या मतदानाचा अधिकार

    Notification of Election Commission of India : चंद्रपुरातील या नागरिकांना घरबसल्या मतदानाचा अधिकार

    Notification of Election Commission of India भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

     

    85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. Notification of Election Commission of India

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षाचा लोकसभा उमेदवार ठरला

    85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 16621 मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 7117 तर स्त्री मतदारांची संख्या 9504 आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार 2754 (पुरुष – 1163, स्त्री – 1591), चंद्रपूर मतदार संघात 2380 (पुरुष – 1100, स्त्री – 1280),  बल्लारपूर मतदार संघात 2246 (पुरुष – 892, स्त्री – 1354), वरोरा मतदार संघात 2878 (पुरुष – 1356, स्त्री – 1522), वणी मतदार संघात 2846 (पुरुष – 1225, स्त्री – 1621, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात 3517 (पुरुष – 1381, स्त्री – 2136) मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

     

    तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 85 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 (पुरुष – 921, स्त्री – 1482) आणि चिमूर मतदार संघात 2594 (पुरुष – 996, स्त्री – 1598) मतदार आहेत. Notification of Election Commission of India

     

    असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 9679 आहे. यात 6164 पुरुष तर 3515 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात 1233 दिव्यांग मतदार (पुरुष – 781, स्त्री – 452), चंद्रपूर मतदार संघात 913 दिव्यांग मतदार (पुरुष – 591, स्त्री – 322), बल्लारपूर मतदार संघात 1842 दिव्यांग मतदार (पुरुष – 1195, स्त्री – 647), वरोरा मतदार संघात 1551 दिव्यांग मतदार (पुरुष – 1021, स्त्री – 530), वणी मतदार संघात 1679 दिव्यांग मतदार (पुरुष – 1035, स्त्री – 644), आर्णी मतदार संघात 2461 दिव्यांग मतदार (पुरुष – 1541, स्त्री – 920) आहेत. Notification of Election Commission of India

     

    तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या 1138 (पुरुष – 774, स्त्री – 364) आणि चिमूर मतदार संघात 1096 (पुरुष – 681, स्त्री – 415) मतदार आहेत.

  • Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out : चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

    Chandrapur Police Mission All Out लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस एक्शन मोड वर आली असून 19 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात तब्बल 35 ठिकाणी नाकाबंदी करीत मिशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली.

     

    ऑल आऊट मोहिमेदरम्यान 78 हॉटेल, लॉज व धाबे चेक करण्यात आले, यावेळी 821 वाहनांची तपासणी करून 64 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करीत 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Chandrapur Police Mission All Out

     

    या मोहिमेत रेकॉर्ड वरील व कारागृहातून सुटलेले व प्रलंबित खटल्यातील 160 समन्स बजावणी करून 61 आरोपीना अटक करण्यात आली.

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेत आव्हान देणारा नेता भाजपात सामील

    अवैध दारू बाळगणाऱ्यावर तब्बल 22 केसेस, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे 1 व पोलीस स्टेशन येथे 2 केसेस भारतीय हत्यार कायद्यांव्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले. Chandrapur Police Mission All Out

     

    तसेच राजुरा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित तंबाखू बाळगणाऱ्या इसम विरुद्ध गुन्हा नोंद करून 3 लाख 36 हजार 200 रुपयांचा माल असा 8 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर जिल्हा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील 52 पोलीस अधिकारी व 265 पोलीस अंमलदार यांनी केली.

  • Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP : विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना आव्हान

    Bablu Katre’s entry into BJP लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते व पदाधिकारी पक्ष बदलवित असतात या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेचे माजी पदाधिकारी बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

    वाचा – चंद्रपुरातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

    वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मधून निवडणूक लढत थेट सुधीर मुनगंटीवार यांना आव्हान देणारे शिवसेनेचे माजी कामगार सेना जिल्हाप्रमुख बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बबलू कटरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.

     

    वर्ष 1993 पासून शिवसेनेत तब्बल 30 वर्षे काम करणारे बबलू कटरे यांनी शाखा प्रमुख, दुर्गापूर ग्रामपंचायत सरपंच ते कामगार सेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मजल मारली. Bablu Katre’s entry into BJP

    वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश

    विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कटरे यांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढली होती.

     

    यावेळी कटरे यांच्याशी संपर्क केला असता मी 30 वर्ष शिवसेना पक्षात काम केले, अनेक पदे पण भूषवली मात्र आज शिवसेना सोडून जाताना मी असंख्य आठवणी सोडून जात आहो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, मात्र काही कारणासाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतो अशी प्रतिक्रिया कटरे यांनी दिली. Bablu Katre’s entry into BJP

     

    बबलू कटरे यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थित आपले सहकारी अतुल कटरे, श्याम वाढई, राजू कटरे सह भाजपात प्रवेश केला, यावेळी मुनगंटीवार यांनी पक्षाचा दुपट्टा कटरे यांच्या गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.